*[अंतरराष्ट्रीय]*
1- अणवस्त्र वापराबाबत ट्रम्पवर विश्वास नाही - हिलरी
2- उत्तर मरियाना बेटावर भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल
3- फ्लोरीडातील चार व्यक्तींना झिका व्हायरसची लागण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
4- आरबीआयच्या गव्हर्नरपदावरील सस्पेंन्स कायम, एसबीआय प्रमुखांच्या नावाची चर्चा?
5- भाजपला न्यायालयाचा दणका; 25000 चा दंड सुनावला
6- पंतप्रधानांच्या संमतीनेच 2.5 लाख कोटींचा डाळ घोटाळा: काँग्रेस
7- इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत 5 दिवसांनी वाढ
8- गृहमंत्री राजनाथ सिंह आज पूरग्रस्त आसामच्या दौ-यावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
9- मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम
10- साई संस्थानमध्ये सेनेला उपाध्यक्षपद, मुख्यमंत्र्यांची कबुली
11- राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमागील गुपित उलगडलं
12- बेस्टच्या अभियंत्यांचे आज सामूहिक रजा आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
13- कल्याणमध्ये डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
14- लातुरात शेततळ्यामध्ये बुडून तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू
15- जालन्यात 60 लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
16- बीडः शाळकरी मुलीचे हत्या प्रकरण, वर्ष उलटूनही आरोपी मोकाट
17- गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका
18- पुणे: बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक
19- दिल्ली: लाजपत नगर परिसरात एका प्रॉपर्टी डीलरची हत्या
20- जोरदार पावसामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी गाठली
21- माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो - निलेश काण्णव
22- नगर; मुलीची चेडछाड प्रकरण: संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या झोपड्या पेटवल्या.
23- खामगाव पो.स्टे. अंतर्गत येनाऱ्या वरखड़ी शिवारात 5 लाखाचा गांजा जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
24- भारत आणि विंडीज जमैकात भिडणार, मुरली विजय संघाबाहेर
25- राजश्री प्रॉडक्शनचे एमडी आणि सीईओ रजत बडजात्या यांचं निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
===========================================

यापूर्वी रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत होती. मात्र बँकांच्या संपामुळे सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.

जयदेव यांनी संपत्तीसाठी कोर्टाची पायरी चढल्यानं कुठलाही समझोता मातोश्रीवरुन होणार नाही असं सूत्रांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंसोबत कोणीही नव्हतं. राज आणि उद्धव या दोघांमध्येच सुमारे दीड तास चर्चा झाली.

बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. स्नेहाधार या संस्थेत एड्सबाधित मुलांचे संगोपन केले जाते. संस्थेच्या बाजूला असलेल्या शेततळ्यात ही मुले पोहण्यासाठी गेली असता अपघात झाल्याची माहिती आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम
मुंबई: मुंबई शहरासह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे.
काही ठिकाणी काल रात्रभर उसंत घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे.
लोकल सेवेवर परिणाम
या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
पाणी साचल्याने रस्ते वाहतूक खोळंबली
तर माटुंगा, लोअर परळ, घाटकोपर, अंधेरी यासारख्या भागात पावासाचं पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. अंधेरी सब वेमध्ये आजही पाणी साचल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
===========================================
कल्याणमध्ये डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
कल्याण : रस्त्यांवरचे खड्डे आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे कल्याणमध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीच्या स्कूटीला डंपरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
हाजी मलंगगड रोडवर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. प्राजक्ता फुलोरे असं या तरुणीचं नाव असून पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.
कल्याण पूर्व मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. यापूर्वीही एका शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला होता.
तसंच या रस्त्यावरून अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक होते, ज्यामुळे अपघात होतात आणि त्यात सामान्यांचा बळी जातो. दरम्यान, रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या मागणीकडे आयुक्तांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
===========================================
आरबीआयच्या गव्हर्नरपदावरील सस्पेंन्स कायम, एसबीआय प्रमुखांच्या नावाची चर्चा?
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरील सस्पेंन्स अजूनही कायम असून, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या संचालिका अरुंधती भट्टाचार्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण भट्टाचार्य यांनी या वृत्ताचे खंडन करून, यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देणेही टाळले.
भट्टाचार्य यांना आरबीआयच्या रघुराम राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्या उद्विग्न झाल्या. त्या म्हणाल्या की, ”यासाठी मी कोणत्याही प्रकारे लॉबिंग करत नाही. तुम्ही पत्रकारच यासंबंधीचे कयास बांधत आहात. या मुद्द्यावर मी कोणती प्रतिक्रीय देणार नाही. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे.
राजन यांनी आकादमीत परतण्याची इच्छा व्यक्त करून दुसऱ्यांदा गव्हर्नर पदाची धुरा सांभाळण्यावर पुर्णविराम दिला. त्यानंतर राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी एसबीआय संचालिका भट्टाचार्य यांच्या नावासोबतच इतरही काही नावांची चर्चा सुरु होती. यामध्ये आर्थिक विषयावरील सचिव शक्तिकांत दास, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्यूटी गव्हर्नर उर्जित पटेल आदींच्या नावाचीही चर्चा आहे.
===========================================
भाजपला न्यायालयाचा दणका
नवी दिल्ली : दिल्लीतील एका सत्र न्यायालयाने भाजपला 25000 चा दंड सुनावला आहे. वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील खटल्याच्या सुनावणीवेळी भाजपचे खासदार भूपेंद्र यादव प्रमुख साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यास न्यायालयाने सांगितले होते. मात्र, यादव यावेळी अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने हा दंड ठोठावला.
राम जेठमलानी यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर, त्यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या खटल्यात भाजपचे राज्यसभा खासदार भूपेंद्र यादव यांना प्रमुख साक्षीदार बनवण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्याचे सांगितले, मात्र वैयक्तिक कारणपुढे करून ते या सुनावणीवेळी अनुपस्थित राहिले. न्यायालयाने यावर दिल्ली विधिक सेवा प्राधिकरणाकडे 25000रुपये दंड भरण्याची सुचना केली.
जेठमलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी यादव यांचे वकील मानिक डोगरा यांनी या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, जेठमलानींचे वकील अशिष दीक्षित यांनी आपल्या प्रतिवादात भाजप संसदीय बोर्डाचा कोणताही सदस्य उपस्थित राहत नसल्याने, भाजप संसदीय समितीसोबतच सर्व प्रितवाद्यांना 25000 रुपये दंड आकरावा अशी मागणी केली.
===========================================
भारत आणि विंडीज जमैकात भिडणार, मुरली विजय संघाबाहेर
जमैका : विराट कोहलीच्या टीम इंडियाने अँटिगाच्या पहिल्या कसोटीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. शिखर धवन, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या जात्यात वेस्ट इंडिजचं आक्रमण भरडून निघालं. अँटिगाच्या त्या अपयशातून धडा घेऊन जेसन होल्डरची कॅरेबियन आर्मी जमैका कसोटीसाठी सज्ज झाली आहे. जमैकाच्या रणांगणात टीम इंडियासमोर वेगाचं आव्हान उभं करण्याचा त्यांची रणनीती आहे.
अँटिगाच्या संथ खेळपट्टीवर विंडीज फलंदाजांनी अश्विनच्या ऑफ स्पिनसमोर चक्क लोटांगण घातलं. विराट कोहलीच्या भारतीय संघाने या कसोटीत एक डाव आणि 92 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
अँटिगाच्या त्या लाजिरवाण्या पराभवाने पेटून उठलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत त्या पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी विंडीजने टीम इंडियाला जमैकात ग्रीन टॉपवर खेळण्याचं निमंत्रण दिलं आहे.
===========================================
पंतप्रधानांच्या संमतीनेच 2.5 लाख कोटींचा डाळ घोटाळा: काँग्रेस
नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी संसदेमध्ये मोदीवर जोरदार हल्ला चढवला होता. यातून चार्ज झालेल्या काँग्रेसने मोदी सरकारवर 2.5 लाख कोटीच्या डाळ घोटाळ्याचा आरोप करत, स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीनेच हा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गौतम अदानींच्या ‘अदानी विल्मर’ या कंपनीने, गुजरातमधील ETG वर्ल्ड या कंपनीच्या पडद्यामागून डाळीचा काळाबाजर केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
ETG वर्ल्डने मोजांबिक या आफ्रिकी देशामधून 55 रुपये प्रतिकिलोने तूर डाळ खरेदी करून 75 किलोने डाळीची विक्री करत आहे. हा गोरखधंदा गेल्या 15 महिन्यांपासून सुरु असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
सध्या किरकोळ बाजारात तूर डाळ 200 रुपये प्रतिकिलोने डाळीची विक्री सुरु आहे. यामुळे जर नफा तोट्याचा विचार केल्यास देशात उत्पादित झालेली, किंवा परदेशातून आयात केलेली तूर डाळ 65 रुपये प्रतिकिलो दरानेच विक्री होणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
===========================================
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत 5 दिवसांनी वाढ
नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणखी 5 दिवसांचा अवधी मिळणार आहे.
यापूर्वी रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत होती. मात्र बँकांच्या संपामुळे सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.
===========================================
साई संस्थानमध्ये सेनेला उपाध्यक्षपद, मुख्यमंत्र्यांची कबुली
मुंबईः मुख्यमंत्री आणि रामदास कदम यांच्या वर्षा भेटिनंतर चक्र फिरली आहेत. शिर्डी साई संस्थानातील उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाट्याला देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. सोबतच तीन सदस्य पदं आणखी वाढवून देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.
साई संस्थानमध्ये भाजपाने शिवसेनेच्या वाट्याला एकही पद न दिल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला यापुढे कुठल्याही महामंडळात समाविष्ट न होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत सेनेच्या दबावतंत्राला यश आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अखेर संस्थान कार्यकारिणीत उपाध्यक्षपदासह तीन पदं देण्याचं मान्य केलं आहे. सेनेकडून रविंद्र मिर्लेकर यांना उपाध्यक्ष पद देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.
===========================================
राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमागील गुपित उलगडलं
मुंबई : जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेल्या वादग्रस्त साक्षीवरुनच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या भेटीला कोणतीही राजकीय किनार नसल्याचं म्हटलं जात आहे.
जयदेव यांनी संपत्तीसाठी कोर्टाची पायरी चढल्यानं कुठलाही समझोता मातोश्रीवरुन होणार नाही असं सूत्रांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंसोबत कोणीही नव्हतं. राज आणि उद्धव या दोघांमध्येच सुमारे दीड तास चर्चा झाली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत होते. तर बाळासाहेब ठाकरेंचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे- जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयाीन लढाई या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज काही जणांनी वर्तवला होता.
===========================================
लातुरात शेततळ्यामध्ये बुडून तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू
लातूर : लातूरच्या उदगीरमध्ये शेततळ्याकडे गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्नेहाधार संस्थेत राहणाऱ्या तिघांसोबत हा दुर्दैवी अपघात घडला.
14 वर्षांचा शुभम मेहत्रे, 16 वर्षांचा ऋषिकेश झाल्टे आणि 13 वर्षांचा भारत भूषण शुक्रवारी शेततळ्याकडे पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात पडून बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. स्नेहाधार या संस्थेत एड्सबाधित मुलांचे संगोपन केले जाते. संस्थेच्या बाजूला असलेल्या शेततळ्यात ही मुले पोहण्यासाठी गेली असता अपघात झाल्याची माहिती आहे.
===========================================
जालन्यात 60 लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
जालनाः जालन्यात 60 लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. शहरातील सूर्या रिसॉर्टवर हा छापा टाकण्यात आला.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या छाप्यात गुटख्यासह गुटखा बनवण्याची सामग्री देखील जप्त केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपण्या गुटखा पुरवणारे चांगलेच हादरले आहेत.
गुटखा बंदीनंतरही शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.
===========================================
बीडः शाळकरी मुलीचे हत्या प्रकरण, वर्ष उलटूनही आरोपी मोकाट
शितल पवार
बीडः आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे मागील वर्षी झालेल्या शितल पवार या शाळकरी मुलीच्या हत्या प्रकरणाचा तपास थंडावल्याने तिला न्याय मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेला दहा महिने उलटले तरी अद्याप तपास प्राथमिक पायरीवरच असून मुलीचे पालक पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवून मेटाकुटीस आले आहेत.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील पवार वस्तीवर राहणारी शितल ही पंधरावर्षीय मुलगी सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता धारदार शास्त्रांनी तिची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
===========================================
गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३० - गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत अडकलेल्या तीन रहिवाशांची बचावपथकाच्या अधिका-यांनी सुखरूपरित्या सुटका केली असून असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील आर्यन शाळेजवळील गल्लीतील पाठारे हाऊल पाठारे हाऊस इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग शनिवारी सकाळी अचानक कोसळला व त्यामध्ये तीन रहिवासी अडकले.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या व ३ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. बचावपथकाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या तिघांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा भाग
===========================================
पुणे: बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३० - पुण्यातील बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून ९ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे, मात्र या प्रकल्पाचे मालक व बिल्डर अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी पार्क एक्स्प्रेस जॉईंट व्हेंचरचे प्रोजेक्ट इन्चार्ज भाविन हर्षद शहा, ज्ञानेश्वर चव्हाण, आर्किटेक्ट संतोष सोपान चव्हाण, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रदीप कुसुमकर आणि हंसल पारिख अँड असोसिएट्स यांना अटक केली आहे.महापालिकेने बारा मजल्यांचीच परवानगी दिलेली असताना कायदा धुडकावत तेराव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम या ठिकाणी सुरू करण्यात आले. तेराव्या मजल्याचा स्लॅब भरत असतानाच ही दुर्घटना घडली. तेथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये ठेकेदार आणि सुपरवायझरचे नातेवाईकही होते. या सोसायटीच्या आधीच्या इमारतींचे बांधकाम झालेले आहे. मात्र, ही दुसरी फेज हाती घेण्यात आली होती. साधारणपणे दीड वर्षापूर्वी या फेजचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या इमारतीचा पहिला स्लॅब ऑक्टोबर २०१५ मध्ये पडला होता.
===========================================
माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो
- निलेश काण्णव/ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. पूर्वी या गावामध्ये आलो होतो त्यामुळे समजले की डोंगर कोसळून गावच गडप झाले आहे. किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडलेले असणार. काही वाचले असतील तर त्यांना मदत मिळाली पाहिजे. गावात रेंज नव्हती. हे सगळ्यांना समजले पाहिजे म्हणून पळत सुटलो... पण एका वायरमनची गाडी मिळाली. चार किलोमीटरवर एका कड्यावर रेंज आहे माहित होते. त्यानंतर मदत सुरू झाली.माळीण दुर्घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेले निलेश काण्णव यांना अजूनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे येतात. निलेश यांनी लोकमतला पाठविलेल्या फोटोने माळीण दुर्घटनेची माहिती जगापुढे आली. देशातील सर्व माध्यमांनी हा फोटो वापरला होता.
===========================================
अणवस्त्र वापराबाबत ट्रम्पवर विश्वास नाही - हिलरी
- वॉशिंग्टन, दि. २९ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी गुरुवारी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकन जनतेसमोर सध्या अनेक आव्हाने असून अशा परिस्थिती अमेरिकेला स्थिर आणि सर्वांना एकत्र पुढे घेऊन जाणा-या नेतृत्वाची गरज आहे.आपल्या भाषणात हिलरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आपण उजवे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हिलरी यांनी आठ नोव्हेंबरला होणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी स्वीकारली.सर्वांसाठी काम करणारा देश अशी आपण अमेरिकेची ओळख निर्माण करु असे हिलरी यांनी यावेळी सांगितले. ट्रम्पला आपल्याला जगापासून तोडायचे आहे,आपल्यात विभागणी करायची आहे. अणवस्त्रांच्या बाबतीतही आपण ट्रम्पवर विश्वास ठेऊ शकत नाही असे हिलरी म्हणाल्या.
===========================================
No comments:
Post a Comment