Saturday, 3 September 2016

नमस्कार लाईव्ह 0३-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- संरक्षण, आयटी क्षेत्रासह 12 करारांवर स्वाक्षऱ्या 
२- 'यिन'च्या निवडणुकीत तरुणाईचे भरघोस मतदान 
३- पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद
४- न्यूझीलंडमध्ये तीव्र भूकंप
५- पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- नरेंद्र मोदींकडून गोरक्षकांचा अपमान: शंकराचार्य 
७- विकृत अभ्यासक्रम बदलण्याची गरज:मोहन भागवत 
८- नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्ये टाळावीत - मोदी 
९- तलाकच्या कायद्यात न्यायालयाची ढवळाढवळ नको - मुस्लिम लॉ बोर्ड 
१०- देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर
११- डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- सुट्यांमुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी 
१३- शहीद महाडिक यांच्या पत्नी "लेफ्टनंट'पदी रुजू 
१४- पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे  
१५- ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द 
१६- शिक्षकांच्या हक्कासाठी चर्नी रोड ते राजभवन बुलंद मोर्चा  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नाशिकजवळ तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू 
१८- संदीप कुमारची 'आप'मधून हकालपट्टी! 
१९- मुलीचे पार्थिव घेऊन 6 किमी चालले आई-वडील 
२०- पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी 
२१- सांगली - इस्लामपुरात सहा हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाला अटक. 
२२- कोल्हापूर- दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित विरेंद्र तावडेला आज रात्री कोल्हापूरला आणणार. 
२३- नाशिक : देवळाली कँम्प भगूर येथे महिला घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यास गेली असता विजेचा शॉक लागून मृत्यू. 
२४- पुणे : कोथरूड डेपोकडे जाणा-या टेम्पोचे ब्रेक झाले फेल 
२५- आंदोलन करणा-या नर्सेसवर दिल्ली सरकारने एस्मा लावला. 
२६- बीफ बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- योगेश्वरच्या 'ब्राँझ'चे होणार 'सुवर्ण'त रुपांतर? 
२८- 'शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण 
२९- पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी
३०- गर्बाइन मुगुरुजा स्पर्धेबाहेर...
३१- ‘मिशन आॅलिम्पिक’साठी कोल्हापुरी बळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==============================
संरक्षण, आयटी क्षेत्रासह 12 करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) व्हिएतनामच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर दाखल झाले असून, या दौऱ्यादरम्यान संरक्षण, आयटी क्षेत्रासह 12 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी हा दौरा आटोपून उद्या (रविवार) चीनमधील हॉंगझोऊ येथे रवाना होणार आहेत. या ठिकाणी अनुक्रमे 4 आणि 5 सप्टेंबर रोजी जी-20 परिषद पार पडणार आहे. व्हिएतनामशी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचे ध्येय आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर असून, दोन्ही देशांमधील भागीदारीचा फायदा आशियासह जगालाही होईल. परिषदेत आंतरराष्ट्रीय आव्हाने, जागतिक अर्थव्यवस्था, सुरक्षेसारख्या महत्त्वांच्या विषयांवर विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची संधी मला यामुळे मिळत असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले होते. 
==============================
नरेंद्र मोदींकडून गोरक्षकांचा अपमान: शंकराचार्य

डेहराडून - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरक्षकांना गुंड आणि बनावट गोरक्षक म्हणत अपमानित करत असल्याची टीका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केली आहे.



ज्या देशात गायीची पूजा केली जाते, त्याच देशातील सरकार गोमांस विकून विदेशी चलन मिळवत असल्याचे म्हणत ही दुर्दैवी गोष्ट असल्याची टीका शंकराचार्य यांनी केली. हरिद्वार येथे आयोजित एका कार्यक्रमात शंकराचार्य बोलत होते. ते म्हणाले, "देशातील अनेक राज्यांमध्ये गोहत्येवर निर्बंध लादण्यात आले आहेत. इतके असूनही गोमांस विक्रीच्या बाबतीत भारत हा संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ज्या देशात गायीला माता समजले जाते आणि तिची पूजा केली जाते, त्याच देशात गोमांस विक्री करून सरकार विदेशी चलन कमावण्याच्या मागे लागले आहे.‘ तसेच येथे गायीचे जीवन धोक्‍यात आले आहे आणि सरकार गावागावातील गायीचे गोठे बांधकाम व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि अन्य लोकांना विकत आहे, असेही ते पुढे म्हणाले. 
==============================
सुट्यांमुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी

पुणे - सलग सुट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार ते पाच किमीपर्यंत वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत.

सोमवारी गणपतीचे आगमन होत असून, रविवारला जोडून सुटी आल्याने अनेकजण आपापल्या गावी जात आहेत. मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी केल्याने अनेकजण वाहनाने गावी जात आहेत.

शनिवार असल्याने पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांचीही संख्या अधिक असल्याने वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहे. एक्स्प्रेसवर शनिवारी आणि रविवारी वाहतुकीची कोंडी नियमित झाली असून, आता गणेशोत्सवामुळे त्यात आणखी भर पडली आहे.
==============================
शहीद महाडिक यांच्या पत्नी "लेफ्टनंट'पदी रुजू

पुणे - सीमेवर लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती याही आता सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होत आहेत. "लेफ्टनंट‘ या पदावर त्यांची निवड झाली असून, चेन्नई येथील "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी‘मध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दहशतवाद्यांशी लढताना सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांना वीरगती प्राप्त झाली. पतीच्या अंत्यसंस्कारावेळीच स्वाती यांनीही पतीप्रमाणे देशसेवा करण्यासाठी लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच केवळ अनुकंपा तत्त्वावर नकोय, तर कठोर चाचण्या पूर्ण करूनच त्यांनी ही इच्छा प्रत्यक्षात फलद्रूप केल्याचे दिसत आहे. चेन्नई येथील संस्थेत त्यांना 49 आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पुण्यातील "ऍपेक्‍स करिअर्स‘ या संस्थेत एसएसबी मुलाखतीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले आहे. मे महिन्यामध्ये त्यांची बंगळूर येथे मुलाखत झाली होती. 1 सप्टेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होऊन स्वाती यांच्यासह त्यांच्यासोबत मुलाखतीची तयारी करत असलेल्या निधी मिश्रा या विधवा महिलेचेही नाव गुणवत्ता यादीत झळकले. त्यामुळे स्वतःच्या निवडीपेक्षाही अधिक आनंद मिश्रा यांच्या निवडीचा झाल्याचे स्वाती यांनी सांगितले. तसेच मुलाखतीचे प्रशिक्षण घेताना तेथील सर्व तरुणींनी खूप मदत केली. मुलाखतीच्या अडथळ्यांची शर्यत पार पाडताना या तरुणींकडून खूप काही शिकण्यास मिळाल्याच्या भावनाही स्वाती यांनी व्यक्त केल्या. 
==============================

No comments: