*[अंतरराष्ट्रीय]*
1- चीनमध्ये पुराचं तांडव, अनेक घरं वाहून गेली
2- वॉशिंग्टन; अमेरिकेत गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू
3- रबत- मोरोक्को 32 नंतर आफ्रिकन युनियनमध्ये होणार सामील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
4- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी
5- नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश
6- कंदिल बलोचला हवे होते भारतीय नागरिकत्व
7- दिल्लीत भारत-पाकसारखी स्थिती- केजरीवाल
8- सुवर्णरोखे योजनेचा चौथा टप्पा आजपासून
9- लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
10- महिलेला कारने धडक, कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकरांना अटक
11- कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
12- मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही: तृप्ती देसाई
13- आजपासून पावसाळी अधिवेशन, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनिती
14- राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी
15- मुख्यमंत्री डिनरसाठी ‘मातोश्री’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
16- हजारो कोटी खर्चूनही मुंबईकर खड्ड्यातच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
17- मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दुल्याचा तरुणीवर चाकूहल्ला
18- लातूर : उदगीरजवळ जीप -कंटेनरच्या भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू. मृतांत दोघे उदगीरचे.
19- कौलं अंगावर फोडली, पुण्यातील 3 विद्यार्थिनींचा विश्वविक्रम
20- मेरठ; दाढी करा नाहीतर आत्महत्या करेन, पत्नीने दिली धमकी
21- रायगड: कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात बुडून तिघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
22- डेव्हिस कपमधील विजयानंतर पेस, बोपण्णाचा कतरिनाच्या गाण्यावर ठेका
23- फुटबॉलच्या मैदानावर हृदय पिळवटून टाकणारी घटना!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=======================================महिलेला कारने धडक, कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकरांना अटक
पुणे : कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील काल (रविवार) भांडारकर रोडवर डॉ. अभ्यंकर यांच्या कारच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अरुंधती हसबनीस असं मृत महिलेचं नाव असून तिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. मृत महिला पंजाब नॅशनल बँकेत नोकरीला होती.
=======================================

डेव्हिस कपमधील विजयानंतर पेस, बोपण्णाचा कतरिनाच्या गाण्यावर ठेका
चंदीगड : डेव्हिस चषक लढतीत दक्षिण कोरियावरील विजयाचा आनंद भारतीय खेळाडूंनी साजरा केला, तो नृत्यासह. हरियाणा टेनिस असोसिएशनच्या ग्रास कोर्टवर लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णासह भारतीय संघाच्या शिलेदारांनी ‘अफगाण जलेबी’ या गाण्यावर ठेका धरला.
एरव्ही टेनिस टीममध्ये बेबनावाची चर्चाच जास्त रंगते, पण पेस आणि बोपण्णाचं हे नृत्य बोलकं ठरलं आहे. स्वत: लिअँडर पेसने या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
=======================================

कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
अहमदनगर : कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कोणत्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
=======================================

मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही: तृप्ती देसाई
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगरमधील कर्जतमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. ‘सरकार सुस्त असून मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला वेळ नाही.’ अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जो पर्यंत राजीनामा देत नाही, तो पर्यंत विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवू देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कुठल्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जत बलात्कार प्रकरणाचा तपास जातीय गतिरोधात अडखळत असल्याची सोशल मीडियावर टीका होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं.
पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान कर्जत बलात्काराप्रकरणी दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
=======================================

आजपासून पावसाळी अधिवेशन, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनिती
मुंबई: आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. मंत्रिमंडळ विस्तार, कर्जत बलात्कार प्रकरण, कथित पीए लाच प्रकरणी खडसेंना मिळालेली क्लिन चीट, आंबेडकर भवन हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात गाजणार असल्याची चिन्ह आहेत.
दुसरीकडे संसदेचंही पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवण्यात आलेल्या बैठकीला सर्वपक्षीयांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात जीएसटीसह महत्त्वाच्या विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असणार आहे.
राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आकड्यांची गणितं बदलली आहेत. त्यामुळेच जीएसटी विधेयक सरकारला आता दृष्टीपथात दिसू लागलं आहे. अरुणाचलमधला आक्रस्ताळेपणा आणि धगधगतं काश्मीरचं खोरं हे दोन मुद्दे सोडले. तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे मोठा दारुगोळा नाही.
स्मृती इराणींना बाजूला करुन मोदींनी त्या संघर्षालाही शमवलं आहे. त्यामुळे सरकारचं जीएसटी विधेयक हेच अधिवेशनात लक्ष्य आहे.
=======================================
मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दुल्याचा तरुणीवर चाकूहल्ला
मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला. रविवारी रात्री ही घटना घटना घडली.
फिरोज युसुफ शेख असं हल्लेखोराचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पुजा बाळकृष्ण पाखरे ही तरुणी दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर रात्री 8.27 च्या लोकलची वाट पाहत उभी होती. मात्र त्याचवेळी एका गर्दुल्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पुष्पाला मानेला दुखापत झाली आहे. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हल्लेखोर गर्दुल्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
=======================================
चीनमध्ये पुराचं तांडव, अनेक घरं वाहून गेली
बीजिंग : चीनच्या हुनान प्रांताला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. उफनती नदीला आलेल्या महापुरात अनेक घरं कचऱ्यासारखं वाहून गेली आहेत. या घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
महापुराची परिस्थिती अत्यंत भीषण असून हुनान प्रांतातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने घरं जमिनीत गाडली गेली आहे.
या पुरात रेल्वेचे रुळही वाहून गेलेत, त्यामुळे पाण्याचा प्रवाह किती जोरात होता, याचा अंदाज लावता येईल. दरम्यान यानंतर स्थानिक प्रशासनाचं मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
=======================================
व्हॉट्सअॅपच्या 4 ओळीनं वाचवला, चार जणांचा जीव!
अकोला: टाईमपासचं साधन म्हणून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाला हिणवलं जातं. मात्र, याच व्हॉट्सअपनं चार जणांचे जीव वाचवले आहेत.
रेखा जोंधळे बुलडाण्यातल्या रहिवासी. रेखाला व्हॉट्सअॅप म्हणजे काय माहित नाही. पण त्याच व्हॉट्सअॅपने तिला जगवलं. 14 तारखेला अकोल्यातल्या जिल्हा रुग्णालयात रेखाला प्रसवकळा सुरु झाल्या. ऑपरेशन सुरु झालं. पण गर्भाशयातच बाळ दगावलं. रेखाची प्रकृतीही चिंताजनक झाली. ऑपरेशनसाठी रक्ताची गरज होती. पण ग्रुप होता ए निगेटिव्ह. जो अत्यंत दुर्मिळ मानला जातो.
रक्तपेढीही हतबल झाली. पण तितक्यात एक चमत्कार झाला. रक्तपेढीच्या प्रमुखांनी एक व्हॉट्सअॅप मेसेज वरिष्ठांना केला
एका ग्रुपवरून दुसऱ्यावर दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असा फिरत त्या मेसेजनं दुर्मिळ असलेल्या रक्तगटाच्या 8 जणांपर्यंत धाव घेतली. आठ ग्रुपवर तो मेसेज पाठवल्यानंतर काही तासात हे रक्तदाते मिळाले. रेखा जोंधळे यांच्याप्रमाणेच आणखी तीन रुग्णांनाही ए निगेटिव्ह ब्लड ग्रुपची गरज होती. त्यामुळे रेखा जोंधळेंसोबत इतर तीन जणांचेही जीव वाचले. म्हणजेच व्हॉट्सअॅपच्या त्या चार ओळींच्या एका मेसेजनं चार जीव बचावले.
=======================================
राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी
मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत राम शिंदेंचा फोटो असल्याचा दावा करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर ट्वीटद्वारे मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली.
राम शिंदेंसोबत फोटोत असलेली व्यक्ती कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता. शिवाय, राम शिंदेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली होती.
=======================================
लातुरात जीप-कंटेनरचा भीषण अपघात, 8 प्रवाशांचा मृत्यू
लातूर : उदगीर-अहमदपूर मार्गावरील कल्लूर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. जीप-कंटेनरमधील अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एकूरका रोडजवळ रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
अपघातातील 8 मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून, उर्वरीत 5 जणांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी उदगीरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
=======================================
मुख्यमंत्री डिनरसाठी ‘मातोश्री’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिनरसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
मातोश्रीच्या डिनर टेबलवर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा रंगणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधलं शीतयुद्ध सगळ्यांनाच माहिती आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी परस्परविरोधी वक्तव्य करून राजकीय वातावरण चांगलंच गरम केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जेवणासाठी मातोश्रीवर गेल्यामुळं सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.
=======================================
फुटबॉलच्या मैदानावर हृदय पिळवटून टाकणारी घटना!
बीजिंग : चायनीज सुपर लीगमध्ये शांघाई एसआयपीजी संघाच्या डेम्बा बाला गंभीर दुखापत झालीय. शांघाय एसआयपीजी आणि शांघाय शेनुआ संघांमधल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली.
शांघाय शेनुआच्या सन शियांगनं डेम्बा बाला टॅकल केलं. हे टॅकल इतकं गंभीर होतं की डेम्बा बाचा पाय मोडला. डेम्बा बाला लागलीच रुग्णालयात हलवण्यात आलं.
दरम्यान, या दुखापतीमुळं डेम्बा बाची कारकीर्द संपुष्टात येण्याचं संकट उभं राहिलंय. डेम्बा बानं आपल्या कारकीर्दीत चेल्सी, न्यूकास्टल युनायटेड, वेस्ट हॅम युनायटेड आणि बेसिकताससारख्या बलाढ्य संघांचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.
पाहा व्हिडीओ –
=======================================
667 कौलं अंगावर फोडली, पुण्यातील 3 विद्यार्थिनींचा विश्वविक्रम
पुणे : पुण्यामध्ये वुसू इंटरनॅशनल मार्शल आर्टच्या 3 विद्यार्थीनींनी डोळे दिपवणारं प्रात्यक्षिक सादर करून लिम्का बुक आणि गिनीज बुकमध्ये आपलं नाव कोरलं आहे. विद्यार्थिनींनी केलेलं हे प्रात्यक्षिक हे योग्य मार्गदर्शनाखाली केलं गेलं आहे.
विश्वविक्रमी दिवशी पुण्यातल्या नेहरु मेमोरियल हॉलमध्ये वेगळंच वातावरण होतं. सगळ्याचं लक्ष लागलं होतं त्या तिघींकडे म्हणजेच ऋतूजा अमरावती, वैजयंती बदाडे आणि युगा आखरेकडे. कारण गिनीज आणि लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी त्या तिघी त्यांचे गुरु विक्रम मराठे यांच्यासह तयार होतात. विश्वविक्रमाला गवसणी घालण्यापासूनव अगदी एक पाऊल दूर असतात आणि अखेर ती वेळ येते. तिघींच्याही शरीरावर सुरु होतो कौलांचा पाऊस…
अगदी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता. शरीरातील शक्तीचा पुरेपूर वापर करून त्या हे सहज सहन करत होत्या. मागच्या अनेक वर्षांपासून घेत असलेल्या मार्शल आर्टच्या ट्रेनिंगमुळे त्यांच्या शरीरावर कौल फो़डली जात असली तरी त्या कोसळत नव्हत्या. अखेर 26 मिनिटांत प्रत्येकीनं तब्बल 667 म्हणजेच एकूण 2001 कौल अंगावर झेलली आणि विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावांवर केली.
ज्यांच्या खांद्यावर ही खरी जबाबदारी होती, ते विक्रम मराठे यांच्यासाठी हा सर्वौच्च आनंदाचा क्षण होता. कारण केलेला सराव आणि खरा हा दिवस यात जमीन अस्मानाचं अंतर होतं. धाकधूक होती. आणि अखेरीस त्यांच्याही कष्टाचं फळ झालं.
पहिल्या क्षणापासून धाकधूक लावलेला हा विक्रम फक्त शारीरीक नाही तर मानसिक कसोटी पाहाणारा होता. ‘जर तर’ मध्ये अडकलेले अनेक प्रश्न आणि बघ्यांची तोबा गर्दी. यामुळे उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. मार्शल आर्टच्या माध्यमातून अगदी शास्त्रशुद्धपणे, विपरित काही घडणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन मिळवलेलं हे यश म्हणूनच कौतुकास पात्र आणि निर्भेळ आहे.
=======================================
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 18 - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही चौकशी केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही चौकशी करण्यात आली. शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी मृतदेह सापडला होता.सुनंदा यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार व थरुर यांच्या संबंधाबाबत ट्विट केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळला होता. चौकशीसाठी मेहेर तरार भारतात आल्या होत्या. मध्य दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी डिसेंबर महिन्यात चौकशीत सहकार्य करण्यासंबंधी पत्र पाठवलं होतं, ज्याला मेहेर तरार यांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं.
=======================================
हजारो कोटी खर्चूनही मुंबईकर खड्ड्यातच
- मुंबई- दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खडतर करणारे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे स्वप्न महापालिकेने तीन वर्षांपूर्वी दाखविले. प्रत्यक्षात करोडो रुपये ठेकेदार आणि अभियंत्यांच्या खिशात आणि मुंबईकर खड्ड्यात गेले आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या पत्रामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे बिंग फुटले. मात्र हे तर हिमनगाचे टोक असून, हा घोटाळा हजारो कोटींचा असण्याची दाट शक्यता आहे. चौकशीच्या पहिल्या फेरीतून अनेक धक्कादायक बाबींनी महापालिका हादरली. वर्षोनुवर्षे महापालिकेच्या तिजोरीला भगदाड पाडणाऱ्या या ठेकेदारांविरोधात पालिका प्रशासन कठोर पावले उचलत असताना अधिकारी घोटाळेबाज ठेकेदारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करीत आहेत.
=======================================
दाढी करा नाहीतर आत्महत्या करेन, पत्नीने दिली धमकी
- ऑनलाइन लोकमत -मेरठ, दि. 18 - दाढी करा नाहीतर मी आत्महत्या करेन अशी अजब धमकी 36 वर्षीय अर्शद बहारुद्दीन यांना त्यांच्या पत्नीने दिली आहे. अर्शद बहारुद्दीन मुस्लिम असून पेश इमाम आहेत. त्यांनी जिल्हाधिका-यांकडे आपल्या पत्नीचं समुदेशन करण्याची विनंती केली आहे. आपल्या पत्नीने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं तर याला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल अशी भीती अर्शद बहारुद्दीन यांना वाटू लागली आहे.अर्शद बहारुद्दीन यांनी जिल्हाधिका-यांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. 'मी पेश इमाम असून इस्लामचा खरा समर्थक आहे. मी 2001 मध्ये सहानाशी विवाहबद्द झालो. लग्नानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला दाढी काढून टाकण्याची मागणी केली. बॉलिवूडमधील अभिनेते सलमान खान, शाहरुख खान तिला प्रचंड आवडतात, त्यामुळे त्यांच्यासारखं मी दिसावं अशी तिची मागणी आहे. तिने स्मार्टफोन विकत घेतला असून दिवसभर परपुरषांशी गप्पा मारत असते. मी अनेकदा यावरुन नाराजी व्यक्त केली आहे' असं अर्शद बहारुद्दीन यांनी सांगितलं आहे.
=======================================
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश
- ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. १७ : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना तूर्तास दिलासा दिला आहे. वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे.पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
- =======================================
- कंदिल बलोचला हवे होते भारतीय नागरिकत्व-
मुलतान - प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिला भारतीय नागरिकत्व हवे असल्याचे तिने केलेल्या ट्विटमधून समोर आले आहे.
कंदिल बलोचची शनिवारी तिचा भाऊ महंमद वासिम यानेच गोळ्या झाडून हत्या केली होती. फेसबुकवर अश्लील व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यासाठी कंदिल प्रसिद्ध होती. यावरूनच तिचा भावाबरोबर वाद होत असे आणि त्यातूनच भावाने गोळ्या झाडून तिची हत्या केली. पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे. कंदिलने मॉडेलिंग व अभिनय सोडावा, असा तगादा तिच्या भावाने लावला होता. एका मुस्लिम धर्मगुरूसोबत सेल्फी काढल्याने कंदिल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. कंदिलने सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यावर प्रेम असल्याचे जाहीर केले होते. याबरोबरच तिने मार्चमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तर स्ट्रीप डान्स करण्याचे जाहीर केले होते.ईदपूर्वी कंदिलने सोशल मीडियावरील एका संदेशात तिला स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे म्हटले होते. कंदिलने मार्चमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते, की पाकिस्तानमध्ये निराश झाल्याने मी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचा विचार करत आहे. तिने हे ट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले होते. पाकिस्तानचे नागरिक मला स्वीकारायला तयार नाहीत, त्यामुळे मला भारतात कामाला सुरवात करण्याचे सोपे वाटत आहे. कंदिल बिग बॉसमध्येही सहभागी होण्याची चर्चा होती.
=======================================
अमेरिकेत गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू
| |
-
| |
वॉशिंग्टन - अमेरिकेतील ल्युसियाना राज्यातील बॅटन रुज शहरात बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये सतत गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आता या घटनेमुळे आणखी यात भर पडली आहे. पोलिसांनी या हल्लेखोराला ठार मारले आहे. पण, याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. डल्लास पोलिसांनी वर्णभेदातून हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निषेध व्यक्त केला आहे.
बॅटन रुज शहरातील एअरलाईन हायवेवर ही गोळीबाराची घटना घडली. पोलिस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
=======================================
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज "टॉक टू एके‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्राने जर दिल्लीत भारत-पाकिस्तानसारखी स्थिती निर्माण केली नसती तर आम्ही चार पटींनी अधिक चांगले काम करू शकलो असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तब्बल अर्धा तास आपले म्हणणे मांडल्यानंतर केजरीवालांनी जनतेशी संवाद साधला. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवरील खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही जे काम केले आहे ते काल्पनिक नाही. आपण ते स्वत: येऊन पाहू शकता.‘‘
यावेळी एका श्रोत्याने निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या वायफायच्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारला. राजेंद्रकुमार यावर काम करत होते, ते नसल्याने आम्हाला नव्या मंत्र्याची नियुक्ती करावी लागेल. सध्या संपूर्ण शहरामध्ये फायबर ऑप्टिक केबल नेटवर्कचे काम सुरू असून यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. या दरम्यान हॉटस्पॉटचेदेखील नेटवर्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नायब राज्यपालांनी यामध्ये अडथळा आणला नाही तर डिसेंबर- जानेवारीपर्यंत हे सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीत भारत-पाकसारखी स्थिती- केजरीवाल
| |
-
| |
यावेळी एका श्रोत्याने निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या वायफायच्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारला. राजेंद्रकुमार यावर काम करत होते, ते नसल्याने आम्हाला नव्या मंत्र्याची नियुक्ती करावी लागेल. सध्या संपूर्ण शहरामध्ये फायबर ऑप्टिक केबल नेटवर्कचे काम सुरू असून यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. या दरम्यान हॉटस्पॉटचेदेखील नेटवर्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नायब राज्यपालांनी यामध्ये अडथळा आणला नाही तर डिसेंबर- जानेवारीपर्यंत हे सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
=======================================
सुवर्णरोखे योजनेचा चौथा टप्पा आजपासून
| |
-
| |
नवी दिल्ली - सुवर्णरोखे योजनेअंतर्गत चौथ्या टप्प्यात सुवर्णरोख्यांची विक्री किंमत प्रतिग्रॅम 3 हजार 119 रुपये केंद्र सरकारकडून रविवारी निश्चित करण्यात आली. योजनेचा चौथा टप्पा उद्यापासून (ता. 18) सुरू होत आहे.
या योजनेसाठी इच्छुकांचे अर्ज 18 जुलै ते 22 जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सुवर्णरोख्यांचे वाटप केले जाणार आहे. बॅंका, स्टॉक होल्डिंग्ज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), नियुक्त टपाल खाती आणि राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजार यांसारख्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये हे रोखे उपलब्ध असणार आहेत. योजनेअंतर्गत 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सुवर्णरोख्यांची विक्री केली जाणार आहे. म्हणजेच 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सोन्यासाठी रोख्यांचे वाटप केले जाते. रोख्यांसाठी 5 ते 7 वर्षाची कालावधी असणार आहे.
याआधी किमान 5 ग्रॅमचे सुवर्णरोखे खरेदी करता येत होते. योजनेच्या चौथ्या टप्प्यात छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 1 ग्रॅमपासून सुवर्णरोखे विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. व्यक्ती अथवा संस्थांना ते खरेदी करता येणार असून, कमाल पाचशे ग्रॅमपर्यंत सुवर्णरोखे खरेदी करता येईल. पहिल्या तीन टप्प्यांत 1 हजार 318 कोटी म्हणजेच 4.9 टन सोन्याएवढी गुंतवणूक झालेली आहे. चौथ्या टप्प्यात सर्वाधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
No comments:
Post a Comment