[अंतरराष्ट्रीय]
1- इटलीत दोन ट्रेनची समोरासमोर धडक, 10 प्रवासी मृत्युमुखी
2- पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
3- चीनला धक्का - दक्षिणेकडच्या समुद्रावर चीनचा हक्क नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय
4- ट्विटरने जीआयएफ इमेजची क्षमता वाढविली
5- उत्तर कोरियाकडून अणुचाचणी केंद्र सज्ज
6- भारताने 5.6 अब्ज डॉलर द्यावेत: केर्न एनर्जी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
7- काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
8- सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर १२ आॅगस्टला सुनावणी- सर्वोच्च न्यायालय
9- वाघांसाठी सुरक्षित ‘कॉरिडोर’चा शोध, भारतीय वन्यजीव संस्थेकडून सर्वेक्षण
10- तूरडाळ भाव नियंत्रणात येणार- गिरीश बापट
11- आठवण पानशेत पुराची - निर्णय झाले, अंमलबजावणी अडकली प्रशासकीय पातळीवर
12- लवादाच्या निर्णयाचा अभ्यास करत आहोत:भारत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
13- पंकजांची नाराजी नको, राम शिंदेंनी पदभारच स्वीकारला नाही
14- मुंबई-गोवा हायवेवरील 'तो' दरोडा बनाव, 5 जणांना बेड्या
15- मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई - नितेश राणेंचा सवाल
16- खडकवासलातून ९ क्युसेक्सने पाणी सोडणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
17- नाशकात पालखेड धरण क्षेत्रात अडकलेल्या 6 जणांची सुटका
18- कैर्न एनर्जीने भारत सरकारकडे मागितली 37,400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
19- सांगली जिल्ह्यातील सहा गावचा संपर्क तुटला
20- सरकारी नोकरी सोडून 'तो' बनला कोट्यधीश
21- बाराखडी न आल्याने पित्याकडून चिमुकलीचा खून
22- पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, लष्कराला पाचारण
23- बीड - परळीनजीक सिरसाळा येथे बस व ट्रकचा अपघात, 15 प्रवासी गंभीर जखमी
24- हिंगोली : जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यास 10 हजारांची लाच घेताना पकडले
25- धुळे- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 13 गुरे ठार, 5 घरांची पडझड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
26- हॉकी : सरदार सिंगला हटवलं, गोलकीपर श्रीजेश नवा कर्णधार
27- वेस्ट इंडिजच्या जेरॉम टेलरचा कसोटी क्रिकेटला अलविदा
28- माजी पाक क्रिकेटपटू इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर
29- शाहरुख व अक्षय ठरले "हायेस्ट पेड' स्टार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================

पुग्लिया आणि अँड्रिया या दोन भागांच्या मध्ये एकाच रुळावर दोन ट्रेन समोरासमोर आल्याने हा अपघात घडला. आकाशातून घेतलेला या अपघाताचा फोटो घटनेची भीषणता स्पष्ट करत आहे. वेगाने येत असलेल्या दोन्ही ट्रेनच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
ट्रॅकवर आणि दुतर्फा रेल्वेच्या अवशेषांचा खच पडला आहे. जखमींना आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. दोन शहरांना जोडणाऱ्या एकाच मार्गावरुन दररोज अनेक गाड्या जातात. त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

इटलीत दोन ट्रेनची समोरासमोर धडक, 10 प्रवासी मृत्युमुखी
रोम : इटलीतील दक्षिण भागात दोन पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा प्रवासी मृत्यूमुखी पडले असून 12 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पुग्लिया आणि अँड्रिया या दोन भागांच्या मध्ये एकाच रुळावर दोन ट्रेन समोरासमोर आल्याने हा अपघात घडला. आकाशातून घेतलेला या अपघाताचा फोटो घटनेची भीषणता स्पष्ट करत आहे. वेगाने येत असलेल्या दोन्ही ट्रेनच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
ट्रॅकवर आणि दुतर्फा रेल्वेच्या अवशेषांचा खच पडला आहे. जखमींना आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. दोन शहरांना जोडणाऱ्या एकाच मार्गावरुन दररोज अनेक गाड्या जातात. त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
==================================
पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
- ऑनलाइन लोकमत -इस्लामाबाद, दि. 12 - पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं असं आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आलेत आहेत. 13 शहरांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समधून लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना लष्करी कायदा लागू करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी, फैसलाबाद, सरगोधा आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये एका रात्रीत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.डॉन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीप्रमाणे 'मुव्ह ऑन पाकिस्तान' या पक्षाने हे पोस्टर्स लावले आहेत. याच पक्षाने लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना निवृत्तीवर फेरविचार करण्यासाठी मोहीम सुरु केली होती.
==================================
सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर १२ आॅगस्टला सुनावणी- सर्वोच्च न्यायालय
- ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 12- घरकूल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आता १२ आॅगस्ट २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जगदीशसिंग खेहर व न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांच्या पिठासमोर सुनावणी झाली. त्यात, सरकार पक्षाच्यावतीने घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल (केस स्टेटस् डिटेल्स) न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने, घरकूल प्रकरणातील उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर सुनावणीअंती सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी होणार आहे. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.
==================================
वाघांसाठी सुरक्षित ‘कॉरिडोर’चा शोध, भारतीय वन्यजीव संस्थेकडून सर्वेक्षण
- गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 12- देशात व्याघ्र प्रकल्पांसह वाघांची संख्या वाढीस लागली असली तरी हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडताना जंगलांची सलगता ठेवण्याचा प्रस्ताव वजा अहवाल डेहरादून येथील वन्यजीव संस्थेने केंद्र सरकारकडे पाठविला आहे.महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये वाघांचा अधिवास आहे. मात्र वाघांना संरक्षण क्षेत्र अपुरे पडत असल्यामुळे वाघ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करीत आहे. वाघांना स्थलांतर करताना नागरी वस्त्यांमधून प्रवास करावा लागतो. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आदी मार्ग ओंलाडून जीव मुठीत घेऊन वाघ भक्ष्याचा शोध घेत नवा अधिवास शोधतो. मात्र स्थलांतरित करताना वाघांचे जीवन असुरक्षित राहते, यात दुमत नाही. बरेचदा वाघ आणि मानव यांचा संघर्षदेखील झाल्याचे घटना उघडकीस आल्या आहेत. ज्याप्रमाणे देशभरात रेल्वेने जाळे विणले, त्याच धर्तीवर वनविभागाने जंगलात सलगता आणली तर व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जुळले जातील, असा प्रस्ताव वजा मागणी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांनी केंद्रीय पर्यावरण तथा वने मंत्रालयाकडे केली आहे.
==================================
तूरडाळ भाव नियंत्रणात येणार- गिरीश बापट
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 : राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांनी तूर डाळीचा पेरा वाढवावा, उत्पादकता वाढवावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच बाजारपेठेत तूर डाळीच्या अनेक प्रतवारी असल्या तरी त्यांची किंमत 120 रुपयांपेक्षा जास्त जावू देणार नाही, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज रविभवन येथे आयोजित बैठकीत दिले.डाळीची साठवण क्षमता व त्याची मूल्य याची माहिती जनतेला व्हावी, चढ्या भावाने तूर डाळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज रविभवन येथे तूर डाळीची आयातदार, मिलर्स, घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अनिल सोले, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. वंजारी, पुरवठा उपायुक्त आर. एस. आडे, अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे, एल. जे. वार्डेकर तसेच वैध मापन शास्त्र, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी, नागपूर विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी राज्याचे डाळीचे दर नियंत्रित ठेवण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
==================================
आठवण पानशेत पुराची - निर्णय झाले, अंमलबजावणी अडकली प्रशासकीय पातळीवर
- पुणे : पानशेत धरणफुटीने पुणे शहरात हाहाकार माजविला होता़ या महापुरात बेघर झालेल्यांसाठी शासनाने शहराच्या ८ ठिकाणी वेगवेगळ्या वसाहती स्थापन करून त्यात ३ हजार ९८८ कुटुंबंची व्यवस्था केली़ या घटनेला आता ५५ वर्षे झाली़ या पूरग्रस्तांना मालकीहक्काने घरे देण्याचा, त्यांनी केलेली वाढीव बांधकामे नियमित करण्याचा शासन निर्णय झाला पण, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसून ती प्रशासकीय पातळीवर अडकली आहे़या पूरग्रस्त कुटुंबांपैकी अनेकांनी घरांची विक्री केली आहे़ शासनाने ही घरे त्यांना मालकीहक्काने दिली असली तरी हे हस्तांतरण अद्याप होत नाही़ पूरग्रस्त वसाहतीतील घरांचे हस्तांतरण नियमित करावे, येथे झालेले वाढीव बांधकामे नियमित करावीत, विकास आराखड्यात टाकलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी केली आहे़पानशेत पूरग्रस्तांना दत्तवाडी, एरंडवणा, पर्वती दर्शन, शिवदर्शन, जनवाडी, हेल्थ कॅम्प, सेनादत्त पेठ, भवानी पेठ या ठिकाणी शासनाने ओटा स्किम, गोलघरे आणि शेजघरे बांधली़ त्यात ३ हजार ९८८ कुटुंबाची सोय करण्यात आली़ सन १९९१मध्ये शासनाने या कुटुंबांना ही घरे मालकीहक्काने देण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयानंतर पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत़ घर मालकीचे असले तरी तेथे बांधकाम करणे, दुरुस्ती करणे अथवा खरेदी-विक्री करणे यापैकी काहीही बाबी पूरग्रस्त करू शकत नव्हते़ शासनाने मालकीहक्काने देण्याचा निर्णय घेतला तरी त्यांच्या नावावर ती झाली नव्हती़ त्यासाठी प्रामुख्याने शासनाने पॉपर्टी कार्डवर त्यांचे नाव लावले नव्हते़.
==================================
मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई - नितेश राणेंचा सवाल
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ - पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी मुंबईकरांची अद्याप खड्ड्यांच्या समस्येतून सुटका झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर 'मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई?' असा सवाल विचारत काँग्रेस आमदार नितेश राणें यांनी मुंबईतल्या विविध खड्डयांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार भवनमध्ये भरवले आहे.मुंबई महानगरपालिकेने फक्त 66 खड्डे असल्याचे जाहीर केले होते, पण आमदार नितेश राणे तब्बल 450 खड्डयांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून पालिकेचे सर्व दावे फोल ठरवले आहेत.मुंबईतील खड्ड्यांची खरी परिस्थिती आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुंबई महापालिकेचे आयुक्त असो वा सत्ताधारी नेते, खड्ड्यांच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप करतात,मात्र खरी परिस्थिती काय आहे, हे आम्ही या प्रदर्शनातून दाखवत आहोत, असे नितेश राणेंनी सांगितले.
==================================
पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
- ऑनलाइन लोकमत -इस्लामाबाद, दि. 12 - पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं असं आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आलेत आहेत. 13 शहरांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समधून लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना लष्करी कायदा लागू करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी, फैसलाबाद, सरगोधा आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये एका रात्रीत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.डॉन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीप्रमाणे 'मुव्ह ऑन पाकिस्तान' या पक्षाने हे पोस्टर्स लावले आहेत. याच पक्षाने लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना निवृत्तीवर फेरविचार करण्यासाठी मोहीम सुरु केली होती.
==================================
चीनला धक्का - दक्षिणेकडच्या समुद्रावर चीनचा हक्क नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय
- ऑनलाइन लोकमतहेग, दि. 12 - चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावर चीनचा कुठलाही हक्क नसल्याचा निवाडा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला असून चीनसाठी हा चांगलाच धक्का मानण्यात येत आहे. दक्षिणेकडील समुद्र किंवा साउथ चायना सी ही आपलीच जहागीर असल्याचा चीनचा अविर्भाव होता आणि यावरून फिलिपाइन्ससह अनेक देशांशी चीनचे खटकेही उडत होते. मात्र, फिलिपाइन्सच्या बाजुने कौल देताना, हा समुद्री भाग चीनची मालकी नसल्याचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे.या समुद्री विभागावर आपला ऐतिहासिक हक्क असल्याचा चीनचा दावा होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशांच्या विपरीत हा दावा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या क्षेत्रातल्या कुठल्याही बेटाने चीनला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून मान्यता दिलेली नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
==================================
कैर्न एनर्जीने भारत सरकारकडे मागितली 37,400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - कैर्न एनर्जी या ब्रिटिश कंपनीने भारत सरकारकडे 37,400 कोटी रुपयांच्या नुकसान भऱपाईची मागणी केली आहे. कैर्नने भारतामधल्या 10 वर्ष जुन्या कंपनीचं नूतनीकरण केलं, त्याबद्दल भारत सरकारने कैर्नकडे पूर्वलक्षी प्रभावानं 29,047 कोटी रुपयांच्या कराची मागणी केली होती. त्यावर कैर्नने आंतरराष्ट्रीय लवादाकडे 160 पानी आपली बाजू मांडली असून, भारत व इंग्लंडदरम्यानच्या करारांचा भंग भारत सरकार करत असल्याचं म्हटलं आहे. इंग्लंडमधल्या कंपनीच्या भारतातल्या गुंतवणुकीस समान वागणूक मिळत नसल्याचा आरोप कैर्ननं केला आहे.इन्कम टॅक्स खात्याने जानेवारी 2014 मध्ये करभरणा करण्याची मागणी केली होती, ज्यामुळे कैर्न इंडियाच्या शेअरला बाजारात चांगलाच फटका बसला आणि भागभांडवलाची किंमत 9 टक्क्यांनी घसरली. त्याशिवाय त्यावरंच व्याज आणि दंड असं एकत्र मिळून 37,400 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ते भारत सरकारने भरून द्यावे अशी याचिका कंपनीने केली आहे.जिनिव्हास्थित लवादाकडे हे प्रकरण असून कैर्नने 28 जून रोजी आपली बाजू मांडली आणि नुकसान भरपाई मागितली आहे. भारत सरकार त्यांची बाजू नोव्हेंबरमध्ये मांडणार आहेत आणि 2017मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
==================================
==================================
==================================
No comments:
Post a Comment