[राष्ट्रीय]
१- लैंगिक छळाच्या तक्रारकर्तीला 90 दिवसांची भरपगारी रजा
२- 'रामदास' बोट दुर्घटनेला ६९ वर्ष पूर्ण, ६२५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू
३- लखनऊ; शीला दीक्षितांच्या एन्ट्रीपूर्वी मंच कोसळला, सर्व सुरक्षित
४- सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील
५- गृहमंत्री पीडितेच्या कुटुंबाला भेट देत नाहीत - विरोधी पक्षनेते
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- मिस्टर सीएम, कट्टपाने बाहुबलीला का मारलं
७- नवी मुंबईतली अनधिकृत बांधकामं पाडण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती
८- कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा
९- आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - मुंढे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- सातारा; .अजगराला पाहुणचार तर मगरीची सर्कस
११- अहमदनगर; कोपर्डी - अत्याचार करणाऱ्यांवर फेकले अंडे
१२- कोझिकोडे; मी दहशतवादी - केरळमधल्या बेपत्ता युवकाचा संदेश
१३- सांगली : गार्डी-घानवड (विटा) येथे पिण्याच्या पाण्यातून 14 महिलांना विषबाधा.
१४- नाशिक; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संपकरी व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला
१५- कोल्हापूर; पुराचे पाणी ओसरल्यानंतर नदी काठावरील झाडावर एका मुलीचे आढळले प्रेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- विजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन
१७- पाकिस्तानची 'क्वीन', पतीशिवाय हुमा एकटीच हनिमूनला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा

लैंगिक छळाच्या तक्रारकर्तीला 90 दिवसांची भरपगारी रजा
नवी दिल्ली : लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना आता 90 दिवसांची भरपगारी रजा मिळू शकते. तक्रारीबाबत चौकशी होण्याच्या कालावधीत ही रजा देण्याची तरतूद सरकारतर्फे करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त ही भरपगारी रजा असेल. काही प्रकरणांमध्ये पीडित महिलांना आरोपींकडून त्रास किंवा धमकावल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे केंद्राचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार (प्रतिबंध, बंदी आणि तक्रार निवारण) या अंतर्गत रजेची तरतूद करण्यात आली आहे. आरोपीच्या सोबत काम करण्याचा त्रास पीडित महिलांना होऊ नये आणि त्यांचा क्लेश वाढू नये यासाठी हा उपाय योग्य ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
लैंगिक अत्याचारामध्ये शारीरिक जवळीक, शरीरसुखाची मागणी, सेक्सशी निगडीत शेरेबाजी किंवा पॉर्नोग्राफिक साहित्य दाखवणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.
==========================================
मिस्टर सीएम, कट्टपाने बाहुबलीला का मारलं
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘टॉक टू AK’ हा कार्यक्रम आजपासून सुरु झाला. पहिल्या दिवशीच्याच कार्यक्रमाला जनतेने उत्सफुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी मागवण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या १५ हजारांवर पोहचली आहे.
अरविंद केजरीवालांनी www.talktoak.com या वेबसाईटवर प्रश्न मागवले होते. या वेब पार्टलवर तब्बल १५ हजार नागरिकांनी आपले प्रश्न विचारले. केजरीवालांना एकाने विचारले की, तुम्ही जाहिरातींवर इतका प्रश्न का करता? तर एकाने विचारले की, तुम्ही जनतेला इतके मुर्ख का बनवता? काहींनी तर मुख्यमंत्र्यांकडून चित्रपटाच्या रिव्हीयूची मागणी केली आहे. तर काहींनी कॅन्सरवरील उपचार विचारला आहे. विशेष म्हणजे, रुपेश नामदेव या व्यक्तीने कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं? अशी विचित्र शंका विचारली आहे.
दरम्यान, आजच्या आपल्या पहिल्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. दिल्ली सरकारमधील जलमंत्री कपिल मिश्रा यांनी भाजपला कोपरखळी मारत, ”दुसऱ्याची ‘मन की बात’ ऐकून कंटाळला असाल, आता मुख्यमंत्र्यांना तुमची ‘मन की बात’ सांगा, असे म्हटले आहे.
==========================================
नवी मुंबईतली अनधिकृत बांधकामं पाडण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तूर्तास दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली.
पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
==========================================
'रामदास' बोट दुर्घटनेला ६९ वर्ष पूर्ण, ६२५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू
- सागरी इतिहासात टायटॅनिक बोट दुर्घटनेला जितके महत्व आहे. तितकेच महत्व भारताच्या सागरी इतिहासात 'रामदास' बोट दुर्घटनेचे आहे. मुंबई बंदरापासून अवघ्या 9 मैलांवर रामदास बोटीला जलसमाधी मिळाली होती. आज या घटनेला ६९ वर्ष पूर्ण झाली. 17 जुलै 1947मध्ये मुंबईहून रेवसला निघालेली रामदास बोट बुडून सुमारे 625 लोक मरण पावले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ही भीषण सागरी दुर्घटना घडली होती. 17 जुलै 1947चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली‘रामदास’बोट मुंबई बंदरापासून अवघ्या 9 मैलांवर असलेल्या‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली.तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून 232 उतारूंचा सुदैवाने जीव बचावला.त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता.रामदास बोट बुडाली ती सकाळच्या वेळेत.या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होते,ते त्या दिवशी दुपारी तीन वाजता ससून डॉकच्या किना-याला लागले.त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिका-यांना मिळाली.नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंधवार्ताही नव्हती. रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ,लालबाग या गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते.हे सारे मूळ कोकणवासी असल्याने रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई,ठाणे,कुलाबा,रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांत आमुलाग्र सुधारणा झाल्या. अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसू लागली.
==========================================
कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा
अहमदनगर : कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळच्या फेसबुक अकाऊंटवर पालकमंत्री राम शिंदेत फोटो आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
संतोष भवाळ असं या आरोपीचं नाव सांगितलं जातं असलं, तरी या फोटोची पुष्टी मात्र एबीपी माझानं केलेली नाही. धनंजय मुंडेंनी याबाबतचा दावा केला आहे. त्याशिवाय काही वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरही हा फोटो झळकतो आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणी राम शिंदेंभोवतीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
==========================================

सुदैवाने दोघाही नेत्यांपैकी कोणीही या प्लॅटफॉर्मवर नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
शीला दीक्षितांच्या एन्ट्रीपूर्वी मंच कोसळला, सर्व सुरक्षित
लखनऊ : उत्तर प्रदेशात काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित ज्या मंचावर जाणार होत्या, तो कोसळल्याचं वृत्त आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि शीला दीक्षित यांचा रोड शो लखनऊमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दीक्षित आणि बब्बर उभे राहणार असलेल्या ट्रकवरचा एक प्लॅटफॉर्म तुटला.
सुदैवाने दोघाही नेत्यांपैकी कोणीही या प्लॅटफॉर्मवर नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
==========================================

वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली.
पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
नवी मुंबईतली अनधिकृत बांधकामं पाडण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तूर्तास दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली.
पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
==========================================
आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - मुंढे
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ : कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. गंभीर आरोप असताना, चौकश्या सुरू असताना मंत्रीमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा कडेलोटचं केला आहे. असा घाणाघाती आरोप विधानसभा विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.पुढे ते म्हाणाले, कापर्डी गावात निर्भया प्रकरणाला लाजवेल अशी हत्या घडलीय. या घटनेनं पुरोगामी राज्याची लाच वेशीवर टांगलीयं. कायद्याचं भय राहिलेलं नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भेट तर दिलीच नाही पण गृहराज्यमंत्री देखील गेले नाहित. पालकमंत्री दोन दिवसांनी गेले.आरोपी संतोष भवाळ यांचा फेसबुक वर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबतच् फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्याच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिकार्यांनवर कारवाई व्हावी, उच्चस्तरिय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.
==========================================
सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ : सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी सैराट स्टईल टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलतं होते.भाजपातील नेत्यांचा आपाआपसातमधील संवाद योग्य नाही, हे सरकार ट्विटरवर चालतंय का? मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्ट्राचाराचा विस्तार होय असं ही ते म्हणाले.पुढे बोलताना ते म्हणाले, कर्जतची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी. निर्भया पेक्षा भयामक कृत्य घडले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वेळ मिळू नये. ही गंभीर घटना आहे. मतदारसंघातले मंत्री कारभार घ्यावा की नाही याच चिंतेत आहेत. हा खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. मुख्यमंत्री एकही शब्द याबाबत बोलले नाहीत. हे दुर्दैवचं.
==========================================
..अजगराला पाहुणचार तर मगरीची सर्कस !
- ऑनलाइन लोकमतसातारा, दि. १७ : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा फुटी अजगर अन सात फुटी मगर सापडल्याने सातारकरांमध्ये चर्चेला ऊत आलाय. एकीकडे भेकराला पकडण्याच्या नादात जखमी झालेल्या अजगराला चिकन-अंडी खाऊ-पिऊ घालण्यात 'वन्यजीव' विभागाचे अधिकारी व्यस्त झालेत, तर दुसरीकडे मगरीच्या पाठीवर बसून तिला डिवचण्यात स्थानिक तरुणांनी धन्यता मानली. दरम्यान, मगरीला आता पुण्याच्या कात्रज उद्यानात पाठविण्यात आलंय.कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जखमी स्थितीत आढळून आलेल्या अजगरावर अद्यापही क-हाडात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून शनिवारपासून त्याला अंडी व कोंबडीच्या मांसाचा खुराक दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.पाटण तालुक्यातील धानकल हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात रस्त्याकडेला पडलेल्या अजगराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. भेकराशी झालेल्या झटापटीत अजगराचा जबडा फाटला होता. त्यामुळे क-हाडात पशुवैद्यकीय अधिका-यांनी त्याच्या जबड्यावर सहा टाक्यांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला 'वन्यजीव' विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
==========================================
कोपर्डी - अत्याचार करणाऱ्यांवर फेकले अंडे
- ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १७ : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना रविवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्यावर अंडे फेकण्याची घडना घडली़. कर्जतमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कोपर्डी घटनेतील पहिला आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे याला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती़ तर या घटनेतील दुसरा आरोपी संतोष गोरख भवाळ याला पोलिसांनी शनिवारी अटक केली़ या दोघांनाही रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ सुनावणी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात कोर्टातून बाहेर पडताना या दोघा आरोपींवर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंडे फेकले़ तसेच या घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या़.कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणानंतर कर्जत परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला होता.
==========================================
मी दहशतवादी - केरळमधल्या बेपत्ता युवकाचा संदेश
- ऑनलाइन लोकमतकोझीकोडे, दि. १७ - लोक मला उद्या दहशतवादी म्हणून बोलवतील, अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल तर हो, मी दहशतवादी आहे असा संदेश केरळमधून बेपत्ता असलेल्या युवकाने त्याच्या कुटुंबाला पाठवला आहे. केरळमधून जे १५ युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे. त्यापैकी एक मोहम्मद मारवानने हा संदेश पाठवला आहे.जूनच्या शेवटच्या आठवडयात टेलिग्राम अॅपवरुन त्याने कुटुंबाला हा संदेश पाठवला आहे. पश्चिम आशियातील दहशतवादी संघटनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूप्रदेशातून आपण हा संदेश पाठवत असल्याचे मोहम्मदने म्हटले आहे. इसिस बरोबरचे काम संपवून मी परत येईन. त्यानंतर मला काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमधल्या पिडित मुस्लिमांना मदत करायची आहे.अमेरिका, रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक निष्पाप मुस्लिमांचा मृत्यू होत आहे. मुस्लिम समाज अडचणीत असताना मी शांतपणे घरी कसा काय बसू शकतो ?. मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार सुरु होता त्यावेळी मी काय करत होतो असे अल्लाह मला विचारेल. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी लढणे हे माझे धार्मिक कर्तव्य आहे असे मोहम्मदने आपल्या संदेशात म्हटले आहे.
==========================================
No comments:
Post a Comment