-----------------------------------------------------------------
नो हेल्मेट, नो पेट्रोल, रावतेंचा जालीम उपाय
मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हे फलक तुम्हाला ठिकठिकाणी दिसू शकतील. त्यामुळं विना हेल्मेट गाडी चालवणं महागात पडणार आहे.
ज्या मोटारसायकलस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल मिळणार नाही. शिवाय विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत.
यापूर्वी केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही ही मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनं 2500 पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.
-----------------------------------------------------------------
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रक्ताची तूट, पोलिस सरसावले
औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र ही तूट भरुन काढण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
औरंगाबादेतील या शासकीय रुग्णालयात एक टक्काही रक्तसाठा उरलेला नाही. त्यामुळे निर्माण झालेला रक्ताचा मोठा तुटवडा भरुन काढण्यासाठी पोलिस पुढे आले आहेत. औरंगाबादच्या पिशोर पोलिस ठाण्यातील कर्मच्याऱ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या सहभागातून 308 बाटल्या रक्तदान केलं आहे.
एरवी लोकांच्या रक्षणाला धावणारे पोलिस गरजेच्या वेळी रक्ताच्या तुटवडा भरुन काढण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या कामाचा कौतुक होत आहे.
-----------------------------------------------------------------
मुंढेंवर नगरसेवकही नाराज, नवी मुंबई मनपा स्थायी समिती तहकूब
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही तोपर्यंत स्थायी समिती अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई केल्याने सर्वपक्षीय त्यांच्याविरोधात एकवटले. मात्र त्यांच्या दबावाला न जुमानता मुंढेंनी कारवाई सुरुच ठेवली. तसंच सर्वपक्षीयांनी बंदही पुकारला होता.
मुंढेंची चौकशी
तुकाराम मुंढेंनी जी कारवाई केली, त्यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं गिरीष बापट यांनी विधानसभेत सांगितलं होतं. तसंच अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे, असं निवेदनात बापट यांनी म्हटलं होतं.
मात्र तरीही आयुक्त तुकाराम मुंढेंकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. याच्या निषेधार्थ स्थायी समिती अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------------------------------------------------------
नागपुरात कराटे क्लासवरुन परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नागपूर : कोपर्डी बलात्कार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या टीबी रुग्णालयाच्या मागील बाजूस ही घटना घडली.
12 वर्षीय अल्पवयीन मुलगी काल (बुधवारी) संध्याकाळी वकीलपेठ भागातील कराटे क्लासला गेली होती. तिथून पायी घरी परतत असताना तिच्यावर अत्याचार झाले. या घटनेत मुलीच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
या प्रकरणी इमामपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आरोपी कोण हे अजून निष्पन्न झालेलं नाही. परंतु पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पीडित मुलगी ही कराटेमध्ये यलो बेल्टधारक आहे. दिल्लीला 31 जुलै रोजी ब्लॅक बेल्टसाठी होणाऱ्या स्पर्धेत ती सहभागी होणार होती.
-----------------------------------------------------------------
तिच्या गर्भपाताबाबत म्हणणं मांडा, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला आदेश
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने गर्भपाताच्या नियमाबाबत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.
एका 24 आठवड्याच्या गर्भवती असलेल्या महिलेने सध्याच्या नियमावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, गर्भपाताची परवानगी मागितली आहे. मात्र गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे या नियमाला या महिलेने आव्हान दिलं आहे.
प्रेग्नंसी अॅक्ट
त्यामुळे ही महिला गर्भपात करु शकेल की नाही, अशी विचारणा करणारी नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला पाठवली आहे.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अॅक्ट 1971 नुसार 20 आठवड्यापेक्षा जास्त गर्भवती महिलेला गर्भपात करता येत नाही.
मात्र हा नियमच चुकीचा असल्याचा दावा, याचिकाकर्त्या महिलेने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित महिलेला कथित बलात्कारामुळे गर्भधारणा झाली आहे.
-----------------------------------------------------------------
Pokemon Go खेळताना 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
ग्वाटेमाला सिटी : काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला ‘Pokemon Go’ या मोबाइल गेमनं तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. पण आता या गेममुळे एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॅटिन अमेरिकेतील ग्वाटेमाला देशात ही घटना घडली
Pokemon Go गेममुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. The Independent च्या वृत्तानुसार, 18 वर्षीय जरसन लोपेज यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तो आपल्या भावासोबत Pokemon Go गेम खेळत होता. हे दोघेही ग्वाटेमाला सिटीच्या रस्त्यावर Pokemon च्या शोधात होते.
जरसन आणि डेनियल हे दोघेही Pokemon Go खेळता खेळता एका घरात घुसले. त्याचवेळी त्यांच्यावर एका अज्ञातानं गोळ्या झाडल्या. गोळी जरसनला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरुन 20 गोळ्या सापडल्या आहेत. मात्र, जरसनच्या हत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
दरम्यान, ज्या देशांमध्ये Pokemon Go गेम लाँच करण्यात आला आहे. त्या देशामध्ये गेम खेळताना अनेकांकडून नियमाचं उल्लंघन होताना दिसून येत आहे.
दरम्यान, ज्या देशांमध्ये Pokemon Go गेम लाँच करण्यात आला आहे. त्या देशामध्ये गेम खेळताना अनेकांकडून नियमाचं उल्लंघन होताना दिसून येत आहे.
-----------------------------------------------------------------
पत्नीसह मुलीची डोक्यात रॉड घालून हत्या, पतीला अटक
पंढरपूर : पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीची एका इसमाने डोक्यात रॉड घालून निर्घृण हत्या केली आहे. पंढरपुरातल्या रोपळेमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत वट्टमवारला पोलिसांनी अटक केली आहे.
पंढरपुरातल्या रोपळे गावात टेलरिंग आणि मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या प्रशांतचं पहाटेच्या सुमारास पत्नीशी भांडण झालं. घरगुती कारणावरुन सुरु झालेल्या या वादातून प्रशांतचा संताप एवढा टोकाला पोहचला की त्यानं पत्नीवर थेट रॉडनं हल्ला केला.
त्यानंतर त्यानं चिमुरड्या ज्ञानेश्वरीवरही रॉडनं वार केला. यात त्या दोघींचाही मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर प्रशांत स्वतः पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------------------------------------
सिद्धू म्हणजे खोबरं तिकडे चांगभल
चंदीगढ : भाजपला सोडचिट्ठी देणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धूवर आता भाजपमधून घणाघाती टीका होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी सिद्धूवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.
खोबरं तिकडं चांगभलं, असा माणूस म्हणजे सिद्धू आहे. पक्ष बदलणारा सिद्धू जिथं तुकडा मिळेल, तिकडे धावतो, अशी घणाघाती टीका प्रकाशसिंह बादल यांनी केली.
सिद्धूने 2017 मध्ये अकाली दलाचा बदला घेऊ, असा इशारा दिला होता. त्याला उत्तर देताना बादल यांनी निशाणा साधला.
नुकतंच नवज्योतसिंह सिद्धूने अडीच महिन्यातच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सिद्धू अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------------------------------
'आती क्या खंडाला'नंतर आता आमीर खानचं नवं गाणं
मुंबई: गुलाम सिनेमातील ‘आती क्या खंडाला’ हे गाणं तुम्हाला आठवत असेलच. अभिनेता आमीर खानने गायलेलं हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर मात्र आमीरचे सूर कधी ऐकायला मिळाले नाहीत.
मात्र आता दंगल सिनेमाच्या निमित्ताने ती संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.
आगामी दंगल सिनेमासाठी आमीर रॅप साँग गाणार आहे. सलमान खान, अमिताभ, अक्षय कुमार यासारख्या अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या सिनेमासाठी गाणी गायली आहेत. मात्र रॅप साँग गाण्याचा हा बहुदा पहिलाच प्रयत्न असेल.
आमीरचा ‘दंगल’ सिनेमा या वर्षाच्या शेवटी 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. आमीर ‘दंगल’मध्ये पैलवानाच्या भूमिकेत आहे.
संबंधित बात
-----------------------------------------------------------------
भर समुद्रात फुटबॉलपटू मेसीला 'त्या'ची सरप्राईज व्हिजीट
इबिझा : फुटबॉलपटू लायनल मेसी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर निवांत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. भूमध्य समुद्रात इबिझा बेटाजवळ प्रायव्हेट यॉटवर आराम करत असताना अचानक त्याला एक सरप्राईज भेट मिळाली.
सुली नावाचा 24 वर्षांचा अॅटलेटिको माद्रिद चाहता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतर पोहून कापत आला आहे. एका अनोळखी व्यक्तीला अचानक आपल्या यॉटजवळ पाहून मेसीही काही काळ बुचकळ्यात पडला.
सुलीने आपली ओळख आणि भेटीची तीव्र इच्छा बोलून दाखवल्यानंतर मेसीने त्याचं आदरातिथ्य केलं. सुलीच्या इच्छेनुसार मेसीने त्याच्यासोबत सेल्फी काढले आणि ज्युसही दिलं.
मेसीला याचि देही याचि डोळा पाहण्याची, किंबहुना त्याच्यासोबत काही काळ घालवण्याची देशविदेशातील अनेक चाहत्यांची इच्छा असते. मात्र स्पेनच्या सियुटा शहरात राहणाऱ्या या चाहत्याच्या वाट्याला ही संधी आली. अर्जेंटिनाच्या या स्टारसोबत त्याच्या प्रायव्हेट यॉटमध्ये
सुलीला 20 मिनिटं थांबता आलं.
इबाझा बेटावर सुट्टी घालवणाऱ्या सुलीला मेसीची यॉट दिसली आणि त्याने मोबाईल प्लास्टिकच्या बॅगेत टाकून पोहत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र समुद्राच्या पाण्यात त्याचा मोबाईल खराब झालाच.
-----------------------------------------------------------------
माजी पंतप्रधान वाजपेयींच्या कवितांचा आधार घेत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशाराही दिला. ‘चिंगारीका का खेल अक्सर बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने की घर मे सदा खरा होता है’ या शब्दात राजनाथ यांनी पाकला सुनावलं. काश्मीरमधील
परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न शेजारी देशांकडून होत आहे. भारतात जर कुठले दहशतवादी असतील, तर ते पाकिस्तान पुरस्कृत आहेत, हे निश्चित, असंही राजनाथ म्हणाले.
चिंगारी का खेल अक्सर बुरा होता है, राजनाथ यांनी पाकला सुनावलं
नवी दिल्ली : चिंगारी का खेल अक्सर बुरा होता है, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिहांनी पाकिस्तानवर आगपाखड केली. काश्मीरात धुमसलेल्या हिंसाचारावर राजनाथ यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं.
माजी पंतप्रधान वाजपेयींच्या कवितांचा आधार घेत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशाराही दिला. ‘चिंगारीका का खेल अक्सर बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने की घर मे सदा खरा होता है’ या शब्दात राजनाथ यांनी पाकला सुनावलं. काश्मीरमधील
परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न शेजारी देशांकडून होत आहे. भारतात जर कुठले दहशतवादी असतील, तर ते पाकिस्तान पुरस्कृत आहेत, हे निश्चित, असंही राजनाथ म्हणाले.
काश्मीरात हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीला भारतीय जवानांनी एका चकमकीत ठार केलं. मात्र त्याच्या खात्मानंतर फुटिरतवाद्यांनी काश्मीरमध्ये बंद पाळत हिंसाचारही केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे
-----------------------------------------------------------------
फेसबुकचा नवा विक्रम, मेसेंजर यूजर्सची संख्या 100 कोटींवर
मुंबई: सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने नवा विक्रम प्रस्थापित केला असून, फेसबुक मेसेंजर यूजर्सची संख्या 100 कोटींवर पोहोचली आहे. 100 कोटींचा टप्पा पार करण्याच्या या प्रवासात यूजर्सना मॉडर्न कम्यूनिकेशनचा उत्तम अनुभव मिळवून देण्याचा उद्देश काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट डेव्हिड मार्कस यांनी सांगितले. तसेच लोकांना आणि उद्योग समूहांना कनेक्ट करणे आमचे पुढील लक्ष असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
फेसबुकचे सध्या जगभरात 160 कोटी यूजर्स आहेत. तर 2014 साली 20 कोटी यूएसडीमध्ये खरेदी केलेल्या व्हॉटसअॅपचे 1 कोटीहून आधिक यूजर्स आहेत. फेसबुकचा आणखीन एक भाग असलेल्या इंस्टाग्रामचेही जगभरात 5 कोटी यूजर्स आहेत.
नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, फ्रांस, फिलिपिन्स, थायलंड आणि इतर यूरोपीय देश ही फेसबुकची बाजारपेठ असल्याचे मार्कस यांनी सांगितले.
फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून मोठ्या उद्योग समूहांना आपल्या जाहिराती यूजर्सपर्यंत पोहचवणे सहज शक्य होणार आहे. व्हॉटसअॅपवरून ही सुविधा उपलब्ध नसल्याने यामार्फत बिझनेस करणे शक्य नाही. पण तरीही यावरूनही जाहिराती प्रसारित करून बिझनेस जनरेट करण्यासंबंधीचे प्रयत्न सुरु आहेत.
-----------------------------------------------------------------
स्प्लेंडरवर कुरघोडी, अॅक्टिव्हा देशातील सर्वाधिक खपाची स्कूटर
नवी दिल्ली : भारतातील रस्त्यांची एकंदर स्थिती पाहता बहुतांश लोक स्कूटर ऐवजी मोटरसायकल वापरणे पसंत करतात. होंडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कूटर मात्र याला अपवाद ठरली आहे. गेल्या सहा महिन्यात भारतातील सर्वाधिक खपाची स्कूटर होण्याचा मान अॅक्टिव्हाला मिळाला आहे.
2016 च्या पहिल्या सहा महिन्यात होंडा कंपनीने 13.38 लाख अॅक्टिव्हांची विक्री केली आहे. सर्वाधिक खपाच्या हिरो स्प्लेंडरच्या खपापेक्षा होंडाने सुमारे 1.04 लाख स्कूटर जास्त विकल्या आहेत.
गेल्या वर्षी याच काळात होंडाने 1.97 लाख अॅक्टिव्हांची विक्री करत बाजी मारली होती. 17 वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या या स्कूटरने आजपर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या स्कूटरला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.
होंडा अॅक्टिव्हाने स्टाईल, टेक्नॉलॉजी आणि मायलेज या सर्वच पातळ्यांवर बाजी मारत स्वतःचा एक मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. होंडा अॅक्टिव्हा ही विश्वसनीयता, सुविधा आणि स्टाईल यांचा सुरेख संगम असून ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले.
होंडा कंपनीने 2001 साली अॅक्टिव्हा बाजारात आणली होती. बाजारात आल्यापासून अॅक्टिव्हा नेहमीच सर्वाधिक खपाची स्कूटर म्हणून ओळखली गेली आहे.
-----------------------------------------------------------------
उत्तम मराठी बोलणारा अक्षय कुमार आज 'चला हवा येऊ द्या'मध्ये
मुंबई: अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता अक्षय कुमारनेही त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’चं दार ठोठावलं.
आगामी रुस्तम या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये हजेरी लावली. आज या स्पेशल एपिसोडचं शुटिंग होत आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
‘चला हवा येऊ द्या’ या शोला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. महाराष्ट्रतल्या घराघरात पोहोचण्यासाठी हक्काचं माध्यम म्हणून या शो कडे पाहिलं जातं. त्याच गोष्टीचा फायदा बॉलिवूडची मंडळी उचलत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. नुकतंच सलमान खाननेही सुलतानच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये उपस्थिती लावली होती.
-----------------------------------------------------------------
उद्धव ठाकरेंचा आदेश, शिवसेना प्रतोदांची तातडीची बैठक
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ प्रतोदांची तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 5 वाजता शिवालायात ही बैठक होणार आहे.
शिवसेनेचे आमदार कामं होत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. याबाबत काल विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेना विधिमंडळ प्रतोदांची बैठक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनीच ही बैठक बोलावली आहे.
-----------------------------------------------------------------
परभणीतून अटक नासेरबिन चाऊस बॉम्ब बनवण्याच्या तयारीत
औरंगाबाद : आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक झालेल्या परभणीच्या नासेरबिन चाऊसनं बॉम्ब बनवण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. एटीएसने औरंगाबाद कोर्टात याबाबत माहिती दिली आहे.
नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद हे नासेरबिन चाऊसचं टार्गेट असल्याचीही माहिती आहे. त्या बॉम्बचे छायाचित्र सिरीयातला दहशतवादी फारुकला पाठवण्यात आलं होते. चाऊसला हा बॉम्ब बनवण्यासाठी हवाला मार्फत पैसे मिळाले होते.
परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासिरबिन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अचानक या मुस्लीमबहुल वस्तीत एटीएसचं पथक दाखल झालं आणि त्यांनी नासेरबिनला अटक केली.
कोण आहे नासेरबिन?
नासेरबिन हा दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात होता असा एटीएसचा आरोप आहे. रमजानच्या महिन्यात त्यानं मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली आहे. नासेरबिनवर लावेलेले सर्व आरोप त्याच्या कुटुंबियानं फेटाळले आहेत.
-----------------------------------------------------------------
बारी घाटात बसचालकाच्या प्रसंगावधानाने 60 प्रवाशांचे प्राण बचावले
शिर्डी : अहमदनगरमधील अकोले तालुक्यात महामंडळाच्या बसचा मोठा अपघात होता होता वाचला आहे. बस दरीत कोसळण्यापासून ड्रायव्हरने यशस्वीपणे रोखल्याने 60 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
बारी घाटाजवळून बस जात असताना चालकाला बसचे ब्रेक फेल असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने बसचे पुढचे टायर फुटून पाठीमागे गेले. त्यामुळे ही बस दरीत कोसळण्याचा धोका होता.
यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवून बस एका खडकावर ठोकली. ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातादरम्यान बसमध्ये 60 प्रवासी होते, यातील 4-5 जणांना किरकोळ जखमा झाल्यात. सध्या जखमींवर घोटीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-----------------------------------------------------------------
कोेहली, ही हॅटट्रिक होऊन जाऊ दे
अँटिगा: अनिल कुंबळेच्या तालमीत नव्या आत्मविश्वासानं भरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि विंडीज संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून अँटिगामध्ये सुरुवात होत आहे.
टीम इंडियानं गेल्या दहा वर्षांमध्ये दोनवेळा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2006 साली राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि मग 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं कसोटी मालिका जिंकली होती.
आता कॅरिबियन भूमीवर सलग तिसरी कसोटी मलिका जिंकण्याचा विराट कोहलीच्या टीम इंडियाचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे विराट कोहलीच्याच नेतृत्त्वाखाली भारतानं गेल्या वर्षी कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 2-1 असा तर दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा विजय साजरा केला होता. त्यामुळं विराट कोहलीच्या टीम इंडियाला आता कॅरिबियन बेटांवरच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कसोटी मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.
-----------------------------------------------------------------
मेलबोर्नमध्ये घुमला विठ्ठलनामाचा गजर
- शोभा भिडे / किशोर पाठारेमेलबोर्न - गेल्या वर्षी 2015 मध्ये विठूमाईच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आमच्या मेलबोर्नवासियांची ही पहिली आषाढी एकादशी. आमच्या विठाईचा हा पहिला सोहळा मग तो थाटातच व्हायला हवा. आम्ही फक्त 10 ते 12 महाराष्ट्रीय कुटुंब या छोट्याशा शहरात पण उत्साह मात्र 100 माणसांचा असावा असा. शनिवारी 16 जुलै रोजी हा कार्यक्रम करण्याचे ठरवले. फक्त दोन मीटिंग्ज झाल्या, सर्व आखीव बेत ठरवला. सर्वप्रथम अभिषेक, पूजा, विठूसहस्त्रनाम, स्थानिक हौशी लोकांची भजने, दिंडी आणि नंतर आरत्यांचा जयजयकार. तयारीला दोनच दिवस होते. सर्वांच्या उत्साहाला भरते आले होते. उद्योगाची जेथे प्रचिती तेथे विठूमाउलीचाच वास असल्याने सर्व कामे भराभर होत गेली.
-----------------------------------------------------------------
डीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी आडसकर यांची आत्महत्या
- ऑनलाइन लोकमतबीड, दि. २१ - डीसीसी बँकेचे माजी संचालक आणि अंबा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मेघराज बाबुराव आडसकर यांनी डीसीसी बँक घोटाळ्यातील चौकशीला कंटाळून स्वत:च्या बंगल्यात जाळून घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.मेघराज यांचा अंबाजोगाई येथील हौसिंग सोसायटी भागात बंगला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब लातूरला राहत असल्याने ते अधून मधून येथे एकटेच राहण्यासाठी येत असत. बुधवारी ते मुक्कामासाठी अंबाजोगाईत आले होते. मध्यरात्री त्यांनी स्वत:च्या बेडरूममध्येच पेटवून घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याने हा प्रकार गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. सकाळपासूनच त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी बंगल्यावर येत होते.परंतु दरवाजा बंद असल्याने अजून ते उठले नसतील म्हणून कोणीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु दुपार होत आली तरी दरवाजा बंद असल्याने कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर बेडरूममध्ये त्यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह दिसला.
-----------------------------------------------------------------
यांना' सुद्धा संसदेमध्ये लागली होती डुलकी
- ऑनलाइन लोकमतलोकसभेमध्ये बुधवारी महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना राहुल गांधी यांचा डोळा लागला आणि प्रसारमाध्यमांसह, विरोधकांना आयता मुद्दा हाती लागला. राहुल यांना लागलेल्या डुलकीची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात असली तरी, संसदेत डुलकी घेणारे राहुल फक्त एकटेच नसून या नेत्यांनी सुद्धा संसदेत चर्चेच्यावेळी डोळा लागला होता.भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनाही संसदेमध्ये चर्चा सुरु असताना झोप लागायची. १९९६ ते ९८मध्ये त्यांना संसदेमध्ये डुलक्या घेताना पाहण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------
पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त
- ऑनलाइन लोकमत -पुणे, दि. 21 - हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात कल्याणी देशापांडेचे आणखी एक सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोथरुडच्या उच्चभ्रू भागात चालणाऱ्या या वेश्या व्यवसायातून मुंबईच्या तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.रवी शिवाजी तपासे (वय 28, रा.फ्लॅट नं ३, शिवालय सोसायटी, डावी भुसारी, पौड रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये मालाडच्या 19 वर्षीय, कांदिवलीच्या 24 वर्षीय तर न्यू पनवेलच्या 22 वर्षीय मुलीचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना भुसारी कॉलनीमध्ये राहणा-या कल्याणी देशपांडे तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) राधिका फडके यांनी पथकासह छापा टाकून कारवाई करीत तीन सज्ञान मुलींची सुटका केली.
-----------------------------------------------------------------
महिला अधिका-याबरोबर गैरवर्तन होत असेल तर, राणे नजरेस आणून द्या - मुख्यमंत्री
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - कॅबिनेट मंत्र्याने क्लास वन महिला अधिका-याशी गैरवर्तन करणे हा गंभीर प्रकार आहे. असे घडले असेल तर, नारायण राणे तुम्ही ते तातडीने नजरेस आणून दिले पाहिजे होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत कोपर्डी बलात्कार घटनेवर चर्चेला उत्तर देताना सांगितले.कोपर्डी येथील बलात्कार व खूनप्रकरणी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये चर्चेदरम्यान राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्याच एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अत्यंत वाईट वर्तन केले आहे.
-----------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment