*[अंतरराष्ट्रीय]*
१- न्यूयॉर्कमधील अपघातात कल्याणच्या गवई कुटुंबावर घाला
२- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निश्चित
३- रिपब्लिकन पार्टीकडून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर
४- जर्मनीत अल्पवयीन तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला, पोलिसांनी केलं ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
५- बाबरी जमीन खटल्यातील पक्षकार हाशिम अन्सारी यांचं निधन
६- होय, बुरहान वानी माझ्या संपर्कात होता : हाफिज सईद
७- जळगाव; बलात्कार पीडितेची उलट तपासणी, महिला आयोगाच्या सदस्यावर आरोप
८- कारगील युद्धात भारताने पाकिस्तान एअरबेस नेस्तानाबूत करण्याची केली होती तयारी
९- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीसीएला झटका
१०- ७ लाख ग्राहकांची गॅस सबसिडी बंद
११- राहुल गांधींच्या बुद्ध्यांकावर भाजपचे प्रश्नचिन्ह
१२- राहुल गांधींना न्यायालयाने खडसावले
१३- 'बाबरी'तील पक्षकार हाशिम अन्सारी यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१४- तीन वर्षांपूर्वी मयत अधिकाऱ्याची बदली, लिपिक निलंबित
१५- शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती - जयदेव ठाकरे
१६- सिद्धिविनायकाचरणी आता पैसे, दागिनेच नव्हे, शेअर्सचंही दान
१७- म्हाडाच्या ९७२ घरांसाठी १ लाखापेक्षा जास्त अर्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१९- मुंबई; नवरदेवाची बाईक सुसाट, वधू मागच्या मागे पडली
२०- विरार; दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिल्यानं प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत
२१- डोंबिवली; मुलीच्या लग्नासाठी तगादा लावल्यानं आईची आत्महत्या
२२- यवतमाळ; यवतमाळमध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप
२३- मुंबई; खोट्या कागदपत्रांनी महागड्या गाड्या विकणारी टोळी गजाआड
२४- सिद्धू यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच- अमरिंदरसिंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- केवळ 1 रुपयात स्मार्टफोन, शाओमीची आजपासून 3 दिवस खास ऑफर
२६- बिंद्रा पाचव्यांदा, तर नारंग, योगेश्वर चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार
२७- 'दबंग 3' मध्ये सलमानसोबत सोनाक्षी नव्हे, 'या' अभिनेत्रीची वर्णी
२८- टीव्ही अभिनेता अनुज सक्सेना सीबीआयच्या रडारवर
२९- सई ताम्हणकरच्या 'वाय झेड' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
३०- कोहली अँड कंपनीला सर व्हिवियन रिचर्ड्स यांचा मोलाचा सल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
======================================

भारतीय दूतावासाच्या अनास्थेमुळे या कुटुंबाची परदेशात परवड सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. आपल्या अख्ख्या परिवाराला गमावलेल्या आनंद गवईची कैफियत. काही दिवसांपूर्वी कल्याणचे रहिवासी कमल गवई हे पत्नी अर्चनासोबत न्यूयॉर्कला गेले. 4 जुलै रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी मुलगा चंदन, त्याची पत्नी मनिषासोबत फिरायला गेले. ते घराबाहेर गेले ते कायमचेच. एका भरधाव ट्रकच्या धडकेत होत्याचं नव्हतं झालं.
या अपघातातून मनिषा बचावल्या, पण त्या कोमात आहेत. 11 महिन्यांचा इभानही वाचला, पण दोन्ही हातांच्या फ्रॅक्चरसह. पण नियतीचा खेळ इथंच थांबला नाही. 14 दिवसांनंतरही भाऊ आनंद आणि स्वप्निलला मृतदेहांचा ताबा मिळालेला नाही. कारण त्यासाठी लागणार आहेत तब्बल 26 लाख रुपये. पण आता कुठे थोडीशी मदतीची आशा निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गवई कुटुंबियांची हाक ऐकून प्रस्ताव समोर ठेवला आहे.

चुलबुल पांडे साकारणाऱ्या सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पहिल्या दोन भागांमध्ये झळकली होती. मात्र तिसऱ्या भागात सोनाक्षीऐवजी नवा चेहरा दिसण्याची शक्यता आहे. अनेक अभिनेत्रींना मागे टाकत परिणीतीला ही संधी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

नवरोबाची ही स्कूटरही फार मजेशीर आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी ही स्कूटी दोघांच्या आकाराच्या मानाने व्हिडिओत अगदीच लहानशी दिसत आहे.
सुदैवाने इतर पादचारी तरुणीच्या मदतीला धावले आणि तिला उचललं. तिला फारशी दुखापत झाली नसावी, मात्र नवऱ्याशी भेट झाल्यानंतर दोघांमध्ये काय झालं असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

डॉ. राठोड यांच्याविधोरात तब्बल आठ महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. त्यापैकी दोन महिलांनी अधिकाऱ्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोग्य अधिकाऱ्याला अटक केलेली नाही.
डॉक्टर राठोड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्याचबरोबर त्यांचे राजकीय हितसंबंध असल्यानं पोलिसांच्या कारवाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.

अनुजने लाच देण्यासाठी दिल्लीत मध्यस्थाचा शोध घेतला होता. याप्रकरणातला दलाल विश्वदीप बन्सलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र अनुजभोवती कायद्याचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.
अनुजच्या एल्डर फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून परदेशातील कंपन्यांनाही पैसा पुरवण्यात आला होता. दुबई आणि बल्जेरियासह अन्य देशात पैसा पाठवला गेल्याचा संशय आहे. अनुजच्या कंपनीवर 138 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी करणारा अहवाल दाबण्यासाठी लाच घेतल्याचं वृत्त आहे.

चौघा आरोपींनी साई समर्थ टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स नावानं कंपनी सुरु केली होती. यामध्ये गाड्या भाड्यानं लावल्या जात असत. पुढे या चौघांनी गाडी मालकांना अंधारात ठेवून परस्पर खोटी कागदपत्रं तयार केली आणि गाड्यांची विक्री केली.
या टोळीचा कारनामा लक्षात आल्यानंतर गाडी मालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. कामोठे पोलिसांनी या टोळीकडून पावणे दोन कोटींची वाहनं जप्त केली आहेत. या टोळीकडे आणखी काही गाड्या असण्याची शक्यता आहे.

या डीमॅट अकाऊण्टद्वारे भाविक आता मंदिराच्या दानपेटीमध्ये रोख रक्कम टाकण्याऐवजी शेअर्सही दान करु शकणार आहेत. ‘श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई’ या नावानं हे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलंय.

तीन वर्षांपूर्वी मयत अधिकाऱ्याची बदली, लिपिक निलंबित
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याची बदली केल्याने लिपीकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन लिपिकाचे निलंबन करण्यात आले असून संबंधित अधीक्षकास यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
दुय्यम निरीक्षकाचे निधन झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे न पाठवल्याने त्यांचा विभागाच्या नियतकालिक बदल्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया अंतर्गत राज्यस्तरीय संवर्गातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 181 कर्मचाऱ्यांच्या शासनाने बदल्या 7 जुलै रोजी केल्या होत्या. या बदल्यांच्या आदेशात एस.एम. साबळे यांची कोल्हापूर येथून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील भरारी पथकात बदली करण्यात आली होती.
कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाकडून कर्मचाऱ्याचा अद्ययावत सेवा तपशील न मिळाल्याने मुंबईतील आयुक्त कार्यालयाकडे असलेल्या तपशीलावरुन बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीतील साबळे यांचं नाव बदलीसाठी काढण्यात आलेल्या आदेशात समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र साबळे यांचे 2013 मध्ये निधन झाल्याचे त्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे आयुक्तालयामार्फत तातडीने साबळे यांच्या बदलीचे आदेश न पाठण्याबाबत कोल्हापूर विभागीय आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना कळवण्यात आलं.
======================================
बाबरी जमीन खटल्यातील पक्षकार हाशिम अन्सारी यांचं निधन
लखनौ : अयोध्येतल्या बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादाच्या खटल्यातील पक्षकारांपैकी एक असलेल्या हाशिम अन्सारी यांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. फैजाबादमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हाशिम अन्सारी यांचे पुत्र इक्बाल अन्सारी यांच्या माहितीनुसार, “अन्सारी बुधवारी सकाळी नमाजसाठी उठले नाहीत. त्यानंतर समजलं की त्यांचा मृत्यू झाला आहे.”
हाशिम अन्सारी 60 वर्षांहून अधिक काळ बाबरी मशिदीसाठी कायदेशीर लढाई लढत होते. परंतु तरीही अन्सारी यांचे स्थानिक हिंदू साधू-संतांसोबतचे संबंध कधीही बिघडले नाहीत. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद 1949 पासून सुरु आहे.
इतकंच नाही तर हाशिम अन्सारी यांनी हा वादग्रस्त खटला न लढवण्याचा निर्णय घेतला होता. या मुद्यावरुन राजकारण होत असल्याने आपण आता हा खटला लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
दरम्यान, हाशिम यांच्या निधनानंतर आता मुस्लीम पक्षाकडून अयोध्या प्रकरणाचा खटला त्यांचे पुत्र लढवणार आहेत. हाशिम यांनीच हा निर्णय घेतला होता.
======================================
होय, बुरहान वानी माझ्या संपर्कात होता : हाफिज सईद
नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद बुरहान वानीच्या संपर्कात असल्याचे आता समोर येत आहे. हाफिजनेच याबाबतचा खुलासा पाकिस्तानमधील गुजरांवालामध्ये केला आहे. बुरहानने भारतीय फौजांशी लढण्यासंदर्भात रणनिती बनवताना आपल्याला विचारले असल्याची कबुली हाफिजने आज दिली.
हाफिजने यासंदर्भातील स्पष्टीकरण देताच भारतीय सुरक्षा एजन्सींनीही बुरहानचे कॉल रेकॉर्ड तपासले असता याची पुष्टी मिळाली आहे.
हाफिज सईद आणि सैय्यद सलाउद्दीन काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी हवालाच्या माध्यमातून 50 ते 60 कोटी रुपये पाठवले होते. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्येही आयएसआयचे अधिकारी, हाफिज सईद आणि सलाउद्दीन यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. या बैठकीवेळी जैशचा कमांडर अब्दुर रऊफही उपस्थित होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शंभर कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
बुरहान वानीच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी ४ कमांडर बनवण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यातील अशंतता अधिकच वाढवण्यासाठी हाफिज आणि सलाउद्दीन पाकिस्तानमधील कंट्रोल रूममध्ये बसून या कमांडरना मार्गदर्शन करत असल्याचेही आता समोर येत आहे.
======================================
न्यूयॉर्कमधील अपघातात कल्याणच्या गवई कुटुंबावर घाला
कल्याण : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात कल्याणच्या गवई कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातातून अकरा महिन्यांचं बाळ सुखरुप बचावलं आहे. मात्र अपघात होऊन 14 दिवस उलटले तरी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
होऊ शकलेले नाहीत.
होऊ शकलेले नाहीत.
भारतीय दूतावासाच्या अनास्थेमुळे या कुटुंबाची परदेशात परवड सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. आपल्या अख्ख्या परिवाराला गमावलेल्या आनंद गवईची कैफियत. काही दिवसांपूर्वी कल्याणचे रहिवासी कमल गवई हे पत्नी अर्चनासोबत न्यूयॉर्कला गेले. 4 जुलै रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी मुलगा चंदन, त्याची पत्नी मनिषासोबत फिरायला गेले. ते घराबाहेर गेले ते कायमचेच. एका भरधाव ट्रकच्या धडकेत होत्याचं नव्हतं झालं.
या अपघातातून मनिषा बचावल्या, पण त्या कोमात आहेत. 11 महिन्यांचा इभानही वाचला, पण दोन्ही हातांच्या फ्रॅक्चरसह. पण नियतीचा खेळ इथंच थांबला नाही. 14 दिवसांनंतरही भाऊ आनंद आणि स्वप्निलला मृतदेहांचा ताबा मिळालेला नाही. कारण त्यासाठी लागणार आहेत तब्बल 26 लाख रुपये. पण आता कुठे थोडीशी मदतीची आशा निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गवई कुटुंबियांची हाक ऐकून प्रस्ताव समोर ठेवला आहे.
======================================
केवळ 1 रुपयात स्मार्टफोन, शाओमीची आजपासून 3 दिवस खास ऑफर
मुंबई: चायनीज कंपनी शाओमीला भारतात येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त तीन दिवसांसाठी कार्निव्हाल (डिस्कउंट ऑफर आणि सेल) जाहीर केले आहे. हा सेल आजपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये शाओमीचे स्मार्टफोन खरेदी करताना किंमतीत स्पेशल डिस्काउंट तसेच 1 रुपयांत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
शाओमी आपल्या रजिस्टर यूजर्ससाठी काही ठराविक स्मार्टफोन मात्र 1 रुपयांना उपलब्ध करून देणार आहेत. आज 10 शाओमी MI5 आणि 100 MI 20000mAhचा पॉवर पॅक या ऑफरमध्ये सहभागी आहे.
तर उद्या म्हणजेच 21 जुलैला 10 शाओमी रेडमी नोट 3 आणि 10 mi बँड हे कार्निव्हल ऑफरमध्ये मिळणार आहे. तर या सेलच्या शेवटच्या दिवशी 22 जुलैला 10 शाओमी mi max आणि 100 mi ब्लूटूथ स्पीकर ऑफरमध्ये मिळणार आहे.
फ्लॅश डील सेल दर दिवशी दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुमचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. या रजिस्ट्रेशची माहिती कंपनीने शाओमीने आपल्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय शाओमीचा 10000mAhचा पॉवर पॅक, Mi ear कॅप्सूल हेडफोन, Mi in ear हेडफोन डिस्काउंटमध्ये मिळेल.
======================================
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निश्चित
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा सामना रंगणार आहे.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या ओहियोच्या क्लिवलॅण्डमध्ये सुरु असलेल्या वार्षिक संमेलनात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निश्चित करण्यात आलं. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर एकमत झालं.
राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार हा माझा सन्मान असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी संमेलनात संबोधित करताना दिली. “ही निवडणूक जिंकून अमेरिकेत खऱ्या अर्थाने बदल घडवेन. त्यामुळे रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला असाच पाठिंबा द्यावा,” असंही ट्रम्प म्हणाले.
======================================
'दबंग 3' मध्ये सलमानसोबत सोनाक्षी नव्हे, 'या' अभिनेत्रीची वर्णी
मुंबई : सलमान खानच्या ‘दबंग’ सीरिजला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळला होता. दबंगच्या आगामी तिसऱ्या भागाची उत्सुकता आहेच, त्याप्रमाणे सलमानसोबत कोणत्या अभिनेत्री वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी परिणीती चोप्राची निवड होण्याचे संकेत आहेत.
चुलबुल पांडे साकारणाऱ्या सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पहिल्या दोन भागांमध्ये झळकली होती. मात्र तिसऱ्या भागात सोनाक्षीऐवजी नवा चेहरा दिसण्याची शक्यता आहे. अनेक अभिनेत्रींना मागे टाकत परिणीतीला ही संधी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
सोनाक्षीसोबत काम करण्यास सलमान खान फारसा उत्सुक नसल्यामुळे निर्माता अरबाज खानने नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. अरबाजचा ‘डॉली की डोली’ सोनाक्षीने नाकारल्यामुळे अरबाज नाखुश होता, त्यातूनच सोनाक्षीला हटवल्याची चर्चा आहे. दबंग 3 च्या पटकथेवर सध्या काम सुरु असून पुढल्या वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
======================================
येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता: हवामान खातं
मुंबई: राज्यभरात विश्रांतीनंतर परत एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, काल दिवसभरात मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं जोरदार कमबॅक केला. मुंबईसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ शहरांमध्येही दमदार पाऊस झाला. तर गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत साधारण 15 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणात कालपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार आजही कायम आहे. तळकोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने आज हजेरी लावली आहे. अनेक ग्रामीण भागातील नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र, अद्याप कुठेही पूर परिस्थिती नाही.
======================================
नवरदेवाची बाईक सुसाट, वधू मागच्या मागे पडली
मुंबई : नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या एका जोडप्याच्या बाईक राईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिलात तर तुमचीही हसता हसता पुरेवाट होईल.
लगीनगाठ बांधल्यानंतर नवरदेव भलत्याच खुशीत आपल्या पत्नीला बाईकवर घेऊन चालले होते. मात्र या खुशीत असताना मधेच एक स्पीडब्रेकर लागला आणि वधू मागच्या मागे खाली पडली. विशेष म्हणजे आपली नवविवाहित पत्नी खाली पडल्याचं या महाशयांच्या ध्यानातच नाही आलं आणि ते सुसाट पुढे निघून गेले.
नवरोबाची ही स्कूटरही फार मजेशीर आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी ही स्कूटी दोघांच्या आकाराच्या मानाने व्हिडिओत अगदीच लहानशी दिसत आहे.
सुदैवाने इतर पादचारी तरुणीच्या मदतीला धावले आणि तिला उचललं. तिला फारशी दुखापत झाली नसावी, मात्र नवऱ्याशी भेट झाल्यानंतर दोघांमध्ये काय झालं असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
======================================
शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती
मुंबई : ठाकरे बंधूंच्या संपत्तीच्या वाद हायकोर्टात गेल्यापासून जयदेव आणि उद्धव यांच्यातले मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. हायकोर्टात सुरु असलेल्या उलटतपासणीत जयदेव यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत, राजकीय वारशाबाबतही धक्कादायक माहिती दिली.
ठाकरे बंधूमधला संपत्तीचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. हायकोर्टात उलटतपासणी दरम्यान सुरु असलेल्या गौप्यस्फोटाची मालिका जयदेव ठाकरेंनी सुरुच ठेवली.
“राजकीय वारसा मी पुढे न्यावा, ही बाळासाहेबांची इच्छा होती”
“बिंदुमाधव मातोश्रीतून बाहेर पडल्यावर मी राजकीय वारसा पुढे न्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. 1995 मध्ये बाळासाहेबांनी तू माझा राजकीय वारसा चालवं, असं म्हटलं होतं. बिंदुमाधव राजकारणात येण्यासाठी कधीच उत्सुक नव्हता.”, अशी माहिती जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात उलटतपासणीवेळी दिली.
सध्या शिवसेनेची कमान उद्धव ठाकरेंकडे आहे. शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे गेल्याचं जयदेव ठाकरेंना रुचलेलं दिसत नाही.
======================================
दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिल्यानं प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत
विरार: विरारमध्ये मंगळवारी एकोणीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडलेल्या किंजल शहा हिची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 24 वर्षीय प्रियकरानंच किंजलचा खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
मयत तरुणी सोमवारी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी राहत्या इमारतीच्या शेजारीच मृतदेह सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. याबाबत अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण ती हत्या की आत्महत्या याचा पोलिस तपास करत असतानाच. तुलिंज पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
तुलिंज पोलिसांना चौकशी दरम्यान, किंजलची हत्या करणारा आरोपी सापडला. चौकशी दरम्यान त्याने अर्नाळा पोलिसात किंजलचा खून केल्याचं कबूल केलं. आरोपीचं नाव देवेंद्र दिनकर भोसले (24 वर्ष) असून तो नालासोपाऱ्यातील मोरेगांवमधील एकविरा अपार्टमेंटमध्ये राहणारा आहे.
देवेंद्र आणि किंजल यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, एका दुसऱ्याच तरुणाबरोबर किंजलला फिरताना पाहिल्यानं त्याला राग आला होता. हत्येच्या दिवशी देवेंद्र किंजलला घेऊन तुंगारेश्वर येथे गेला होता. त्यानंतर त्यानं तिला तिथल्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिला रिक्षात बसवून तिचा मृतदेह सोसायटीजवळ फेकून दिला.
======================================
मुलीच्या लग्नासाठी तगादा लावल्यानं आईची आत्महत्या
डोंबिवली: लग्नासाठी नकार दिल्यानंतरही तरुणानं सतत तगादा लावल्यानं, कंटाळून मुलीच्या आईनं आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. याप्रकरणी गिरीश बच्छाव या एकतर्फी प्रेमवीराला अटक करण्यात आली आहे.
गीता साळुंखे ही 35 वर्षीय महिला त्यांच्या 17 वर्षीय मुलीसह डोंबिवलीतल्या मानपाड्यात राहत होती. गिरीश बच्छाव हा रिक्षाचालक तिच्याकडे जेवायला येत होता. गिरीशला गीता यांच्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, याला गीता यांचा विरोध होता. त्यानंतरही गिरीशनं लग्नासाठी तगादा लावत मानसिक त्रास देणं सुरुच ठेवलं. अखेर गीता यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं. यामध्ये गीता यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी एकतर्फी प्रेमवीर गिरीश याला अटक केली असून. गिरीशला बच्छावला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
======================================
यवतमाळमध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप
यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर किसन झिताजी राठोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
डॉ. राठोड यांच्याविधोरात तब्बल आठ महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. त्यापैकी दोन महिलांनी अधिकाऱ्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोग्य अधिकाऱ्याला अटक केलेली नाही.
डॉक्टर राठोड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्याचबरोबर त्यांचे राजकीय हितसंबंध असल्यानं पोलिसांच्या कारवाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.
======================================
बलात्कार पीडितेची उलट तपासणी, महिला आयोगाच्या सदस्यावर आरोप
जळगावः जळगावमध्ये महिला आयोगाच्या सदस्यावर असंवेदनशीलपणाचा गंभीर आरोप होत आहे. शहरातील मेहरुण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र महिला आयोगाच्या सदस्यांनी सांत्वन करण्याऐवजी मुलीच्या कुटुंबीयांचीच उलट तपासणी केली, असा आरोप आहे.
महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट दिली. मात्र या भेटीत ठाकरे यांनी सर्वांसमोर पीडित मुलीची उलट तपासणी केल्याचा आरोप लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.
देवयानी ठाकरे यांच्या विरोधात सध्या तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र देवयानी ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून महिला आयोग मुलीच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे.
======================================
टीव्ही अभिनेता अनुज सक्सेना सीबीआयच्या रडारवर
नवी दिल्ली : देख भाई देख, कुसुम, कुमकुम यासारख्या हिंदी मालिका आणि देवयानी सारख्या मराठी मालिकेत झळकलेला टीव्ही अभिनेता सीबीआयच्या रडारवर आहे. अनुजच्या शोधासाठी दिल्लीत सीबीआयने छापे टाकले आहेत.
अनुजने लाच देण्यासाठी दिल्लीत मध्यस्थाचा शोध घेतला होता. याप्रकरणातला दलाल विश्वदीप बन्सलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र अनुजभोवती कायद्याचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.
अनुजच्या एल्डर फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून परदेशातील कंपन्यांनाही पैसा पुरवण्यात आला होता. दुबई आणि बल्जेरियासह अन्य देशात पैसा पाठवला गेल्याचा संशय आहे. अनुजच्या कंपनीवर 138 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी करणारा अहवाल दाबण्यासाठी लाच घेतल्याचं वृत्त आहे.
======================================
सई ताम्हणकरच्या 'वाय झेड' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. सई ताम्हणकरसोबत या सिनेमात मुक्ता बर्वेही दिसणार आहे. ‘वाय झेड’चा ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
======================================
खोट्या कागदपत्रांनी महागड्या गाड्या विकणारी टोळी गजाआड
नवी मुंबई : खोट्या कागदपत्रांद्वारे महागड्या गाड्या विकणाऱ्या टोळीला कामोठे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रविण खंदबाज, विकी गायकवाड, मोसम पाटील आणि विश्वास कदम अशी चार आरोपींची नावं आहेत.
चौघा आरोपींनी साई समर्थ टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स नावानं कंपनी सुरु केली होती. यामध्ये गाड्या भाड्यानं लावल्या जात असत. पुढे या चौघांनी गाडी मालकांना अंधारात ठेवून परस्पर खोटी कागदपत्रं तयार केली आणि गाड्यांची विक्री केली.
या टोळीचा कारनामा लक्षात आल्यानंतर गाडी मालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. कामोठे पोलिसांनी या टोळीकडून पावणे दोन कोटींची वाहनं जप्त केली आहेत. या टोळीकडे आणखी काही गाड्या असण्याची शक्यता आहे.
======================================
सिद्धिविनायकाचरणी आता पैसे, दागिनेच नव्हे, शेअर्सचंही दान
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आतापर्यंत पैसे, दागिने या स्वरुपात दान देण्याची सुविधा होती. मात्र आता शेअर्सच्या माध्यमातूनही दान देता येणार आहे.
सिद्धिविनायक देवस्थान देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानलं जातं. या मंदिरात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचं दान दिलं जातं. त्यामुळे आता देवस्थानाकडून दान करण्यासाठी थेट डी मॅट अकाऊंट सुरु करण्यात आलंय.
या डीमॅट अकाऊण्टद्वारे भाविक आता मंदिराच्या दानपेटीमध्ये रोख रक्कम टाकण्याऐवजी शेअर्सही दान करु शकणार आहेत. ‘श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई’ या नावानं हे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलंय.
======================================
सिद्धिविनायकाचरणी आता पैसे, दागिनेच नव्हे, शेअर्सचंही दान
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आतापर्यंत पैसे, दागिने या स्वरुपात दान देण्याची सुविधा होती. मात्र आता शेअर्सच्या माध्यमातूनही दान देता येणार आहे.
सिद्धिविनायक देवस्थान देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानलं जातं. या मंदिरात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचं दान दिलं जातं. त्यामुळे आता देवस्थानाकडून दान करण्यासाठी थेट डी मॅट अकाऊंट सुरु करण्यात आलंय.
या डीमॅट अकाऊण्टद्वारे भाविक आता मंदिराच्या दानपेटीमध्ये रोख रक्कम टाकण्याऐवजी शेअर्सही दान करु शकणार आहेत. ‘श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई’ या नावानं हे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलंय.
======================================
कोहली अँड कंपनीला सर व्हिवियन रिचर्ड्स यांचा मोलाचा सल्ला
अँटिगा (वेस्ट इंडिज): वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिवियन रिचर्ड्स यांना भेटून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार धन्य झाले आहेत. व्हिव रिचर्ड्स टीम इंडियाच्या शिलेदारांना भेटण्यासाठी स्वत: त्यांच्या अँटिगातील हॉटेलात दाखल झाले होते.
भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 21 जुलैपासून अँटिगात म्हणजे रिचर्ड्स यांच्याच गावात सुरुवात होत आहे. या कसोटीच्या पार्श्वभूमीवरच टीम इंडियासोबतच्या रिचर्डसच्या भेटीचा योग जुळून आला.
‘वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव रिचर्डस यांच्यासोबतच्या भेटीचा क्षण अविस्मरणीय होता. त्यांच्याकडून मिळालेला सल्ला हा माझ्यासाठी अनमोल होता’, या शब्दात विराट कोहलीने रिचर्ड्स यांच्यासोबतच्या भेटीचं वर्णन केलं.
======================================
कारगील युद्धात भारताने पाकिस्तान एअरबेस नेस्तानाबूत करण्याची केली होती तयारी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 20 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगील युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तान एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती. 13 जूनला हल्ल्याची सर्व तयारी पुर्ण झाली होती. भारतीय हवाई दल संपुर्ण ताकदीनिशी पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या एअरबेसवर हल्ला करणार होतं. मात्र हल्ला करण्याची सूचना न मिळाल्याने ही योजना रद्द करावी लागली.एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सर्व ठिकाण भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होती. 16 विमान पुर्ण तयार ठेवण्यात आली होती. हल्ला करण्याचा मार्गही तयार होता. सर्व वैमानिकांना खासगी रिव्हॉल्वर लोड करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. वैमानिकांजवळ पाकिस्तानी चलनाचीदेखील व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. जेणेकरुन आपातकालीन परिस्थितीत विमानातून उतरावं लागलं तर त्यांना सुरक्षित निघता यावं.
======================================
म्हाडाच्या ९७२ घरांसाठी १ लाखापेक्षा जास्त अर्ज
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - म्हाडाच्या मुंबई विभागातील ९७२ घरांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात येणार असून, आतापर्यंत या घरांसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. म्हाडाच्या सोडतीची घरे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहे. म्हाडाच्या सोडतीच्या घरांसाठी २३ जून ते २३ जुलै यावेळेत नोंदणी करता येईल.२४ जून ते २५ जुलै याकाळात ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तर अॅक्सिस बँकेत डीडी भरण्याचा कालावधी २४ जून ते २७ जूलै असा आहे. घरांची सोडत १० ऑगस्ट रोजी काढण्यात येईल. म्हाडाच्या ९७२ घरांपैकी ४७७ घरे खुल्या गटासाठी उपलब्ध आहे.उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत; आणि त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे.
======================================
रिपब्लिकन पार्टीकडून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर
- ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. 20 - रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. ट्रम्प यांनी 1237 मताधिक्य मिळवून रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत बंडखोरांमुळे ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्याची धाकधूक लागली होती. मात्र राज्यांनी 16 उमेदवारांसाठी केलेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक मते मिळवून उमेदवारीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या मुलानंही आनंद व्यक्त केला आहे. 89 उमेदवारांमधून माझ्या वडिलांची निवड होणे हे गौरवास्पद आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करत असून, वडिलांचं अभिनंदनही केलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबरात होणारी निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे आता स्पष्ट झाले आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात थेट निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत.
======================================
हैदराबादच्या रोहित खंडेलवाने 'मिस्टर वर्ल्ड 2016' खिताब जिंकत रचला इतिहास
- ऑनलाइन लोकमत -साऊथ पोर्ट (लंडन), दि. 20 - हैद्राबादच्या रोहित खंडेलवाने 'मिस्टर वर्ल्ड 2016' चा खिताब जिंकला आहे. साऊथपोर्ट थिएटरमधील फ्लोरल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात रोहित खंडेलवालला 'मिस्टर वर्ल्ड 2016' चा खिताब देण्यात आला. विशेष म्हणजे प्रथमच एका भारतीयाने ही स्पर्धा जिंकत 'मिस्टर वर्ल्ड 2016' खिताबावर आपलं नाव कोरलं आहे.रोहितसाठी ही स्पर्धा फारच कठीण होती. रोहितसमोर जगभरातील 47 स्पर्धकांचं आव्हान होतं. पण रोहितने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ही स्पर्धा जिंकून खिताब आपल्या नावावर केला. रोहितला 50 हजार डॉलरचं (33 लाख 60 हजार) बक्षिसही देण्यात आलं आहे. रोहितने यावेळी डिझाईनर निवेदिता साबूने डिझाईन केलेले कपडे घातले होते. रोहितला या स्पर्धेसाठी तयार करण्याकरिता 20 लोकांच्या टीमने मेहनत घेतली होती. रोहित खंडेलवालने 2015 मध्ये 'प्रोवोग पर्सनल केअर मिस्टर इंडिया 2015' स्पर्धाही जिंकली होती.
======================================
जर्मनीत अल्पवयीन तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला, पोलिसांनी केलं ठार
- ऑनलाइन लोकमत -बर्लिन, दि. 19 - दक्षिण जर्मनीत एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने ट्रेनमधील प्रवाशांवर हल्ला केला. कु-हाड आणि चाकूने केलेल्या या हल्ल्यात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचा नागरिक असणा-या या तरुणाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ठार केलं आहे.बवेरिया शहराचे मंत्री जोआचिम हेर्रमन यांनी हल्लेखोर तरुण अफगाण नागरिक ओच्सेनफर्ट येथे राहत होता अशी माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 वाजता स्टेशनला ट्रेन पोहोचली असता काही वेळातच तरुणाने कु-हाड आणि चाकूच्या सहाय्याने प्रवाशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. हल्ला केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी गोळ्या घालून त्याला ठार केलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. हल्ल्याचं नेमक कारण अजून कळू शकलेलं नाही.
======================================
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीसीएला झटका
- कानपूर : लोढा समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याचा मोठा झटका उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला (यूपीसीए) बसणार आहे. संघटनेचे सर्वच निर्देशक ७०हून अधिक वर्षांचे असून, संघटनेचे कोशाध्यक्ष यांनाही पदावरून पायउतार व्हावे लागेल.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोएब अहमद (७८ वर्षे), पी. डी. पाठक (८३), मदन मोहन मिश्रा (८३), एस. के. अग्रवाल (७९) आणि ज्योती वाजपेयी (८०) असे पाचही निर्देशक आणि कोशाध्यक्ष के. एन. टंडन (८१) हे लोढा समितीच्या शिफारशींनुसार संघटनेवर कार्य करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे, दुहेरी हितसंबंधांच्या नियमाप्रमाणे सीएओ दीपक शर्मा आणि वरिष्ठ निवड समितीचे सदस्य ज्ञानेंद्र पांडट्ये यांनादेखील आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे.शर्मा यांची दोन्ही मुले १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळत असून, पांड्ये यांचा पुतण्या संभाव्य रणजी संघात आहे. त्याच वेळी दुसरीकडे लोढा समितीच्या या शिफारशींमुळे यूपीसीएमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार असल्याने माजी रणजी खेळाडू आनंदी आहेत.
======================================
बिंद्रा पाचव्यांदा, तर नारंग, योगेश्वर चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार
- नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक असलेला नेमबाज अभिनव बिंद्रा रिओमध्ये कारकिर्दीतील पाचव्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे, तर लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेता नेमबाज गगन नारंग आणि मल्ल योगेश्वर दत्त चौथ्यांदा आॅलिम्पिक खेळणार आहेत. महान टेनिसपटू लिएंडर पेस कारकिर्दीतील विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे.नारंगसह योगेश्वर आणि थाळीफेकपटू विकास गौडा कारकिर्दीतील चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. विकास खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, पण भारतीय अॅथलेटिक्स महासंघ अखेरच्या क्षणापर्यंत त्याच्या फिटनेसची प्रतीक्षा करणार आहे.चार वर्षांपूर्वी लंडनमध्ये कांस्यपदक पटकावणारा नारंग रिओमध्ये तीन स्पर्धांमध्ये (१० मीटर एअररायफल, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन आणि ५० मीटर रायफल प्रोन) सहभागी होणार आहे. योगेश्वर ६५ किलो वजनगटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. योगेश्वरने लंडनमध्ये कांस्यपदक पटकावले होते आणि रिओमध्येही त्याच्याकडून पदकाची आशा आहे.लंडनमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली बॅडमिंटनस्टार सायना नेहवाल आणि महिला तिरंदाज बोम्बायलादेवी कारकिर्दीत तिसऱ्यांदा आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. सायना महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे, तर बोम्बायलादेवी वैयक्तिक व सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी इव्हेंटमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.
======================================
७ लाख ग्राहकांची गॅस सबसिडी बंद
- नवी दिल्ली : वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या सात लाख सिलिंडर ग्राहकांची सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारची तब्बल ५० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. २०१५-१६ मध्ये सरकारने २७ हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. त्याच्या मागील वर्षी ही सबसिडी ७६ हजार कोटी रुपये एवढी होती.उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना सबसिडी न देता, त्याचा लाभ आर्थिक दुर्बल गटांना देण्याच्या सरकारच्या योजनेमुळे दहा लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आता ही सबसिडी बंद झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना एजन्सीला शपथपत्र द्यावे लागते की, त्यांचे उत्पन्न हे दहा लाखांपेक्षा कमी आहे. सरकारने गॅस सिलिडंर कंपन्यांना सिलिंडरची किंमत दोन रुपयांनी वाढविण्याची तर रॉकलच्या दरात ५० पैसे प्रती लीटर वाढ करण्याची परवानगी दिली आहे.
======================================
सिद्धू यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच- अमरिंदरसिंग
| |
-
| |
चंदिगड - भाजपमधून बाहेर पडलेले राज्यसभेचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी काँग्रेस पक्षाची दारे उघडी असून, त्यांचे पक्षात स्वागतच करण्यात येईल, असे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.
भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला आहे. सिद्धू हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यात पंजाब विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. आता सिद्धू यांच्यासाठी काँग्रेसनेही आपली दारे उघडी ठेवली आहेत.
अमरिंदरसिंग म्हणाले की, आम्ही सिद्धू यांचे खुल्या मनाने काँग्रेसमध्ये स्वागत करु. काँग्रेसची दारे सर्वांसाठी खुली आहेत. त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल. याबाबत माझी अद्याप सिद्धू यांच्याशी कोणताही चर्चा झालेली नाही. तसेच पक्षातील वरिषेठ नेतेही त्यांच्या संपर्कात असल्याचे माहिती नाही. आम्ही दोघेही पटियालाचे असून, दोघेही सिद्धू आहोत.
======================================
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या बुद्ध्यांकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एन सी म्हणाल्या, "ज्या ज्या वेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतात त्या त्या वेळी त्यांच्या बुद्ध्यांकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. आदरणीय न्यायालयाने त्याबाबतचा पुरावा मागितला आहे. त्यांनी संघाविषयी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून त्यांचे बालिशपण आणि अपरिपक्वता दिसून येते.‘ तसे जर ते गंभीर प्रश्नावर उत्तर देण्यास समर्थ नसतील तर त्यांनी असे प्रश्नच उपस्थित करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला. तर "राहुल गांधी खऱ्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून लोकांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे. मात्र एवढे होऊनही संघाची आणि देशातील जनतेची माफी मागण्याऐवजी राहुल अत्यंत गर्विष्ठ भावनेने अवमान करत आहेत‘, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
राहुल गांधींच्या बुद्ध्यांकावर भाजपचे प्रश्नचिन्ह

अयोध्या - अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वांत जुने पक्षकार हाशिम अन्सारी (वय 96) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले.
'बाबरी'तील पक्षकार हाशिम अन्सारी यांचे निधन
| |
-
| |
हाशिम अन्सारी यांनी फैजाबादमधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. अन्सारी हे 22-23 डिसेंबर, 1949 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानंतर अन्सारी हेच पहिले पक्षकार होते. अन्सारी हे 1959 पासून बाबरी मशीदप्रकरणी मुस्लिमांच्या बाजूने लढत होते. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना 8 महिने कारागृहात काढावे लागले होते. अयोध्येत आंदोलनादरम्यान तणाव असताना लोकांना शांततेचे आवाहन करणारे अन्सारी यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तितकाच सन्मान मिळत होता.
अन्सारी यांनी अनेकवेळा न्यायालयाबाहेर जाऊन हिंदू धर्मगुरुंची भेट घेऊन हा मुद्दा मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अन्सारी यांनी 2014 मध्ये हा खटला न लढवण्याची घोषणा केली होती.
======================================

राहुल गांधींना न्यायालयाने खडसावले
| |
-
| |
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहाणीच्या खटल्यात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. एखाद्या संघटनेतील सर्वांची तुम्ही सरसकट बदनामी करू शकत नाही. या प्रकरणी माफी मागा अन्यथा खटल्यास सामोरे जा, अशा शब्दांत न्यायालयाने राहुल यांना खडसावले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक मिश्रा आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ऐतिहासिकदृष्ट्या राहुल यांचे वक्तव्य बरोबर समजले तरी ते लोकहिताचे नाही. तुम्ही एखाद्या संघटनेतील सर्वांची सरसकट जाहीर बदनामी करू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांची हत्या केली, असे वक्तव्य राहुल यांनी भिवंडीतील प्रचार सभेत बोलताना केले होते. त्याविरोधात संघाकडून राहुल यांच्याविरोधात मानहाणीचा दावा दाखल करण्यात आला आहे. हा खटला रद्द करण्यात यावा, यासाठी राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारी कागदपत्रांतील माहिती आणि पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे राहुल यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले होते, असे राहुल यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.
======================================
No comments:
Post a Comment