Wednesday, 27 July 2016

नमस्कार लाईव्ह २७-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[आंतरराष्ट्रीय]
१- जिवंत पकडलेला अतिरेकी लाहोरचा, फोटोही प्रसिद्ध 
२- भारत अमेरिकेकडून विकत घेणार घातक पॉसीडॉन-८ आय विमान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- जीपच्या तीन गाड्या लवकरच भेटीला, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट 
४- सातवा वेतन आयोग, स्वातंत्र्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच करुन दाखवलं ! 
५- राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही : आठवले 
६- डॉ. कलामांच्या प्रथम स्मृतिदिनी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 
७- मोदी मला मारुन टाकतील - अरविंद केजरीवाल 
८- तूरडाळ उत्पादकांना अनुदान देणार! 
९- लोकसभेत बेनामी संपत्तीसंदर्भातील मांडलेलं विधेयक मंजूर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- तृप्ती देसाईंनी तरुणाला भर चौकात चोपलं 
११- नशाबंदी कायदा करा, मुख्यमंत्र्यांकडे अण्णांची मागणी 
१२- शिवसेनेचा टॅब बोगस, काहींना स्क्रॅच तर काहींना डिसप्लेच नाही! 
१३- 'मैत्रेय'मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळणार, देशातील ऐतिहासिक घटना 
१४- हेल्मेट सक्तिविरोधात पेट्रोलपंप चालक एकवटले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- पुणे; चॉकलेटचं आमिष दाखवून 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार 
१६- त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलणार 
१७- डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा 
१९- सीएम निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का 
२०- 'पोकेमॉन गो' मुळे मुंबईत पहिल्या अपघाताची नोंद, मर्सिडीजला रिक्षाची धडक 
२१- उस्मानाबाद- हाडांपासून भुकटी बनवणारे सहा कारखाने सील 
२२- मुसळधार पावसानंतर हैदराबादमध्ये अनेक भागात साचले पाणी 
२३- डाळींसाठी लातुरात ७ ठिकाणी धाडी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- दोन दिवसात विंडोज-10 अपग्रेड करा, अन्यथा... 
२५- दोन भारतीयांना यंदाचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
========================================

जीपच्या तीन गाड्या लवकरच भेटीला, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट

जीपच्या तीन गाड्या लवकरच भेटीला, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट
रँगलर
मुंबई: अमेरिकेची प्रसिद्ध एसयूव्ही निर्मिती कंपनी जीप लवकरच भारतात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील महिन्यातच म्हणजेच ऑगस्ट 2016 मध्येच जीप उद्योग सुरु करणार आहे. तर 2017 पासून पुण्यातील रांजनगावात कंपनी आपला प्लांन्ट सुरु करणार आहे.

सध्या जीप आपली प्रसिद्ध जीप ग्रँड चेरोकी, ग्रँड चेरोकी SRT आणि ऑफ रोड रँगलर अनलिमिटेड या गाड्या बाजारात आणणार आहे.

========================================

दोन दिवसात विंडोज-10 अपग्रेड करा, अन्यथा...

दोन दिवसात विंडोज-10 अपग्रेड करा, अन्यथा...
मुंबई मायक्रोसॉफ्टचं विंडोज 10 मोफत अपग्रेड करण्याचं मुदत दोन दिवसांत संपणार आहे. येत्या शुक्रवारनंतर विंडोज 10 मोफत अपग्रेड करता येणार नाही. शुक्रवारनंतर अपग्रेडिंगसाठी पैसे मोजावे लागतील. भारतात विंडोज 10 सॉफ्टवेअरच्या होम व्हर्जनची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे.

गेल्या वर्षी 29 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 लॉन्च केला होता. प्रसिद्धीसाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 ला एक वर्षासाठी मोफत केलं होतं.

विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरणारे यूझर्स हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करु शकतात. मायक्रोसॉफ्टने यासाठी अपग्रेड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उद्योग क्षेत्रातील यूझर्ससाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

जर तुम्हाला विंडोज 7 च्या स्टार्ट मेन्यूची कमतरता भासत असेल, तर या सॉफ्टवेअरमुळे ती कमतरता भरुन काढू शकता. इतकंच नव्हे, तर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने विंडोजला पर्सनलाईजही करु शकता. या सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट अॅपही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगळ्या अॅप्ससाठी अधिकची मेहनतही करावी लागत नाही.

या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमचा चेहरा किंवा आवाजाला आपल्या पीसी, लॅपटॉप किंवा टॅबचा पासवर्डही करु शकता.https://www.microsoft.com/en-in/software-download/windows10 वर जाऊन विंडोज 10 डाऊनलोड करु शकता.

========================================

तृप्ती देसाईंनी तरुणाला भर चौकात चोपलं

तृप्ती देसाईंनी तरुणाला भर चौकात चोपलं
पुणे: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. नगररोडवरील शिक्रापूर चौकात ही घटना घडली.

श्रीकांत लोंढे असं मारहाण करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

श्रीकांतचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होतं. लग्नाचं आमिष दाखवून तीच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र मुलीला दिवस जाऊनही श्रीकांतने लग्न न केल्याने, तसंच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्याने, या तरुणाला चोप दिल्याचं, तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

मात्र तृप्ती देसाईंना कायदा हातात घेऊन तरुणाला मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न पडतोय. खऱं तर तृप्ती देसाईंनी या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, मात्र भरचौकात मारहाण करुन कायदा हातात घेतला आहे.

========================================

7 वा वेतन आयोग, स्वातंत्र्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच करुन दाखवलं !

7 वा वेतन आयोग, स्वातंत्र्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच करुन दाखवलं !
नवी दिल्ली:  काम दाखवा आणि प्रमोशन मिळवा, हा खासगी कंपन्यांचा फंडा आता सरकारी नोकऱ्यांमध्येही लागू होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाचं नोटिफिकेशन काढतानाच मोदी सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची अट ठेवली आहे. त्यामुळे सरकारी नोकरांची क्षमता अधिक वाढेल असा विश्वास सरकारला वाटत आहे.

पगारवाढ घ्या, पण चांगलं काम करा
पगारवाढ घ्या, पण त्यासाठी चांगलं कामही करुन दाखवावं लागेल. सातव्या वेतन आयोगाचं नोटिफिकेशन काढतानाच मोदी सरकारनं  देशातल्या 47 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना हा संदेश दिला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकरीतही खासगीप्रमाणे  कामगिरीनुसार प्रमोशन करण्याची पद्धत रुढ होणार आहे..

सरकारी नोकरीत एकदा शिरलं की पुढे परफार्मन्सचं टेन्शन अनेकांना नसतं..कारण नियमानुसार वेतन, बढती मिळतच असते…पण आता हे चित्र बदलणार आहे..

========================================

राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही : आठवले

राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही : आठवले
नवी दिल्ली : राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, त्यामुळे त्यांच्या विधानाला फारसं गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असं उत्तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे.

देशातील दलितांवर अत्याचार होतात. यावर सर्वसहमतीनेच अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला आहे, असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं. तसंच अॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.


========================================

नशाबंदी कायदा करा, मुख्यमंत्र्यांकडे अण्णांची मागणी

नशाबंदी कायदा करा, मुख्यमंत्र्यांकडे अण्णांची मागणी
प्रातिनिधीक फोटो
मुंबईः नशाबंदी कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व्यसनाधितेमुळेच राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडत आहेत, असं अण्णांनी सांगितलं.


व्यसनाधिनता रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसंरक्षण दल स्थापण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. हे ग्रामसंरक्षण दल स्थापण्यासंदर्भात विधिमंडळात कायदा आणण्याची मागणीही अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.


पोलिसांना अवैध दारुचा पुरवठा रोखण्यात अपयश येत असल्यानं लोकांना अधिकार देण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. दारुबंदी करुनही दारुबंद रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत, त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी लोकांनाच अधिकार द्यावेत, अशी मागणी अण्णांनी केली.

========================================

चॉकलेटचं आमिष दाखवून 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

चॉकलेटचं आमिष दाखवून 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

चॉकलेटचं आमिष दाखवून 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

पुणेः चॉकलेटचं आमिष दाखवून सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शिवणे-उत्तमनगर भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील गोडाऊनमध्ये काल रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.



उमेश जाधव असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तमनगर परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील बाजूस एका इमारतीचं बांधकाम चालू आहे. आरोपी जाधव त्याच भागात तीन दिवसापूर्वी राहण्यास आला असून या साईट वर काम करत आहे, अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली.



जाधवने पीडित मुलाला चॉकलेट देतो, असे सांगून एका बांधकामाच्या रूममध्ये नेलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या सर्व प्रकाराची माहिती मुलाने घराच्यांना दिली. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

========================================

जिवंत पकडलेला अतिरेकी लाहोरचा, फोटोही प्रसिद्ध !

जिवंत पकडलेला अतिरेकी लाहोरचा, फोटोही प्रसिद्ध !
नवी दिल्ली : कारगील विजय दिनीच सीमेवर घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय जवानांनी जिवंत पकडलं. तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात काल हा थरार रंगला.

बहादूर अली असं जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून, त्याचा फोटो नकुताच जारी करण्यात आला आहे. बहादूर अली हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानविरोधात भक्कम पुरावा
या दहशतवाद्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. तसंच पाकविरोधात आणखी एक भक्कम पुरावा मिळाला आहे.

सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांना काही दहशवादी घुसखोरी करत असल्याचं दिसलं. त्याचवेळी झालेल्या धुमश्चक्रीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात जवानांना यश आलं.

========================================

शिवसेनेचा टॅब बोगस, काहींना स्क्रॅच तर काहींना डिसप्लेच नाही!

शिवसेनेचा टॅब बोगस, काहींना स्क्रॅच तर काहींना डिसप्लेच नाही!
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेची महत्त्वाकांक्षी टॅब योजना सलग दुसऱ्या वर्षीही हँग झाली आहे. वाटप केलेले टॅब बोगस निघाले आहेत. काहींना स्क्रॅच पडले आहेत, तर काहींना डिसप्लेच नाही.

मागील वर्षी प्रथमच आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे टॅब देण्यात आलेले होते. वह्या पुस्तकांनी भरलेलं दप्तर वाहण्यापेक्षा अभ्यासाची सगळी पुस्तकं असलेला हा टॅब उशीरा का होईना पण विद्यार्थ्यांच्या हातात आला. मात्र त्यातील बरेच टॅब बंद पडले आहेत.

अभ्यासक्रम डाऊनलोड केलेलं 32 GB मेमरी कार्ड काढून त्याजागी 2 GB, 4 GB चं बनावट मेमरी कार्ड टाकण्यात आलं आहे. पालिकेच्या 143 शाळांमधून अशी सुमारे 715 बनावट मेमरी कार्ड गोळा झाली आहेत.

यंदा आठवीची विद्यार्थीसंख्या 21 हजार आहे, तर टॅब वाटले फक्त 13 हजार, तसंच आठवीतून नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षाचे टॅब तर मिळाले, पण त्यात नव्या अभ्यासक्रमाच्या मेमरी कार्डचा पत्ता नाही. शिवाय टॅब हँग होणे आणि चार्जिंगचा प्रश्नही आहेच.

========================================

दोन भारतीयांना यंदाचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

दोन भारतीयांना यंदाचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : अत्यंत मानाच्या अशा जागतिक कीर्तीच्या रेमन मॅगसेसे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2016 सालच्या मॅगसेसे पुरस्काराने टीएम कृष्णा आणि बेजवाडा विल्सन या भारतीयांचा गौरव करण्यात आला आहे.

कर्नाटकातील संगीतकार टीएम कृष्णा आणि मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन यांना बहाल करण्यात येणार आहे. बेजवाडा विल्सन यांचा जन्म कर्नाटकातील एका दलित कुटुंबात झाला होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची दखल घेण्यात आली आहे.

चेन्नईत जन्मलेले टीएम कृष्णा कर्नाटकी संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्कृतीत सामाजिक एकरुपता कायम राखलं आहे, या कार्याची दखल घेण्यात आली आहे. कृष्णा सध्या रशियामध्ये स्थायिक आहेत.

========================================

'मैत्रेय'मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळणार, देशातील ऐतिहासिक घटना

'मैत्रेय'मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळणार, देशातील ऐतिहासिक घटना
नाशिकनाशिकमधील मैत्रेय चिटफंडमध्ये गुंतवलेले पैसे गुंतवणूकदारांना परत मिळणार आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने काल तसा आदेश दिला आहे.

चिटफंड घोटाळ्यातील पैसे गुंतवणूकदारांना परत मिळण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल.

गुंतवणूकदारांच्या बँक अकाऊंटमध्ये रक्कम

पैसे वाटप प्रक्रियेसाठी समितीची स्थापना केली जाणार आहे. हे पैसे थेट गुंतवणूकदारांच्या  खात्यात जमा होणार आहेत.

सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये जवळपास तेराशे कोटींचा मैत्रेय नामक घोटाळा उघडकीस आला होता, ज्यात नाशिकमधून चौदा हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या होत्या. त्याचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

========================================

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलणार

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलणार
नाशिक : त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलण्यात येणार आहे. ऐतिहासिक मंदिरातील श्रद्ध्येय पुरातन मूर्ती बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे.


जुन्या मूर्तीऐवजी नव्या मूर्तीची पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. मूर्ती जीर्ण आणि खंडित झाल्यामुळे या बदलाला संमती देण्यात आली आहे. जगन्नाथ पुरीच्या मूर्तीबदलानंतरची देशातली दुसरी तर महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे.


========================================

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा
पिंपरी चिंचवड/कोल्हापूर : पिंपरी चिंचवड आणि कोल्हापुरातील डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरीत 3 ते 4 कार्यालयात आयकर विभागाने सकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकली. शिवाय कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

पिंपरीत 22 अधिकाऱ्यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसंच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलिसही उपस्थित आहेत. आयकर विभागाचे अधिकारी साडेतीन तासांपासून कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत.

दुसरीकडे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजवर आयकर विभागाने सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकला आहे.

छाप्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

========================================

सीएम निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का

'सीएम निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का?'
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या निवासस्थानासमोर एका दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केली असतानाच खुद्द सिंह यांनी आगीत तेल ओतलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का, असा सवाल विचारणाऱ्या रमण सिंह यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

एका व्यक्तीने आपल्या निवासस्थानासमोर आत्महत्या केल्याने त्याचं राजकारण केलं जाऊ नये. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का, असं वक्तव्य रमण सिंह यांनी केलं.

========================================

डॉ. कलामांच्या प्रथम स्मृतिदिनी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

डॉ. कलामांच्या प्रथम स्मृतिदिनी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
चेन्नई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. या निमित्ताने तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये कलाम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेही उपस्थित होते.

गेल्या वर्षी याच दिवशी मेघालयमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला होता. आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना ते कोसळले आणि त्यांचं निधन झालं. डॉ. कलाम यांचा 1997 मध्ये सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ बहाल करुन गौरव करण्यात आला होता.

========================================

No comments: