Friday, 14 August 2015

Namaskar Live 14-08 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर येत्या १५ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करू - शरद पवार

२- इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी रज्जाक कुरेशी यांची निवड

३- नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांची पायाभूतचाचणी

४- समाज कल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दलितवस्त्यांमध्ये विकासाची कामे करण्यात येणार - जि.प. समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण

५- मल्लिनाथ बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

६- बिलोली तालुक्यातील बोळेगाव जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- राष्ट्रवादी काँग्रसनेच त्यांचे स्वतःचे प्रश्न सोडवावेत, राज्यापुढील अडचणींमधून मार्ग काढण्यास सरकार समर्थ आहे; मुख्यमंत्र्यांची भूमिका

2- IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ज्यांना ठोस पुराव्याअभावी कोर्टाने मुक्त केले त्या सगळ्यांच्या विरोधात नव्याने कारवाई करण्याची परवानगी मिळवण्यासाठी दिल्ली पोलिस कोर्टात याचिका करणार

3- दिल्लीत जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन

4- भाजप सरकारला शेतक-यांशी काहीच देणेघेणे नाही, सरकारला अद्याप सूर गवसलेला नाही, पंतप्रधान तर २० - २० दिवस संसदेतच येत नाहीत - शरद पवार

5- हैदराबादमध्ये 4 संशयित अतिरेकी पकडले, दोन बांगलादेशी, 1 पाकिस्तान आणि 1 म्यानमारचा

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२६ºC / २८ºC आहे

निरभ्र आकाश आहे

उद्या दि. १२ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२७ºC / ३०ºC राहील

निरभ्र आकाश राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा हे महत्वाचे नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे.

त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचे नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपने तुमच्या पाठीशी आहे हे महत्त्वाचे आहे

( मनोज धनवाणी , नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: