[अंतरराष्ट्रीय]
१- लाँचिंगपूर्वीच भारतात आयफोन 7, आयफोन 7 प्लसचं प्री बुकिंग सुरु
२- बांगलादेशमध्ये बकरी ईदनिमित्त रस्त्यांवर वाहिला रक्ताचा महापूर
३- ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार
४- दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड
५- बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट
६- वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
७- कधी होता मेकॅनिक, आज जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये आहेत 22 फ्लॅट
८- दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर
९- नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१०- काश्मिरी फुटीरतावादी शब्द कोर्टात वापरु नका - सर्वोच्च न्यायालय
११- राहुल गांधींच्या सभेत पुन्हा खाटांची पळवापळवी
१२- अर्थसंकल्पांच्या एकत्रीकरणामुळे रेल्वेचे वाचणार १0 हजार कोटी रुपये
१३- किंगफिशर व्हिला लिलावात
१४- झीरो बॅलन्स ‘जनधन बँक खाती’ कमी करा
१५- ब्रिटनच्या चलनात आल्या प्लॅस्टिक नोटा!
१६- ... तर महाडची दुर्घटना टळली असती - नितिन गडकरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- मराठा-दलित ऐक्यासाठी रिपाइंचे मोर्चे : आठवले
१८- मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
१९- संजयनीती : महाराष्ट्रात 'मराठा', गोव्यात 'मराठी'
२०- चाचणीचा मुहूर्त पुन्हा टळला
२१- टिळक टर्मिनसची जीवघेणी वाट
२२- मनसेचा राडा!
२३- सोसायटीचे इकोफ्रेंडली गणपती विसर्जन
२४- केईएमची ओपीडी एसी कंटेनरमध्ये
२५- विधि प्रवेशाची दुसरी यादी २० सप्टेंबरला
२६- पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- नागपुरात विदर्भवाद्यांकडून राज ठाकरेंच्या पुतळ्याचं दहन
२८- पतंग काढताना पोटात रॉड घुसून मनमाडमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
२९- लातूर; विवाहितेने दोन लहान मुलांचा खुन करून केली आत्महत्या
३०- औरंगाबाद - विनायक मेटे आणि मराठा मोर्च्यांचा संबंध नाही
३१- कोल्हापूर - पाटपन्हाळा मार्गावर एसटी बस उलटली, 20 प्रवासी जखमी.
३२- अहमदनगर - श्रीरामपूर येथे डेंग्युने मुलीचा मृत्यू
३३- पंढरपूरमध्ये स्वच्छतेचे काम कराताना झाड अंगावरपडून दोघे जखमी
३४- सोलापूरमध्ये काल रात्री पासून पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३५- सचिनच्या निवृत्तीचं राज काय? तीन वर्षांनी पुन्हा चर्चा
३६- इम्रान हाश्मीचा हॉरर सिनेमा 'राज रिबूट' ऑनलाईन लीक?
३७- नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
३८- रिओ पॅरालिम्पिक - भारताला आणखी एक सुवर्णपदक
३९- रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके
४०- विराटकडून बरेच काही शिकण्यासारखे : विल्यम्सन
४१- भारताला नमवणे आव्हानात्मक
४२- नदालकडून शिकण्यास मिळेल
४३- दिग्गजांना मागे टाकण्याची विराटला संधी
४४- इंडिया ब्लू संघाला ४७६ धावांची आघाडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

मनमाड शहरातील पांडूरंग नगर येथे आदित्य राहत होता. खेळण्यासाठी तो आपल्या बहिणीसोबत मावशीच्या घरी आला होता. दुपारच्या सुमारास कटलेली पतंग घेण्यासाठी तो प्रोफेसर कॉलनी जवळच्या कंपाऊन्डमध्ये लोखंडी गेट उतरुन खाली उतरला.
पतंग घेऊन पुन्हा गेटवरुन खाली उतरत असताना त्याचा हात सटकल्याने गेटला लावलेला धारदार अणुकीदार रॉड पोटात लागल्याने तो जखमी झाला. परिसरातील नागरिक त्याला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. आदित्य जाधव हा नगरसुल मधल्या संत नारायणगिरी महाराज आश्रमात सहाव्या इयत्तेत शिकत होता.

मराठा-दलित ऐक्यासाठी रिपाइंचे मोर्चे : आठवले
नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे मोर्चे हे प्रतिमोर्चे नसतील. तर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये आणि दलित-मराठा ऐक्य व्हावं, यासाठी आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
मराठ्यांच्या मोर्चांविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नये, असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मोर्चे काढायचे असते तर यापेक्षाही मोठे काढले असते. कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मोर्चा काढायला हरकत नाही, पण त्याच अॅट्रॉसिटीचा विषय का आणला असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांनी काढावेत, असं आठवले म्हणाले.
तसंच अॅट्रॉसिटीची एवढी भीती असेल तर दलितांवर अत्याचार करु नका. अॅट्रॉसिटी कायद्यात बदलासाठी चांगल्या सूचना आल्या तर त्याचा जरुर विचार केला जाईल, असंही आठवलेंनी नमूद केलं.
शिर्डीत 7 ऑक्टोबरला मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली असून मराठा महासंघ, शिवसंग्राम संघटना यांनाही आमंत्रण असल्याचं आठवलेंनी सांगितलं.
======================================
मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
शिर्डीः राज्यभरात निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चांना जाहीर पाठिंबा आहे. अहमदनगरच्या मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार आहोत, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांच्या मोर्चांना पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या मराठा नेत्यांच्या बैठकीवरही विखे पाटलांनी टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य योग्य- विखे पाटील
मराठा समाजाची भूमिका योग्य आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून बैठका घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचं राजकारण केलं जात असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. “मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, असे मोर्चे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक होतील. मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरु आहे”, असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर निशाणा साधला होता.
======================================
नागपुरात विदर्भवाद्यांकडून राज ठाकरेंच्या पुतळ्याचं दहन
नागपूरः मनसेने काल मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळल्यानंतर आज नागपूरमध्येही त्याचे पडसाद उमटले. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीची पोस्टर जाळली.
त्यामुळे नागपूरमध्ये विदर्भावरुन दोन गट बघायला मिळत आहेत. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या नकाशाला जोडेही मारले. ज्या व्हरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आलं तिथेच सकाळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या पुतळ्यांचं आंदोलन केलं होतं. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय मनसेच्या आंदोलनातही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित होते.
विदर्भवाद्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. त्यामुळं विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली.
======================================
लाँचिंगपूर्वीच भारतात आयफोन 7, आयफोन 7 प्लसचं प्री बुकिंग सुरु
नवी दिल्लीः अमेरिकेत आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केल्यानंतर भारतामध्येही अॅपलच्या या फोन्सची लाँच होण्यापूर्वीच प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. प्री बुकिंग केलेल्या फोन्सची डिलिव्हरी 7 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अॅपलचे सीईओ टिम कूक यांच्या हस्ते हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले आहेत.
भारतात 7 ऑक्टोबर रोजी आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच होणार आहेत. त्याआधी अॅपलच्या वेबसाईटवर 5 हजार रुपये अॅडव्हान्स देऊन फोनची बुकिंग सुरु आहे. शिवाय भारतात आयवर्ल्ड स्टोअर आणि युनिकॉर्न स्टोअरवर देखील या फोन्सची बुकिंग करता येत आहे. आयवर्ल्ड आणि युनिकॉर्न भारतातील अपलचे प्रीमियम पार्टनर आहेत.
आयफोन 7 32 GB, 64 GB आणि 256 GB या मॉडेल्समध्ये उपलब्ध असणार आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2मध्ये 4 GB रॅम देण्यात आली आहे.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. एक स्पीकर वर असून दुसरा फोनच्या खाली आहे. यामध्ये रेटिना HD डिसप्ले आहे, जो आधीच्या आयफोनच्या तुलनेत 25 टक्के ब्राईट आहे. विशेष म्हणजे हे आयफोन 3D टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकतात.
======================================
पतंग काढताना पोटात रॉड घुसून मनमाडमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
मनमाड : मनमाड शहरात पतंग काढताना पोटात रॉड घुसल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रोफेसर कॉलनीतील मोकळ्या जागेत पतंग पकडायला गेला असताना 13 वर्षांच्या आदित्य जाधवच्या पोटात लाकडी गेटचा धारदार रॉड घुसला.
मनमाड शहरातील पांडूरंग नगर येथे आदित्य राहत होता. खेळण्यासाठी तो आपल्या बहिणीसोबत मावशीच्या घरी आला होता. दुपारच्या सुमारास कटलेली पतंग घेण्यासाठी तो प्रोफेसर कॉलनी जवळच्या कंपाऊन्डमध्ये लोखंडी गेट उतरुन खाली उतरला.
पतंग घेऊन पुन्हा गेटवरुन खाली उतरत असताना त्याचा हात सटकल्याने गेटला लावलेला धारदार अणुकीदार रॉड पोटात लागल्याने तो जखमी झाला. परिसरातील नागरिक त्याला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. आदित्य जाधव हा नगरसुल मधल्या संत नारायणगिरी महाराज आश्रमात सहाव्या इयत्तेत शिकत होता.
======================================
संजयनीती : महाराष्ट्रात 'मराठा', गोव्यात 'मराठी'
महाराष्ट्रात ‘मराठा’ समाजाचे मोर्चे सध्या गाजत आहेत, तर बाजूच्या गोवा राज्यात मराठी व कोकणी भाषिकांनी त्यांच्या हक्कासाठी बंडाळ्या सुरु केल्या. गेले काही महिने मी राजकीय कामासाठी गोव्यात जाऊन-येऊन आहे. कोकणातील एका जिल्ह्याएवढे गोवा राज्य. पण मातृभाषेच्या प्रश्नावर सुभाष वेलिंगकर या शिक्षकाने राज्यात खळबळ माजवून दिली. महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांत एखाद्या प्रश्नावर ‘जातीय’ तणाव वाढतो व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे काही गोव्याच्या बाबतीत घडणार नाही. गोव्याच्या मातीचा तो गुण नाही व मानसिकता नाही.
सुभाष वेलिंगकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रमुख पदावरुन दूर केले. वेलिंगकर यांचे मातृभाषेचे आंदोलन हे गोव्यातील भाजप सरकारची तिरडी बांधणारे ठरत आहे व वेलिंगकर यांनी सरळ सरळ राजकीय भूमिका घेऊन गोव्यात भाजपच्या पराभवाची गर्जना करताच वेलिंगकर यांना हटवण्यात आले. वेलिंगकर हे 40 वर्षांपासून गोव्यात संघ रुजवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे संघाचे शेकडो स्वयंसेवक वेलिंगकर यांच्या हाकेसरशी पणजीत जमा झाले व भाजपचा पराभव करण्याचा निर्धार त्यांनी केला.
======================================
सचिनच्या निवृत्तीचं राज काय? तीन वर्षांनी पुन्हा चर्चा
मुंबई: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा करुन तीन वर्षे होत आहेत. मात्र तीन वर्षानंतरही सचिनच्या निवृत्तीबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
सचिनच्या निवृत्तीच्या प्रश्नावर भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. सचिनची निवृत्ती हे आजही गुपीत आहे. पण त्याबाबत उघड बोलण्यास संदीप पाटील यांनी नकार दिला.
सचिनला निवृत्तीसाठी दबाव आणला का, याबाबतच्या प्रश्नावर संदीप पाटील म्हणाले, “काही गोष्टी या गुपीत ठेवाव्या लागतात. काही बाबी या बीसीसीआय आणि निवड समिती यांच्यातच मर्यादित राहतात. काही गोष्टी गुपीत/राज असतात, त्या उघड केल्या जाऊ शकत नाहीत”.
======================================
इम्रान हाश्मीचा हॉरर सिनेमा 'राज रिबूट' ऑनलाईन लीक?
मुंबई : पायरसी हे सिनेमांना लागलेलं ग्रहण आहे. विशेषत: चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तो ऑनलाईन लीक होत असल्याने अनेक दिग्दर्शक याचा धसका घेतात. आता ‘राज रिबूट’ हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. ही बाब समजल्यानंतर निर्माता मुकेश भट, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
विक्रम भट दिग्दर्शित ‘राज रिबूट’ हा चित्रपट मंगळवारी रात्री ऑनलाईन लीक झाला आणि ट्विटरवर ट्रेण्ड झाला. सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलं की, हा सिनेमा ऑनलाईन उपलब्ध आहे. राज रिबूट 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
“संपूर्ण चित्रपट नाही, तर त्यामधील एक छोटी क्लिप लीक झाली आहे. रिलीजसाठी सिनेमाची प्रिंट परदेशात पाठवण्यात आली आहे. या क्लिपमध्ये सेंसर कट नाही आणि यामधील आवाजही स्पष्ट नाही. कोणीतरी स्मार्टफोनवर स्टूडियोतच सिनेमा शूट करुन ऑनलाईन लीक केला असावा,” असं निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट यांनी स्पष्ट केलं.
या घटनेनंतर इम्रान हाश्मीने ट्वीट करुन प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं.

No comments:
Post a Comment