Thursday, 14 July 2016

नमस्कार लाईव्ह १४-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल 
२- हाफीज सईदचे ट्‌वीटरवरील खाते बंद 
३- आग्नेय आशियात अमेरिकेने आळवला 'शांतताराग' 
४- पाकिस्तानला अकबरुद्दीनांकडून सडेतोड प्रत्युत्तर 
५- गुगलचं अजब ट्रान्सलेशन, Hinjewadi चं भाषांतर "ते घरी परतले नाहीत" 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- 'नीट' अध्यादेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
७- सरकारकडून राज्यघटनेचा अवमान - सोनिया गांधींचा मोदी सरकारवर प्रहार 
८- काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा 
९- गोमांसबंदीला दिल्लीच्या न्यायालयात आव्हान 
१०- पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी ८० ते ११० कोटी पाठविले 
११- समान नागरी कायदा होणे अवघड- दिग्विजय 
१२- अघोषित संपत्तीतून नाही भरता येणार कर 
१३- हवाई दलाची वर्तणूक भेदभावाची:पूजा ठाकूर 
१४- नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: राष्ट्रवादी काँग्रेस 
१६- देवयानी खोब्रागडे रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यक 
१७- नाशिक; मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक 
१८- यवतमाळ; २०५ पोलिसांच्या बदल्यांना ठेंगा 
१९- 'तीन लाखांपेक्षा रोख व्यवहारांवर बंदी आणा'- अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल  
२०- शीला दीक्षित उ. प्रदेशच्या "सीएम' उमेदवार 
२१- 'आंबेडकर भवन'बद्दल सरकारने माफी मागावी - श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर 
२२- नक्षलवाद्यांकडून चीनच्या क्रांतीचा जल्लोष महाराष्ट्राच्या भूमीवर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- मंगळुरू; लग्नाच्या तीन तास आधी नवरदेवाचा अकाली मृत्यू 
२४- जिगिशा खूनप्रकरणी तीन जण दोषी 
२५- वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून 
२६- नोइडा; लिव्ह-इन पार्टनरने तिला भोसकले 32 वेळा 
२७- जयपूर; अन् बैल चढला 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- नव्या उपचारामुळे मधुमेहींचे आयुष्यमान वाढणार 
२९- धर्मापुरीच्या डेव्हिडच्या नृत्याची परदेशातही भुरळ 
३०- अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या भावावर पुण्यात गुन्हा दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

====================================

'नीट' अध्यादेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारनं अलीकडेच काढलेल्या नीट अध्यादेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी 2016-17या शैक्षणिक वर्षात स्वतंत्र परीक्षा कायम ठेवण्याची राज्यांना केंद्रानं मुभा देत त्यांना नीटच्या अखत्यारीत न आणण्यासंबंधी हा अध्यादेश काढला होता.
    या अध्यादेशाला याचिकेद्वारे कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र आता या अध्यादेशात हस्तक्षेप करणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. नीटबाबत सर्वोच्च न्यायालयात एकानं याचिका दाखल करीत केंद्र सरकारच्या या वटहुकुमाला आव्हान दिले होते.
    वटहुकूम मूलभूत अधिकाराच्या विसंगत असल्याचा दावा या याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं विरोध दर्शवला आहे.
====================================

सरकारकडून राज्यघटनेचा अवमान - सोनिया गांधींचा मोदी सरकारवर प्रहार


  • सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाही बहाल
    ऑनलाइन लोकमत
    नांदेड, दि. १४ -  दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्य अन् देशात मोठी पदे सांभाळली़ त्यांनी आयुष्यभर संवैधानिक मुल्यांचे संरक्षण केले. विद्यमान भाजपा सरकारने मात्र सत्तेच्या लालसेपोटी अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकशाही मूल्य पायदळी तुडवित राज्यघटनेचा अवमान केला, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला़
    डॉ़. शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या़. अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ़. मनमोहनसिंग होते़. यावेळी काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा हे त्यातीलच अग्रणी राहिलेले. डॉ़. शंकरराव यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले़ केंद्रात गृहमंत्री व अन्य महत्त्वाची पदे सांभाळली़. ते कधीही संवैधानिक मुल्यांच्या बाहेर जावून काम करण्याचा विचारही करू शकत नव्हते. लोकमताचा आदर करीत सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी आयुष्य वेचले, आज मात्र सत्ता मिळविण्यासाठी राज्यघटना बाजूला सारण्यापर्यंत मजल जात आहे. आज शंकरराव असते तर त्यांना मोठे दु:ख झाले असते, त्यांनी अशा असंवैधानिक राजकारणाचा कठोरपणे विरोध केला असता. निश्चितच आजच्या परिस्थितीत आपणा सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटला पाहिजे़ न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले अन् लोकशाही बहाल केली़.
====================================

देवयानी खोब्रागडे रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यक ?


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १४ - केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद मिळालेल्या रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाली होती. 
    अमेरिकतील भारताच्या वाणिज्यदूतवासातील उच्च-उपायुक्तपदावर असताना अटक केल्यानंतर त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. 
    त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा त्यावेळी सत्तेवर असलेल्या तत्कालिन काँग्रेस सरकार आणि विरोधात असलेल्या भाजप दोघांनीही  निषेध केला होता. या प्रकरणामुळे भारत-अमेरिकेतील संबंधही ताणले गेले होते. देवयानी या माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत. 
====================================

लग्नाच्या तीन तास आधी नवरदेवाचा अकाली मृत्यू


  • ऑनलाइन लोकमत 
    मंगळुरु, दि. १४ - घरात लग्नसोहळयाची लगबग सरु असताना नवरदेवाचा बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. मंगळुरुच्या सुलिया तालुक येथे बुधवारी ही दुर्देवी घटना घडली. लग्नाच्या तीन तास आधी ही मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. मृत सचिन गोडा (३२) पेशाने इलेक्ट्रीशियन होता. 
    घरात नातेवाईक आले होते. लग्नाची लगबग सुरु होती. सचिन दाढी करण्यासाठी म्हणून बाथरुममध्ये गेला असताना पाय घसरुन बाथरुमध्ये पडला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ह्दयविकाराच्या झटक्याने सचिनचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाथरुममध्ये प्रवेश करताच सचिन खाली कोसळला. 
    बेशुद्धा अवस्थेत असताना नातेवाईक त्याला पुत्तुरच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे दोन कुटुंबातील आनंदाचा सोहळा दु:खामध्ये बदलून गेला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी सचिनच्या शरीरातील नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत.  
====================================

मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक


  • नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत.
    दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    विशेष म्हणजे, रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, बी. ए. डिझायनिंग, डीएमएलटी, बीएससीआयडी अशा अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या अभ्यासक्रमाची देखील मान्यता रद्द केली
    आहे. विद्यापीठाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 
====================================

२०५ पोलिसांच्या बदल्यांना ठेंगा


  • यवतमाळ : यंदा झालेल्या बदल्या सोयीच्या नाहीत, असे सांगत नव्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी २०५ पोलीस निरीक्षकांनी केलेले अर्ज महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने फेटाळले आहेत.
    यंदाच्या सामान्य बदल्या जाहीर झाल्यानंतर अडीचशेपेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांनी आपल्या सोयीने बदल्या द्याव्या म्हणून महासंचालक कार्यालयाकडे २५ मे ते ५ जून या काळात अर्ज केले होते. त्यात प्रत्येकानेच कौटुंबीक, आजार व अन्य कारणे दिली होती. निरीक्षकाने इच्छा दर्शविलेल्या घटकातील रिक्त जागा, तो सध्याचे नियुक्तीचे ठिकाण सोडू इच्छित असलेल्या जिल्ह्यातील निरीक्षकांची उपलब्ध संख्या, सोयीच्या बदलीसाठी दर्शविलेल्या कारणाची गंभीरता अशा विविध बाबींचा विचार करून महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने तब्बल २०५ पोलीस निरीक्षकांचे विनंती अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. केवळ ५२ पोलीस निरीक्षकांचे बदलीचे विनंती अर्ज मान्य झाले.
====================================

काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा


  • नवी दिल्ली : पंजाबमधील अकाली दल-भाजपाच्या सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी आतूर असलेल्या काँग्रेसच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे, केजरीवालांचा आम आदमी पक्ष. काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या समस्येवर मात करण्यासाठी राज्यात प्रत्येक गरजवंत कुटुंबाला एक सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाचा आक्रमक डाव खेळायचे ठरवले आहे.
    केजरीवालांच्या ‘आप’ ने तरुणांवर मोहिनी घालणारे अनेक प्रयोग पूर्वीच सुरू केले आहेत. काँग्रेसने अमरिंदरसिंगांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर ‘कॉफी वुइथ कॅप्टन’, ‘प्रत्येक मतदारसंघात कॅप्टन’ यासारख्या कार्यक्रमांचा धूमधडाका उडवून दिला. या कार्यक्रमातून, तसेच निरनिराळ्या सर्वेक्षणातून एकच महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसच्या लक्षात आला, पंजाबमधील बेरोजगारीची समस्या. त्यामुळे काँग्रेसने आता निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्याचे ठरवले आहे.
====================================

गोमांसबंदीला दिल्लीच्या न्यायालयात आव्हान


  • नवी दिल्ली : दिल्लीत गोमांसाचे सेवन करणे अथवा ते बाळगणे हा अपराध आहे. मात्र, या निर्णयालाच एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. गौरव जैन या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली सरकारला नोटीस पाठविली आहे.
    मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता धींगरा सहगल यांनी सरकारला १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. दिल्ली अ‍ॅग्रीकल्चर कॅटल प्रिजर्व्हेशन अ‍ॅक्टच्या त्या तरतुदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यानुसार दिल्लीत गोमांस सेवन वा बाळगणे हा गुन्हा आहे. याचिकाकर्ता गौरव जैन याने निदर्शनास आणून दिले की, असेच प्रकरण मध्य प्रदेशातूनही आले आहे आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या विधेयकाच्या अशाच तरतुदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.
====================================

संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल


  • ऑनलाइन लोकमत 
    संयुक्त राष्ट्र, दि. १४ - काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला त्याच व्यासपीठावरुन भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान एक देश म्हणून दहशतवादाचा धोरणासारखा वापर करत आहे तसेच दहशतवादाचा मानवी हक्क समर्थनासाठी वापर करत आहे असे स्पष्ट शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले. 
    संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारणसभेत मानवी हक्काच्या विषयावर बोलताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानने आधी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी मालीहा लोधी यांनी दहशतवादी बुरहान वानीला काश्मीरी नेता ठरवले. त्याचा भारताने कठोर शब्दात समाचार घेतला. 
    संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा पाकिस्तानने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचा धोरणासारखा वापर केला आहे. दहशतवाद्यांचे गुणगान करताना पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राने ज्यांना अतिरेकी घोषित केले त्यांना आश्रय स्थान मिळवून दिले आणि आता आपण हे सर्व मानवी हक्कांच्या समर्थनासाठी करत असल्याचा आव आणत आहेत अशा शब्दात भारताने पाकिस्तानला उघडे 

    पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी ८० ते ११० कोटी पाठविले


    • डिप्पी वांकाणी,  मुंबई
      नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ््यामध्ये पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी जिग्नेश शाह याने सुरू केलेल्या कंपन्यांमध्ये सुमारे ८० ते ११० कोटी रुपये पाठविले आहेत. सक्त वसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी शाह याला अटक केली. हा अधिकारी म्हणाला की खोट्या व्यवहारांचा खुलासा ना जिग्नेश शाह करू शकला ना या लबाड कंपन्यांचे संचालक. त्यामुळेच शाह याला अटक झाली. शाह याने फिनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची स्थापना केली असून ती एनएसईएलमधील होल्डींग कंपनी आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जागेवर व्यापारी मालाची देवाणघेवाण/ व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणून ही कंपनी होती. एनएसईएलच्या गोदामात जो माल ठेवण्यात आला होता तो विकला गेला परंतु २०१३ मध्ये घोटाळा उघडकीस आला तो हा की मुळात गोदामात मालच नव्हता. त्यानंतर १३ हजार गुंतवणूकदारांचे पैसे कंपन्यांनी दिले नाहीत व हा घोटाळा ५,६०० कोटी रुपयांचा झाला.
      ‘‘जिग्नेश शाह याने स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी ८० ते ११० कोटी रुपये भरल्याचे आम्हाला आढळले आहे. बुडविणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांना आम्ही बोलावले होते. त्यांनी या ८० ते ११० कोटी रुपयांबद्दल समाधानकारक खुलासा केलेला नाही’’, असेपाडले. 


  • ====================================

No comments: