नमस्कार लाईव्ह ०६-09-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
==========================
[आंतरराष्ट्रीय]
१- फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी
२- काबूल तिस-या बॉम्बस्फोटानं हादरलं, आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू
३- भारतीय वंशाच्या कैैद्याची गफलतीने तुरुंगातून सुटका
४- दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेचा ड्रॅगनला इशारा
५- ‘मिस जपान’च्या निवडीवरून वाद
६- रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरले
७- दक्षिण आशियात एक देश पसरवतोय दहशतवाद - पंतप्रधान मोदी
==========================
[राष्ट्रीय]
८- आग्र्यातील मंदिरात हिंदू तरुणी देते कुराणची शिकवण
९- भारत शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पिछाडीवर - युनेस्कोचा अहवाल
१०- गृहमंत्र्यांचा काश्मिरी फुटीरवाद्यांवर हल्लाबोल
११- तीन बहिणींवर अॅसिड फेकून तरुणाची आत्महत्या
१२- वादविवादांचा पक्ष बनलाय ‘आप’
१३- रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरले
१४- ऊर्जित पटेल यांनी कार्यभार स्वीकारला
१५- काळ्या पैशांचा तपशील तपास संस्थांना द्या
१६- मुस्लिमांसाठी लवकरच खास बँक !
१७- काळा पैसा योजनेतील वसुलीचे उद्दिष्ट घटविले
१८- यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी
=========================
[राज्य]
१९- बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!
२०- लालबाग मंडळाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
२१- बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!
२२- मराठा समाज मोर्चेकऱ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा
२३- इंटरनेटवर पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही!
२४- गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी
२५- आज सलिल चौधरी यांची पुण्यतिथी
=========================
प्रादेशिक]
२६- कर्नाटक - कावेरी नदी प्रश्नावरून वातावरण तापले
२७- नागपूर - अग्रसेन चौक परिसरात अज्ञात व्यक्तींकडून वृद्ध व्यक्तीवर गोळीबार
२८- उस्मानाबाद - उमरगा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया
२९- पुणे ग्रामीण पोलिसांनी देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
३०- पुणे- दगडूशेठ गणपतीसमोर महिलांचे अथर्वशीर्ष पठण
=========================
[इतर]
सेरेनाचा विक्रमी विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पोइलीकडून नदाल ‘आउट’
...तर पाकला खेळावी लागू शकते पात्रता फेरी
===========================
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
=========================================

भारत शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पिछाडीवर - युनेस्कोचा अहवाल
- - ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - भारत सर्वांना शिक्षण पुरवण्याच्या ध्येयामध्ये 50 वर्ष पिछाडीवर असल्याचा अहवाल युनेस्कोने दिला आहे. याचा अर्थ भारत प्राथमिक शिक्षणाचं ध्येय 2050, कनिष्ठ माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2060 आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2085 मध्ये पुर्ण करेल असं अहलावात नमूद करण्यात आलं आहे.भारताला शाश्वत विकास ध्येय गाठायचं असेल तर शिक्षण क्षेत्रात मुलभूत बदल करण्याची गरज आहे. तेव्हाच 2030 पर्यंत ध्येय पुर्ण होऊ शकेल असं ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (जीईएम) अहवालात सांगण्यात आलं आहे. अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे भारतात 6 कोटींहूनही जास्त मुलांना कमी किंवा अजिबात शिक्षण मिळत नाही. तर 11 लाख मुलं कनिष्ठ माध्यमिक स्तरावर असताना शिक्षण सोडून देतात, आणि हा आकडा जगातील कोणत्याही देशाशी तुलना करता उच्चांक आहे.उच्च माध्यमिक स्तरावरील 4 कोटी 68 लाख मुलं शाळेतच जात नाहीत. तर 29 लाख मुलं प्राथमिक शिक्षणापासूनच दूर आहेत. अहवालानुसार भारतात 2020 मध्ये 4 कोटी कामगार असे असतील ज्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणच घेतलं नसेल.अहवालात सांगितल्याप्रमाणे जगभरातील 40 टक्के विद्यार्थ्यांना अशी भाषा शिकवली जाते जी त्यांना कळतच नाही. एकीकडे जगातील अर्ध्या शाळांमध्ये वातावरणातील बदलांवर शिक्षण दिलं जात नसताना भारतात 30 कोटी विद्यार्थ्यांना हवामानाबद्दल शिक्षण दिलं जात आहे.
=========================================
आग्र्यातील मंदिरात हिंदू तरुणी देते कुराणची शिकवण
- - ऑनलाइन लोकमतआग्रा, दि. 6 - पश्चिम उत्तरप्रदेशात एकीकडे धार्मिक अशांतता पसरत असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. संजय नगर कॉलनीत रोज संध्याकाळी मंदिरात एक 18 वर्षाची तरुणी मुलांनी कुराण शिकवताना दिसते. विशेष म्हणजे ही तरुणी हिंदू असूनही तिला कुराण तोंडपाठ आहे. आपलं हे ज्ञान फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनादेखील ती देत आहे. पुजा कुशवाहा असं या तरुणीचं नाव असून तीदेखील बारावीत शिकत आहे.पुजा कुशवाहा 35 हून जास्त मुस्लिम मुलांना कुराणची शिकवणी देत आहे. पुजाने भाषेवर प्रभुत्व मिळवलं असून तिच्याकडे पाहून सर्व लोक आश्चर्य व्यक्त करत असतात. 'इतक्या कमी वयात इतकं ज्ञान मिळवणं खरंच आश्चर्यकारक आहे. माझ्या मुलीला ती शिकवते यासाठी मी तिची आभारी आहे. तिचा धर्म हा आमच्यासाठी किंवा कोणत्याही मुलाच्या पाल्यासाठी महत्वाचा नाही', असं रेशमा बागम सांगतात. त्यांच्या 5 वर्षाच्या आलिशाला पुजा शिकवणी देते.पण पुजाला हे शिकली कुठून ? हा प्रश्न सर्वांना पडतो. 'काही वर्षापुर्वी संगीता बेगम नावाची एक महिला आमच्या परिसरात राहत होती. त्यांचे वडिल मुस्लिम तर आई हिंदू होती. लहान मुलांना त्या कुराण शिकवत असे. मला कुराण शिकण्यात रस वाटला आणि त्यांच्या शिकवणीला जाण्यास सुरुवात केली. मी लवकरच प्रगती केली आणि सर्वांपेक्षा हुशार बनली', असं पुजा सांगते.पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी शिकवणी बंद केली. त्यांनी पुजाला हे काम पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर पुजाने शिकवणी घेण्याचा निर्णय घेतला. 'त्यांनी मला इस्लाम धर्मातील महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. तुम्ही तुमचं ज्ञान दुस-यांना दिलं नाही तर त्याचा काहीच फायदा नाही', असं पुजाने सांगितलं आहे.महत्वाचं म्हणजे पुजा शिकवणीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही. 'अनेक मुलं गरिभ घरचे असून त्यांना पैसे देणं शक्य नाही, आणि मलाही त्याची गरज नाही', असं पुजा बोलली आहे.
=========================================
फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी
- - ऑनलाइन लोकमतमलीना, दि. 6 - जगातील बलाढ्य देशांच्या यादीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी चक्क शिवी हासडली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली आहे. रॉड्रिगो डुटर्टे यांच्या या वक्तव्यामुळे व्हाईट हाऊसने बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली आहे.व्हाईट हाऊसने काही दिवसांपुर्वी बराक ओबामा फिलिपिन्समध्ये ड्रग्ज तस्करांना ज्याप्रकारे हाताळलं जात आहे त्यासंबंधी अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये ड्रग तस्करांना देण्यात येणा-या मृत्यूदंडांवरही चर्चा केली जाणार होती. मात्र यामुळे संतापलेल्या रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांवर आगपाखड करत खालच्या स्तरावर जाऊन शिवी घालत आपला संताप व्यक्त केला आहे.'ओबामांना काय वाटतं, कोण आहेत ते ? मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नाही. मी एका स्वतंत्र देशाचा अध्यक्ष असून मी फक्त फिलिपिन्स जनतेला उत्तर देण्यास बांधिल आहे', असं वक्तव्य रॉड्रिगो डुटर्टे यांनी केलं आहे.
=========================================
बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!
- मुंबई : विघ्नहारी, विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात विराजमान झाले असून, गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी गणेशोत्सवातील चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ‘आवाजा’ची मुभा पर्यावरण विभागाने दिली आहे.वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुका, ढोल-ताशे-लेझीमसह पारंपरिक वाद्यांचा निनाद, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे अवघे वातावरण भक्तीरसपूर्ण होते. गणपती माझा नाचत आाला...असेच चित्र सर्वत्र असल्याने आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. दहा दिवस मोरयाचा गजर आसमंत व्यापून राहणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात आज मंगळवार, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशीला रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पर्यावरण विभागाने सोमवारी या संबंधीचे परिपत्रक काढले. एरवी रात्री १० पर्यंतच ध्वनिक्षेपणाची परवानगी असते. ही परवानगी वर्षभरात १५ दिवस रात्री १२ पर्यंत विविध कार्यक्रमांसाठी देता येते. हे दिवस कोणते असावेत याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, गणेशोत्सव काळात चार दिवस रात्री १२ पर्यंत ही मुभा देण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला.
=========================================
काबूल तिस-या बॉम्बस्फोटानं हादरलं, आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमतअफगाणिस्तान, दि. 6 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती भाग मध्यरात्रीच्या सुमारास तिस-या बॉम्बस्फोटानं हादरला. तर या आधी काबूलमध्ये सोमवारी झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक जण जखमी आहेत.दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे तिन्ही स्फोट करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबान या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या बॉम्बस्फोटाच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. "अफगाणिस्तानच्या शत्रू राष्ट्रांमध्ये सुरक्षा आणि संरक्षण दलांच्या माध्यमातून लढण्याची क्षमता नसल्यानंच अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवण्याची कृत्ये करतात," असं म्हणत गनी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
No comments:
Post a Comment