[अंतरराष्ट्रीय]
१- 'पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र', संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर
२- काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य : शरीफ
३- भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?
४- लंडनमधील महाराष्ट्र मंडळात उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव
५- नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख
६- मुस्लिमांनो चालते व्हा सांगणा-याला मशिदीत येण्याचं निमंत्रण
७- पाकिस्तानातल्या सार्क परिषदेवर बहिष्कार घाला - अफगाणिस्तान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- उरी हल्ला:पंतप्रधानांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसह वॉर रुममध्ये विशेष बैठक
९- उरीमध्ये काही तरी चुकलंच, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांची अप्रत्यक्ष कबुली
१०- राफेल विमान खरेदीला मंजूरी, शुक्रवारी करारावर शिक्कामोर्तब
११- रेस कोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ नामकरण
१२- नव्या डान्सबार कायद्याला स्थगिती नाही
१३- ‘कोहिनूर’ मिळवण्याचे पर्याय नाहीत
१४- जैन साधू तरुण सागर यांची ददलानी यांनी मागितली माफी
१५- डाळी, खाद्य तेलाच्या साठामर्यादेला मुदतवाढ
१६- पैसे जमा करण्यासाठी यापुढे बँकेत जायचीच गरज नाही
१७- काळा पैसा; सीबीडीटीकडून एसएमएस
१८- स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
१९- राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२०- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलवसुलीला 2035पर्यंत मंजुरी!
२१- मराठा आरक्षणः आता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून सुनावणी
२२- मुंबई 'वायफाय'मय बनणार, मुख्यमंत्र्यांची थेट गूगलशी चर्चा
२३- सात हजारासाठी भावंडांचे अपहरण
२४- पुढच्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
२५- तृप्ती देसाईंचा 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास नकार
२६- बसफेरी सुरू करण्यासाठी श्रमदानातून रस्ता दुरूस्ती
२७- मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली
२८- पंकजांनी घेतली भुजबळ यांची भेट
२९- शहरात दिवसभर पावसाची संततधार
३०- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘गोल्डन अवर्स’ला यश
३१- कुपोषणाचे वर्षभरात १७ हजार बळी
३२- मुख्यमंत्री साधणार प्रशिक्षणार्थींशी संवाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३३- मुंबई, ठाणे, भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी
३४- मुंबईसह उपनगरात 'कोसळधार', रस्ते-लोकल वाहतूक मंदावली
३५- काश्मीर खोऱ्यात पुन्हा चकमक; 1 दहशतवादी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३६- विराट कोहलीविरुद्ध केन विलियम्सन यांच्यात वर्चस्वाची लढाई
३७- अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व
३८- अजय शिर्के यांच्यावर मानहानीचा आरोप होऊ शकतो
३९- अजय देशपांडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी
४०- बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
४१- भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
======================================

मुंबई, ठाणे, भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई/ठाणे: मुसळधार पाऊस, पुलांवर आलेलं पाणी आणि रस्त्यांवरचे खड्डे, यामुळे मुंबई आणि परिसरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. त्यामुळे एरव्ही वेगाने धावणारी मुंबई कमालीची मंदावली आहे.
ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळतेय. मुंबई- अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद असल्यानं मोठ्या गाड्यांची वाहतूक ही विविध मार्गे वळवण्यात आली आहे.
त्यामुळे काल रात्रीपासून ठाणे, भिवंडी, शिळफाटा, तसंच घोडबंदरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. दोन आठवड्यांसाठी वर्सोवा पूल बंद करण्यात आल्यानं जवळपास वाहनांच्या 20 किमीपर्यंत लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत.
याच वाहतुकीचा थेट परिणाम मुंबई शहरात पहायला मिळतोय. कारण मुंबईतले प्रमुख महामार्ग वाहतूक कोंडीने जाम झाले आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन-पनवेल हायवे आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, या महत्त्वाच्या रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
इतकंच नाही, तर लिंक रोड, एलबीएस मार्ग, एसव्ही रोड या अंतर्गत रस्त्यांवरही जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे आजची मुंबईकरांची वाट कमालीची बिकट झाली आहे.
======================================
'पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र', संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर
फोटो सौजन्य: संयुक्त राष्ट्रसंघ (UNGA)
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भाषणाला चोख प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र असून सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेलं असतं, असा थेट आरोप केला. भारतात पाकिस्तानी सीमेपलीकडून केल्या जात असलेल्या दहशतवादी कारवाया या युद्धगुन्हे असल्याचा आरोपही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरचा प्रश्न सुटल्याशिवाय भारताबरोबरचे संबंध सुधारणार नाहीत, असं आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं.
संयुक्त राष्ट्रांनी ज्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं आहे, अशांना पाकिस्तानात पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य मिळतं. ते पाकिस्तानच्या रस्त्यांवरून खुलेआम फिरत असतात, तसंच पाकिस्तानी सरकारच्या संमतीने आणि सहकार्यानेच भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी चिथावणी देत असतात, असंही भारताने प्रत्युत्तरात म्हटलं आहे.
======================================
मुंबईसह उपनगरात 'कोसळधार', रस्ते-लोकल वाहतूक मंदावली
मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात परतलेल्या वरुणराजाची न थकता, न थांबता तुफान बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, पालघरलाही पावसाने झोडपलं आहे. मागील 21 तासात मुंबईत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उरी हल्ला:पंतप्रधानांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसह वॉर रुममध्ये विशेष बैठक
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर सैन्यदलाची रणनीती आखण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात वॉर रुममध्ये एक विशेष बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 2 तास चाललेल्या या गुप्त बैठकीमध्ये भारताच्या तिन्ही दलाच्या लष्कर प्रमुखांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या संभाव्य कारवाईची रणनीती स्पष्ट केली.
20 सप्टेंबरच्या रात्री पंतप्रधान कार्यालयातील वॉर रुममध्ये नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग, हवाईदलाचे प्रमुख अरुप राहा आणि नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा उपस्थित होते.
या बैठकीत नरेंद्र मोदी यांना अत्यंत गोपनीय माहिती देण्यात आली. इतकंच नाही, तर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांची माहितीही देण्यात आली. पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, काश्मीरचे नकाशे आणि दहशतवादी तळांचे मॉडेल्सही या बैठकीत तयार करण्यात आले.
======================================
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलवसुलीला 2035पर्यंत मंजुरी!
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्याची चाचपणी सुरु असतानाच राज्य सरकारने या मार्गावरील टोलवसुलीची मुदत 2035 पर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या रुंदीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे टोल ठेकेदाराची चांदी होणार असून वाहनचालकांना मात्र टोलभार सोसावा लागणार आहे.
खालापूर फूडमॉल ते खालापूर इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. या कामाकरिता ३२१५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निविदा मागवून हे काम केले जाणार आहे.
हा एक्सप्रेस वे सहा पदरी रुंद असला तरी पर्यावरणविषयक मंजुरीअभावी खोपोली ते कुसगावपर्यंत १२ किमीच्या मार्गाचे काम करण्यात आले नव्हते. मात्र वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम हाती घेण्यात आलं आहे.
======================================
काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य : शरीफ
न्यूयॉर्क : काश्मीरप्रश्नी तोडगा काढल्याशिवाय आता भारताशी समेट अशक्य असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या 71 व्या सत्रात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. या भाषणात त्यांनी भारतावर आरोपांची सरबत्ती केली. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून, काश्मिरी जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
======================================
उरीमध्ये काही तरी चुकलंच, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांची अप्रत्यक्ष कबुली
नवी दिल्ली : उरीतील लष्करी तळाच्या सुरक्षेसंदर्भात काही तरी चूक झाली, अशी अप्रत्यक्ष कबुली देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र, पुन्हा अशी चूक होणार नाही यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही पर्रिकरांनी दिलं.
उरीमधील हल्ला हा पाक पुरस्कृतच होता, हे भारताने पुन्हा एकदा खडसावून सांगितलं. भारताचे परराष्ट्र खात्याचे सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना समन्स बजावून पाकिस्तानविरोधातले सर्व पुरावे दिले आहेत.
दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली जीपीएस यंत्रणा पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा सबळ पुरावा पाकिस्तनला देण्यात आला आहे. तसंच पाकिस्तानकडून दहशवाद्यांना पुरवण्यात येणारी रसद थांबवावी अशी ताकीदही दिली.
======================================
मराठा आरक्षणः आता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून सुनावणी
मुंबईः सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने हायकोर्टात पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भात नवीन याचिका दाखल करण्यात आली. मात्र न्या. कानडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विनोद पाटील उद्या मुख्य न्यायमूर्तींकडे धाव घेणार आहेत.
मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यामुळे सुनावणी घेण्याचा आग्रह विनोद पाटील यांनी केला. महाराष्ट्रात लाखोंच्या गर्दीने मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मराठा तरूणांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. अशा वेळी मराठा आरक्षणावरील सुनावणी जलदगतीने व्हावी, यासाठी विनोद पाटील पुन्हा गुरूवारी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे धाव घेणार आहेत.
हायकोर्ट सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं, सुप्रीम कोर्टाने मत नोंदवले होते.सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश न्यायमूर्तींसमोर मांडले जाणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी मराठा आरक्षणावर सुनावणी घेतली जाणार आहे.
======================================
राफेल विमान खरेदीला मंजूरी, शुक्रवारी करारावर शिक्कामोर्तब
नवी दिल्लीः फ्रान्सकडून राफेल विमान खरेदीच्या कराराला मंजूरी मिळाली आहे. या करारावर दोन्ही देशांकडून 23 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. या कराराअंतर्गत भारत फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यांची किंमत 59 हजार कोटी रुपये आहे.
20 वर्षात पहिल्यांदाच लढाऊ विमानांची खरेदी
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी गेल्या आठवड्यात राफेल डील सध्या निर्णायक अवस्थेत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या 20 वर्षात लढाऊ विमान खरेदी करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. या विमानातील अत्याधुनिक मिसाईल्समुळे वायूसेनेला फायदा होणार आहे. भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात हे विमान दाखल होण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
======================================
मुंबई 'वायफाय'मय बनणार, मुख्यमंत्र्यांची थेट गूगलशी चर्चा
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या त्यांनी आज सॅन फ्रॅन्सिस्को येथे प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात त्यांचा सहयोग घेण्याबाबत चर्चा केली.
यावेळी गूगलचे प्रतिनिधी विनय गोयल यांच्यासोबत झालेल्या भेटीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीदरम्यान मुंबईला वायफाय सिटी बनविण्यासाठी गुगलने पाठबळ देण्याची तयारी दर्शविली आहे.
======================================
No comments:
Post a Comment