Saturday, 23 July 2016

नमस्कार लाईव्ह २३-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

*नमस्कार लाईव्ह २३-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र*

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तानात असेल: नवाज शरीफ 
२- मॅकडॉनल्ड्सची व्हेनेझुएलामध्ये मॅक हॅम्बर्गरवर बंदी 
३- आयसिस संशयित रिझवान खानला कल्याणमधून अटक 
४- शाओमीचा फ्लॅश सेल, 2 सेकंदात MI5 आउट ऑफ स्टॉक 
५- काबूल स्फोटातील मृतांचा आकडा 50 वर पोहोचला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन व्हिजा प्रकरणावरून सर्वात मोठा खुलासा 
७- मल्ल्याच्या ताफ्यातील 8 गाड्यांचा एसबीआय करणार लिलाव 
८- 'रन फॉर रिओ'ला ३१ जुलै रोजी पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- पुणे; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात रिपाईच्या कार्यकर्त्याची घोषणाबाजी 
१०- मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द 
१२- महिलेला अश्लिल मेसेज, माजी खासदाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सावंतवाडी; फोटो काढणं जीवावर बेतलं, 60 फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू 
१४- पिंपरीत सहा वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या 
१५- नांदेडमध्ये कचऱ्यात जिवंत हँड ग्रेनेड सापडल्यानं खळबळ 
१६- लोकमान्यांच्या स्मृतिस्थळांकडे दुर्लक्ष, सरदार गृहाची पुरती दुरवस्था 
१७- जळगाव - प्रियकराच्या मदतीने कन्नड घाटात पतीची हत्या 
१८- ठाणे - अन्नाच्या शोधात शहरात घुसलेल्या माकडांच्या 2 पिल्लांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'विराट' विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलंवहिलं द्विशतक! 
२०- दोन नव्या स्मार्टफोनसह नोकिया कमबॅकसाठी तयार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=======================================

फोटो काढणं जीवावर बेतलं, 60 फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

फोटो काढणं जीवावर बेतलं, 60 फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी: आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात कॉलेज युवकाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फोटोसाठीचा अतिउत्साहीपणा तरुणाच्या जीवावर बेतला आहे.

धबधब्याजवळ पाय घसरल्याने खोल दरीत पडून युवकाचा मृत्यू झाला. रुद्राप्पा विठ्ठल बजेरी (19 वर्ष) असं त्याचं नाव असून तो बेळगावचा रहिवासी होता.

पिकनिकसाठी आंबोली घाटात 11 जणांचा ग्रुप आला होता. त्याचवेळी फोटो काढण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट 60 फूट दरीत कोसळला. आज (शनिवार) सकाळी १० वाजता ही घटना घडली. सोबत असलेल्या मित्रांना आरडाओरडा केल्यानं स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. अखेर दुपारी तरुणाचा मृतदेह सापडला. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठविण्यात आला आहे.
=======================================

पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन व्हिजा प्रकरणावरून सर्वात मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन व्हिजा प्रकरणावरून सर्वात मोठा खुलासा
क्लीवलॅंड: अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात 2005 मध्ये व्हाईट हाऊसने गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिजा देण्यास विरोध केला होते. ही माहिती तत्कालिन उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्टिफन येट्स यांनी दिली.

चेनींचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्टिफन येट्स यांनी गुरुवारी भारतीय पत्रकारांच्या एका गटाशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, ”जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळातील व्हाईट हाऊसमधील कोणीही व्यक्ती मोदींना व्हिजा देण्याचा विचार करीत असेल, असे मला वाटत नाही.”

यावर पत्रकारांनी बुश प्रशासन मोदींना व्हिजा देण्याच्या विरोधात होते का, असा प्रश्न विचारला असता, स्टिफन यांनीही होकारार्थ उत्तर दिले.
=======================================

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात रिपाईच्या कार्यकर्त्याची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात रिपाईच्या कार्यकर्त्याची घोषणाबाजी
पुणेः पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका तरुणाने व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी केली. रिपाईच्या सचिन खरात गटाच्या तरुणाने ही घोषणाबाजी केली असल्याचं कळतंय. सध्या पुणे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.


‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेचं शताब्दी वर्ष यंदा साजरं होत आहे. त्या निमित्तानं ‘लोकमान्य अँण्ड हिज डेज’ आणि ‘लोकमान्य टिळक्स फोटोबोयोग्राफी’ या दोन इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पत्रकार दिलीप पाडगावकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
=======================================

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द
नवी मुंबई : कोपर्डी घटनेत आरोपी दलित आहेत म्हणून काय झालं, पीडित कुटुंबाला भेटणं माझं कर्तव्य होतं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

आठवले आज कोपर्डीला रवाना होत असताना मुख्यमंत्र्यांनी फोन करुन त्यांना कोपर्डीत जाण्यास मनाई केली. कोपर्डीत पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना नकार दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान त्यानंतर आठवलेंनी नवी मुंबईत सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नेरुळच्या 15 वर्षीय स्वप्नील सोनवणेची प्रेमप्रकरणातून हत्या झाली. याप्रकरणी सरकारनं सीआयडी चौकशी नेमावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. तसंच याप्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि स्वप्नील सोनवणेच्या पालकांना धमकावणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी, असंही आठवले म्हणाले.
=======================================

त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तानात असेल: नवाज शरीफ

त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तानात असेल: नवाज शरीफ
मुजफ्फराबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, मला त्या दिवसाची प्रतीक्षा आहे, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तनाचा एक भाग असेल. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच ‘आजाद जम्मू एवं कश्मीर’मध्ये विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलते होते.

शरीफ हे ऑपरेशननंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील नागरिक स्वातंत्र्यांसाठी बलिदान देत आहेत. हे आपण विसरायला नको.”

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पीएमएल-एन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारताचं म्हणणं आहे की, जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळं करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि शस्त्र पुरवले जातात. मात्र, पाकिस्तान कायमच भारताचा हा आरोप फेटाळला असून, फुटीरतावादी मोहिमेला केवळ राजकीय आणि नैतिक पाठिंबा असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येते.
=======================================

पिंपरीत सहा वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या

पिंपरीत सहा वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये सहा वर्षाच्या मुलीच्या हत्या करून आईनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नीलम भामे असं या महिलेचं नाव असून मुलीचं नाव लावण्या आहे.

कासारवाडी येथे दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती कामावर गेल्यानंतर गळफास घेऊन केली महिलेने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समजतं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना आत्महत्येपूर्वी नीलमनं लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.

‘माझ्या पतीला मी खुश ठेऊ शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. पण माझ्यामागे मी मुलीला ठेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे मी मुलीलाही संपवत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरु नये.’ अशा आशयाची सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. दरम्यान याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
=======================================

दोन नव्या स्मार्टफोनसह नोकिया कमबॅकसाठी तयार

दोन नव्या स्मार्टफोनसह नोकिया कमबॅकसाठी तयार
मुंबई : दुरसंचार जगतात एक काळ गाजवलेल्या फिनलँडच्या नोकिया कंपनीने दोन नव्या स्मार्टफोनसह कमबॅकची तयारी केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार नोकिया यावर्षी दोन नवीन स्मार्टफोनसह पुन्हा एकदा बाजारात कमबॅक करत आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असतील.
 
द इंक्वायरर या नियतकालिकाच्या वृत्तानुसार या दोन्ही स्मार्टफोनची नावं अजून निश्चित झालेली नाहीत. ही दोन्ही मॉडेल्स वॉटरप्रुफ असणार आहेत. हे स्मार्टफोन 5.2 आणि 5.5 क्यूएचडी डिस्प्ले, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अत्याधुनिक कॅमेरा अशा सुविधांनी युक्त असतील.


दोन्ही स्मार्टफोन स्प्लीट स्क्रीन मोड आणि अत्याधुनिक सुविधांनी भरलेले असतील तसेच या स्मार्टफोनना 3डी टच असण्याची शक्यता आहे.
बाजारात आपले स्थान टिकवण्यासाठी धडपड करत असलेल्या नोकिया कंपनीने फिनलँडमधील एचएमडी या कंपनीला मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवण्याचे परवाने दिले आहेत.
 
दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकियाच्या फोन व्यवसायाला 7.2 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले होते. मायक्रोसॉफ्टने मागच्या वर्षभरात 7800 लोकांना कमी केले असून 7.6 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.


मायक्रोसॉफ्ट लुमिया आणि विंडोज फोनच्या अपयशानंतर वाजारातील त्याचे मुल्य बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.


No comments: