[राष्ट्रीय]
मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार, विखे-पाटलांचा इशारा
१- चौकीदारासमोर डाळीची चोरी, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
२- राज्यसभेत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप
३- भारतात लवकरच अॅपल स्टोअर, टिम कूक यांची घोषणा
४- वेदांता कंपनीचा 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीचा परवाना रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- मैत्रेय' गुंतवणूकदारांना उद्या पैसे परत मिळणार
६- नो हेल्मेट नो पेट्रोलबाबत चर्चेने तोडगा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
७- शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह 11 जण दोषी, मात्र मोक्का हटवला
८- महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजकांना राजस्थानचे द्वार खुले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
९- मुंबई; एक शरीर, दोन तोंडं, सायन रुग्णालयात सयामी जुळ्यांचा जन्म
१०- उस्मानाबाद; मुंबईकरांचं चीज-बटर उस्मानाबादच्या जनावरांच्या कारखान्यातून?
११- वर्धा; पैसे आणि मुलाचा हव्यास, पतीकडून पत्नीसह चिमुकलीची हत्या
१२- चंडीगड; शेतकऱ्याचं कौतुकास्पद पाऊल, गँगरेप पीडितेशी लग्न
१३- नाशिक; महिलेचा खून करुन मृतदेह बाथरुममध्ये लपवला
१४- औरंगाबाद; शिक्षकाने आडनावावरुन चिडवलं, विद्यार्थीनीचा गळफास
१५- मेंपुरी; १५ रुपयांच्या उधारीवरुन दलित दांम्पत्याची हत्या
१६- भडगाव; भिंत पडल्याने शाळा राहिली बंद
१७- उस्मानाबाद; तीन दिवस मजुरी, तीन दिवस शिक्षण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- सुप्रसिद्ध साहित्यिका महाश्वेता देवी यांचं निधन
१९- हरभजन आणि गीताच्या घरी नन्ही परी
२०- टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज लवकरच बोहल्यावर
२१- रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे रक्षण व्हावे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

साईन खान या महिलेने सायन रुग्णालयात या बाळांना जन्म दिला आहे. यांना सयामी जुळेच म्हणता येईल, मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे.
या बाळाला दोन तोंडे आणि तीन हात आहेत. तूर्तास ऑपरेशन केलं तर धोका संभवत असल्यानं यावर संपूर्ण विचार करुन मगच बाळाची सर्जरी केली जाईल. तूर्तास या बाळाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र बाळाचं ऑपरेशन करायचं की नाही? याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

जनावरांच्या हाडांचा ढीग आणि असह्य कुबट वास… उस्मानाबादच्या पिंपरीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या या कारखान्यांवर काल धाड पडली आणि किळसवाण्या कारखान्यांचा पर्दाफाश झाला.
बाबा मुजावर हे कारखान्याचे चालक आणि काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. शफिक कुरेशी हे कारखान्याचे मालक मूळचे मुंबईकर आहेत, पण दोघांनाही कारखान्यातून तयार होणारा पदार्थ कुठे आणि कशासाठी जातो हे सांगता येत नाहीये. कारखान्याचे सहाही मालक मुंबईचे आहेत. कारखान्यातले कामगार बिहारी. सहापैकी दोनच कारखान्यांकडे केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा परवाना आहे.

रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे. त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्त्व न पटणाऱ्या वाहनचालकांमध्येही याबाबत मोठा संताप आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हेल्मेटसक्ती गरजेची असल्याचं सांगतानाच त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत म्हटलं. त्यामुळे तूर्तास तरी रावतेंचा ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा निर्णय बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षाने कॅबिनेट मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती देत मंत्र्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.
संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचं विखे म्हणाले. सीबीआयने संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे, त्यामुळे विखे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत.

गेल्या काही काळापासून महाश्वेता देवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. महाश्वेता देवी यांना भारतीय साहित्य विश्वात अत्यंत मानाचं स्थान आहे. पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानांबरोबरच साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
‘हजार चौरासी की माँ’ सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांबरोबरच त्यांचं बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या आदिवासी जमातींच्या संघर्षावर केलेलं लिखाण विशेष महत्त्वाचं ठरलं आहे.
त्याचप्रमाणे ‘आरण्येर अधिकार’ ही त्यांची आदिवासींच्या आयुष्यावर आधारित कादंबरीही प्रसिद्ध ठरली होती. आदिवासी जमातींवर त्यांनी केवळ लेखनच केलं नाही तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढाही दिला. रुदाली या महाश्वेता देवींच्या लघुकथेवर चित्रपटही आला होता.

हेझल कीच ब्रिटनमध्ये जन्मली असून 2011 साली बॉडीगार्ड’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

एक शरीर, दोन तोंडं, सायन रुग्णालयात सयामी जुळ्यांचा जन्म
मुंबई : मुंबईच्या सायन रुग्णालयात एक शरीर आणि दोन तोंडं असलेल्या बाळांचा जन्म झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाळ आणि बाळंतीण या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
साईन खान या महिलेने सायन रुग्णालयात या बाळांना जन्म दिला आहे. यांना सयामी जुळेच म्हणता येईल, मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे.
या बाळाला दोन तोंडे आणि तीन हात आहेत. तूर्तास ऑपरेशन केलं तर धोका संभवत असल्यानं यावर संपूर्ण विचार करुन मगच बाळाची सर्जरी केली जाईल. तूर्तास या बाळाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र बाळाचं ऑपरेशन करायचं की नाही? याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
======================================
मुंबईकरांचं चीज-बटर उस्मानाबादच्या जनावरांच्या कारखान्यातून?
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये मांसाची फॅक्टरी असल्याचं बुधवारी उघडकीस आल्यानंतर आज या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीच नसल्याचं समोर आलं आहे. तसंच इथं जनावरांच्या हाडापासून भुकटी नव्हे तर मांसापासून चीज आणि बटर तयार करण्यात येत होतं असा आरोप आहे.
जनावरांच्या हाडांचा ढीग आणि असह्य कुबट वास… उस्मानाबादच्या पिंपरीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या या कारखान्यांवर काल धाड पडली आणि किळसवाण्या कारखान्यांचा पर्दाफाश झाला.
बाबा मुजावर हे कारखान्याचे चालक आणि काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. शफिक कुरेशी हे कारखान्याचे मालक मूळचे मुंबईकर आहेत, पण दोघांनाही कारखान्यातून तयार होणारा पदार्थ कुठे आणि कशासाठी जातो हे सांगता येत नाहीये. कारखान्याचे सहाही मालक मुंबईचे आहेत. कारखान्यातले कामगार बिहारी. सहापैकी दोनच कारखान्यांकडे केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा परवाना आहे.
======================================
मैत्रेय' गुंतवणूकदारांना उद्या पैसे परत मिळणार
नाशिक : मैत्रेय कंपनीत गुंतवलेले पैसे उद्या म्हणजेच शुक्रवारपासून परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांना त्यांच्या थकीत पैशाचे डीडी उद्या दुपारी 4 वाजता नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात वाटप करण्यात येईल.
ठेवीची मुदत संपलेल्या 125 तक्रारदारांना पोलीस आयुक्त एस.जगन्नाथ यांच्या हस्ते डिमांड ड्राफ देण्यात येणार आहे.
तर उर्वरीत ठेवीदारांना स्थापन केलेल्या समितीच्या सुचनेनुसार पैसे मिळणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी दिली.
दरम्यान मैत्रेयच्या ठेवीदारांसंदर्भात पैसे परत मिळण्याची बातमी प्रसारीत होताच, नाशिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. काल एकाच दिवसात तब्बल अकराशे तक्रारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. मैत्रेय चित्रफंडनं देशातल्या एकूण 20 लाख गुंतवणूकदारांना चुना लावला आहे.
======================================
नो हेल्मेट नो पेट्रोलबाबत चर्चेने तोडगा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई : ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’वरुन राज्यभर गोंधळ सुरु असताना आता विधानसभेतही या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घेतलेल्या निर्णयाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे. त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्त्व न पटणाऱ्या वाहनचालकांमध्येही याबाबत मोठा संताप आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हेल्मेटसक्ती गरजेची असल्याचं सांगतानाच त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत म्हटलं. त्यामुळे तूर्तास तरी रावतेंचा ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा निर्णय बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार, विखे-पाटलांचा इशारा
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा दावा करत सोमवारी ते हक्कभंग दाखल करणार आहेत.
विरोधी पक्षाने कॅबिनेट मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती देत मंत्र्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.
संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचं विखे म्हणाले. सीबीआयने संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे, त्यामुळे विखे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत.
======================================
चौकीदारासमोर डाळीची चोरी, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : देशातल्या महागाईच्या मुद्यावरुन आज लोकसभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. “मा बच्चे रातभर रोते है,आसू पिकर सोते है”, अशी डायलॉगबाजी मोदींनी केली होती. मग आता महागाईबाबत का बोलत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी केला.
पंतप्रधान स्वत:ला प्रधानसेवक म्हणतात, मात्र चौकीदाराच्या डोळ्यासमोर चोरी होत असताना, चौकीदार शांत का, असा घणाघात, राहुल गांधींनी केला.
मोदी देशातल्या कोणत्याही विषयांवर पोटतिडकीनं बोलतात.पण महागाईच्या मुद्यावर मोदींनी अद्याप एकही वक्तव्य केलं नाही.
यावेळी बोलताना राहुल गांधींनी डाळ आणि भाजीपाल्यांचे दर वाचून दाखवले. यूपीए सरकारच्या काळात सर्व दर आटोक्यात होते. मात्र आता ते कसे वाढले असा सवालही राहुल गांधींनी केला.
======================================
सुप्रसिद्ध साहित्यिका महाश्वेता देवी यांचं निधन
कोलकाता : प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. कोलकात्याच्या बेलव्यू रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या.
गेल्या काही काळापासून महाश्वेता देवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. महाश्वेता देवी यांना भारतीय साहित्य विश्वात अत्यंत मानाचं स्थान आहे. पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानांबरोबरच साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
‘हजार चौरासी की माँ’ सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांबरोबरच त्यांचं बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या आदिवासी जमातींच्या संघर्षावर केलेलं लिखाण विशेष महत्त्वाचं ठरलं आहे.
त्याचप्रमाणे ‘आरण्येर अधिकार’ ही त्यांची आदिवासींच्या आयुष्यावर आधारित कादंबरीही प्रसिद्ध ठरली होती. आदिवासी जमातींवर त्यांनी केवळ लेखनच केलं नाही तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढाही दिला. रुदाली या महाश्वेता देवींच्या लघुकथेवर चित्रपटही आला होता.
======================================
शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह 11 जण दोषी, मात्र मोक्का हटवला
मुंबई : औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणात 22 पैकी 11 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालचा समावेश आहे. मात्र यासोबतच सर्व दोषींवरील मोक्का हटवण्या आला आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला. उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
काय आहे हे प्रकरण?
महाराष्ट्र एटीएसने 8 मे 2006 रोजी टाटा सुमो आणि इंडिका कारचा पाठलाग करुन औरंगाबादमधील वेरुळ इथे तीन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 30 किलो आरडीएक्स, 10 एके-47 रायफल आणि 3200 गोळ्या जप्त केल्या होत्या. मात्र इंडिका कार चालवत असलेला अबू जुंदाल पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.
राज्यसभेत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : राज्यसभेत कॅम्पा विधेयकावर चर्चा सुरु असताना, काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वनीकरण व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण अर्थात Compensatory Afforestation Management and Planning Authority (CAMPA) कडे असणारा निधी राज्यांकडे वर्ग करण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे.
या विधेयकानुसार जवळपास 40 हजार कोटींचा निधी राज्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातली वन खाती सक्षम होणार आहेत. पण त्याचवेळी या विधेयकात आदिवासींच्या, ग्रामसभेच्या हक्कांचा विचार करण्यात आलेला नाही, असं जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. या विधेयकानं राज्यांकडे पैसा तर येईल, पण तो वनजमिनी, आदिवासींच्या हितार्थ वापरला जाणार नाही, असा आरोप रमेश यांनी केला.
आपल्या उदाहरणाला पुष्टी देताना रमेश यांनी तीन राज्यांची उदाहरणं दिली आहेत, त्यात महाराष्ट्राचंही उदाहरण आहे. 2006 साली वनहक्क कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क सरकारकडून लोकांना देण्यात आले. म्हणजे काय तर त्या वनांची निगराणी लोकांनी करायची त्या बदल्यात, वनांमधून येणारं उत्पन्नही त्यांनीच वापरायचं. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा हे त्याचं उत्तम उदाहरण.
======================================
पैसे आणि मुलाचा हव्यास, पतीकडून पत्नीसह चिमुकलीची हत्या
वर्धा : पैसे आणि मुलाच्या हव्यासापोटी पतीने पत्नीसह आणि दोन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या केली. निखिल सेलोरे असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
अवघ्या वर्षभरापूर्वीच निखिल सेलोरेचा कल्याणीसोबत प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर दोन महिन्यांतच निखिलने कल्याणीकडे माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्यातच कल्याणीने मुलीला जन्म दिल्याने त्याचा संताप वाढला.
मागील अनेक दिवस त्यांच्यात यावरुन भांडणं, वादावादी सुरु होती. अखेर बुधवारी रात्री संतापाच्या भरात निखिलने कल्याणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर शेजारी झोपलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचीही गळा दाबून हत्या केली.
======================================
हरभजन आणि गीताच्या घरी नन्ही परी
मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह बाबा बनला आहे. हरभजन आणि गीताच्या घरात नन्ही परी अवतरली आहे. गीता बसराने 27 जुलै म्हणजेच काल लंडनमध्ये मुलीला जन्म दिला
हरभजन सिंहची आई अवतार कौरने एका वेबसाईटला ही माहिती दिली. मुलगा भज्जी आणि सून गीताला फोनवरुन शुभेच्छा दिल्याचं अवतार कौर यांनी सांगितलं.
क्रिकेटपटून हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते.
======================================
भारतात लवकरच अॅपल स्टोअर, टिम कूक यांची घोषणा
मुंबई : अॅपल या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीची भारतातील बाजारपेठ वाढली आहे. त्यामुळे लवकरच भारतात अॅपल स्टोअर सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
गेल्या काही महिन्यात अॅपलचे जगभरातील ग्राहक कमी झाले झाले असले करी भारतात मात्र अॅपलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.
अॅपल आयफोनच्या विक्रीत 27 टक्के घसरण झाली आहे. ही घसरण तब्बल 7.8 अब्ज डॉलर इतकी होती. 2016 मध्ये 4.04 कोटी आयफोनची विक्री झाली आहे. तर 2015 मध्ये याच काळात 4.75 कोटी आयफोनची विक्री झाली होती.
गेल्या वर्षभरात भारतात अॅपल आयफोनचा खप 51 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीने अॅपल स्टोअर भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी दिली.
======================================
शेतकऱ्याचं कौतुकास्पद पाऊल, गँगरेप पीडितेशी लग्न
चंदीगड : देशभरात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्याचवेळी बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक लोक लढा देत आहेत. मात्र प्रत्यक्ष बलात्कार पीडितांना आपण काहीच मदत करु शकत नाही. हीच भावना मनात ठेवून एका शेतकऱ्याने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. 29 वर्षीय जितेंद्र छत्तरने गँगरेप पीडित तरुणीशी लग्न केलं आहे.
हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जितेंद्र केवळ यावरच थांबलेला नाही. त्याने पत्नीला कायद्याच्या शिक्षणासाठी अडमिशनही घेऊन दिलं आहे. न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या पीडित पत्नीच्या लढ्याला पाठबळ मिळण्यास, कायद्याचं शिक्षण उपयोगी येईल, तसंच बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यास मदत होईल, हा त्यामगचा हेतू आहे. याशिवाय जितेंद्रने ‘यूथ अगेन्स्ट रेप’ ही मोहीम हाती घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तरुणीवर गँगरेप झाला होता. नीरज नावाच्या क्लासचालकाने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार केला होता. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. मात्र याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. त्यामुळे तरुणीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
======================================
महिलेचा खून करुन मृतदेह बाथरुममध्ये लपवला
नाशिक: एकटी राहत असलेल्या महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार नाशिकमधल्या जेलरोड परिसरात उघडकीस आला आहे. मृतदेह कुजल्याने इमारतीत दुर्गंधी सुटल्यानंतर, शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
नंदा अनिल कपलीकर असं या महिलेचं नाव आहे. नंदा या एकट्याच राहात होत्या. अंदाजे 3 दिवसापूर्वीच त्यांचा खून करुन मृतदेह बाथरुममध्ये ठेवल्याचं पोलीस पंचनाम्यात समोर आलं आहे. राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळच्या इमारतीत ही घटना उघडकीस आली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी नंदा यांचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला.
पंचनाम्यानंतर नंदा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. साधारण 3 दिवसापूर्वी नंदा यांचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
======================================
शिक्षकाने आडनावावरुन चिडवलं, विद्यार्थीनीचा गळफास
औरंगाबाद: शिक्षक वर्गात आडनावावरून टिंगल करतात म्हणून अकरावीतील एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशनमध्ये ही घटना घडली.
दीपाली गोटे असं या मुलीचं नाव असून, ती लासूरच्या न्यू हायस्कूल कॉलेजमध्ये शिकत होती. वर्गात शिक्षकांनी टिंगल केल्यामुळे दीपालीने थेट गळफास घेत जीवन संपवलं. राहत्या घरी तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
======================================
टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज लवकरच बोहल्यावर
लेडी लव्ह हेजल आणि युवराज सिंह
मुंबई : टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये युवराज आणि हेझल कीच विवाहबंधनात अडकतील.
युवराज सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा नोव्हेंबर 2015 मध्ये साखरपुडा झाला होता. बालीमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या युवराज आणि हेजलने साखरपुडा उरकला होता.
युवीच्या लग्नाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी लवकरच जाहीर केली जाईल.
हिंदू आणि शिख दोन्ही पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती दोघांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना दिली होती.
हिंदू आणि शिख दोन्ही पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती दोघांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना दिली होती.
हेझल कीच ब्रिटनमध्ये जन्मली असून 2011 साली बॉडीगार्ड’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
======================================
१५ रुपयांच्या उधारीवरुन दलित दांम्पत्याची हत्या
- ऑनलाइन लोकमतमैनपुरी, दि. २८ - पंधरा रुपयांची उधारी चुकवली नाही म्हणून एका व्यक्तीने कुहा-डीचे घाव घालून दलित दांम्पत्याची हत्या केली. उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृत दांम्पत्याने आरोपीच्या दुकानातून पंधरा रुपयांचे सामान उधार घेतले होते. ही उधारी चुकवली नाही म्हणून दलित दांम्पत्याची हत्या केली.लखीमपूर गावात रहाणा-या भारत सिंहने गावातील दुकानदार अशोककडून १५ रुपयाचे सामान उधारीवर घेतले होते. गुरुवारी सकाळी भारत सिंह पत्नी ममता सोबत शेतावर चालला असताना अशोक त्याला भेटला. त्याने भारतचा रस्ता अडवून पंधरा रुपये मागितले. भारतने त्याला संध्याकाळी पैसे देतो असे सांगितले.पण अशोक ऐकायला तयार नव्हता. दोघांमधले भांडण मारामारीपर्यंत पोहोचले. अशोकने हातातल्या कु-हाडीने ममता आणि भरतच्या गळयावर वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळयात खाली कोसळले. काहीवेळातच त्यांचा मृत्यू झाला. हत्या करुन तिथून पळणा-या अशोकला आसपासच्या लोकांनी पकडले. त्यानंतर पोलिस आले व त्यांनी अशोकला अटक केली.
======================================
भिंत पडल्याने शाळा राहिली बंद
- भडगाव : भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली. या घटनेत तीन-चार विद्यार्थी जखमी झाले होते. घटनेमुळे विद्यार्थी वर्ग कमालीचा घाबरला असून २८ रोजी शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. यामुळे आता शाळा कधी सुरु होईल असा प्रश्न उभा राहिला आहे.अनेक जण मदतीस सरसावलेभिंत कोसळताच स्थानिक नागरिकांसह कजगावचेही अनेक जण मदतीसाठी धावून गेले होते. दरम्यान मातीचा ढिगार उपसण्याची काम सुरु झाले आहे. सरपंच तुकाराम जाधव, उपसरपंच राजेंद्र धनगर, सदस्य सुनील महाजन, उमेश देशमुख, मंगा नाईक, गुलाब पाटील, जिभाऊ महाजन, भिकन महाजन, पुंजू महाजन, बाबूलाल कोळी, हनुमान कोळी, शालिक पाटील, भैया पाटील, कौतिक धनगर, अर्जुन धनगर, धुडकू महाजन, संजय धनगर, नामदेव पाटील, गंभीर महाजन, दगडू महाजन, पंडित महाजन, अशोक पाटील, दत्तू धनगर, राजू कोळी आदींनी मदत केली. जेसीबी मशीनही घटनास्थळी आणले. कजगावचे दिनेश पाटील, कमलचंद धाडीवाल, छोटू जैन आदींनीही यासाठी सहकार्य केले.
======================================
वेदांता कंपनीचा 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीचा परवाना रद्द
- ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २८ : खाण खात्याने खनिजाच्या वाहतुकीसाठी परवानगी देताना ज्या अटी लागू केल्या होत्या, त्या अटींचे मुद्दाम वेदांता कंपनीने पालन केले नाही, असा ठपका ठेवून गोवा सरकारच्या खाण खात्याने या कंपनीला 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीसाठी दिलेला आयात व वाहतूक परवाना रद्द केला आहे.खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी गुरुवारी याबाबतचा लेखी आदेश जारी केला. कर्नाटकच्या खाण खात्याने केलेल्या ई-लिलावावेळी वेदांता लिमिटेड कंपनीने 12 हजार मेट्रीक टन खनिज माल (लंप्स) घेतला होता. 16 जुलै 2016 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीने हा खनिज माल गोव्यात आणण्यासाठी आयात व वाहतूक परवाना गोव्याच्या खाण खात्याकडून घेतला.परवाना देताना खाण खात्याने स्पष्ट अशी अट लागू केली होती. गोव्यातील या खनिज मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी मोले येथील तपास नाक्यावर या खनिज मालासाठी खाण खाते प्रवेश तिकीट देईल अशी अट होती. या खनिज मालाचा उपयोग फक्त स्थानिक वापरासाठी व्हावा असाही ही अट लागू करण्यामागिल हेतू होता. त्यासाठी या खनिज मालाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणो गरजेचे होते.
======================================
तीन दिवस मजुरी, तीन दिवस शिक्षण
- इम्रान शेखउस्मानाबाद, दि. २८ : बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले.. वडिलांच्या पश्चात आधार होता तो आईचा.. मात्र, दीड वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने आईही सोडून गेली आणि आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या दोन बहिणीचे छत्र हरवले. मात्र, त्यानंतरही त्यांनी हिम्मत हरली नाही. दहावीतील निकिता शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी तीन दिवस शाळेत तर घरखर्च चालविण्यासाठी तीन दिवस कामाला जाते. तिनेच आता धाकट्या बहिणीच्याही शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तालुक्यातील गोवर्धनवाडी परिसरातील या हिंमतवान बहिणींच्या धैर्याची ही कहाणी आहे.आई-वडिलांच्या मायेला पोरके झाल्यानंतर निकिता अगरचंद मोटे ही ढोकी येथीलच तेरणानगर साखर कारखाना प्रशालेत दहावीच्या वर्गात शिकत आहे. मूळची बीड जिल्ह्यातील माळी चिंचोली येथील रहिवासी असलेल्या निकिताच्या वडिलांचे ती तीन वर्षांची असताना म्हणजेच बारा वर्षांपूर्वी येडशी-येरमाळा मार्गावर अपघाती निधन झाले. त्यामुळे निकिताची आई संगीता या निकिता व तिची लहान बहीण पूजा यांना घेऊन माहेरी गोवर्धनवाडी येथे आली. येथे सरपंच विनोद थोडसरे यांनी त्यांना राहण्यासाठी गावठाणची जागा त्यांच्या नावावर करून दिली.
======================================
महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजकांना राजस्थानचे द्वार खुले
- मुंबई : राजस्थानातील कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून, महाराष्ट्रातील उद्योजक आणि शेतकऱ्यांनी राजस्थानात येऊन व्यवसाय करावा. त्यासाठी आमच्या राज्याचे द्वार खुले आहे, असे आवाहन राजस्थानचे कृषिमंत्री प्रभू लाल सैनी यांनी केले.९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान जयपूर येथे ग्लोबल राजस्थान अॅग्रिटेक परिषद (ग्राम-२०१६) होणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत नुकताच रोड-शो आयोजित झाला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्राम-२०१६ परिषदेचे नेदरलँड, इस्रायल, आॅस्ट्रेलिया आणि कॅनडा असे देश भागीदार आहेत. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की यांच्या सहकार्याने राजस्थान सरकारने ही परिषद आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानजयपूरमध्ये होणाऱ्या ग्राम-२०१६ परिषदेमध्ये सिंचनाशी संबंधीत उपकरणे, सोलार पंप, शेती अवजारे आणि यंत्र, कृषी प्रकिया यंत्र अशाप्रकारचे तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणारआहे. ‘ग्राम’च्या माध्यमातून जगभरातील कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
======================================
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे रक्षण व्हावे
- मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण व्हायला हवे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी दहाव्या सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजन बोलत होते.राजन यांनी टीकाकारांचा जोरदार समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या उच्च व्याजदरांमुळे वृद्धी संपली आहे, अशी टीका होत असतानाच भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी प्राप्त करणारा देश ठरला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.‘ही दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनीनव्हे, तर पेट्रोलियम पदार्थांच्याकिमती घसरल्यामुळे महागाई कमी झाल्याचा दावा केला जात आहे. तथापि, या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. जागतिक बाजारात तेलाच्या किमती घसरल्या तरी सरकारने कर वाढविल्यामुळे स्वस्ताईचा मोठा हिस्सा ग्राहकांपर्यंत पोहोचलेलाच नाही,’ असेही राजन म्हणाले
No comments:
Post a Comment