Saturday, 16 July 2016

नमस्कार लाईव्ह १६-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाकडून हत्या 
२- टर्की : लष्कराचा सत्तापालट करण्याचा डाव उधळला, 200 ठार 
३- शरीफ म्हणाले, बुरहान ‘शहीद’ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट 
५- स्मृती इराणींना दुसरा धक्का, कॅबिनेट कमिटीवरुन हकालपट्टी 
६- 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू 
७- काश्‍मीर स्वतःचाच नाश ओढवून घेत आहे - काश्‍मीर शालेय शिक्षण संचालक डॉ.शाह फजल
८- 'यूएएन'शिवाय मिळणार आता 'ईपीएफ'ची रक्कम 
९- जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना  कंठस्नान. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- गणेशोत्सवावर ध्वनी प्रदुषणची टांगती तलवार कायम 
११- पुण्यातून ISIS संशयित 5 जणांना अटक 
१२- नागपूर - जागतिक व्याघ्रदिन नागपुरात साजरा केला जाणार - मुनगंटीवार 
१३- पंढरपूर येथे बसेसचा तुटवडा. उस्मानाबाद विभागातील सहा आगारातून ३० जादा बसेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई; आत्महत्येचा VIDEO-कमकुवत मनाच्या लोकांनी बघू नये 
१५- अहमदनगर - मुळा धरण 50 टक्के भरले,  पिण्याच्या पाण्याची व उदयोगांसाठीच्या पाण्याची चिंता मिटली. 
१६- वर्धा रेल्वे स्थानकात मनोरुग्ण इसम रेल्वे इंजिनवर चढला. 
१७- नाशिकमध्ये दुचाकीस्वारावर कोसळलं झाड, एका तासानंतर सुटका 
१८- उत्तराखंड - मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग उखीमठ येथे भूस्खलन 
१९- नागपूर : प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीचा आईनेच केला गळा आवळून खून. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी 
२१- वाढदिवसाचा मुहूर्त साधत कतरिना कैफची फेसबूकवर एंट्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

----------------------------------------------------------------------

पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट 

पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट
मुंबई : कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे.  एसीबीनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचे नाव नाही.

त्यामुळे या प्रकरणातून एकनाथ खडसे निर्दोष सुटण्याची चिन्हं आहेत.
gajanan patil khadse PA
गजानन पाटील याला ज्या ठिकाणांवरुन एसीबीने ताब्यात घेतले होते, ते ठिकाण म्हणजे खडसेंचे मंत्रालयातील दालन याचाही उल्लेख नसून, मंत्रालय असा उल्लेख आरोपपत्रात आहे. हे आरोपपत्र १ हजार पेक्षा जास्त पानांचे असून, फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असं स्पष्ट होतं.
----------------------------------------------------------------------

स्मृती इराणींना दुसरा धक्का, कॅबिनेट कमिटीवरुन हकालपट्टी

स्मृती इराणींना दुसरा धक्का, कॅबिनेट कमिटीवरुन हकालपट्टी
नवी दिल्लीः वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांचं केंद्रीय कॅबिनेट कमिटीचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट समितीमध्येही मोठे फेरबदल केले आहेत.
मंत्रीमंडळ फेरबदलांमध्ये स्मृती इराणींच मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता कॅबिनेट समिचीचं सदस्यत्वही काढून घेण्यात आलं. त्यामुळे स्मृती इराणींना हा मोठा धक्का मानावा लागेल.
सदानंद गौडा यांची कौशल्य विकास मंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांचंही समितीचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रीपद स्वीकारणाऱ्या प्रकाश जावडेकरांचं समितीचं सदस्यत्व कायम ठेवण्यात आलं आहे.
----------------------------------------------------------------------

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाकडून हत्या

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाकडून हत्या
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलौच
लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या झाली आहे. कंदीलच्या भावानेच तिची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या मुलतान शहरात हा थरार रंगला.
काही दिवसांपूर्वीच कंदीलने मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी  ट्विटर, फेसबुकवर स्वतःच शेअर केला होता. त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता.
----------------------------------------------------------------------

गणेशोत्सवावर ध्वनी प्रदुषणची टांगती तलवार कायम

गणेशोत्सवावर ध्वनी प्रदुषणची टांगती तलवार कायम
मुंबई: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनांने रस्त्यावर मंडपांना परवानगी देऊ नये यासाठीची जनहित याचिका ठाणे येथील महेश बेडेकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारने ध्वनी प्रदुषणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या याचिकेवरील सुनावणी घेताना न्यायालयाने गेल्यावर्षी स्थानिक प्रशासनांना रस्त्यावर मंडपांना परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत. आवाजाचे नियम न पाळणाऱ्या मंडळांवर कारवाई करा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

या याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू आहे.

ध्वनी प्रदुषणाविषयी राज्य शासनाच्यावतीने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, शांतता क्षेत्रात पोलिसांच्या परवानगीशिवाय लाऊडस्पिकर लावणे बेकायदाच आहे. शांतता क्षेत्रात येणाऱ्या सिनेमागृहाला परवाना दिला जातो. तशी तरतुदच कायद्यात आहे. त्यामुळे सिनेमागृहांमध्ये होणाऱ्या आवाजावर बंदी घालता येणार नाही. पण शांतता क्षेत्रात लाऊडस्पिकरला परवानगी दिली गेली तरी त्याला आवाजाच्या मर्यादेचे निर्बंध असतात. या निर्बंधांचे पालन न केल्यास कारवाई केली जाते.
----------------------------------------------------------------------

पुण्यातून ISIS संशयित 5 जणांना अटक

आता पुण्यातून ISIS संशयित 5 जणांना अटक
पुणे: आससिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन आता पुण्यातूनही पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे दहशवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे दोनच दिवसांपूर्वी आससिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन परभणीतून एकाला अटक केली होती.

त्यानंतर आता पुण्यातील कोंढवा परिसरातून एटीएसने पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. पुणे एटीएसची कौसरबाग परिसरात ही कारवाई केली.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासीरबीन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती.
----------------------------------------------------------------------

VIDEO: अंगावर येणारी रेल्वे आणि धडकी भरवणारा स्टंट

VIDEO: अंगावर येणारी रेल्वे आणि धडकी भरवणारा स्टंट
लखनऊ: मुंबईच्या लोकल प्रवासातली स्टंटबाजी अनेकांच्या अंगावर शहारे आणते., मात्र मुंबईतल्या स्टंटबाजीपेक्षाही धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातल्या गाजियाबादच्या मसुरीतील स्टंटबाजीचा हा व्हिडीओ आहे. रेल्वेच्या पुलावर चढून काही अल्पवयीन मुलं रेल्वेची वाट बघतात. रेल्वे अगदी काही सेकंद लांब असताना पुलावरुन खाली उडी टाकतात.
ghaziyabad Railway Stunt
एका स्थानिक रहिवाशानं ही स्टंटबाजी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.  हा व्हिडीओ कधीचा आहे, मुलं कोण आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
VIDEO:

----------------------------------------------------------------------

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 16 - भारतावर 2005 सालापासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी आणि मृत झालेल्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत. हथरस येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गौरव अग्रवाल यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून ही माहिती मागवली होती. 
    पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2 जानेवारीला पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 सुरक्षा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाने आपला जीव गमावला होता. 37 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
    आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही 2005 पासून 2 दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 11 जुलै 2006मध्ये लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये 187 लोकांनी आपला जीव गमावला, तर 817 जण जखमी झाले होते. यानंतर लगेचच दोन वर्षात मुंबईवर भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रामार्गे भारतात दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं  होतं. या हल्ल्यात एकूण 175 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. 291 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. 
    दिल्लीलादेखील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 29 ऑक्टोबर 2005 मध्ये पहाडगंज, सरोजिनी नगर आणि डीटीसी बसमध्ये सिरिअल ब्लास्ट करण्यात आले. या स्फोटात 50 जण मृत्यूमुखी पडले तर 105 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला तर 156 जण जखमी झाले होते. 
----------------------------------------------------------------------

टर्की : लष्कराचा सत्तापालट करण्याचा डाव उधळला, 200 ठार

  • ऑनलाइन लोकमत
    अंकारा, दि. १६ -  तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तुर्कस्तान येथील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच लष्कराच्या या उठावामुले देशभरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या बंडखोर गटाने उठाव करत सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालटाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हेलिकॉप्टरमधून झालेल्या हल्ल्यात व सरकारशी बांधील सैन्याने केलेल्या विरोधात एकंदर 200 जण ठार झाले आहेत. इस्तंबुल व राजधानी अंकारा शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या फुटीर गटाने काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांस बंदी बनवले आहे. राष्ट्रपती तय्यीप अर्दोजेन यांनी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणास असल्याचे सांगताना, टर्कीमध्ये लष्कराच्या हातात कधीही सत्ता जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकारच सत्तेत राहील याची ग्वाही दिली.
----------------------------------------------------------------------

आत्महत्येचा VIDEO - कमकुवत मनाच्या लोकांनी बघू नये

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १६ - पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकात एका तरूणाने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. १० जुलै रोजी ही दुर्दैवी घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. 
    मिळालेल्या माहितीनुसार, भाईनंदर स्टेशन मधील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर संध्याकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. या इसमाचे वय ३२ ते ३५ च्या दरम्यान असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली. 
    इतर सर्व प्रवाशांप्रमाणे हा इसम भाईंदर स्थानकात लोकलची वाट पाहत उभा होता. आत्महत्या करण्यापूर्वी काही काळ आधी तो कानाला हेडफोन लावून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मात्र इतक्यात समोरून लोकल आली आणि त्या तरूणाने रुळांवर उडी मारत लोकल समोर झोकून देत आत्महत्या केली. 
----------------------------------------------------------------------
'काश्‍मीर स्वतःचाच नाश ओढवून घेत आहे'

श्रीनगर - जेव्हा एखादे राज्यच आपल्या लोकांना मारत असेल, त्यांना विकलांग बनवू पाहत असेल तर असे राज्य स्वतःहून आपला नाश ओढवून घेत असते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया काश्‍मीरमधील शालेय शिक्षण संचालक डॉ.शाह फजल यांनी व्यक्त केली.

फजल हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2009 च्या परीक्षेत पहिले आले आहेत. नागरी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारे राज्यातील ते पहिले तरुण ठरले आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा नेता बुऱ्हाण वणी हा लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर काश्‍मीरमध्ये हिंसाचार उसळला आहे. अनेक जण यात बळी पडले असून शेकडो जण जखमी झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून तेथे संचारबंदी आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या फजलने प्रसारमाध्यमांवरही टीका केली. काही वृत्तवाहिन्यांनी वणी व फजल यांची छायाचित्रे एकत्र दाखवून त्यांच्यात तुलना केली आहे. यामुळे फजलने नाराजी व्यक्त केली. हिंसेचे, क्रौर्याचे बनावट चित्रण दाखवून वाहिन्यांची लोकप्रियता वाढविण्याचे काम राष्ट्रीय पातळीवरील काही माध्यमे करीत असल्याची टीका त्यांनी फेसबुकवर केली आहे. मात्र यामुळे नागरिकांमध्ये दुफळी माजत असून द्वेषाचे वातावरण निर्माण होते, असे ते म्हणाले. केवळ "टीआरपी‘साठी जे लोक काश्‍मीर खोरे धगधगते ठेवू पाहत आहे, त्यांच्यापासून आपण जपून राहायला हवे, असेही ते म्हणाले.
----------------------------------------------------------------------
'यूएएन'शिवाय मिळणार आता 'ईपीएफ'ची रक्कम

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 1 जानेवारी 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ खात्यातील रक्कम काढून घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (यूएएन) अनिवार्यतेची अट मागे घेतली आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ईपीएफची रक्कम मिळविण्यासाठी अर्जावर यूएएनचा पर्याय अनिवार्य करण्यात आला होता. यूएएन क्रमांक न मिळालेल्या सदस्यांना ईपीएफ रक्कम मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अट शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती ईपीएफओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जानेवारी ते जून 2014 दरम्यान ईपीएफओचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी यूएएन क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले होते. आतादेखील हा नियम तसाच आहे परंतु जानेवारी 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या म्हणजेच ईपीएफओचे सदस्यत्व रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.

No comments: