Friday, 15 July 2016

नमस्कार लाईव्ह १५-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८० नागरिक ठार 
नीसमधील सर्व भारतीय सुखरुप, हा आहे हेल्पलाईन नंबर.. 
नीसमध्ये प्रत्येक पाच मीटरवर मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा 
द. सुदानमधील 152 भारतीय सुखरूप परतले 
फ्रान्सवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'इसिस'ने स्वीकारली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लपलाय भारतात? 
भाव कमी न केल्यास कारवाई 
एमडी, डिप्लोमा पॅथॉलॉजीच्या ३ वर्षांत ३३ जागा रिक्त 
हार्दिक पटेल नऊ महिन्यानंतर कारागृहाबाहेर 
मी दहशतवादाला प्रोत्साहन दिले नाही- झाकिर 
फ्रान्स हल्ल्यातील मृतांमध्ये भारतीय नाही 
दु :खद क्षणी फ्रेंच नागरिकांसोबत भारत- मोदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
गोल्डन मॅन दत्तात्रय फुगेचा दगडाने ठेचून खून 
आजारपणाला कंटाळून आईने केली मुलाची हत्या; दुसरा मुलगा वाचला 
खड्ड्यांवर चर्चा नको, जाब विचारा 
शिक्षकांअभावी घसरतेय पालिका शाळांची पटसंख्या 
ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचे निधन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
भुसावळमधील विकास कॉलनीतील विठ्ठल मंदिरात चोरी, चोरट्यांनी दानपेटी लांबवली 
बीड; धुमाकुळ घालणारी चंदन चोरांची टोळी जेरबंद. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
मुंबईत अजून एका मॉडेलची संशयास्पद आत्महत्या 
'गोलमाल-4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 
गायक अभिजीतविरोधात गुन्हा दाखल, ट्विटरवर अपशब्द...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांच्या नांदेड शाखेच्या शुभारंभ निमित्त हार्दिक शुभेच्छा*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

==================================

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८० नागरिक ठार


  • ऑनलाइन लोकमत
    नाईस, दि. १५ -  फ्रान्समधील नीस शहरात राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना एका इसमाने ट्रकने चिरडल्याने ८० जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. नीस शहरात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून हा एक दहशतवादी हल्लाच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील गंभीर जखमींची संख्या वाढतच चालली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान निरपराध नागरिकांना चिरडणा-या त्या माथेफिरूला कंठस्नान घालण्यात फ्रान्स पोलिसांना यश मिळाले आहे. 
    मिळालेल्या माहितीनुसार, नीस शहरातील फ्रेंच रिव्हेरा रिसॉर्टमध्ये काही नागरिक राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले असतानाच अचानक एका ट्रक चालकाने उपस्थितांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये ८० हून अधिक ठार झाले. दरम्यान त्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा असल्याचे उघड झाले आहे.  या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिका-यांनी घटनास्थऴी धाव घेतली तसेच रुग्णवाहिकाही तेथे तातडीने पोचल्या.
.
.==================================

नीसमधील सर्व भारतीय सुखरुप, हा आहे हेल्पलाईन नंबर..


  • दोन किमीच्या परिघातील गर्दीवर ट्रक चढवणा-या या ट्रक ड्रायव्हरला ठार करण्यात आले आहे. नीसच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. पॅरिसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आठ महिन्यातच फ्रान्समध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. 
  • ऑनलाइन लोकमत 
    नीस, दि. १५ - फ्रान्समधील नीस शहरातील रिसॉर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाही भारतीयाला हानी पोहोचलेली नाही. सर्व भारतीय सुखरुप आहेत अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली आहे. नीसमधील रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरु असताना एका अतिरेक्याने जमलेल्या गर्दीमध्ये ट्रक घुसवून अनेकांना चिरडले. यात आतापर्यंत ८० जण ठार झाले आहेत.  
    पॅरिसमधील भारतीय राजदूत नीसमधील भारतीयांच्या संपर्कात असून, आतापर्यंत कोणाही भारतीयाला हानी पोहोचल्याचे वृत्त नाही असे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी टि्वटवरुन सांगितले. पॅरिसमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.
.
.==================================

गोल्डन मॅन दत्तात्रय फुगेचा दगडाने ठेचून खून


  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि.१५ -  सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे जगभर गाजलेले पिंपरी-चिंचवडचे गोल्डमॅन दत्ता फुगे यांचे चार ते पाच जणांनी घरातून अपहरण करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला. दिघी येथील भारतमातानगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार-पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये फुगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. 
    रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाचजणांनी बळजबरीने नेले होते, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
    फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती  पोलीस तपासात पुढे आली आहे.

.
.==================================

नीसमध्ये प्रत्येक पाच मीटरवर मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा


  • ऑनलाइन लोकमत
    नीस, दि. १५ - फ्रान्सच्या नीस शहरात मन सुन्न करुन टाकणारे दृश्य आहे. नीसमध्ये प्रत्येक पाच मीटरवर एक मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा असे चित्र आहे.  आतापर्यंत ८० जण या हल्ल्यात ठार झाले असून, १८ जखमींची प्रकृती गंभीर आहे. 
    रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीमध्ये घुसवण्यात आलेला ट्रक हा दहशतवादी हल्लाच असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद यांनी स्पष्ट केले आहे. या ट्रकमधून मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, या हल्लेखोराने जमलेल्या गर्दीला ट्रकखाली चिरडताना अंदाधुंद गोळीबारही केला होता. 
    राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने होणारी आतषबाजी पाहण्यासाठी येथे गर्दी जमली होती. यावेळी गर्दीमध्ये जल्लोष, उत्साहाचे वातावरण असताना अचानक १९ टन वजनाचा ट्रक अतिवेगाने गर्दीमध्ये घुसला व बेदरकारपणे समोरच्यांना उडवण्यास सुरुवात केली. सर्वत्र एकच किंकाळया ऐकू येत होत्या. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळत होता. 
    ट्रकमध्ये सापडलेली कागदपत्रे ३१ वर्षांच्या युवकाची असून तो फ्रेंच, टयुनिशनय नागरीक आहे. मृतांमध्ये मोठया प्रमाणावर लहान मुलांचा समावेश आहे.  
.
.==================================

ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लपलाय भारतात?


  • ऑनलाइन लोकमत 
    कोलकाता, दि. १५ - बांगलादेशात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतात लपून बसला आहे असा दावा ढाका ट्रीब्युन या बांगलादेशी वर्तमानपत्राने केला होता. आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे परराष्ट्र सल्लागार गवाहर रिझवी यांनी सुद्धा कटाचा मुख्य सूत्रधार भारतात असल्याचे संकेत दिले आहेत. 
    बांगलादेशातून बेपत्ता असलेल्या युवकांसंबंधीची माहिती भारताला देणार असल्याचे रिझवी यांनी सांगितले. ढाक्यातील होली आर्टीसन बेकरी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हल्ल्याच्या सात महिने आधीच पश्चिम बंगालमध्ये निघून गेला होता असे ढाका ट्रीब्युनने आपल्या वृत्तात म्हटले होते. बंगाल पोलिस एमडी सुलेमानच्या शोधात आहेत. अबु अल मुसा अल बंगालीच्या चौकशीत सुलेमानचे नाव समोर आले होते. 
.
.==================================

भाव कमी न केल्यास कारवाई


  • अतुल कुलकर्णी,  मुंबई
    मिलमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडलेल्या मुगावर तब्बल ९७ टक्के, मूगडाळीवर ९० टक्के, मसूरडाळीवर ७७ टक्के आणि तूरडाळीवर ४८ टक्के किमती वाढवून विक्री केल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने मॉल व्यवस्थापनाची बैठक घेऊन तातडीने भाव कमी करा, नाहीतर कारवाईला सामोरे जा, अशा शब्दांत सुनावले आहे.
    डाळविक्रीतील नफेखोरीने टोक गाठल्याने त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न एका संस्थेने केला. त्यांनी विविध ठिकाणांहून डाळी विकत घेतल्या व दरातील प्रचंड फरक दाखविणाऱ्या पावत्याच एफडीएच्या अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या. त्यानंतर एफडीएचे प्रधान सचिव महेश पाठक, उपसचिव सतीश सुपे आणि अव्वर सचिव प्रवीण नलावडे यांनी मॉलमध्ये विक्री करणाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीला रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अक्षय काळे, आदित्य बिर्ला रिटेल लि.चे गोपाळ नाईक, हायपरसिटी रिटेल इंडिया लि.च्या संपदा गाडगीळ आणि फ्यूचर रिटेल लि.चे सुनील साळगावकर हजर होते. मात्र रिलायन्स, बीग बझार, डीमार्ट असे मोठे मॉलचालक हजर नव्हते. डाळींचे दर कमी करा नाहीतर प्रशासन कठोर कारवाई करेल, असे त्यांना सांगण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
.
.==================================

आजारपणाला कंटाळून आईने केली मुलाची हत्या; दुसरा मुलगा वाचला


  • मुंब्रा : स्वत:च्या आजारपणाला कंटाळून एका आईने तिच्या चिमुरड्या मुलाची हत्या करून, दुसऱ्या मुलास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना दिव्यात घडली. यामुळे दिव्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
    येथील मुंब्रादेवी कॉलनीतील वैभव कॉम्प्लेक्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारी संपा कर्मकार ही महिला मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, कावीळ, न्यूमोनिया या आजारांनी त्रस्त आहे. या आजारपणात स्वत:च्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास मुले उघड्यावर पडतील, तसेच त्यांचे हाल होतील, या भीतीने तिला ग्रासले होते.
    मागील काही दिवसांपासून संपा विमनस्क अवस्थेत वावरत होती. बुधवारी संध्याकाळी तिने तिचा पावणेदोन वर्षांचा मुलगा ईशान याच्या गळ्यावर आणि पोटावर विळीने वार करून त्याची हत्या केली.
.
.==================================

खड्ड्यांवर चर्चा नको, जाब विचारा


  • स्नेहा मोरे,  मुंबई
    मुंबईच्या खड्ड्यांवर आपापसांत चर्चा करण्याऐवजी राज्यकर्त्यांना जाब विचारा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुंबईकरांना दिला आहे. उदासीनता झटकून प्रश्न विचारले तरच काहीतरी फरक पडेल, असेही नाना यांनी सुचविले.
    बॉम्बे आर्ट सोसायटीने १२५ वर्षे पूर्ण केली त्यानिमित्ताने ‘द पोट्रेट शो’ या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी वांद्रे येथील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कलादालनात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या दीपप्रज्लवन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी नाना बोलत होते. कार्यक्रमाला उशीरही या खड्ड्यांमुळेच झाल्याचे ते म्हणाले.
    याप्रसंगी, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत, दत्तात्रय पाडेकर , नरेंद्र विचारे, चंद्रजीत यादव, अनिल नाईक आणि ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे अशी कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. या प्रदर्शनात नवोदित आणि प्रसिद्ध चित्रकारांची अप्रतिम व्यक्तिचित्रे मांडण्यात आली आहेत. याप्रसंगी, नाना यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, कलाकारांची पाठही थोपटली.
.
.==================================

शिक्षकांअभावी घसरतेय पालिका शाळांची पटसंख्या


  • मुंबई : पालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या मोहिमेला शिक्षण खातेच हरताळ फासत असल्याचे उजेडात आले आहे़ मुंबईतील चार विभागांतील २० शाळांमध्ये तब्बल दीडशे शिक्षकांची अद्याप नियुक्ती झालेली नाही़ याचा परिणाम पटसंख्येवर होऊ लागला आहे़ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने एक-एक विद्यार्थी दररोज गळू लागला आहे़
    पालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, सकस आहार व विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो़ मात्र पालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने या मोहिमेचे उद्दिष्टच धोक्यात आले आहे़ नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्याप काही शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक झालेली नाही़
    ‘तांत्रिक अडचण’ असे या दिरंगाईला प्रशासन नाव देत आहे़ मात्र या अडचणीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे़ चेंबूर येथील महापालिका शाळेतील इयत्ता ६वीच्या वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या ३३वरून १६वर घसरली आहे़ ही बाब शिक्षण खात्याच्या कानावर टाकल्यानंतरही कोणतीच पावलं उचलण्यात येत नसल्याने मुख्याध्यापकही हवालदिल झाले आहेत़ 
.
.==================================

एमडी, डिप्लोमा पॅथॉलॉजीच्या ३ वर्षांत ३३ जागा रिक्त

  • First Published :15-July-2016 : 02:00:18

  • पूजा दामले,  मुंबई
    बोगस पॅथॉलॉजी लॅबमधून सुरू असलेल्या निदानाच्या काळ्या बाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खुलेआमपणे राज्यात खेळ सुरू आहे. तथापि, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा विळखा अधिक घट्ट होत आहे. याचा परिणाम पदव्युत्तर अभ्यासक्रमावरही झाल्याचे दिसून येत आहे. २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर (एमडी, डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या ३३ जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. निदानाच्या काळ्या बाजारामुळे पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे डॉक्टर पाठ फिरवत असल्याचेही यामुळे समोर आले आहे.
    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत राज्यातील एकूण २८ वैद्यकीय महाविद्यालये येतात. या वैद्यकीय महाविद्यालयांत पॅथॉलॉजीच्या एकूण ४६४ जागा आहेत. त्यापैकी ३९८ जागा या एमडी अभ्यासक्रमासाठी तर ६६ जागा या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेल्या तीन वर्षांपासून पसंती घटत असल्याचे दिसून येत आहे. ताप, जास्त काळापासून असलेला खोकला, दीर्घकाळचे दुखणे आदी कारणांसाठी डॉक्टर रक्त, मूत्र, बॉडी फ्युएडच्या तपासणी करण्याचे सांगतात. तपासणी अहवालावरून आजाराचे निदान करून औषधोपचार सुरू केले जातात, म्हणूनच आरोग्य क्षेत्रात पॅथॉलॉजी शाखा महत्त्वाची मानली जाते. 
.
.==================================
हार्दिक पटेल नऊ महिन्यानंतर कारागृहाबाहेर

अहमदाबाद- पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल नऊ महिन्यानंतर सुरत येथील कारागृहातून आज (शुक्रवार) सकाळी बाहेर आला. न्यायालयाच्या आदेशानुसार 48 तासात त्याला गुजरात सोडावे लागणार असून, सहा महिने गुजरात बाहेर रहावे लागणार आहे.

आरक्षणाच्या मागणीवरून सुरू झालेले आंदोलन चिघळल्यानंतर तेवीस वर्षीय हार्दिक पटेलला अटक झाली होती. ऑक्‍टोबर 2015 पासून तो सूरत येथील कारागृहात होता. त्याच्यावर तीन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन खटल्यांत त्याला नुकताच जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, विसानगर खटल्यासंदर्भातील जामीनाअभावी तो तुरुंगातून बाहेर पडणे शक्‍य नव्हते. मात्र, गुजरात उच्च न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत त्याला जामीन मंजूर करण्यात आला व कारागृहातून तो बाहेर आला. 
.
.==================================
मी दहशतवादाला प्रोत्साहन दिले नाही- झाकिर

मुंबई - ‘मी गेल्या 25 वर्षांपासून जाहीर व्याख्याने देत असून कधीही दहशतवादाला प्रोत्साहन दिलेले नाही‘, अशा प्रतिक्रिया मुस्लिम धर्मोपदेशक झाकिर नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

"स्काईप‘द्वारे नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नीस येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. ते म्हणाले, "माझ्यावर झालेल्या सर्व आरोप खोडून काढणारी माहिती देणारे पेन ड्राईव्हज्‌ मी सर्वांना देणार आहे. आपण निष्पक्षपातपणे त्याकडे पाहावे. त्यातून मी निर्दोष असल्याचे तुम्हाला दिसेल.‘ तसेच माध्यमांनी माझ्या वक्तव्य बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. निर्दोष लोकांना ठार करणाऱ्या आत्मघातकी हल्ल्याला इस्लाममध्ये परवानगी नसून तो चूक असल्याचेही नाईक म्हणाले. ‘मी शांतीसाठी व्याख्याने देतो, हिंसेसाठी चिथावणी देत नाही‘, असा दावाही यावेळी त्यांनी केला.

बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी डॉ. नाईक यांचे नाव घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आपण दहशतवादी बनलो. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असे सांगितल्याचे उघड झाल्याने ते चर्चेत आले आहेत. या हल्ल्यात  एका भारतीय युवतीसह वीस जणांचा मृत्यू झाला.

.
.==================================
ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचे निधन

मुंबई- ज्येष्ठ पत्रकार, नवशक्तीच्या माजी संपादिका, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माजी कार्यकारी संपादिका वसुंधरा पेंडसे नाईक यांचे प्रदीर्घ आजाराने आज (शुक्रवार) येथे निधन झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद, लोकप्रभा साप्ताहिक व अन्य काही नियतकालिकांचे संपादकत्व (महाराष्ट्र), राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि शिवाय मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या. भारत निर्माण या संस्थेच्या त्या 1999 सालच्या टॅलेन्टेड लेडीज वॉर्डच्या मानकरी होत्या. वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत.

.
.==================================
द. सुदानमधील 152 भारतीय सुखरूप परतले

तिरुअनंतपुरम - दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या 152 भारतीयांना हवाई दलाच्या ‘सी-17‘ विमानाने आज (शुक्रवार) सकाळी भारतामध्ये सुखरूप आणण्यात आले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्‌विटरद्वारे माहिती दिली आहे.

दक्षिण सुदानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने "संकट मोचन‘ नावाची मोहिम राबविली. या मोहिमेअंतर्गत दोन स्वतंत्र विमानांनी भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले. पहिल्या विमानात नऊ भारतीय आणि दोन नेपाळच्या नागरिकांना भारतात सुखरूप आणण्यात आले. तर ‘सी-17‘ नावाच्या दुसऱ्या विमानाने एकूण 10 महिला, तीन बालकांसाठी एकूण 143 भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या भारतात आणण्यात आले.
.
.==================================
दु :खद क्षणी फ्रेंच नागरिकांसोबत भारत- मोदी

नवी दिल्ली - आमच्या फ्रेंच बंधू आणि भगिनींसोबत भारत खंबीरपणे उभा असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.



मोदी यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, "नीसमधील या भयानक हल्ल्याबाबत समजले. हिंसेच्या या बेदरकार कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या दु:खद प्रसंगी आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत.‘ तसेच हल्ल्यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील अशी आश व्यक्त करतो. या प्रचंड दु:खद प्रसंगी भारतीय नागरिक फ्रेंच बंधू भगिनींसोबत आहेत‘, अशा शब्दांत मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिनाचे सेलिब्रेशन सुरु असताना प्रचंड गर्दीत ट्रक घुसल्याने झालेल्या अपघातात 73 जण ठार तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
.
.==================================
फ्रान्स हल्ल्यातील मृतांमध्ये भारतीय नाही

नवी दिल्ली - फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अद्यापपर्यंत एकही भारतीय आढळून आला नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्‌विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. "आमचे पॅरिसमधील राजदूत नीसमधील भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. हल्ल्यात अद्यापपर्यंत एकही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही.‘ तसेच भारतीय दूतावासाने पॅरिमध्ये मदत क्रमांकही (33-1-40507070) जाहीर केले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त सुरू असलेल्या सेलिब्रेशनदरम्यान एक ट्रक प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अचानक घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान 80 जण ठार तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून त्याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही.
.
.==================================

No comments: