[अंतरराष्ट्रीय]
१- चीन घेणार 68 लाख कोटींची विमाने
२- अंदमान बेटावर भुकंपाचे धक्के, 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप
३- नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आज पासून ४ दिवसाच्या भारत दौऱ्यावर
४- पाकिस्तानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू तर 100 जखमी
५- हॅन्सी क्रोनिए सामनानिश्चिती प्रकरणी आरोपी संजीव चावला अटकेत
६- दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ३५० पाणघोड्यांचा बळी?
७- काश्मीरमध्ये नि:पक्ष मिशन पाठविणे भारताला अमान्य
८- सिंगापूरसह भारतातही मिळेल यूकेची पदवी
९- नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१०- अप्रत्यक्ष करातून 3.36 लाख कोटी रुपये
११- तनिष्का उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..
१२- 'सत्तेसाठी मराठा नेत्यांचे मोर्चांचे राजकारण ' - राज्यमंत्री रामदास आठवले
१३- एंब्रेअर विमान करार चौकशीच्या फेऱ्यात
१४- चिकुनगुनिया रोखण्यासाठी नड्डांकडून सूत्रे हाती
१५- 'ड्यूटी' संपल्यानंतरही 'कर्तव्य' बजाविणारा कॉन्स्टेबल ठार
१६- मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !
१७- घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
१८- हजार कि.मी. इकॉनॉमिक कॉरिडॉर
१९- रिलायन्स कम्युनिकेशन व एअरसेलच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब
२०- अर्थसंकल्पांच्या एकत्रीकरणामुळे रेल्वेचे वाचणार १0 हजार कोटी रुपये
२१- किंगफिशर व्हिला लिलावात
२२- झीरो बॅलन्स ‘जनधन बँक खाती’ कमी करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२३- पावसाचा जोर वाढला, पावसातही मिरवणूक उत्साहात सुरु
२४- कोल्हापूर - डॉल्बी लावणा-या मंडळांवर कडक कारवाईचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
२५- पालघर; कुपोषण समस्या सोडविण्यात सरकार अपयशी - राज्यपाल सी. विद्यासागर राव
२६- "पतंजली' दुग्ध व्यवसायात उतरणार
२७- खडकवासला धरणातून विसर्जनासाठी 2 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात
२८- पोलिसांचे गुड मॉर्निंग पथक
२९- रस्ते घोटाळ्यात आणखी अधिकारी
३०- म.रे.कडूनही आज रात्रभर लोकल सेवा
31- आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३२- कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग
३३- बँड पथकाची कमाल, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेही थिरकले!
३४- जालना- कर्जबाजारीपणाला कटांळून शेतक-याची आत्महत्या.
३५- कोल्हापूर - विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा धक्का संजय पाटील यांचा मृत्यू.
३६- नाशिक - इंदिरानगरमध्ये रस्त्यात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचांची अज्ञातांकडून तोडफोड
३७- सावंतवाडी - दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील आंबेली येथे दोन एसटींची समोरासमोर धडक, 27 प्रवासी जखमी
३८- पुणे - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 12 जणांना अटक,
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३९- हॅन्सी क्रोनिए सामनानिश्चिती प्रकरणी आरोपी संजीव चावला अटकेत
४०- न्यूझीलंड संघाचा कसून सराव
४१- न्यूझीलंड संघाचा कसून सराव
४२- भारताचे दुसरे ‘सुवर्ण यश’
४३- विराट प्रेरणादायी : लोकेश
४४- राफेल नदाल-मार्क लोपेझचा अनोखा सराव
४५- जीएमआर वरोराला ऊर्जा व्यवस्थापनेतील राष्ट्रीय पुरस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=========================================

पालघर; कुपोषण समस्या सोडविण्यात सरकार अपयशी - राज्यपाल सी. विद्यासागर राव
| |
-
| |
मुंबई - पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या भागातील बालकांच्या कुपोषणाच्या समस्या सोडविण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव संतप्त झाले असून त्यांनी आज सरकारची खरडपट्टी केल्याचे समजते. आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी या तिन्ही विभागांच्या समन्वयातून युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी सरकारला दिले.
जव्हार, मोखाडा तालुक्यांत मोठ्या संख्येने कुपोषणग्रस्त बालके आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, की मुंबईलगतच्या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची गंभीर समस्या असणे चिंताजनक आहे. कुपोषणावर दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच तातडीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, तसेच येत्या महिनाभरात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवावे. आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात यावा. आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांवर नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी हजर व्हावे यासाठी प्रभावी उपाय योजावेत; तसेच गैरहजर डॉक्टरांविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, असेही ते म्हणाले. कुपोषणग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी सर्वच विभागांनी संवेदनशीलपणे काम करावे, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, की पुढील तीन महिन्यांत या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळेल असा कृती आराखडा तयार करा. आरोग्य शिबिर आयोजित करून बालकांची तपासणी मोहीम हाती घ्यावी.

राज्यभर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये तनिष्कांसाठी होणार मतदान
पुणे - पाणी, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, शेती- रोजगार, पर्यावरण यांसारख्या क्षेत्रात राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या तनिष्का सदस्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नेतृत्वविकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तीन टप्प्यांत तालुकावार निवडणुका घेण्यात येणार असून, तनिष्का सदस्या त्यासाठी उत्साहाने तयारीला लागल्या आहेत.
निवडणुकीच्या माध्यमातून अनेकजणींच्या सुप्त नेतृत्वगुणांना वाव मिळेलच; पण सामाजिक, विधायक मुद्द्यांवर अभ्यासाची, ते मांडण्याची, तसेच संपर्क जाळे (नेटवर्क) वाढवण्याचीही संधी मिळणार आहे. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून पाणी, आरोग्याची जणू लोकचळवळ उभी राहिली. अनेक गावांतील रस्त्याचे वाद मिटले. छेडछाडीच्या प्रसंगात गाव, शहरात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली ती तनिष्कांनीच. नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेनंतर त्या गावातील मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तनिष्का पुढे सरसावल्या. "सकाळ‘ने नगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. रस्ते, पाणी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव यासारख्या नागरी समस्यांच्या सोडवणुकीचा आग्रह धरला. शेळीपालन, दूध संकलन केंद्रासारखे रोजगाराचे अनेक वेगवेगळे मार्ग त्यांनी चोखाळले.
तनिष्का उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..

'सत्तेसाठी मराठा नेत्यांचे मोर्चांचे राजकारण ' - राज्यमंत्री रामदास आठवले
| |
-
| |
नवी दिल्ली - कोपर्डी हत्याकांडानंतर महाराष्ट्रात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून काही ठिकाणी दलित समाजानेही प्रतिमोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर "जय भीम के नारे पे, खून बहे तो बहेने दो‘ असेही आठवले यांनी आक्रमकपणे सांगितले. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेल्या मराठा नेत्यांना एकत्र करून मोर्चाचे राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील दलित समाजाच्या प्रतिमोर्चांमागे संघ व भाजप आहेत, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला होता. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी आंबेडकर यांचा आरोप स्पष्टपणे फेटाळला. प्रस्तावित प्रतिमोर्चांवरून दलित समाजाचे नेते परस्परविरोधी मते व्यक्त करत आहेत.

आठवले म्हणाले, की संघ व भाजपचा दलितांच्या प्रस्तावित प्रतिमोर्चांशी संबंध नाही. दलितांची ताकद ऐवढी आहे, की त्यांची मदत घेण्याची वेळच येणार नाही. कोपर्डी घटनेनंतर राज्यातील विशेषतः ग्रमीण भागातील दलित भयभीत अवस्थेत आहे. मात्र दलितांनी घाबरण्याचे कारण नाही. दलितांनी प्रतिमोर्चे काढण्यातही काही वावगे नाही. सत्ता गेल्यानंतर व सहकार क्षेत्रातील चौकशा सुरू झाल्यावर अस्वस्थ झालेल्या मराठ्यांना एकत्र करून काहींनी मोर्चाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप आठवले यांनी केला.
=========================================
"पतंजली' दुग्ध व्यवसायात उतरणार
| |
-
| |
कोल्हापूर -राज्याच्या दुग्ध व्यवसायात "अमूल‘पाठोपाठ योगगुरू रामदेवबाबा यांची पतंजली संस्थाही उतरणार असून, त्यांनी कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत सर्वेक्षणही सुरू केले आहे. दोन महिन्यांत प्रत्यक्ष दूध संकलनाचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात बंद पडलेली एक मोठी डेअरीही त्यांनी खरेदी केली आहे.
पतंजलीमार्फत सध्या बाजारात तुपाची विक्री होत आहे. हे तूप हरिद्वार येथील आश्रमात तयार केले जाते. यासाठी लोणी खरेदीसाठी मात्र त्यांना देशभरात मार्केटिंग करावे लागत आहे. प्रतिकिलो 450 रुपये दराने पतंजलीचे तूप विकले जाते. अलीकडे लोणी कमी पडत असल्याने या लोण्याची खरेदी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात कच्चा माल उपलब्ध आहे, त्याच ठिकाणी मुख्य उत्पादन काढणे कमी खर्चाचे व सोयीचे असल्यानेच त्यांनी महाराष्ट्रात दूध संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे.

गायीचे दूध संकलन हेच पतंजलीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतातील दुधाचा दर्जा चांगला व मिश्रणाचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात गाय व म्हशीचे दूध स्वतंत्र संकलित केले जाते. म्हणूनच पतंजलीने महाराष्ट्रात संकलन करण्याचे निश्चित केले आहे, त्याची सुरवात औरंगाबाद व त्या परिसरात होईल. त्यासाठी नेवासा येथील सहा लाख लिटर क्षमतेच्या एका बंद पडलेल्या डेअरीची खरेदीही ऑगस्ट महिन्यात करण्यात आली. या परिसरात आवश्यकतेपेक्षा कमी गायीचे दूध कमी मिळू लागल्यास त्यानंतरचे त्यांचे पहिले लक्ष्य कोल्हापूर हेच असणार आहे. कोल्हापुरातील शिरोळ व कागल तालुक्यातील बंद पडलेल्या डेअरी प्रकल्पांची माहितीही त्यांनी घेतली असून, संबंधितांशी प्राथमिक चर्चाही झाली आहे.
=========================================
एंब्रेअर विमान करार चौकशीच्या फेऱ्यात
| |
-
| |
नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात झालेल्या 20.8 कोटी डॉलर रकमेच्या एंब्रेअर विमान खरेदी करारात लाच घेतली गेल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले आहेत.
ब्राझीलची विमाननिर्मिती कंपनी एंब्रेअर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या दरम्यान 2008मध्ये हा करार झाला होता. गंभीर प्रकारच्या आरोपांमुळे सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या आठवड्याच्या सुरवातीलाच चौकशीबाबतचे संकेत दिले होते. हे प्रकरण गुन्हेगारीशी संबंधित असेल तर त्याची चौकशी सीबीआय करेल. मंत्रालय चौकशी करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. जर हे प्रकरण केवळ प्रक्रियेशी निगडित असेल तर संरक्षण मंत्रालयअंतर्गत चौकशी करू शकते, असेही त्यांनी नमूद केले होते.
यूपीए सरकारच्या काळात एंब्रेअरच्या तीन विमानांसाठी झालेला करार अमेरिकी अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. करार पूर्णत्वास नेण्यासाठी कंपनीच्या वतीने लाच देण्यात आली होती, अशी साशंकता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचा न्यायिक विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या कंपनीची चौकशी करत आहे.
=========================================
चिकुनगुनिया रोखण्यासाठी नड्डांकडून सूत्रे हाती
| |
-
| |
नवी दिल्ली - दिल्लीला ग्रासलेल्या चिकुनगुनिया व डेंगीच्या साथीचा फैलाव आटोक्याबाहेर जात आहे, असे दिसताच केंद्र सरकारने याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज सकाळी केंद्रीय व दिल्लीच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोणत्याही रुग्णालयात औषधांची कमतरता जाणवता कामा नये, असे त्यांनी बजावले. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशीही नड्डा यांनी सातत्याने संपर्क ठेवला असून दिल्ली सरकारला केंद्र सर्वतोपरी मदत करेल, या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
चिकुनगुनिया मुंबईच्या दरवाजावरही धडक देण्याची भीती असल्याची माहिती दिल्लीत पोचल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला सावधान केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसानंतर चिकुनगुनिया व डेंगीची जोरदार साथ आली. आतापर्यंत किमान पाच बळी घेतलेल्या चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या आज 2000 च्या वर पोचली. या साथीच्या उद्रेक असताना दिल्लीचे मुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकार असलेले नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासह सारे प्रमुख मंत्री दिल्लीबाहेर गेले आहेत. जैन यांनाही गोव्यात प्राचरासाठी पाठविले होते. दिल्ली सरकार गायब असल्याचे पाहून संतापाचा उद्रेक होत असल्याचे समजताच नड्डा यांना काल दुपारी तातडीने दिल्लीला पाठविण्यात आले. जैन यांनी काल आल्याआल्या पाचही शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या. केजरीवाल यांनी याबद्दल पंतप्रधान व नायब राज्यपालांवर थेट निशाणा साधला तरी या संकटाच्या काळात राजकारण न करण्याचा सल्ला पंतप्रधानांकडून भाजपला मिळाला आहे. दिल्ली भाजपने महापालिकेतील आपल्या नेत्यांना वॉर्डावॉर्डात फिरून रुग्णांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले. जनजागृतीच्या जाहिराती दिल्ली सरकारसह भाजपच्या वतीनेही सोशल मीडिया व आकाशवाणीवर देण्यात येत आहेत.
=========================================
बीजिंग : चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार वाढत असून, चीनमधील विमान प्रवासी कंपन्या पुढील 20 वर्षांत बोइंगकडून 1.025 ट्रिलियन डॉलरची (सुमारे 68 लाख कोटी रुपये) विमाने खरेदी करणार आहेत.
चीन घेणार 68 लाख कोटींची विमाने
| |
-
| |
चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत आहे. 2035 पर्यंत सुमारे 6 हजार 810 बोइंग विमानांची मागणी चीनमधून नोंदविली जाईल. आधीच्या 2034 पर्यंतच्या अंदाजात आणखी 7.6 टक्के वाढ झाली आहे. चीनमधून विमानांची मागणी वाढणार असली तरी अमेरिकी कंपन्यांकडून मागणी घटू लागली आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती याला कारणीभूत ठरली आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या चिंतित आहेत. बोइंग आणि तिची युरोपमधील प्रतिस्पर्धी एअरबस चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चीनचे नागरी हवाई क्षेत्र सर्वाधिक वेगाने वाढत आहे. यामुळे कंपन्या येथे उत्पादन प्रकल्प उभारत आहेत. बोइंगने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील 50 टक्के व्यावसायिक विमाने त्यांच्या कंपनीची आहेत.
=========================================
अप्रत्यक्ष करातून 3.36 लाख कोटी रुपये
| |
-
| |
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये अप्रत्यक्ष कर संकलनाचे प्रमाण तब्बल 27.5 टक्क्यांनी वधारुन 3.36 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. आतापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्पात निश्चित उद्दिष्टाच्या 43.2 टक्के अप्रत्यक्ष कर गोळा झाला आहे.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान केंद्रीय उत्पादन शुल्काद्वारे मिळणारे उत्पन्न 48.8 टक्के वाढीसह 1.53 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच काळात 1.03 लाख कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क गोळा करण्यात आले होते. याच काळात, सेवा कर संकलनातून मिळणारे उत्पन्न 23.2 टक्के वाढीसह 92,696 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्यावर्षी याच काळात सेवा करातून 75,219 कोटी रुपये मिळाले होते.
दरम्यान, एप्रिल ते ऑगस्टदरम्यान 90,448 कोटी रुपयांचे सीमाशुल्क गोळा करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 85,557 कोटी रुपयांचे सीमाशुल्क गोळा करण्यात आले होते. सीमाशुल्क संकलनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
=========================================
No comments:
Post a Comment