नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 13 August 2015
Namaskar Live 13-08-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १३-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेद करण्यासाठी यंदा भारत-पाकमध्ये स्वातंत्र्यदिनी मिठाईची देवाण-घेवाण होणार नाही - बीएसएफच्या जवानांनी दिली माहिती
२- लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेनी केली दुष्काळी भागाची पाहणी
३- लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या खा. शरद पवार यांच्या हस्ते
४- लातूर जिल्हा सहकार बोर्ड व लक्ष्मी बँकेच्या सभासदांसाठी १८ ऑगस्ट रोजी शिक्षण कार्यक्रमांचे आयोजन
५- राज्याचे जल आयुक्तालय मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन करा; शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख बालाजी भोसले यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पहिल्या श्रावणी सोमवार १७ ऑगस्टला लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराची महापूजा केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांच्या हस्ते
२- कोर्टाने उठविली मॅगीवरील बंदी, सहा आठवड्यांनी येणार बाजारात
३- शिक्षणमंत्री विनोद तावडे लातुरात, वैद्यकीय महाविद्यालयाला दिली भेट
४- पंचायत राज समिती, २५ आमदारांसोबत करणार पुढील महिन्यात नांदेड जिल्हा दौरा
५- लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या मुंबईत शेतकऱ्यांच्या आत्महत्या समस्या आणि उपाय या विषयावर किशोर तिवारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २५ºC / २७ºC आहे
उद्या दि. १४ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे, या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे, नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे
( सुधीर सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment