*[अंतरराष्ट्रीय]*
१- सौदीत 'पोकेमॉन गो' विरोधात फतवा
२- रिओ आॅलिम्पिक दहशतवादमुक्त ठरवू : ब्राझील
३- न्यूझीलंड; पोकेमॉन खेळण्यासाठी 'त्याने' सोडली नोकरी
४- काश्मीर मुद्यावरील पाक पंतप्रधानांचे भाषण रद्द
५- तुर्कस्तानमध्ये 3 महिन्यांसाठी आणीबाणी
६- काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नाही-शरीफ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
७- नागझिरा अभयारण्यात दोन महिन्यांपासून व्याघ्रदर्शन नाही
८- गुजरातमधील दलित मारहाण प्रकरणाचे संसदेत पडसाद
९- दहशतवादी बु-हानला मारण्याची काय गरज होती ? लोकसभेत PDPचा सरकारला सवाल
१०- एसबीआय उभारणार एक अब्ज डॉलर निधी
११- अमृतसर; स्पाईसजेटच्या विमानात सापडली संशयास्पद बॅग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप
१३- सोलापुरात मश्रुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
१४- लखनऊ; दयाशंकर सिंहच्या अटकेसाठी बसपची तीव्र निदर्शने
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- साताऱ्यात मगरीला त्रास देणाऱ्या दोघांना अटक
१६- पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींसह एक दलाल अटकेत
१७- मुंबई; स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात
१८- पुणे; पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात दोन शालेय मुलींचे मृतदेह
१९- परभणी; तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार
२०- मालेगाव; गटारीत उतरुन आंदोलन करणं पडलं महागात
२१- अमरावती; अवैधरित्या गाय वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू
२२- पंढरपूर; पत्नी, मुलीचा खून करून 'तो' गेला पोलिसांकडे
२३- कणकवली; दहावीत ९२ टक्के मिळवूनही भविष्य अंधकारमय
२४- औरंगाबाद; निर्दयी मातेने पोरींना ढकलले देहविक्रीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- विंडिज दौऱ्यात विराट कोहलीचं खास अस्त्र
२६- नाट्यगृहाच्या सफाईसाठी अभिनेता प्रशांत दामलेंच्या हाती झाडू
२७- विंडीजविरुद्ध आज पहिली कसोटी, टीम इंडियासह प्रशिक्षक कुंबळेचीही परीक्षा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
================================================

सेल्फीप्रेमींचा उतावीळपणा अनेकदा त्यांच्या जीवावर आला आहे. मात्र तरीही सेल्फीचं फॅड कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला.
कण्हेर धरणाच्या परिसरात मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं. यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली. यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टिंगल टवाळ्या सुरु केल्या. कोणी मगरीला हात लावून हूसकवत होतं तर कोणी सेल्फीची हौस पुरवून घेतं होतं.

संत एकनाथ नाट्यगृह सध्या मरणयातना भोगत आहे. या हॉलला नाट्यगृह म्हणावं का, असा प्रश्न नाट्यरसिकांसह कलाकरांनाही पडला. अखेर नाट्यकर्मींनी हातात झाडू घेत रंगमंचाची साफसफाई सुरु केली.
काही कलाकारांनी रंगमंचावरील खिळे ठोकले तर, फाटलेल्या खुर्च्या आणि पडदेसुद्धा या नाट्यप्रेमींनी शिवले. काम नावासाठी नाही तर गावासाठी करीत असल्याचं या नाट्यकर्मींचं म्हणणं आहे.
राज्यभरातील नाट्यगृहांची अशीच उपेक्षा होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी प्रशांत दामले यांनी केली आहे.

स्नेहा मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी या मुलींची नावं आहेत. त्यांचा मृतदेह चंदननगरच्या परिसरात आढळला. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

बुधवारी रात्रभर सोलापूर भागात मुसळधार पाऊस पडत होता. त्याचवेळी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. याचाच फायदा चोरट्यांनी उचलून कळस लांबवल्याचं बोललं जातंय.
सकाळी पुजारी आल्यानंतर प्रसिद्ध गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला 25 तोळे सोन्याचा मुलामा होता.

या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आलेली असून 4 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. उना भागात काही दलित तरुणांवर गायींचं कातडं काढून विकल्याचा आरोप झाला. त्यानंतर चार तरुणांना मारहाण झाली होती.
दरम्यान उना प्रकरणाचे लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले. यावर उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

मृतांमध्ये किशोर इंगळे, शिल्पा इंगळे आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार खरवाडी फाट्याजवळ या ट्रकनं जवळपास 18 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. त्यात इंगळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान यावेळी संतप्त जमावानं ट्रकवर दगडफेक केली. अवैधरित्या गायींना कत्तलीसाठी नेणाऱ्या या ट्रकचा पाठलाग पोलीस करत होते, त्यावेळी हा अपघात घडला.
दरम्यान कालच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज चांदूर बाजारात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. ट्रकचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे.

नागझिरा अभयारण्यात दोन महिन्यांपासून व्याघ्रदर्शन नाही
नागपूर : नागझिरा अभयारण्यात गेल्या दोन महिन्यांपासून एकही वाघ दृष्टीस पडलेला नाही. त्यामुळे अभयारण्याले वाघ नेमके गेले कुठे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नागझिरा अभयारण्य हे मध्य भारतामधील ताडोबानंतरचं वाघांचं सर्वात मोठं जन्मस्थान मानलं जातं. मात्र या अभयारण्यात एकही वाघ दिसत नसल्याच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नागझिरा अभयारण्याच्या वनाधिकाऱ्यांना जेव्हा वाघाच्या गायब होण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्याकडेही या प्रश्नावर समाधानकार उत्तरं नव्हती.
================================================
साताऱ्यात मगरीला त्रास देणाऱ्या दोघांना अटक
सातारा : साताऱ्यात मगरीसोबत सेल्फी काढणाऱ्या दोघांना अखेर अटक झाली आहे. ‘एबीपी माझा’ने मगरीसोबत सेल्फी काढणाऱ्यांची बातमी दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
सेल्फीप्रेमींचा उतावीळपणा अनेकदा त्यांच्या जीवावर आला आहे. मात्र तरीही सेल्फीचं फॅड कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला.
कण्हेर धरणाच्या परिसरात मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं. यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली. यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टिंगल टवाळ्या सुरु केल्या. कोणी मगरीला हात लावून हूसकवत होतं तर कोणी सेल्फीची हौस पुरवून घेतं होतं.
================================================
पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींसह एक दलाल अटकेत
पुणे: पुण्याच्या कोथरुड भागातील भुसारी कॉलनीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी एका दलालासह तीन मुलींना अटक केली आहे. रवी शिवाजी तपासे असं दलालाचं नाव आहे.
हा वेश्या व्यवसाय कल्याणी देशपांडे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कल्याणी देशपांडे ही वेश्या व्यवसायातील नामचीन दलाल आहे. आतापर्यंत पुण्यातील विविध पोलिस स्टेशनमधे तिच्यावर 22 गुन्हे नोंद आहेत. तर एकदा मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तीनही मुलींपैकी दोघींजणी या मुंबईतील आहेत. तर एक मुलगी ही पनवेलमधील असल्याची माहिती समजते आहे.
================================================
विंडिज दौऱ्यात विराट कोहलीचं खास अस्त्र
अँटिगा: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत आक्रमक खेळ करण्यावर आपला भर राहील असं भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी कोहलीने मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीवर विश्वास टाकला आहे.
टीम इंडिया अँटिगा कसोटीत पाच गोलंदाज खेळवण्याच्या विचारात असल्याचे संकेतही विराटनं दिले आहेत.
================================================
नाट्यगृहाच्या सफाईसाठी अभिनेता प्रशांत दामलेंच्या हाती झाडू
औरंगाबाद : औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह सध्या मोडकळीस आलं आहे. महापालिका सुधारणा करीत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंसह अन्य कलाकारांनी नाट्यगृहाच्या डागडुजीचं काम हाती घेतलं.
संत एकनाथ नाट्यगृह सध्या मरणयातना भोगत आहे. या हॉलला नाट्यगृह म्हणावं का, असा प्रश्न नाट्यरसिकांसह कलाकरांनाही पडला. अखेर नाट्यकर्मींनी हातात झाडू घेत रंगमंचाची साफसफाई सुरु केली.
काही कलाकारांनी रंगमंचावरील खिळे ठोकले तर, फाटलेल्या खुर्च्या आणि पडदेसुद्धा या नाट्यप्रेमींनी शिवले. काम नावासाठी नाही तर गावासाठी करीत असल्याचं या नाट्यकर्मींचं म्हणणं आहे.
राज्यभरातील नाट्यगृहांची अशीच उपेक्षा होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी प्रशांत दामले यांनी केली आहे.
================================================
स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात
नवी मुंबई : नवी मुंबईत 15 वर्षीय स्वप्नील सोनावणेच्या हत्ये प्रकरणी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित तरुणीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये हत्या झाल्याचं काल उघड झालं होतं.
नेरुळ पोलिसांनी तरुणीची आई, वडील राजेंद्र नाईक (वडील, वय 50 वर्ष), सागर नाईक (भाऊ, वय 25 वर्ष), साजेश नाईक (भाऊ, वय 22 वर्ष), दुर्गेश पाटील (मित्र, वय 22 वर्ष), आशिष ठाकूर (मित्र, वय 23 वर्ष) आणि एक रिक्षावाला अशा सात आरोपींना अटक केली आहे.
तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
================================================
पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात दोन शालेय मुलींचे मृतदेह
पुणे : दोन शालेय मुलींचे मृतदेह मुळा मुठा नदीच्या पात्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी मृत्यूचं गूढ कायम आहे.
16 तारखेला वडगाव परिसरातील चार मुली काही मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या. त्यापैकी दोघी मुली घरी परतल्याच नाहीत. त्यांचा मृतदेह नदीत दोरीने हातात हात बांधलेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात आढळला आहे.
स्नेहा मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी या मुलींची नावं आहेत. त्यांचा मृतदेह चंदननगरच्या परिसरात आढळला. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
================================================
सोलापुरात मश्रुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
सोलापूर : सोलापुरात हिप्परगामधील मश्रुम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. तब्बल 25 तोळे सोन्याचा कळस चोरट्यांनी लांबवला आहे.
बुधवारी रात्रभर सोलापूर भागात मुसळधार पाऊस पडत होता. त्याचवेळी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. याचाच फायदा चोरट्यांनी उचलून कळस लांबवल्याचं बोललं जातंय.
सकाळी पुजारी आल्यानंतर प्रसिद्ध गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला 25 तोळे सोन्याचा मुलामा होता.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
================================================
विंडीजविरुद्ध आज पहिली कसोटी, टीम इंडियासह प्रशिक्षक कुंबळेचीही परीक्षा
अँटिगा: अनिल कुंबळेच्या तालमीत नव्या आत्मविश्वासानं भरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि विंडीज संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून अँटिगामध्ये सुरुवात होत आहे.
कधी ड्रम सेशन… कधी व्हॉलीबॉल… तर कधी साखळी साखळी… भारतीय संघाच्या टीम बॉण्डिंगसाठी कुंबळे गुरुजींनी सरावात प्रयोगांची जणू मालिकाच राबवली. कुंबळे गुरुजींच्या या प्रयोगांनी टीम इंडियाच्या फिटनेस आणि आत्मविश्वासात नक्कीच मोलाची भर घातली आहे. आता विंडीज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्याच्या दृष्टीनं कोहली अँड कंपनी किती कणखर बनली आहे, याची पहिली परीक्षा अँटिगाच्या मैदानात होणार आहे. अँटिगातली ही परीक्षा केवळ टीम इंडियाचीच नाही, तर कुंबळे गुरुजींचीही पहिली परीक्षा असेल.
विराट कोहलीची टीम इंडिया आणि जेसन होल्डरची वेस्ट इंडियन फौज यांच्यामधला पहिला कसोटी सामना आजपासून अँटिगाच्या सर व्हिव रिचर्डस स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत विराट अँड कंपनीचं पारडं बरंच जड आहे आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनंही ही बाब मान्य केली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी उच्च दर्जाची आहे. तसंच भारतीय संघाच्या तुलनेत विंडीजचा संघ हा तरुण आणि अननुभवी आहे. त्यामुळं भारताचं आव्हान आमच्यासाठी कठीण असल्याचं होल्डरनं म्हटलं होतं. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला वाटणारी चिंता नक्कीच चुकीची नाही.
================================================
गुजरातमधील दलित मारहाण प्रकरणाचे संसदेत पडसाद
अहमदाबाद : गुजरातच्या उनामध्ये दलितांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण संसदेत गाजलं आहे. मारहाणीविरोधात काल अहमदाबाद आणि राजकोटमध्ये बंद पाळण्यात आला. अनेक दलित संघटनांनी या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आलेली असून 4 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. उना भागात काही दलित तरुणांवर गायींचं कातडं काढून विकल्याचा आरोप झाला. त्यानंतर चार तरुणांना मारहाण झाली होती.
दरम्यान उना प्रकरणाचे लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले. यावर उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
================================================
तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार
परभणी: राज्यात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाही. कारण तलवारीचा धाक दाखवून तरुणानं 35 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे.
पीडित महिलेच्या परिसरातच राहणाऱ्या तरुणानं रात्री तलवारीचा धाक दाखवत, शेजारीच्या मैदानात नेलं आणि पीडितेवर बलात्कार केला. हा संपूर्ण प्रकार महिलेनं तिच्या पतीला आणि नातेवाईकांना सांगितला आणि प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीविरोधात बलात्कार, अवैध शस्त्र बाळगणे आणि अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
================================================
गटारीत उतरुन आंदोलन करणं पडलं महागात
मालेगाव: मालेगावातील गटारांच्या प्रश्नावर महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आंदोलन एका सामाजिक कार्यकर्त्याच्या चांगलंच अंगलट आलं. भ्रष्टाचारमुक्त मालेगाव संघटनेच्या रिझवान बॅटरीवाला यांनी अफलातून पद्धतीनं गटारीत उतरुन आंदोलन केलं. पण गटारातील खोलीचा अंदाज न आल्यानं रिझवान गटारीत बुडू लागले.
रिझवान कमरेपर्यंत गटारीत गेल्याचं लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी धावाधाव करत त्यांना पकडून ठेवलं. शेवटी पोलीस, महापालिका आयुक्त फौजफाटा घेवून तिथे पोहोचले आणि रिझवान बॅटरीवाला यांना बाहेर काढण्यात आलं.
बाहेर आल्यानंतर रिझवान यांनी आयुक्तांना आपल्या मागणीचं निवेदन देत शहरातील गटारींवर झाकणं बसवण्याची विनंती केली. पण रिझवान यांच्या आंदोलनापेक्षी त्यांची कशी फसगत झाली याचीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगलेली दिसली.
================================================
अवैधरित्या गाय वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू
अमरावती : अवैधरित्या गायींना कत्तलीसाठी नेणाऱ्या ट्रकचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे.
मृतांमध्ये किशोर इंगळे, शिल्पा इंगळे आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार खरवाडी फाट्याजवळ या ट्रकनं जवळपास 18 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. त्यात इंगळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान यावेळी संतप्त जमावानं ट्रकवर दगडफेक केली. अवैधरित्या गायींना कत्तलीसाठी नेणाऱ्या या ट्रकचा पाठलाग पोलीस करत होते, त्यावेळी हा अपघात घडला.
दरम्यान कालच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज चांदूर बाजारात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. ट्रकचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे.
================================================
जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरुन उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या कोर्टकचेरीला आज नाजूक वळण मिळालं. आज हायकोर्टात साक्ष नोंदवताना जयदेव ठाकरे यांनी उद्धव आणि ठाकरे कुटुंबावर अतिशय वैयक्तिक आणि बेफाम आरोप केले.
जयदेव यांनी आरोपांची सरबत्ती सुरु करताच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही काही काळ भांबावले. त्यानंतर न्यायमूर्तींनी जेवणाची सुटी जाहीर केली आणि जयदेव यांची उरलेली साक्ष इन कॅमेरा नोंदवण्यात आली.
आजच्या साक्षीत जयदेव यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकला. ज्याचा तपशील ठाकरे कुटुंबासाठी मोठा मानहानिकारक असा आहे.
त्यामुळं ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादाला कटू वळण मिळालं आहे. उद्यापासून या प्रकरणाची पुन्हा जाहीर सुनावणी होईल.
================================================
दहशतवादी बु-हानला मारण्याची काय गरज होती ? लोकसभेत PDPचा सरकारला सवाल
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 21 - जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. आंदोलन शमवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे. बु-हान वनी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.बु-हान वनीच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानने काळा दिवस जाहीर केल्याने परिस्थिती अजून बिघडली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आपल्या देशातील दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी पाकिस्तान कोणतेही प्रयत्न करत नसल्याचंही सांगण्यात आलं. काश्मीरमधील लढाई भौगोलिक नसून वैचारिक असल्याचं परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटलं आहे.
================================================
सौदीत 'पोकेमॉन गो' विरोधात फतवा
- ऑनलाइन लोकमत -रियाध, दि. 21 - पोकेमॉन गो गेम सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. तरुणालाईला तर या गेमने अक्षरक्ष: वेड लावलं आहे. दिवसेंदिवस या गेमची लोकप्रियता वाढू लागली आहे. मात्र काही ठिकाणी या गेमला विरोध होतानाही दिसत आहे. सौदी अरेबियामध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढण्यात आला असून असे प्रकार मुस्लीम धर्मात व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे.सौदीतील एका धार्मिस संस्थेने हा फतवा काढला आहे. याअगोदरही या संस्थेने 2001 मध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढत हा गेम झुगार असल्याचं सांगितलं होतं. अधिकृतपणे हा गेम सौदीमध्ये उपलब्ध नसला तरी अनेकजणांनी बेकायदेशीरपणे हा गेम डाऊनलोड केला असल्याची माहिती मिळत आहे.काय आहे पोकेमॉन जाणून घ्या
================================================
रिओ आॅलिम्पिक दहशतवादमुक्त ठरवू : ब्राझील
- ब्रासिलिया : रिओत ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होत असलेल्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा दहशतवादी हल्ल्यापासून दूर ठेवण्याचे आव्हान आहे. पण, यात कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नाही. सर्वांना कडेकोट सुरक्षा पुरविण्यावर भर राहील, असे आयोजन समितीने म्हटले आहे.फ्रान्समध्ये मागील आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ब्राझीलने सुरक्षेचे अतिरिक्त उपाय योजले. रिओत सैनिकांशिवाय ६० हजार पोलीस तैनात राहतील. एकूण ८५ हजार सुरक्षा सैनिक १० हजार ५०० खेळाडूंच्या जीविताची काळजी घेणार आहेत. ही संख्या लंडनमधील सुरक्षाव्यवस्थेच्या दुप्पट आहे.ब्राझीलच्या गुप्तहेर खात्याने दिलेल्या माहितीनुसार रिओतील संभाव्य धोक्याचा तपास करण्यात येत आहे. कुठलाही धोका न पत्करता तपास यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करीत आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती मिचेल टिमर यांनी जगभरातील लोकांना आॅलिम्पिकचा आनंद लुटण्यासाठी ब्राझीलमध्ये येण्याचे आवाहन केले.ब्राझीलमध्ये आॅलिम्पिकदरम्यान इस्लामिक स्टेटची (आयएस) दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना असल्याचे वृत्त निराधार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आॅलिम्पिकदरम्यान जवळपास पाच लाख लोकांची येथे गर्दी होणार असल्याने मित्रराष्ट्रांना विश्वासात घेण्याचे काम ब्राझीलने सुरू केले आहे. दरम्यान, रिओमध्ये आमच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती फ्रान्सने निराधार ठरविली. फ्रान्सच्या गुप्तहेर एजन्सीचे प्रमुख ख्रिस्टोफ गोमार्ट म्हणाले, की आमच्या खेळाडूंवर ब्राझीलमध्ये आयएसकडून घातपात होण्याची भीती खरी नाही.
================================================
एसबीआय उभारणार एक अब्ज डॉलर निधी
- मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक आणि ब्रूकफिल्ड ही कंपनी यांनी संयुक्तरित्या गुंतवणूक करत एक अब्ज डॉलरचा निधी उभारुन एक कंपनी स्थापन केली आहे. या निधीचा उपयोग अनुत्पादित कर्जाच्या संपत्तीत गुंतवणूक करण्यासाठी केला जाणार आहे.एसबीआयने याबाबत म्हटले आहे की, या संयुक्त उपक्रमात ब्रूकफिल्ड सात हजार कोटीरुपये गुंतविणार आहे. तर एसबीआय अनुत्पादित कर्जांच्या संपत्तीत एकूण पाच टक्के गुंतवणूक करणार आहे.बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, अनुत्पादित कर्जातून मार्ग काढण्यासाठी हा एक पर्याय आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीही चर्चा केली जात आहे. अनुत्पादित कर्जाच्या संपत्तीची माहिती ब्रूकफिल्डकडून घेण्यात येणारआहे.
================================================
अजब ! पोकेमॉन खेळण्यासाठी 'त्याने' सोडली नोकरी
- ऑनलाइन लोकमत -
वेलिंग्टन (न्यूझीलंड), दि. 19 - सध्या पोकेमॉन व्हायरल होऊ लागला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण फक्त पोकेमॉन खेळण्याकरिता एका व्यक्तीने आपली नोकरी सोडली असल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे. टॉम करी असं या व्यक्तीचं नाव आहे. ऑकलंड येथील हिबिस्कस समुद्रकिनारी असणा-या एका रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर म्हणून काम करणा-या टॉम करीने पोकेमॉनच्या वेडापायी आपली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या मॅनेजरने मला सहकार्य केलं. पण माझे आई-वडिल खुपच घाबरले होते असं टॉम करीने सांगितलं आहे. आपण घेतलेल्या या निर्णयाचा टॉमला प्रचंड आनंद झाला असून यामधील फिरतीचा भाग त्याला खूपच आवडला आहे. आत्तापर्यंत त्याने 151 पैकी 91 पोकेमॉन मिळवले आहेत. टॉमला अनेक मित्रांना भेटण्याची तसंच विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळत आहे. 'मी अशा अनेक ठिकाणी फिरत आहे जिथे मला जाण्याची संधी मिळाली नसती', असं टॉम करीने सांगितलं आहे. - टॉम करी दोन महिन्यांसाठी संपुर्ण देशात प्रवास करणार आहे. त्याने 20 बस ट्रीपही बुक केल्या असून आतापर्यंत 6 बेटांवर प्रवास केली आहे. पोकेमॉन खेळ संपल्यानंतर टॉम पुन्हा नवीन नोकरी शोधणार आहे किंवा एखादा व्यवसाय सुरु करणार आहे.
================================================
पत्नी, मुलीचा खून करून 'तो' गेला पोलिसांकडे!
| |
-
| |
पंढरपूर - कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीचा खून करून आरोपी स्वत: पोलिस चौकीत हजर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रोपळे गावातील प्रशांत वट्टमवार यांचा त्यांच्या पत्नीसोबत काही कौटुंबिक कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान आज (गुरुवार) पहाटे प्रशांतने पत्नी वृषाली वट्टमवार आणि मुलगी ज्ञानेश्वरी वट्टमवार झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर प्रशांत स्वत:हून जवळच्या पोलिस चौकीत हजर झाला. पोलिसांना सर्व घटना सांगून त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दयाशंकर सिंहच्या अटकेसाठी बसपची तीव्र निदर्शने
| |
-
| |
लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना त्यांची वारांगनेशी तुलना करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्याची मागणी करत बसपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील हजरतगंज परिसरात तीव्र निदर्शने केली.
हजरतगंज परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ विविध जिल्ह्यांतील बसपचे कार्यकर्ते एकत्र आलेले आले असून त्यांनी सिंह यांच्या अटकेची मागणी करत तीव्र निदर्शने केली. प्रत्येक जिल्ह्यातून किमान 500 ते 1000 कार्यकर्ते बुधवारी रात्री लखनौमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या तिकिट विक्रीवर भाष्य करताना दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना वारांगनेशी केली. त्यावरून त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. तसेच पक्षश्रेष्ठींनीही त्यांना तंबी दिली. त्यांनतर त्यांनी माफीनामा सादर केला. हा विषय संसदेतही गाजला. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सिंह यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगत मायावती यांची माफी मागितली. मात्र भाजप नेतृत्त्वाने दयाशंकर यांच्या वक्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या प्रकरणी सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

कराची (पाकिस्तान) - काश्मीरच्या मुद्याबाबत देशाला संबोधित करण्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणी हा लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. त्यामुळे परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान लाहोरमध्ये 15 जुलै रोजी पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेट बैठकीत बुऱ्हाण वाणीला हुतात्मा घोषित करत काश्मीरमध्ये झालेल्या मृत्यूंविरूद्ध मंगळवारी (19 जुलै) काळा दिवस पाळण्याची घोषणा केली होती. या बैठकीला शरीफ, लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र नंतर काही कारणामुळे 19 जुलैऐवजी 20 जुलै रोजी ‘काळा दिवस‘ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीरच्या मुद्यासंदर्भात शरीफ देशाला संबोधित करणार होते. मात्र स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे वृत्त दिले आहे. त्या मागील नेमके कारण सांगण्यात आलेले नाही.
काश्मीर मुद्यावरील पाक पंतप्रधानांचे भाषण रद्द

स्पाईसजेटच्या विमानात सापडली संशयास्पद बॅग
| |
-
| |
अमृतसर - दुबई-अमृतसर या स्पाईसजेटच्या विमानात संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून, चौकशी सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर विमानतळावर स्पाईसजेटच्या या विमानात संशयास्पद बॅग असल्याचा दूरध्वनी आल्यानंतर तपास सुरु झाला. बॉम्बनिकामी पथक दाखल झाले असून, तपासणी करण्यात येत आहे.
================================================
ओंकार परबचा संघर्ष - इंजिनिअर व्हायचे स्वप्न पूर्ण कसे होणार; दातृत्वाची अपेक्षा
दहावीत ९२ टक्के मिळवूनही भविष्य अंधकारमय
| |
-
| |
कणकवली - सुटीच्या दिवसात मोलमजुरी करून, जादा वीज बिल येण्याच्या भीतीने घरात एकच दिवा पेटवून, रोज पाच किलोमीटरची पायपीट करून ओंकारने दहावीत तब्बल ९२ टक्के गुण मिळवले. त्याला इंजिनिअर व्हायचे आहे; पण पुढच्या शिक्षणाला पैसे आणायचे कुठून, या प्रश्नाचे उत्तर या स्कॉलर मुलाकडेही नाही.
परिस्थितीशी लढत दहावीत यश मिळवलेल्या कणकवली तालुक्यातील कळसुली गावच्या ओंकार दीनानाथ परब याच्या गुणवत्तेला तोड नाही. कष्टकरी आई-वडिलांच्या मेहनतीचे त्याने चीज करून दाखवले आहे.
घरात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या दीनानाथ परब यांचा ओंकार हा मुलगा. हुंबरणेवाडी येथून पाच किलोमीटरची पायपीट करून आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत होता. त्याच्या घरात विजेचा केवळ एकच बल्ब आहे. वीज बिल भरणे शक्य नसल्याने केवळ अभ्यासासाठी एक बल्ब चालू ठेवून ओंकारने परिस्थितीवर मात केली.
================================================
इस्तंबूल - लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
तुर्कस्तानमध्ये 3 महिन्यांसाठी आणीबाणी
| |
-
| |
अंकारा येथील राष्ट्रपती निवासातून देशाला संबोधित करताना एर्दोगन म्हणाले की, लष्करी बंडात सहभागी झालेल्या दहशतवादी संघटनांना शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मौलवी फतेहउल्लाह गुलेन यांच्या समर्थकांचाही बंडात समावेश होता. आतापर्यंत 50 हजार बंडखोरांना अटक करण्यात आलेली आहे. लोकशाहीबाबत आम्ही कोणतीही तडजोड करु शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
तुर्कस्तानच्या लष्करातील नाराज सैनिकांच्या एका गटाने शुक्रवारी रात्री सत्तापालटाचा प्रयत्न केला होता. एर्दोगन यांनी सत्तेवर आपले नियंत्रण कायम असल्याचा दावा शनिवारी केला. तरीही 13 वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारसमोर पहिल्यांदाच एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. लष्कराच्या बंडामुळे 250पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच वेळी तब्बल 2839 सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुर्कस्तानातील जनतेने रस्त्यावर उतरून बंडखोर सैनिकांना प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन एर्दोगन यांनी केल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले आणि बंडखोर सैनिकांच्या विरोधात लढा दिला आणि बंड फसल्यानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला होता.
================================================
निर्दयी मातेने पोरींना ढकलले देहविक्रीत!
| |
-
| |
औरंगाबाद - पाचवीत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीला निर्दयी माता, पुतण्या, मावशी व मानलेल्या ‘बोगस’ वडिलाने राजस्थानातील एजंटांना तीन लाखांत विकले. तिला देहविक्रीत ढकलून अडीच लाख रुपये मिळविल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. पोलिस, महिला बालकल्याण समिती आणि महिला बालविभागाच्या अथक प्रयत्नांनी तिची राजस्थानातून सुटका झाली असून ती आता सुखरूप आहे.
मुकुंदवाडीत राहणाऱ्या कुटुंबातील दोन मुली आशा व निशा (नाव बदलले) एका बालगृहात राहतात. येथेच त्या शिक्षण घेतात. या मुलींच्या वडिलांचे निधन झाले असून काही दिवसांपासून आशा-निशाच्या आईसोबत नितीन रोकडे (मानलेला पती) हा व्यक्ती राहतो. पाचवीत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षीय आशाच्या शाळेला एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या. त्यामुळे तिची आई व नितीन रोकडे हे बालगृहात येऊन आशाला घेऊन गेले. जूनमध्ये नितीन रोकडे व तिच्या आईने मुंबईला राहणाऱ्या मावशीच्या मदतीने राजस्थानस्थित एजंटांशी बोलणी केली. याच कालावधीत राजस्थानातून काही एजंट शहरात दाखल झाले, ते मुकुंदवाडीत आशाच्या घरी गेले. तेथे आशाची आई, नितीन रोकडेने आशाला दाखविले. तेथेच तिचा व्यवहार ठरवून तीन लाख रुपयांत विकले. याच वेळी आशाची मोठी बहीण निशा (नाव बदलले आहे.) तिचाही व्यवहार ठरला. पण आशालाच राजस्थानातील रामनगर (जि. बुंदी) येथे नेण्यात आले. तेथे अक्षरश: एका कुंटणखान्यात तिला देहविक्रीसाठी पाठविण्यात आले. याच कुंटणखान्यावर राजस्थान पोलिसांनी छापा घातला, त्या वेळी आशा पोलिसांच्या हाती लागली. बालवयातील मुलगी पाहून पोलिसही चक्रावले, तिची चौकशी केली असता, ती औरंगाबादेतील असल्याचे स्पष्ट झाले. रामनगर पोलिस ठाण्याचे हवालदार रणवीरसिंग यांनी महिला बालविकास विभागाला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तसेच बालविकास समितीने मुलीच्या सुटकेसाठी हालचाली सुरू केल्या. पोलिस, महिला बालविकास समितीने हे प्रकरण गोपनीयरीत्या व संवेदनशीलरीत्या हाताळले. या प्रकरणात नितीन रोकडेसह तिघांवर गुन्ह्याची नोंद झाली.
================================================
काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नाही-शरीफ
| |
-
| |
इस्लामाबाद - "काळा दिवस‘ पाळल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा "काश्मीर राग‘ आळवला. काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या मनात एकजूट निर्माण करण्यासाठी "काला दिवस‘ पाळला गेल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचे सांगितले. काश्मिरी लोकांच्या अधिकारांचा सन्मान करण्यासाठी तेथे जनमत चाचणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
आपल्या भाषणामध्ये शरीफ यांनी काश्मिरी लोकांच्या एकजुटीसाठी "काळा दिवस‘ पाळत असून, यामधून काश्मिरी लोकांच्या अधिकार मिळविण्याच्या लढाईत पाकिस्तान त्यांच्यासोबत आहे. भारत सामर्थ्याच्या जोरावर काश्मिरी जनतेचा आवाज दाबू शकत नाही. त्यांना स्वातंत्र्य मिळेलच. संयुक्त राष्ट्राने काश्मीरला एक वादग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. त्यामुळे भारताला काश्मिरी लोकांच्या अधिकारांचा सन्मान करत जनमत चाचणी घ्यायला हवी. काश्मीरला भारताचा अंतर्गत मुद्दा मानणे उचित नसल्याचेही शरीफ या वेळी म्हणाले.
शरीफ यांच्या म्हणण्यानुसार काश्मिरी भागात भारताने मानवाधिकारांचे उल्लंघन केले आहे. ही बाब विश्व समुदायासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. त्यांनी याआधी सर्व संबंधित विभागांशी आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा उठविण्याची विनंती केली असल्याचेही शरीफ यांनी या वेळी सांगितले.
================================================
No comments:
Post a Comment