Wednesday, 13 July 2016

नमस्कार लाईव्ह १३-०७-२०१६ चे बातमीपत्र

*नमस्कार लाईव्ह १३-०७-२०१६ चे बातमीपत्र *

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[अंतरराष्ट्रीय]*
१- अमेरिकेत कैद्याचा न्यायालयात गोळीबार 
२- दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- उत्तराखंडपाठोपाठ अरुणाचलमध्येही मोदी सरकारला झटका 
४- पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम 
५- सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु 
६- दहावी आणि ITI पास, नेव्हल शिपमध्ये प्रशिक्षणाची संधी 
७- दहशतवादी बुरहान वानीला हिरो बनवू नका : मोदी 
८- 5600 कोटींचा NSEL घोटाळा : FTIL च्या जिग्नेश शाहांना अटक 
९- पेट्रोल-डिझेलसाठी ‘एक देश, एक दर’ लागू करा - पेट्रोल पंप मालक 
१०- केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री सिद्धेश्वरा यांचा राजीनामा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
११- दुष्काळ हटवण्यासाठी पाण्याचं नियोजन करा 
१२- महाराष्ट्रातील पाऊस आणि धरणांची सद्यस्थिती 
१३- साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वतींवर शिर्डीत शाईफेक 
१४- कुत्रा पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 
१५- सावधान! मुंबई लोकलमध्ये बॅगांची हेराफेरी करणारी टोळी
१६- छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षापथके आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१७- नंदूरबार; वीरचक्र धरण फुटल्याची अफवा, नागरिकांची धावाधाव 
१८- कोल्हापुरात पूरपरिस्थिती, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली 
१९- पालघर; बोईसरमध्ये पतीच्या आदेशाने भावोजीचा नववधूवर बलात्कार 
२०- कोल्हापूर - रेडे डोहातुन चार मुले वाहून गेली, दोघाना वाचविण्यात यश, दोघे पुरातुन गायब. 
२१- मुंबई-गोवा महामार्गावर रेपोलीजवळ अपघात, एसटीची कारला धडक, दोन ठार, एक जण जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२२- सहकलाकाराला थप्पड लगावल्यानंतर इशिता दत्त ढसाढसा रडली 
२३- सलमान आणि हृतिकमध्ये 'या' अभिनेत्रीवरुन कोल्डवॉर? 
२४- सलमान, अनुष्कावर फसवणुकीचा आरोप, बिहारमध्ये तक्रार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[सविस्तर]*
२५- *सोनियामुळे स्वच्छ व अतिक्रमण मुक्त नांदेड दिसणार का?*
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/07/blog-post_74.html
कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोसर्वा मा. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच कोंग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत शामिल असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते उद्या नांदेड शहरात येणार आहेत. त्यांना सलामी देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी असलेले कॉंग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून अतिक्रमणाच्या विलाख्यातील नांदेड शहर. वाहतुकीचा वाजलेला बोजवारा व स्वच्छतेअभावी बकाल झालेले नांदेड शहर उत्साहाने सजत आहे. नांदेड शहराचे भाग्यविधाते कर्तव्याचे महानेरू माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सैनिक कै. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण व संग्रहालयाचे उद्घाटन उद्या सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 
शंकररावजी यांच्या कर्तव्याची व दूरदृष्टीची फळे नांदेडकर चाखत आहेत. यामुळे दुष्काळातही नांदेडची अवस्था झाली नाही. विष्णुपुरी प्रकल्प हे त्यांचे साक्षीचे उदाहरण आहे. अशा कर्मठ, कर्मयोगी महात्म्याच्या शहरात त्यांच्याच पक्षाच्या अधिपत्याखाली व पक्षाची सर्व सत्तास्थाने आहेत. परंतु शहरात अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे. स्वच्छते अभावी शहराला बकाल अवस्था आलेली आहे. यामुळे आता झालेल्या पावसात बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबण्याचे प्रकार दिसून आले तर शहरात वाहतूक व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. 
अशावेळी नांदेडकरांच्या गळतील ताईत असलेले, अपेक्षेच्या हृदयस्थानी असलेले अशोकराव चव्हाण साहेब यांनी लक्ष घालावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जर अशोकरावांच्या कार्यक्रमाला अशी अवस्था तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा विचार कोणी करेल काय?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

=================================

दुष्काळ हटवण्यासाठी पाण्याचं नियोजन करा

दुष्काळ हटवण्यासाठी पाण्याचं नियोजन करा !
मुंबई: महाराष्ट्र चिंब झाला आहे. जागोजागी मुसळधार पाऊस सुरु आहे. फक्त जुलैच्या 11 दिवसातच 300 तालुक्यांमध्ये 100 टक्के पाऊस झाला आहे. नद्या पात्राबाहेर आहेत. धरणं काठोकाठ भरली आहेत, चित्र सुखावणारं आहे.

पण मग डिसेंबर महिना उजाडताच टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या बातम्या का दाखवाव्या लागतात?.. उत्तर सोपं आहे… आपण वरुणराजानं भरभरून दिलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब साठवत नाही… त्या थेंबांची आपल्याला कदर नाही… पण जेव्हा घशाला कोरड पडते, तेव्हा मात्र आपण पाण्यासाठी दाहीदिशा भटकतो.

महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब वाचवला, तर दुष्काळाचा लवलेश आपल्याला दिसणार नाही.. आणि म्हणूनच पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, जलयुक्त शिवार, नाम फाऊंडेशन यासारख्या अनेक जलसंवर्धनाच्या योजना प्रत्येक गावात होण्याची गरज आहे.

नद्यांमधून वाहून जाऊन समुद्रात जाणारं पाणी जमिनीत मुरवणं गरजेचं आहे, धावत्या पाण्याला चालवणं शिकवायला हवं, चालणाऱ्या पाण्याला थांबवायला हवं… आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला हवं…. येत्या काळात तसं झालं… तर डिसेंबरमध्येच पाणी आटून भेगाळलेल्या जमिनी महाराष्ट्रात दिसणार नाहीत.
=================================

महाराष्ट्रातील पाऊस आणि धरणांची सद्यस्थिती

महाराष्ट्रातील पाऊस आणि धरणांची सद्यस्थिती
मुंबईगेल्या 11 दिवसात राज्यभरात सर्वदूर पावसानं दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. यामुळं कागदावर तरी महाराष्ट्र हिरवा दिसतोय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यभरातील 297 तालुक्यात 1 जुलै  ते 11 जुलैच्या दरम्यान 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

यात संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागाचा समावेश आहे. तर 24 तालुके असे आहे कि जिथं सरासरी इतका किंवा सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला आहे.

राज्यातील फक्त 32 तालुक्यात सरासरीच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील काही तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 2 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळं राज्याच्या धरणातील एकूण पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राज्यातील धरणात आतापर्यंत 26 टक्के पाणी साठा जमा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र ही परिस्थिती उद्यापासून बदलण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेनं उद्यापासून राज्यात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

=================================

वीरचक्र धरण फुटल्याची अफवा, नागरिकांची धावाधाव

वीरचक्र धरण फुटल्याची अफवा, नागरिकांची धावाधाव
नंदुरबार: नंदुरबारमध्ये पावसापाठोपाठ आता एका अफवेने काहूर उठलं आहे. वीरचक्र धरण फुटल्याच्या अफवांना गावात ऊत आला आहे. यामुळे पाचोराबारी गावातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली असून जीव वाचवण्यासाठी लोकांची धावाधाव सुरु आहे.

गेल्या काही दिवसात पाचोराबारी गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच आता धरण फुटल्याच्या अफेवनं थैमान घातलं आहे. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी गावात ठाण मांडून बसले आहे.

दरम्यान, तीन दिवसांनंतर सूरत-भुसावळ रेल्वेमार्ग पुन्हा सुरु झाला आहे. पाचोराबारी गावाजवळ रुळाखालील माती खचल्याने याठिकाणी रेल्वेचे काही डबे घसरले होते.

=================================

सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु

सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु
नंदुरबार: पावसाने रेल्वे ट्रॅक वाहून गेल्यामुळे, ठप्प झालेली सुरत-भुसावळ मार्गावरील सर्वच रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे.

जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी  मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच अतिवृष्टी झालेल्या पाचोराबारी गावाला मोठा फटका बसला. गावानजीक रेल्वे मार्गावर रूळाखालील माती खचल्याने गुजरातमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र दिवसरात्र काम करून रेल्वे लोहमार्ग सुरू झाला आहे.

=================================

उत्तराखंडपाठोपाठ अरुणाचलमध्येही मोदी सरकारला झटका

उत्तराखंडपाठोपाठ अरुणाचलमध्येही मोदी सरकारला झटका
नवी दिल्ली: मोदी सरकारला उत्तराखंडपाठोपाठ अरुणाचलमध्येही दणका बसला आहे. कारण काँग्रेसची सत्ता असलेल्या अरुणाचलमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने रोखलं आहे.

अरुणाचल प्रदेशात राज्यपालांनी काँग्रेस सरकारच्या बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य ठरवत, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दणका दिला. त्यामुळे 7 महिन्यांतर अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता कायम असणार आहे.

14 जानेवारी 2016 ला सुरू होणारं अधिवेशन राज्यपालांनी 16 डिसेंबरला घेऊन स्वतःच निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे बरखास्त केलेल्या काँग्रेसच्या सरकारला पुन्हा कारभार सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय आज सुप्रीम कोर्टानं सुनावला.

राज्यपालांनी सरकार बरखास्तीचा निर्णय दिला होता. तेव्हा नबाम तुकी हे मुख्यमंत्री होते. अरुणाचल प्रदेशात 60 सदस्यांपैकी 42 आमदार काँग्रेसचे आहेत. यातल्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजपनं सरकारला पाडण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

=================================

पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम

पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम
मुंबईगेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र ही परिस्थिती उद्यापासून बदलण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेनं उद्यापासून राज्यात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने आनंदाचं वातावरण आहे. त्यातच जवळजवळ सर्वच नद्या दुथडी भरुन वाहात असल्याचं चित्र आहे. धरणांच्या पाण्यामध्येही चांगली वाढ झालीय. त्यामुळे पाऊस कमी झाल्याने शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

पंचगंगेचं कोल्हापूर शहरावर आक्रमण
पंचगंगा नदीनं कोल्हापूर शहरावर कसं आक्रमण केलं आहे… ते दाखवणारा हा व्हिडिओ माझाच्या एका प्रेक्षकाने कोल्हापुरातल्या बापट कॅम्पमधून पाठवला आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसानं पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांड़लीय. पंचगंगा पात्र सोडून वाहात असल्याने कोल्हापुरात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. शहरातल्या कसबा बावडा, बापट कॅम्प या भागांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पंचगंगेच्या लगत असलेली ऊसशेती पाण्याखाली गेली असून, पाण्याची पातळी आणखी वाढल्यास, शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

=================================

दहावी आणि ITI पास, नेव्हल शिपमध्ये प्रशिक्षणाची संधी

दहावी आणि ITI पास, नेव्हल शिपमध्ये प्रशिक्षणाची संधी
मुंबईनेव्हल शिप रिपेअर यार्ड आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड (केओसी) चे ॲप्रेन्टिसेस ट्रेनिंग स्कूल उमेदवारी प्रशिक्षणाकरिता आयटीआय (एनसीव्हिटी) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहेत.

याबाबतची माहिती ‘महान्यूज’ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर, पेंटर (जनरल), मशिनिस्ट, टर्नर, एमआरएसी, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रीक), इलेक्ट्रो प्लॅटर, कॉम्प्युटर ऑपरेशन ऑफ प्रोग्रॅमिंग असिस्टंट (सीओपीए), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, टेलर, मेकॅनिक मोटर वेहिकल (एमएमव्ही) हे प्रशिक्षण दोन वर्ष कालावधीचे आहेत.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार हे किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (एनसीव्हीटी) मध्ये 65 गुण प्राप्त केलेले असावेत. उमेदवाराने दि. 01 ऑक्टोबर, 2016 रोजी वयाची 14 वर्षे पूर्ण केलेली असावीत, परंतु त्याचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले नसावे. सरकारच्या आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयोमर्यादेत 21 वर्षे सवलत आहे.

=================================

दहशतवादी बुरहान वानीला हिरो बनवू नका : मोदी

दहशतवादी बुरहान वानीला हिरो बनवू नका : मोदी
नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसेच्या मीडिया कव्हरेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रसारमाध्यमं बुरहान वानीला हिरोचा दर्जा देत आहेत. त्यामुळे त्याच्या समर्थकांना आणखी प्रोत्साहान मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.


आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावरुन परतलेल्या पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काश्मीर हिंसाचाराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

=================================
दहशतवादी बुरहान वानीला हिरो बनवू नका : मोदी
नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसेच्या मीडिया कव्हरेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रसारमाध्यमं बुरहान वानीला हिरोचा दर्जा देत आहेत. त्यामुळे त्याच्या समर्थकांना आणखी प्रोत्साहान मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.


आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावरुन परतलेल्या पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काश्मीर हिंसाचाराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


=================================
दहशतवादी बुरहान वानीला हिरो बनवू नका : मोदी
नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसेच्या मीडिया कव्हरेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रसारमाध्यमं बुरहान वानीला हिरोचा दर्जा देत आहेत. त्यामुळे त्याच्या समर्थकांना आणखी प्रोत्साहान मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.


आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावरुन परतलेल्या पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काश्मीर हिंसाचाराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

=================================

5600 कोटींचा NSEL घोटाळा : FTIL च्या जिग्नेश शाहांना अटक

5600 कोटींचा NSEL घोटाळा : FTIL च्या जिग्नेश शाहांना अटक
मुंबई : 5600 कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी एफटीआयएलचे संस्थापक जिग्नेश शाह यांना अंमलबजावणी संचालयानालयाने मंगळवारी अटक केली. आज त्यांना न्यायालयात सादर केलं जाणार आहे.

एफटीआयएल म्हणजेच फायनान्शियल टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेड या कंपनीने नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यानुसार एफटीआयएलचे प्रमुख जिग्नेश शाह यांना अटक केली आहे. जिग्नेश शाह हे कोट्यवधी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्याच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

मंगळवारी दुपारी त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना अटक केल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं. त्यांना आज विशेष ईडी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

ईडीने गेल्यावर्षी या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात जिग्नेश शाह यांचाही समावेश होता.
=================================

“पेट्रोल-डिझेलसाठी ‘एक देश, एक दर’ लागू करा”

“पेट्रोल-डिझेलसाठी ‘एक देश, एक दर’ लागू करा”
चंदीगड : पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील असमानता दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी देशभरात ‘एक देश, एक दर’ लागू करण्याची मागणी केली आहे.

ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी मागणी करताना म्हटलं, “आम्ही इंधनांसाठी ‘एक देश, एक दर’ लागू करण्याची मागणी करत आहोत. जेणेकरुन राज्या-राज्यांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधील तफावत दूर होईल.”

राज्या राज्यांमध्ये इंधनांच्या किंमतीत तफावत किती आहे?

राज्या-राज्यांमधील कमी-अधिक व्हॅटनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही बदलतात. ईंधनांमधील किंमतींमधील ही तफावत मोठी आहे. यामध्ये डिझेलच्या किंमती 60 पैसे ते 4 रुपये प्रति लिटर, तर पेट्रोलच्या किंमती 1 रुपया ते 7.50 रुपये प्रति लिटर फरकाने आढळतात.
=================================

सहकलाकाराला थप्पड लगावल्यानंतर इशिता दत्त ढसाढसा रडली

सहकलाकाराला थप्पड लगावल्यानंतर इशिता दत्त ढसाढसा रडली
मुंबई : टीव्ही अभिनेत्री इशिता दत्तने तिचा सहकलाकार वात्सल सेठला थप्पड लगावली. मात्र यानंतर इशिताला अश्रू अनावर झाले.
‘लाईफ ओके’ या चॅनलवरील ‘रिश्तों का सौदागर – बाजीगर’ या मालिकेत थप्पड लगावण्याचा सीन चित्रीत करायचा होता. यावेळी इशिताला वात्सलच्या थोबाडीत मारायचं होतं.
याबाबत इशिता म्हणाली की, “खरंतर थप्पड मारायची म्हणून सुरुवातीला मी वात्सला चिडवायला लागले. पण सीन सुरु झाल्यावर फारच नर्व्हस झाले होते. मात्र वात्सलने मला या सीनसाठी तयार केलं. सीन पार पडला, परंतु मला अतिशय वाईट वाटत होतं आणि मी रडायला लागले.”
“यानंतर मला आणखी वाईट वाटू नये म्हणून वात्सलने मला मिठी मारली, जोक्स सांगितले,” असंही इशिताने सांगितलं. “पण माझ्या सहकलाकाराला थोबाडीत मारण्याची पहिली आणि शेवटची वेळ असेल,” असंही तिने स्पष्ट केलं
=================================

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेच्या काठावरील गांवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
=================================

केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री सिद्धेश्वरा यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री सिद्धेश्वरा यांचा राजीनामा
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असताना पंच्च्याहत्तरी पार केलेल्या नजमा हेपतुल्ला आणि जी एम सिद्देश्वरा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला. राष्ट्रपतींनीही या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले आहेत. आपल्या मंत्रिमंडळामध्ये पंच्च्याहत्तरीच्या आतीलच नेत्यांचा समावेश असेल असं मोदींनी घोषित केलं होतं. तेच सूत्र याठिकाणी कटाक्षानं पाळल्याचं दिसतं आहे.
नजमा हेपतुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती देण्यात आली आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्य़ाक खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर बाबुल सुप्रियो यांच्याकडे सिद्देश्वरा यांच्याकडे असलेलं अवजड उद्योग राज्यमंत्री आणि सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे कर्नाटकमधील जीएम सिद्धेश्वरा यांनीही आपल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एक आठवड्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्याचवेळी सिद्धेश्वरा यांचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र, काही कारणास्तव तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. अखेर नजमा हेपतुल्ला यांच्यासोबतच आज सिद्धेश्वरा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.
=================================

बोईसरमध्ये पतीच्या आदेशाने भावोजीचा नववधूवर बलात्कार

बोईसरमध्ये पतीच्या आदेशाने भावोजीचा नववधूवर बलात्कार
पालघर : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच पतीच्या डोळ्यादेखत नातेवाईकाने नवविवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये घडली.

बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पती हुस्नू खान आणि त्याच्या भावोजीला (बहिणीचा नवरा) अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणातील पीडितेचा 7 जुलै म्हणजेच ईदला हुस्नू खानशी निकाह झाला होता. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरी तिच्यावर बलात्कार झाला.
=================================

सलमान आणि हृतिकमध्ये 'या' अभिनेत्रीवरुन कोल्डवॉर?

सलमान आणि हृतिकमध्ये 'या' अभिनेत्रीवरुन कोल्डवॉर?
मुंबई : ‘कितने अजीब रिश्ते है यहाँ पे’, ‘पेज3’ सिनेमातील हे शब्द बॉलिवूडला अगदी तंतोतंत लागू होतात. आज गळ्यात गळे घालणारे कलाकार उद्या एकमेकांविषयी गरळ ओकताना दिसतात. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये एकत्र काम केलेल्या प्रियांका आणि दीपिकामध्ये सध्या काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे हे कोल्डवॉर एका अभिनेत्रीवरुन सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.


सलमान खान हृतिक रोशनवर नाराज असल्याचं वृत्त आहे. आयफा 2016 पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि हृतिकमध्ये वाद झाले होते. याला सलमानची जवळची अभिनेत्री समजली जाणारी डेझी शाह कारणीभूत ठरली होती.


आयफा सोहळ्यात सलमानने हृतिकला डेझीसोबत परफॉर्म करण्यास सांगितलं होतं. पण हृतिकने यासाठी साफ नकार दिला. इतकंच नाही तर डेझीसोबत स्टेज शेअर करणार नाही, असं हृतिकने आयफा आयोजकांनाही सांगितलं.
=================================

सलमान, अनुष्कावर फसवणुकीचा आरोप, बिहारमध्ये तक्रार

सलमान, अनुष्कावर फसवणुकीचा आरोप, बिहारमध्ये तक्रार
पाटणा : बॉलिवूडचा सुपरस्टार, ‘सुलतान’ सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक अली जफर अब्बास यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फसवणूक केल्याच्या आरोपातून मुझफ्फरनगर कोर्टात तक्रारकर्त्याने धाव घेतली आहे.

सुलतान हा चित्रपट आपल्या आयुष्यावर आधारित असून सलमानने मानधन (रॉयल्टी) म्हणून 20 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा मोहम्मग साबीर अन्सारी उर्फ साबीर बाबाने केला आहे. तक्रारकर्ता बिहारच्या मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे.

साबीर बाबाने मुंबईत 2010 मध्ये त्याची कहाणी सलमानला ऐकवली होती. जर आपण त्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवला, तर काही भाग मानधन देण्याचं वचन सलमानने दिल्याचं त्याचे वकील सुधीर ओझा यांनी म्हटलं आहे. मात्र सलमानने आश्वासन न पाळल्यामुळे साबीरने कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे.
=================================

साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वतींवर शिर्डीत शाईफेक

साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वतींवर शिर्डीत शाईफेक
शिर्डी: साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती दंडीस्वामींवर शाईफेक करण्यात आली. दंडीस्वानी आज शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना साईभक्तांच्या रोषाचा सामना करावा लागला.
दंडीस्वामी हे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य आहेत. शंकराचार्य यांनी साईबाबा मुस्लिम असल्याचं वादग्रस्त विधान केल्यानंतर दंडीस्वामी यांनी साईंची हिंदू पद्धतीची पूजा बंद करण्याचा आवाहन केलं होतं.
दरम्यान, आज दंडीस्वामी हे प्रांताधिकारी कार्यालयात आले असताना त्यांना शिर्डीकरांच्या रोषाला सामोर जावं लागलं. त्याचेवेळी त्यांच्यावर शिर्डीकरांना शाईफेकही केली. तसंच त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
=================================

कुत्रा पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुत्रा पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.


आज सकाळी 7.35 वाजता कल्याण पत्री पुलावरुन एका कुत्र्याने रेल्वेच्या पेंटाग्राफवर पडला. पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्याने गाडी थांबवण्यात आली होती. दहा मिनिटांनी कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरु झाली. मात्र सर्व गाड्या 10 ते 15 मिनटं उशिरा धावत आहेत.


जलद आणि धीम्या मार्गावरील अप-डाऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
=================================

सावधान! मुंबई लोकलमध्ये बॅगांची हेराफेरी करणारी टोळी

सावधान! मुंबई लोकलमध्ये बॅगांची हेराफेरी करणारी टोळी
मुंबई : मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोरीला जाणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र चोरट्यांनी मोबाईलसकट तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी लांबवण्यासाठी नवी शक्कल लढवलीय. ती म्हणजे तुमच्या बॅगांची हेराफेरी करण्याची.

हेराफेरी सिनेमाचे अनेक सिक्वेल सध्या मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये घडतायत. या टोळीची काम करण्याची पद्धत अनेकांची मती गुंग करणारी आहे. तुम्ही बॅगेसह लोकलमध्ये चढलात, की या टोळीपैकी एक जण हुबेहुब तुमच्या बॅगेसारखीच बॅग घेऊन तुमच्या जवळ येतो.

बऱ्याचदा तुम्ही मोबाईलमध्ये गुंग होता, अनेकदा तुमचा डोळाही लागतो. मात्र जोपर्यंत डोळा उघडतो, तोपर्यंत चोरानं आपला कार्यभाग साधलेला असतो. त्याची बॅग तुमच्याकडे आणि तुमची बॅग त्याच्याकडे. हा घोळ एवढ्यावरच थांबत नाही. ही टोळी तुमच्या बॅगेतील महत्वाच्या गोष्टी काढून घेते आणि रिकाम्या बॅगनं परत दुसऱ्या लोकलमध्ये चढते. पुन्हा तुमची बॅग ठेवून दुसऱ्याची बॅग लांबवली जाते.

एकाच दिवशी चर्चगेट, वांद्रे आणि बोरीवलीवरुन काही जणांच्या बॅगा चोरी झाल्या. त्यांच्या बॅगा एकमेकांकडे सापडल्या, मात्र मुद्देमाल, मोबाईल, चार्जर, एटीएम कार्ड असं काहीही त्यात नव्हतं.
=================================

No comments: