[अंतरराष्ट्रीय]
१- एफ-१६ लढाऊ विमानांच्या सरावामुळे पाकिस्तानी जनता भयभयीत
२- चीन व पाकिस्तानची मैत्री अभेदय : कियांग
३- भारताच्या ३१ शिक्षण संस्था जगात टॉपवर
४- पाकिस्तानला झटका, काश्मीरमध्ये हस्तक्षेपास यूएनचा नकार
५- युद्ध सराव करुन पाकिस्तानने पाडला आपलाच शेअर बाजार
६- पाकिस्तान एक दहशतवादी देश - भारत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर डेटाचं काय होतं?, हायकोर्टाचा सवाल
८- 'पीएफ'साठी कंपनीचे हेलपाटे बंद, लवकरच ऑनलाईन प्रक्रिया
९- पाकिस्तानविरुद्ध युद्धासाठी घेऊन जाणाऱ्या टँकचे व्हायरल सत्य
१०- सीमा न ओलांडताही शत्रूवर हल्ला शक्य
११- महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करणार
१२- अन्नधान्य उत्पादन वाढणार
१३- ‘किंगफिशर’च्या अधिकाऱ्यास तुरुंगवास
१४- सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी
१५- BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर
१६- डाळी, खाद्य तेलाच्या साठामर्यादेला मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- 48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी
१८- बीडमध्ये धुवांधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
१९- राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे
२०- अहमदनगरची नीता बनली मंगळयान मोहिमेची घटक
२१- नवरात्रौत्सवावरही खडडयांचे सावट
२२- महिलांवर टिप्पणी करताना निर्बंध घाला
२३- मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय
२४- बांधकाम खात्यात हेवेदावे
२५- चिमुरडयाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- अहमदनगर मराठा क्रांती मूक मोर्चा
२७- निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात
२८- पावसानं हैदराबादला झोडपलं, महाभयंकर पुराची दृश्य कॅमेऱ्यात कैद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात
३०- आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
३१- ...तर सचिनची संघातून हकालपट्टी झाली असती!
३२- टी शर्ट-लाडूचे आमिष, तरीही प्रेक्षकांनी फिरविली पाठ !
३३- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान
३४- औरंगाबादमध्ये रंगणार राज्य पिकलबॉलचा धडाका
३५- एक विकेट गमावून न्यूझीलंड ६० धावांच्या पुढे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=========================================

48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी
मुंबई : उरी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला असताना, इकडे मुंबईतही पाकिस्तानविरोधातील रोष वाढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.
“मुंबईत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी पुढील 48 तासात मुंबई सोडून पाकिस्तानात जावं, अन्यथा त्यांचं शुटिंग चालू देणार नाही. त्यांनी तातडीने भारत न सोडल्यास, आम्ही शुटिंग सुरु असलेल्या ठिकाणी घुसून त्यांना आमच्या पद्धतीने पळवून लावू, असा इशारा”, मनसेने दिला आहे.
जम्मू काश्मीरमधील उरी इथं अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.
या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तानला दहशवादी राष्ट्र घोषीत करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांत केली आहे.
=========================================
अहमदनगर मराठा क्रांती मूक मोर्चा
अहमदनगर : राज्यभर पसरलेलं मराठा क्रांती मोर्चानं आज आपला मोर्चा अत्याचाराच्या घटनास्थळी वळवला आहे. अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही या मोर्चात सहभाग घेतला आहे.
* पोलिस बंदोबस्त असा :
पोलिस अधीक्षक (01), अतिरिक्त पोलिस अधीक्षक (02), डीवायएसपी (10), पीएसआय व एपीआय (19), सहायक एपीआय (75), पोलिस कर्मचारी (1450), होम गार्ड (600), महिला पोलीस(160)
* नगर शहरातून सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत वाहनांना प्रवेश नाही, बायपास मार्गे वळविली वाहतूक
* मोर्चेकर्यांसाठी असणार्या सुविधा : 100 पाण्याचे स्टॉल, 15 लाख पाण्याचे पाऊच, 8 वाहनतळे, 10 मोबाईल टॉयलेट, 35 टॉवर भोंगे, 5 ड्रोन कॅमेरे, 15 रूग्णवाहिका, 25 वॉकीटॉकी, 100 डॉक्टरांचे पथक, 10 महिला डॉक्टरांचे पथक, 15 फिरते दवाखाने
=========================================
निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात
अहमदनगर : राज्यभर पसरलेलं मराठा क्रांती मोर्चानं आज आपला मोर्चा अत्याचाराच्या घटनास्थळी वळवला आहे. अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे.
कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे.
ज्या कोपर्डीच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे, त्या नगरमध्येच आज मोर्चा असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या मोर्चाकडे लागलं आहे.
सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मोर्चाच्या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. पावसाळी वातावरण असूनही पुरुषांसह महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
=========================================
पावसानं हैदराबादला झोडपलं, महाभयंकर पुराची दृश्य कॅमेऱ्यात कैद
हैदराबाद: हैदराबादमध्ये पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे.येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. येथील एका प्लायओव्हरला तर अक्षरश: नदीचं रुप आलं आहे.
मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यानं एवढ्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांच्या चांगलंच नाकीनऊ येत आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये शाळा आणि महाविद्यालायांना 2 दिवसांच्या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. जोरदार पावसामुळे येथील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे.
दरम्यान, येथील परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या जवनांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डेही पडले आहेत. काल रात्रभरात दोन तासांमध्ये जवळजवळ 106 मिमी पाऊस पडला आहे.
=========================================
व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर डेटाचं काय होतं?, हायकोर्टाचा सवाल
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप यूझरने अकाऊण्ट डिलीट केल्यास डेटाचं काय होतं, असा सवाल दिल्ली हायकोर्टाने ‘व्हॉट्सअॅप’ला विचारला आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कोणतीही माहिती आणि मेसेज सार्वजनिक होत नसल्याची हमी यापूर्वीच दिली आहे.
‘व्हॉट्सअॅप वापरणं सुरु ठेवणाऱ्या यूझर्सशी आम्हाला देणंघेणं नाही, मात्र ज्यांना आपली माहिती शेअर करायची नाही, त्यांचं काय? एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने त्याचं अकाऊण्ट डिलीट केलं, त्याच्या तर जुन्या माहिती आणि डेटाचं काय होतं?’ असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने विचारला आहे.
व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार यूझरची माहिती फेसबुकसोबत शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. याविरोधात कर्मण्या सिंग सरीन आणि श्रेया सेठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठाने हा सवाल व्हॉट्सअॅपला विचारला.
व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर माहितीचं काय ?
‘एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने आपलं अकाऊण्ट डिलीट केल्यास सोबतच सर्व माहितीही डिलीट होते’ असा दावा कंपनीने प्रतिज्ञापत्रात केल्याचं वकिलांनी सांगितलं. मात्र यूझरचे प्रसिद्ध फोटो आणि व्हिडिओज सर्व्हरवर दीर्घकाळापर्यंत राहतात, असं म्हटलं आहे.
टेलिफोन नंबर सारखी माहिती फक्त फेसबुकसोबत शेअर होते, कोणताही डेटा शेअर होत नाही, असं व्हॉट्सअॅपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
=========================================
'पीएफ'साठी कंपनीचे हेलपाटे बंद, लवकरच ऑनलाईन प्रक्रिया
मुंबई : पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला वारंवार कंपनीचे हेलपाटे घालण्याची आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची गरज नाही. येत्या डिसेंबर महिन्यापासून पैसे ऑनलाईन काढता येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
डिसेंबर महिन्यापासून प्रायव्हेट कंपनीतील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीतील पैसा ऑनलाईन काढता येण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये चकरा मारण्याऐवजी घरबसल्या हा पैसा अकाऊण्टमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.
पीएफ ऑनलाईन काढता येण्याच्या दृष्टीने ‘ईपीएफओ’कडून सध्या डाटा जमा करण्याचं काम सुरु आहे. यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना पीएफ ऑनलाईन काढता येईल.
ईपीएफओचे सध्या 3.6 कोटी अॅक्टिव्ह अकाऊंटधारक आहेत. त्यामुळे ऑनलाईन पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरु होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
सध्या पीएफ काढण्याची प्रक्रिया काहीशी किचकट मानली जाते. महत्त्वाच्या कागदपत्रांसह कंपनीत जावं लागतं. फॉर्म 10C आणि फॉर्म 19 भरावे लागतात. यूएएन नंबरसह हे फॉर्म कंपनीत जमा करावे लागतात. त्यानंतर 15 ते 30 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाऊण्टमध्ये जमा
होतात.
होतात.
=========================================
पाकिस्तानविरुद्ध युद्धासाठी घेऊन जाणाऱ्या टँकचे व्हायरल सत्य
नवी दिल्ली: उरीमधील हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे.
भारतीयांच्या या संतापाला सोशल मीडियातून वाट मोकळी करुन देत असतानाच काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ट्रेनमधून सैन्याचे टँक रेल्वेवर लोड करुन घेऊन जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या फोटोंसोबत एक मेसेजही व्हायरल होत असून, या मेसेजमध्ये, ”युद्धाची तयारी सुरु असून आज कोटा रेल्वे स्थानकातून सैन्य दलाचे टँक घेऊन जाताना पाहण्यात आले. या टँकची संख्या पाहता युद्धाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, मित्रांनो मोदींवर थोडासा विश्वास ठेवा!,” असे म्हटले आहे.
या व्हायरल फोटोंमुळे जो दावा करण्यात येत आहे, त्यात कितपत तथ्य आहे. तसेच हे फोटो नक्की कोटा रेल्वे स्थानकावरीलच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याची पडताळणी करण्यासाठी राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकाचे एडीआरएम पीके बी मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सैन्य दलाचे असे कोणतेही टँक किंवा इतर कोणत्याही वस्तू घेऊन जाणार असल्यास याची माहिती आधीच दिली जाते. पण गेल्या आठवड्याभरापासून अशी कोणतीही ट्रेन रेल्वे स्थानकातून गेलेली नाही.
या पडताळणीवेळी हे फोटो कोटा रेल्वे स्थानकावरील नसल्याचे समोर आले. उलट हे फोटो जुने असून सोशल मीडियावरुन प्रसारित करण्यात आल्याचे आढळले. एबीपी न्यूजच्या या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आढळून आले आहे.
=========================================

No comments:
Post a Comment