Thursday, 8 September 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीनच्या विमान कंपनीचा भारतीयांपासून सावध राहण्याचा इशारा
२- आईवरुन शिवी घालणा-या फिलिपिन्सच्या अध्यक्षांची ओबामांनी घेतली भेट
३- पंतप्रधान मोदी लाओसमध्ये
४- पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स
५- अमेरिकेतही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- पाकिस्तानला वाळित टाकण्याची गरज - पंतप्रधान मोदी 
७- मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी
८- हवामान उपग्रह इनसॅट-३डीआर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 
९- साखर साठ्याची मर्यादा रद्द करा
१०- जीएसटी अंमलबजावणीसाठी वेळ कमी
११- सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर
१२- यूबीएलचे चेअरमनपद विजय मल्ल्यांकडेच?
१३- भारत-पाक सीमेवर हेरॉइनसह शस्त्रसाठा जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- उदयनराजेंच्या खिल्लीची पोस्ट 'फेसबुक'नं उडविली ! 
१५- ग्रामीण भारतामध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग सर्वात स्वच्छ जिल्हा 
१६- काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव
१७- फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना सुरुवात
१८- असंसर्गजन्य आजारांना आळा घाला
१९- भावाच्या लग्नासाठी केली फसवणूक
२०- पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात
२१- मुख्यमंत्र्यांच्या घरी पूजा करणारा आहे स्त्रीलंपट भामटा - गावकरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- अरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी
२३- जमीन आंदोलनाची पुरुलियातही लागण 
२४- राजापुरात सापडला 'ऍटलस' प्रजातीचा मोठा पंतग 
२५- प्रीती राठी हल्ला प्रकरणी अंकूर पनवारला फाशी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- सकारात्मक विचाराने प्रेरित झाले
२७- जोकोविचची ‘सहज’ आगेकूच
२८- टी-२० त सर्वोच्च धावसंख्येची नोंद चौथ्यांदा!
२९- प्रशिक्षकांना ओळख मिळणे गरजेचे : गोपीचंद
३०- पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग
३१- डोक्याला चेंडू लागल्याने प्रग्यान ओझा जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
-----------------------
Timepass Viral Video पाहण्यासाठी YouTube वर Subscribe करा 
https://www.youtube.com/watch?v=rTev-8hk8Mo&list=UUxdHGKyCzzrFyNRPwe8gstg
======================================

मुख्यमंत्र्यांच्या घरी पूजा करणारा आहे स्त्रीलंपट भामटा - गावकरी

  • First Published :08-September-2016 : 16:05:00Last Updated at: 08-September-2016 : 17:14:55

  • अनंत जाधव, ऑनलाइन लोकमत
    सावंतवाडी, दि. 8 - गावाने वाळीत टाकल्याचा बहाणा करण्याऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद सावळाराम हेवाळेकर याचा खरा चेहरा आता लोकांसमोर उघड झाला आहे. हेवाळेकर याला गावातून कोणी बाहेर काढले नसून गावात कोठेही जातपंचायत हा प्रकार अस्तित्वात नाही. मात्र परमानंदचे गावातील वेगवेगळे प्रताप पुढे येऊ लागले आहेत.
    तीन वर्षांपूर्वी परमानंद याने घराशेजारी महिला एकटीच घरात राहत असल्याची संधी साधून रात्रीच्या वेळी घरात शिरला. त्यानंतर त्या महिलेने त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र या घटनेनंतर तो पसार झाला. तो पुन्हा गावात आलाच नाही. त्याच्याविरोधात अटक वॉरंट बजावून त्याची प्रत घरावर चिकटवण्यात आली.
    सध्या परमानंद हा वेगवेगळ्या ठिकाणावरून गावातील प्रमुख मानकरी लोकांना सतत अश्लील पत्रे पाठवत असे. गावकरी सर्व पत्रे पोलिसांना देत असत. मात्र आपणास गावक-यांनी वाळीत टाकले, असा अर्ज त्याने तत्कालीन पोलीस अधीक्षकाकडे केला होता. त्यावेळी गावातील प्रमुखांना बोलावून तोडगा ही काढण्यात आला होता. गावक-यांनी गावात कोणतीच जात पंचायत नसून परमानंद याला गावात बंदी घातली नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणाची दखल घेत परमानंद यांना न्याय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
======================================

हवामान उपग्रह इनसॅट-३डीआर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • First Published :08-September-2016 : 17:00:00Last Updated at: 08-September-2016 : 17:49:43

  • ऑनलाइन लोकमत
    श्रीहरीकोटा, दि. ८ - भारताच्या जीएसएलव्ही-एफ०५ प्रक्षेपकाने गुरुवारी इनसॅट-३डीआर या अत्याधुनिक हवामान उपग्रहाला यशस्वीरित्या अवकाश कक्षेत स्थिर केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही -एफ०५ ने ४.५० मिनिटांनी उड्डाण केले. 
     
    उड्डाणानंतर १७ मिनिटांनी  इनसॅट-३डीआर कक्षेत स्थिर झाला. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आलेल्या जीएसएलव्ही -एफ०५ चे हे पहिले ऑपरेशनल उड्डाण होते. 
     
    जीएसएलव्ही काही तपासण्या बाकी असल्याने हे उड्डाण नियोजित वेळेपेक्षा ४० मिनिट उशिराने झाले. इनसॅट-३ डी कडून समृद्राच्या पुष्ठभागाचे तापमान, बर्फ, ढग आणि धुके याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. 
======================================

पाकिस्तानला वाळित टाकण्याची गरज - पंतप्रधान मोदी

  • First Published :08-September-2016 : 13:58:38

  • ऑनलाइन लोकमत
    लाओस, दि. 8 - केवळ दहशतवाद्यांना नाही तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या देशाला एकटं पाडलं पाहिजे, तसंच त्या देशावर कडक निर्बंध घातले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे थेट नाव न घेता मांडली आहे. मोदी 14व्या इंडो-आसियान परिषदेमध्ये बोलत होते. "आमच्या शेजारच्या एक राष्ट्राची जी काय स्पर्धात्मकता आहे ती दहशतवाद पसरवण्यामध्ये आहे. मात्र, आता वेळ आली आहे की, या देशाला वाळित टाकावं आणि दहशतवाद पसरवणाऱ्या या देशावर कडक निर्बंध घालावेत," असे पंतप्रधान म्हणाले.
    "केवळ दहशतवादी नाही तर त्यांना मदत करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला लक्ष्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खुल्या समाजासाठी दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला एकत्रितपणे करायला हवा. राष्ट्राची भूमिका म्हणून जे दहशतवादाला प्रोत्साहन देतात, त्यांच्याविरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करायला हवी," असे सांगत मोदींनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला आहे.
    दुसऱ्याप्रती द्वेषाची भावना आणि त्यापोटी होणारा हिंसाचार देखील समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेच्या गोष्टी असल्याचे मोदी म्हणाले. 
======================================

ग्रामीण भारतामध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग सर्वात स्वच्छ जिल्हा

  • First Published :08-September-2016 : 16:36:28

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ८ - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वात 'स्वच्छ' जिल्हा ठरला आहे. प्रथमच ग्रामीण भारतातील ७५ जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या वेगवेगळया निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे. 
     
    २०१६ स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. स्वच्छतेच्या आघाडीवर चांगली कामगिरी करणारे देशभरातून ७५ जिल्हे निवडण्यात आले. शौचालय, सार्वजनिक स्थळी कचरा करणे आणि पाण्याचा वापर या निकषांच्या आधारे जिल्ह्यांना क्रमांक देण्यात आले. 
     
    २०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनवर्षांपूर्वी १.९६ लाख कोटींच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात केली. मोदींच्या गृहराज्यातील अहमदाबाद, आनंद आणि पंचमहाल हे जिल्हे स्वच्छतेच्या निकषांवर अजून बरेच मागे असल्याचे या सर्वेक्षणात दिसले. 
     
    राज्य आणि जिल्ह्यामध्ये स्वच्छेतबाबत स्पर्धा वाढवण्यासाठी अशा प्रकारे क्रमांक देण्यात आले आहेत. पहिल्या पाच सर्वाधिक स्वच्छ जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग पहिला, नादीया (पश्चिमबंगाल) दुस-या, सातारा (महाराष्ट्र) तिस-या, मिदानपोर पूर्व (पश्चिम बंगाल) चौथ्या आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) पाचव्या स्थानावर आहे. 
======================================

उदयनराजेंच्या खिल्लीची पोस्ट 'फेसबुक'नं उडविली !

  • First Published :08-September-2016 : 17:31:37

  • ऑनलाइन लोकमत
    सातारा, दि. 8 - सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट 'फेसबुक'वर टाकल्याप्रकणी औरंगाबाद येथील युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही पोस्ट टाकल्यानंतर सातारा पोलिसांनी 'फेसबुक'शी संपर्क साधल्यानंतर कंपनीनेही तत्काळ ही पोस्ट 'डिलीट' करून टाकली.
    खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पुण्यात 'अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा !' अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील एका युवकाने उदयनराजे यांचे विडंबन करणारे चित्र तयार करून पोस्ट टाकली होती.
    याची माहिती कळताच राजे समर्थकांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची गुरुवारी सकाळी भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तेव्हा केदार नामक युवकावर 'सायबर एक्ट'नुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, 'समाजात जातीतेढ निर्माण होऊ नये म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये,' असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.|
======================================

No comments: