Sunday, 3 July 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०७-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ढाक्यात ब्लॅक फ्रायडे: दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचाही मृत्यू 
२- वियन्ना; विएन्ना सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा बंदुकधारी ठार 
३- यूजर्ससाठी 'फेसबुक'चे बहुभाषिक पाऊल 
४- फ्रान्सचे माजी पंतप्रधान मिशेल रोकार्ड यांचं निधन 
५- इसीसने ढाका दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संपत्तीत घट 
७- रेल्वेचे तिकीट मिळणार 5 मिनिटांत 
८- पीएमपीच्या ताफ्यात येणार नवीन 1550 बस 
९- झारखंड; पोलीस आणि नक्षलवाद्याची चकमक, एक नक्षलवादी ठार.
१०- पाच मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाकडून अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक 
१२- मुंबईच्या उपनगरात पावसाची बॅटिंग, रस्ते-रेल्वे सुरळीत 
१३- कोकणात मुसळधार, पहा महाराष्ट्रात कुठे किती पाऊस
१४- सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा द्या - औरंगाबाद खंडपीठ 
१५- मुंबई; खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक 
१६- गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेतले 
१७- मुंबई; पावसाळ्यानंतर १४ फुटांहून उंच झोपड्यांवर हातोडा 
१८- मुस्लीम बांधवांनी जागविली ‘बडी रात’! 
१९- ताणमुक्तीसाठी सण,उत्सव साजरे करा:बालाजी तांबे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस 
२१- मुंबईत लेप्टो, कावीळ आणि टायफॉईडचे रुग्ण वाढले 
२२- डोंबिवली; सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी 
२३- करमाळा; पाच महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू 
२४- गाझियाबाद; दोन रुपयांच्या डिस्काऊंटसाठी आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या 
२५- हैदराबाद; पूर्वप्रेयसीचा व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणा-या युवकाला अटक 
२६- पुणे शहरासह उपनगरात पावसाचा जोर 
२७- आंध्रप्रदेश; गुंटुर जिल्हयात अपघाताने डबक्यात पडून चार मुले बुडाली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- इटलीला नमवून जर्मनी युरो कपच्या उपांत्य फेरीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
========================================

कोकणात मुसळधार, महाराष्ट्रात कुठे किती पाऊस

कोकणात मुसळधार, महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं जोर धरला आहे. खेड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. खेडमधल्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय.

यंदा पूर्व महाराष्ट्रातून एन्ट्री घेतलेल्या पावसानं कोकणात पोहोचायला थोडा उशीर केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरल्यानं कोकणवासी सुखावलेत. रत्नागिरीप्रमाणे रायगड आणि सिंधुदुर्गामध्येही पाऊस धो-धो बरसतोय.
========================================

मुंबईच्या उपनगरात पावसाची बॅटिंग, रस्ते-रेल्वे सुरळीत

मुंबईच्या उपनगरात पावसाची बॅटिंग, रस्ते-रेल्वे सुरळीत
मुंबई : मुंबई आणि परिसरातल्या उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर काहीशी उसंत घेतली आहे. मात्र तरीही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

शनिवार संध्याकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. सालाबादप्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल, घाटकोपर आणि अंधेरीच्या काही भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली पाहायाला मिळाली. रात्रभरात काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झालाय.

मुंबईत कुठल्याही स्थितीत पाणी साचू देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांनी दिलं होतं. हिंदमाताजवळ पाणी साचू नये म्हणून 108 कोटी रुपये खर्चून पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं. त्यानंतर 15 मिनिटापेक्षा जास्त काळ पाणी रस्त्यावर राहणार नाही असं पालिका आयुक्तांनी म्हटलं होतं, पण धुवांधार पावसानं सगळे दावे फोल ठरले आहेत.
========================================

इटलीला नमवून जर्मनी युरो कपच्या उपांत्य फेरीत

इटलीला नमवून जर्मनी युरो कपच्या उपांत्य फेरीत
फोटो : एपी
पॅरिस : वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीनं इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 असा सनसनाटी विजय मिळवून युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.

बोर्डोमध्ये झालेल्या या सामन्यात मेसूत ओझिलनं 65व्या मिनिटाला गोल करुन जर्मनीचं खातं उघडलं. पण लिओनार्डो बोनूचीनं 78व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल डागून इटलीला बरोबरी साधून दिली.  आधी निर्धारित वेळत आणि मग अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटनं सामन्याचा निर्णय घेण्यात आला.

पेनल्टी शूटआऊटच्या पहिल्या पाच प्रयत्नात दोन्ही संघांना केवळ दोनच गोल करता आले. मग पुढच्या तीन प्रयत्नात इटलीसाठी गियाचेरीनी, पारोलो आणि डी सिग्लियोनं गोल केले. तर जर्मनीसाठी मॅट हमेल्स, किमिक आणि बोएटेंगनं गोल डागले.

नवव्या प्रयत्नात इटलीच्या मॅटियो डार्मायनची पेनल्टी किकी जर्मनीचा गोलकीपर मॅन्युअल नोयानं थोपवून धरली. आणि जर्मनीला विजयाची संधी उपबल्ध करुन दिली. त्यानंतर जोनास हेक्टरनं गोल झळकावून जर्मनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.
========================================

हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक

हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक
ठाणे : ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांकडे वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिले. ठाणे शहर पोलिसांचं हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी वाचल्यानंतर त्यांनी ठाणे पोलिसांना विनम्रता आणि उत्तर देण्याची पद्धत योग्य शब्दात शिकवली. उत्तर सांगण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे सांगत, उत्तर कसं असायला हवं, हेही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहर पोलिसांना सांगून चांगलीच चपराक दिली आहे.

मुंबईसह ठाण्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. कामावरुन घरी परतण्याच्या वेळेस झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
========================================

ढाक्यात ब्लॅक फ्रायडे: दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचाही मृत्यू

ढाक्यात ब्लॅक फ्रायडे: दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचाही मृत्यू
ढाका बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 वर्षीय भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला आहे. तारूषी जैन असं मृत्यूमुखी पडलेल्या तरूणीचं नाव आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून तारूषीच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

13 तासांच्या कारवाईनंतर 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात बांग्लादेशच्या लष्कराला यश आलं आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास ढाक्यातील होली आर्टीसन रेस्टॉरन्टवर आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.

दहशतवाद्यांनी ओलीस धरून ठेवलेल्या 20 जणांची निर्घृण हत्या केली. ज्यांना कुराणची आयत वाचता आला नाही, त्या सर्वांना दहशतवाद्यांनी ठार केलं. कारवाईदरम्यान बांग्लादेशच्या लष्करानं 13 जणांची सुटका केली आहे.
========================================

येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
मुंबई: येत्या 48 तासात मुंबईसह कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

नैऋत्य मोसमी वारे उत्तरेकडे सरकत असून येत्या 48 तासात देशात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.


सध्या वायव्य बंगालच्या उपसागरातील ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम बंगालच्या उपसागराकडे सरकले आहे. तसेच उत्तरे लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावर कमी दबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी सुरु आहे.


येत्या 48 तासात अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले असले, तरी कोकण आणि गोव्यात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
========================================

मुंबईत लेप्टो, कावीळ आणि टायफॉईडचे रुग्ण वाढले

मुंबईत लेप्टो, कावीळ आणि टायफॉईडचे रुग्ण वाढले
मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने नुकताच संसर्गजन्य रोगाच्या प्रसारासंबंधिची आकडेवीरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केली. यात लेप्टो, कावीळ आणि टायफाईडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर मलेरीया आणि डेंग्यूची भीती कमी झाल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या वर्षी जानेवारी ते जून – २०१५ या दरम्यान महापालिका क्षेत्रातील लेप्टो रुग्णांची संख्या ५ इतकी होती. तर जानेवारी ते जून – २०१६ या कालावधीत ही संख्या ३० इतकी झाली आहे.

तर कवीळीच्या रुग्णांच्या संख्येतही यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कावीळच्या रुग्णांच्या संख्येत २१५ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान ५८२ रुग्णांची होती. या वर्षी ती संख्या वाढून ७९७ झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टायफाईडच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या कालावधी दरम्यान ५३१ रुग्णांची होती. तर या वर्षी ही संख्या ७१२ नोंद करण्यात आली आहे.
========================================

रेल्वेचे तिकीट मिळणार 5 मिनिटांत

आता रेल्वेचे तिकीट मिळणार 5 मिनिटांत
नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालय रेल्वे स्टेशनच्या आधारभूत संरचनेत बदल करण्याच्या येत असून, सुविधांमध्येही वाढ करणार आहे. यातीलच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे तिकीट 5 मिनिटांत मिळण्याची यंत्रणा कार्यन्वित करण्यात येत आहे. यासाठी देशातील सर्व रेल्वे स्टेशनसाठी सिटिझन चार्टर बनवण्यात आला आहे. यावर सर्व रेल्वे स्टेशनना हा सिटिझन चार्ट रेल्वेच्या वेबसाइटवर 15 ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

रेल्वे आरक्षणासाठी एक निश्चित कालावधी ठरवण्यात येत आहे. यासाठी रेल्वेच्या आधारभूत संरचनेमध्ये काही मुलभूत बदल करण्यात येत आहेत. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तिकीट पाच मिनीटांत उपलब्ध होऊ शकणार आहे.

रेल्वे मंत्रालायाच्या वतीने बनवण्यात आलेल्या सुचनात्मक चार्टरनुसार, ए1 आणि ए श्रेणी रेल्वे स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे पाच मिनिटांच्या आत निवारण करण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑन बोर्ड हाउसकीपिंग सर्व्हिसेस (ओबीएचएस) ला 20 मिनिटांच्या आत समस्यांचे निवारण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या सर्व सेवांसाठीही कालावधी निश्चित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
========================================

सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी

सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी हद्दीत फेज २ मध्ये असलेल्या प्रोबेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या रिऍक्टरच्या शक्तिशाली स्फोटात ही कंपनी नेस्तनाबूत झाली. या घटनेनंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एमआयडीसी प्रशासनाने सरकारी मालकी असलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अवैध इमारतींतील घरे खरेदी करण्यास मज्जाव केला असून तसे जाहीर फलक संबंधित इमारतीजवळ लावण्यात आले. मात्र, मुजोर बिल्डरांनी इमारतीजवळ लावलेले  जाहीर फलक 24 तासाच्या आत काढून फेकून दिले आहेत.

प्रोबेस कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात या कंपनीच्या परिघातील पाच कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तर आसपासच्या ६५ वाणिज्य (दुकानी गाळे) आणि २ हजार ७६३ निवासी घरांचे लहान-मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील काही इमारती एमआयडीसी आणि निवासी विभागाला लागून आहेत, शिवाय एमआयडीसीची मालकी असलेल्या भूखंडावर देखील सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिक भूमाफियांनी बहुमजली इमारती उभारल्या आहेत.
स्फोटामुळे झालेल्या वैध-अवैध इमारतींतील रहिवाश्यांचे नुकसान पाहता याच पट्टयात उभारण्यात आलेल्या अवैध इमारतीत राहणारे किंवा राहण्यास येणाऱ्या नागरिकांना एमआयडीसीने खबरदार केले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच ठिकाणी अनधिकृत इमारतीचे फलक लावले आहेत.
========================================

पाच महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू


  • करमाळा (जि. सोलापूर) : वारकऱ्यांच्या टेम्पोला मालट्रकने टक्कर दिल्याने पाच महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर १२ वारकरी जखमी झाले. ते सर्व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरातून पांडुरंगाचे दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ््यात परतताना शनिवारी शेलगाव गावाजवळ अपघात झाला. यामुळे वारीवर शोककळा पसरली.
    त्र्यंबकेश्वरहून पालखी पंढरपुरला निघाली आहे. वीस हजार वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या हा पालखीचा शुक्रवारी अहमदनगरला मुक्काम होता. दिंडीतील १६ भाविक टेम्पोतून पंढरीस गेले होते़ विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण परतत होते. टेम्पोतील अंजनाबाई भगत, तुळसाबाई शेळके, हिराबाई गुळवे, लक्ष्मीबाई चव्हाण, जिजाबाई बिन्नर या जागीच मरण पावल्या़ तर चांगुणाबाई दुबासे, हौसाबाई सदरक, शोभा चव्हाण, मीनाबाई सदगिरे या जखमी आहेत. 
========================================

विएन्ना सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा बंदुकधारी ठार


  • ऑनलाइन लोकमत 
    विएन्ना, दि. ३ - टर्की, बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी ऑस्ट्रियाच्या विएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये घुसून एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला. स्थानिक पोलिसांच्या कमांडो पथकाने तात्काळ केलेल्या कारवाईत हा बंदुकधारी ठार झाला. 
    या कारवाईत दोन पोलिस जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता का ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. विएन्नामधील काही भागात शोधमोहिम सुरु आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास बिला सुपरमार्केटमध्ये हा हल्ला झाला. 
    या संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला असून, सुरक्षेसाठी हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पोलिसांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. 
========================================

फक्त दोन रुपयांच्या डिस्काऊंटसाठी आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या


  • ऑनलाइन लोकमत 
    गाझियाबाद दि. ३ - सध्याच्या जमान्यात माणसांचा स्वत:वरील आत्मसंयम मोठया प्रमाणात कमी झाला आहे. छोटया छोटया वादांचे हाणामारीत होणारे पर्यावसन आपण ट्रेन, बस प्रवासात नेहमीच पाहतो. उत्तरप्रदेश गाझियाबादमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 
    आईस्क्रीम विक्रेत्याने फक्त दोन रुपयांचा डिस्काऊंट दिला नाही म्हणून युवकांनी आईस्क्रीम विक्रेत्याला मेरपर्यंत मारले. गाझियाबादच्या महाराजपूर गावात ही घटना घडली. या मारहाणीत आईस्क्रीम विक्रेता इस्लामचा मृत्यू झाला. राशिद त्याच्या मित्रांसह आईस्क्रीम खाण्यासाठी इस्लामच्या दुकानावर गेला. 
    त्याने इस्लामला प्रत्येक आईस्क्रीमवर दोन रुपयांचा डिस्काऊंट देण्यास सांगितले. पण इस्लामने नकार दिला. राशिदला त्याच्या नकाराचा राग आला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. राशिद आणि त्याच्या मित्रांनी इस्लामला जबर मारहाण केली. 
========================================

पूर्वप्रेयसीचा व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणा-या युवकाला अटक


  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. ३ - पूर्वप्रेयसी सोबतचे शारीरीक संबंधांचे व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करणा-या युवकाला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. बी.रुपेश (२७) असे या युवकाचे नाव असून तो इंजिनीयरींग शाखेचा पदवीधर आहे. पूर्वप्रेयसीवरच्या रागातून त्याने दोघांचे अंतरंग क्षणांचे शूट केलेले व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केले. 
    शनिवारी त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. रुपेशच्या पूर्वप्रेयसीने त्याला सोडून दुस-याबरोबर लग्न केले म्हणून रुपेश तिला त्रास देत होता. पिडित तरुणीची प्रतिमा मलिन करण्यासाठी म्हणून त्याने या व्हिडीओची सीडीही पोस्टाने तिच्या सासरी पाठवून दिली. 
    रुपेश आणि पिडित तरुणी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपालीचे निवासी असून, ते इंजिनियरींगच्या शाखेमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांची ओळख आणि पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघे लग्नही करणार होते. पण पिडित तरुणीला रुपेशच्या स्वभावातील काही गोष्टी खटकल्या व तिने रुपेशची साथ सोडून दुस-याबरोबर लग्न केले. याच राग रुपेशच्या मनात होता. 
========================================

सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा द्या


  • मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची विपन्नावस्था व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन चालू खरीप हंगामात राज्यातील सर्व लहान, सीमान्त व मध्यम शेतकऱ्यांना पीककर्ज आणि त्यासोबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळेल याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बचोटी, कंधार (जि. नांदेड) येथील शेतकरी शंकर गणेशराव धोंडगे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. आर. एम. बोर्डे आणि के. एल. वडाणे यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शुक्रवारी हा आदेश दिला.
    न्यायालयाने ५० पानी अंतरिम आदेशात राज्यातील आणि खासकरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दैन्यावस्था व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. धोरणात्मक बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मर्यादा असल्या तरी सरकारने आखलेल्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळेल याकडे कसोशीने पाहावे, असे खंडपीठाने नमूद केले.
========================================

खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक


  • मुंबई : मुसळधार पावसाने दररोज मुंबई आणखीनच खड्डयात जात आहे़ मुख्य रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहतूक मंदावली आहे़ त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी घेतला़
    गेले काही दिवस मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे़ यामुळे छोटे व मुख्य रस्तेही खड्डयात गेले आहेत़ दोनच दिवसांत दीडशे खड्डे मुंबईतील रस्त्यांवर पडले आहेत़ १ जुलैपर्यंत २४४ खड्डयांची नोंद झाली आहे़ यापैकी केवळ दोनच खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत़
    प्रत्यक्षात अनेक मुख्य रस्ते आजही खड्डयांत आहेत़ मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने खड्डे भरणे शक्य होत नाही़ 
========================================

गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेतले


  • मुंबई : गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने अखेर गुन्हे शाखेने घेतले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी २००९ मध्ये गुन्हे शाखेने त्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. दोन्ही आवाजांच्या नमुन्यांमध्ये साम्य आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे.
    कुमार पिल्लेकडे सध्या तीन गुन्ह्यांची कसून चौकशी गुन्हे शाखा करत आहे. २००९ साली विक्रोळी येथील शहा विकासकाला फोन करून ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते. गुन्हे शाखेने कुमार पिल्लेचा आवाज रेकॉर्ड केला होता. पिल्लेचे दोन्ही आवाज जुळले तर याच गुन्ह्यांत कोठडी वाढवून या पसार आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. 
========================================

पावसाळ्यानंतर १४ फुटांहून उंच झोपड्यांवर हातोडा


  • मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा दुमजली झोपड्या उभ्या राहिल्या आहेत़ अशा बांधकामांमुळे एखाद्या दुर्घटनेत निष्पाप जिवांचा बळी जाऊ शकतो़ जुहू गल्लीतील आगीच्या दुर्घटनेतून ही बाब उजेडात आल्यानंतर मुंबईत सर्व १४ फुटांहून उंच झोपड्यांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे़ निवडणुकीचा काळ असल्याने या कारवाईत राजकीय पक्षांकडून अडथळा आल्यास त्यांच्यावरही उचित कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत़
    झोपड्यांना १४ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची परवानगी आहे़ मात्र अनेक ठिकाणी उंचीची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचे समोर आले आहे़ आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जुहू गल्लीतील मेडिकल स्टोअरवरील गच्चीही बेकायदा होती़ या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाला़ याची गंभीर दखल पालिकेच्या मासिक बैठकीत शनिवारी घेण्यात आली़ १४ फुटांहून उंच झोपड्यांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना या वेळी दिले़
    पावसाळ्यातील चार महिने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत नाही़ त्यामुळे ही सर्व यादी या काळात तयार ठेवावी़ या झोपड्यांवर आॅक्टोबरमध्ये कारवाई करण्यात येणार आहे़ ही कारवाईत अडथळा आणणाऱ्यांच्या नावांची नोंद घेऊन त्याचा अहवाल तयार करण्याची सूचनाही आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांच्या साहाय्यक आयुक्तांना केली़
========================================

मुस्लीम बांधवांनी जागविली ‘बडी रात’!


  • मुंबई : इस्लाम धर्मातील रमजान महिन्यातील शब-ऐ-कद्र (बडी रात) शनिवारी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. पावसाची रिपरिप सुरु असतानाही शहर व उपनगरातील मशीद, दर्गाह व स्मशानभूमीच्या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमलेले होते. नमाज व कुराण पठण करीत पूर्ण रात्र जागून काढली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
    दरम्यान, रविवारी २७ वा रोजा (उपवास) असून अनेक हिंदू बांधव यादिवशी उपवास करणार आहेत. रमजान ईद अवघ्या तीन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी खरेदी वाढली आहे.
    रमजान महिन्यात २१,२३,२५ व २७ व्या रात्रीला ‘ताक रात’ म्हणजे रात्रभर जागून ईश्वर भक्ती करावयाची असते. शनिवारी २७ वी रात्र असल्याने शहर व उपनगरातील मशीदी गर्दीने गजबजलेल्या होत्या. गेल्या २६ दिवसापासून रोज रात्री पठण केल्या जाणाऱ्या ‘तरावीह’च्या नमाजमध्ये आज कुराणाचे पूर्ण वाचन करण्यात आले. त्यानंतर मौलवी व पेशईमामांकडून प्रेषित मंहमद पैंगबर यांची शिकवण, जीवनपद्धती,धार्मिक आचरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनेक बांधव मशीदीमध्ये पहाटेपर्यत नमाज व कुराण पठण करीत होते. दरम्यान, रविवारी २७ वा रोजा असून ईद तीन दिवसावर आल्याने त्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मसाल्याचे पदार्थ, कपडे खरेदी करण्यासाठी अबालवृद्धाच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार, महंमद अली रोड गजबजून गेला आहे. 
========================================
पुणे शहरासह उपनगरात पावसाचा जोर

पुणे - पुणे शहर व उपनगरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, आज (रविवार) सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा संततधार सुरुच आहे.

पुण्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस जूनच्या मध्यावर दाखल झाला; पण जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरीही पुणेकरांनी बऱ्याच महिन्यांनंतर शनिवारी दिवसभर पावसाचा अनुभव घेता आला. मात्र, शनिवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. शनिवारी बच्चे कंपनी, तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांनीही पावसात भिजण्याचा आनंद घेतला. शनिवारी दिवसभरात 1.3 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. 


========================================
पीएमपीच्या ताफ्यात येणार नवीन 1550 बस

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतुकीची गंभीर समस्या सोडविण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 जादा बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी झाला. त्यासाठीची निविदा प्रक्रिया 15 दिवसांत करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील बसगाड्या पाच सप्टेंबरपासून पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी वाहक, चालक, बस देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी आदी साडेपाच हजार पदांची भरतीही एक महिन्यांत सुरू होणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

पुण्याचे महापौर जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि डब्बू आसवानी, महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार, संचालक आनंद अलकुंटे, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा आदी या बैठकीला उपस्थित होते.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 2100 बस असून, त्यातील सरासरी 1550 बस दररोज मार्गावर असतात. सुमारे 550 बस येत्या तीन वर्षांत आयुर्मान संपल्यामुळे प्रशासनाला बाद कराव्या लागणार आहेत. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टच्या (सीआयआरटी) निकषांनुसार सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला 3100 बसगाड्या लागतील. म्हणजेच आणखी किमान 1550 बसची आवश्‍यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने 1550 बस ताफ्यात घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी तीन प्रकारच्या निविदा तयार करून त्या पंधरा दिवसांत जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्यासाठी 21 दिवसांची मुदत असेल, अशी माहिती जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही शहरांतील प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी पीएमपी कार्यक्षम झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका "सकाळ‘ने सातत्याने घेतली आहे. 
========================================
यूजर्ससाठी 'फेसबुक'चे बहुभाषिक पाऊल

नेटिझन्सच्या पोस्ट 44 भाषांत झळकणार 
नवी दिल्ली - जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने अधिकाधिक यूजर जोडण्यासाठी आता बहुभाषिक होण्याचा निर्धार केला आहे. यासाठी यूजर्सना बहुभाषिक कंपोझर उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे फेसबुकवर टाकलेली पोस्ट काही क्षणांमध्ये 44 भाषांत भाषांतरित होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फेसबुकचा मूळ साचा जरी इंग्रजी असला, तरीसुद्धा अन्य भाषांमधून संवाद साधणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. फेसबुकवरील पन्नास टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक यूजर हे इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. यूजर्सना संवादादरम्यान अडचण ठरणारी भाषिक मर्यादा कशी ओलांडता येईल याबाबत फेसबुकची थिकटॅंक मागील काही दिवसांपासून विचार करत होती. फेसबुक पेजवर सक्रिय असलेल्या बऱ्याचशा यूजर्सची पार्श्‍वभूमी ही भिन्न असते. अनेकांना आपण टाकलेली पोस्ट अन्य भाषांमध्येही भाषांतरित व्हावी असे वाटते, अशांसाठी हे नवे कंपोझर गिफ्ट ठरणार आहे.

असे असेल कंपोझर 
या बहुभाषिक कंपोझरच्या माध्यमातून यूजर्सना आपली पोस्ट एकाच वेळी अनेक भाषांत लिहिणे शक्‍य होईल. यामुळे त्या त्या भाषेतील वाचक ते वाचू शकतील आणि त्यांना त्याचा योग्य अर्थबोधही होईल. या नव्या फीचरमुळे यूजर्सना एखादा मजकूर समजून घेताना फारशा भाषिक अडचणीही येणार नाहीत. 
========================================
ताणमुक्तीसाठी सण,उत्सव साजरे करा:बालाजी तांबे



‘फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र‘ पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे - ‘समूहाला एकत्र आणण्यासाठी भारतीय संस्कृतीत सणांची योजना केलेली आहे; परंतु हल्ली सण, उत्सव साजरे करण्याची पद्धती बंद होत असल्याने सामुदायिक जीवन संपले आहे. परिणामी, माणसाच्या मनावरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करणे, हा सणांचा आणि उत्सवांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ताणमुक्तीसाठी सण, उत्सव समूहाने साजरे करायलाच हवेत,‘‘ असा कानमंत्र श्रीगुरू बालाजी तांबे यांनी शनिवारी दिला. 
========================================
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संपत्तीत घट

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 2.73 कोटी रुपयांची घसरण 
नवी दिल्ली - मंत्री आणि राजकारणी यांची संपत्ती वाढत असल्याची उदाहरणे समोर येत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मात्र, संपत्ती कमी झाली आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात जेटली यांची संपत्ती 2.83 कोटी रुपयांनी कमी होऊन 68.41 कोटी रुपयांवर आली.

जेटली यांनी संपत्ती आणि उत्तरदायित्व पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. जेटली यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत तेवढीच आहे. यात निवासी इमारत व जमिनीची समावेश असून तो 34.49 कोटी रुपये एवढा कायम राहिला आहे. त्यांचा चार बॅंक खात्यातील शिल्लक मार्चअखेर एक कोटी रुपयांनी कमी होऊन 3.52 कोटी रुपयांवर आली. एनप्रो ऑइल्स लिमिटेड आणि डीसीएम श्रीराम कन्सॉलिडेटेड लिमिटेडसह अन्य कंपन्यांमधील ठेवी मागील वर्षी एवढ्या 17 कोटी रुपयांच्याच आहेत. त्यांच्याकडील रोख रक्कम मार्च 2015 मध्ये 93.35 लाख रुपये होती. ती यावर्षी मार्चअखेर 65.29 लाखांवर आली. पीपीएफ आणि अन्य गुंतवणूक 11.24 कोटींवरून 11 कोटींवर आली. 
========================================

No comments: