[अंतरराष्ट्रीय]
१- बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू
२- उत्तर कोरियाचा जगभर ‘अणु’कंप
३- ‘त्या’यादीत पाक जाणार होता
४- ९/११ हल्ल्यातील पीडित सौदी अरेबिया विरुद्ध खटला दाखल करणार ?
५- आल्प्स पर्वतामध्ये केबल कार बिघडली, पर्यटकांची दुस-यादिवशी सुटका
६- 'आयफोन-7'ची खिल्ली उडवणारा व्हिडीओ झाला व्हायरल
७- उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- मतांसाठी केजरीवाल काहीही बरळतात - काटजू
९- भारतीय ड्रॅगनही जागा झालाय...
१०- किशोरवयातील स्टार्टअपसाठी भरघोस निधी- मंत्री
११- "तलाक'मध्ये पती-पत्नींची संमती आवश्यक?
१२- अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे
१३- सोने-चांदी आणखी घसरले
१४- ट्रायची दूरसंचार कंपन्यांशी चर्चा
१५- शांती सेनेसमोर अनेक नवी आव्हाने
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- कोल्हापूर; तराफा उलटल्याने आमदारांसह 11 जण बुडाले
१७- मुंबईमध्ये नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी
१८- केज कल्चर प्रणालीतून रोजगाराच्या संधी मिळणार
१९- आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा
२०- ‘एफआरपी’ कर्जाची पुनर्रचना करा
२१- वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार
२३- जमिनीच्या वादातून केली आई, पत्नीसह मुलींची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- रिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व 'कांस्य'
२५- मॅक्सवेलचा धडाका; 29 चेंडूंत 66 धावा
२६- पंकज अडवाणीला कांस्यपदक
२७- युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल
२८- ‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप
२९- आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय
३०- भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले
३१- अनफिट, कुचकामी खेळाडू पाक संघात नकोच!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=================================

रिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व 'कांस्य'
- ऑनलाइन लोकमतरिओ दि जानेरो, दि. १० - रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे. मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंच उडी प्रकारात 'सुवर्ण' पदक पटकावले आहे. तर याच प्रकारात तिस-या आलेल्या वरूण सिंग भाटी याने कांस्यपदक पटकावले आहे.मरियप्पन व वरूणच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.पॅरालिम्पिकच्या उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी मारत सुवर्ण पदक पटकावणा-या मयप्पनने ऐतिहासिक कामगिरी केली असून उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रकारात सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जाणा अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला मात्र 'रौप्य' पदकावक समाधाना मानावे लागले. महत्वाची बाब म्हणजे याच क्रीडा प्रकारात तिस-या स्थानावर राहून 'कांस्य' पदक पटकावणाराही एक भारतीयच असून खेळाडू वरूण भाटी याने १.८६ मीटर उंच उडी मारली.
=================================
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार
- ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. १० - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सँट्रो कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ रात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये मुंबई पोलीसचे कर्मचारी राजेंद्र विष्णु चव्हाण (बक्कल नं. ३२१८१) यांचा व त्यांची पत्नी वनीता चव्हाण, शंकर मारुती वेणगुळे, पुजा वेणगुळे (सर्व राहणार मुंबई) यांचा समावेश आहे.खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेली सँट्रो कार क्र. (एमएच ०४ बी डब्लू ०२२९) ही चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच ०६ ऄ क्यु ७५१७) ला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की सँट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के हे महामार्गावरील विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी सदर अपघात पाहिला, त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी बोलवले खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार अनंता पवार, हवालदार उदय पवार, मारुती शेंडगे, दिलीप कुरंदळे, मायकल सपकाळ व आयआरबीचे पेट्रोलिंग कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या टिमचे सहकारी यांनी सदर सँट्रो कार कंटेनरच्या खालून बाहेर काढत मयतांना गाडीतून बाहेर काढले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.
=================================
भारतीय ड्रॅगनही जागा झालाय...
- चंद्रशेखर कुलकर्णी, आॅनलाइन लोकमतकेवळ इतिहासातील वैभवाचे दाखले देण्यातच गुंग राहण्यात चीनप्रमाणेच भारतालाही आता रस नाही. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवर आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यावर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वात तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणाला सामोरे जाण्यासाठीची पायाभरणी केली. नंतरच्या काळात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पोखरणच्या रणात अणुचाचणी नव्याने सिद्ध झाली, अर्थात बुद्ध पुन्हा हसला. तो भारतीय तंत्रज्ञानाचा सामर्थ्यशाली हुंकार होता. त्या एका हुंकाराने परावलंबित्वाच्या कुबड्या बाजूला टाकणे आपल्याला शक्य झाले. परिणामी चांगल्या सुखकर भविष्यासाठी वर्तमानाला कवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.
=================================
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार
- ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. १० - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सँट्रो कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ रात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये मुंबई पोलीसचे कर्मचारी राजेंद्र विष्णु चव्हाण (बक्कल नं. ३२१८१) यांचा व त्यांची पत्नी वनीता चव्हाण, शंकर मारुती वेणगुळे, पुजा वेणगुळे (सर्व राहणार मुंबई) यांचा समावेश आहे.खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेली सँट्रो कार क्र. (एमएच ०४ बी डब्लू ०२२९) ही चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच ०६ ऄ क्यु ७५१७) ला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की सँट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के हे महामार्गावरील विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी सदर अपघात पाहिला, त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी बोलवले खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार अनंता पवार, हवालदार उदय पवार, मारुती शेंडगे, दिलीप कुरंदळे, मायकल सपकाळ व आयआरबीचे पेट्रोलिंग कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या टिमचे सहकारी यांनी सदर सँट्रो कार कंटेनरच्या खालून बाहेर काढत मयतांना गाडीतून बाहेर काढले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.
=================================
जमिनीच्या वादातून केली आई, पत्नीसह मुलींची हत्या
- ऑनलाइन लोकमतसांगली, दि. १० - सांगली : जमीन वादातून एकाने पत्नी, आई व दोन मुलींचा निर्घृण खून केल्याची घटना कुडनूर (ता. जत) येथे शनिवारी पहाटे घडली. आई सुशिला कुंडलिक इरकर (वय ६०), पत्नी सिंधुबाई भारत इरकर (४०), मुली रूपाली भारत इरकर (१९) व राणी भारत इरकर (१६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर संशयित भारत इरकर (वय ४६) जत पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबूली दिली.भारत इरकर वारकरी संप्रदायातील आहे. त्याच्या वडिलांनी दोन विवाह केले होते. त्याची आई सुशिला त्याच्यासोबत शेतातील घरात रहात होती, तर सावत्र आई सांगलीत राहते. सावत्र आईसोबत त्याचा ३२ एकर शेत जमिनीवरुन वाद आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे, पण भारत खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने पकड वॉरंटही बजावले होते. ही शेतजमीन आपल्या ताब्यातून गेली तर मुला-बाळांनी जगायचे कसे, या विचाराने तो अस्वस्थ होता. यातून त्याने शनिवारी पहाटे साडेपाच वाजता कोयत्याने गाढ झोपेत असलेल्या आई, पत्नी व दोन मुलींवर हल्ला केला. त्याने कोणालाही प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. घरात रक्ताचा पाट वाहत होता.
=================================
मतांसाठी केजरीवाल काहीही बरळतात - काटजू
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - अमृतसरला धार्मिक शहराचा दर्जा देण्याचे आश्वासन देणारे अरविंद केजरीवाल, हे मतांसाठी वाट्टेल ती बडबड करतात आणि त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली आहे, अशी टीका सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केली आहे. पंजाबमधल्या निवडणुकांमध्ये विजयी झालो तर अमृतसरला धार्मिक शहर असा दर्जा देऊ अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. तसेच अमृतसरमध्ये मद्य, मांस व तंबाखू या सगळ्यांवर बंदी घालू असेही ते म्हणाले आहेत. याचा समाचार घेताना फेसबुक पोस्टमध्ये काटजू म्हणतात की,"डोक्यात असलं काहीही नसताना केवळ मतांसाठी केजरीवाल बोलत आहेत. जर असं काही केलं, तर अलाहाबाद, वाराणसी, अयोध्या, मथुरा, पुरी, द्वारका, हरीद्वार, गया, महेश्वरी, मदुराई व अजमेरसारख्या शहरांमधूनही अशाच मागण्या होतील." अशा घोषणा मतांसाठी ठीक असू शकतात परंतु देशाच्या सेक्युलर प्रतिमेशी विसंगत असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे.राम मंदीर - बाबरी मशिदीचा दाखला देत काटजू यांनी या मुद्यावर भाजपाला सत्ता मिळाली परंतु देशाचे प्रचंड नुकसान झाले असे म्हटले आहे. यापूर्वी केजरीवाल यांना प्रामाणिक व्यक्ती हे आपण दिलेले प्रशस्तीपत्रक ही एक चूक होती असे काटजू यांनी कबूल केले आहे आणि केजरीवालांच्या घोषणा मूर्खपणाच्या असल्याची टीका केली आहे.
=================================
तराफा उलटल्याने आमदारांसह 11 जण बुडाले
| |
-
| |
कोल्हापूर : गणेशमुर्ती विसर्जनासाठी नेलेला बँरेलचा तराफा अचानक उलटल्याने आमदार सुरेश हाळवणकर, त्यांची दोन मुले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, उपअधीक्षक विनायक नरळे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रकाश रसाळ हे पाण्यात बुडाले. मात्र, सुदैवाने तराफावर असलेल्या अकराजणांना काठावरील व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक, पोलिस, व नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले.
इचलकरंजी तालुक्यातील शहापूर खणीमध्ये शनिवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. बुडालेल्यांपैकी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या पोटात पाणी गेल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
=================================
किशोरवयातील स्टार्टअपसाठी भरघोस निधी- मंत्री
| |
-
| |
पुणे - स्टार्टअप योजनेला आणखी चालना देण्याच्या उद्देशाने 16 ते 21 वर्ष आणि 21 ते 26 वर्षांच्या वयोगटातील तरुणांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा विज्ञान, तंत्रज्ञान व भूविज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री वाय. एस. चौदरी यांनी शनिवारी येथे केली.
"इंडियन स्टेप्स अँड बिझनेस इन्क्युबेटर्स असोसिएशन‘तर्फे आयोजित इस्बा परिषदेचे उद्घाटन चौदरी यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे नियोजन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याच्या नावीन्यता मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सायन्स टेक्नॉलॉजी पार्क पुणेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, इस्बाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगदाळे, कार्यकारी संचालक रघुनंदन राजमणी आदी उपस्थित होते.

"तलाक'मध्ये पती-पत्नींची संमती आवश्यक?
| |
-
| |
लखनौ - तीन वेळा "तलाक‘ म्हणत वैवाहिक जीवनापासून विभक्त होण्याच्या मुस्लिम धर्मातील पद्धतीमध्ये सुधारणा करत "तलाक‘ पद्धतीमध्ये पती आणि पत्नीची संमती असणे आवश्यक करण्याची शिफारस ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएसपीएलबी) आधुनिक निकाहनाम्याच्या मसुद्यामध्ये सुचविली आहे.
शिफारस ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी या आधुनिक निकाहनाम्याचा मसुदा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) उपाध्यक्ष मौलाना कालबे सिद्दीक यांच्याकडे सुपूर्त केला आहे. या मसुद्यामध्ये तलाक पद्धतीमध्ये तलाक घेताना महिलांची संमती घ्यावी. अशी सुधारणा सुचविली आहे ‘यापूर्वी या नव्या निकाहनाम्यातील सुधारित तरतुदींबद्दल आपण एआयएमपीएलबीचे सदस्य झफारयाब जिलानी यांना कळविले होते, असे अब्बास यांनी सांगितले. एआयएमपीएलबीने सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे इस्लाम धर्माचा अवमान झाल्याचेही त्यांनी पुढे म्हटले. तसेच येत्या काही दिवसात आम्ही आमची मते सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचेही ते म्हणाले.

मॅक्सवेलचा धडाका; 29 चेंडूंत 66 धावा
| |
-
| |
कोलंबो : अफलातून सूर गवसलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या धडाक्यासमोर श्रीलंकेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले आणि दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 असा विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या 128 धावांत रोखला गेला. त्यानंतर हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 13 चेंडू शिल्लक ठेवत गाठले. या सामन्यासह श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू तिलकरत्ने दिल्शान याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दही संपुष्टात आली. अंतिम सामन्यात दिल्शान केवळ एक धाव काढून बाद झाला.
कर्णधार दिनेश चंडिमलने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पण दुसऱ्याच षटकात दिल्शान बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले. धनंजय डिसिल्वा (62) आणि कुशल परेरा (22) यांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनर आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी धडाकेबाज सुरवात केली. नवव्या षटकात मॅक्सवेल बाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने 93 धावा केल्या होत्या. यापैकी मॅक्सवेलने केवळ 29 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 66 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच षटकात वॉर्नरही बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला काही वेळ वेसण घातली गेली. मोझेस हेन्रिकेज, जेम्स फॉकनर, उस्मान ख्वाजा हे झटपट बाद झाले. विजयाचे लक्ष्य माफक असल्याने ऑस्ट्रेलियाला फारशी अडचण आली नाही. अखेरचा सामना खेळणाऱ्या दिल्शानने दोन गडी बाद केले.

No comments:
Post a Comment