[अंतरराष्ट्रीय]
१- दक्षिण सुदानमध्ये भीषण रक्तपात, 150 अधिक जणांचा मृत्यू
२- ब्रिटनला मिळणार महिला पंतप्रधान!
३- अमेरिकेत पोलिसांवर गोळीबार; पाच ठार
४- सौदी अरेबियातल्या हल्ल्यांप्रकरणी 12 पाकिस्तानींना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- बुरहान वानी क्रांतिकारक, उमर खलिदने पुन्हा गरळ ओकली
६- झाकीर नाईक विरोधातील फतव्याचा सोशल मीडियात वापराने दार-उल-उलूम देवबंद नाराज
७- बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू
८- मोदी सरकारमधील 78पैकी 72 मंत्री कोट्यधीश
९- काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या
१०- अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल
११- झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी
१२- 'पायाभूत' गुंतवणुकीसाठी गडकरींचा अमेरिका दौरा
१३- बँकांचा 12-13 जुलैला देशव्यापी संप!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का
१५- खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
१६- अहमदनगर; पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
१७- राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस
१८- भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री होणार - केजरीवाल
१९- जलसंधारण खातं काढल्यानं पंकजांची ट्विटरवरुन नाराजी, मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय...
२०- राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती
२१- चोविस तास करता येणार दागिन्यांची खरेदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधूनच, आजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
२३- पंढरपूर; सुभाष देशमुखांनी मागितली भाविकांची माफी
२४- वसई; बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा
२५- केरळमध्ये 'जंक फूड'वर लागू होणार तब्बल 14.5 टक्के 'फॅट टॅक्स'!
२६- नाशिकमध्ये भीषण अपघातात राष्ट्रीय जलतरणपटूचा दुर्दैवी मृत्यू
२७- औरंगाबाद; शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली
२८- मांढवी ओढ्यावरून माऊलींची पालखी मार्गस्थ
२९- मध्य प्रदेशातील पुरात 15 जण मृत्युमुखी
३०- हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
३१- बल्लारपूरजवळ कार नाल्यात कोसळली;चौघे बेपत्ता
३२- कोल्हापूर; पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर
३३- खडकवासलांत मागील वर्षी पेक्षा जास्त साठा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- आज युरोकपच्या मेगा फायनलचा थरार, रोनाल्डोच्या पोर्तुगालची टक्कर फ्रान्सशी
३५- विम्बल्डनमध्ये सेरेनाचंच राज्य, जर्मनीच्या अँजेलिकवर मात
३६- चार दिवसांत 'सुलतान'ची कमाई 142.62 कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================




















१- दक्षिण सुदानमध्ये भीषण रक्तपात, 150 अधिक जणांचा मृत्यू
२- ब्रिटनला मिळणार महिला पंतप्रधान!
३- अमेरिकेत पोलिसांवर गोळीबार; पाच ठार
४- सौदी अरेबियातल्या हल्ल्यांप्रकरणी 12 पाकिस्तानींना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- बुरहान वानी क्रांतिकारक, उमर खलिदने पुन्हा गरळ ओकली
६- झाकीर नाईक विरोधातील फतव्याचा सोशल मीडियात वापराने दार-उल-उलूम देवबंद नाराज
७- बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू
८- मोदी सरकारमधील 78पैकी 72 मंत्री कोट्यधीश
९- काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या
१०- अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल
११- झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी
१२- 'पायाभूत' गुंतवणुकीसाठी गडकरींचा अमेरिका दौरा
१३- बँकांचा 12-13 जुलैला देशव्यापी संप!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का
१५- खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
१६- अहमदनगर; पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
१७- राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस
१८- भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री होणार - केजरीवाल
१९- जलसंधारण खातं काढल्यानं पंकजांची ट्विटरवरुन नाराजी, मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय...
२०- राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती
२१- चोविस तास करता येणार दागिन्यांची खरेदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधूनच, आजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
२३- पंढरपूर; सुभाष देशमुखांनी मागितली भाविकांची माफी
२४- वसई; बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा
२५- केरळमध्ये 'जंक फूड'वर लागू होणार तब्बल 14.5 टक्के 'फॅट टॅक्स'!
२६- नाशिकमध्ये भीषण अपघातात राष्ट्रीय जलतरणपटूचा दुर्दैवी मृत्यू
२७- औरंगाबाद; शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली
२८- मांढवी ओढ्यावरून माऊलींची पालखी मार्गस्थ
२९- मध्य प्रदेशातील पुरात 15 जण मृत्युमुखी
३०- हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
३१- बल्लारपूरजवळ कार नाल्यात कोसळली;चौघे बेपत्ता
३२- कोल्हापूर; पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर
३३- खडकवासलांत मागील वर्षी पेक्षा जास्त साठा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- आज युरोकपच्या मेगा फायनलचा थरार, रोनाल्डोच्या पोर्तुगालची टक्कर फ्रान्सशी
३५- विम्बल्डनमध्ये सेरेनाचंच राज्य, जर्मनीच्या अँजेलिकवर मात
३६- चार दिवसांत 'सुलतान'ची कमाई 142.62 कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================
बुरहान वानी क्रांतिकारक, उमर खलिदने पुन्हा गरळ ओकली
मुंबई: बुरहान वानीवरून देशद्रोहातील आरोपी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खलिदने पुन्हा गरळ ओकली आहे. उमरने बुरहानच्या कृत्याचे समर्थन करून त्याच्या कृत्याची तुलना कम्यूनिस्ट क्रांतिकारक चे गव्हेराशी केली आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता अध्यक्ष कन्हैया कुमारचा साथिदार उमर खलिद देशद्रोहाच्या आरोपांमध्ये जामीनावर बाहेर आहे. दरम्यान, त्याच्याशी एबीपीच्या टीमने संपर्क केला, तर त्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
फेसबुकच्या मध्यमातून खलिदने ओकली गरळ, बुरहानची तुलना चे गव्हेराशी
उमर खलिदने आपल्या फेसबुक पेजवर बुरहान वानीला शहिद ठरवले आहे. तो म्हणतो की, ”चे गव्हेराने म्हणले होते की, जर मी मेलो, तरी मला फरक पडणार नाही, कारण त्यावेळी माझी बंदूक उचलून कोणीतरी लढत असेल. हे शब्द बुरहान वानीलाही लागू होतात. बुरहान मृत्यूला घाबरत नव्हता. त्याला सर्वसामान्यांसारखे जगणे पसंत नव्हते. त्याने याचा विरोध केला. तो स्वच्छंदीपणे जगला आणि मृत्यूलाही हसत हसत कवटाळले. काश्मीरवरील वर्चस्व संपू दे. हे भारता, तू अशा कोणत्या लोकांना हरवशील ज्यांनी भीतीलाच मागे टाकले आहे. असेच शक्तिशाली रहा बुरहान. काश्मीरच्या लोकांसाठी सहानुभूती.#FreeKashmir”
=======================================
झाकीर नाईक विरोधातील फतव्याचा सोशल मीडियात वापराने दार-उल-उलूम देवबंद नाराज
लखनऊ: देशातील इस्लामचे शिक्षण देणारी प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या दार-उल उलूम देवबंदने नुकताच ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात चर्चेत आलेला धर्म प्रसारक डॉ. झाकीर नाईकच्या विरोधात फतवा काढला. पण याला सोशल मीडियावरून प्रसारीत करण्यात आल्याने देवबंदने नाराजी व्यक्त केली आहे.
दार-उल-उलूम देवबंदचे प्रवक्ता अशरफ उस्मानी यांनी देलेल्या प्रतिक्रीयेत, काही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेलमधून देवबंदने झाकीर नाईक विरोध काढलेल्या फतव्याचा उल्लेख करत आहेत. नाईकच्या दहशतवादी संघटनांशी संबंध खरे ठरवण्यासाठी दार-उल-उलूम देवबंदने काढलेल्या फतव्याचा वापर केला जात आहे. वास्तविक हे एखाद्या घटने संदर्भात दिलेल्या प्रतिक्रीयेला वेगळ्याच घटनेतील प्रतिक्रीयेशी जोडण्यासारखे आहे.
उस्मानी यांनी सांगितले की, ”नाईक विरोधात काढलेला फतवा हा, मसलक(मुस्लीम समाजातील काही वर्ग)शी संदर्भात आहे. अशावेळी नाईकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधासाठी या फतव्याचा वापर करणे चुकीचे आहे.”
उस्मानी म्हणाले की, ”रमजान महिन्यातील रोजे आणि ईदच्या व्यस्ततेमुळे दार-उल-उलूमला नाईक प्रकरणावर भूमिका घेण्यास उशीर झाला. संस्था या विषयावर येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.”
=======================================
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस
मुंबईः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांतील जलसाठा देखील वाढण्यास मदत झाली आहे.
मुंबई आणि कोकणसह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाने उघडीप घेताच बळीराजाची शेती कामाची लगबग पाहायला मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुण्यात पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. सातारा, महाबळेश्वर या परिसरातही चांगला पाऊस पडला आहे. कोयना धरणातील पाणी पातळी गेल्या 24 तासांत 2 टीएमसीने वाढली असून 29 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मुळा नदिला पूर आल्यामुळे पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. नदीवरील मांडवे पूल पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोले तालुक्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
=======================================
पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
अहमदनगरः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं जलसंधारण खातं काढल्यानं अहमदनगरला मुंडे समर्थकांनी रोष व्यक्त केला आहे. पाथर्डीत मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.
पाथर्डीच्या मुख्य चौकात पुतळा जाळून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश होता. जलयुक्त शिवार योजनेचं श्रेय मिळू न देण्यासाठी पद काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
=======================================
बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू
श्रीनगर : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरात घडलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या श्रीनगरची परिस्थिती नियंत्रणात असली तरी संचारबंदी कायम आहे.
यामुळे अमरनाथ यात्रा आजही सुरु होऊ शकलेली नाही. दहशतवादी बुरहानच्या खात्म्यानंतर फुटिरतावादी नेत्यांनी कालपासून काश्मीरात धुडगूस घातला आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारुन दंगलखोरांनी वाहनांवर दगडफेक केली.
सध्या प्रशासनानं श्रीनगरमध्ये जवानांची अधिकची कुमक उतरवली असून, शहरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
=======================================
आज युरोकपच्या मेगा फायनलचा थरार, रोनाल्डोच्या पोर्तुगालची टक्कर फ्रान्सशी
पॅरिस(फ्रान्स): ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ आणि आणि ह्युगो लॉरिसची फ्रेन्च टीम या युरोपातल्या दोन बलाढ्य संघांमध्ये युरो कपसाठी अंतिम लढाई रंगणार आहे. पॅरिसच्या स्टेड दी फ्रान्समध्ये आज हा सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय वेळेनुसार 11 जुलैला रात्री साडेबारा वाजता या लढतीचा किकऑफ होईल. पोर्तुगालने वेल्सला, तर फ्रान्सने वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला धूळ चारुन युरो कपची फायनल गाठली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अॅन्टॉइन ग्रिझमन या दोघांमधलं द्वंद्व या सामन्याचं खास आकर्षण असणार आहे.
फ्रान्ससाठी ग्रिझमननं सहा सामन्यांत सहा गोल झळकावले आहेत. तर रोनाल्डोच्या नावावर तीन गोल जमा आहेत. फ्रान्सने घरच्या मैदानात खेळताना 1984 साली युरो कप आणि 1998 साली विश्वचषक जिंकला होता. साहजिकच या फायनलमध्ये फ्रान्सचं पारडं जड मानलं जातं आहे.
=======================================
''भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री होणार''
नवी दिल्लीः भाजपा अध्यक्ष अमित शहा आता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जागेवर मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला आहे. सोमनाथ मंदीर दर्शनासाठी केजरिवाल गुजरातमध्ये गेले असता त्यांनी हा दावा केला आहे.
गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ केजरिवाल यांनी फोडला आहे. शेतकऱ्यांच्या एका संभेला संबोधित करताना केजरिवाल यांनी भाजपा सरकारवर यावेळी जोरदार टिका केली.
=======================================
जलसंधारण खातं काढल्यानं पंकजांची ट्विटरवरुन नाराजी, मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय...
मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात पंकजा मुंडे यांना मोठा झटका मिळालाय. त्यांचं जलसंधारण खातं काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडेंची नाराजी ट्विटरवर पहायला मिळाली.
सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजांनी आता मी जलसंधारण खात्याची मंत्री नसल्याने या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्वीट केलं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नव्हे तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहा, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या आदेशाची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात रिप्लाय येताना दिसत आहेत.
=======================================
अखेर सुभाष देशमुखांनी मागितली भाविकांची माफी
पंढरपूरः रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना डावलून विठ्ठलाचं दर्शन घेणाऱ्या सुभाष देशमुखांना अखेर माफी मागावी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. मात्र भाविकांची भलीमोठी रांग असताना देशमुखांनी रांग डावलून दर्शन घेतलं होतं.
राज्यातील मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर सुभाष देशमुखांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आलं आहे. देशमुख मंदिरात दर्शनासाठी गेले असता भाविकांची भलीमोठी रांग होती. मात्र भक्तांना ताटकळत ठेवून सुभाष देशमुखांना दर्शनाची संधी देण्यात आली. त्यामुळं भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर भाविकांचा पवित्रा पाहून सुभाष देशमुखांनी प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर माफी मागितली आहे.
=======================================
मुंबईतील तिनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई : वेगवेगळ्या तांत्रिक कामांमुळे मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान तिनही मार्गांवरील काही सेवा रद्द होणार आहेत. तर काही लोक 15 ते 20 मिनिटं उशिरानं असणार आहेत.
पश्चिम रेल्वे – सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे स्लो लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान फास्ट ट्रॅकवर चालवल्या जामार आहेत.
मध्य रेल्वे – सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 दरम्यान ठाणे ते कल्याण डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे ठाणे स्थानकापुढे जामाऱ्या सर्व स्लो लोकल फास्ट ट्रॅकवरुन चालवल्या जातील. या लोकल ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानच्या स्थानकांवरच थांबवल्या जातील.
हार्बर रेल्वे – सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे – सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉरकमुळे सीएसटी-अंधेरी आणि सीएसटी-पनवेल यादरम्यानच्या लोकल पूर्णपणे रद्द असतील. पनवेल-कुर्ला दरम्यान काही विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
=======================================
दक्षिण सुदानमध्ये भीषण रक्तपात, 150 अधिक जणांचा मृत्यू
जुबा (दक्षिण सुदान) : दक्षिण सुदानमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्यांची सुदानमधील स्थानिक माध्यमांच्या मार्फत मिळते आहे. राष्ट्रपती सलवा कीर आणि त्यांचे विरोधक असलेले उपराष्ट्रपती रीक मखार यांच्यातील मुलाखतीदरम्यान राष्ट्रपती भवनाजवळ गोळीबार झाला.
गोळीबारात एकूण किती जणांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार, 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
गेल्या 20 महिन्यांपासून सुरु असलेलं गृहयुद्ध रोखण्यासाठी 2015 मध्ये शांती करार झाला होता. मात्र, हा करारही हिंसाचार रोखण्यास अपयशी ठरला आहे. हिंसाचारानंतर राजधानी जुबामध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दक्षिण सुदान जगातील सर्वात तरुण देश असून, यंदा सुदान पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे.
सलवा कीर आणि रीक मखार यांच्यामध्ये मुलाखत सुरु असताना, दोघांच्याही सुरक्षारक्षकांमध्ये गोळीबार सुरु झाला. जवळपास अर्धा तास गोळीबार सुरु होता, त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्येही हिंसाचार सुरु झाला.
=======================================
मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात जाण्यापूर्वी खाते वाटप जाहीर केलं. खाते वाटपाची यादी राज्यपालांकडून सुपूर्द करुन मुख्यमंत्री परदेशात रवाना झाले. दरम्यान या खाते वाटपात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना जोरदार धक्का दिला आहे. या दोघांकडील महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतले आहेत.
पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे. कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंसोबतच मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनाही धक्का दिला आहे. विनोद तावडेंकडे असणारं वैद्यकीय शिक्षण खातं काढून ते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे.
दरम्यान, पंकजा मुडें यांचं जलसंधारण खातं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त माझानं दिलं होतं. त्यावर अखेर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
=======================================
खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
मुंबई: मुख्यमंत्र्यांनी आज खाते वाटप जाहीर केले असून या खाते वाटपात पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्याकडील काही महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. तर दुसरीकडे काही मंत्र्यांची महत्वाच्या खात्यात वर्णी लागली आहे. पाहा कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं.
एक नजर राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपावर:
दीपक केसरकर- गृह राज्यमंत्री (ग्रामीण)
जयकुमार रावल- रोजगार हमी योजना, पर्यटन
गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा
महादेव जानकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (कॅबिनेट)
गुलाबराव पाटील- राज्यमंत्री सहकार
पाडुंरंग फुंडकर- कृषीमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे- उर्जा, उत्पादन शुल्क
संभाजी निलंगेकर- कामगार, कौशल्य विकास (कॅबिनेट)
सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकार (कॅबिनेट)
अर्जुन खोतकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (राज्यमंत्री)
रविंद्र चव्हाण- बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री
राम शिंदे- जलसंधारण (कॅबिनेट)
चंद्रकात पाटील- महसूल आणि सार्वजनिक बांधकाम
सदाभाऊ खोत- कृषी आणि पणन (राज्यमंत्री)
मदन येरावार – उर्जा व पर्यावरण (राज्यमंत्री)
=======================================
राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधूनच, आजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
A
पुणे: राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधून होतात, त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही, असे सांगून अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, ”इतर पक्षांप्रमाणे आम्हाला शहराचे निर्णय घेण्यासाठी केंद्रात किंवा राज्यात जावे लागत नाही. जनता शहराचा विकास बघत आहे. त्याला ती योग्य न्याय देईल.”
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होत आहे त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, आज राज्यात व केंद्रात सरकार असून ही त्यांना इथे मात्र राष्ट्रवादी विरुद्ध लढण्यासाठी ते हतबल असावेत म्हणून युती केली असेल. राम शिंदे आणि महादेव जाणकार अशा दोन धनगर समाजाच्या व्यक्तींना मंत्रिपद दिले त्याचा आनंद होतो आणि दोन तीन महिन्यात आरक्षण मिळवून घेतील आणि आरक्षण मिळाले नाही तर ते बाहेरही पडेल दुधाला किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल अशी आहे. अशी टीकाही अजित पवारांनी यावेळी केली.
=======================================
बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा
वसईः बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सिताराम गुप्ता आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात, तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार जगदीश दुबे यांचा जमिनीच्या पैशांवरून सिताराम गुप्ता यांच्याशी वाद सुरू आहे.
सिताराम गुप्ता यांचा मुलगा अनिल आणि अरविंद या दोघांनी अपहरण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप जगदीश दुबे यांनी केला आहे. तसंच गुप्ता पिता-पुत्रांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही दुबे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सिताराम गुप्ता आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली होती. मात्र न्यायलयानं त्यांची जामीनावर सुटका केली आहे.
=======================================
केरळमध्ये 'जंक फूड'वर लागू होणार तब्बल 14.5 टक्के 'फॅट टॅक्स'!
तिरुअनंतपूरम: जंक फूडचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. त्यामुळेच अशाप्रकारच्या खाद्य पदार्थांवर केरळ सरकारनं थेट ‘फॅट टॅक्स’ लागू केला आहे.
केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सॅण्डविच यासारख्या जंक फूडवर 14.5 टक्के कर लावला आहे.
दरम्यान, हा टॅक्स रेस्टॉरंट मालकांना चुकवावा लागणार आहे की, खवय्यांना यांचा भार सोसावा लागणार आहे याबाबत सरकारनं अद्याप काहीही स्पष्ट केलं नाही. केरळच्या अर्थ सचिवांनी याबाबत माहिती दिली की, हा निर्णय आम्ही कॉर्पोरेट्सवर सोडला आहे. हा नियम मॅक्डोनल्ड, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्सला लागू होणार आहे.
केरळ सरकारच्या पॉलिसीनुसार नवे नियम निश्चित करण्यात आले आहे. केरळ सरकारनं फॅट टॅक्स लागू करण्याची घोषणा शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली. यातून सरकारला 10 कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
=======================================
मोदी सरकारमधील 78पैकी 72 मंत्री कोट्यधीश
मुंबई: नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाची संख्या 78 झाली. यापैकी 72 मंत्री कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्मने मंत्र्यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या तपशीलाच्या आधारे ही माहिती दिली आहे.
नव्या मंत्रिमंडळातील सर्वात जास्त श्रीमंत मंत्री एम.जे. अकबर आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 49.90 कोटी आहे. तर त्यानंतर पीपी चौधरी यांचा क्रमांक आहे. त्यांच्यी संपत्ती 35.25 कोटीची आहे. तर विजय गोयल यांची संपत्ती 29.97 कोटी इतकी संपत्ती आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांची संपत्ती 30 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अरुण जेटली, हरसिमरत कौर बादलस जयंत सिन्हा, मनेका गांधी आणि महेश शर्मा यांचा समावेश आहे.
या सर्वांच्या यादीत अनिल दवे यांची संपत्ती सर्वात कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची संपत्ती 60.97 लाख रुपये आहे.
=======================================
ब्रिटनला मिळणार महिला पंतप्रधान!
तेरेसा मे
पुरुष गोंधळ घालतात आणि बायकांना सगळं निस्तरावं लागतं! विनोदाचा भाग सोडा, पण ब्रिटनचं चित्र सध्या तसंच दिसतं आहे.
ब्रिटनच्या जनतेनं ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिल्यावर डेव्हिड कॅमरॉन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षात नव्या नेतृत्त्वासाठी निवड प्रक्रिया सुरू असून, त्यात आता केवळ दोनच उमेदवार उरल्या आहेत. तेरेसा मे (59 वर्ष) आणि अँड्रिया लीडसॉम (53 वर्ष).
=======================================
नाशिकमध्ये भीषण अपघातात राष्ट्रीय जलतरणपटूचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक: नाशिकमध्ये डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात राष्ट्रीय जलतरणपटू सौरभ सोंकाम्बळे या तरुणाचा दुर्दैवी आज दुपारी मृत्यू झाला. डंपर आणि दुचाकीमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये सौरभचा जागीच मृत्यू झाला.
18 वर्षाचा सौरभ हा राष्ट्रीय जलतरणपटू होता. नाशिकमधील RYK कॉलेजमध्ये तो 12 वीच्या वर्गात होता. दरम्यान घरात दुपारी क्लासला जात असतानाच त्याचा अपघात झाला.
सौरभ हा दुपारी क्लासला जात असताना नाशिकमधील बोधले नगर येथे पेट्रोल पंपाच्या समोर मागून जाऊन डंपरला धडक दिल्यानं सौरभनं जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सौरभ हा जलतरण प्रशिक्षक हरी सोंकाम्बळे यांचा मुलगा होता.
=======================================
विम्बल्डनमध्ये सेरेनाचंच राज्य, जर्मनीच्या अँजेलिकवर मात
फोटो सौजन्य: एपी (AP)
विम्बल्डन: वर्ल्ड नंबर वन सेरेना विल्यम्सच पुन्हा एकदा विम्बल्डनची राणी ठरली आहे. सेरेनानं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरवर 7-5, 6-3 अशी मात केली. सेरेनाचं हे विम्बल्डन महिला एकेरीतलं तब्बल सातवं विजेतेपद ठरलं.
या विजयासोबतच सेरेनानं स्टेफी ग्राफच्या ओपन इरामध्ये सर्वाधिक 22 ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधली. सेरेनाच्या खात्यात सात विम्बल्डन विजेतेपदांशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा, फ्रेन्च ओपनमध्ये तीन आणि अमेरिकन ओपनमध्ये सहा विजेतीपदं जमा आहेत.
ओपन इरामध्ये म्हणजे 1968नंतर सेरेना आणि स्टेफीलाच 22 ग्रँड स्लॅम जेतेपदं जिंकता आली आहेत. केवळ मार्गारेट कोर्टनंच सेरेना आणि स्टेफीशिवाय जास्त म्हणजे 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदं मिळवलं होती. त्याच मार्गारेटच्या उपस्थितीत सेरेनानं स्टेफीच्या विक्रमाशी बरोबरी साधून महिला टेनिसवरची मक्तेदारी सिद्ध केली आहे.
=======================================
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती
- ऑनलाइन लोकमतकोल्हापूरात पंचगंगा पात्राबाहेर, गगनबाबडा तालुक्यात सर्वाधिक १८९.५० मिमी पाऊसगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 87 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबाबडा तालुक्यात 189.50 मि.मी पाऊस पडला आहे.धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामूळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 29 फूट 4 इंचावर पोहचली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर व भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
=======================================
काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या
- ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. १० - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला चकमकीत जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खो-यात उफाळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. रविवारी हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीन जण ठार झाले. यात एका पोलिसाचा समावेश आहे. काश्मीर खो-यातीला मृतांचा आकडा आता १८ झाला असून, २०० जण हिंसक आंदोलनात जखमी झाले आहेत.काश्मीरमध्ये अनेक भागात संचारबंदी असून, मोबाईलमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरुंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.रविवारी सकाळी पुलावामाच्या नेवा भागात सुरक्षा जवान आणि आंदोलकांच्या चकमकीत इरफान अहमद मलिक हा १८ वर्षांचा युवक मरण पावला. अनंतनाग जिल्ह्यात संगममध्ये जमावाने पोलिसांची बंकर व्हॅन झेलनदीमध्ये ढकलून दिली. यात वाहनचालक फिरोझ अहमद ठार झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
=======================================
अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल
- ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १० - अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी असलेल्या लंगरमधील भोजनव्यवस्थाही संपुष्टात आल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या भाविकांनी तेथील प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला आहे़अमरनाथ यात्रेसाठी जळगाव येथील अनिल महाजन यांच्यासमवेत (१२), दादर येथील तेजस कारंबे यांच्यासमवेत (८०), श्रीरामपूर येथील सुहास परदेशी यांच्यासमवेत (२०), नागपूर येथील गणेश कोठारी यांच्यासमवेत (१२), कल्याण येथील सतीश कोठेकर यांच्यासमवेत (१६), मुंबईतील लक्ष्मण वारे यांच्यासमवेत (८) तर मालेगावमधील दादाजी शेवाळे यांच्यासमवेत १२ व्यक्ती या अमरनाथ यात्रेसाठी गेल्या आहेत.दरम्यान, अमरनाथ दर्शनाहून परतणा-या भाविकांनी परतीच्या गाड्यांचे केलेले आरक्षण रद्द होण्याचा मार्गावर आहे. मात्र तरीही तेथील स्थानिक प्रशासन त्यांना पुढे जाऊ देत नसल्याची माहिती हेमंत अगरवाल यांनी लोकमत ऑनलाईनसाठी दिली आहे़
=======================================
शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली
- ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १० - औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्यावर रेल्वेद्वारे आलेली शेकडो युरियाचे पोती रविवारी पावसामुळे भिजली.सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र या पावसाने शेतकऱ्यांसाठी आलेले खत भिजले.भिजेलली पोती तशीच ट्रकमध्ये लोड केली जात होती. त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील हा प्रश्न आहे
=======================================
झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी येऊ शकते
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १० - दहशतवादा संदर्भातल्या झाकीर नाईकच्या वक्तव्यांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची नऊ पथके त्याशिवाय गुप्तचर यंत्रणा आणि अन्य तपास यंत्रणा झाकीर नाईकच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. विशेष पथके त्याच्या भाषणाच्या चित्रफितींमधील शब्द न शब्द तपासत आहेत.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चार पथके फुटेज आणि भाषणांच्या सीडी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. तीन टीम्स सोशल साईटसवर लक्ष ठेऊन आहेत आणि दोन टीम्स नाईकच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. प्राथमिक तपासात नाईकची भाषणे चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे.त्याशिवाय त्याच्या संस्थेबद्दलही संशय निर्माण झाला आहे. झाकीर नाईकला समाजसेवेसाठी जो निधी मिळाला त्याचाही गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. फोन कॉल्स आणि ई-मेल शिवाय झाकीर नाईकच्या परदेश दौ-याचे प्रायोजकही एनआयएच्या रडावर आहेत. केंद्र सरकार यासंबंधी कायदेशीर मत घेईल. सूत्रांच्या माहितीनुसार नाईकवर लवकरच बंदी येऊ शकते.
=======================================
अमेरिकेत पोलिसांवर गोळीबार; पाच ठार
- ह्युस्टन : अमेरिकेत आंदोलनादरम्यान काहींनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात पाच अधिकारी ठार, तर सात जखमी झाले. डलास शहरात गुरुवारी रात्री करण्यात आलेला हा हल्ला देशातील पोलिसांवरचा आजवरचा सर्वांत घातक हल्ला ठरला. पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर अलीकडेच गोळीबार केला होता. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू होते.शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. दोन बंदूकधारी उंच ठिकाणी दबा धरून बसले होते. त्यांनी हल्ला केला, असे डलासचे पोलीस प्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी येथे सांगितले. पोलिसांनी एका संशयिताशी वाटाघाटीचा प्रयत्न केला. तथापि, हा प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर झालेल्या चकमकीत हा संशयित मारला गेला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सीएनएन या वाहिनीला सांगितले. मात्र, तो नेमका कसा ठार झाला हे स्पष्ट केले नाही.
=======================================
सौदी अरेबियातल्या हल्ल्यांप्रकरणी 12 पाकिस्तानींना अटक
- ऑनलाइन लोकमतरियाध, दि. 8 - सोमवारी मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी 12 पाकिस्तानी नागरिकांसह 19 जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले आहे. शियांच्या मशिदीजवळ करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण सात जण ठार तर 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.नईर मोस्लेम हम्माद अल बलावी हा सौदी नागरिक या हल्ल्यांमागचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला तिघा दहशतवाद्यांनी केला होता. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी व्यक्तिने केल्याचे तपासात आढळले आहे. ड्रायव्हर असलेला अब्दुल्ला गेली 12 वर्षे सौदीमध्ये आहे. मदिना येथे झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. तर कातिफमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जण ठार झाले होते. या हल्ल्यांची अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही.मुस्लीमांसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थान असलेल्या मदिनामध्ये प्रथमच आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला आहे. प्रेषित मोहम्मद यांनी बांधलेली मशिद या ठिकाणी असून या स्थळांची संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे राज्यकर्ते सौद घराणे मानते. तर, इस्लामिक स्टेटने सौद घराणे धर्मभ्रष्ट असून त्यांची राजवट उलथून टाकण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियावर हल्ले करण्याचे आदेश इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याने दिले असून त्यानंतर हे हल्ले झाले आहेत.सौदीमधले तरूण कट्टरतावादाकडे झुकत असून याबाबत सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी चिंता व्यक्त केली आहे.
=======================================
चोविस तास करता येणार दागिन्यांची खरेदी
- मुंबई : भारतात ई र्कामर्स बाजारपेठ तब्बल ६७ टक्क्यांनी वाढून, ती ३८ अब्ज डॉलर्सवर जाणे अपेक्षित असतानाच दागिने व जवाहिऱ्यांची आॅनलाइन खरेदीही २00 लक्ष डॉलर्सवर गेली आहे. एकूणच इॅ कॉमर्स बाजारपेठेत जेम्स आणि ज्वेलरीचा वाटा वाढण्याची शक्यता लक्षात घेत बिझनेस टू कन्झयुमर (बीटूसी) आणि बिझनेस टू बिझनेस (बीटूबी) पोर्टल दाखल झाले आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या या व्हर्च्युअल स्टोअर्समुळे किफायतशीर किमतीला दागिने मिळू शकतील, असा दावा केला जात आहे. या पोर्टलमुळे ब्रोकरेज हा प्रकार बंद होईल, अनेक अतिरिक्त शुल्क बंद होतील आणि विश्वसनीय प्रमाणपत्रे व घरपोच सेवा हा फायदा गिऱ्याईकांना मिळेल, दुसरीकडे सुवर्णकार आणि त्यांच्याकडील कारागिर यांनाही मोठा व्यवसाय मिळू शकेल, असे ज्युवेलईमार्टचे सीईओ आदिश शाह यांनी सांगितले. ज्युवेलईमार्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करून ते म्हणाले की आतापर्यंत दागिन्यांच्या कमी श्रेणी वा किंमतीमध्ये चीन आपल्यापुढे होता. मात्र या पोर्टरलच्या माध्यमातून भारत दहिल्या क्रमांकावर जाईल, अशी खात्री आहे. मेक इन इंडियाच्या दृश्टीने हे आमचे छोटेसे योगदान आहे.
=======================================
मांढवी ओढ्यावरून माऊलींची पालखी मार्गस्थ
| |
-
| |
मांडवीचा ओढा येथे पालखीचा विसावा
मांढवी ओढ्यावरून "माऊलीं"ची पालखी 11.30 वाजता मार्गस्थ
पुरंदवडे येथील पहिले गोल रिंगण अंदाजे दुपारी एक वाजता सुरू
श्री संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी वडशिंगे येथे दाखल
=======================================
मध्य प्रदेशातील पुरात 15 जण मृत्युमुखी
| |
-
| |
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या वाढून मृतांचा आकडा आता 15 वर पोचला आहे, गेल्या 24 तासात राज्याच्या विविध भागात पुरामुळे सात जण मरण पावले,अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे सात जण मरण पावले असल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
मुख्यमंत्री चौहान यांनी आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व 51 जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदतीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. शिबिरात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे सात जण मरण पावले असल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
मुख्यमंत्री चौहान यांनी आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व 51 जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदतीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. शिबिरात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
=======================================
'पायाभूत' गुंतवणुकीसाठी गडकरींचा अमेरिका दौरा
| |
-
| |
वॉशिंग्टन : केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे अमेरिकी दौऱ्यात महत्त्वपूर्ण अशा पायाभूत क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक होण्यासाठी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची मोहीम सुरू करणार आहेत. एका आठवड्याच्या अमेरिकी दौऱ्यावर असलेले गडकरी अमेरिकेबरोबर द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा कणार आहे.
केंद्रीय मंत्री म्हणून गडकरी प्रथमच अमेरिकेला जात असून ते आठवडाभराचा कार्यक्रम भरगच्च आहे. वॉशिंग्टनपासून ते लॉस एंजलिसदरम्यान न्यूयॉर्क, सेंट लुईस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अधिकाऱ्यांच्या मते गडकरी अमेरिकेचे परिवहन मंत्री अँटनी फॉक्स यांच्यासमवेत 11 जुलै रोजी चर्चा करणार आहेत. पायाभूत सुविधेत गुंतवणुक वाढविण्याबरोबरच उभय देशातील संबंध अधिक वृद्धींगत होण्यासाठी अमेरिकेच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. अमेरिकी परिवहन विभागात गडकरी फेडरल हायवे ऍडमिनिस्ट्रेशन, यूएस मेरिटाइम ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनचे सादरीकरण पाहणार आहेत. वॉशिंग्टन येथील थिंक टॅंक अटलाटिंक कौन्सिलकडून भारताचा पायाभूत विकास: एक संधी यावर आयोजित एका कार्यक्रमात गडकरी सहभाग घेणार आहेत. यूएस-इंडिया कौन्सिलकडून आयोजित कार्यक्रमात गडकरी हे गुंतवणुकदारांना आणि पायाभूत सुविधा देणाऱ्या कंपन्यांना पोर्ट, इनलॅंड वॉटरवेज, हायवे डेव्हलपमेंटबाबत सादरीकरण करणार आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, गडकरी पायाभूत क्षेत्रात 50 ते 60 अब्ज डॉलर आणि बंदर परिसरातील आर्थिक क्षेत्रात 100 अब्ज डॉलर गुंतवणुक करण्यासंदर्भात आवाहन करणार आहेत. इनलॅंड वॉटरवेज, वॉटर ट्रान्सपोर्ट, कोस्टल आणि क्रुझ शिपिंप, सोलर आणि एनर्जी जनरेशनमध्येही गुंतवणूक करण्याची योजना केली आहे.
=======================================
बँकांचा 12-13 जुलैला देशव्यापी संप!
| |
-
| |
नवी दिल्ली : अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) 12-13 जुलैला देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच, 12 जुलैला मुख्य स्टेट बॅंकेच्या पाच सहयोगी बँकांचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका स्टेट बँकेत विलीन करण्याचे सरकारने ठरविले आहे.
दुसर्या दिवशी (13 जुलै) सर्वच बँकांमधील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे एआयबीईएचे सरचिटणीस वेंकटाचलम यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा स्टेट बॅंकेमध्ये सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला आणि आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला विरोध आहे.
=======================================
हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
| |
-
| |
श्रीनगर - ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हाण वणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आजही (रविवार) हिंसाचाराच्या घटना सुरु असल्याने संचारबंदी कायम आहे. मात्र, हिंसाचारानंतर स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला.
काश्मीर खोरतील दहा जिल्ह्यांमध्ये अद्यापही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुराण वाणी हा लष्कराबरोबरील चकमकीत मारला गेल्यानंतर तेथे काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराला सुरवात झाली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव शुक्रवारपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मोबाईल, इंटरनेटसेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांना मदतीसाठी केंद्रीय पथकाला पाचारण करण्यात आले होते.
कुलगाम, अनंतनाग, त्राल, कोकेरनाग आणि श्रीनगरमधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शनिवारी जवान व संतप्त जमावामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 12 जण ठार, तर 50 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी तीन पोलिस स्थानकांसह पाच इमारतींना व वाहनांना आग लावली. फुटीरतावादी नेत्यांनी शनिवारी "बंद‘ पुकारला होता.
=======================================
मुंबई - सलमान खानच्या ‘सुलतान‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून शनिवारपर्यंत चार दिवसांत तब्बल 142.62 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या चार दिवसांत इतकी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. चित्रपट तरुण आदर्श यांनी सुलतानच्या कमाईची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बुधवारी (ता. 6) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच त्याच्या 100 कोटींहून अधिक व्यवसायाची चर्चा होती. काहींनी तर हा चित्रपट 300 कोटींहून अधिक कमाई करेल, असे सांगितले आहे. पहिल्या तीन दिवसांतच "सुलतान‘ने 100 कोटींचा पल्ला गाठला. बुधवारी 37 कोटींची कमाई झाली. पहिल्याच दिवशी एवढा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. गुरुवारी (ता. 7) या चित्रपटाने 36 कोटींची, तर शुक्रवारी (ता. 8) 31 कोटी 50 लाख कमावले. सलमानचे अलीकडचे चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये आहेत.
चार दिवसांत 'सुलतान'ची कमाई 142.62 कोटी
| |
-
| |
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बुधवारी (ता. 6) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच त्याच्या 100 कोटींहून अधिक व्यवसायाची चर्चा होती. काहींनी तर हा चित्रपट 300 कोटींहून अधिक कमाई करेल, असे सांगितले आहे. पहिल्या तीन दिवसांतच "सुलतान‘ने 100 कोटींचा पल्ला गाठला. बुधवारी 37 कोटींची कमाई झाली. पहिल्याच दिवशी एवढा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. गुरुवारी (ता. 7) या चित्रपटाने 36 कोटींची, तर शुक्रवारी (ता. 8) 31 कोटी 50 लाख कमावले. सलमानचे अलीकडचे चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये आहेत.
शनिवारीही सुलतानने आपली घोडदौड कायम ठेवताना 37.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज (रविवार) सुटी असल्याने ‘सुलतान‘ आणखी किती व्यवसाय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
=======================================
बल्लारपूरजवळ कार नाल्यात कोसळली;चौघे बेपत्ता
| |
-
| |
चंद्रपूर - शालेय साहित्य खरेदीसाठी चंद्रपूरला येणारी कार किन्ही पुलावरून नाल्यात कोसळली. यात कारमधील चौघे बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना शनिवारी (ता. 9) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
कोठारी येथे सचिन गोविंदवार यांची शाळा आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी त्यांच्यासोबत सुवर्ण राजूरकर, पूजा राजूरकर आणि करण अरुण कावळे हे शिक्षक एमएच 34 ए. एम. 3153 क्रमांकाच्या कारने चंद्रपूरसाठी निघाले. चंद्रपूर मार्गावर किन्ही नाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याजवळ येताच सचिन गोविंदवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार क्षणातच खाली कोसळली. घटना माहीत होताच तुकूमचे पोलिस पाटील मारोती बंडू आलाम यांनी सहायक पोलिस निरीक्षक पान्हेकर यांना भेटून माहिती दिली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा प्रवाहात चौघेही वाहून गेले. कार पुलापासून 30 ते चाळीस फुटावर अडकली होती. मात्र, कारमधील चौघेही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
कोठारी येथे सचिन गोविंदवार यांची शाळा आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी त्यांच्यासोबत सुवर्ण राजूरकर, पूजा राजूरकर आणि करण अरुण कावळे हे शिक्षक एमएच 34 ए. एम. 3153 क्रमांकाच्या कारने चंद्रपूरसाठी निघाले. चंद्रपूर मार्गावर किन्ही नाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याजवळ येताच सचिन गोविंदवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार क्षणातच खाली कोसळली. घटना माहीत होताच तुकूमचे पोलिस पाटील मारोती बंडू आलाम यांनी सहायक पोलिस निरीक्षक पान्हेकर यांना भेटून माहिती दिली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा प्रवाहात चौघेही वाहून गेले. कार पुलापासून 30 ते चाळीस फुटावर अडकली होती. मात्र, कारमधील चौघेही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
=======================================
कोल्हापूर - जिल्ह्यात सर्वत्र आज (रविवार) पाऊस सुरुच असून, पंचगंगा नदीचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर गेल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८९.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर: पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर
| |
-
| |
गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १८९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी ८७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
तालुकानिहाय पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे -
चंदगड ११०.१६
करवीर ८१.७२
कागल ६९.७१
पन्हाळा ९८.२८
शाहूवाडी १३०
हातकणंगले ३२.८७
शिरोळ-३७.५७
राधानगरी ७६.६१
भुदरगड ७५.६०
गडहिंग्लज ५०.७१
आजरा ९१.२५
गगनबावडा १८९.५०
- एकूण १०४४.४० मिमी
=======================================
पुणे - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मागील वर्षी पेक्षा सुमारे एक टीएमसीने जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच मागील 24 तासात देखील एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.
खडकवासलांत मागील वर्षी पेक्षा जास्त साठा
| |
-
| |
मागील वर्षी चारही धरणात मिळून 10 जुलै रोजी ७.२४ टीएमसी म्हणजे 24.85 टक्के पाणीसाठा जमा होता. आज (रविवार) सकाळी चारही धरणात ८.१९ टीएमसी म्हणजे २८.१० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सुमारे ०.९५ टीएमसी म्हणजे 1 टीएमसीने वाढ आहे. तर काल सकाळी चारही धरणात ७.१० टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या २४ तासात १.०९ टीएमसीने वाढ झाली आहे.
धरणांत ८.१० टीएमसी म्हणजे 8100 दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला दररोज 40 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असते. त्यानुसार हे पाणी पुण्याला ६ महिने 22 दिवस पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे.
=======================================
=======================================


No comments:
Post a Comment