Wednesday, 21 September 2016

नमस्कार लाईव्ह २१-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानातल्या सार्क परिषदेवर बहिष्कार घाला - अफगाणिस्तान 
२- पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक 
३- वॉशिंग्टन; मुस्लिमांनो चालते व्हा सांगणा-याला मशिदीत येण्याचं निमंत्रण 
४- पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक
५- जोहान्सबर्गमध्ये आंदोलक विद्यार्थी व पोलिसांत संघर्ष
६- अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, दोन महत्वपूर्ण निर्णयाची शक्यता 
८- पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी दिल्लीत रात्रभर खलबतं 
९- काळा पैसा; सीबीडीटीकडून एसएमएस
१०- स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
११- राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान
१२- निर्माण ग्रुपतर्फे रविवारी जुनेे फ्लॅट विक्री-खरेदी मेळावा
१३- सोन्या-चांदीच्या भावात वाढ
१४- दोन हजार कोटींची सोने तस्करी उघड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात 
१६- नवी मुंबई, सोलापुरात मराठा मोर्चा 
१७- पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्यापूर्वी लागू केलेली जमावबंदी मागे 
१८- बेनवाझ शरीर घरी तरी तुमचे कोणी ऐकते का ? - सलीम खान
१९- तूफान पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या
२०- हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नव्हेत, भीमाची गदा आहे हे पाकिस्तानला दाखवा - उद्धव ठाकरे
२१- पाऊसफुल्ल दिवस; २८ हजार गावे डिजिटल... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- हैदराबाद; युवकाला उडवून कार सुसाट, तीन किमीपर्यंत मृतदेह टपावरच 
२३- नाशकात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- किलोचा मूतखडा, यशस्वी शस्त्रक्रिया, लिम्का बुकात नोंद? 
२५- मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये ट्रॅकवर पाणी 
२६- क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 
१७- पाकबाबतच्या सवालाने कपिल देव भडकले 
२८- भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही
२९- रिषिराज बारोटला सुवर्ण!
३०- पी. कश्यप मुख्य फेरीत
३१- बीसीसीआयची वार्षिक सभा आज
३२- अडचणींतूनच स्वत:ला सिद्ध केले
३३- विराट, विजेंदरकडून पाक हल्ल्याचा निषेध
३४- निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
======================================

पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात

पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात
मुंबई : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज थेट जे जे रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली.
छगन भुजबळ यांची शनिवारी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तुरुंगातून जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
15 सप्टेंबरपासून भुजबळांना प्रचंड ताप असून, त्याचं संपूर्ण अंग दुखतं आहे. मदतीशिवाय भुजबळांना दोन पावलेही चालता येत नसल्याची माहिती मिळते आहे.
प्लेटलेट्स कमी झाल्या असून, ब्लडप्रेशर 104/55 इतकं आहे. प्रचंड दम लागणे, झोप न लागणे, छातीत कळ येणे असेही त्रास भुजबळांना होत आहेत.
जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन भुजबळांची तपासणी केली आणि रुग्णालयात अॅडमिट करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज पंकजा मुंडे यांनी जे जे रुग्णालयात धाव घेतली.

======================================

1 किलोचा मूतखडा, यशस्वी शस्त्रक्रिया, लिम्का बुकात नोंद?

मुंबई : मूतखडा किंवा किडनी स्टोन हा आजकाल सर्रास ऐकायला मिळणारा शब्द आहे. कोणाच्या पोटातून किती मोठा मूतखडा काढला याबाबत अनेक आश्चर्यकारक माहिती ऐकायला मिळते. तशीच काहीशी घटना मुंबईजवळच्या वसईत घडली आहे.
एका रुग्णाच्या पोटातून तब्बल एक किलोचा मूतखडा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आहे. वसईत डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
vasai kidney stone
वसईच्या  नायगांवमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर  हे ७२ वर्षाचे  रुग्ण मूतखड्यामुळे त्रस्त होते. त्यांनी उपचारासाठी डॉ. देवेंद्र पाटील यांची भेट घेतली. वॉर्नर यांच्या तपासण्या केल्या असता, त्यांना मूतखडा असल्याचं समोर आलं.
हा मूतखडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. मात्र शस्त्रक्रियेद्वारे मूतखडा काढल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा मूतखडा तब्बल 1100 ग्रॅम म्हणजे 1 किलोहून अधिक वजनाचा होता. तर त्याचा आकार 13.5 सेंटीमीटर X 7 सेंटीमीटर इतकी होती.
एवढा मोठा मूतखडा ऑपरेशन करून  बाहेर  काढणे हे डॉक्टरांसाठी  आव्हान होतं. कारण त्या रुग्णाला  हृदयाचा त्रास  होता.  तसेच त्या रुग्णाचे मूत्राशय कृत्रिम होते.  तरीही डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार  पाडले.
एवढा मोठ्या वजनाचा मूतखडा भारतात तरी अजून सापडला  नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.  आता याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न आहेत.

======================================

नवी मुंबई, सोलापुरात मराठा मोर्चा

LIVE: नवी मुंबई, सोलापुरात मराठा मोर्चाला सुरुवात
नवी मुंबई / सोलापूर : नवी मुंबई आणि सोलापुरात मराठा क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे.
नवी मुंबईत खारघर सेंट्रल पार्कमधून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला आहे.

अॅट्रॉसिटी कायदा रद्द नव्हे तर त्यामध्ये बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या मराठा मूक मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत.

राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं आता आपला मोर्चा नवी मुंबई आणि सोलापूरकडे वळवला आहे. आज नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आणि सोलापुरात मराठा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
नवी मुंबईत निघणारा मोर्चा हा रायगड आणि नवी मुंबई असा दोन विभागांचा आहे. त्यामुळे यात लाखोंचा जमाव सहभागी होईल असा अंदाज  व्यक्त करण्यात येतोय. सेंट्रल पार्क ते कोकण भवन असा हा मोर्चा निघणार आहे .
तर दुसरीकडे सोलापुरातही मोर्चाला मोठी गर्दी होताना दिसत आहे.खेडोपाडीच्या गाड्या भरुन सोलापूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. संभाजी चौक ते होम मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
इकडे मुंबईत दिवाळीच्या आधी भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी मंदिरात काल बैठकही घेण्यात आली.

======================================

युवकाला उडवून कार सुसाट, तीन किमीपर्यंत मृतदेह टपावरच

युवकाला उडवून कार सुसाट, तीन किमीपर्यंत मृतदेह टपावरच
हैदराबाद : भरधाव वेगात आलेल्या एका गाडीने युवकाला धडक दिली, धडकेत मृतदेह उडून गाडीच्या टपावर पडला. त्यानंतरही उद्दाम चालकाने गाडी तशीच दामटवत तीन किलोमीटर प्रवास केला. तेलंगणातील मेहबूबनगरमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली.

35 वर्षीय कामगार श्रीनिवासुलू रात्री दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी शेव्हरोले कंपनीच्या एका कारने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की तो उडून त्याच गाडीच्या टपावर पडला.

अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार थांबवण्याऐवजी वेगात सुरु केली. कामगाराचा मृतदेह टपावर त्याच अवस्थेत असताना जवळपास तीन किलोमीटरचे अंतर कारने पार केले. त्यानंतर काही दुचाकीस्वारांनी त्याला हटकलं आणि पोलिसांना माहिती दिली.

स्थानिक आणि पोलिसांनी कारचालकाला थांबवलं, मात्र पळून जाण्यात त्याला यश आलं. पोलिसांच्या माहितीनुसार हैदराबादचे व्यावसायिक राजशेखर यांच्या नावाने कारची नोंद आहे.

======================================

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये ट्रॅकवर पाणी

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये ट्रॅकवर पाणी
मुसळधार पावसानं पालघर जलमय
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. दादर, माटुंगा, वांद्रे भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. तर दक्षिण मुंबई तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पाऊस कोसळतो आहे. ठाणे आणि कल्याणमध्येही रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.

– पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं वाहतुकीचा खोळंबा, हार्बरवर सीएसटी-अंधेरी रेल्वे वाहतूक विस्कळीत

दरम्यान, पालघर आणि बोईसरमध्ये ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. गुजरातकडे जाणाऱ्या आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात ट्रफिक असल्याची माहिती समजते आहे.

======================================

नाशकात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशकात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : नाशिकमध्ये देवळाली परिसरात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडाला गळफास घेऊन कर्मचाऱ्याने जीव दिला.

चिन्नप्पा मन्द्री असं आत्महत्या केलेल्या 45 वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. पगारवाढीच्या नैराश्यातूनच चिन्नप्पा यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे

गेल्या 8 महिन्यांपासून पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यामध्ये 94 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. चिन्नप्पाच्या आत्महत्येनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.

======================================

पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्यापूर्वी लागू केलेली जमावबंदी मागे

पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्यापूर्वी लागू केलेली जमावबंदी मागे
पालघर : महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या मोखाडा दौऱ्याआधी लागू करण्यात आलेली जमावबंदी रद्द करण्यात आली आहे. पंकजा मुंडेंच्या विनंतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी रद्द करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे आज पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणग्रस्त कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंनी या जमावबंदीला विरोध केला.


======================================

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, दोन महत्वपूर्ण निर्णयाची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, दोन महत्वपूर्ण निर्णयाची शक्यता
नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प मार्च ऐवजी 1 फेब्रुवारीलाच सादर करण्यासंदर्भात पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभर आधीच अर्थसंकल्प सादर केला जाईल.

दरम्यान, अर्थसंकल्पाच्या या निर्णयाबरोबरच रेल्वे अर्थसंकल्पाबाबतही निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प न मांडता सर्वसामान्य अर्थसंकल्पातच त्याचा समावेश करण्याचा विचार सरु आहे. त्यामुळे या निर्णयाला आजच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वे अर्थसंकल्प हा ब्रिटीश काळापासून स्वतंत्ररित्या मांडण्यात येतो. मात्र, आता रेल्वे अर्थसंकल्पापेक्षाही संरक्षण मंत्रालयाचा अर्थसंकल्प मोठा असतो. आता रेल्वे अर्थ संकल्पाचा समावेश सर्वसाधारण बजेटमध्ये अंतर्भाव कसा करावा, यासाठी एक पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली होती.

======================================

पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी दिल्लीत रात्रभर खलबतं

पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी दिल्लीत रात्रभर खलबतं
नवी दिल्ली : काश्मीरमधील उरीतल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत खलबतं सुरु झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत दिल्लीत चाललेल्या बैठकीला मोदी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची उपस्थिती होती.

दोन दिवसांपूर्वी उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर आजही चकमक झाली. ज्यात दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, तर 18 भारतीय जवान शहीद झाले. पण पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी मंत्रिमंडळानं खलबतं सुरु केली आहेत.

आंतराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताकडून प्रयत्न सुरु आहे. शिवाय सीमेवर होणारा दहशतवाद थांबवण्यासाठी करता येण्यासारख्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

======================================

क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोलंबो: श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका मोटारबाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात कुलशेखरा कोलंबो पोलिसांनी अटक केली होती.

प्राथमिक चौकशीनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार, एका बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या बाईकस्वाराचा तोल जाऊन तो कुलशेखराच्या कारसमोर आला. त्यावेळी कारची धडक बसून त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी श्रीलंकचा तेज गोलंदाज कुलशेखराची प्रतक्रिया अद्याप समजू शकलेली नाही. पण त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या मते, या घटनेनं त्याला फार मोठा धक्का बसला आहे.

======================================

'भारतीयच आहेस ना?' पाकबाबतच्या सवालाने कपिल देव भडकले

'भारतीयच आहेस ना?' पाकबाबतच्या सवालाने कपिल देव भडकले
मुंबई : आगामी कबड्डी वर्ल्डकपसाठी आयोजित कार्यक्रमात पोहचलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव पाकिस्तानचं नाव काढताच चांगलेच भडकले. भारतीय कबड्डी संघांची घोषणा आणि जर्सीच्या अनावरणासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कपिल देव या कार्यक्रमासाठी पोहोचल्यानंतर एका पत्रकाराने कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ का नाही, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर कपिलपाजी चांगलेच भडकले. ‘तुम्ही भारतीयच आहात ना?’, असा सवाल त्यांनी पत्रकाराला केला.

‘ही वेळ आहे का या प्रश्नाची? हा प्रश्न सरकारवर सोडायला पाहिजे. देशाचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून मला तलावात उडी मारायला सांगितली, तर मी आनंदाने मारेन’ असंही देव म्हणाले. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. त्यातच कपिल देव यांचाही संताप पहायला मिळाला.

अहमदाबादमध्ये पुढील महिन्यात आयोजित कबड्डी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचं नेतृत्त्व अनुपकुमारकडे सोपवण्यात आलं आहे. मनजीत चिल्लर हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. येत्या 7 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत कबड्डी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे.

======================================

No comments: