Wednesday, 12 August 2015

Namaskar Live 12-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- जगाची लोकसंख्या २०१५ पर्यंत ९.७ अब्जापर्यंत पोहचण्याची शक्यता; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

२- लातूर जिल्यातील जळकोट तालुक्यातील जंगमवाडी तलावातून पाणी उपसा सुरूच

३- लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे चार हजार कोटींचे नुकसान

४- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, जनावरांसाठी चार छावण्या उभ्या करा, अन्यथा लातूर जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही - राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे

५- लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, लातूर बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष अभय शहा

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लोकसभेत ललित मोदी प्रकरणावर पुन्हा गोंधळ, गर्विष्ठ सरकार विरोधकांना भीती दाखवतंय, कॉंग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गेचा आरोप

२- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रामेश्वरमध्ये स्वाईन फ्लूचे संकट ५ दिवसात तिघांचा मृत्यू

३- लातूर शहरातील उत्तर विभागांतर्गत मागील काही दिवसात वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली, ६० वीजचोरांवर दंडात्मक कारवाई

४- औसा तालुक्यातील गोंद्री येथील साईबाबा शुगर्स या खासगी कारखान्याची ५ कोटी १५ लाखाची मालमत्ता तहसीलदारांनी केली जप्त

५- पंकजा मुंडे आजपासून १५ ऑगस्टपर्यंत दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्हा दौऱ्यावर

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

संस्कारातून स्वभाव निर्माण होतो आणि स्वभावातून आपली वृत्ती

( विनोद पवार, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २४ / २६ आहे

उद्या दि. १३ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२५ / २७ राहील

No comments: