Sunday, 24 July 2016

नमस्कार लाईव्ह २४-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- काश्मीर प्रश्नावरुन भारताचं पाकिस्तानला सणसणीत उत्तर! 
२- काबुलमधील आत्मघाती स्फोटातल्या मृतांचा आकडा 83 वर 
३- जर्मनी : एका हल्लेखोराच्या अंदाधुंद गोळीबारात ९ ठार 
४- भारताकडून तीन चिनी पत्रकारांची हकालपट्टी 
५- बॉंबस्फोटाने काबूल हादरले; 61 जण ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
६- हवाईदलाच्या विमानाचा 48 तासानंतरही पत्ता नाहीच 
७- राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपच्या वाटेवर? 
८- पाक शिवसेनेचाच दुश्मन आहे का? उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र 
९- हैदराबाद; सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू 
१०- महिला सर्वच क्षेत्रात अव्वल - नीता अंबानी 
११- एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्सच्या विरोधात जास्त तक्रारी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी 
१३- हवाईदलाच्या 'त्या' विमानात निगडीचे कुणाल बारपट्टे बेपत्ता 
१४- रायगडमध्ये धबधब्यांवर जमावबंदीचा आदेश, पर्यटकांचा हिरमोड 
१५- घरबसल्या करा पोलिस तक्रार, ई-तक्रार सेवा लाँच 
१६- एक रुपयाचं खोटं काम केलं नाही, रस्ते घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं 
१७- "त्यांनी' तब्बल आठशे जणांना केले मुसलमान... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१८- सोलापूर; 'आस्था'ने दिला असहाय आजीला आधार 
१९- लाल चौकात ध्वजवंदनाचा विद्यार्थिनीचा निर्धार 
२०- मुंबई; टोल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटवलं 
२१- पिंपरीत तरुणावर आठ जणांकडून अंदाधुंद गोळीबार 
२२- चेनई; बारावी नापास असूनही बनली डॉक्टर 
२३- लैंगिक अत्याचारग्रस्तांना गाव सोडण्याची वेळ 
२४- मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान! 
२५- दिल्ली; बलात्काराची धमकी: आप आमदार अटकेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२६- वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत 
२७- कंडक्टर ते कबाली, रजनीकांतचा थक्क करणारा प्रवास 
२८- अँटिगा कसोटीः भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, शमीचं दमदार पुनरागमन 
२९- अमेरिकेत भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय 
३०- ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी 
३१- भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम 
३२- वेस्ट विंडीजला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा 
३३- अँटिगा कसोटीः वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की, शमी, यादवचा भेदक मारा 
३४- ...तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा : नागराज मंजुळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
====================================

कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
मुंबई : भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधील सहभागाच्या स्वप्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. उत्तेजक सेवन चाचणीत नरसिंग दोषी आढळल्याचा माहिती आहे.

नाडा अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत 5 जुलै रोजी चाचणी केली होती. या चाचणीमध्ये नरसिंग यादव ए, बी सॅम्पलमध्ये दोषी आढळला आहे.

महाराष्ट्राचा पैलवान त्याच्या कामगिरीसोबतच सततच्या वादांमुळे चर्चेत राहिला आहे. ऑलिम्पिकला सुशीलकुमार जाणार की नरसिंग यावरुन चढाओढ सुरु होती. अखेर नरसिंगच्या बाजूने कौल लागल्यामुळे महाराष्ट्रातून आनंद व्यक्त केला जात होता. मात्र तो डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्ताने कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्याचप्रमाणे नरसिंग यादव आणि त्याचे कोच यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
====================================

हवाईदलाच्या 'त्या' विमानात निगडीचे कुणाल बारपट्टे बेपत्ता

हवाईदलाच्या 'त्या' विमानात निगडीचे कुणाल बारपट्टे बेपत्ता
पुणे : पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या विमानातील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे. हवाईदलाच्या बेपत्ता विमानात असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल निगडीत राहणारे आहेत.

28 वर्षीय कुणाल बारपट्टे हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील ते रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना एक धाकटा भाऊ आहे.


विमान बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यावर बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

कुणाल यांचे मामा दिनेश पाटील यांनी हवाई दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही माहिती मिळू न शकल्याने चिंतेत भरच पडली. या घटनेबाबत संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटवर दिनेश पाटील यांनी कुणाल यांच्याविषयी विचारणा केली.
====================================

वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत

वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत
मुंबईः सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ने पहिल्या दिवशी 55 कोटींची बंपर ओपनिंग करत भारतीय सिनेमांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफीसवर ‘कबाली’ची दुसऱ्या दिवशीची कमाई 45 ते 50 कोटी रुपये अपेक्षित आहे. यासोबतच ‘कबाली’ने सलमान खानच्या ‘सुलतान’लाही मागे टाकलं आहे.


‘सुलतान’ने पहिल्या दिवशी 36.54 कोटींचा गल्ला जमवला होता. तर कबालीने पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई केली. रजनीकांतचा हा तिसरा हायबजेट सिनेमा आहे. या सिनेमाचं एकूण बजेट 110 कोटी रुपये आहे.

परदेशात भारतीय सिनेमाचा विक्रम
‘कबाली’ने परदेशात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्याच दिवशी ‘कबाली’ने अमेरिका, कॅनडा आणि मलेशियामध्ये 13 कोटींची कमाई केली. ‘कबाली’ वर्ल्डवाईड सहा हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर भारतात 12 हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे.
====================================

हवाईदलाच्या विमानाचा 48 तासानंतरही पत्ता नाहीच

हवाईदलाच्या विमानाचा 48 तासानंतरही पत्ता नाहीच
नवी दिल्लीः वायूदलाचं ‘AN-32’ हे विमान गायब होऊन आता जवळपास 48 तास होत आहेत. त्यामुळे हे विमान सापडण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चेन्नईत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पी8आय या विमानातून संपूर्ण शोधमोहीमेची माहिती पर्रीकर यांनी घेतली आहे. मात्र 48 तास उलटूनही विमानाचा काही थांगपत्ता नसल्यामुळे चिंतेची बाब बनली आहे.
या विमानाने 29 जणांना घेऊन शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चेन्नईच्या तंबराम बेसवरुन उड्डाण भरलं. मात्र 16 मिनीटांच्या प्रवासानंतर या विमानाचा मुख्य रडार यंत्रणेशी संपर्क तुटला. ‘AN-32’  या विमानात सहा क्रू मेंबरसह 29 जण आहेत.
====================================

रायगडमध्ये धबधब्यांवर जमावबंदीचा आदेश, पर्यटकांचा हिरमोड

रायगडमध्ये धबधब्यांवर जमावबंदीचा आदेश, पर्यटकांचा हिरमोड
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या धबधब्यांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहाला निर्बंध घालण्यासाठीच प्रशासनातर्फे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खालापूर परिसरातल्या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसात कर्जत आणि खालापूर भागात 7 पर्यटकांना धबधब्याखाली पाय घसल्यानं जीव गमवावा लागला आहे. सेल्फी किंवा फोटो काढण्याचा नाद अनेकांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे.
अतिउत्साही पर्यटकांच्या अघोरी धाडसामुळे प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं म्हटलं जात आहे. या जमावबंदीच्या निर्णयामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
====================================

आता घरबसल्या करा पोलिस तक्रार, ई-तक्रार सेवा लाँच

आता घरबसल्या करा पोलिस तक्रार, ई-तक्रार सेवा लाँच
पुणेः महाराष्ट्र राज्य पोलीस 14 व्या कर्तव्य मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर ई-कम्प्लेंट सिस्टीमचं अनावरण करण्यात आलं. यापुढे घरबसल्या राज्यातील कोणत्याही पोलीस स्थानकात तक्रार करता येणार आहे. मात्र त्याआधी हा प्रयोग पुणे आणि नंतर राज्यभरात  राबवण्यात येणार आहे.


ही देशातील पहिली एवढी टेक्नोसॅव्ही सिस्टम आहे. मुख्यमंत्र्यांनी  नागपूर पोलीस स्टेशनमधे 1 तक्रार  दाखल  केली. तिकडच्या पीआयने तक्रार ऑनलाइन  नोंद झाल्याचा कॉल केला आणि या प्रायोगीक  सेवेची सुरूवात झाली.
====================================

कंडक्टर ते कबाली, रजनीकांतचा थक्क करणारा प्रवास

कंडक्टर ते कबाली, रजनीकांतचा थक्क करणारा प्रवास
मुंबई : रजनीकांतचा कबाली सिनेमा प्रदर्शित झाला आणि नेहमीप्रमाणे लोकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. अर्थात रजनीकांतच्या सिनेमासाठी चाहत्यांना वेड लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. रजनीकांतला जितकं चाहत्यांचं प्रेम मिळालंय तेवढं आजवर कुठल्याचं अभिनेत्याला मिळालं नसेल. कसा झाला रजनीकांतचा प्रवास… कबाली सिनेमानिमित्त एक स्पेशल रिपोर्ट..

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उर्फ द रजनीकांत, जो कधी सुट्टी पाहून सिनेमा रिलीज करत नाही… तर तो फिल्म करतो आणि सुट्टी जाहीर होते.. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बॉस… अवघ्या 65 वर्षांचा हा तरणाबांड महानायक… गेल्या 40 वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा देव आहे… पण काय आहे या चेहऱ्याचा इतिहास? जाऊयात थोडं फ्लॅशबॅकमध्ये.

2 डिसेंबर 1950. बंगलोरमधल्या रामोजी राव आणि रमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड. जन्म बंगलोरमध्ये झाला असला, तरी रजनीकांतचे मूळ हे महाराष्ट्रात आहे…
====================================

टोल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटवलं

टोल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटवलं
मुंबई : गुजरातमधील गोध्रात टोल न भरण्यावर अडून राहिलेल्या कारचालकाने टोल कर्मचाऱ्याला तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत घासत नेलं. गोध्रा-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर कर्मचाऱ्याने कारचालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण या प्रयत्नात कारने त्याला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं.


टोलनाक्यावर कारचालकाने टोल देण्यास मनाई केल्यावर तेथील एक कर्मचारी कारच्या बोनेटवर चढला, परंतु तेव्हाच कारचालकाने कार सुरू करून तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत नेलं.


हा सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फक्त 60 रूपयांसाठी हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत टोलनाक्यांवर होणाऱ्या अशा घटनांमुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
====================================

पिंपरीत तरुणावर आठ जणांकडून अंदाधुंद गोळीबार

पिंपरीत तरुणावर आठ जणांकडून अंदाधुंद गोळीबार
पिंपरीः पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरात तरुणावर सात ते आठ तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुण गंभीर झाला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.


अमित चव्हाण असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आदित्य आहिरराव, सिलव्या उर्फ संदेश चोपडे, संदीप पवार आणि इतर पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. एकही गोळी न लागल्याने अमित बचावला असला तरी तो यात गंभीर जखमी झाला आहे. अमितला कोयता आणि लाथा-बुक्कयाने जबर मारहाण करण्यात आली.


अमितवर हा हल्ला कशामुळं करण्यात आला, याचा पोलिस तपास करत आहेत. मात्र गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. पिंपरी परिसरात गेल्या काही दिवसात गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.
====================================

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपच्या वाटेवर?

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपच्या वाटेवर?
मुंबई : राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत ते लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.


भारतीय जनता पक्षाच्या ऑफरवर संभाजीराजेंनी तूर्तास वेट अँड वॉच हे धोरण स्वीकारलं आहे. भाजपकडून काय ऑफर येईल यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान नरेंद्र जाधव यांनी सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर भाजपनं संभाजीराजेंना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता संभाजी राजेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
====================================

पाक शिवसेनेचाच दुश्मन आहे का? उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

पाक शिवसेनेचाच दुश्मन आहे का? उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र
मुंबई : ‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, या शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखातीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेतली आहे. आम्ही हिंदुत्वासाठी हल्ले सहन करायचे, संकटे अंगावर घ्यायची व इतरांनी मात्र मजा मारायची, हे किती काळ चालणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

काश्मीर खोऱ्यात अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ले झाले. त्यात जवान, पोलीस मारले गेले. सरकार बदलल्यावर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती. पण असं काहीच पाहायला मिळालं नाही. त्याबरोबर या देशाला ‘हिंदुराष्ट्र’ घोषित करण्याशिवाय पर्याय नाही! असंही ते म्हणाले.
====================================

अँटिगा कसोटीः भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, शमीचं दमदार पुनरागमन

अँटिगा कसोटीः भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, शमीचं दमदार पुनरागमन
मुंबईः मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं अँटिगा कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. सर व्हिव रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 अशी अवस्था झाली आहे.


इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी विंडीजच्या फलंदाजांना आपल्या भेदक माऱ्याने जेरीस आणलं. त्यामुळे विंडीज संघाला निदान एका डावाने तरी पराभव टाळण्याचं मोठं आव्हान उभं राहीलं आहे.
====================================

अमेरिकेत भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय

अमेरिकेत भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय
फोटो : ट्विटर
न्यूयॉर्क : भारताच्या महिला हॉकी संघानं अमेरिका दौऱ्यात सलग तिसरा विजय साजरा केला. मॅनहेममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी कॅनडाचा 3-1 असा धुव्वा उडवला.

या सामन्यात पूनम रानीनं 19 व्या मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं होतं. पण कॅनडासाठी नताली सौरिसोनं 21 व्या मिनिटाला गोल डागून कॅनडाला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करुन सामन्यावर आपली पकड मिळवली.

रेणुका यादवनं 32 व्या आणि अनुराधा देवीनं 58 व्या मिनिटाला गोल झळकावून भारताचा 3-1 असा विजय निश्चित केला. भारताने आपल्या तिसऱ्या सामन्यातही कॅनडाचा 5-2 असा धुव्वा उडवला होता.
====================================

अँटिगा कसोटीः वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की, शमी, यादवचा भेदक मारा

अँटिगा कसोटीः वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की, शमी, यादवचा भेदक मारा
अँटिगा( वेस्ट इंडिज): मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं अँटिगा कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. सर व्हिव रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 अशी अवस्था झाली आहे.


ईशांत शर्मानं क्रेग ब्रॅथवेटला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडलं. त्याआधी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 243 धावांत आटोपला. त्यामुळं त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. भारताकडून मोहम्मद शमीनं 66 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढून आपलं पुनरागमन दणक्यात साजरं केलं. तर उमेश यादवनंही 41 धावांत विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.
====================================

...तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा : नागराज मंजुळे

...तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा : नागराज मंजुळे
पुणे : कोपर्डी घटना सैराटमुळे घडली, असं काही जण म्हणू लागले आहेत, असं असेल तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा, अशी खंत सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांन पुण्यात व्यक्त केली. पुण्यात एका पारितोषिक वितरण सोहळ्यात नागराज मंजुळे बोलत होते.
“सैराट सिनेमा येईपर्यंत जग सुंदर होतं, सगळं चांगलं सुरु होतं, सैराट आला आणि अचानक बलात्काराच्या घटना घडू लागल्या, कोपर्डी घटना तर सैराटमुळे घडली असंही काही जण म्हणू लागले आहेत, असं असेल तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा”, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.
====================================

काश्मीर प्रश्नावरुन भारताचं पाकिस्तानला सणसणीत उत्तर!

काश्मीर प्रश्नावरुन भारताचं पाकिस्तानला सणसणीत उत्तर!
मुजफ्फराबाद पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या शुक्रवारी एका सभेत म्हटलं होतं की, त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल. नवाज शरीफ यांच्या या विधानावर भारताने त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या शरीफ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “शरीफ यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवादाशिवाय काहीही केलं नाही. किंबहुना, नवाज शरीफ हे ज्या वानीला शहीद घोषित करातात, तो वानी हा हिजबुलचा कमांडर होता, हे शरीफ यांना माहित आहे का?”

पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजेच पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या विजयानिमित्त आयोजित सभेत नवाज शरीफ बोलत होते. त्यावेळी त्यांनी काश्मीरवर विधान केलं होतं. त्यांच्या विधानाला अखेर भारताकडून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

====================================

काबुलमधील आत्मघाती स्फोटातल्या मृतांचा आकडा 83 वर

काबुलमधील आत्मघाती स्फोटातल्या मृतांचा आकडा 83 वर
काबुल अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी स्फोट झाला असून, यातील मृतांचा आकडा 83 वर पोहचला आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 61 जणांचा मृत्यू, तर 207 जण जखमी झाले आहेत.



अमाक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, देह मजांगमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांक शिया समूहाच्या वस्तीत मोठा स्फोट घडवून आणला. देहमजंग स्क्वेअरमध्ये पॉवर लाईनविरोधात शिया समूहाचे लोक आंदोलन करत होते.


खामा डॉट कॉम या वेबसाईटवरील वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे. तालिबान संघटनेचा प्रवक्ता मुजाहिद जेवुल्लाहने स्पष्ट केलं आहे की, काबुलमधील हल्ल्याशी तालिबानचा काहीही संबंध नाही. लोकांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी हा स्फोट घडवल्याचा आरोप तालिबानने केला आहे.

====================================

एक रुपयाचं खोटं काम केलं नाही, रस्ते घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं

एक रुपयाचं खोटं काम केलं नाही, रस्ते घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं
मुंबई रस्ते घोटाळा असो की नाले घोटाळा सगळ्या घोटाळ्याची चौकशी करा, शिवसेनेनं एक रुपाचंही खोटं काम केलं नाही. असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे गणेशोत्सवादरम्यान जनजागृती कशी करावी याबद्दल कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.यावेळी मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता,महापौर स्नेहल आंबेकरांची उपस्थिती होती.

जिकडे चूक आहे चूक पण त्यातून लगेच घोटाळा झाला. असा अर्थ काढला जातो आहे. रस्ते घोटाळा शिवसेनेनं केला असता, तर महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेच नसते. या चौकशीतून सत्य बाहेर येईल, असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

====================================

ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २४ - भारताचा कुस्तीपटू नरसिंग पंचम यादवचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडला आहे. ७४ किलो फ्रीस्टाईल गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला आहे. नाडाच्या महासंचालकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
    राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) तपासात नरसिंगचे दोन नमुने पॉझिटीव्ह आढळल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्रवारी नरसिंगने नाडाच्या समितीसमोर हजर होऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आहे. आपल्या विरोधात कारस्थान रचले असून, रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागापूर्वी आपल्या मार्गात अडथळे आणले जात आहेत असे नरसिंगने समितीसमोर सांगितल्याची माहिती नाडामधील सूत्रांनी दिली. 
    नाडाने पाच जुलैला सोनीपत येथील साईच्या केंद्रात नरसिंगची उत्तजेक चाचणी केली होती. त्याच्या ए चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला बी टेस्टसाठी बोलवण्यात आले. त्याचाही अहवाल  पॉझिटिव्ह आला. नाडाने आपला अंतिम अहवाल भारतीय कुस्ती महासंघाला पाठवून दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने ही बाब क्रीडा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. 
====================================

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम


  • ऑनलाइन लोकमत 
    बंगळुरु, दि. २४ - भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीच्या ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला आहे. शनिवारी पोलंडमध्ये झालेल्या आयएएएफ वर्ल्ड अंडर -२० चॅम्पियनशीप स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने ८६.४८ मीटर अंतरावर भालाफेकून ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला. 
    ८०.५९ मीटर अंतरावर भालाफेकणा-या दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रॉबलरने रौप्य तर, ७९.६५ मीटर अंतरावर भालाफेकून ग्रानाडाच्या अँडरसन पीटर्सने कास्यपदक पटकावले. अॅथलेटीक्समध्ये विश्वविक्रम रचणारा नीरज पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे तसेच वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणाराही तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. 
    पहिल्या फेरीत नीरज ७९.६६ मीटर अंतरावर भालाफेकून दुस-या स्थानावर होता. पहिल्या प्रयत्नात ग्रॉबलरने ८०.५९ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. दुस-या प्रयत्नात नीरजने ८६.४८ मीटर अंतरावर भालाफेकून विश्वविक्रमाला गवसणी घातली. यापूर्वीचा ज्यूनियर गटातील विश्वविक्रम लाटव्हीयानच्या झिगीसमुंड सिरमायसच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये ८४.६९ मीटर अंतरावर भालाफेकला होता.  
====================================

वेस्ट विंडीजला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा


  • ऑनलाइन लोकमत
    अँटिग्वा, दि. २४ -  फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान वेस्ट विंडीज संघाने नांगी टाकली. पहिल्या डावात २४३ वर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट विंडीजने १ गडी गमावून २१ धावा केल्या. यामुळे भारताकडे अजून ३०२ धावांची आघाडी आहे. गोलंदाज इशांतने एक बळी टिपला. 




====================================

सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू


  • ऑनलाइन लोकमत
    हैदराबाद, दि. २४ - हैदराबादमधील गांधी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांधी हॉस्पिटल हे बाराशे खाटांचे सरकारी रुग्णालय आहे. एकाच दिवशी इतक्या रुग्णांच्या मृत्यूसाठी विद्युतपुरवठा कारणीभूत असल्याचे रुग्णालयाच्या कर्मचा-यांचे म्हणणे आहे. 








====================================

बारावी नापास असूनही बनली डॉक्टर



  • चेन्नई, दि. २४ - तिच्याकडे वैद्यकीय पदवी आहे. डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करायचा परवाना आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. फक्त तिच्याकडे नाहीये ते बारावी उर्तीण झाल्याचे प्रमाणपत्र. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. साधी बारावीची परिक्षा उर्तीण होऊ न शकलेली अर्चना रामचंद्रन ही महिला तामिळनाडूमध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करत होती. 
    अर्चनाचा हा खोटेपणा तिच्याच नव-याने आणि सास-यांनी उघडकीस आणला. अर्चनाने डॉक्टर म्हणून वावरताना थामीझारसी थुलूकन्नम या महिलेचे नाव धारण केले होते. थामीझारसीच्या नावाने तिने खोटी वैद्यकीय पदवी मिळवली होती. थामीझारसीचा २००३ मध्ये मृत्यू झाला आहे. वडिल आर.रामचंद्रन यांच्या मदतीने अर्चनाने ही बोगस पदवी मिळवली होती. 
====================================

लैंगिक अत्याचारग्रस्तांना गाव सोडण्याची वेळ


  • - सुषमा नेहरकर-शिंदे , पुणे
    बलात्कार आणि बाललैंगिक विकृतीला बळी पडणाऱ्या पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच देशोधडीला लागण्याची वेळ येत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. पीडितांसाठी शासनाने ‘मनोधैर्य योजना’ सुरू केली. त्यामध्ये आर्थिक मदतीबरोबर शारीरिक आणि मानसिक पुनर्वसनही होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत अत्याचाराला बळी पडणाऱ्या १०३ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने बाललैंगिक अत्याचारग्रस्तांचे प्रमाण जास्त आहे.



====================================

मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान!


  • मुंबई: दोन दिवस सुरू असलेली डोकेदुखी असह्य झाल्याने बुधवारी एक महिला रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या करत असतानाच त्या महिलेला ब्रेनहॅमरेज झाल्याचे निदान झाले. ब्रेन हॅमरेजमुळे एका दिवसात या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर, तिच्या वैभव (वय १६) आणि रवी संघवी (वय १४) लहान मुलांनी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेची मूत्रपिंड, यकृत, त्वचा आणि डोळे दान करण्यात आले.
    दादर परिसरात राहणारी ही महिला स्वयंपाकाची कामे करत होती. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ महिला एकटीच करत होती. १९ जुलैपासून या महिलेचे डोके दुखत होते. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. त्या वेळी तिचा रक्तदाब वाढल्याचे निदान झाले. त्यानुसार, डॉक्टरांनी तिला गोळ््या दिल्या, पण डोकेदुखी थांबत नसल्याने दादरचे हिंदुजा रुग्णालय गाठले. त्या वेळी तिची दोन्ही मुले तिच्याबरोबर होती. ‘आमच्या आईला बर करा,’ असेही त्यांनी या वेळी डॉक्टरांना सांगितले असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुचेता देसाई यांनी दिली.
====================================

महिला सर्वच क्षेत्रात अव्वल - नीता अंबानी


  • - ‘शी वॉक, शी लीड्स’ पुस्तकाचे प्रकाशन
    एका अहवालानुसार केवळ २५ टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले. मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत, असे प्रतिपादन नीता अंबानी यांनी ‘शी वॉक, शी लीडस्’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी केले. उद्योजक आणि लेखिका गुंजन जैन यांच्या ‘शी वॉक, शी लीडस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ताजमहाल पॅलेस येथे पार पडला.




====================================

जर्मनी : एका हल्लेखोराच्या अंदाधुंद गोळीबारात ९ ठार


  • ऑनलाइन लोकमत
    बर्लिन, दि. २२ - जर्मनीच्या दक्षिणेकडील म्युनिच शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटरमध्ये एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ९ जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या हल्लेखोराने नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे. या अंदाधुंद गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान निरपराध नागरिकांवर हल्ला करणारा हल्लेखोर मूळचा इराणी असून त्याचे नाव अली सोमीबॉय असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा हल्ला झाला.
============================================

एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्सच्या विरोधात जास्त तक्रारी


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 21 - भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या मोबाईल कंपन्यांविरोधात गेल्या तीन वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे बुधवारी संसदेत सांगण्यात आले.
    केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपन्यांविरोधात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) तक्रारी दाखल झाल्या असून यामध्ये खराब सेवा व कॉल ड्रॉप्सच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे 2016 मधील पहिल्या सहा महिन्यात निम्यापेक्षा जास्त एअरटेलच्या विरोधात आहेत.
    ट्रायकडे 30 जून 2016 पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, खराब सर्व्हिस असल्याच्या 9720 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात एअरटेलविरोधात 3257, व्होडाफोनच्या विरोधात 2130, रिलायन्सविरोधात 1526 आणि आयडियाच्याविरोधात 997 तक्रारी आल्या आहेत.
    गेल्या वर्षी म्हणजेच, 2015 मध्ये ट्रायकडे मोबाईल कंपन्यांविरोधात 6131 तक्रारी आल्या होत्या.
============================================
बलात्काराची धमकी: आप आमदार अटकेत

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे दिल्लीमधील आमदार अमानतुल्ला खान यांना एका महिलेस बलात्कार व हत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज (रविवार) पोलिसांनी अटक केली. खान यांनी एका महिलेस गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांच्याविरुद्ध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीमधील वीजपुरवठ्याच्या मुद्यावरुन एका तरुणास या महिलेवर बलात्कार करण्याची धमकी देण्याचे आदेश खान यांनी दिल्याची तक्रार संबंधित महिलेने नोंदविली आहे. दरम्यान, खान यांना अटक करण्यामागे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राजकारण असल्याची टीका आपकडून करण्यात आली आहे. मोदींकडून आणखी एक आप आमदारास अटक करण्यात आल्याची प्रतिक्रिया केजरीवाल यांनी व्यक्‍त केली आहे. खान यांच्या अटकेसंदर्भात निषेध नोंदविण्यासाठी येथील जमिया नगर पोलिस स्थानकाबाहेर आप समर्थकांनी गर्दी केली होती. 
============================================
"त्यांनी' तब्बल आठशे जणांना केले मुसलमान...

मुंबई - दहशतवादाशी संबंधित आरोपांसंदर्भात ताब्यात घेण्यात आलेल्या रिझवान खान आणि आर्शिद कुरेशी या दोघांनी देशातील किमान 800 नागरिकांचे धर्मांतर करुन त्यांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. यांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील बहुसंख्य नागरिकांचा समावेश आहे.

खान व कुरेशी हे दोघेही मुस्लिम विचारवंत झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संबंधित आहेत. खान याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमधून ही बाब उघडकीस आली. आपण "विवाह संस्था‘ (मॅरेज ब्युरो) चालवित असून यांमधील कुठलेही धर्मांतर बळजबरी घडविण्यात आले नसल्याचा दावा खान याने केला आहे. मात्र एटीसच्या अधिकाऱ्याने हे दोघेही अत्यंत मोठ्या स्तरावर धर्मांतर घडविण्याच्या प्रयत्नांत असल्याचे म्हटले आहे. 
============================================
भारताकडून तीन चिनी पत्रकारांची हकालपट्टी

नवी दिल्ली - गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या "चिंते‘च्या पार्श्‍वभूमीवर शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेसाठी भारतामध्ये काम करणाऱ्या तीन वरिष्ठ चिनी पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दिल्लीमधील शिन्हुआचे शाखाप्रमुख (ब्युरो चीफ) वु किआंग आणि मुंबईमधील त्यांचे लु तांग आणि शे योंगगांग यांना सरकारने 31 जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांस भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या तीनही पत्रकारांचा व्हिसा रद्द करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून वु यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे; तर इतर दोन पत्रकारांनाही व्हिसा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. 
============================================
बॉंबस्फोटाने काबूल हादरले; 61 जण ठार

‘इसिस‘ने केले लक्ष्य; 61 जण ठार, दीडशेहून अधिक जखमी 
काबूल - जगभरात भीषण दहशतवादी हल्ले घडवून हजारो निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या "इसिस‘ या दहशतवादी संघटनेने शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलला लक्ष्य केले. येथे मध्यवर्ती चौकात शिया हजारा अल्पसंख्याक समुदायाच्या रॅलीमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या बॉंबस्फोटांमध्ये 61 जण ठार झाले, तर अन्य दोनशे आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. हे बॉंबस्फोट एवढे भीषण होते, की काही क्षणांत आंदोलकांच्या चिंधड्या उडाल्या. रस्त्यावर रक्त-मांसाचा चिखल झाला होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना दिली. 
============================================
'आस्था'ने दिला असहाय आजीला आधार

सोलापूर - सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात एक आजी गेल्या अनेक दिवसांपासून पडून होत्या. वय झाल्याने व आजारी असल्याने ग्लानी आलेली. चार-पाच दिवसांपासून भर पावसात तिथेच झोपून होत्या आणि हे जगणे एक दिवस संपले. माणुसकीची "आस्था‘ मंदिरातील आजींना नवे जीवन, आधार व निवारा देऊन गेली. 

जगदीश पाटील व त्यांचे मित्र आस्था फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात. विद्यार्थी आणि गरजूंना शक्‍य ती मदत करण्यासाठी संस्थेचे सदस्य निःस्वार्थी भावनेने धडपड करीत असतात. सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक आजी गेल्या तीन महिन्यांपासून झाडाखाली पडून होत्या. चार-पाच दिवसांपासून पावसात भिजल्याने त्यांना ग्लानी आलेली होती. दोन दिवसांपूर्वी पाटील आपल्या मित्रांसह सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात गेले. सोबत आणलेल्या रुग्णवाहिकेत आजींना घेतले. त्यांना भोगाव येथील आधार केंद्रात नेले. आस्था संस्थेने त्यांचे पालकत्व घेत आधार केंद्रातील आजींचा राहण्याचा आणि औषधोपचाराचा खर्च करण्याचा निर्णय घेतला. या आजी मूळच्या कर्नाटकातील असून पतीच्या निधनानंतर सांभाळायला कोणीच नसल्याने त्यांनी गाव सोडले आहे. 
============================================
लाल चौकात ध्वजवंदनाचा विद्यार्थिनीचा निर्धार

काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना आव्हान 
लुधियाना - काश्‍मीरमधील लाल चौकात येत्या स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविणार असल्याचा निर्धार लुधियानातील जान्हवी बहल (वय 15) हिने शनिवारी व्यक्त केला. हिंमत असेल तर मला रोखण्याचे धाडस करावे, असे आव्हान तिने फुटीरतावादी गट व पाकिस्तानला दिले आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करण्याचे खुले आव्हान जान्हवीने याआधी दिल्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ""काश्‍मीरमधील लाल चौकात राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे याच ठिकाणी मी 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविणार आहे,‘‘ असे तिने सांगितले. सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात ध्वजवंदन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण केली होती. ती मान्य केल्याने मला आनंद झाला आहे. मोदी यांच्यासारखे चांगले पंतप्रधानच असे करू शकतात, असेही ती म्हणाली. 
============================================

No comments: