Friday, 1 July 2016

नमस्कार लाईव्ह ०१-०७-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा 
२- राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलीसोबत शॉपिंग 
३- बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची हत्या 
४- न्यूयॉर्क; पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप  
५- मिन्स्क; विवस्त्र होऊन कर्मचारी पोहोचले ऑफिसला 
६- अफगाणिस्तानात दुहेरी आत्मघाती हल्ला, ३७ ठार 
७- राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर 
८- सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
९- 7 रेसकोर्टवर 7 तास बैठक, मोदींनी मंत्र्यांना का झापलं? 
१०- देश हादरवून सोडण्याच्या वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंचा यू-टर्न 
११- पेट्रोल आणि डिझेल स्वस्त 
१२- पिककर्जाची सोपी पद्धत, किसान क्रेडिट कार्ड 
१३- हरभरा दाळ 60 रुपये प्रति किलो दराने 
१४- संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'तेजस'ची आकाशझेप 
१५- हायपरसिटीला उच्च न्यायालयाचा दिलासा 
१६- मोबाईल टॉवर लावण्यासाठी नवीन धोरण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१७- बीड; बँक घोटाळाप्रकरणी धनंजय मुडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी 
१८- वृक्षारोपणाला उत्तम प्रतिसाद, सकाळी 11 पर्यंत 40 लाख झाडं लावली 
१९- उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू 
२०- उद्धव ठाकरेंच्या झाडाला माती घातली, रोपाचं वटवृक्ष होईल : मुख्यमंत्री 
२१- नाशिक; सेंट्रल जेलमधील सहा कैद्यांची पोलिसांना मारहाण 
२२- सीएसटी मोफत पाहण्याची संधी 
२३- गुजरातमध्ये सोळा हजार अभियंते बेरोजगार! 
२४- रिटेल क्षेत्रात वाढणार ५0 टक्के रोजगार ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- ठाणे पोलिसांची भन्नाट कामगिरी, 9 कोटींच्या दरोड्याचा छडा 
२६- बापानं नदीत फेकलेल्या बदलापूरच्या बहादूर मुलीची कहाणी! 
२७- मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेचा खोळंबा 
२८- नाशिक;  तरुणाच्या त्रासाला कंटाळून दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 
२९- सुरत; कोट्यधीश पती, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि एक हत्या 
३०- नांदेड; गुटखा प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय 
३१- पिंपरी; शेतातून साडे चार लाखांच्या डाळिंबांची चोरी 
३२- जयपूर; खुनी पित्यासोबत जेलमध्ये राहून केली जेईई क्रॅक 
३३- जयपूर; राजस्थान 'स्कूल टॉपर'कडून पतीचा खून 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- पुद्दुचेरी; घरात टॉयलेट बांधा, 'कबाली'चं तिकीट मोफत मिळवा 
३५- रोनाल्डोच्या पोर्तुगालची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक 
३६- अँड्रॉईड नॉगट, अँड्रॉईडचं नवीन व्हर्जन 
३७- जसवीर सिंहची जबरदस्त झुंज, जयपूर-बंगळुरु सामना टाय 
३८- मृणाल सेन यांच्या निधनाचे टि्वट खोटे 
३९- रवी शास्त्री यांचा ICC क्रिकेट कमिटीमधून राजीनामा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

======================================

बापानं नदीत फेकलेल्या बदलापूरच्या बहादूर मुलीची कहाणी!

बापानं नदीत फेकलेल्या बदलापूरच्या बहादूर मुलीची कहाणी!
बदलापूर: ‘देव तारी त्याला कोण मारी’ या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूरमध्ये आली आहे.  एकता सैनी असं त्या चिमुकलीचं नावं असून वडिलांनीच तिला पुलावरून नदीत फेकून दिलं होतं.  या चिमुकलीनं तब्बल १० तास मृत्युशी झुंज दिली. अखेर अग्निशमनच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बदलापूर जवळील एरंजाड गावातील पुलाखाली एक चिमुकली आवाज देत असल्याचं काही गावकऱ्यांना दिसलं. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणि अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीला टायरट्यूब बांधून  तिला सुखरूप बाहेर काढले , 
काल रात्री ८ वाजताच्या सुमारास ऐकता सैनी या ६ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी चप्पल घेऊन देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेलं आणि त्यानंतर तिला एरंजाड गावातील  उल्हास नदीच्या पुलावरून खाली फेकलं.  मात्र, नदीत पाण्यावर जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन असल्याने ती त्या जलपर्णी वरच तरंगली. रात्रभर ती त्या नदीच्या पुलाखाली जलपर्णी वनस्पतीवर बसून राहिली. नंतर सकाळी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबात माहिती दिली.  त्यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन या चिमुरडीची सुखरुप सुटका केली.
======================================

मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेचा खोळंबा

मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेचा खोळंबा
मुंबई : दक्षिण मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे दादर परिसरात वाहतुकीची कोंडी बघायला मिळते. वांद्रे आणि माहिम परिसरातही जोरदार पाऊस झालाय.
रस्ते वाहतुकीसोबतच लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. कळव्याजवळ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे.
जेव्हीएलआर मार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे कांजूर मार्गावरुन पवईकडे येणारी वाहतूक खोळंबलीय. पश्चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशीजवळ वाहतुक धीम्या गतीनं सुरु आहे.
======================================

बँक घोटाळाप्रकरणी धनंजय मुडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी

बँक घोटाळाप्रकरणी धनंजय मुडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी
बीड: बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची एसआयटीमार्फत चौकशी काल मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली .
धनंजय मुंडे हे मध्यरात्री एसआयटीसमोर हजर झाले. ही चौकशी तब्बल दीड तास सुरु होती. धनंजय मुंडेसोबतच अमरसिंह पंडितांचीही चौकशी करण्यात आली आहे.
बीड जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात विशेष पथकानं गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर कोर्टानं सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्यास बजावलं आहे.
======================================

नाशकात तरुणाच्या त्रासाला कंटाळून दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या

नाशकात तरुणाच्या त्रासाला कंटाळून दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या
नाशिक : तरुणाच्या छळाला कंटाळून एका दिव्यांग शिक्षिकेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या शिंदे-पळसे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

वंदना जाधव असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. सामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण पंकज ठाकूरला अटक केलीय.

जाधव यांनी तरुणाविरोधात एक महिन्यापूर्वी नाशिकरोड पोलिस स्टेशनला तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वैतागलेल्या वंदना जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
======================================

घरात टॉयलेट बांधा, 'कबाली'चं तिकीट मोफत मिळवा

घरात टॉयलेट बांधा, 'कबाली'चं तिकीट मोफत मिळवा
पुद्दुचेरी : सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. एअर एशियाकडून थलैवा रजनीला आगळीवेगळी मानवंदना दिलेली असताना पुदुच्चेरीत एक अनोखी योजना आणण्याची तयारी सुरु आहे. घरात स्वच्छतागृह बांधा आणि कबाली सिनेमाचं मोफत तिकीट मिळवा, ही ऑफर असेल.

घरातच स्वच्छतागृह बांधण्याचं महत्त्व समजावण्याचे प्रयत्न अनेक पातळींवर केले जातात. पुदुच्चेरीमधील सेल्लीपेटच्या गावकऱ्यांमध्येही अशाचप्रकारे जनजागृती करण्यासाठी पंचायतीने पावलं उचलली आहेत. घरात स्वच्छतागृह बांधा आणि कबाली सिनेमाचं मोफत तिकीट मिळवा अशी पंचायतीची योजना आहे.

ग्रामीण विकास संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात सेल्लीपेट गावात 772 घरं असून त्यापैकी केवळ 447 घरांमध्येच स्वच्छतागृहं असल्याचं समोर आलं. गावात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ही योजना आखली आहे.

सेल्लीपेट गावात रजनीकांतच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाचं मोफत तिकीट मिळवण्याच्या बहाण्याने का असेना, रहिवासी घरात स्वच्छतागृह बांधतील अशी अटकळ बांधली जात आहे. पुदुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी रजनीकांतला स्वच्छ भारत अभियानाचे सदिच्छादूत होण्याची विनंती केली आहे.
======================================

7 रेसकोर्टवर 7 तास बैठक, मोदींनी मंत्र्यांना का झापलं?

7 रेसकोर्टवर 7 तास बैठक, मोदींनी मंत्र्यांना का झापलं?
नवी दिल्ली: अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची कितपत अंमलबजावणी झाली, कोणत्या मंत्र्यांने काय कामं केली, जाहीरनाम्यात केलेल्या दाव्यांचं काय झालं, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांकडून घेतली.

7 रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. जवळपास 7 तास चाललेल्या या बैठकीत मोदींनी मंत्र्यांची झाडाझडती घेतली.

मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या 250 पैकी 150 घोषणांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून 100 स्लाईट्सद्वारे प्रेझेंटेशनमार्फत माहिती घेतली. सरकारची मदत, माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते का, ती कशी पोहोचवली जाईल, याबाबतही चर्चा झाली.

एकंदरीत या बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांची शाळा घेतली.
======================================

वृक्षारोपणाला उत्तम प्रतिसाद, सकाळी 11 पर्यंत 40 लाख झाडं लावली

वृक्षारोपणाला उत्तम प्रतिसाद, सकाळी 11 पर्यंत 40 लाख झाडं लावली
मुंबईशिवसेना आणि भाजपमधील तणावानंतर, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती राज्यभर वृक्षरोपणाची मोहीम सुरु झाली. सकाळी 11 पर्यंत 40,01,430 झाडं लावण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.

राज्य सरकारकडून महाराष्ट्रात आज तब्बल 2 कोटी झाडं लावण्यात येणार आहेत. वन विभागाकडून एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थित कार्यक्रम सुरु आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोनचाफा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण, सुधीर मुनगंटीवार आणि मकरंद अनासपुरेंच्या हस्ते कडूलिंब, कॉमेडी किंग कपिल शर्मा बकूळ तर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पिंपळाचं झाड लावण्यात आली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या नागरिकांना किमान एक तरी झाड लावण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाडं लावण्याचं नियोजन वन विभागाकडून करण्यात आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर्षी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येकी एका झाडाचे रोप भेट देण्याची सूचना केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
======================================

देश हादरवून सोडण्याच्या वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंचा यू-टर्न

देश हादरवून सोडण्याच्या वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंचा यू-टर्न
मुंबई: ‘गौप्यस्फोट करून देश हादरवण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंनी अचानक आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे. दाऊदचा एकनाथ खडसेंना फोन आला होता हे सिद्ध झालं असतं तर देश हादरला असता, अशी सारवासारव एकनाथ खडसेंनी केली आहे.’

दरम्यान, ‘मी तोंड उघडलं तर देश हादरेल असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना केलं होतं.’ त्यावरून विरोधकांनी एकनाथ खडसेंना गौप्यस्फोट करण्याचं आव्हान केलं होतं. विरोधकांच्या आव्हानानंतर एकनाथ खडसे बॅकफूटवर गेलेल दिसत आहेत. कदाचित म्हणूनच त्यांनी गौप्यस्फोट करून देश हादरवण्याएवजी सारवासारव सुरू केली आहे.

मध्यंतरी एकनाथ खडसेंवर एकामागे एक अनेक आरोप झाल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला. ‘मात्र मी तोंड उघडलं तर संपूर्ण देश हादरेल’, असं वक्तव्य करून खडसेंनी त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या शत्रूंना सूचक इशारा दिला होता. मात्र आता त्या वक्तव्यावरुन त्यांनी यू-टर्न घेतला आहे.
======================================

कोट्यधीश पती, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि एक हत्या

कोट्यधीश पती, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि एक हत्या
सुरत : सुरतमधील एका धनाढ्य व्यक्तीची घरात घुसून हत्या आणि लूट झाल्यामुळे शहरात खळबळ माजली होती. घरात पत्नी आणि लेक असतानाच या व्यावसायिकाची काही जणांनी सुरा खुपसून हत्या केली. मात्र लुटमारीच्या दिशेने तपास सुरु असतानाच पोलिसांना एक वेगळाच धागादोरा सापडला. या प्रकरणाची उकल करुन त्यांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी आरोपी तरुणी वेल्सीचा विवाह कोट्यधीश व्यावसायिक दिशीतशी झाला. नवऱ्याचं जीवापाड प्रेम, अगणित पैसा, आणि पदरात दीड वर्षांची मुलगी… तसं पाहता तिला कसलीच कमतरता नव्हती. पण तिच्या मनात कोणी दुसराच भरला होता.

सुरतच्या पॉश पार्ले पॉइंट परिसरात 27 जूनला एक हत्याकांड घडलं. व्यावसायिक दिशीत जरीवाला यांची काही जणांनी घरात घुसत सुऱ्याने खुपसून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिशीतची पत्नी वेल्सीने पोलिसांसमोर रडून रडून आकांडतांडव केला.

तिच्या माहितीनुसार रात्री 9.45 वाजता घराची बेल वाजली. दिशीत यांनी दरवाजा उघडला, तर काही सशस्त्र गुंडांनी घुसखोरी केली. आधी वेल्सीच्या हातातली सोन्याची अंगठी आणि चेन त्यांनी काढायला लावली आणि नंतर मायलेकींना बाथरुममध्ये बंद केलं. त्यानंतर सुऱ्याने पोटात खुपसून दिशीतची हत्या केली आणि तिजोरी तोडून दागिन्यांसह पोबारा केला.
======================================

गुटखा प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

गुटखा प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
नांदेड: राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. गुटख्याची कारवाई किरकोळ असते अशी धारणा झाल्याने गुटखा बंदीचा फारसा परिणाम कुठेही दिसून येत नाही. पण असे विचार करणाऱ्यांना झटका देणारा निकाल न्यायालायने दिला आहे. गुटख्यात हानिकारक पदार्थ आढळून आल्याने न्यायालायने 2 विविध प्रकरणांत 14 महिने आणि 20 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गुटख्यात हानिकारक पदार्थ असल्याने सरकारने 300 कोटींच्या महसुलावर पाणी सोडत गुटखा बंदी लागू केली. पण ही बंदी म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं अनेकदा उघड झालं. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गुटखा पकडला जातो. बंदीनंतर राज्यात 40 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यासाठी 5 हजार खटलेही दाखल झाले. पण तरीही गुटखा माफियांचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. 2004 आणि 2006 साली नांदेड शहरातून अन्न सुरक्षा विभागाने गुटख्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले त्यात मॅग्नेशियम कॉर्बोनेट हे हानिकारक घटक असल्याचा अहवाल देणय्त आला. त्यानंतर मुकेश आणि दिनेश अग्रवाल या बंधूंवर न्यायालयात खटला दाखल झाला.

आता या प्रकरणाचा निकाल आला असून एक प्रकरणात दोघांना 14 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे तर दुसऱ्या प्रकरणात दिनेश अग्रवालला 20 महिन्यांची सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे.
======================================

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
नवी दिल्ली : सामन्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 89 पैसे तर डिझेल 49 पैशांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
याआधी 15 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ही सहा आठवड्यातील चौथी दरवाढ होती. 15 जून रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 पैसे तर डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं होतं.
======================================

रोनाल्डोच्या पोर्तुगालची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक

रोनाल्डोच्या पोर्तुगालची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक
फोटो : एपी
पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालनं पोलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे पोर्तुगालने युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

मार्सेईत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रॉबर्ट लेवान्डोवस्कीनं दुसऱ्याच मिनिटाला गोल करुन पोलंडचं खातं उघडलं होतं. पण रिनाटो सान्चेझनं 33व्या मिनिटाला गोल डागून पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. हा सामना आधी निर्धारित वेळेत आणि मग अतिरिक्त वेळेतही 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामुळं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळवण्यात आला.

पोर्तुगालकडून रोनाल्डो, सान्चेझ, मोटिन्यो आणि नानीनं पहिले चार गोल केले. तर पोलंडकडून लेवान्डोवस्की, मिलिक आणि ग्लिकनं पहिले तीन गोल केले. मात्र ब्लाझकोवस्कीची पेनल्टी किक पोर्तुगालचा गोलकीपर रुई पॅट्रिसियोनं थोपवून लावली. त्यामुळे पोर्तुगालला विजयाची संधी चालून आली.

पाचव्या आणि अखेरच्या किकवर रिकार्डो क्वारेझ्मानं गोल झळकावून पोर्तुगालला युरो कपच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
======================================

अँड्रॉईड नॉगट, अँड्रॉईडचं नवीन व्हर्जन

अँड्रॉईड नॉगट, अँड्रॉईडचं नवीन व्हर्जन
मुंबईः अँड्रॉईड एनचं अँड्रॉईड नॉगट हे नवीन व्हर्जन लवकरच युझर्सच्या भेटीला येणार आहे, असं गुगलने जाहीर केलं आहे. युझर्स नावाबद्दलचं आपलं मत देखील कंपनीला कळवू शकतात, असंही कंपनीने म्हटलं आहे.




नॉगट हे अँड्रॉईडचं लेटेस्ट व्हर्जन असणार आहे, असं गुगलने मार्चमध्ये जाहीर केलं होतं. या व्हर्जनमध्ये मोबाईलची कार्यक्षमता वाढवणे, मल्टीटास्किंग अशी अनेक अपडेटेड फीचर्स असणार आहेत.
======================================

जसवीर सिंहची जबरदस्त झुंज, जयपूर-बंगळुरु सामना टाय

जसवीर सिंहची जबरदस्त झुंज, जयपूर-बंगळुरु सामना टाय
मुंबई : जसवीर सिंहने अखेरच्या मिनिटात जबरदस्त झुंज दिल्याने जयपूर पिंक पँथर्सला बंगळुरु बुल्सविरुद्धचा सामना 28-28 असा बरोबरीत रोखता आला. प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात टाय झालेला हा दुसरा सामना ठरला.


खरंतर बंगळुरु बुल्सचा संघ अखेरच्या मिनिटापर्यंत 28-25 असा तीन गुणांनी आघाडीवर होता. पण जसविरने दोन्ही चढायांमध्ये प्रत्येकी एक गुण आणून बंगळुरुची आघाडी 28-27 अशी एका गुणावर आणली. मग बंगळुरु बुल्सच्या अखेरच्या चढाईत रोहित कुमारला पकडून जयपूर पिंक पँथर्सने सामना 28-28 असा बरोबरीत सोडला.


जयपूरसाठी जसविर सिंहने सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली. तर राजेश नरवालने सहा गुण वसूल करुन जयपूरच्या विजयाला हातभार लावला.


बंगळुरु बुल्सकडून रोहित कुमारने सहा गुणांची कमाई केली. प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत जयपूर पिंक पँथर्स नऊ गुणांसह तिसऱ्या, तर बंगळुरु बुल्स आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.
======================================

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबईः सकाळपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसत आहे.

ठाणे, पवई, मुलुंड या भागात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तर कांदिवली, मीरो रोड, बोरिवली, दहिसर या भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

कुर्ला ते कलिना, बीकेसी या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली आहे. तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वे 20 मिनीटे उशीराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे 10 मिनीट उशीराने धावत आहे.
======================================

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलीसोबत शॉपिंग

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलीसोबत शॉपिंग
वॉशिंग्टनः अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली मुलगी मालिया ओबामा हिच्यासोबत शॉपिंगचा आनंद लुटला. मालियाने वडिलांसोबत शॉपिंग केल्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

ओबामा यापूर्वी देखील शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. मात्र यावेळची ओबामांची शॉपिंग जास्तच चर्चेत आहे. ओबामा सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहून शॉपिंगचे बिल घेताना दिसत आहेत.
======================================

शेतातून साडे चार लाखांच्या डाळिंबांची चोरी

शेतातून साडे चार लाखांच्या डाळिंबांची चोरी
पिंपरीः शिरुर तालुक्यातील फाकटे गावातील शेतकऱ्याच्या तब्बल 150 कॅरेट डाळिंबावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आजच्या बाजारभावानूसार तब्बल चार ते साडेचार लाखाचं नुकसान झाल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे.

भर दुष्काळात शेतकरी मोठ्या आव्हानांचा सामना करुन पिकं जगवत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मीत संकटांचा सुद्धा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

फाकटे गावाता मिनीनाथ वाळूंज यांची डाळिंबाची शेती आहे. यंदा दुष्काळ असल्याने टँकरच्या सहाय्याने पाणी घालून त्यांनी डाळिंबाची बाग जगवली. मात्र चोरट्यांनी डाळिंब चोरुन वाळिंज यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. याप्रकरणी टाकळीहाजी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
======================================

पिककर्जाची सोपी पद्धत, किसान क्रेडिट कार्ड

पिककर्जाची सोपी पद्धत, किसान क्रेडिट कार्ड
मुंबईः शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे शेतकऱ्यांना वापरता येतात.

शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता येणं, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून शेतकरी प्रत्येकवेळी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात.

किसान क्रडिट कार्डसाठी पात्रता
शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधणं गरजेचं आहे. कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे.शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
======================================

हरभरा दाळ 60 रुपये प्रति किलो दराने

हरभरा दाळ 60 रुपये प्रति किलो दराने
नवी दिल्लीः ग्राहकांना दाळ 60 रुपये प्रति किलो विकावी, असे निर्देश राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ म्हणजेच एनसीसीएफला केंद्र सरकारने दिले आहेत. दाळींच्या वाढत्या किंमतीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एनसीसीएफ अगोदरपासूनच मदर डेअरी आणि केंद्रीय भांडार यांच्यासोबत मिळून तूर आणि उडीद दाळ 120 रुपये प्रति किलो दराने विकत आहे.

तूर दाळ आणि उडीद दाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीमध्ये हरभरा दाळीचेही दर गगनाला भिडले आहेत. त्यानंतर सरकारने उपाय म्हणून हाचचाली करण्यास सुरुवात केली आहे.

दाळींच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवता यावं यासाठी एनसीसीएफला स्वस्त दरात दाळ विकण्याचे निर्देश दिले आहेत, असं केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रीलयाने एका पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
======================================

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू
देहरादून: उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने अलकनंदा नदीला आलेल्या पुरात 30 जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.

तीन वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यानं उत्तराखंडमध्ये जसा हाहाकार माजवला होता, तशीच काहीशी परिस्थिती आज उत्तराखंडच्या चामोली आणि पिठोडगढमध्ये निर्माण झाली आहे.

चामोली जिल्ह्यातील नंदप्रयाग घाट भागात ढगफुटीने जन-जीवन अक्षरशः विस्कटून गेलं. अलंकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे लोकांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं. अनेक भागातल्या घरांच्या भिंतीही कोसळल्यामुळे लोकांनी आता गच्चीचा आसरा घेतला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात घेऊन प्रशासनानं बचावकार्याला सुरूवात केली आहे.
======================================

ठाणे पोलिसांची भन्नाट कामगिरी, 9 कोटींच्या दरोड्याचा छडा

ठाणे पोलिसांची भन्नाट कामगिरी, 9 कोटींच्या दरोड्याचा छडा
ठाणे :  ठाणे पोलिसांनी चेकमेट कंपनीवरील दरोड्याचा छडा अवघ्या दोन दिवसात लावला आहे. याप्रकरणी कंपनीच्या एक माजी आणि एक आजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यापासून 4 कोटी 19 लाख रुपये जप्त केले आहेत.  अद्याप सुमारे 5 कोटी रक्कम हस्तगत करणं बाकी आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाणे पोलिस आयुक्त परवींदर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मंगळवारी चेकमेट या कंपनीवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी तब्बल साडेनऊ कोटी रुपये लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी झटपट तपासाची चक्रं फिरवून 24 तासांच्या आत पहिली अटक केली होती. या अटकेनंतरच धागेदोरे मिळत गेले आणि पोलिसांच्या हाती यश आलं.
======================================

संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'तेजस'ची आकाशझेप

संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'तेजस'ची आकाशझेप
बंगळुरु : संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाची पहिली बॅच आज हवाई दलात सहभागी झाली आहे. आज हवाई दलाच्या बंगळुरु येथील बेसवर छोटेखानी धार्मिक विधींसह हे लढाऊ विमान हवाईदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आलं.

सुरुवातीला केवळ दोन विमानं हवाई दलाला मिळणार असली तरीही या वर्षअखेर ही संख्या 6 वर जाणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या या विमानांचा तळ कोईंबतूर येथील शुलु या ठिकाणी करण्यात आलाय.

हवाई दलाच्या मिग-21 या विमानांच्या जागी तेजस ही विमानं असणार आहेत. अद्याप या विमानाला ऑपरेशनल लायसन्स मिळालेलं नाहीये, पण हा परवाना मिळाल्यानंतर तेजस लवकर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होईल.
======================================

उद्धव ठाकरेंच्या झाडाला माती घातली, रोपाचं वटवृक्ष होईल : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंच्या झाडाला माती घातली, रोपाचं वटवृक्ष होईल : मुख्यमंत्री
मुंबई:  जिथं गरज असेल तिथं खांद्याला खांदा लावून उभा राहीन, अपशकून करणार नाही. असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. तर वृक्षारोपणच्या मोहिमेत उद्धव ठाकरेंनी झाड लावलं. मी माती आणि पाणी घातलं. त्यामुळे यातून योग्य संदेश जाईल. आम्ही लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होईल, अशी अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुंबईतल्या कुर्ला परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज वृक्षरोपण करण्यात आलं. त्यानंतर आयोजित सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

शिवसेना आणि भाजपमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे.

आतापर्यंत 40 लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा वनविभागच्या वतीनं करण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक दिग्गज व्यासपीठावर होते.
======================================

नाशकात सेंट्रल जेलमधील सहा कैद्यांची पोलिसांना मारहाण

नाशकात सेंट्रल जेलमधील सहा कैद्यांची पोलिसांना मारहाण
नाशिक : कारागृहातील सहा कैद्यांनीच दोन पोलीस शिपायांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील गुन्हेगारांनी पोलिसांना मारहाण केली.

तुरुंगातील सहा गुन्हेगारांना आज कोर्टात नेलं जाणार होतं. पण गाडीत बसायला जागा नसल्याने खासगी गाडीतून कोर्टात नेण्याची व्यवस्था करा, अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली.

पोलिसांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे वैतगालेल्या कैद्यांनी थेट पोलिसांना मारहाण केलीय. त्यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचं काहीच भय उरलं नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
======================================

रवी शास्त्री यांचा ICC क्रिकेट कमिटीमधून राजीनामा


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 01 - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी क्रिकेट कमिटीमधून राजीनामा दिला आहे. रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली आहे असं बोललं जात आहे. कोच पदावरून रवी शास्त्री आणि सौरव गांगुली या भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये गेले काही दिवस शाब्दिक युद्ध रंगले आहे.
    रवी शास्त्री गेली 6 वर्ष आयसीसी क्रिकेट कमिटीचा प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. रवी शास्त्रीने अगोदरच राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. तसंच आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांना पत्र लिहून या पदावरुव बाजूला होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. 
======================================

सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा


  • ऑनलाइन लोकमत - 
    न्यूयॉर्क, दि. 01 - सिरियामध्ये काही भारतीयांचं वास्तव्य असल्याची माहिती इसीसशी (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया) संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या फ्रेंच नागरिकाने दिली आहे. दहशतवादी संघटना इसीसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली रेदा हेम याला गेल्यावर्षी पॅरिसमधून अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असताना सिरियामध्ये जेव्हा मला एका खोलीत ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी तिथे माझी भेट काही भारतीय आणि रशियन नागरिकांशी झाल्याचं सांगितलं आहे. 
    सिरियामधून परतल्यानंतर लगेचच ऑगस्टमध्ये  रेदा हेमला अटक करण्यात आली होती. 'फ्रान्समध्ये रॉक कॉन्सर्टदरम्यान हिंसाचार घडवण्याची कामगिरी इसीसने माझ्यावर सोपवली होती, त्यासाठीच माझी नेमणूक करण्यात आली होती', अशी माहिती रेदा हेमने चौकशीदरम्यान दिली आहे. सिरियामध्ये रशियन बोलणा-या हल्लेखोरांची संख्या जास्त असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका लेखात म्हटलं आहे. 
======================================

हायपरसिटीला उच्च न्यायालयाचा दिलासा


  • मुंबई : वाशीमधील इनआॅर्बिट मॉलमध्ये हायपरसिटीची शाखा बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही शाखा एका रात्रीत सील केली. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने एनएमएमसीच्या नोटीसला स्थगिती दिल्याने पुन्हा हायपरसिटीची शाखा ग्राहकांसाठी सुरू होणार आहे.
    ‘मॉलला एफएसआय मिळालेला आहे. या एफएसआयचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या इनआॅर्बिट मॉलने महापालिकेकडून घेतल्या आहेत. महापालिका दावा करत असल्याप्रमाणे हायपरसिटी तळघरात नसून तळमजल्यावर आहे. त्यामुळे महापालिकेने बजावलेली नोटीस रद्द करावी,’ असा युक्तिवाद इनआॅर्बिट मॉलतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला. पालिकेने यावर आक्षेप घेतला. ‘पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, तळघराचा वापर पार्किंग किंवा स्टोअररूमसाठी करण्याची परवानगी आहे. मात्र तळघराचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे मॉलकडे सर्व परवानग्या असल्या तरी तळघराचा वापर दोन गोष्टींकरिता मर्यादित आहे. डीसीआरचे उल्लंघन केल्याने महापालिकेने संबंधित आउटलेट सील केले,’ असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केला. ‘२००८ पासून हे सुरू आहे. तेव्हापासून तुम्ही काय करत आहात? परवानग्या तर तुम्हीच दिल्यात. एवढी वर्षे सुरू असलेली शाखा आता आणखी काही दिवस सुरू राहू द्या,’ असे म्हणत न्यायालयाने नोटिसीला स्थगिती देत ही याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवली. 
======================================

सीएसटी मोफत पाहण्याची संधी


  • मुंबई : वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेले सीएसटी स्थानक आणि त्यातील म्युझियम पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुल्क आकारले जाते. मात्र २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून हेरिटेज सप्ताह साजरा केला जाणार असून ८ जुलैपर्यंत सीएसटीला भेट देणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
    २ जुलै २00४ रोजी सीएसटी स्थानकाचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समावेश करण्यात आला. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असणारे मुंबईतील हे एकमेव स्थानक ठरले. या स्थानकाला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. आता स्थानकात २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून ‘हेरिटेज सप्ताह’ साजरा केला जाणार असून तो ८ जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती अपर महाव्यवस्थापक ए.के. श्रीवास्तव यांनी दिली. या सप्ताहात हेरिटेज वॉक, प्रदर्शन, सीएसटी येथील मुख्यालयाच्या डायनिंग हॉलमध्ये चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी स्थानकाला भेट देणाऱ्यांसाठी २ जुलै ते ८ जुलैपर्यंत कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांना सीएसटीचे अंतर्गत बांधकाम आणि म्युझियमही
    पाहता येईल, असेही श्रीवास्तव म्हणाले.
======================================

खुनी पित्यासोबत जेलमध्ये राहून केली जेईई क्रॅक


  • जयपूर : ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते. कोटा येथील पीयूष मीना याने असेच अपवादात्मक यश मिळवित इतरांसाठी आदर्शवत ठरणारी स्वत:ची अनोखी कहाणी घडवली आहे.
    पूर्वाश्रमीचे शासकीय शिक्षक असलेले वडील फुलचंद हे हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असल्यामुळे आणि होस्टेलची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे वडील राहत असलेल्या खुल्या कारागृहातील ८ बाय ८च्या सेलमध्ये राहून त्याला अभ्यास करावा लागला. आयआयटी प्रवेशासाठी असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत ४५३वी रँक (अनुसूचित जमाती श्रेणी) घेत त्याने मिळविलेले यश म्हणूनच अनोखे ठरते. खुल्या कारागृहात आरोपीसोबत कुटुंबीयांना राहता येत नाही, पण आरोपीला दररोज कमाईसाठी बाहेर जाता येते. मला मुुलाच्या कोचिंग आणि होस्टेलसाठी २ लाख रुपयांची गरज होती. नातेवाईक, मित्रांची मनधरणी करून १ लाख रुपये जमवता आले, पण त्यात कोचिंगची फीसुद्धा भागत नव्हती.
======================================

बलात्कार पीडितेसोबतचा सेल्फी महागात


  • जयपूर : बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेणे राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर यांना महागात पडले असून, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फैलावर घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बुधवारी महिला पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार पीडितेची भेट घेतली होती. तेव्हा
    आयोगाच्या सदस्य गुर्जर त्यांच्यासोबत होत्या. पीडितेची विचारपूस करतेवेळी गुर्जर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेतले. या वेळी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने गुर्जर पीडितेसोबत सेल्फी घेत असतानाची दोन छायाचित्रे टिपली.
    ती व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
======================================

मृणाल सेन यांच्या निधनाचे टि्वट खोटे


  • कोलकाता : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन झाल्याच्या टि्वट आलेल्या बातम्या या अफवा असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी स्पष्ट केले. सेन यांचे निधन झाल्याचे टिष्ट्वट बुधवारी फिरत होते. प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांनी टिष्ट्वटरवर त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. सेन यांच्या कुटुंबीयांनी निधनाची ही अफवा असल्याचे सांगितले.








======================================

बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची कु-हाडीने करण्यात आली हत्या


  • ऑनलाइन लोकमत
    ढाका, दि. १ - बांग्लादेशमध्ये शुक्रवारी सकाळी एका हिंदू पुजा-याची कु-हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली. बांग्लादेशची राजधानी ढाक्यापासून ३०० किमी अंतरावर असलेल्या झिनाइडा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली असून श्यामनंदो दास (वय ४५) असे मृत पुजा-याचे नाव आहे. 
    शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दास हे पूजेसाठी फुलं गोळा करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर कु-हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दास यांचा जागीच गतप्राण झाले, अशी माहिती अधिका-यांनी दिली. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नसून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
    गेल्या काही दिवसांत बांग्लादेशमध्ये हिंदूंची हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून आजच्या आणखी एका हत्येमुळे परिसरातील तणाव वाढला आहे. 
======================================

पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप


  •  ऑनलाइन लोकमत 
    न्यूयॉर्क, दि. १ - सध्याच्या जमान्यात लग्न, प्रेम जुळवणा-या डेटींग अॅप्सचा पर्याय उपलब्ध असताना आता ब्रेकअपचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड सोबत रहाण्यात स्वारस्य नसेल, तुम्हाला त्या नात्याचा उबग आला असेल तर, तुम्ही ब्रेकअप शॉप कंपनीची मदत घेऊन प्रेमसंबंध संपवू शकता. 
    यासाठी दहा डॉलर ते ४० डॉलरपर्यंत रक्कम आकारली जाते. तुम्ही कुठली सेवा निवडता त्यावर रक्कम ठरते. मॅकेंझी आणि इव्हान या दोन कॅनडीयन भावांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली आहे. वेबसाईटवर जाहीरात केल्यानुसार आम्ही सर्व सेवा देतो असे त्यांनी सांगितले. 
    प्रेमसंबंध संपवण्यासाठी मोबाईलवरुन संदेश, फोन, ई-मेल आणि हस्तलिखित पत्राची सेवा ही कंपनी देते. मोबाईल संदेशासाठी सर्वात कमी १० आणि हस्तलिखित पत्रासाठी सर्वाधिक ३० डॉलर आकारले जातात. तात्काळ सेवा हवी असल्यास जास्त रक्कम घेतली जाते.
    ब्रेकअप संदेश काय असावा हे  स्वत: ग्राहक ठरवू शकतो किंवा कंपनीतील तज्ञ ग्राहकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संदेश बनवतात. या कंपनीचे खास ब्रेकअॅपही असून तुम्हाला अशा कुठल्या नात्यातून सुटका करुन घ्यायची असेल तर, आता ब्रेकअप ऑप्शनही उपलब्ध आहे. 
======================================

.....आणि विवस्त्र होऊन कर्मचारी पोहोचले ऑफिसला


  • ऑनलाइन लोकमत
    मिन्स्क, दि. ३० – बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी राजधानी मिन्स्कमधल्या नॅशनल असेंबलीमध्ये भाषण दिले. यावेळी अलेक्झांडर यांनी लोकांना उद्देशून बोलताना 'आपल्याला आयटी टेक्नॉलॉजीमध्ये नावीन्यपूर्णता आणायची आहे, हे स्पष्ट आहे. आयटी क्षेत्र आपण आधीच काबीज केलं आहे. त्यामुळे आपण कपडे काढून काम केलं पाहिजे,"  असं म्हटलं आहे. राष्ट्रपतींना स्वतःला विकसित करा "develop themselves" असं म्हणायचं होतं. मात्र त्यांनी त्याऐवजी 'गेट अनड्रेस' म्हणजेच कपडे काढून काम करा, अशा शब्दांचा उच्चार केला. राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी कपडे काढून कामावर जाणं पसंत केलं. काही कर्मचारी तर चक्क विवस्त्र होऊन कामावरती आले. त्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राष्ट्रपतींच्या आदेशाचे पालन करताना कर्मचाऱ्यांनी चक्क कपडे काढून काम केलं, यामध्ये स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर टॉप ट्रेंड सुरू आहे.
======================================

अफगाणिस्तानात दुहेरी आत्मघाती हल्ला, ३७ ठार


  • काबूल : अफगाणिस्तानात पोलिसांच्या ताफ्यावर गुरुवारी केलेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यात ३७ ठार, तर ४० जण जखमी झाले.
    काबूलपासून २० कि.मी.वरील पघमान जिल्ह्यात हा हल्ला झाला. पहिल्या हल्लेखोराने प्रशिक्षणार्थी पोलिसांना नेणाऱ्या दोन बसवर हल्ला केला, तर दुसऱ्याने पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणी मदतीसाठी धावलेल्यांना लक्ष्य केले.
    मृतांत चार नागरिकांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी पोलीस वारदाक प्रांतातील प्रशिक्षण केंद्राहून काबूलला परतत होते.
    गृहमंत्रालयाने हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देत मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले. मात्र, हल्ल्याविषयी अधिक माहिती दिली नाही.
    तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारणारा ई-मेल वृत्तसंस्थेला पाठविला आहे. दोन आत्मघाती हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला.
======================================

राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर


  • लंडन : भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल (३९) लंडनचे उपमहापौर झाले आहेत. सादिक खान हे महापौर आहेत. लंडन शहराचा बुद्धिमत्तेकडे आणि साहसी उपक्रमांकडे बघण्याचा खुलेपणा सार्वमतामुळे बदलून जायला नको, असे अग्रवाल म्हणाले. भारतात सामान्य वातावरणात वाढलेले राजेश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या रॅशनलएफएक्स या विदेशी चलन व्यवहारांतील प्रचंड मोठ्या कंपनीची गेल्या वर्षीची वार्षिक उलाढाल १.३ अब्ज पौंडांची होती. 





======================================

सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा


  • ऑनलाइन लोकमत - 
    न्यूयॉर्क, दि. 01 - सिरियामध्ये काही भारतीयांचं वास्तव्य असल्याची माहिती इसीसशी (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया) संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या फ्रेंच नागरिकाने दिली आहे. दहशतवादी संघटना इसीसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली रेदा हेम याला गेल्यावर्षी पॅरिसमधून अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असताना सिरियामध्ये जेव्हा मला एका खोलीत ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी तिथे माझी भेट काही भारतीय आणि रशियन नागरिकांशी झाल्याचं सांगितलं आहे. 
    सिरियामधून परतल्यानंतर लगेचच ऑगस्टमध्ये  रेदा हेमला अटक करण्यात आली होती. 'फ्रान्समध्ये रॉक कॉन्सर्टदरम्यान हिंसाचार घडवण्याची कामगिरी इसीसने माझ्यावर सोपवली होती, त्यासाठीच माझी नेमणूक करण्यात आली होती', अशी माहिती रेदा हेमने चौकशीदरम्यान दिली आहे. सिरियामध्ये रशियन बोलणा-या हल्लेखोरांची संख्या जास्त असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका लेखात म्हटलं आहे. 
======================================

मोबाईल टॉवर लावण्यासाठी नवीन धोरण


  • डेहरादून : मोबाईल टॉवरमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा सरकारने इन्कार केला असून, याबाबत एक नवीन धोरण निश्चित केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन धोरणामुळे नवीन टॉवर विशेषत: निवासी भागांत लावणे सोपे होणार आहे.
    केंद्रीय दूरसंचार सचिव जे.एस. दीपक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, याबाबत संबंधित पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. पुढील दोन महिन्यांत हे धोरण तयार होईल, अशी मला आशा आहे.
    मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणांमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे अद्यापपर्यंत कोणत्याही अभ्यासातून स्पष्ट झालेले नाही.
    जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या अभ्यासात ही बाब आढळून आलेली नसल्याचे दीपक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
======================================

रिटेल क्षेत्रात वाढणार ५0 टक्के रोजगार !


  • मुंबई : दुकाने २४ तास तसेच आठवड्यातील सर्व ७ दिवस उघडी ठेवण्यास परवानगी देणारे आदर्श दुकाने आणि प्रतिष्ठाने (रोजगार आणि सेवा शर्ती नियमन) विधेयक रोजगार क्षेत्रासाठी वरदान सिद्ध होणार आहे. या विधेयकामुळे किरकोळ क्षेत्रातील रोजगारात तब्बल ५0 टक्के वाढ होईल. तसेच किरकोळ क्षेत्रासह आतिथ्य, आयटी आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित विचार केल्यास रोजगारात सुमारे १0 टक्के वाढ होईल. याशिवाय महिलांना रात्रपाळीच्या कामावर ठेवणेही कंपन्यांना शक्य होणार आहे.
    नव्या विधेयकावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, वरील माहिती समोर आली आहे. रँडस्टॅड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मूर्ती के. उप्पालुरी यांनी सांगितले की, नव्या विधेयकाचा सर्वाधिक लाभ किरकोळ आणि आतिथ्य क्षेत्राला होणार आहे. या क्षेत्रांना थेट आणि तात्काळ फायदा होईल.
    विधि आणि कर सल्लागार संस्था निशिथ देसाई असोसिएटस्चे प्रमुख (मनुष्यबळ विकास व विधि) विक्रम श्रॉफ यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी नवीन कायदा लागू केल्यास कंपन्यांना विविध राज्यांत आपली कार्यालये उघडणे सोपे होईल. मनुष्यबळविषयक नियमांत समानता आणणेही शक्य होईल. कामगारविषयक कायद्यांची अंमलबजावणी सोपी होईल.
======================================
गायींची तस्करी थांबवा- ममता बॅनर्जी

कोलकता- बांगलादेशमध्ये होणाऱया गायींची तस्करी थांबविण्याचे आदेश पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शुक्रवार) प्रशासनाला दिले आहेत.

नॉर्थ 24 परगन्स जिल्ह्यातील विकासकामांची माहिती घेण्यासाठी बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. पश्‍चिम बंगालमधून बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होते. तस्करी थांबविण्यासाठी कडक तपासणीचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या औद्योगीक कंपन्यांनी 45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये 1.45 लाख नागरिकांना रोजगार निर्माण होईल. शिवाय, जिल्ह्यामध्ये नवीन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.‘
======================================
गुजरातमध्ये सोळा हजार अभियंते बेरोजगार!

अहमदाबाद - गुजरातमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडलेले तब्बल 16 हजारपेक्षा अधिक पदवीधारक सुशिक्षित बेकार असल्याची माहितीसमोर आली आहे. गुजरातमधील रोजगार हमी कार्यालयात यावर्षी अभियांत्रिकी क्षेत्रातील 16 हजार पेक्षा अधिक पदवीधारकांची नावनोंदणी झाली आहे.

लहानपणापासून प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वप्न असते. बहुतेक विद्यार्थ्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी बाळगून हे विद्यार्थी योग्य ती पूर्वतयारी करून अभियांत्रिकी शाखेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. या क्षेत्रातील संधी, लठ्ठ पगार, प्रतिष्ठा आदी बाबींमुळे गुजरातमधील तरुणांनादेखील या क्षेत्रात भुरळ पडलेली आहे. मात्र अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडलेले तब्बल 16 हजार विद्यार्थी सुशिक्षित बेकार असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुजरातच्या रोजगार हमी कार्यालयात असे दरवर्षी सोळा हजार अधिकृत बेकार अभियंते नोकरीच्या आशेवर शिक्षण घेत आहेत. 
======================================
राजस्थान 'स्कूल टॉपर'कडून पतीचा खून

जयपूर (राजस्थान)- इयत्ता आठवीमध्ये प्रथम आल्याबद्दल बक्षीस म्हणून मिळालेला लॅपटॉप घेऊन पळ काढत असलेल्या व्यसनी पतीचा ‘स्कूल टॉपर‘ने खून केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीमध्ये ‘स्कूल टॉपर‘ ठरलेल्या विद्यार्थिनीचा वयाच्या 16व्या वर्षी कानोटा गावातील हरफूल (वय 20) या युवकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर तिचे शिक्षण थांबले होते. हरफूल याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने पत्नीला शाळेत बक्षीस म्हणून मिळालेला लॅपटॉप विक्रीसाठी चालविला होता. यावेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीत हरफूलचा जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पतीच्या खुनाबद्दल पत्नीला अटक करण्यात आली असून, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
======================================

No comments: