[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; महिलेचं नाव ISIS, फेसबुक म्हणतं ओळख पुरावा द्या
२- ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू
३- शारजाह; दुबईत भरले मराठी बांधवांचे स्नेहसंमेलन
४- ढाक्यात दहशतवाद्यांकडून 20 जणांची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आधार कार्डच्या टॅगलाइनमध्ये बदल, 'आम आदमी' शब्द हटवला
६- शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर टॅक्स लागणार?
७- कोर्टाचा आदेश- “घरी परतल्यानंतर पत्नीला रोज विचारायचं- कैसी हो डार्लिंग?”
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबईत कोसळधार! रेल्वे वाहतूक कोलमडली
९- येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
१०- पटना; कन्हैयाच्या स्पर्शानंतर पुतळ्याचे शुद्धीकरण
११- आगरतळा; महामार्ग खराब झाल्याने त्रिपुरात इंधन टंचाई
१२- बिहार: मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- डोंबिवली; सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी
१४- लातूर-धवेली बस सेवा अखेर सुरु
१५- महाबळेश्वरमध्ये दोन एसटींची धडक, 42 जखमी
१६- हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीवर बलात्कार, संचालकासह दोघे अटकेत
१७- यवतमाळ; विजय दर्डांच्या घराबाहेर राडा, सचिवाच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या
१८- सातारा; बारावी पास, 18 हजार पगार, 3 वर्षात 16 कोटी, ठक तरुणीचा पर्दाफाश
१९- करमाळा तालुक्यात अपघातात 7 वारकरी ठार
२०- चेन्नई; स्वातीच्या हल्लेखोराने केला आत्महत्येचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- मुरलीधरनने ग्लासवरील कॉईन अलगद टिपला - पहा व्हिडीओ
२२- सुलतान'साठी नवरी नटली
२३- सुहानाच्या बिकिनी फोटोबाबत शाहरुख म्हणतो..
२४- सैफ-करिनाच्या घरी येणार नवा पाहुणा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=========================================

मुंबईत कोसळधार! रेल्वे वाहतूक कोलमडली
मुंबई : मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानंतर अनेक उपनगरात अद्यापही अखंडपणे पाऊस बरसतो आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग कमालीचा मंदावला आहे.
घाटकोपरहून बीकेसीला जाणारा मार्ग, पवई, सायन, मांटुग्यात वाहतुकीचा परिणाम ठळकपणे जाणवतो आहे. त्यासोबत लोकलचाही वेग मंदावला असून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे.
हिंदमाता आणि घाटकोपरमध्येही जोरदार पावसामुळं पाणी साचलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेचा दावा यावर्षीही फोल ठरला आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं मुंबईकरांना चांगलीच कसरत करावी लागते आहे.
=========================================
येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
मुंबई: येत्या 48 तासात मुंबईसह कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
नैऋत्य मोसमी वारे उत्तरेकडे सरकत असून येत्या 48 तासात देशात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.
सध्या वायव्य बंगालच्या उपसागरातील ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम बंगालच्या उपसागराकडे सरकले आहे. तसेच उत्तरे लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावर कमी दबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी सुरु आहे.
येत्या 48 तासात अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले असले, तरी कोकण आणि गोव्यात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
=========================================
आधार कार्डच्या टॅगलाइनमध्ये बदल, 'आम आदमी' शब्द हटवला
मुंबई: आधार कार्डावरील टॅगलाइन ‘आम आदमी का अधिकार’ हा शब्द हटवण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय भाजपच्या काही नेत्यांच्या आग्रहावरून घेतल्याचे समजते. त्यामुळे आता आधार कार्डवर ‘मेरा आधार, मेरी पहचान’ अशी नवी टॅगलाइन असेल. दिल्ली आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर आधार कार्डवरील टॅगलाइन बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता.
दिल्ली भाजप अध्यक्ष अश्विनी उपाध्याय यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून ही टॅगलाइन बदलण्याची मागणी केली होती. या पत्रामध्ये त्यांनी आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयाचा आधिकार असून त्याद्वारे जात, धर्म, पंथाचे उदात्तीकरण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २८ जून रोजी उपाध्याय यांना पत्रद्वारे नाव बदलण्या संदर्भाची माहिती दिली.
दरम्यान, बायूनिक आयडेंटिफिकेशन अथॅरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने यासंबंधित अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जुनी टॅगलाइन हटवून ‘मेरा आधार, मेरी पहचान’ अशी नवी टॅगलाइन अपडेट करण्यात आली आहे.
=========================================
सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी हद्दीत फेज २ मध्ये असलेल्या प्रोबेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या रिऍक्टरच्या शक्तिशाली स्फोटात ही कंपनी नेस्तनाबूत झाली. या घटनेनंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एमआयडीसी प्रशासनाने सरकारी मालकी असलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अवैध इमारतींतील घरे खरेदी करण्यास मज्जाव केला असून तसे जाहीर फलक संबंधित इमारतीजवळ लावण्यात आले. मात्र, मुजोर बिल्डरांनी इमारतीजवळ लावलेले जाहीर फलक 24 तासाच्या आत काढून फेकून दिले आहेत.
प्रोबेस कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात या कंपनीच्या परिघातील पाच कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तर आसपासच्या ६५ वाणिज्य (दुकानी गाळे) आणि २ हजार ७६३ निवासी घरांचे लहान-मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील काही इमारती एमआयडीसी आणि निवासी विभागाला लागून आहेत, शिवाय एमआयडीसीची मालकी असलेल्या भूखंडावर देखील सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिक भूमाफियांनी बहुमजली इमारती उभारल्या आहेत.
स्फोटामुळे झालेल्या वैध-अवैध इमारतींतील रहिवाश्यांचे नुकसान पाहता याच पट्टयात उभारण्यात आलेल्या अवैध इमारतीत राहणारे किंवा राहण्यास येणाऱ्या नागरिकांना एमआयडीसीने खबरदार केले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच ठिकाणी अनधिकृत इमारतीचे फलक लावले आहेत.

शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर टॅक्स लागणार?
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर कर आकारणीला सुरुवात करण्याचा प्रस्ताव आयकर विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राजस्व ज्ञान संगम या आयकर अधिकाऱ्यांच्या विशेष परिषदेत हा प्रस्ताव पुढे आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
देशातील करदात्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शेतीउत्पन्न असल्याचं दाखवून कर चुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ही सूचना उपयुक्त असल्याचा दावाही काही अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र देशाच्या घटनेनुसारच शेती उत्पन्नाला करमुक्त ठेवण्यात आलं आहे. शेतकरी उत्पन्नावर कर आकारणीला सुरुवात करायची असेल तर मोदी सरकारला त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.
आयकर अधिकाऱ्यांनी शेती उत्पन्नावरील कर आकारणी सरसकट करण्याऐवजी अंशतः करण्याची शिफारस केलीय. ज्या नागरिकांना शेती उत्पन्नाशिवाय अन्य मार्गानेही उत्पन्न मिळतं, तेवढंच उत्पन्न करपात्र करण्याचा हा प्रस्ताव आहे. सध्या अनेक बिगर शेतकरीही केवळ सात-बारा उताऱ्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन करचुकवेगिरी करतात, त्यांना चाप लावण्यासाठी ही शिफारस असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
=========================================
सरकारी भूखंडावरील इमारतीत घरे खरेदी करण्यास मज्जाव, मात्र बिल्डरांची मुजोरी
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी हद्दीत फेज २ मध्ये असलेल्या प्रोबेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या रिऍक्टरच्या शक्तिशाली स्फोटात ही कंपनी नेस्तनाबूत झाली. या घटनेनंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एमआयडीसी प्रशासनाने सरकारी मालकी असलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अवैध इमारतींतील घरे खरेदी करण्यास मज्जाव केला असून तसे जाहीर फलक संबंधित इमारतीजवळ लावण्यात आले. मात्र, मुजोर बिल्डरांनी इमारतीजवळ लावलेले जाहीर फलक 24 तासाच्या आत काढून फेकून दिले आहेत.
प्रोबेस कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात या कंपनीच्या परिघातील पाच कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तर आसपासच्या ६५ वाणिज्य (दुकानी गाळे) आणि २ हजार ७६३ निवासी घरांचे लहान-मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील काही इमारती एमआयडीसी आणि निवासी विभागाला लागून आहेत, शिवाय एमआयडीसीची मालकी असलेल्या भूखंडावर देखील सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिक भूमाफियांनी बहुमजली इमारती उभारल्या आहेत.
स्फोटामुळे झालेल्या वैध-अवैध इमारतींतील रहिवाश्यांचे नुकसान पाहता याच पट्टयात उभारण्यात आलेल्या अवैध इमारतीत राहणारे किंवा राहण्यास येणाऱ्या नागरिकांना एमआयडीसीने खबरदार केले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच ठिकाणी अनधिकृत इमारतीचे फलक लावले आहेत.
स्फोटामुळे झालेल्या वैध-अवैध इमारतींतील रहिवाश्यांचे नुकसान पाहता याच पट्टयात उभारण्यात आलेल्या अवैध इमारतीत राहणारे किंवा राहण्यास येणाऱ्या नागरिकांना एमआयडीसीने खबरदार केले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच ठिकाणी अनधिकृत इमारतीचे फलक लावले आहेत.
=========================================
लातूर-धवेली बस सेवा अखेर सुरु
लातूर : लातूरमधील धवेली, आनंदवाडी आणि कवठाळी गावात खराब रस्त्यामुळे बस येत नव्हती. त्यामुळे जाणवळला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुटली होती. ‘एबीपी माझा’नं ही बातमी दाखवल्यानंतर आजपासून रोज शाळेच्या वेळेनुसार बस सोडण्यात येत आहे.
गावातला रस्ता खराब असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वेळोवेळी केली. विद्यार्थ्यांनी तर चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सूटत असल्याची कैफियत मांडली होती. विद्यार्थ्यांची ही समस्या जगासमोर मांडली आणि अवघ्या दोनच दिवसात प्रशासनाला बस सुरू करण्यास भाग पाडलं. बस सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी आभार मानले.
=========================================
महाबळेश्वरमध्ये दोन एसटींची धडक, 42 जखमी
सातारा : महाबळेश्वरजवळ दोन एसटी बसची समोरा-समोर धडक झाली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. महाबळेश्वर – पाचगणी रोडवर हा अपघात झाला.
जखमींना महाबळेश्वर ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. सर्व जखमीवर ग्रामीण आणि जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच हा अपघात झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
=========================================
हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीवर बलात्कार, संचालकासह दोघे अटकेत
हिंगोली : गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना हिंगोलीत घडली आहे. शहरातील विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थिनीवर केंद्र संचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
आरोपींनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर हे फोटो सोशल साईट्सवर टाकू, अशी धमकी देत तिच्यावर 3 महिने सतत बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडित विद्यार्थिनीने हिंगोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर केंद्र संचालक शेख अफजल महेबूब, प्रशिक्षक मीर अश्फाक मीर आणि वैजनाथ गायकवाड या तिघांना अटक करण्यात आली आहे.
=========================================
कोर्टाचा आदेश- “घरी परतल्यानंतर पत्नीला रोज विचारायचं- कैसी हो डार्लिंग?”
भोपाळ (मध्यप्रदेश) : पती-पत्नीला वेगळे होण्यापासून वाचवण्यासाठी मध्य प्रदेशातील कोर्टाने अनोखी शक्कल लढवली आहे. रोज घरी परतल्यानंतर आपल्या पत्नीला ‘कैसी हो डार्लिंग’ असे म्हणण्याचा आदेश कोर्टाने दारुड्या पतीला दिला आहे.
खरगोन भागातील 23 वर्षीय हेमलता 2013 साली 25 वर्षीय अभिषेकसोबत विवाहबंधनात अडकली. सहा-सात महिन्यांनंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली.
पत्नी हेमलाताचा आरोप आहे की, “अभिषेक रोज दारु पिऊन घरी परततो आणि मारझोडही करतो. यामध्ये सासूही अभिषेकला मदत करते. त्यामुळेच मला या सर्व प्रकारामुळेच सासर सोडून माहेरी यावं लागलं.”
पती अभिषेकने हेमलतावर आरोप केला आहे की, “हेमलात लहान-सहान गोष्टींरुन भांडण करायला सुरुवात करते. त्यामुळे घरातील वातावरण खराब होतं.”
यादरम्यान, अभिषेकने खरगोन आणि धार कोर्टात हेमलताशी घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांचंही काऊन्सिलिंग केलं आणि दोघांचीही समजूत काढली.
त्यानंतर कोर्टाने अभिषेकला आदेश दिले आहेत की, घरी परतल्यानंतर रोज आपल्या पत्नीला म्हणजेच हेमलताला “कैसी हो डार्लिंग” असे म्हणावं लागेल. यामुळे पती-पत्नीमधील नातं आणखी घट्ट होईल, असा कोर्टाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे कोर्टाच्या या आदेशाचं पालन करण्यास अभिषेकने सहमती दर्शवली आहे आणि दोघेही पती-पत्नी आता एकत्र नांदण्यास तयार झाले आहेत.
=========================================
मुरलीधरनने ग्लासवरील कॉईन अलगद टिपला
मुंबई: श्रीलंकेचा जादुई फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा स्पिनर ग्रॅमी स्वॉन या माजी क्रिकेटपटूंमध्ये एक स्पर्धा रंगली होती.
एरव्ही फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या या दोन फिरकीपटूंना यावेळी त्यापेक्षा अवघड चॅलेंज होतं.
यावेळी त्यांना दांडी उडवायची नव्हती तर स्टम्पवर ठेवलेल्या ग्लासवरील कॉईन गोलंदाजीने अलगद उडवायची होती.
मुरलीधरन की स्वॉन कोण कॉईन उडवणार, याबाबत उपस्थितांना उत्सुकता निर्माण झाली.
दोघांनी आपले प्रयत्न सुरु केले. या दरम्यान स्वॉनने टाकलेला चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला, मात्र तो कॉईन टिपू शकला नाही.
मात्र जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या मुरलीधरननेच हा कॉईन अलगद टिपला. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वी यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत 13 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.
=========================================
विजय दर्डांच्या घराबाहेर राडा, सचिवाच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या
यवतमाळ : यवतमाळमध्ये काँग्रसे नेते विजय दर्डा यांच्या घरावर संतप्त नागरिकांनी हल्लाबोल केला. विजय दर्डा अध्यक्ष असलेल्या जवारलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी यवतमाळमधील पालक आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी दर्डांविरोधात घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर तोडफोडही केली.
संतप्त महिला पालकांनी किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत. याप्रकरणी विजय दर्डा यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
=========================================
सुलतान'साठी नवरी नटली
मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या आगामी सुलतान या चित्रपटातील नववधूचा लूक नुकताच रिलीज झाला. सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील सच्ची-मुच्ची या गीतात अनुष्का या नव्या लूकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 जुलै रोजी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
अनुष्का या गाण्यात हरयाणी पेहरावातील नववधूच्या रुपात दिसते आहे. अनुष्काने या गाण्यासाठी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये सुंदर नक्षी रेखाटण्यात आली असून त्यात कुंदन, गोट आदींचा वापर करण्यात आला आहे.
ती या चित्रपटासाठी खुपच ऐक्सायटेड असून, ती पहिल्यांदाच महिला पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिचे नाव आरफा, असल्याचे तिने सांगितले. या गाण्यासाठी दिवानी कलेक्शनच्या टीमने हा लग्नातील ड्रेस बनवला असल्याचेही तिने सांगितले.
=========================================
बारावी पास, 18 हजार पगार, 3 वर्षात 16 कोटी, ठक तरुणीचा पर्दाफाश
सातारा : एक तरुणी, बारावी पास, महिना 18 हजार रुपये पगार आणि तीन वर्षांत 16 कोटींची कमाई. तिच्याकडे गाडीपासून बंगल्यापर्यंत सगळं आहे. हे वाचून विचार येईल की, केवळ 18 हजार रुपये पगार असूनही 3 वर्षांत कोणीही 16 कोटी कसे काय कमावू शकतं?
पण या तरुणीने हे 16 कोटी रुपये मेहनतीने नाही तर अफरातफर करुन मिळवली आहे. वृषाली बामने असं या ठक तरुणीचं नाव आहे. वृषाली एका कंपनीत असिस्टंट अकाऊंटण्ट म्हणून काम करत होती. मात्र तिने केलेली अफरातफर समोर आल्यानंतर कंपनीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.
वृषाली बामनेची संपत्ती
साताराच्या कराडमध्ये 3 मजली बंगला, टेरेसवर स्विमिंग पूल – किंमत 5 कोटी
मुंबईजवळच्या डोंबिवलीमध्ये 2 ते 2.50 कोटींचे 5 फ्लॅट
22 लाखांची ह्युंदाई एलेंत्रा
14.85 लाखांची इनोव्हा
8 लाखांची मारुती स्विफ्ट
16.55 लाख महिंद्रा एक्सयूव्ही
22 लाखांची रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड
2.13 लाखांची होंडा सीबीआर बाईक
सुमारे 18.23 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळं आणि रोकड
=========================================

सुहानाच्या बिकिनी फोटोबाबत शाहरुख म्हणतो..
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने अखेर मुलगी सुहानाच्या बिकिनीवरील फोटोबाबत मौन सोडलं आहे. त्याने असं काही उत्तर दिलं की, सर्वांचं तोंड बंद झालं.
काही दिवसांपूर्वी बिकिनीवरील सुहानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुहानासोबत तिचा लहान भाऊ अबरामही होता. बिकिनीवरील सुहानाचा हा फोटो चर्चेचा विषय बनला होता.
नुकतंच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की, “सुहाना बीचवर तिच्या भावासोबत बिकीनीवर होती. पण मीडियासाठी मुलीचा बिकिनीवरील फोटो हेडलाईनचा विषय बनला. हे वाईट नाही का? माझी मुलगी 16 वर्षांची आहे आणि या चर्चेमुळे तिला अतिशय ऑकवर्ड वाटत आहे. माझ्या स्टारडममुळे ही छोटी गोष्ट मोठी बनली. या ठिकाणी जर कोणाचा न्यूड फोटो असता तर काहीही फरक पडला नसता. पण ती माझी मुलगी असल्याने; एवढी निगेटिव्ह चर्चा झाली.”
शाहरुखचं हे उत्तर अनेकांच्या तोंडाला कुलुप लावणारं आहे. कारण शाहरुखची सुहाना, अबराम किंवा आर्यन ही तिन्ही मुलं बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अशावेळी छोट्या छोट्या गोष्टीही फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे या गोष्टींची थट्टा होणं किंवा निगेटिव्ह चर्चा होणं चुकीचं असल्याचं शाहरुखचं मत आहे.
=========================================
महिलेचं नाव ISIS, फेसबुक म्हणतं ओळख पुरावा द्या
- ऑनलाइन लोकमत -लंडन, दि. 02 - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसीस) ही दहशतवादी संघटना जगभरात आपलं जाळ पसरत आहे. आणि यासाठी सोशल मिडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. त्यांना रोखणं हेच आव्हान सोशल मिडियासमोर आहे, त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. मात्र याचा कधीतरी वेगळाच परिणाम होता ज्याचा अनावधनाने एखाद्या व्यक्तीला फटका बसू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेचं नाव ISIS असल्याने फेसबुकने महिलेकडे ओळख पुरावा मागितला.इसीस थॉमस असं नाव असणारी ही महिला ब्रिटनच्या ब्रिस्टोलची रहिवासी आहे. 27 जूनला महिलेने फेसबूकवर लॉग इन केले असतना तिला नाव बदलण्यास सांगण्यात आलं. काहीच कल्पना नसलेल्या या महिलेला आपल्या आडनावामुळे लॉग इनमध्ये समस्या येत असल्याचा समज झाला.'मी याअगोदर इसीस वोरकास्टर ( Isis Worcester) या नावाने फेसबुक अकाऊंट वापरत होते. इसीस थॉमस (Isis Thomas) माझं खरं नाव असून काम करत असलेल्या ठिकाणी काही अडचणी असल्याने मी हे आडनाव वापरत नव्हते. त्यामुळे मी आडनाव बदलल, पण त्यानंतरही समस्या सुटली नाही तेव्हा माझ्या नावामुळे ही समस्या येत असल्याचं माझ्या लक्षात आलं', अशी माहिती महिलेने दिली आहे.ISIS हे चालणार नाही किंवा हे आमच्या नियमांत बसत नाही असा संदेश फेसबूकने पाठवला. त्यानंतर महिलेला ओळख पुरावादेखील मागण्यात आला. महिलेने पुरावा पाठवला आहे, पण यामध्ये खुप वेळ लागण्याची शक्यता आहे असं महिलेने सांगितलं आहे.
=========================================
ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमत -ढाका, दि. 02 - बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तारुषी जैन (19) या भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये तारुषी जैनदेखील होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन तारुषी जैनची हत्या झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून दुख: व्यक्त केलं आहे. तारुषीचे वडिल संजीव जैन यांच्याशी मी बातचीत केली असून देश त्यांच्यासोबत असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे.तारुषी जैन 19 वर्षांची होती. ढाकामधील अमेरिकन स्कूलमधून तिने शिक्षण पुर्ण केलं होतं. शुक्रवारी रात्री ढाका येथील गुलशन परिसरातील रेस्टॉरंटवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 13 ओलिसांचादेखील समावेश आहे. मृतांमध्ये इटलीचे 8 नागरिक, जापानी, उत्तर कोरिया, एक भारतीय आणि काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
=========================================
दुबईत भरले मराठी बांधवांचे स्नेहसंमेलन
| |
-
| |
शारजहा - भारतातील मराठी माणसाचा झेंडा अटकेपार नेणाऱ्या आखाती देशातील मराठी बांधवांचे नुकतेच कौटुंबिक स्नेहसंमेलन शारजहा येथे मरबेला रिसॉर्टमध्ये पार पडले. अखिल आमिराती मराठी इंडियन्स (‘AAMI‘) या संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले.

दोन महिन्यांपूर्वीच स्थापन झालेल्या एएएमआय या संस्थेचे पाचशे सभासद झाले आहेत. या संस्थेचे पहिले स्नेहसंमेलन जून महिन्यात संपन्न झाले. आखातातील वाळवंटात मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे काम एएएमआय या संस्थेने हाती घेतले. या संस्थेचे पदाधिकारी संतोष कारंडे, नितीन साडेकर, वैभव किरपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी कुटुंबातील थोऱ्या-मोठ्यांना स्वत:ची कला सादर करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची माहिती स्वत: सैफने दिली आहे.
सैफ-करिनाच्या घरी येणार नवा पाहुणा!
| |
-
| |
गेल्या काही महिन्यांपासून करिना गर्भवती असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. ती अफवा असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र आज (शनिवार) खुद्द सैफनेच त्याबाबत माहिती दिली. तो म्हणाला, "माझ्या पत्नीला आणि मला हे जाहिर करताना आनंद होत आहे की येत्या डिसेंबर महिन्यात आम्हाला पहिले अपत्य होणार आहे. चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या शुभेच्छांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.‘
करिनाचे हे पहिले आणि सैफ अली खानचे हे तिसरे अपत्य असणार आहे. सैफ व त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांना इब्राहिम आणि सारा ही दोन मुले आहेत. करिनाने ‘उडता पंजाब‘ या चित्रपटात भूमिका केली आहे. तिचा सोनम कपूरसोबत ‘वीरा दी वेडींग‘ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
=========================================
कन्हैयाच्या स्पर्शानंतर पुतळ्याचे शुद्धीकरण
| |
-
| |
पाटणा - बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी दिनकर यांच्या पुतळा गंगाजलाने धुवून घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे शुद्धीकरण केले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने गुरुवारी (ता.30) दिनकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुष्पांजली वाहिली होती. त्याच्या निषेधार्थ "अभाविप‘ व बजरंग दलाने शुक्रवारी (ता.1) पुतळा गंगाजलाने धुतला. तसेच कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या सभेत कन्हैयाने भाषण केले होतो. ही सभा ज्या मैदानावर झाली तेथे हवन पूजा करून कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडले. कन्हैयावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला असल्याने त्याच्या उपस्थितीमुळे मैदान अपवित्र झाले आहे.

दरम्यान, बेगुसराईतील बिहाट हे कन्हैयाचे मूळ गाव आहे. "जेएनयू‘तील राष्ट्रविरोधी घोषणेच्या घटनेनंतर कन्हैयावर राजद्रोहाचा खटला दाखल होऊन त्याला अटक झाली होती. जामिनावर त्याची सुटका झाल्यानंतर तो प्रथमच आपल्या घरी आला होता. त्यामुळे संपूर्ण गावात उत्सवी वातावरण होते. कन्हैया घरी आल्याने आईवडील, कुटुंबातील अन्य सदस्य, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ आनंदात होते.
=========================================
आगरताळा (त्रिपुरा) - आसाम-त्रिपुरा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 खराब झाल्याने आसाममधून त्रिपुरा येथे टॅंकरद्वारे होणारा इंधनपुरवठा थांबला आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
आसाममधून त्रिपुरा येथे टॅंकरने इंधनपुरवठा करण्यात येतो. त्रिपुरा येथील बहुतेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपले आहे. तर ज्या पंपांवर इंधन शिल्लक आहे, अशा पंपांवर वाहनांची लांब रांग लागली आहे. "गेल्या महिनाभरापासून ही टंचाई जाणवत आहे. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे इंधनपुरवठा करणारे टॅंकर पोचू शकत नसल्याचे ही टंचाई जाणवत आहे. नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आम्ही कार्यालयात वेळेत पोचू शकत नाहीत. सगळीकडे हीच समस्या जाणवत आहे‘, अशी माहिती जितेंद्र नाथ नावाच्या एका नोकरदाराने दिली. तर अन्य एका नागरिकाने इंधनासह स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आणि अन्य काही जीवनावश्यक बाबींचीही टंचाई जाणवत असल्याची माहिती दिली.
महामार्ग खराब झाल्याने त्रिपुरात इंधन टंचाई

ढाक्यात दहशतवाद्यांकडून 20 जणांची हत्या
| |
-
| |
ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका शहरातील गुलशन परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये बंदुकधारी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्यांपैकी 20 जणांची धारदार शस्त्राने हत्या केली. तर, 13 जणांची सुखरुप सुटका करण्यात यश आल्याचे, लष्कराचे प्रमुख नईम असराफ चौधरी यांनी सांगितले. जवानांच्या कारवाईत 6 दहशतवादी ठार झाले आहेत व एक दहशतवाद्यांला पकडण्यात यश आले आहे.
ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकांसह 33 जणांना ओलिस ठेवले होते. यात एका भारतीय नागरिकासह जपान, अर्जेंटिना, इटली, श्रीलंका या देशांतील नागरिकांचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्यांपैकी 20 जणांची शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली आहे. इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांकडून हा हल्ला घडविण्यात आला आहे.
=========================================
करमाळा तालुक्यात अपघातात 7 वारकरी ठार
| |
-
| |
सोलापूर - जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ शेलगाव फाट्याजवळ आज (शनिवार) सकाळी ट्रकने वारकऱ्यांना घेऊन जात असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी नगरहून पंढरपूरकडे टेम्पोने जात असताना हा अपघात घडला. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याने टेम्पोला धडक दिली. यावेळी सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. जखमींना जेऊरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.
=========================================
बिहार: मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी
| |
-
| |
सीवान (बिहार) - येथील एका मंदिरातून आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे.
येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची चोरी केली. चोरी झाली त्यावेळी मंदिरात पुजारी उपस्थित नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज (शनिवार) सकाळी ज्यावेळी पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात आले, त्यावेळी ही चोरी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
=========================================
स्वातीच्या हल्लेखोराने केला आत्महत्येचा प्रयत्न
| |
-
| |
चेन्नई - इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या स्वाती (वय 24) हिची चेन्नई रेल्वे स्थानकावर हत्या करणाऱ्यापर्यंत पोलिसांना पोहचण्यात यश आले. पण, या हल्लेखोराने स्वतःच्या गळ्यावरच चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला.
इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या स्वातीची रेल्वे स्थानकावर अनेक वार करून हत्या करण्यात आली होती. या वेळी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असूनही कोणीही हल्लेखोराला कोणी अडविले नव्हते. स्वातीच्या हल्लेखोरांना दोन दिवसांत पकडण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. पोलिसांनी या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते. अखेर तमिळनाडूतील तिरुनेलवल्ली येथून हल्लेखोर राम कुमार याला अटक करण्यासाठी गेले असताना पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीत त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून घेतला. तो जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कुमार हा स्वातीच्या घराजवळच राहत होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. पण, स्वातीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्याने तिची हत्या केली. स्वाती बराचवेळ रेल्वे स्थानकावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. माझ्या मुलीच्या हत्येचे मूक साक्षीदार असलेल्या नागरिकांनी आम्हाला निराश केले. त्यांनी हस्तक्षेप केला असता, तर आमची मुलगी आम्हाला परत मिळाली असती, अशी कैफियत तिच्या वडिलांनी मांडली होती.
=========================================

No comments:
Post a Comment