Friday, 30 September 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- दहशतवाद्यांचे मृतदेह पुरले, पुरावे नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव 
२- पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर 
३- शांघाय; भररस्त्यात 999 कंडोम देऊन त्याने केलं 'प्रपोज' 
४- श्रीलंकेनेही सार्क परिषदेवर घातला बहिष्कार. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा 
६- जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू- राजनाथसिंह 
७- सीमेजवळची हजार गावं रिकामी, रुग्णालयंही सज्ज 
८- सर्जिकल स्ट्राईक : राहुल गांधीही म्हणतात, मी मोदींसोबत ! 
९- बनावट क्‍लिप प्रसारित करू नका: भारतीय लष्कर 
१०- बनावट क्‍लिप प्रसारित करू नका: भारतीय लष्कर 
११- पश्चिम किनारपट्टीवर आढळली संशयास्पद बोट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- मोहम्मद शहाबुद्दीनचा जामीन न्यायालयाकडून रद्द 
१३- घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 
१४- पूँछ, नौगाममध्येही पाककडून गोळीबार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- पाकने जवान पकडल्याच्या धक्क्याने आजीचा मृत्यू 
१७- चंदू चव्हाण; भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं 
१८- बीड-छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न 
१९- भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींवर गुन्हा दाखल, 
२०- अकोला; दोन ठिकाणी घरफोडी, घरातील ५ लाखाचे सोन्याचे दागीने लंपास
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाही - सलमान खान 
२२- पाकी सैन्याला संपवणाऱ्या भारतीय जवानाची भूमिका करेल का फवाद खान? 
२३- पूजारा-रहाणेची अर्धशतके, भारत १७० च्या पुढे 
२४- भारतीय संघाची खराब सुरवात- 5 बाद 194 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=================================

पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा

पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा
नवी दिल्ली : नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून ते मूळचे धुळ्याचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय जवानाने नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केल्याचं वृत्त गुरुवारी संध्याकाळी आलं होतं. टट्टापानी इथे या चंदू चव्हाण यांनी एलओसी पार केली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्ताने त्यांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे.


=================================

22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं

22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं
धुळे/मुंबईनजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून तो धुळ्याचा आहे.
धुळ्यातील बोरविहार गावचा, अवघ्या 22 वर्षांचा तरणाबांड चंदू, 2012 मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाला. दोनच महिन्यांपूर्वी त्याने राष्ट्रीय रायफल्स जॉईन केली होती. मात्र काल पाकिस्तानने त्याला पकडल्याचं वृत्त आलं आणि धुळ्यासह संपूर्ण देशावर काळजीची लाट पसरली.
चंदूचा मोठा भाऊ भूषण चव्हाण हा सुद्धा मिलिट्रीतच आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंट, जामनगर गुजरातमध्ये कार्यरत आहे.

=================================

सीमेजवळची हजार गावं रिकामी, रुग्णालयंही सज्ज

सीमेजवळची हजार गावं रिकामी, रुग्णालयंही सज्ज
नवी दिल्ली भारतीय लष्कराच्या यशस्वी सर्जिकल ऑपरेशननंतर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब सीमेजवळची सुमारे 1 हजार गावं रिकामी करण्यात आली आहेत. सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. प्रशासनाने 15 लाख नागरिकांना सुरक्षीत स्थळी ठेवण्याची तयारी केली आहे.
पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट, तर्णतारण, फिरोजपूर, हाजीलका या जिल्ह्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

=================================

सर्जिकल स्ट्राईक : राहुल गांधीही म्हणतात, मी मोदींसोबत !

सर्जिकल स्ट्राईक : राहुल गांधीही म्हणतात, मी मोदींसोबत !
नवी दिल्ली भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर संपूर्ण देशाने भारतीय जवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत, असदुद्दीन ओवेसींपासून ते सीताराम येचुरींपर्यंत सर्वांनी पाकिस्तानविरोधी कारवाईसाठी आम्ही भारत सरकारसोबत असल्याचं म्हटलं.
त्यानंतर आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. “मी आणि माझा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत. त्यांनी जे केलं ते अत्यंत योग्य होतं”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंचा मोदींना कॉल, सोनियांकडूनही कौतुक
भारतीय लष्करानं पाकिस्तानाला चोख उत्तर दिल्यानंतर मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षावर होतो आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. एवढंच नाही तर सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली. या मोहिमेत काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताचा सर्जिकल स्ट्राईक
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

=================================

अदनान सामीकडून भारतीय जवान आणि मोदींचं कौतुक

अदनान सामीकडून भारतीय जवान आणि मोदींचं कौतुक
मुंबई : काही महिन्यांपूर्वीच भारताचा नागरिक झालेला गायक अदनान सामीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीचं अदनानने कौतुक केलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला !

सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला !
फाइल फोटो
नवी दिल्लीज्यांनी आपल्या 20 साथिदारांना गमावलं, ज्यांनी उरी हल्ल्याची भळभळती जखम घेऊन इतके दिवस प्रतीक्षा केली, त्याच जवानांनी आपल्या मित्रांच्या बलिदानाचा बदला घेतला.
ज्या भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केलं, त्या जवानांमध्ये डोग्रा रेजिमेन्ट आणि बिहार रेजिमेन्टच्या जवानांचा समावेश होता.

=================================
बनावट क्‍लिप प्रसारित करू नका: भारतीय लष्कर

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून "सर्जिकल ऑपरेशन‘द्वारे इशारा दिल्यानंतर पाकमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पाकमधील माध्यमांनी "सर्जिकल ऑपरेशन‘दरम्यान भारतीय जवान जखमी झाल्याची बनावट व्हिडिओ क्लिप तयार केली असून ती सोशल मिडियावरही व्हायरल करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारची क्‍लिप प्रसारित करू नये किंवा वितरित (फॉरवर्ड) करू नये असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.

लष्कराने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेखालील दहशतवाद्यांचे सात तळ उध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले. मात्र पुन्हा अशी कारवाई करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिली. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्‌भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नमस्कार लाईव्ह ३०-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली 
२- भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत 
३- भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर अमेरिकेने मौन सोडलं! 
४- चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक 
६- सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट 
७- ऑक्टोबरमध्ये बँकांना 11 दिवस सुट्ट्या 
८- देश आणि लष्करासोबत आम्ही एकजूट आहोत: ओवेसी
९- पाकिस्तानला डबल दणका, इराणनेही केला हल्ला 
१०- हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन 
११- सर्जिकल स्ट्राईकमधील पुरावे नष्ट करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु - गुप्तचर यंत्रणा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- सुरतमधील कार्यक्रमात 2 कोटींची उधळण, रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देणार 
१३- पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच थांबायला हवे - उद्धव ठाकरे
१४- अखेर परळ टर्मिनसच्या कामाला सुरुवात
१५- लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- कोल्हापुरात जिलेटीनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट 
१७- वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
१८- उस्मानाबाद - किल्लारी, सास्तूरमधील विनाशकारी भुकंपाला २३ 
१९- राजस्थान सीमेजवळ पाकिस्तानचे मानवरहीत विमान उडताना दिसले.
२०- हरियाणा; अपघातात 9 भाविकांचा मृत्यू तर 14 जखमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद
२२- भारताचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय 
२३- सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण
२४- उच्च न्यायालयाचा आदेश पाळायला व्हॉट्स अॅपचा नकार
२५- iPhone 7 आणि 7 plus चं आज मध्यरात्रीपासून प्री-बुकिंग सुरू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
===================================

सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक

सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामध्ये केंद्रीय सुरक्षा समितीती आज पुन्हा बैठक होणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.

फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!

भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, सुरक्षा सल्लागार अजित दोभाल, तीनही सैन्यदलाचे प्रमुख, सरकारचे वरिष्ठ मंत्री हे या बैठकीला उपस्थित असतील.

फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ

सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तान सैन्याच्या हालचाली, त्यांना उत्तर देण्यासाठी भारताची तयारी यासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार

27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली
दरम्यान, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसत आहे. आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे. यानंतर सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

===================================

सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट

सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट
मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताच्या पश्चिम समुद्रकिनावर अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबईतील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतं. मात्र सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
1 आणि 2 ऑक्टोबर रोजी सैन्याच्या युद्धनौकेवर सामान्यांसाठी आयोजित केलेलं प्रदर्शन रद्द केलं आहे.
तसंच 3 ऑक्टोबर रोजी एनसीसी कॅडेट, सैनिक स्कूलचे विद्यार्थी, इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी समुद्रात आयोजित केलेले सैन्याचं प्रदर्शन आणि कार्यक्रम रद्द झाला आहे.
याशिवाय ऑक्टोबर मध्य आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेव्ही मॅरेथॉन, दिव्यांगांसाठी प्रदर्शन, बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. पण सध्या तरी त्यात कोणताही बदल केलेला नाही.

===================================

सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली

सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवरचा तणाव तासागणिक वाढत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसत आहे. काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याने सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

===================================

भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत

भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत?
नवी दिल्ली : भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताने सर्जिकल स्टाईक यशस्वी केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर तणावपूर्ण वातावरण आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 हजार 323 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात अशा चार राज्यांपर्यंत भारत-पाकिस्तान सीमा पसरली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 1225 किलोमीटर लांब सीमा आहे, ज्यातील 740 किलोमीटर नियंत्रण रेषा (LOC) आहे.

राजस्थानमध्ये 1037 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तर गुजरातमध्ये 508 किलोमीटर लांब सीमा, पंजाबमध्ये 553 किलोमीटर लांब सीमा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 740 किलोमीटर लांब नियंत्रण रेषा आहे.

485 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा जम्मू, सांबा आणि कठुआमध्ये आहे. ही सीमा कठुआ ते अखनूरपर्यंत पसरली आहे.

1972 मध्ये शिमला करारानुसार युद्धानंतर जो देश जिथपर्यंत होता, तिथेच राहून त्या जागेला नियंत्रण रेषा (LOC) संबोधलं गेलं. 740 किलोमीटर लांबीची सीमा नकाशावर आखण्यात आली.

===================================

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर अमेरिकेने मौन सोडलं!

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर अमेरिकेने मौन सोडलं!
वॉशिंग्टन संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी, असा सक्त संदेश पाकिस्तानला देत व्हाईट हाऊसने भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव कमी करण्याचं आवाहनही केलं आहे.

अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी याबाबत बोलताना सांगितले, उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेल्या स्थितीवर अमेरिकेची नजर आहे. उरीसारखे दहशतवादी हल्ले तणाव निर्माण करणारेच असतात.

व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “भारत आणि पाकिस्तानचं लष्कर एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्याच्या चर्चेसाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.”

अर्नेस्ट यांनी सांगितले की, “अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राइस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. अमेरिकालाही वाटतं की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह इतर दहशतवादी संघटनांची कायदेशीर मान्यता रद्द करावी, असे सुझान राइस यांनी डोभाल यांना सांगितले.”

===================================

सुरतमधील कार्यक्रमात 2 कोटींची उधळण, रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देणार

सुरतमधील कार्यक्रमात 2 कोटींची उधळण, रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देणार
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये एका सांगीतिक कार्यक्रमात गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र या कार्यक्रमात जमा झालेली रक्कम शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सुरतचे व्यापारी महेश सवाणीने उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘वतन के रखवाले’ हा भजन कार्यक्रम आयोजित केला होता. या पुरुष, महिलांसह लहान मुलांनीही पैसे उडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात सुमारे 2 कोटी रुपयांचा अक्षरश: पाऊस पडला.
जमा झालेले सर्व पैसे शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदत म्हणून दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी अशा पद्धतीने पैसे उधळल्याने या कार्यक्रमावर टीका होत आहे.

===================================

ऑक्टोबरमध्ये बँकांना 11 दिवस सुट्ट्या

ऑक्टोबरमध्ये बँकांना 11 दिवस सुट्ट्या!
मुंबईः ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका अकरा दिवस बंद राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बँकांना सुटट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आत्ताच नियोजनपूर्वक आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे.

ऑक्टोबरमधील पाच रविवार (2,9,16,23 आणि 30) तसेच दुसरा आणि चौथा शनिवार (8 आणि 22 ऑक्टोबर) या दिवशीही बँका बंद राहणार आहेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांनी आत्ताच आर्थिक नियोजन करणं बंद आहे.

असा आहे सुट्ट्यांचा क्रम
  • 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती)
  • 8 ऑक्टोबर दुसरा शनिवार
  • 9 ऑक्टोबर रविवार
  • 10 आणि 11 तारखेला दसऱ्याची सुट्टी
  • 12 ऑक्टोबर रोजी मोहरमची सुट्टी
  • 30 (लक्ष्मीपूजन) आणि 31 ऑक्टोबर (बलिप्रतिपदा)

===================================

भारत-न्यूझीलंड आमने सामने, गंभीरऐवजी धवनला संधी

LIVE: भारत-न्यूझीलंड आमने सामने, गंभीरऐवजी धवनला संधी
अपडेटः
भारताला पहिला झटका, शिखर धवन एक धाव करुन तंबूत

टीम इंडियात दोन बदल, केएल राहुल ऐवजी, धवनला संधी, तर उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी

दुसऱ्या कसोटीत गौतम गंभीरला संधी नाहीच, गंभीरऐवजी शिखर धवनला संधी

भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
————————————
कोलकाताः भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा कसोटी सामना आजपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतीय भूमीवरचा हा अडीचशेवा कसोटी सामना असून, विराट कोहलीची टीम इंडिया ही कसोटी जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे.

कोल्हापुरात जिलेटीनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट

कोल्हापुरात जिलेटीनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट
कोल्हापूर : कोल्हापुरातील कागल पिंपळगाव खुर्द इथे जिलेटिनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट झाला. रात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली.
मुस्तफा महम्मद यांच्या गोदामात जिलेटीनचा साठा होता. मात्र मध्यरात्री तिथे अचानक स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
स्फोटाची तीव्रता एवढी होती की, 12 किलोमीटर अंतरावर आवाज ऐकू आला. आवाजाने जागं झालेल्या नागरिकांना सुरुवातीला हा भूकंप असल्याचं वाटलं. मात्र नंतर गोदामात स्फोट झाल्याचं समजलं. दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


===================================

चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात


चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या एका जवानाला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचा दावा पाक लष्करानं केला आहे. भारतीय जवानानं चुकून नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केली. त्यामुळं पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय जवानाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे.

भारतानं काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान, पाक लष्करानं पकडलेल्या जवानाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पण या जवानानं चुकून नियंत्रण रेषा ओलांडली आणि त्यानंतर पाकनं त्याला ताब्यात घेतलं अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, हा जवान महाराष्ट्रातील आहे. पण नियंत्रण रेषा ओलंडलेला जवान हाच महाराष्ट्रातील जवान आहे का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराकडून जवानाबाबत जेव्हा नेमकी माहिती देण्यात येईल त्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.

===================================

Thursday, 29 September 2016

नमस्कार लाईव्ह २९-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
२- 'सर्जिकल स्ट्राईक'चा दावा पाकिस्तानने फेटाळला 
३- पुढीलवेळी आम्ही उत्तर देऊ - पाक संरक्षणमंत्री 
४- राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली लष्करी कारवाई
५- भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात गोंधळ 
६- पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना फोनवर मिळाली धमकी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- चार तासात ३५ दहशतवादी, ९ पाकी सैनिकांचा खात्मा 
८- दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं
९- पाकविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी- कर्नल पाटील 
१०- सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ? 
११- 'सर्जिकल स्ट्राईक'चे काँग्रेसकडून कौतूक
१२- पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई; वाचा सविस्तर 
१३- भारताच्या कारवाईमुळे सेन्सेक्स कोसळला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे
१५- पंजाबमध्ये सीमेवरील गावांना अतिदक्षतेचा इशारा 
१६- 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी मारले' 
१७- सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे 'कमेंटभर' कौतुक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- आग्य्राजवळ मराठी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 
१९- अंधेरी; जन्मदात्या आईला पंख्याला लटकावलं, नराधम मुलाला अटक
२०- ठाण्यात मुख्यमंत्र्यासमोर कुपोषणाविरोधात निदर्शने
२१- भाईंदर; आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुण तलवार घेऊन इमारतीवर चढला
२२- सोलापूर;तोल जाऊन विहीरीत पडल्याने मुलीचा दुर्दैवी अंत.
२३- सांगलीतील प्रेमीयुगुलाची आग्रा येथे केली आत्महत्या. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय
२५- अनुराग ठाकूर, अजय शिर्के यांना हटवा
२६- बीसीसीआयने सुधारावे; अन्यथा आम्ही सुधरवू
२७- गंभीरच्या समावेशामुळे धवनचे स्थान धोक्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करा - संभाजी ब्रिगेड 

सोयाबीन, उडीद, मुग ह्या हाताशी आलेल्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. मागील तीन वर्षापासून दुष्काळात होरपळत 

असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीचा पाऊस दिलासा देणारा होता... पण, परतीच्या पावसाने हाताशी आलेले पिक जमीनदोस्त झाले आहे. उभे 

पिक जमिनीवर आडवे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पिकाच्या शेंगामधून मोड आलेले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हताश झाला 

आहे. 
या पिकांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, 

अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष संभाजी कल्याणकर व राजू मोरे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
================================

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले, भारताचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणं.
सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.
साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.
================================

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.
भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं पित्त चांगलंच खवळलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत असल्याचं पाकिस्ताने म्हटलं आहे. तसंच आमच्या शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, अशी उलटबोंब आता पाकिस्तानने सुरु केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आपली भूमिका मांडली. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचं नवाज शरीफांनी म्हटलं आहे.

================================

दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं

दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं
नवी दिल्ली : पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. उरी हल्ला आणि पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अर्धवट सोडून तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
या बैठकीसाठी तीनही सैन्यदलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि दिग्गज मंत्री उपस्थित आहेत.
दरम्यान, भारत आज पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधीचा करार मोडणार असल्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 साली शस्त्रसंधी करार झाला होता.
काल रात्री सीमेवर पुन्हा गोळीबार झाला. त्यात आमचे दोन जवान मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. शस्त्रसंधी करार जर संपुष्टात आला, तर सैन्यदलाला तात्काळ निर्णय घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मुभा मिळेल.

================================

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.  त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या.
“हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है, असंच म्हणावं लागेल, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली.
तसंच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असं म्हणत सुप्रियांनी निशाणा साधला.

================================
  • पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई
पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून 35 दहशतवादी व 9 सैनिकांना ठार मारल्याची घोषणा भारताने केल्यानंतर या कारवाईवर अचानक प्रकाशझोत पडला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला.

पार्श्‍वभूमी उरीतील दहशतवादी हल्ल्यात आपले 18 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरवात केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्‍मीरचे तुणतुणे वाजवले होते. एनाम गंभीर या भारतीय अधिकाऱ्याने शरीफ यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही आमसभेत हिंदीत भाषण करत पाकिस्तानच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविल्या होत्या. त्याच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर सभेत पाकिस्तानच्या जनतेशीच संवाद साधत तेथील राज्यकर्ते आणि लष्कराच्या कारवायांवर बोट ठेवले होते.

कारवाई काय झाली? पाकव्याप्त काश्‍मीरमधील प्रशिक्षण तळांवर दहशतवादी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर किमान 20 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कराने उधळले होते. आता पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल (बुधवार) मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या कालावधीमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. प्रत्यक्ष ताबारेषेपासून 500 मीटर ते दोन किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये ही कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई ही जमिनीवर झाली. या कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमधील किमान पाच दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईमध्ये भारताचा कोणताही जवान जखमी झालेला नाही; तर ‘आमचे दोन सैनिक ठार आणि नऊ सैनिक जखमी झाले,‘ असा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षेनुसार, पाकिस्तानने सुरवातीला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि नंतर या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ला ‘भारताने केलेले आक्रमण‘ असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भारताने कारवाईची अधिकृत घोषणा केल्यामुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानने आता भारतालाच ‘आक्रमक‘ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भारताने पुन्हा अशी कारवाई केल्यास पाकिस्तान पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देईल,‘ असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे.

पुढे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या योजना कार्यान्वित केल्या असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहण्यास मिळत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दुपारी चार वाजता सर्वपक्षीय बैठकही बोलाविली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिंधू पाणी वाटप कराराचाही पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर याविषयीही काही निर्णय होण्याची शक्‍यता आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनाही देण्यात आली आहे. 


नमस्कार लाईव्ह २९-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ओबामा यांना झटका, सिनेटकडून पहिल्यांदा व्हेटो रद्द 
२- सार्कवर बहिष्कार घालण्याच्या भारताच्या निर्णयाचा अभिमान वाटतो - रतन टाटा 
३- आण्विक शस्त्र प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही - पाकिस्तान 
४- कॅलिफोर्निया; वणवा विझविण्यास १,१00 कर्मचारी 
५- अॅम्सटरडॅम; MH-17 विमानाच्या रहस्यावरून पडदा उठला, रशियन मिसाईलने पाडलं विमान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी? 
७- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस
८- आता JIO सिम कार्डची होम डिलीवरी
९- अंबानी बंधू 10 वर्षांनंतर एकत्र 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी 
११- खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत 
१२- विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी 
१३- संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे 
१४- रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर 
१५- स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- अंधेरी; पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत 
१७- शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार 
१८- कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं
१९- मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात
२०- उरण; 'थ्रील' अनुभवण्यासाठी 'तिने' पसरवली दहशतवाद्यांची अफवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय 
२२- गंभीरच्या समावेशामुळे धवनचे स्थान धोक्यात 
२३- बीसीसीआयने सुधारावे; अन्यथा आम्ही सुधरवू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
===========================================

अंधेरी; पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत

पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत
मुंबई : माणुसकीला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार मुंबईतल्या अंधेरीत समोर आला आहे. 80 वर्षांच्या जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी सुरेंद्र सत्तार वैद्य नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आगे.
महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पीडित मायावती वैद्य यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
या अत्याचाराचा व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पीडित वृद्धेची सून, मुलगी आणि नातीने काढला असून रेकॉर्डिंग करताना त्यांच्या हसण्याचा आवाजही येत आहे.
वृद्धेवरील अत्याचार किती भीषण होते हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. नराधम मुलगा ओढणी पंख्याला बांधून, ती आईच्या पायात अडकवून तिला ओढत असे.
हा सैतान मुलगा मागील तीन वर्षांपासून आईचा अमानुष छळ करत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारात सुरेंद्रला मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुरेंद्र, बहु आणि मुलीविरोधात भारतीय दंडविधान कलम  354, 352, 336, 506 (2अ), 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी मुलगा, सून आणि मुलीला अटक केली असून त्यांना आज अंधेरी कोर्टात सादर करण्यात येईल.
===========================================

मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी

मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी
उस्मानाबादः मराठवाड्याचा दुष्काळ यंदाच्या पावसाने धुऊन लावला असला तरी नैसर्गिक आपत्तीने मात्र 70 बळी घेतले आहेत. यामध्ये पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अतिवृष्टीने मराठवाड्यात 569 जनावरे दगावली. तर 3 हजार 998 घरं, झोपड्या, गोठ्यांचं नुकसान झालं. 19 ठिकाणच्या खाजगी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या नुकसानीचा आकडा 31 लाख 48 हजार एवढा आहे.  मात्र आनंदाची बाब म्हणजे मराठवाड्यातल्या सर्वच प्रकल्पात मिळून 60 टक्के पाणी साठा झाला आहे.

मराठवाड्यात पुरात वाहून गेलेल्यांची संख्या
मराठवाड्यात वीज पडून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरात वाहून गेल्याने विविध जिल्ह्यात 33 जणांना आपला जीव गमवावा लागला.

===========================================

खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत

खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत
भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेसह संसदेतही उमटले होते.
दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची  पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते.
आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली. भोतमांगेना न्याय मिळावा म्हणूण अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. भैयालाल भोतमांगे यांची अजूनही न्यायासाठी लढाई सुरु आहे.
या हत्याकांडांनंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी आहे.

===========================================

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार
बारामती (पुणे) : मराठा क्रांती मोर्चा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत धडकणार आहे. सकाळी 11 वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात होईल.
कोपर्डीतील निर्भया आणि उरीमधल्या शहीद जवानांना मोर्चात श्रद्धांजली वाहिली जाईल. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत..
पुण्यातल्या मोर्चाप्रमाणेच बारामतीतील मराठा मोर्चाही विक्रमी ठरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

===========================================

विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी

विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी
नवी दिल्लीः वेतनवाढीच्या मागणीनंतर खासदारांनी विमान प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या वेतनवाढीसाठी असलेल्या समितीची विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. त्यामध्ये विमान प्रवासात सवलत देण्याची मागणी केली.

अशा आहेत खासदारांच्या मागण्या
  • विमानात खासदारांसाठी आरक्षित जागा असावी.
  • विमानतळावर खासदारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळावी.
  • विमानात पुढच्या जागा खासदारांना मिळाव्या.
  • विमान तिकिट शुल्कात सवलत मिळावी.
  • विमान प्रवासात खासदारांना जेवन मोफत मिळावं.

===========================================

कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं

कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं
कोल्हापूर : कोल्हापुरातील हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने एका महिलेसह पाच जणांना उडवलं. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य जखमी झाले आहेत.
दाभोळकर कॉर्नर ते न्यू शाहूपुरी रोड या परिसरात काल रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने 5 दुचाकींना उडवलं. दुचाकींचा चक्काचूर झाला, तर तिथून पळ काढण्यात चालक यशस्वी झाला.
दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची गाडीची तोडफोड केली. शाहूपुरी पोलिस या कार चालकाचा शोध घेत आहेत.

===========================================

संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे

संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे
मुंबई : ‘सामना’मधील कार्टून वादानंतर सर्वच पक्षांतून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे दिसेल तिथे त्याला फटके टाकणार’ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.


‘सामना’मधील कार्टून वादावर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही, असं म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला.
‘सामना’तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचं हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

===========================================

मराठा मोर्चा प्रश्नी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?

मराठा मोर्चा प्रश्नी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?
मुंबई : मराठा मोर्चातील मागण्यांचा विचार व्हावा यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं, या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याचसंदर्भात उद्धव उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे.

===========================================

निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी?

निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी?
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी देवाला देखील सोडलेलं दिसत नाही. कुणी गणेशभक्तांना साकडं घालत आहे, तर कुणी साईभक्तांना आपलसं करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता कोणता देव कोणत्या पक्षाला पावणार हे तर महापालिका निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी उत्तर भारतीयांना गोंजारल्याचं तुम्हाला आठवत असेल. आता त्याच भाजपनं आपला मोर्चा साईभक्तांकडे वळवला आहे. कारण मुंबईतल्या 70 टक्के गणेश मंडळांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे.
त्यासाठी साईसेवा मंडळांची शिवाजी मंदिरात बैठकही बोलावली. मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साईभक्तांची संख्या मोठी आहे. यावर डोळा ठेवून भाजपनं पाऊल टाकलं आहे. मग शिवसेना तरी कशी मागे राहणार?
भाजप आणि शिवसेनेनं देवांच्या मंडळाचं राजकारण करण्यापेक्षा मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावं असा सल्ला मनसेनं दिला आहे. दहीहंडी, गणेश उत्सव किंवा आता साई मंडळातून पक्षांना कार्यकर्ते मिळतात आणि त्यांच्याच जीवावर निवडणुका जिंकण्याचा राजकीय पक्षांचा मनसुबा असतो. मुंबईत शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही हे माहित नाही. पण सध्या हे दोन्ही पक्ष आपापले गड मजबूत करत आहेत. पण राजकीय पक्षांच्या या प्रयत्नांना साईबाबा पावणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

===========================================

मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठ्यात एका व्यापाऱ्याची चाकूनं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक कलहातून व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विनोद शाह असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. विनोद यांची पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी कामोठे गावाजवळ शाह यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मंगळवारी रात्री उशिरा ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्री उशिरा धारदार शास्त्राने या व्यापार्यांच्या छातीवर वार करून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

===========================================

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस
पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी डॉ. श्रीपाल सबनीसांनी पाठवलेल्या पत्राची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावं, अशी मागणी करणारे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांना पाठवलं होतं.

श्रीपाल सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑगस्ट महिन्यात पत्र लिहिलं होतं. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मागणी या पत्रातून केली होती. बलुचिस्तानमधील नागरिकांच्या मानवाधिकारांसोबतच पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केल्याबद्दल अभिनंदनही केलं होतं.

पंतप्रधान कार्यालयाकडून श्रीपाल सबनीस यांना पत्राची पोच पाठवण्यात आली आहे. पत्रातील मुद्द्यांवर सकारात्मक विचार करुन कार्यवाही करत असल्याचही सांगण्यात आलं आहे. “मराठीला अभिजात दर्जा मिळावा तसंच मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठासाठी अनेकांनी पाठपुरावा केला आहे. पण आपण पाठवलेल्या पत्रामुळे सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं याचा आनंद वाटतो,” असं डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितलं.

===========================================

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली. सलग पाचव्या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसमध्ये यावर्षी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रमाणात हा बोनस दिला जाणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिला जाणारा हा बोनस आरपीएफ आणि आरपीएसएफ यांना दिला जाणार नाही. गेल्या वर्षी 8975 रुपयांचा कमीत कमी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी तो वाढवून 18 हजार रुपये करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेच्या जवळपास 12 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या बोनसमुळे रेल्वेच्या तिजोरीवर 2,090.96 कोटींचा बोजा पडणार आहे.

===========================================

स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा

स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा
मुंबई: स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. राधे माँ विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं निकाली काढली आहे.

पुत्र प्राप्ती आणि पैसा मिळवण्यासाठी राधे माँ लोकांची दिशाभूल करते, पोलिसात तक्रार करुनही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्यानं कोर्टानं गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

कोर्टानं ही जनहित याचिका होऊ शकत नसल्याचं सांगत ही याचिका निकाली काढली. तसंच पोलीस गुन्हा दाखल करत नसतील तर याचिकाकर्त्यांनी इतर पर्यायांचा वापर करावा, असंही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.

===========================================