Tuesday, 19 July 2016

नमस्कार लाईव्ह १९-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- झोपलो नव्हतो, मान खाली घालून चिंतन करत होतो : संदीप बाजोरिया 
२- कोपर्डी प्रकरणावर चर्चा, राष्ट्रवादीचे आमदार बाजोरियांना डुलक्या 
३- 'सैराट'सारख्या सिनेमांमुळे बलात्कारांमध्ये वाढ : भाजप आमदार
४- मुंबई जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या 
५- आजारी सूतगिरण्यांना मिळणार आधार! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- प्रक्षोभ थांबवा, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू : मुख्यमंत्री 
७- आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा 
८- कोपर्डी पाकिस्तानात आहे का?, राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल 
९- कोपर्डी बलात्कार : आरोपींना 4 महिन्यात भररस्त्यात फाशी द्या : मुंडे 
१०- जालना उत्तरपत्रिका रॅकेट : बारावीचे 80 विद्यार्थी बडतर्फ, बोर्डाची कारवाई 
११- कोपर्डी बलात्कार : आरोपींना फाशीच होईल असा तपास करा : अजित पवार 
१२- कोपर्डी बलात्काराच्या गंभीर चर्चेदरम्यान राजकीय चिखलफेक 
१३- बलात्कारात दोषी ठरण्याचे प्रमाण आठ टक्क्यावरुन २१ टक्क्यापर्यंत वाढले - मुख्यमंत्री.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई : 30 जुलै पासून आंबेडकर भवन श्रमदानाने बांधायचे काम सुरु करुयात - प्रकाश आंबेडकर 
१५- सोलापूर - महिला ग्रामपंचायत सदस्येला अंगावर रॉकेल ओतून पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न 
१६- लातूर - अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे दोन दुचाकींच्या अपघातात शिक्षक ठार 
१७- जळगाव - कृषि उत्पन्न बाजार समितीच्या व्यापा-यांचे पुन्हा आंदोलन सुरु. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- देशात वाय-फाय सर्व ठिकाणी! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=========================================

प्रक्षोभ थांबवा, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू : मुख्यमंत्री

प्रक्षोभ थांबवा, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू : मुख्यमंत्री
मुंबई अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू. राज्यातील जनतेने प्रक्षोभ थांबवावा. याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच नराधमांना फाशीच मिळावी अशी मागणी कोर्टात करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज विधीमंडळात चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं.

नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

कोपर्डी बलात्कार ही राज्याला काळीमा फासणारी घटना आहे. याबाबत सरकार गंभीर आहे. आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सरकार करेल. त्यासाठी उज्वल निकम यांच्यासारख्या निष्णात वकिलाची नियुक्ती कऱण्यात आली आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होऊन, भविष्यात अशाप्रकारचं कृत्य करण्याचं कोणाचंही धाडस होणार नाही, हा संदेश देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
=========================================

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा
मुंबई : दादरमधील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. भर पावसात या मोर्चाला महाराष्ट्रभरातून लाखो लोकांनी सहभाग नोंदवला.

भायखळ्यातून निघालेला सीएसटीजवळ पोहोचला तिथेच मोर्चाचं रुपांतर रॅलीत झालं. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं.

या मोर्चाला सीताराम येचुरी, कन्हैया कुमार यांनीही हजेरी लावली आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. कन्हैया कुमारने आपल्या खास शैलीत राज्य सरकारवर निशाणा साधला.

30 जुलैपासून श्रमदान करुन पुन्हा दादरमध्ये आंबेडकर भवन उभारु असा निर्धार यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.

दादरमधील आंबेडकर भवनाची इमारत पुर्नविकासासाठी पाडण्यात आली होती. त्यानंतर आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकर कुटुंबियांमध्ये वाद झाला.
=========================================

झोपलो नव्हतो, मान खाली घालून चिंतन करत होतो : संदीप बाजोरिया

झोपलो नव्हतो, मान खाली घालून चिंतन करत होतो : संदीप बाजोरिया
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेचं भाषण सुरु असताना, मी झोपलो नव्हतो. मी मान खाली घालून चिंतन करत होतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बजोरिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचारावर विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरिया यांना मात्र डुलक्या अनावर झाल्या होत्या. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढच्या बाकावर अतिशय आक्रमकपणे आणि मुद्देसूद भाषण करत असताना बाजोरियांना झोप लागल्यानं संताप व्यक्त होतो आहे.
=========================================

कोपर्डी प्रकरणावर चर्चा, राष्ट्रवादीचे आमदार बाजोरियांना डुलक्या

कोपर्डी प्रकरणावर चर्चा, राष्ट्रवादीचे आमदार बाजोरियांना डुलक्या!
मुंबई: कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचारावर विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरिया यांना मात्र डुलक्या अनावर झाल्या.

विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढच्या बाकावर अतिशय आक्रमकपणे आणि मुद्देसूद भाषण करत असताना बाजोरियांना झोप लागल्यानं संताप व्यक्त होतो आहे.

अखेर ही बाब इतर सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर शिपायाकडून बाजोरिया यांना चिठ्ठी पोहोचवण्यात आली, आणि त्यानंतर बाजोरिया सभागृहातून उठून गेले. थोड्या वेळानंतर बजोरिया पुन्हा एकदा सदनात परतले.
=========================================

मुंबईत भर रस्त्यात 'बर्निंग कार'चा थरार

VIDEO : मुंबईत भर रस्त्यात 'बर्निंग कार'चा थरार
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलिना फ्लायओव्हरजवळ दोन गाड्यांच्या धडकेनंतर दोन्ही गाड्यांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलिना फ्लायओव्हरजवळ स्विफ्ट कारने अचानक ब्रेक दाबल्याने पुढे असलेल्या गाडीला स्विफ्ट धडकली. अचान ब्रेक लावल्याने मागच्या गाडीलाही अचानक थांबता आलं नाही. त्यामुळे मागे असलेल्या डस्टर कारने स्विफ्टला धडक दिली. या धडकेने स्विफ्टच्या मागील बाजूने पेट घेतला. शिवाय, डस्टरनेही पेट घेतला.

त्यानंतर स्विफ्टच्या चालकाने आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने आग विझवली. रहिवाशांनी गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे स्फोट टाळता आला. शिवाय, अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी वेळेवर पोहोचले. त्यामुळे जीवितहानी टळली.

=========================================

कोपर्डी पाकिस्तानात आहे का?, राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोपर्डी पाकिस्तानात आहे का?, राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई राज्य सरकारला आया-बहिणींचं संरक्षण करावं लागेल. ही विनंती नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. हे जर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत केला.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधीमंडळात चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत आधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मग नारायण राणे यांनी सरकारवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री मातोश्रीवर जेवायला जाऊ शकतात, विठ्ठलच्या दर्शनाला जातात, दिल्लीलाही जातात, मग नगर काय पाकिस्तानमध्ये आहे का?  असा सवाल नारायण राणेंनी केला.

जे नागपूर सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार
नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. राज्यातील गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वाधिक गुन्हा नागपूरमध्ये घडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी झाली. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूला खून होतो. जो माणूस नागपूर सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, असा घणाघात राणेंनी केला.
=========================================

कोपर्डी बलात्कार : आरोपींना 4 महिन्यात भररस्त्यात फाशी द्या : मुंडे

कोपर्डी बलात्कार : आरोपींना 4 महिन्यात भररस्त्यात फाशी द्या : मुंडे
मुंबई : नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आरोपी नराधमांना चार महिन्यांत भर रस्त्यात फाशी द्यावी. जेणेकरुन  यापुढे आया-बहिणीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडेंनी घेतला.

धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत राज्यातील महिला अत्याचारा पाढाच वाचला. जिथे आरोग्य मंत्र्याचा पीए डॉक्टर महिलेचा विनयभंग करतो, तिथे या सरकारकडून सुरक्षेची हमी काय बाळगावी असं मुंडे म्हणाले.

वाघाच्या जबड्यात हात घालू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, आरोपीचा हात तरी पकडायचा होता, असं म्हणत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक न राहिल्याचं मुंडे म्हणाले.
=========================================

जालना उत्तरपत्रिका रॅकेट : बारावीचे 80 विद्यार्थी बडतर्फ, बोर्डाची कारवाई

जालना उत्तरपत्रिका रॅकेट : बारावीचे 80 विद्यार्थी बडतर्फ, बोर्डाची कारवाई
जालना : जालना पोलिसांनी भाडांफोड केलेल्या उत्तरपात्रिका रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटप्रकरणी बारावीच्या 80 विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. औरंगाबाद बोर्डाकडून दोषी विद्यार्थ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

18 मार्च रोजी जालना पोलिसांनी शहरातील संस्कार वस्तीगृहातून बारावीच्या उत्तरपत्रिका जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये अडीच हजार लिहिलेल्या आणि 5 हजार कोऱ्या उत्तरपत्रिका होत्या.

या प्रकरणातील 472 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने राखून ठेवला होता. त्यानंतर या विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी घेण्यात येऊन 2 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. तर 80 विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. बडतर्फ विद्यार्थ्यांवर वन प्लस वन या बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आल्यानं आता त्यांना 3 वर्ष परीक्षा देता येणार नाही.
=========================================

कोपर्डी बलात्कार : आरोपींना फाशीच होईल असा तपास करा : अजित पवार

कोपर्डी बलात्कार : आरोपींना फाशीच होईल असा तपास करा : अजित पवार
मुंबई नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही विधीमंडळात सुरु आहे.  कोपर्डीतील बलात्कार अत्यंत पाशवी कृत्य आहे. याप्रकरणी तातडीने तपास करुन, तपासात कुठेही दोष राहणार नाहीत याची काळजी घ्या. जेणेकरुन न्यायालय आरोपींना मरेपर्यंत फाशीच सुनावेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

चांद्यापासून – बांद्यापर्यंत महिलांवर अत्याचार सुरु आहेत, हे अत्याचार कसे रोखता येतील याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. कोपर्डीत घटना घडली त्यावेळी आरोपी दारु पित बसले होते, तिथे अनधिकृत दारुचा अड्डा चालूच कसा होता? अशी परिस्थितीच नसती, तर कोपर्डी बलात्कार झालाच नसता, असं अजित पवार म्हणाले.

गुन्हेगाराला जात-धर्म नसतो, मात्र गुन्हेगारांवर कडक कारवाई आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेला विश्वास, आधार वाटेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी केली.

बलात्कार पीडितांना नुकसान भरपाईची देण्याची रक्कम वाढवली आहे. मात्र त्यांच्यावर ती वेळच येऊ नये अशी व्यवस्था करा. पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन प्रश्न सुटणार नाहीत, सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई आवश्यक आहे, असं अजित पवारांनी नमूद केलं.
=========================================

'सैराट'सारख्या सिनेमांमुळे बलात्कारांमध्ये वाढ : भाजप आमदार

'सैराट'सारख्या सिनेमांमुळे बलात्कारांमध्ये वाढ : भाजप आमदार
मुंबई : ‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे मुलं बिघडत आहेत, बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असं अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे.

विधानसभा कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असतानाच मनिषा चौधरी यांनी हे विधान केलं आहे. इतकंच नाही तर ‘सैराट’सारख्या सिनेमांवर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केलं आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असंही मनिषा चौधरी म्हणाल्या.
=========================================

कोपर्डी बलात्काराच्या गंभीर चर्चेदरम्यान राजकीय चिखलफेक

कोपर्डी बलात्काराच्या गंभीर चर्चेदरम्यान राजकीय चिखलफेक
मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरु असताना काही काळ विषय भरकटला. कोपर्डीसारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात व्यक्त होते.

कोपर्डी प्रकरणावर चर्चा सुरु असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकार राबवत असणाऱ्या यंत्रणेवर अविश्वास व्यक्त केला आणि विषय थेट एकनाथ खडसेंना मिळालेल्या क्लीन चिटपर्यंत नेला. यानंतर एकनाथ खडसेही गप्प राहिले नाहीत. माझ्या क्लीन चिटमुळे अनेकांच्या थोबाडीत बसली, असं उत्तर  खडसेंनी विखेंना दिलं.

मात्र नेमकी कुणा-कुणाच्या थोबाडीत बसली, त्यांची नावंही खडसेंनी जाहीर करुन पटलावर ठेवावीत, आमची नावं त्यात नाही हे नक्की, असा मिश्लिल टोला राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला.

काही काळ आरोप प्रत्यारोप, चिखलफेक झाल्यानंतर पुन्हा कोपर्डी प्रकरणावर चर्चा सुरु झाली. परंतु चर्चा सुरु असताना काँग्रेसने कोपर्डीसारख्या गंभीर विषयाला राजकीय रंग दिला. त्यामुळे विरोधकांना तरी याप्रकरणाचं गांभीर्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
=========================================

मुंबई जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १९ - डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका बुडल्या. सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही तसेच बंदरातील नौदलाच्या सागरी संपत्तीचे नुकसान झाले नाही असे सूत्रांनी सांगितले. 
    बंदरात उभ्या असलेल्या दोन पैकी एका बोटीला आग लागली. ही आग जवळच्याच दुस-या बोटीपर्यंत पसरली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाणी आत शिरले व दोन्ही बोटी बुडाल्या. 
    बुडालेल्या बोटी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही नौका आकाराने छोटया होत्या. सागरी गस्तीसाठी त्यांचा वापर व्हायचा. 
=========================================
=========================================
=========================================
=========================================
=========================================
=========================================
=========================================
=========================================
=========================================

No comments: