Saturday, 23 July 2016

नमस्कार लाईव्ह २३-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- कबालीचा भारतासह परदेशातही धुमाकूळ, पहिल्या दिवशीच सर्व रेकॉर्ड मोडीत 
२- अखेर सर्वांचं आवडतं किकॅस टोरंट बंद 
३- जर्मनीः मॉलमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबर, 10 जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाचं हॉलतिकीट 
५- जर्मनीतील सर्व भारतीय सुखरूप - परराष्ट्र मंत्रालय 
६- चुकीचं राष्ट्रगीत गायल्याद्दल सनी लिओनी विरोधात तक्रार! 
७- भारतीय वायू दलाच्या बेपत्ता विमानासाठी शोधमोहिम कायम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- कोपर्डीला चाललेल्या रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी परत बोलावलं 
९- लोकमान्यांच्या स्मृतिस्थळांकडे दुर्लक्ष, सरदार गृहाची पुरती दुरवस्था 
१०- भारतीय नौदलाची 6 दशकं सेवा, 'आयएनएस विराट' अखेरच्या प्रवासाला 
११- महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटी, गडकरींची घोषणा 
१२- विधान परिषदेत राणेंना सभापतीने सुनावले 
१३- डीसीसी बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांना ६ आॅगस्टपर्यंत दिलासा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची गोची, चार वर्षांची कुंडली जनतेसमोर 
१५- डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटाचा उलगडा 
१६- नागपूर; जिवंत राहायचं असेल, तर तक्रार मागे घे, बलात्कार पीडितेला भर बाजारात गुंडांची धमकी 
१७- तेल्हारा; कपडे धुण्याच्या मोगरीने केली पतीची धुलाई 
१८- बीड; महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी तिघाजणांना जन्मठेपेची शिक्षा 
१९- 'इसिस'च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ठाण्यातून एका तरूणाला अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- 'विराट' विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलंवहिलं द्विशतक 
२१- कपिल शर्माच्या शो मध्ये 'बुआ'ची पुन्हा एंट्री! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

==========================================

कोपर्डीला चाललेल्या रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी परत बोलावलं!

कोपर्डीला चाललेल्या रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी परत बोलावलं!
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे रामदास आठवलेंना आपला कोपर्डी दौरा रद्द करावा लागला आहे. कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी आठवले आज मुंबई विमानतळावर पोहोचलेही होते.

विमानतळावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांचा रामदास आठवलेंना फोन आला. कोपर्डीतल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही कोपर्डीला जाऊ नका  अशी सूचना त्यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे आठवलेंना विमानतळावरून परतावं लागल्याचं समजतं आहे.

कोपर्डीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केल्याचं आठवलेंच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे.
==========================================

'विराट' विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलंवहिलं द्विशतक

'विराट' विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलंवहिलं द्विशतक!
अँटिगा: अँटिगा कसोटीवर टीम इंडियानं आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. तर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजला एक बाद 31 धावांची मजल मारता आली आहे.

भारतीय क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीनं रचला नवा विक्रम. परदेशात द्विशतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या रथीमहारथी कर्णधारांनाही आजवर अशी कामगिरी करता आलेली नाही. पण विराटनं अँटिगा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

विराटनं 283 चेंडूंत 200 धावांची खेळी 24 चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच द्विशतक ठरलं.

कोहलीच्या या विराट खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे कोहलीनं द्विशतक ठोकलं, तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसला.
==========================================

लोकमान्यांच्या स्मृतिस्थळांकडे दुर्लक्ष, सरदार गृहाची पुरती दुरवस्था

लोकमान्यांच्या स्मृतिस्थळांकडे दुर्लक्ष, सरदार गृहाची पुरती दुरवस्था
मुंबई: ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज 160वी जयंती आहे. टिळकांनी दिलेल्या सिंहगर्जनेलाही यावर्षी म्हणजे २०१६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. लोकमान्यांच्या या घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचेतना दिली. मात्र, लोकमान्य टिळकांनी वास्तव्य केलेल्या स्मृतिस्थळांची अवस्था फारच बिकट झाली आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिस्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या स्मृतिस्थळांचा होणारा ऱ्हास, राज्य आणि केंद्र सरकारने थांबवावा. यासाठी ओआरएफचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींना या संदर्भात पत्र लिहलं आहे.

लोकमान्यांनी जेथे अखरेचा श्वास घेतला ते मुंबईतील सरदारगृहाची तर आज पुरती दुरवस्था झाली आहे. सरदार गृहाची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. या वास्तूकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्याचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे.

लोकमान्यांनी जेथे अखरेचा श्वास घेतला ते मुंबईतील सरदारगृह, पुण्यातील टिळक स्मारक आणि रत्नागिरीतील लोकमान्या यांचे जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे. त्यांच्या संरक्षण आणि संवंर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. अशीही मागणी करण्यात आली आहे.
==========================================

कबालीचा भारतासह परदेशातही धुमाकूळ, पहिल्या दिवशीच सर्व रेकॉर्ड मोडीत

कबालीचा भारतासह परदेशातही धुमाकूळ, पहिल्या दिवशीच सर्व रेकॉर्ड मोडीत
मुंबईः रजनीकांतच्या ‘कबाली’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कबालीने वर्ल्डवाईड तब्बल 55 कोटींची कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या सिनेमाने एकाच दिवसात तब्बल 12.93 कोटींची कमाई केली आहे.
परदेशात भारतीय सिनेमाने एवढी कमाई करण्याची पहिलीच वेळ आहे. कबालीने या कमाईसह परदेशात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘कबाली’ भारतातील 12 हजार स्क्रिनवर रिलीज झाला आहे. शिवाय मलेशिया, सिंगापूर, अमेरिका यांसह अनेक देशांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे.
==========================================

अखेर सर्वांचं आवडतं किकॅस टोरंट बंद

अखेर सर्वांचं आवडतं किकॅस टोरंट बंद
नवी दिल्लीः जगभरातील चाहत्यांची आवडती साईड किकॅस टोरंटवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने ही कारवाई केली आहे. टोरंटचा सर्वेसर्वा अर्टेम व्हॉलीन याला पोलंडमधून अटक करण्यात आली असून टोरंटचे सर्व डोमेन्स जप्त केले आहेत.
कॉपी राईट असणारे अनेक गाणी, चित्रपट, अप्लीकेशन्स टोरंटद्वारे नेटीझन्सला वितरीत केले जात होते. यामुळे जवळपास साडे सहा हजार कोटींचं नुकसान झालं असल्याचा दावा, शिकागो येथील जिल्हा न्यायालयात करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली.
व्हॉलीन उर्फ टीर्म याने 2008 साली किकॅस टोरंटची सुरुवात केली, असं बोललं जातं. या माध्यमातून पैशांची मोठी अफरातफर केली जात असे. अनेक सर्व्हरचा किकॅस टोरेंटशी टाएप होता, ज्यामध्ये शिकागो येथील एका सर्व्हरचाही समावेश आहे. या सर्व्हर विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळेच टोरेंटवर बंदी घालण्यात आली.
टोरंट ही जगभरातील प्रसिद्ध वेबसाईटपैकी एक आहे. त्यामुळे हा नेटीझन्ससाठी मोठा झटका मानला जात आहे. गुन्हेगारी तक्रारीनुसार टोरंट ही जगातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या वेबसाईटच्या यादीत 69 व्या स्थानी आहे.
==========================================

हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाचं हॉलतिकीट

हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाचं हॉलतिकीट!
नवी दिल्ली: सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी तयार केलेल्या एका हॉलतिकीटाववर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो सापडला आहे. असा फॉर्म कुणीतरी मुद्दाम भरल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रामपूरमध्ये 15 जुलैला झालेल्या भरती परीक्षेसाठी हे हॉलतिकीट देण्यात आलं होते. या कार्डमध्ये नरेंद्र मोदींच्या नावासह त्यांचा फोटोही छापण्यात आला आहे. तसेच त्यावर आसन क्रमांकही देण्यात आला आहे.

crpf-modi-admit-card-

या कार्डवर नाव आणि फोटो जरी मोदींचा असला तरी जन्मतारीख मात्र, 18 ऑक्टोबर 1992 अशी देण्यात आली आहे. हा फॉर्म भरणारा व्यक्ती पंजाबमधील असून तो अमृतसरजवळील समरई गावचा रहिवासी असल्याचं समजतं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदर व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या फोटोशी खेळ करत हा फॉर्म भरला आहे.

15 जुलै रोजी झालेल्या परीक्षेसाठी या नंबरचा कोणताही उमेदवार आला नव्हता. मोदींच्या नावे फॉर्म भरल्याचे लक्षात येताच सदर हॉलतिकीट रद्दबातल करण्यात आले. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले असून लवकरच सदर इसमाला अटक करण्यात येईल असे स्पष्ट केले.
==========================================

भारतीय नौदलाची 6 दशकं सेवा, 'आयएनएस विराट' अखेरच्या प्रवासाला

भारतीय नौदलाची 6 दशकं सेवा, 'आयएनएस विराट' अखेरच्या प्रवासाला
मुंबईः भारतीय नौदलाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका आपल्या शेवटच्या प्रवासाला निघाली आहे. जवळपास 6 दशकं नौदलाची सेवा केल्यानंतर ही युद्धनौका आज मुंबईहून कोच्चीच्या दिशेने रवाना होईल.
कोच्ची येथे 27 तारखेला पोहचल्यानंतर या युद्धनौकेवरच्या महत्वाच्या तोफा, रडार, इंजिन काढल्या जातील. ‘आयएनएस विराट’च्या सेवानिवृत्तीनंतर या युद्धनौकेचा संग्रहालयात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर संरक्षण खात्याने अजून निर्णय दिलेला नाही.
विराट ही युद्धनौका अगोदर ब्रिटनच्या सेवेत होती. त्यानंतर भारताने ही युद्धनौका विकत घेतली. या नौकेला 1987 साली नौदलाच्या ताफ्यात सहभागी करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाची 6 दशकं सेवा करणारी ही नौका आज अखेरच्या प्रवासाला निघाली आहे.
==========================================

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची गोची, चार वर्षांची कुंडली जनतेसमोर

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची गोची, चार वर्षांची कुंडली जनतेसमोर
पुणेः महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. पुण्यातील एका संस्थेने नगरसेवकांची चार वर्षांची कुंडलीच जनतेसमोर मांडली आहे. यामध्ये नगरसेवकांनी चार वर्षात बाकडी बसवण्यासाठीच जास्त निधी खर्च केला, असं समोर आलं आहे. नगरसेवकांना या प्रगती पुस्तकाला सामोरं जाण्याचं कठीण आव्हान समोर उभं राहिलं आहे.


पुणे महापालिकेत एकूण 152 नगरसेवक आहेत. नगरसेवकांनी मागच्या चार वर्षात काय केलं असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याचं उत्तर आता पुण्यातील परिवर्तन संस्थेने काढलेल्या प्रगतीपुस्तकातून मिळणार आहे. परिवर्तन संस्थेने नुकतंच 152 नगरसेवकांच्या चार वर्षांच्या कामाचा आढावा घेणारं प्रगतीपुस्तक काढलं आहे.
==========================================

महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटी, गडकरींची घोषणा

महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटी, गडकरींची घोषणा
नवी दिल्लीः मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यांचा प्रश्न काल दोन्ही सभागृहात गाजल्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटींचे वार्षिक बजट गडकरी यांनी जाहीर केलं आहे.


महाराष्ट्रात येत्या 5 वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते बांधारणार असल्याचं गडकरींनी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. अमेरिकेतला लॉस एंजिलिस ते सँनफ्रान्सिस्को असा पॅसिफिक सागरी मार्ग कोकणातही तयार व्हावा यासाठी किनारी रस्ता बांधण्याचा निश्चय गडकरी यांनी केला आहे.


गडकरी यांनी यापूर्वीही औरंगाबाद, वर्धा येथील कार्यक्रमात मराठवाडा आणि विदर्भातील रस्त्यांसाठी मोठा निधी जाहीर केला होता. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठीही निधीची घोषणा केली होती. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या या घोषणेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
==========================================

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटाचा उलगडा

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटाचा उलगडा
डोंबिवली (मुंबई) : डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस इंटरप्राइजेस कंपनी स्फोटाचा अखेर उलगडा झाला आहे. कंपनीत साठवून ठेवलेल्या प्रोपाझील क्लोराइड केमिकलमध्ये आग लागल्यामुळे स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

प्रोपोझील क्लोराईड केमिकल हा जवलनशील पदार्थ असल्याने त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरु होतं आणि त्याच ठिकाणी ठिणगी उडून स्फोट झाला, अशी माहिती समोर आली आहे.

==========================================

कपिल शर्माच्या शो मध्ये 'बुआ'ची पुन्हा एंट्री!

कपिल शर्माच्या शो मध्ये 'बुआ'ची पुन्हा एंट्री!
मुंबई: कृष्णा अभिषेकचा शो ‘कॉमेडी नाइट लाइव्ह’ सोडल्यानंतर टीव्ही अभिनेत्री उपासना सिंह भारतात सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत आली आहे.

==========================================

जर्मनीः मॉलमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबर, 10 जणांचा मृत्यू

जर्मनीः मॉलमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबर, 10 जणांचा मृत्यू
म्युनिक(जर्मनी): जर्मनीमधील म्युनिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका मॉलमध्ये शुक्रवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून हल्लेखोरानी स्वतःलाही गोळी मारुन घेतली.


या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा गोळीबार तबब्ल दोन तासाहून जास्त काळ सुरु होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मॉलमधील जमावाला बाहेर काढलं. हल्ल्यामध्ये तीन हल्लेखोर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

==========================================

जिवंत राहायचं असेल, तर तक्रार मागे घे, बलात्कार पीडितेला भर बाजारात गुंडांची धमकी

जिवंत राहायचं असेल, तर तक्रार मागे घे, बलात्कार पीडितेला भर बाजारात गुंडांची धमकी
नागपूर बलात्कार पीडितेला त्वरित न्याय मिळवून देऊ असे दावे बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणानंतर केले जातात. मात्र, प्रत्यक्षात ज्या पोलिस यंत्रणेवर पीडितेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तीच यंत्रणा पीडितेचा छळ करते. नागपूरची अशीच एक निर्भया गेले दोन महीने न्यायासाठी संघर्ष करत आहे. मात्र, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाची हिम्मत एवढी वाढली आहे की काल भर बाजारात त्याने पाठविलेल्या गुंडानी तिच्या कानशिलात बंदूक ठेऊन जिवंत राहायचे असल्यास तक्रार मागे घे अशी धमकी दिली.

पितृछत्र आधीच हरपलेली नागपूरच्या निर्भयावर मित्राकडून अत्याचार झाल्यानंतर ही मनोरुग्ण आई आणि अल्पवयीन भावाची सांभाळ करत न्यायासाठी लढत आहे. मैत्री ठेऊन लग्नाचे आश्वासन देणाऱ्या पराग राऊत नावाच्या युवकाने 28 मे रोजी नशेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एकाएकी संबंध तोडले.

परागचे कुटुंब पीडितेला ओळखत असल्याने तिने नागभीडला त्यांच्या घरी जाऊन सर्व प्रकार सांगितला. मात्र, आमची पूर्ण हयात पोलिस विभागात गेली आहे. तू पोलिसात तक्रार केली तरी आम्ही सर्व सांभाळून घेऊ असा दावा करत पराग कुटुंबीयांनी पीडितेला मारहाण केली. दुर्व्यवहार केला.

==========================================

जर्मनीतील सर्व भारतीय सुखरूप - परराष्ट्र मंत्रालय


  • ऑनलाइन लोकमत
    बर्लिन, दि. २३ - जर्मनीतील म्युनिच शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ९ निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले असून एका हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे समजत आहे. तीनपैकी एका हल्लेखोराने स्वत:वरच गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. 
    दरम्यान जर्मनीतील सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतल्या भारतीय नागरिकांची माहिती जाणून  परराष्ट्र मंत्रालयाने काही हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.
    ते पुढीलप्रमाणे : 0171 2885973, 01512 3595006, 0175 4000667 
    पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
    दरम्यान जर्मनीतील हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. 'जर्मनीतील हल्ल्याबद्दल ऐकून मोठे दु:ख झाले. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी  झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत', अशा शब्दांत ट्विटरवरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
==========================================

चुकीचं राष्ट्रगीत गायल्याद्दल सनी लिओनी विरोधात तक्रार!



  • नवी दिल्ली, दि. २२ :  बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसवलेल्या सनी लिओनींवर राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनीवर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरवारी प्रो-कबड्डी लीग सामन्याच्या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती. तिच्या सोबत पती डेनियल वेबरही उपस्थित होता. 
    प्रो कबड्डीच्या जयपूर पिंक पँथर आणि दबंग दिल्ली या सामन्यादरम्यान सनी उपस्थित होती. गुन्हा दाखल करणाऱ्या उल्लास याच्यामते सनीने राष्ट्रगीत गाताना सिंध ऐवजी सिंधु असा उच्चार केला होता. आणि हा उच्चार चुकिचा आहे. दरम्यान सनीने राष्ट्रगीत झाल्यानंतर ट्विट करत आपल्या भावना मांडल्या होत्या. ट्विट मध्ये ती म्हणाली होती, राष्ट्रगीत गायल्याचा मला गर्व आहे. राष्ट्रगीत गाताना मी थोडीसी नर्वस झाली होती. राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आधी मला सराव करावा लागला होता. 
    तक्रार दाखल करणाऱ्या नुसार, सनी लिओनाने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हटले आहे. राष्ट्रगीत सुरु असताना कॅमेरा इकडे तिकडे जात होता. भारतीय राष्ट्रगीताचा किमान ५२ सेकंदापर्यंत सन्मान केला पाहिजे. 
==========================================

कपडे धुण्याच्या मोगरीने केली पतीची धुलाई


  • ऑनलाइन लोकमत
    तेल्हारा, दि. 22 - आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पत्नीला पतीने मज्जाव करताच पारा चढलेल्या पत्नीने कपडे धुण्याच्या मोगरीने पतीची धुलाई केली तर यात पती जखमी होऊन त्याचा हात मोडल्याची घटना शहरातील उच्चशिक्षित वस्तीत घडली आहे. या भांडखोर पत्नीचा बंदोबस्त करण्याची मागणी शासकीय नोकरीत असणाऱ्या पतीने २० जुलै रोजी तेल्हारा पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.
    तेल्हारा येथील ३५ वर्षीय इसम वीज वितरण कंपनीत तेल्हारा येथेच नोकरीला आहे. त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी व मुलासह आईसुद्धा राहते. ३० जून रोजी सायंकाळी ७ वाजता पती घरी आले असता त्यांची पत्नी त्यांच्या आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होती. तिने स्वत:च्या सासुला घराबाहेर काढून घर आतून बंद करून घेतले होते. पतीने तिला घर उघडण्यासाठी आवाज देताच पारा चढलेली पत्नी आतुन भाजी कापण्याची सुरी घेऊन पतीच्या अंगावर धावून आली. सूरा बाजुला फेकत तीने कपडे धुण्याच्या मोगरी हातात घेतली व पतीची चांगलीच धुलाई केली. यात पतीचा हात फ्रॅक्चर झाला. या विषयीची तक्रार पतीने तेल्हारा पोलिसात २० जुलै रोजी दिली आहे. पत्नीवर गुन्हे दाखल करून तिच्यापासून आपली सुटका करा. तिच्यापासून आपल्या व कुटूंबीयाच्या जीवित्वास धोका असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. सदर प्रकरणाची चौकशी ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ गणपत गवळी व नागोराव भांगे करीत असून सदर प्रकरण महिला विशेष सुरक्षा आकोटकडे पाठविण्यात आले आहे.
==========================================

विधान परिषदेत राणेंना सभापतीने सुनावले


  • राणे, शंका घेवू नका - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
    ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २२ : विधान परिषदेत दाखल झाल्यापासून काँग्रेस सदस्य नारायण राणे विविध नियमांचा आधार घेत सभापती आणि पिठासीन अधिका-यांची शाळा घेत आहेत. अनेकदा सभागृह कोण चालवितो, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण होते. शुक्रवारी मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी नारायण राणेंना संसदीय आयुधाची महत्ता सांगत धडे दिले.
    प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापतींच्या परवानगीने सदस्य औचित्याच्या मुद्याद्वारे विविध विषय मांडत असतात. या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे आणि सरकारने त्यावर आवश्यक कार्यवाही करावी, हा संकेत आहे. सदस्याने औचित्य मांडल्यावर विधिमंडळाच्या परंपरेप्रमाणे परस्पर कृती होत असते. शुक्रवारी मात्र नारायण राणे यांनी सरकारचे लक्ष नसल्याचे सांगत औचित्याच्या मुद्यांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
==========================================

डीसीसी बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांना ६ आॅगस्टपर्यंत दिलासा


  • ऑनलाइन लोकमत
    बीड, दि. 22  -  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी  अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले  यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. तपासी पोलिस अधिकारी रजेवर गेल्याने जामीन अर्जावर अंतिम निर्णय आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे. 
    संत जगमित्र नागा सूतगिरणीच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी त्यांनी प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र अनिकेत निकम यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याने सुनावणी दरम्यान हजर रहावे, असे आदेश दिले होते. अंबाजोगाई येथील अप्पर पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तपासी पोलिस अधिकारी रजेवर असल्याचे पत्र न्यायालयाकडे पाठवले होते. जामीन अर्जाची सुनावणी आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. 
    सारडा, सोळंके, काळे यांनाही दिलासा...
      जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात गुरुवारी आ. अमरसिंह पंडित यांना येथील न्यायालयाने विधीमंडळ अधिवेशन संपेपर्यंत अटक करता येणार नाही, असे आदेश दिले होते. पाठोपाठ शुक्रवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा, माजी संचालक शोभा काळे, धैर्यशिल सोळंके यांनाही दिलासा मिळाला. २ आॅगस्टपर्यंत या तिघांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांनाही न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत.
==========================================

महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी तिघाजणांना जन्मठेपेची शिक्षा


  • ऑनलाइन लोकमत
    बीड, दि. 20 - जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी चाळीस वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन जिवंत जाळल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायधीश एस. व्ही. हंडे यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची ( अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांंचा दंड ठोठावला. 
        केज तालुक्यातील उमरी येथील वर्षा गिणा मुळे (वय ४० वर्षे ) या १९ एप्रील २०१५ रोजी पहाटे तीन वाजता पीठाची गिरणी चालु करण्यासाठी उठल्या. त्यावेळेसच गावातीलच भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे यांनी वर्षाला घराबाहेर बोलावले. त्या ठिकाणी धनराज व भारत रॉकेलचा कॅन घेऊन उभा होते. आता तुला जिवेच मारतो म्हणुन भारतने वर्षाच्या अंगावर रॉकेल टाकले. धनराज ने काडी पेटवुन दिले. यात ती ८८ टक्के भाजली होती. तिला केजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले. उपचारा दरम्याण जखमी महीलेचा व तिचा मुलगा निखीलचा मृत्युपुर्व जवाब पोलिस व कार्यकारी दंडाधिका-यासमोर नोंदवला. या जवाबावरुन केज पोलिसात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. चव्हाण यांनी करुन दोषारोपपत्र अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्यायधीस एस. व्ही. हंडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासले. यात मुत्युपुर्व जवाब व मयत महीलेच्या मुलाचा जवाब ग्राह्य धरुन न्या. एस. व्ही. हंडे यांनी भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची (अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. लक्ष्मन फड यांनी काम पाहीले त्यांना अ‍ॅड. आर. एस. राख यांनी सहकार्य केले. 
==========================================
==========================================

No comments: