Friday, 15 July 2016

नमस्कार लाईव्ह १५-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कंदील बलोचची 3 लग्नं, 7 वर्षांचा मुलगा, माजी पतीचा दावा 
२- 'ऑपरेशन संकटमोचन' : द. सुदानमध्ये अडकलेले 156 भारतीय मायदेशी परतले 
३- इसिस विरोधात इमामांची सोशल मीडियातून आघाडी 
४- फ्रान्सच्या नीसमध्ये अतिरेकी हल्ला, ट्रकने 80 जणांना चिरडलं 
५- एक सेंटीमीटर जागापण देणार नाही - चिनी ललकार 
६- बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण पाकमध्ये खेळा! - पिबिसी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- 'शेर का बच्चा है, तो स्टुडिओ के बाहर आ', झाकीर नाईकचं आव्हान 
८- मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक 
९- पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग 
१०- दहशतवादी बुरहानला पाकिस्तानने घोषित केले 'शहीद' 
११- सोनियांविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मंत्री जयकुमार रावलांचा ठेका 
१३- गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना, महेश मोतेवारच्या पत्नीचे चार किलो सोने चोरी 
१४- मुंबई - मनपाने एमएमआरडीएकडून शिकावं, एमएमआरडीएच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत - हायकोर्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे 
१६- बरेली; वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने इमामाला भोसकले 
१७- मुंब्रा; आजारपणाला कंटाळून आईने केली मुलाची हत्या; दुसरा मुलगा वाचला 
१८- भुवनेश्वर; मालकासाठी 4 नागांना मारून कुत्र्याने सोडले प्राण 
१९- फिरोजाबाद; मद्यपी गब्बर सिंगने काढले चार तास टॉवरवर 
२०- जम्मू-काश्मीर - कुलगाममधील यारीपुरा येथे पोलिसांच्या चौकीवर ग्रेनेड हल्ला, पाच पोलीस जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- लोकलमधील स्टंटबाजी महागात, अनिल कपूरला नोटीस 
२२- 3 टी-20, 3 वन डे, 5 कसोटी, इंग्लड भारताच्या 'जम्बो' दौऱ्यावर 
२३- मिस्बाह उल हकचा लॉर्डसवर नवा विक्रम 
२४- गेलच्या 'फायर'मध्ये विराट आणि राहुलचा परफॉमन्स  
२५- दिवसात 2617 वेळा आपण करतो स्मार्टफोनला टच - सर्वे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

====================================
'शेर का बच्चा है, तो स्टुडिओ के बाहर आ', झाकीर नाईकचं आव्हान
मुंबई : इस्लाम प्रसारक झाकीर नाईकने आपण शांतीदूत असल्याचं सांगत, सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र त्याचवेळी पीस टीव्हीवरील बंदी चुकीचं असल्याचं नाईक म्हणाला. भारतात माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु असून, येत्या 2 दिवसात 10 चॅनेल्सना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, असा इशारा नाईकने दिला.

झाकीर नाईकने आज स्काईपद्वारे सौदी अरेबियातून प्रेस कॉन्फरन्स घेतली. मुंबईतील माझगाव परिसरातील त्याच्या एका हॉलमध्ये, स्काईपद्वारे त्याने बातचीत केली.

माध्यमांवर आगपाखड
यावेळी नाईकला पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. इस्लाम प्रचारक असलेल्या झाकीर नाईक यांना मुस्लिमांचं शिक्षण, सामाजिक स्थितीची जाणीव आहे का? किती मुस्लिम मुलांनी अर्धवट सोडल्याची माहिती आहे का? याबाबतचे प्रश्न विचारल्यानंतर, नाईकने हा प्रश्न आजच्या विषयाशी संबंधित नसल्याचं सांगितलं. तसंच याबाबतची माहिती नसल्याचंही मान्य केलं.
====================================

लोकलमधील स्टंटबाजी महागात, अनिल कपूरला नोटीस

लोकलमधील स्टंटबाजी महागात, अनिल कपूरला नोटीस
मुंबई : अभिनेता अनिल कपूरला एका मालिकेसाठी लोकल रेल्वेवर चढून स्टंटबाजी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पश्चिम रेल्वेने अनिल कपूरला नोटीस धाडली आहे.

एका वाहिनीवर अनिल कपूरची मालिका सुरु होत आहे. त्यासाठी अनिल कपूरने चर्चगेट स्टेशनवरुन शुटिंगसाठी परवानगी मागितली होती. त्याला रेल्वेने परवानगी दिली होती.

मात्र परवानगी देताना रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये शुटिंग करण्यास मान्यता दिली होती. पण अनिल कपूरने फुटबोर्डवर चढून, लटकत स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेत, त्याला नोटीस पाठवली आहे.

रेल्वेच्या छतावरुन, फुटबोर्डला लटकत प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करते.  त्यामुळे अनिल कपूरच्या या स्टंटबाजीमुळे तरुणांना प्रोत्साहन मिळू शकतं. म्हणून रेल्वेने अनिल कपूरला नोटीस धाडली आहे.
====================================

मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक

मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक
मुंबई : मी शांतीदूत आहे, कोणत्याही दहशवादी हल्ल्याचं कधीचं समर्थन केलेलं नाही, सर्व हल्ल्यांचा मी निषेध करतो. मात्र युद्धांमध्ये आत्मघाती हल्ले योग्यच आहेत, असं इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक म्हणाला.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या झाकीर नाईकने अखेर आज सौदी अरेबियातून पत्रकार परिषद घेतली. ‘स्काईप’द्वारे त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

भारतामध्ये आपली मीडिया ट्रायल सुरु असल्याचा आरोप करत इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकनं आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आपण शांतीदूत असल्याचं झाकीरचं म्हणणं आहे.  तसंच निर्दोषांची हत्या इस्लाममध्ये पाप असल्यानं कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचं मी समर्थन करत नसल्याचं झाकिरनं म्हटलं आहे.
====================================

3 टी-20, 3 वन डे, 5 कसोटी, इंग्लड भारताच्या 'जम्बो' दौऱ्यावर

3 टी-20, 3 वन डे, 5 कसोटी, इंग्लड भारताच्या 'जम्बो' दौऱ्यावर
नवी दिल्लीः टीम इंडिया येत्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मायदेशात इंग्लंडचा मुकाबला करणार आहे. बीसीसीआयने आज या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी, 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.
बीसीसीआयने या दौऱ्याचं वेळापत्रक जरा हटके स्टाईलमध्ये जाहीर केलं. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीनं बीसीसीआयच्या वेबसाईटवर एका व्हिडिओ पोस्टद्वारा इंग्लंडच्या आगामी दौऱ्याची माहिती दिली आहे.
====================================

पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग

पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग
पुणे: जर पीस टीव्हीवर बंदी आणू शकता, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही, असा सवाल दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला आहे.

झाकीर नाईकांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग मैदानात उतरले असून त्यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

ते म्हणाले की, ”२०१२ मध्ये मुंबईत झाकीरसोबत ज्या परिषदेत सहभागी झालो होतो, त्यात त्यांनी शांततेचा पुरस्कार केला होता. मग झाकीर नाईक यांच्यावर संथय का घेतला जातो, ”

तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. ते म्हणाले की, ”असीमानंद यांना मोदी भेटतात, आसाराम बापूंच्या पाया पडतात याचं काय असंही त्यावेळी विचारलं.
====================================

कंदील बलोचची 3 लग्नं, 7 वर्षांचा मुलगा, माजी पतीचा दावा

कंदील बलोचची 3 लग्नं, 7 वर्षांचा मुलगा, माजी पतीचा दावा
लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने तीन वेळा लग्न केल्याचा दावा तिच्या घटस्फोटित पतीने केला आहे. पेशावरच्या शाहिद बलोचने पूर्व पत्नी फौजिया उर्फ कंदीलने दोन नव्हे, तीन वेळा लग्न केल्याचा गौप्यस्फोट केलाय.
 
कुटुंबाच्या संमतीविना कंदीलने आपल्याशी कोर्टात लग्न केलं होतं, असा खुलासा त्याने केला आहे. 13 वर्षांपूर्वी आपण कंदीलशी विवाहबद्ध झालो होतो, हे तिचं दुसरं लग्न होतं, अशा खळबळजनक दावा त्याने केलाय.
 
काहीच दिवसांपूर्वी कोट अड्डूतील आशिक हुसेन नामक व्यक्तीने कंदीलसोबत आपण 2008 मध्ये लग्न केल्याचा दावा केला होता. त्यानंतर 2009 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिल्याचंही त्याने म्हटलं होतं. कंदीलने मात्र हे लग्न जबरदस्ती लावल्याचा आरोप केला होता.
 
कंदीलने आपल्या रक्ताने लिहिलेली पत्रं आपल्याकडे असल्याचंही आशिकने म्हटलं आहे. तिच्याशी लग्न झाल्यानंतर आपलं सात लाखांचं नुकसान झाल्याचा दावाही त्याने केला आहे.
====================================

राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मंत्री जयकुमार रावलांचा ठेका

राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मंत्री जयकुमार रावलांचा ठेका
धुळे :  रोजगार हमी योजना, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या गावी दोंडाईचात आल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Jaykumar Rawal Dance 1
यानिमित्त जयकुमार रावल यांची दोंडाईचा शहरातील प्रमुख मार्गावरून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. रावल यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ही स्वागत मिरवणूक आली असताना, मिरवणुकीत सुरु असलेल्या वाद्यावर मंत्री जयकुमार रावल स्वत: थिरकले.
====================================

...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई :  डॅशिंग IAS आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा राजकारण्यांचा सामना करावा लागतो.  यावेळी नवी मुंबईतील भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तुकाराम मुंढेंना आव्हान दिलं आहे.

नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर येत्या पावसाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा, आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला.

गावठाणांतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईला भाजपने विरोध केला आहे.  तर शिवसेनेना आणि सत्ताधारी राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेतली आहे.
====================================

गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना, महेश मोतेवारच्या पत्नीचे चार किलो सोने चोरी

गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना, महेश मोतेवारच्या पत्नीचे चार किलो सोने चोरी
पुणे: समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारचे चार किलो सोने चोरीला गेल्याची घटना उघड झाले आहे. या प्रकरणी लीना मोतेवारने ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला होता. पण गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीने हे बिंग फुटलं आहे.

वाल्हेकर वाडीत राहणारा ड्रायव्हर नरहरी घरतच्या घरी दोन स्वतंत्र डब्यात प्रत्येकी 4 किलो असे एकूण आठ किलो सोने ठेवले होते. त्यापैकी एक डबा 29 जानेवारी 2016 ला चोरीला गेला होता. मात्र, याची तक्रार दाखल न करता लीना मोतेवार यांनी चालकालाच करमळ्याला पाठविले.

या प्रकरणात सुरुवातीला मोतेवारच्या पत्नीने चालकावर दागिने चोरल्याचा आरोप केला. मात्र, चालकाने सत्यस्थिती सांगताच, तक्रार करू नये म्हणून त्यास गावाला पाठविले.

दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्याच आले असून या दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. या घटनेची चिंचवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे.
====================================

'ऑपरेशन संकटमोचन' : द. सुदानमध्ये अडकलेले 156 भारतीय मायदेशी परतले

'ऑपरेशन संकटमोचन' : द. सुदानमध्ये अडकलेले 156 भारतीय मायदेशी परतले
नवी दिल्ली : दक्षिण सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन संकटमोचन’चा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. दक्षिण सुदामधून 156 भारतीयांना घेऊन हवाईदलाचं C-17 हे विमान आज पहाटे पाच वाजता तिरुअनंतपुरममध्ये दाखल झालं. त्यानंतर तिथून सकाळी 10 वाजता दिल्लीला पोहोचलं.

सुदानमध्ये 600 भारतीय अडकले
दक्षिण सुदानमधील गृहयुद्धात 600 भारतीय अडकले आहेत. त्यापैकी 450 जण राजधानी जुबामध्ये आहेत. मात्र या 600 पैकी केवळ 300 भारतीयांना मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 156 नागरिक हवाईदलाच्या  विमानाने परतले आहेत.
====================================

इसिस विरोधात इमामांची सोशल मीडियातून आघाडी

इसिस विरोधात इमामांची सोशल मीडियातून आघाडी

कोलकाता: इसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांकडे वळणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी कोलकातातील इमाम सोशल मीडियाचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व इमाम एकत्रित येऊन तरुणांना इस्लामचा खरा अर्थ समजावून सांगून शांततेचा संदेश प्रसारित करणार आहेत. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ इमाम कारी फजलुर रहमान यांनी ही माहिती दिली.


इसिस तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेत असल्याचे समोर आल्यानंतर इमामांनी देखील या विरोधात आघाडी उघडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार असल्याचा निर्णय घेतला. इसिस आणि इतर कट्टरवादी संघटना इस्लाम आणि कुराणाचा चुकीचा अर्थ सांगून तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यामुळे या विषयावरून मी इतर इमाम आणि इस्लामच्या अभ्यासकांशी चर्चा करीत असून यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचे रहमान यांनी सांगितले.
====================================

मिस्बाह उल हकचा लॉर्डसवर नवा विक्रम

मिस्बाह उल हकचा लॉर्डसवर नवा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड विरूद्ध लॉर्डस मैदात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हकच्या नाबाद ११० आणि अशद शफीकच्या ७३ धावांच्या बदल्यात पाकिस्तानने २८२ धावांची आघाडी मिळाली. मिस्बाहची इंग्लडमधील ही पहिली शतकी खेळी आहे.

मिस्बाहाने आपल्या वयाच्या ४२ व्या वर्षी शतक झळकावून हा विक्रम केला आहे. यापूर्वी बॉब सिम्पसन यांनी १९७७ साली ४१ व्या वर्षी शतक झळकावले होते.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना मिस्बाह म्हणाला की, ”ही खेळी माझ्यासोबतच माझ्या संघाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. माझ्यावर विकेट टीकवून खेळी करण्याची जबाबदारी होती. लॉर्डस मैदानावरील हे माझे पहिले शतक आहे. मी माझे हे शतक माझ्या पत्नीला समर्पित करतो. कारण मी जेव्हा मैदानावर खेळत असतो, तेव्हा माझी पत्नी माझ्या चांगल्या कामगिरीसाठी व्रत करते.”
====================================

गेलच्या 'फायर'मध्ये विराट आणि राहुलचा परफॉमन्स

गेलच्या 'फायर'मध्ये विराट आणि राहुलचा परफॉमन्स
नवी दिल्ली : आयपीएल आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया चार टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची क्रिकेट व्यतिरिक्त मैदानाबाहेरही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत नेहमीच मजामस्ती चालते. अशाच प्रकारची मस्ती कॅरिबियन टीमचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेसबुक पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि के. एल. राहुल नृत्य करताना दिसत आहेत. विराट कोहली आणि ख्रिस गेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत असल्याने या दोघांचीही मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे ख्रिस गेलने आयोजित फायरमध्ये विराट आणि राहुल परफॉम करताना पाहायला मिळाले.
====================================

फ्रान्सच्या नीसमध्ये अतिरेकी हल्ला, ट्रकने 80 जणांना चिरडलं

फ्रान्सच्या नीसमध्ये अतिरेकी हल्ला, ट्रकने 80 जणांना चिरडलं
पॅरिस :  फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाला. राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीत एक ट्रक घुसला. यात तब्बल 80 जणांना चिरडून मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी आहेत.


फ्रान्समध्ये 14 जुलै हा बॅस्टिल डे म्हणजेच राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समुद्रकिनाऱ्यावर फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. त्याचवेळी हा ट्रक घुसला.


अपघात नाही हल्ला
सुरुवातीला हा अपघात असल्याचं म्हटलं जात होतं. पण अपघात नसून हा हल्ला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. चालकाने गर्दीमध्ये ट्रक घुसवल्यानंतर गोळीबारही केला. यानंतर सगळीकडे मृतदेहांचे खच पडले होते.
====================================

वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने इमामाला भोसकले 

  • ऑनलाइन लोकमत 
    बरेली, दि. १५ - वडिलांचा अपमान केला म्हणून अल्पवयीन मुलाने मशिदीतल्या इमामाला भोसकले. उत्तरप्रदेशातल्या नवाबगंजमध्ये बुधवारी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, तो नवव्या इयत्तेत आहे. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     
    वडिलांच्या चिथावणीवरुन मुलाने हल्ला केल्याचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इमामाने सांगितले. मुलाचे पिता छोटान फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 
     
    इमाम जाहीरपणे आपल्या वडिलांचा पाणउतारा करत आहे हे पाहिल्यानंतर मुलाला संताप आला व त्याने थेट इमामावर हल्ला केला असे पोलिसांनी सांगितले. 
====================================

सोनियांविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १५ - अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टर घोटाळयात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांच्या सहका-यांविरोधात सीबीआयला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. अगुस्ता हॅलिकॉप्टर घोटाळयाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे एफआयआर दाखल करायचा कि, नाही ते सीबीआय ठरवले असे सर्वोच्च न्यायालायने सांगितले. 
     
    वकिल एमएल.शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. शर्मा यांनी आपल्या याचिकेत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अहमद पटेल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली होती. 
     
    इटालियन कोर्टाच्या आदेशात नाव येऊनही सीबीआय भारतातील हायप्रोफाईल राजकारण्यांवर कारवाई करत नसल्याचे शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. इटालियन कोर्टाच्या निकालावर विश्वास ठेवणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. 
     
    सीबीआय या प्रकरणात जे पुरावे गोळा करेल त्या आधारावर ते एफआयआर संबंधी निर्णय घेतील असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. पुरावे असतानाही सीबीआय कारवाई करत नसेल तर, शर्मा पुन्हा न्यायालयात दाद मागू शकतात असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
====================================

आजारपणाला कंटाळून आईने केली मुलाची हत्या; दुसरा मुलगा वाचला


  • मुंब्रा : स्वत:च्या आजारपणाला कंटाळून एका आईने तिच्या चिमुरड्या मुलाची हत्या करून, दुसऱ्या मुलास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना दिव्यात घडली. यामुळे दिव्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
    येथील मुंब्रादेवी कॉलनीतील वैभव कॉम्प्लेक्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारी संपा कर्मकार ही महिला मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, कावीळ, न्यूमोनिया या आजारांनी त्रस्त आहे. या आजारपणात स्वत:च्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास मुले उघड्यावर पडतील, तसेच त्यांचे हाल होतील, या भीतीने तिला ग्रासले होते.
    मागील काही दिवसांपासून संपा विमनस्क अवस्थेत वावरत होती. बुधवारी संध्याकाळी तिने
    तिचा पावणेदोन वर्षांचा मुलगा ईशान याच्या गळ्यावर आणि
    पोटावर विळीने वार करून त्याची हत्या केली.
====================================

एक सेंटीमीटर जागापण देणार नाही - चिनी ललकार


  • ऑनलाइन लोकमत
    बीजिंग, दि. 15 - चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावर चीनचा हक्क नसल्याचा निवाडा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिल्यानंतर सार्वभौमत्व हा चीनच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असून या भागातला एक सेंटिमीटर भाग देखील चीन सोडणार नाही, असे या देशाने शुक्रवारी सांगितले आहे. चीनचे एक वरीष्ठ सरकारी अधिकारी यांग जिएची यांनी ही भूमिका मांडली आहे.
    चीन हा प्रचंड मोठा देश आहे, तरीही पूर्वजांनी जो भौतिक वारसा दिला आहे, त्यातला एक सेंटिमीटरदेखील आम्ही सोडणार नाही असे यांग यांनी म्हटले आहे. यांग यांचा अधिकार परराष्ट्र मंत्र्यापेक्षा वरच्या दर्जाचा असून त्यावरून चीनच्या या भूमिकेचे गांभीर्य लक्षात येते.
    या सामुद्री भागावर ऐतिहासिक हक्क असल्याचा चीनचा दावा हेगमधल्या आंतरराष्ट्रीय लवादानं फेटाळल्यानंतर आलेली चीनची ही अधिकृत प्रतिक्रिया आहे. याखेरीज भारत व चीनदरम्यानही आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून वाद आहे. अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटता भाग असल्याची चीनची भूमिका आहे, तर अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असल्याची भारताची भूमिका आहे. या विषयावरून दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 19 फैरी झडलेल्या आहेत.
    सीमारेषा हा ऐतिहासिक दृष्टीकोनातून बघायला हवा आणि मॅकमोहन सीमारेषा अग्राह्य आहे अशी चीनची भूमिका आहे. चीन व भारतामध्ये या भागात 3,488 किलोमीटरची सीमारेषा असून ही ताबारेषा स्वीकारावी व तणाव टाळावा अशी भारताची मागणी आहे. 
    तर, दक्षिणेकडच्या समुद्रातली बेटे चिनी राज्यकर्त्यांनी 2000 वर्षांपूर्वी शोधली आणि त्यांचा कारभार पाहिला, म्हणून हा भाग चीनचा असल्याचा चीनचा दावा आहे. मात्र, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया व ब्रुनेई या देशांनी चीनचा हा दावा नाकारला आहे. 
    विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय चीनवर बंधनकारक असल्याचे सांगत या भागातून प्रवास करण्याचा व त्याच्यावरून विमाने नेण्याचा हक्क प्रस्थापित झाल्याची भूमिका घेतली आहे. याला प्रतिवाद करताना, या लवादाचा निर्णय अंतिम मानणाऱ्यांनी चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल अशी कृती केल्यास त्यास निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा दिला आहे. यामुळे साउथ चायना सीमुळे आंतरराष्ट्रीय वातावरण तणावाचे राहील अशी शक्यता आहे.
====================================
मालकासाठी 4 नागांना मारून कुत्र्याने सोडले प्राण

भुवनेश्वर- डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याने चार कोब्रा जातीच्या नागांना ठार करून मालकाचे संरक्षण केले. परंतु, सर्पदंश झाल्याने त्यालाही शेवटी प्राण सोडावे लागले. कुत्रा हा नागरिकांचा चांगला मित्र व संरक्षणकर्ता असतो, हे सिद्ध झाले.

गजपती जिल्ह्यातील सेबेकापूर गावात ही घटना घडली आहे. गावामधील दिबाकर सैता यांना डॉबरमॅन जातीचा कुत्रा पाळला होता. सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडत होता. यावेळी चार कोब्रा जातीचे नाग घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कुत्र्याने एकावेळी चारी नागांशी झुंज सुरू ठेवली होती. दरम्यान, कुत्र्यालाही दंश होऊन रक्तस्राव होत होता. परंतु, चारही नागांना ठार केल्यानंतरच तो जमिनीवर कोसळला. मालकाकडे पाहून त्याने काही वेळातच प्राण सोडला.

दिबाकर यांच्या शूर कुत्र्याची माहिती काही वेळातच गावात पसरली. पाऊस उघडल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत कुत्र्यावर फुले वाहून अंत्यसंस्कार केले. यावेळी दिबाकर यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
====================================
दिवसात 2617 वेळा आपण करतो स्मार्टफोनला टच

अमेरिकेतील संशोधन संस्थेचा अहवाल 

नवी दिल्ली-  "अरे फेकून दे तो मोबाईल‘, "किती वेळ झाला पडीक आहेस त्या डब्यावरच‘ असे संवाद हल्ली घरातच नाही तर बाहेरही कानावर पडतात. आपण ऍडिक्‍ट होत चाललोय या स्मार्टफोन नावाच्या जाळ्यात त्यामुळे मित्रांबरोबर बसल्यानंतरही आपण स्मार्टफोनमध्येच गुंतलेले असतो, हाच सगळा प्रकार लक्षात घेऊन अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्मार्टफोन वापरणारा माणूस दिवसाला दोन हजार सहाशे 17 वेळा स्क्रीनवर फिरवत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

पटणार नसला तरी हा आकडा खरा आहे, अमेरिकेतील या संस्थेने एक लाखाहून अधिक लोकांमधून 94 ऍण्ड्राईड युजर्सची निवड करून हा अभ्यास केला आहे. हे सर्व युजर्स विविध गटातील होते, सलग पाच दिवस आणि 24 तास या युजर्सना निरीक्षणाखाली ठेवून केलेल्या या अभ्यासात एक माणूस साधारणपणे दिवसातून 2,617 वेळा फोनला टॅप, स्वाईप आणि क्‍लिक करत असल्याचे समोर आले आहे. 
====================================
मद्यपी गब्बर सिंगने काढले चार तास टॉवरवर

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश)- गब्बर सिंग नावाची व्यक्ती दारूच्या नशेत 140 मीटर उचींच्या टॉवरवर जाऊन उलटी लटकला. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गब्बर सिंग (वय 30) याने आज सकाळी दारू प्यायली होती. दारूच्या नशेत तो अतिउच्च दाब असलेल्या विद्युत टॉवर चढला. पायांचा आधार घेऊन तो उलटा लटकला. उलटा लटकल्यामुळे व विद्युत प्रवाहामुळे त्याच्या जिवाला धोका होता. काही वेळातच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली. काही केल्या तो खाली येत नव्हता. अखेर याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोचली. घटनास्थळी पोलिस व विद्युत विभागाचे अधिकारी दाखल झाले. काही केल्या तो खाली येत नव्हता. 
====================================
बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण पाकमध्ये खेळा!

इस्लामाबाद : दहशतवादाच्या सावटाखालीही परदेशी क्रिकेट संघांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावे, अशा आशेने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) चार ‘बुलेटप्रूफ‘ बस खरेदी केल्या आहेत. यामुळे परदेशी खेळाडूंना सुरक्षेची खात्री देता येऊ शकेल आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू होऊ शकेल, अशी ‘पीसीबी‘ला आशा आहे.

2009 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमधील सहा जण ठार झाले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. त्यानंतर पाकिस्तानचे घरचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेतले जात होते. भरपूर प्रयत्नांनंतरही कोणत्याही बड्या संघाने पाकिस्तानच्या दौऱ्यावर येण्यास तयारी दर्शविली नाही. गेल्या वर्षी झिंबाब्वेच्या संघाने पाकिस्तानचा छोटेखानी दौरा केला होता. त्यानंतर इतर संघांनीही पाकिस्तानमध्ये खेळावे, यासाठी ‘पीसीबी‘ने प्रयत्न सुरू केले होते.

‘देशात क्रिकेटचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून आम्ही चार ‘बुलेटप्रूफ‘ बस विकत घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही संघाला सुरक्षेसंदर्भात चिंता वाटणे साहजिक आहे. त्यामुळे शक्‍य त्या सर्व उपाययोजना करून तोडगा काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत,‘ असे ‘पीसीबी‘च्या प्रवक्‍त्याने ‘क्रिकइन्फो‘ला सांगितले.
====================================

No comments: