Monday, 11 July 2016

नमस्कार लाईव्ह ११-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ट्विटरचे सीईओ जॅक दोरसेंचं अकाऊंट हॅक 
२- सौदी अरेबियात हाफिज सईद करतोय दहशतवाद्यांची भरती 
३- अमेरिकन रोजगारनिर्मितीमुळे महागले कच्चे तेल 
४- सोमालियात आत्मघाती हल्ल्यात दहा सैनिक ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- अबू आझमी झाकीर नाईकच्या पाठिशी 
६- अटकेच्या भीतीने डॉ. झाकीर नाईकची भारत वापसी रद्द? 
७- काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या 23, राजनाथ सिंहांचा सोनियांना कॉल 
८- दहशतवादी बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रमात हाफिज सईदची हजेरी 
९- मोदी फुकट नाही, भाडं भरून विमान वापरतात - गौतम अदानी 
१०- सेंसेक्स 500 अशांनी वधारला 
११- भारतीय कंपन्या पारदर्शकतेत अव्वल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- वायकरांचा निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 
१३- बीड; धनंजय मुंडे, रजनी पाटील लवकरच फरार घोषित 
१४- पंकजा मुंडेंच्या महिला-बालकल्याण विभागानं दिलेली टेंडर कोर्टाकडून रद्द 
१५- मोबाईल अॅपसाठीही भरावा लागणार टॅक्स 
१६- खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडले 
१७- लैंगिक अत्याचारप्रकरणी पचोरी यांना जामीन 
१८- औरंगाबाद: पोषण आहाराच्या 6300 कोटींच्या निविदा खंडपीठाकडून रद्द 
१९- नाशिकमध्ये होणारी गुरुवारची पाणी कपात अखेर रद्द - महापालिकेचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- जळगाव; नवरदेव आणि वऱ्हाड्यांचं चक्क गोमूत्र आणि गाईच्या शेणानं स्वागत! 
२१- नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये 
२२- हतनूर धरणाचे प्रथमच 36 दरवाजे उघडले 
२३- केरळातील 21 जण 'इसिस'मध्ये गेल्याची शक्यता 
२४- आसाम: एकशिंगी गेंड्यांना पुराचा धोका 
२५- चंद्रपूर; कार वाहून गेल्याने तीन शिक्षक बुडाले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- सलमानच्या 'सुलतान'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी घोडदौड 
२७- स्नॅपडीलच्या मार्केटिंग शुल्कात 18% पर्यंत कपात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

--------------------------------------------------

सौदी अरेबियात हाफिज सईद करतोय दहशतवाद्यांची भरती


  • ऑनलाइन लोकमत - 
    ब्रुसेल्स (बेल्जिअम), दि. 11 - सौदी अरेबियात रमझानच्या निमित्ताने झालेल्या दहशतवाही हल्ला ही चेतावणी असून लष्कर-ए-तोयबाने आपले हात पसरण्यास सुरुवात केली आहे. मदिनामध्ये झालेला दहशतवादी हल्ल्याचा मागे लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदने सुरु केलेली स्वयंसेवी संस्थाफलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनचा हात असल्याची शक्यता युरोपिअन संसद उपाध्यक्ष रिझार्ड झारनेक यांनी व्यक्त केली आहे. रिझार्ड झारनेक यांनी लिहिलेल्या ' वेक अप कॉल टू अँटी - टेररिझम अय्यतोल्लाज' लेखाच्या माध्यमातून ही शंका व्यक्त केली आहे. 
     
    'इसीसने मध्य पुर्व देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशननेदेखील आपलं जाळ पसरवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनच्या हालचाली भारताशी निगडीत असल्याचा समज असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण मदिना येथे झालेल्या हल्ल्यामुळे हे मत बदललं असल्याचं', रिझार्ड झारनेक यांनी लेखात नमूद केलं आहे. 
--------------------------------------------------

दहशतवादी बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रमात हाफिज सईदची हजेरी


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुझफ्फराबाद, दि. 11 - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारला गेल्यानंतर एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असताना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुझफ्फराबादमधील हिजबुल बेसवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या श्रद्धांजली कार्यक्रमात हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीन आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बुरहान वनीच्या समर्थनार्थ पोस्टरही लावण्यात आले होते. 
     
    हाफिज सईद जमात-उल-दावाच्या सायबर सेल सदस्यांसोबत या बैठकीत पोहोचला होता. सय्यद सलाऊद्दीनदेखील आपल्या सरर्थकांसह या बैठकीत हजर होता. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं यावेळी हाफिज सईद बोलला आहे. हाफिज सईदने बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना काश्मीर खो-यात भारताविरोधी भावना भडकवण्याचं आवाहन केलं आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 
--------------------------------------------------

पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी 15 घरगुती उपाय


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 11 - वाढत्या वयासोबत होणारे पांढरे केस अनेकांची समस्या असते. तरुण वयात होणारे पांढरे केस अनेकांना आपलं वय वाढल्याची भीती निर्माण करुन देत असतात. त्यामुळेच मग आपलं वय लपवण्यासाठी केसं काळे करणं, ते लपवणं असे प्रकार सुरु होतात. केसांवर कलरचा वापर केल्यास केस कमकुवत होतात. केस पांढरे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण केस पांढरे होण्यापासून रोखणे आपल्या हातात आहे. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करु शकतात. यामध्ये आहाराचा समावेश असून हे नैसर्गिक पदार्थ केसांना लावले तरी आपले केस काळे होऊ शकतात. 
     
    चला तर मग जाणुन घेऊया कोणता आहार घेतल्यास किंवा कोणत्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्याने पांढ-या केसांची समस्या दूर होईल.
--------------------------------------------------

केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय


  • ऑनलाइन लोकमत - 
    थिरुवनंतपुरम , दि. 11 - लग्नानंतर इस्लाममध्ये धर्मातरण केलेली गरोदर महिला आपल्या पतीसह इसीसमध्ये भरती झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निमिशा नाव असलेल्या या 25 वर्षीय तरुणीची आई बिंदू यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली असून चौकशीची मागणी केली आहे. केरळमधील 15 लोक इसीसमध्ये भरती झाला असल्याचा संशय आहे ज्यामध्ये निमिशादेखील आपल्या पतीसह सामील असण्याची शक्यता आहे. 
     
    'मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तपासात प्रगती होत असल्याचं सांगितलं', असल्याची माहिती बिंदू यांनी दिली आहे. बिंदू यांनी मुलगी निमिषा बेपत्ता झाल्यानंतर याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली होती. पश्चिम आशियात गेलेले केरळातील 15 तरुण बेपत्ता झाले असून ते इस्लामिक स्टेट (आयएस) या खतरनाक अतिरेकी संघटनेत सहभागी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिले आहेत.
--------------------------------------------------

मोबाईल अॅपसाठीही भरावा लागणार टॅक्स?


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 11 - अॅपल आणि गुगलवर मोबाईल अॅप्लिकेशन किंवा अॅप खरेदी करणं आता महाग होण्याची शक्यता आहे. मोबाईल अॅप्लिकेशन्सवर इक्वलायजेशन लेवी अंतर्गत अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याने अँड्रॉईड आणि iOS मोबाईल अॅप्लिकेशन्स महाग होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत नव्याने मार्गदर्शक तत्वे जारी केली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
    इक्वलायजेशन लेवी १ जून २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. यानुसार, देशाबाहेर रजिस्टर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑनलाइन जाहिरातींवर ६ टक्के इक्वलायजेशन लेवी लागू केली जात आहे. या लेवीचा किंवा अतिरिक्त कराचा भार कंपन्या साहजिक ग्राहकाकडून वसून करण्याची शक्यता असून परिणामी अॅपच्या किंमती 7 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. भारतामध्ये ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या सेवा पुरवतात, ज्यामध्ये ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच गूगल, याहू, ट्विटर, फेसबुक इत्यादी येतात, त्यांच्या वेबसाईटवरी ऑनलाईन जाहिरातींवर ६ टक्के लेवी किंवा कर आकारण्यात येतो. आता, हा कर मोबाईलसाठीही लागू केला तर, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून पुरवण्यात येणारी अॅप महागतील. त्याच्या पुढे जात, आंतरराष्ट्रीय टिव्ही चॅनेलवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींवरही हा कर लागू शकेल. 
    केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्थापन केलेल्या समितीने मार्चमध्ये अशाप्रकारे कर लावण्याचं सुचवलं होतं. त्यामुळे कर लावण्याचा निर्णय झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. यांसदर्भात या वर्षाअखेरीपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
--------------------------------------------------
हतनूर धरणाचे प्रथमच 36 दरवाजे उघडले

पश्‍चिम रेल्वेची सेवा कोलमडली

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. पश्‍चिम रेल्वेची सेवा कोलमडली आहे. नंदुरबारला रेल्वेचे डबे घसरल्याने भुसावळकडून सुरत, अहमदाबादकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या मुंबईमार्गे वळविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सहा तालुक्‍यात अतिवृष्टी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत सरासरी 900 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव, एरंडोल, धरणगाव, यावल, पारोळा, चोपडा या सहा तालुक्‍यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही संततधार पाऊस सुरू आहे.
हतनूर धरणाच्या कॅचमेंट एरिया, सोबतच मध्यप्रदेशात पावसाचा गेल्या दोन दिवसांपासून जोर आहे. यामुळे हतनूर धरणाचे 36 गेट पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. महापूराचे पाणी अनेक शेतात गेले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
--------------------------------------------------
खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडले

टेमघरला तासात 143 मिमी, तर खडकवासला धरण 80 टक्के भरले 
खडकवासला : खडकवासला धरणातील पाणीसाठा 80 टक्के झाला आहे. पावसाचा जोर असल्याने धरणाच्या पाणलोटात जमा होणारा येवा चांगला आहे. त्यामुळे, खडकवासला धरणातून सोमवारी संध्याकाळी सुमारे 500 क्‍युसेकने कालव्यात पाणी सोडले.

टेमघर धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 24 तासांत 143 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्या धरणाच्या भिंतीच्या पुढील बाजूला पडलेला पाऊस खडकवासला धरणात जमा होतो. धरणात प्रत्येक तासाला 16.41 दशलक्ष घनफूट म्हणजे तासाला 189 क्‍युसेकने पाणी टेमघर, सिंहगड, पाबे, आगळंबे, आंबी या खोऱ्यातून जमा होत आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. 

दुपारी तीन वाजता या खडकवासला धरणात 1.58 टीएमसी 79.86 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत धरणात 4.32 टीएमसी 40.60 टक्के, वरसगाव धरणात 3.95 टीएमसी 30.81 टक्के, टेमघर धरणात सोमवारी सकाळी 0.79 टीएमसी तर 21.34 टक्के पाणी जमा झाले होते.
मागील 9 तासांत टेमघर येथे 42, वरसगाव येथे 37, पानशेत येथे 38, तर खडकवासला येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला प्रकल्पातील चार ही धरणांत एकूण 10.30 टीएमसी पाणी जमा झाले आहे. पुणे शहराला दररोज 40 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्‍यकता असते. हा पाणीसाठा पुणे शहराला 257 दिवस म्हणजे आठ महिने पुरेल एवढा आहे. 
--------------------------------------------------
भारतीय कंपन्या पारदर्शकतेत अव्वल
-

लंडन - पारदर्शी व्यवहाराच्या निकषावर भारतीय कंपन्या जगात सर्वोत्कृष्ट असून चीनमधील कंपन्या या यादीत तळाला असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. "ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल‘ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.

या संस्थेने जगात वेगाने विकसीत होणाऱ्या 15 देशांतील एकूण शंभर कंपन्यांची पाहणी केली. भारत आणि चीनसह ब्राझील, मेक्‍सिको आणि रशिया या देशांमधील कंपन्यांचाही यामध्ये समावेश होता. त्या त्या देशांच्या कंपनी कायद्याचे पालन करत एकूण व्यवहार आणि गुंतवणूकीबाबत पारदर्शकता हा निकष तपासला गेला. तपासल्या गेलेल्या भारताच्या सर्व 19 कंपन्यांना संस्थेने 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण देत यादीत त्यांना वरचे स्थान दिले. याउलट चीनच्या कंपन्यांची कामगिरी मात्र फारच खराब असल्याचे निदर्शनास आले. सर्वेक्षणात घेतलेल्या चाचणीमध्ये त्यांना सरासरी दहा पैकी फक्त 1.6 गुण मिळाले. देशातील कमजोर आणि कालबाह्य कायदे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचेही दिसून आले. तपासल्या गेलेल्या शंभर कंपन्यांमध्ये सर्वांत जास्त 37 कंपन्या चीनमधीलच होत्या आणि सर्वांत खराब कामगिरीही त्यांचीच होती. यातील काही कंपन्यांना तर शून्य गुण मिळाले. 
--------------------------------------------------
सोमालियात आत्मघाती हल्ल्यात दहा सैनिक ठार
-

मोगादिशू- सोमालिया लष्करी प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात दहा सैनिक ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.

अधिकारी मोहमद अदावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शाबेल्ले प्रांतातील लंता ब्युरो येथे लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आहे. दहशतवाद्यांनी आज सकाळी मोटारीचा वापर करून आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात दहा सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘

दरम्यान, अल शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यात 30 सैनिक ठार झाल्याचा दावा अल शबाबच्या प्रवक्‍त्याने केला आहे. गेल्या वर्षीही त्यांनी केलेल्या हल्ल्यात 15 सैनिक ठार झाले होते.
--------------------------------------------------
स्नॅपडीलच्या मार्केटिंग शुल्कात 18% पर्यंत कपात

मुंबई : भारतातील ऑनलाइन व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी स्नॅपडीलने आपल्या विपणन शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरविले आहे.

अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने कंपनीने मार्केटिंगचे नवे धोरण आखले आहे. स्नॅपडीलने आपल्या डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स, महिलांची फॅशन, जलदगती ग्राहकवस्तू उत्पादने यांसह सुमारे 120 उपवर्गांमध्ये या शुल्कामध्ये ही कपात करणार आहे. परंतु, त्याचवेळी 30 उपविभागामधील विपणन शुल्क वाढविण्यात येणार आहे. 

विक्रेत्यांकडून आलेल्या प्रतिसादानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, नवे शुल्क या आठवड्यापासून लागू होणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. 
--------------------------------------------------

No comments: