[आंतरराष्ट्रीय]
१- बर्लिन- हॉस्पिटलमध्ये बंदुकधारी व्यक्तीनं केला गोळीबार
२- दुबईहून मालेला चाललेल्या एमिराटसच्या विमानाचे मुंबईत इर्मजन्सी लँण्डीग
३- सोमालियाच्या मोगादिशू विमानतळावर मोठा स्फोट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- 50,000 रुपयात धर्मांतर, झाकीर नाईकच्या संस्थेवर आरोप
५- प्रवासी वाढले, डबे तेवढेच, कॅग अहवालात लोकलच्या कारभारावर ताशेरे
६- गांधीहत्येबद्दल बोलायला स्वामी उभे राहिले, अन् विरोधकांचं ब्लड प्रेशर वाढलं!
७- फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीवर बंदी घाला : काँग्रेस खासदार
८- लवकरच रेल्वेमध्येही रेडिओ सेवा
९- शीला दीक्षित यांचे सुपुत्र काँग्रेसमधून बंडखोरीच्या पावित्र्यात
१०- इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी
११- सोळा वर्षांपासूनचे उपोषण सोडून इरॉम लढवणार निवडणूक
१२- विजयाचा तिरंगा फडकवीन किंवा तिरंग्यामध्ये लपेटून येईन - शहीद कॅप्टन बात्रा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- कोलगेट, साबण, पॅराशूट तेल... हा घ्या पुरावा: अजित पवार
१४- पाचपुतेंना हायकोर्टाचा झटका, साईकृपा साखर कारखान्याची जप्ती होणार
१५- राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार
१६- ...अन्यथा कामकाज चालू देणार नाही : धनंजय मुंडे
१७- 'रजनीकांत महाराष्ट्राचा, त्याला 'महाराष्ट्र भूषण' द्या'
१८- नवी मुंबई पालिकेत मेगा भरती, 4713 पदं भरणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- भदोही; ड्रायव्हरच्या स्टंटबाजीमुळे 'त्या' 9 चिमुरड्यांचा मृत्यू
२०- घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 दहशतवादी जिवंत पकडला
२१- अमरावती; आजीने आईला विष दिलं, महिलेच्या आत्महत्येनंतर मुलांचा दावा
२२- पुण्यात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या
२३- दुसरं इंजिन लावून सिंहगड एक्स्प्रेस रवाना, म.रे. ची वाहतूक विस्कळीतच
२४- नाशिक; १ गावठी पिस्तुल व १ काडतूस जप्त
२५- सोलापूर : बाळीवेस परिसरात पोलीसांच्या गाडीवर दगडफेक, ५ पोलीस जखमी
२६- लातुर : लहान मुलांशी अश्लील चाळे करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यास अटक
२७- भोकर; किणी येथे शिक्षक नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- बीसीसीआयने पाच ऑगस्टला मुंबईत विशेष सर्वसाधारण सभा
२९- सलमानने नाही मारले, चिंकाराने आत्महत्या केली - सोशल मिडिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

स्कूलबस अपघातातून वाचलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरबाबत ही माहिती दिली आहे. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनसमोरुन अधिक वेगाने स्कूल बस नेण्याचीही त्याला खोड होती. त्याचप्रमाणे गाडी चालवताना इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय ड्रायव्हरला असल्याचंही सांगितलं जातं. मात्र त्याच्या या सवयी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्या आहेत.
भदोही जिल्ह्यातल्या औरईमधील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर सोमवारी ट्रेनच्या धडकेत स्कूल बसमधील 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी आहेत.

40 वर्षीय सुनेने आपले 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप सासूने केला होता. याच वादातून सासूने सुनेला विष आणून दिलं आणि प्यायला लावलं असा आरोप विवाहितेच्या मुलांनी केला आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचं एमएपर्यंत शिक्षण झालं होतं. 15 वर्षीय मुलांच्या आरोपानंतर पोलिसांनी विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूला अटक केली आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपल्या ब्लॉगद्वारे संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या हायकमांडवर शरसंधान साधलं आहे. ‘माझा स्वभाव बंडखोर वृत्तीचा आहे आणि असं नेतृत्त्व काँग्रेसमध्ये स्वीकारलं जात नाही, असं मला सांगण्यात आलंय. मग मी काय करु’, असा सवाल संदीप दीक्षित यांनी विचारला आहे.
याच ब्लॉगमधून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अजय माकन यांच्यावर संदिप दीक्षित यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजप आणि आप हे दोन पर्याय उपलब्ध असल्याचंही दीक्षित यांनी नमूद केलं आहे. आपमधील नेतृत्वाने शीला दीक्षित यांच्यावर चुकीचे आरोप करत निशाणा साधला. त्यामुळे आत्मसन्मान शाबुत राहील अशा पर्यायाच्या मी शोधात आहे.
दुसरीकडे, भाजपविषयी बोलताना या पक्षात एकाच व्यक्तीचं पूजन होत असल्याचं ते म्हणाले. मी मात्र लोकशाहीवर विश्वास ठेवतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

कोलगेट, साबण, पॅराशूट तेल... हा घ्या पुरावा: अजित पवार
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं आणि बनावट साहित्य पुरवलं जातं. याचे पुरावेच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केले.
गेल्या काही दिवसात आदिवासी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवल्याप्रकरणी विधानसभेत चर्चा सुरु होती. यावेळी अजित पवरांनी दंत मंजनापासून ते साबणापर्यंत बनावट साहित्य पुरविल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री नेहमी पुरावे द्या असं विरोधकांना म्हणतात. आता मुख्यमंत्र्यांनी पुरावा घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या साहित्यामधील अनेक बनावट वस्तू असल्याचा दावा अजित पवारांनी केला. बनावट साबण, तेलाची बाटली, कोलगेट यासारख्या वस्तू अजित पवारांनी विधानसभेत दाखवल्या. अशा पद्धतीचे जर घोटाळे होत तर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
======================================
पाचपुतेंना हायकोर्टाचा झटका, साईकृपा साखर कारखान्याची जप्ती होणार
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या उसाचा एफआरपी थकवल्यामुळे भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने झटका दिला आहे. पाचपुते यांच्या हिरडगावातील साईकृपा साखर कारखान्याची जप्ती होणार आहे.
2014-15 मधील शेतकऱ्यांचे 38 कोटी 25 लाख रुपयांचा एफआरपी थकवल्याप्रकरणी साईकृपा साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेलं कारखाना व्यवस्थापन एफआरपीनुसार रक्कम देण्यास असमर्थ ठरलं.
शेतकऱ्यांच्या थकबाकी संदर्भात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कारखान्याची सुनावणी सुरु होती. कारखान्याची मालमत्ता आरआरसी करण्याच्या निर्णयास सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर या स्थगितीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं होतं.
शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयांचा थकीत एफआरपी मिळावा यासाठी परांडा, जामखेड, करमाळा आणि फलटण येथील 96 शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी संघटनेने हायकोर्टात धाव घेतली होती.
======================================
राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार
जालना : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
“अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करुन राज ठाकरेंनी संविधान मान्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत” असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे.
त्यामुळेच राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिपने केला आहे. तशी तक्रार भारिपने तालुका पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.
“राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं दिसतंय. त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा” असं भारिपने तक्रारीत म्हटलं आहे.
======================================
...अन्यथा कामकाज चालू देणार नाही : धनंजय मुंडे
मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवरुन विधानपरिषद आज पुन्हा दणाणली. भ्रष्ट मंत्र्यांना चौकशीविना क्लीन चिट दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी दिला आहे. यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
कोणत्या मंत्र्यांवर कोणते आरोप?
– पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की कंत्राटाच्या वाटपात 80 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय पूरक पोषण आहाराची 270 कोटीची कंत्राटं तर औरंगाबाद खंडपीठानेच रद्द केली आहेत.
– गिरीश बापट आणि मुख्यमंत्र्यांनी डाळीवरचे निर्बंध उठवून साठेबाजीला प्रोत्साहन दिलं. या काळात 4500 कोटी रुपयाचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
– आदिवासी मुलांच्या स्वेटर खरेदीत 31 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे, ज्यामुळे विष्णू सावरा गोत्यात आले आहेत.
– रविंद्र वायकर यांच्यावर एसआरएचे प्रकल्प स्वत:च्या कंपनीच्या खिशात घातल्याचा आरोप आहे.
– शिवाय संभाजी निलंगेकरांवर व्हिक्टोरिया अॅग्रो फूडमधील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं 3 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.
======================================
50,000 रुपयात धर्मांतर, झाकीर नाईकच्या संस्थेवर आरोप
नवी दिल्ली: झाकीर नाईकवर धर्मांतराच्या प्रकरणातील रोज नवे खुलासे होत आहेत. आता एका नव्या खुलाशानुसार, झाकीर नाईकच्या संस्थेकडून धर्मांतरासाठी 50,000 दिले जात असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे, झाकीर नाईक संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देशातील धर्मांतराची मोहीम राबवणारे एक केंद्र म्हणून उद्याला येत होते. सध्या झाकीर नाईकच्या संस्थेने जवळपास 800 नागरिकांचे धर्मांतर घडवून आणल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
झाकीर नाईकचा सहकारी आर्शी कुरेशी आणि रिझवान खान हे दोघे धर्मांतराची मोहीम राबवत असल्याचा आरोप होत आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाकीरच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेकजण झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संपर्क करत होते. त्यावेळी कुरेशी हा त्यांना मुंबईत बोलावत असे, तर रिझवान त्यांना पनवेलला उतरवून त्यांची राहण्याची आणि धर्मांतराची सर्व प्रक्रिया पूर्ण करीत असे. याबद्ल्यात रिझवान झाकीर नाईकच्या संस्थेकडून पैसे घेत असल्याचे समोर येत आहे.
======================================
प्रवासी वाढले, डबे तेवढेच, कॅग अहवालात लोकलच्या कारभारावर ताशेरे
फाईल फोटो
नवी दिल्लीः लोकल रेल्वे प्रवाशांची संख्या 2010 ते 2015 या कालावधीत कैक पटीनं वाढली. मात्र त्या मानानं डब्यांची संख्या वाढली नसल्याचं कॅगनं अहवालात म्हटलं आहे. मुंबईसह देशभरातल्या लोकल रेल्वेची अवस्था दयनीय असल्याचं कॅगनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे.
उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या सेवेसंदर्भातील कॅगचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या शिवाय रेल्वे स्थानकावर असणाऱ्या असुविधांवर देखील कॅगनं बोट ठेवलंय. अनेक रेल्वे स्थानकांवरचे मेटल डिटेक्टर कार्यरत नसल्याचं कॅगनं ठळकपणे नमूद करून, प्रवाशांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
======================================
गांधीहत्येबद्दल बोलायला स्वामी उभे राहिले, अन् विरोधकांचं ब्लड प्रेशर वाढलं!
नवी दिल्ली: राज्यसभेत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी बोलायला उभे राहिले की वातावरणातला तणाव वाढतो. आज पुन्हा एकदा हे चित्र पाहायला मिळालं. शिवाय आज तर स्वामी एका स्फोटक मुद्द्यावर बोलणार होते. महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भातले काही तपशील का लपवले? त्यांचं पोस्टमॉर्टम का नाही झालं? असे प्रश्न स्वामींनी शून्य प्रहरात विचारले.
खरं तर शून्य प्रहरात बोलायचं म्हणजे खासदाराकडे अवघी दोन ते तीन मिनिटेच असतात. स्वामी बोलायले उभे राहिले. “महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात काही महत्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत. कारण या मुद्द्यावरून अनेकदा बेधडक आरोप करत एका विशिष्ट संघटनेला (म्हणजे आरएसएस) लक्ष्य केलं जातं. अनेक सन्माननीय सदस्य त्यावर बोलतात आणि मग सुप्रीम कोर्ट त्यांचं कान उपटतं (राहुल गांधींकडे इशारा).” अशा फटकेबाजीनंतर स्वामींनी सांगितलं की गांधी हत्येसंदर्भातल्या अनेक फाईल्स सध्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या वाचल्यानंतर मला जी तीन तथ्य सापडली ती सभागृहासमोर मांडायची आहेत.
======================================
'रजनीकांत महाराष्ट्राचा, त्याला 'महाराष्ट्र भूषण' द्या'
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे या अभिनेत्याचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करा, अशी मागणी भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत केली.
आमदार अनिल गोटे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, ही मागणी केली. इतकंच नाही तर रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मिळवलेलं यश हे वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी, अशीही मागणी अनिल गोटे यांनी केली आहे.
======================================
ड्रायव्हरच्या स्टंटबाजीमुळे 'त्या' 9 चिमुरड्यांचा मृत्यू
भदोही : उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनच्या धडकेत स्कूलबसमधील नऊ चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र या अपघाताला स्कूलबस चालकाची स्टंटबाजीच कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.
स्कूलबस अपघातातून वाचलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरबाबत ही माहिती दिली आहे. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनसमोरुन अधिक वेगाने स्कूल बस नेण्याचीही त्याला खोड होती. त्याचप्रमाणे गाडी चालवताना इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय ड्रायव्हरला असल्याचंही सांगितलं जातं. मात्र त्याच्या या सवयी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्या आहेत.
भदोही जिल्ह्यातल्या औरईमधील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर सोमवारी ट्रेनच्या धडकेत स्कूल बसमधील 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी आहेत.
======================================
घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 दहशतवादी जिवंत पकडला
जम्मू-काश्मिर: कारगिल विजय दिनानिमित्त एकीकडे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे सीमरेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. जम्मू-काश्मिरमधील कुपवाड येथे घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आल्याचं समजतं आहे.
हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी गस्त घालणाऱ्या जवानांची त्यांच्यावर नजर पडली. त्यानंतर त्यांच्यात चकमक सुरु झाली. यामध्ये चौघांना ठार करण्यात आलं. तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.
======================================
आजीने आईला विष दिलं, महिलेच्या आत्महत्येनंतर मुलांचा दावा
अमरावती : उच्चशिक्षित विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. मात्र आपल्या आजीने आईला विष दिल्याचा आरोप विवाहितेच्या मुलांनी केला आहे.
40 वर्षीय सुनेने आपले 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप सासूने केला होता. याच वादातून सासूने सुनेला विष आणून दिलं आणि प्यायला लावलं असा आरोप विवाहितेच्या मुलांनी केला आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचं एमएपर्यंत शिक्षण झालं होतं. 15 वर्षीय मुलांच्या आरोपानंतर पोलिसांनी विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूला अटक केली आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================
फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीवर बंदी घाला : काँग्रेस खासदार
नवी दिल्ली : सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी आज राज्यसभेत करण्यात आली. अशा प्रकारची उत्पादनं आणि त्यांच्या जाहिराती महिलांना कमी लेखणाऱ्या असल्याचा आरोप काँग्रेस खासदार विप्लव ठाकूर यांनी केला आहे.
पॉन्ड्स आणि फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत महिलांना कमी लेखण्यात येतं, असं विप्लव ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितलं.
प्रत्येक फेअरनेस क्रीम स्त्रियांना सुंदर बनवण्याचे दावा करतात, पण त्याचा पाठपुरावा कुणीच करत नाही. अशा प्रकारच्या जाहिराती थांबल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
ही उत्पादनं स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. सौंदर्यप्रसाधनांची संबंधित संस्थांकडून तपासणी केली जावी, तसंच खोटे दावे करणाऱ्या या उत्पादनांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणीही खासदार ठाकूर यांनी केली.
======================================
लवकरच रेल्वेमध्येही रेडिओ सेवा
1 जुलैपासून राजधानी, शताब्दी, दूरन्तो आणि इतर सुपरफास्ट ट्रेनप्रमाणे सुविधा ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. सुविधा ट्रेनमध्ये कोणालाही वेटिंग तिकीट मिळणार नाही, तर सर्वांना कन्फर्म तिकीटच मिळणार आहे.
मुंबई : रेल्वेचा प्रवास हा नेहमीच कंटाळवाणा समजला जातो. सुरेश प्रभूंनी रेल्वेमंत्रीपद स्वीकारल्यापासून रेल्वेच्या सेवेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेत. यातच आता रेल रेडिओ सेवेची भर पडली आहे. ही सेवा जवळपास 1000 ट्रेन्समध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी गेल्या वर्षभरात रेल्वे प्रशासनाकडून बरेच उपक्रम राबवले गेलेत. क्लीन माय कोच, बेबीफूड सारख्या बऱ्याच सेवा रेल्वेकडून सुरू करण्यात आल्या आहेत. जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढावी यासाठी रेल्वेने विविध प्रयत्न चालवले आहेत.
लवकरच सुमारे 1000 ट्रेन्समध्ये FM रेडिओ सेवा सुरू होईल. या सेवेच्या माध्यमातून आपत्कालीन संदेशही दिले जाणार आहेत.
======================================
शीला दीक्षित यांचे सुपुत्र काँग्रेसमधून बंडखोरीच्या पावित्र्यात
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रसतर्फे शीला दीक्षित यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे दीक्षित प्रबळ दावेदार मानल्या जात असतानाच त्यांचे सुपु्त्र संदीप दीक्षित बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
आपल्या ब्लॉगद्वारे संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या हायकमांडवर शरसंधान साधलं आहे. ‘माझा स्वभाव बंडखोर वृत्तीचा आहे आणि असं नेतृत्त्व काँग्रेसमध्ये स्वीकारलं जात नाही, असं मला सांगण्यात आलंय. मग मी काय करु’, असा सवाल संदीप दीक्षित यांनी विचारला आहे.
याच ब्लॉगमधून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अजय माकन यांच्यावर संदिप दीक्षित यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजप आणि आप हे दोन पर्याय उपलब्ध असल्याचंही दीक्षित यांनी नमूद केलं आहे. आपमधील नेतृत्वाने शीला दीक्षित यांच्यावर चुकीचे आरोप करत निशाणा साधला. त्यामुळे आत्मसन्मान शाबुत राहील अशा पर्यायाच्या मी शोधात आहे.
दुसरीकडे, भाजपविषयी बोलताना या पक्षात एकाच व्यक्तीचं पूजन होत असल्याचं ते म्हणाले. मी मात्र लोकशाहीवर विश्वास ठेवतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
======================================
पुण्यात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
पुणे : पुण्यात प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. हडपसरच्या सत्यपुरम सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली.
शुभम टिळेकर असं मृत तरुणाचं नाव आहे. शुभमचे आई-वडील पुण्यातीलच दुसऱ्या घरात गेले होते. घरात कोणीही नसल्याचं पाहून शुभमने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
दरम्यान, पोलिसांना शुभमच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. शुभमने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
======================================
दुसरं इंजिन लावून सिंहगड एक्स्प्रेस रवाना, म.रे. ची वाहतूक विस्कळीतच
मुंबई : सिंहगड एक्स्प्रेसचं बिघडलेलं इंजिन हटवून, दुसरं इंजिन लावून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक अद्यापही 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे.
मुंब्रा-कळवादरम्यान पारसिक बोगद्याजवळ दहाच्या सुमारास सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पारसिक बोगद्याजवळ एका मागे एक अशा सहा लोकल ट्रेन खोळंबून राहिल्या होत्या.
या खोळंब्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकल दिव्यापासून धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. शिवाय ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने असल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
मात्र काही वेळापूर्वीच सिंहगड एक्स्प्रेसचं बिघडलेलं इंजिन बोगद्यातून हटवलं आणि दुसरं इंजिन लावून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना केली.
======================================
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या गुप्तचर यंत्रणा अर्थात इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अनेक पदं भरण्यात येणार आहेत.
यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर्स ट्रान्सपोर्ट) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ‘महान्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०१६ आहे. याबाबतची अधिक माहितीwww.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
======================================
नवी मुंबई पालिकेत मेगा भरती, 4713 पदं भरणार
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. महापालिकेत तब्बल 4713 इतकी पदं भरण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली.
कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच ही पदं भरली जातील, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांचा लोकाभिमुख प्रशासन करण्यावर अधिक भर आहे. यासाठी ते विभाग कार्यालय आणि झोनल कार्यालयाची कार्यक्षमता वाढवत आहेत. जेणेकरून ८० टक्के कामं या कार्यालयांच्या माध्यमातून केली जातील आणि नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न या ठिकाणीच सुटतील.
======================================
१६ वर्षांपासूनचे उपोषण सोडून इरॉम लढवणार निवडणूक
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये लष्कराला विशेष अधिकार देणारा एएफएसपीए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शर्मिला मागच्या १६ वर्षांपासून बेमुदत उपोषण करत आहेत.येत्या नऊ ऑगस्टला त्या आपले उपोषण सोडणार आहेत. मणिपूरमध्ये लष्कर या कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता.माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करण्याऐवजी मी आता निवडणूक लढवून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करीन असे इरॉम शर्मिला यांनी सांगितले.इरॉम नोव्हेंबर २००० पासून उपोषणाला बसल्या होत्या. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या.
======================================
सलमानने नाही मारले, चिंकाराने आत्महत्या केली - सोशल मिडिया
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ - हिट अँड रन पाठोपाठ चिंकारा शिकार प्रकरणातही सलमानची सुटका झाल्याने सध्या सलमानचे लाखो चाहते आनंदात आहेत. ज्या सोशल मिडियावरुन सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे त्याच सोशल मिडियावर काही जणांनी सलमानची टरही उडवली आहे. टि्वटरवर अनेकांनी वेगळया पद्धतीने सलमानच्या सुटकेवर नाराजी व्यक्त केली आहे.चिंकारा स्वत:च्या पायामध्ये बंदुक पकडून स्वत:वर गोळी झाडत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माणसाची, चिंकाराची हत्या करुन फक्त प्राणी सुटू शकतो असे टि्वट एकाने केले आहे. सलमान दारु प्यायला नव्हता, सलमानने काळवीटची शिकार केली नाही. त्या रात्री काळवीट सलमानची गाडी चालवत होता असे एका टि्वटमध्ये म्हटले आहे.
======================================
विजयाचा तिरंगा फडकवीन किंवा तिरंग्यामध्ये लपेटून येईन - शहीद कॅप्टन बात्रा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ - विजयाचा तिरंगा फडकवून येईन किंवा त्यामध्ये लपेटून येईन हे शब्द होते शहीद कॅप्टन विक्रम बात्राचे. कारगिल युध्दावर निघण्यापूर्वी विक्रमचा मित्राबरोबर हा संवाद झाला होता. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पाच आठवडयांनी कॅप्टन विक्रम बात्राला तोलोलिंग जवळील १७ हजार फूट उंचीवरील शिखर ५१४० ताब्यात घेण्याचे आदेश मिळाले.पाकिस्तानी घुसखोर या शिखरावर बंकरमध्ये दबा धरुन बसले होते. शत्रूला चकवण्यासाठी कॅप्टन बत्राने दुर्मिळ बाजूने शिखरावर चढून जाण्याचा निर्णय घेतला. बत्रा आणि त्यांचे पाच सहकारी कडा चढून शिखराच्या जवळ पोहोचले असताना पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला. त्या परिस्थितीतही विक्रम बात्राची टीम शिखरावर पोहोचली आणि शत्रूच्या ठिकाणावर ग्रेनेड हल्ला केला.
======================================

No comments:
Post a Comment