Tuesday, 27 September 2016

नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जा भारत काढून घेणार ? 
२- पाकिस्ताननं घेतला भारताचा धसका 
३- पाकिस्तानात 4 भारतीय महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखलं
४- हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा आले आमने सामने
५- लंडनमधील चिनी दूतावासापुढे बलोच जनतेची निदर्शने
६- काश्मीर तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सुषमा स्वराज यांनी खडसावलं
७- भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान
८- भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
९- छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाचा पुन्हा दणका 
१०- मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार 
११- मेट्रो 2 आणि मेट्रो 4 प्रकल्पाला मंजुरी, 4 वर्षात काम पूर्ण होणार ! 
१२- पॅरासिटेमॉल औषधाच्या दरात 35 टक्क्यांची कपात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार! 
१४- 'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे 
१५- कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
१६- मुंबई; करण जोहरच्या ऑफिसबाहेर मनसेचं आंदोलन 
१७- मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गासाठी २५ हजार कोटी रुपयांची मंजुरी
१८- व्यंगचित्राचे पडसाद, संभाजी ब्रिगेडचा 'सामना' कार्यालयावर हल्ला
१९- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलनजीक अपघात, ३ ठार
२०- 'ऐ दिल है मुश्किल'च्या विरोधात मनसेचे करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शन
२१- कर्नल पुरोहितचा जामीन फेटाळला
२२- पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- सांगलीतल्या मराठा मोर्चात मुस्लीम बांधवांकडून पाणीवाटप 
२४- धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा 
२५- विरार; आकसापोटी दहशतवादी म्हणून बदनामी, व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल 
२६- सांगलीच्या नेत्यांना मराठा मोर्चा आयोजकांची प्रसारमाध्यमांनान बोलण्याची अट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- भारतापुढे दिग्गज संघांचे आव्हान
२८- चाहत्यांच्या संघात विराट, गांगुलीला स्थान नाही
२९- विजयानंतर मैदानात 'वंदे मातरम'च्या घोषणा, हॉटेलमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत
३०- उरी हल्ल्याने प्रचंड दु:ख झाले - विराट कोहली
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
================================

'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे

'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
अहमदनगर : ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील ज्या व्यंगचित्रावरुन गदारोळ निर्माण झाला आहे, ते आलं नसतं तर बरं झालं असतं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. हे आपलं वैयक्तिक मत असून, प्रवक्त्याला व्यक्तिगत मत नसल्याची जाणीव असूनही आपण हे सांगत असल्याचंही गोऱ्हे म्हणाल्या.
श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठा समाजाच्या किंवा कुठल्याही समाजातील भगिनींच्या भावना दुखावण्याचं काम ‘सामना’तून कधीही केलं जात नाही, त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारचे गैरसमज करुन घेऊ नयेत, असं कळकळीचं आवाहन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सामनातील व्यंगचित्राबाबतची अधिकृत भूमिका पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत स्पष्ट करतील, त्यामुळे जो प्रश्न एसपीला विचारायला हवा, तो कॉन्स्टेबलला विचारुन उपयोग नाही, असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.


================================

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
मुंबई : मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
मराठा मोर्चात शेतकरी
राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. प्रामुख्याने हा समाज शेतकरी समाज आहे. या समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे.  या सरकारने आरक्षण दिलं नाही म्हणून या समाजाचा हा रोष मोर्चामुळे दिसतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.
मराठा अरक्षणासंबंधी सरकारने दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी, समाजाचा अंत पाहू नये; असं अल्टिमेटम धनंजय मुंडे यांनी दिलं.
कोपर्डीच्या प्रकरणात अजूनही चार्जशीट दाखल झालं नाही. सरकारने ही काय थट्टा चालवली आहे? असा सवाल त्यांनी केला.
आरक्षण देण्यासाठी जर कायद्यात काही बदल करावे लागणार असतील, तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं मुंडे म्हणाले.

================================

धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा

धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा
धुळे : विविध ठिकाणी शांततेत मोर्चा निघत असताना आता मराठा समाजात राजीनामास्त्र सुरु झालं आहे. धुळ्याचे नगरसेवक रविराज पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पदाचा राजीनामा दिला आहे.
रविराज ज्ञानेश्वर पाटील हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. दोंडाईचा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून ते निवडून आले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्याचे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
धुळ्यात उद्या (28 सप्टेंबर) मराठा मूकमोर्चा मोर्चा होणार आहे. मात्र त्याआधीच पाटील यांनी नगरसेवक पद सोडलं आहे. आपल्या समाजाच्या मागणीसाठी नगरसेवकाने राजीनामा देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी.

================================

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. पण हा निर्णय घेताना इतर कोणत्याही घटकाला धक्का लावू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.  रायगड जिल्ह्यातील उरण येथे पत्रकारांशी बोलताना, पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठा समाजाचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नाहीत. मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा असं पवार म्हणाले.
याशिवाय पठाणकोट आणि उरी हल्ल्याबद्दलचा निर्णय लष्कर प्रमुखांचा सल्ला घेऊन घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव लेटर पाठवणं बंद करा अशी भाषा करत होते. आता मात्र त्यांच्यात बदल झालेला दिसतोय, असं म्हणत शरद पवारांनी टोला लगावला.

================================

आकसापोटी दहशतवादी म्हणून बदनामी, व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल

आकसापोटी दहशतवादी म्हणून बदनामी, व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल
विरार : केवळ आकसापोटी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एका व्यक्तीची दहशतवादी म्हणून बदनामी केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला घरबाहेर पडणंही अशक्य झालं आहे.
सईद शेरअली खान आणि सलाम शेख यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला. त्या वादातून सईद खान यांची गाडी जाळण्यात आली. पण पोलिसांनी दखल न घेतल्याने हिंमत वाढलेल्या सलाम शेखने, सईद आणि त्यांच्या मित्राचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून, फोटोतले दोघेही दहशतवादी असल्याची अफवा पसरवली.
“गाइज, ये आदमी किधर भी दिखे तो ये लोग को पकड़ो और पुलीस को दो. क्योंकि ये लोग आतंकवादी है और हर एक जगह जाकर उधर के डिटेल्स ले रहे है. बी अलर्ट,” अशा आशयाचा मजकूर व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला आहे.
सईद शेरअली खान विरारच्या गोपचरपाडा इथे पत्नी आणि चार मुलांसह राहतात. पण या पोस्टमुळे सईद यांना घराबाहेर पडणं कठीण झालं असून, या एका मेसेजमुळे लोक आता सईद यांच्याकडे संशयाने पाहत आहेत.
दरम्यान सईद शेरअली खान यांची तक्रार नोंदवण्याची तसदीही पोलिसांनी घेतली नाही. तसंच सलाम शेख यांचीही बाजू समोर आलेली नाही.

================================

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार!

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार!
मुंबईः पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहे. सरकारने यासंदर्भात आज अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पनवेल नगरपरिषदेचं संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रात येणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 29 महसूली गावांचा समावेश करण्यात आला आहे. खारघरचा महापालिकेत जाण्यास विरोध होता. मात्र खारघरचाही महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेल महापालिकेतील राजकारणाच्या हालचालींना वेग येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील 32 गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 गावांचा समावेश आहे.
याबाबतच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं असून सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नैना क्षेत्रातील 36 गावं मात्र महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. महापालिका स्थापनेची अंतिम अधिसूचना आज काढण्यात आली.
नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर याचा मोठा ताण पडत आहे.  त्यामुळे या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 आणि नयना क्षेत्रातील 36 अशा 68 गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्य़ातील पहिली महापालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

================================

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार!

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार!
मुंबईः पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहे. सरकारने यासंदर्भात आज अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पनवेल नगरपरिषदेचं संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रात येणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 29 महसूली गावांचा समावेश करण्यात आला आहे. खारघरचा महापालिकेत जाण्यास विरोध होता. मात्र खारघरचाही महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेल महापालिकेतील राजकारणाच्या हालचालींना वेग येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील 32 गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 गावांचा समावेश आहे.
याबाबतच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं असून सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नैना क्षेत्रातील 36 गावं मात्र महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. महापालिका स्थापनेची अंतिम अधिसूचना आज काढण्यात आली.
नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर याचा मोठा ताण पडत आहे.  त्यामुळे या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 आणि नयना क्षेत्रातील 36 अशा 68 गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्य़ातील पहिली महापालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

================================

मेट्रो 2 आणि मेट्रो 4 प्रकल्पाला मंजुरी, 4 वर्षात काम पूर्ण होणार !


मेट्रो 2 आणि मेट्रो 4 प्रकल्पाला मंजुरी, 4 वर्षात काम पूर्ण होणार !
मुंबई:  मुंबईचा वेग आता आणखी वाढणार आहे. कारण मेट्रो दोनच्या उर्वरित टप्प्याला मंजुरी मिळाली. मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4  या मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
डीएन नगर- वांद्रे -मानखुर्द या 24 किमीच्या मेट्रो 2 च्या मार्गाला मंजुरी मिळाली. तर वडाळा- घाटकोपर -ठाणे- कासारवडवली असा मेट्रो 4 चा 33 किमीचा मार्ग असेल.
मेट्रो मार्ग- 2 ब मध्ये डीएन नगर ते मंडाळे या 24 कि.मी.च्या मार्गावर 22 स्थानके आहेत. यासाठी 10 हजार 970 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत म्हणजेच 42 महिन्यांत हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे.
तर वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या 33 कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्ग- 4 वर 32 स्थानके आहेत. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 14 हजार 549 कोटींचा निधी लागणार आहे. हा प्रकल्प एप्रिल 2017 ते जुलै 2021 या 52 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.

================================

करण जोहरच्या ऑफिसबाहेर मनसेचं आंदोलन

करण जोहरच्या ऑफिसबाहेर मनसेचं आंदोलन
मुंबईः मनसे चित्रपट सेनेने सिनेनिर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉक्शनच्या कार्यालयासमोर आज निषेध आंदोलन केलं. करण जोहरचा आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’मध्ये  पाकिस्तानी कलाकार फवाद खान हा एक भूमिका साकारतोय. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत मनसेनं हे आंदोलन केलं.

यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकेतही घेतलं. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने मुंबईतील सर्व पाक कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिला होता. तसंच ज्या सिनेमा आणि मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकार असतील, त्या बंद पाडू असंही मनसेनं म्हटलं होतं.

मनसेच्या अल्टीमेटमंतर अनेक वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे शो बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र करण जोहरने पाकिस्तानी कलाकारांना हाकलल्याने प्रश्न सुटणार नाही, असं मत मांडलं होतं. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत करण जोहरच्या मुंबईतील ऑफिससमोर आंदोलन केलं.

================================

छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाचा पुन्हा दणका

छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाचा पुन्हा दणका
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. हायकोर्टाने भजुबळांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. शिवाय, आर्थक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यासंदर्भातल्या (PMLA) याचिकेवर चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेशही हायकोर्टाने ईडी आणि राज्य सरकारला दिला आहे.

आर्थक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातल्या काही कलमांच्या वैधानिक तरतुदींना भुजबळांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यादरम्यान भुजबळांनी जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली. पण ज्या कारणाकरता याचिका दाखल केली आहे. त्याव्यतिरिक्त कोणतीही इतर विनंती मान्य करण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार दिला आहे. जामीनासंदर्भात संबंधित कोर्टात जाण्याची हायकोर्टाने सूचना दिली.

================================

सांगलीतल्या मराठा मोर्चात मुस्लीम बांधवांकडून पाणीवाटप

सांगलीतल्या मराठा मोर्चात मुस्लीम बांधवांकडून पाणीवाटप
सांगलीत : सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसंच विद्यार्थ्यांनी लाखोंच्या संख्यने मोर्चात सहभाग नोंदवला आहे. सांगलीतल्या या मराठा मोर्चात हिंदू-मुस्लीम एकतेचं चित्र पाहायला मिळाली.
मुस्लीम बांधवांनीही या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुस्लीम बांधव या मोर्चात पाणीवाटपाचं महत्त्वाचं कार्य करत आहेत. राज्यातील यापूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चांप्रमाणेच सांगलीच्या मोर्चातही मुस्लीम बांधव पाणीवाटप करताना दिसत आहेत.
यापूर्वी बहुतांश मराठा मोर्चात मुस्लीम बांधव पाणीवाटप करताना दिसत आहेत. आता सांगलीतही तेच चित्र पाहायला मिळाल.

================================

सांगलीच्या नेत्यांना मराठा मोर्चा आयोजकांची एक अट
सांगलीच्या नेत्यांना मराठा मोर्चा आयोजकांची एक अट
सांगली: सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चावेळी बंदोबस्त म्हणून १८०० पोलीस कर्मचारी, ७५० होमगार्ड, एसआरपीएफच्या ४ तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेला आहे. तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी ६ पासूनच बंद करण्यात आली आहे.
माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, आर.आर.पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील, या मोर्चात सहभागी झाल्या. याशिवाय भाजप खासदार संजयकाका पाटील, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलास जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यासह अनेक नेते मोर्चात सहभागी झाले.
विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, मात्र मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलू नये, अशी अट आयोजकांनी घातली आहे.

================================

पॅरासिटेमॉल औषधाच्या दरात 35 टक्क्यांची कपात

पॅरासिटेमॉल औषधाच्या दरात 35 टक्क्यांची कपात
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय किंमत प्राधिकरणाने पॅरासिटेमॉल औषधाच्या किंमतींमध्ये 35 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पॅरासिटेमॉलच्या गोळ्या याआधीच किंमत नियंत्रण कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. मात्र त्यात आता इंजेक्शनसह इतर औषधांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

सामान्यपणे चिकन गुणिया आणि डेंग्यूंच्या तापावर पॅरासिटेमॉलचा वापर केला जातो. त्यामुळे अशा रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, एनपीपीए अर्थात नॅशनल फार्मसिटीकल प्रायजिंग ऑथेरिटीकडून औषध कंपन्यांना यासंदर्भात आदेश दिले जाणार आहेत. त्यानंतर ही किंमत कपात तत्काळ लागू केली जाणार आहे.

================================

No comments: