Saturday, 10 September 2016

नमस्कार लाईव्ह १०-०४-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू 
२- उत्तर कोरियाचा जगभर ‘अणु’कंप 
३- ९/११ हल्ल्यातील पीडित सौदी अरेबिया विरुद्ध खटला दाखल करणार ? 
४- आल्प्स पर्वतामध्ये केबल कार बिघडली, पर्यटकांची दुस-यादिवशी सुटका 
५- उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- विमानात 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'च्या वापरावर बंदी 
७- अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे 
८- सोने-चांदी आणखी घसरले
९- ट्रायची दूरसंचार कंपन्यांशी चर्चा
१०- शांती सेनेसमोर अनेक नवी आव्हाने
११- मला भारतात परतायचेय
१२- गोवा राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था आणि कोकण रेल्वेची मर्यादा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार 
१४- मुंबईमध्ये नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी
१५- केज कल्चर प्रणालीतून रोजगाराच्या संधी मिळणार
१६- आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा
१७- ‘एफआरपी’ कर्जाची पुनर्रचना करा
१८- वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- वाशी पोलीस ठाण्यावर इंदापूरकरांचा मोर्चा 
२०- सांगली : संशयित भारत कुंडलिक इरकर पोलिसांत हजर. आई, पत्नीसह दोन मुलींचा खून केल्याची कबुली. 
२१- सांगली : जमिनीच्या वादातून जत तालुक्यात एकाच घरातील चार जणांचा खून.  
२२- बांग्लादेशमध्ये एका फॅक्टरीत आग लागून १० जण ठार 
२३- नागपूर: मिहानमध्ये बाबा रामदेव यांच्या पंतजली फुडपार्कचे आज भुमीपूजन 
२४- चेन्नई-जलपायगुडी एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन सिलगुडी येथे रुळावरुन घसरले 
२५- जत: एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व 'कांस्य' 
२७- आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय 
२८- युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल
२९- ‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप
३०- भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले
३१- पंकज अडवाणीला कांस्यपदक
३२- अनफिट, कुचकामी खेळाडू पाक संघात नकोच!
३३- रिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व 'कांस्य' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 

हे दोन्ही नंबर Add करा 

========================================

रिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व 'कांस्य'



  • रिओ दि जानेरो, दि. १० -  रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे.  मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंच उडी प्रकारात 'सुवर्ण' पदक पटकावले आहे. तर याच प्रकारात तिस-या आलेल्या वरूण सिंग भाटी याने कांस्यपदक पटकावले आहे.
    मरियप्पन व वरूणच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 
    पॅरालिम्पिकच्या उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी मारत सुवर्ण पदक पटकावणा-या मयप्पनने ऐतिहासिक कामगिरी केली असून उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रकारात सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जाणा अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला मात्र 'रौप्य' पदकावक समाधाना मानावे लागले. महत्वाची बाब म्हणजे याच क्रीडा प्रकारात तिस-या स्थानावर राहून 'कांस्य' पदक पटकावणाराही एक भारतीयच असून खेळाडू वरूण भाटी याने १.८६ मीटर उंच उडी मारली.
    दरम्यान पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणा-या खेळाडूला ७५ लाख, रौप्य जिंकणा-याला ५० तर कांस्य पदक जिंकणा-याला ३० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केले होते.
========================================

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार

  • First Published :10-September-2016 : 07:05:00Last Updated at: 10-September-2016 : 11:09:56

  • ऑनलाइन लोकमत
    लोणावळा, दि. १० - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सँट्रो कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ रात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला.
     मृतांमध्ये मुंबई पोलीसचे  कर्मचारी राजेंद्र विष्णु चव्हाण (बक्कल नं. ३२१८१) यांचा व त्यांची पत्नी वनीता चव्हाण, शंकर मारुती वेणगुळे, पुजा वेणगुळे (सर्व राहणार मुंबई) यांचा समावेश आहे.
    खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेली सँट्रो कार क्र. (एमएच ०४ बी डब्लू ०२२९) ही चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच ०६ ऄ क्यु ७५१७) ला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की सँट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने  आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के हे महामार्गावरील विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी सदर अपघात पाहिला, त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी बोलवले खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार अनंता पवार, हवालदार उदय पवार, मारुती शेंडगे, दिलीप कुरंदळे, मायकल सपकाळ व आयआरबीचे पेट्रोलिंग कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या टिमचे सहकारी यांनी सदर सँट्रो कार कंटेनरच्या खालून बाहेर काढत मयतांना गाडीतून बाहेर काढले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.
========================================

विमानात 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'च्या वापरावर बंदी

  • First Published :09-September-2016 : 19:15:00Last Updated at: 09-September-2016 : 22:22:18

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ९- विमान प्रवासात सॅमसंग गॅलेक्सी नोट सेव्हन या स्मार्टफोनच्या वापरावर भारत सरकारने बंदी आणली आहे. मागील काही दिवसांपासून या फोनच्या बॅटरीमुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
    प्रवाशांना हा फोन हँडबॅगमध्येच ठेवता येईल व संपूर्ण प्रवासभर तो बंद (स्वीचड् आॅफ) करून ठेवावा लागेल, अशी माहिती नागरी उड्डयन विभागाचे महासंचालक बी. एस.भुल्लर यांनी दिली. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा आदेश ताबडतोब लागू करण्यात आल्याचे भुल्लर म्हणाले.
    सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 या फोनच्या बॅटरीमध्ये त्रुटी असल्याचं समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच सॅमसंग कंपनीने जगभरातून नोट 7 हे फोन परत मागवले आहेत. तसेच कंपनीने या फोनची विक्री सुद्धा थांबवली आहे. अमेरिकेच्या फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या संदर्भात गुरूवारी आदेश दिल्यानंतर लगेचच भारतानेही वरील आदेश जारी केला. 
    या फोनबाबात नुकत्याच घडलेल्या काही घटना आणि सॅमसंगने कंपनीने गॅलॅक्सी नोट सेव्हन फोनबद्दल व्यक्त केलेल्या काळजीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने प्रवाशांना विमानात हा फोन सुरू करू नये किंवा तो चार्जिंगला लावू नये , तसेच तपासणी झालेल्या बॅगांमध्ये त्यांना ठेवू नये, असे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. 

========================================

बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू

  • First Published :10-September-2016 : 06:40:19

  • ऑनलाइन लोकमत
    इराक, दि. 10 - बगदाद शहर दोन आत्मघाती बॉम्बस्फोटानं पुन्हा एकदा हादरलं आहे. बगदादजवळच असलेल्या नखील या मॉलजवळ दोन कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात  28हून अधिक लोक जखमी आहेत.
    पहिला बॉम्बस्फोट कार पार्किंग केलेल्या परिसरात झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट हा नखील मॉलजवळील स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीतून आलेल्या आत्मघाती हल्लेखोरानं घडवून आणला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी मध्य बगदादमधल्या पॅलेस्टाइन रस्त्यावर हा मॉल सुरू करण्यात आला आहे. ईद अल-अधा जवळ आल्यानं वीकेंडच्या दिवशीही हा मॉल सुरू ठेवण्यात आला होता. या मॉलला अनेक मजले असून, प्रत्येक मजल्या दुकानं आहेत. या मॉलमध्ये शहरातला प्रसिद्ध सिनेमागृहही आहे, अशी माहिती इंटिरियर मंत्रालयानं दिली आहे.
    या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस)नं स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यातच बगदादमधल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात 300 जण ठार झाले होते.
========================================

बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू

  • First Published :10-September-2016 : 06:40:19

  • ऑनलाइन लोकमत
    इराक, दि. 10 - बगदाद शहर दोन आत्मघाती बॉम्बस्फोटानं पुन्हा एकदा हादरलं आहे. बगदादजवळच असलेल्या नखील या मॉलजवळ दोन कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात  28हून अधिक लोक जखमी आहेत.
    पहिला बॉम्बस्फोट कार पार्किंग केलेल्या परिसरात झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट हा नखील मॉलजवळील स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीतून आलेल्या आत्मघाती हल्लेखोरानं घडवून आणला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी मध्य बगदादमधल्या पॅलेस्टाइन रस्त्यावर हा मॉल सुरू करण्यात आला आहे. ईद अल-अधा जवळ आल्यानं वीकेंडच्या दिवशीही हा मॉल सुरू ठेवण्यात आला होता. या मॉलला अनेक मजले असून, प्रत्येक मजल्या दुकानं आहेत. या मॉलमध्ये शहरातला प्रसिद्ध सिनेमागृहही आहे, अशी माहिती इंटिरियर मंत्रालयानं दिली आहे.
    या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस)नं स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यातच बगदादमधल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात 300 जण ठार झाले होते.
========================================

उत्तर कोरियाचा जगभर ‘अणु’कंप

  • First Published :10-September-2016 : 06:10:34

  • सोल : उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केल्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, जागतिक शेअर बाजारांवरही त्याचा परिणाम झाला; आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव खाली आले. भारतात सेन्सेक्स, निफ्टी, सोने, चांदी, रुपये हे सारे घसरल्यामुळे बाजारपेठेत अस्वस्थता होती. आमच्या अणुशास्त्रज्ञांनी नव्याने विकसित केलेल्या शस्त्राचा देशाच्या उत्तरेकडील अणुचाचणी ठिकाणी स्फोट घडविला, अशी घोषणा उत्तर कोरियाच्या दूरचित्रवाणीवरून करण्यात आली. ही चाचणी उत्तर कोरियाची सर्वांत मोठी म्हणजे १० किलो टन एवढी आहे.
    उत्तर कोरियाने केलेल्या या अणुचाचणीची क्षमता ५.३ तीव्रतेच्या भूकंपाएवढी होती. हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या १५ किलो टन अणुबॉम्बपेक्षा किंचित कमी ही चाचणी होती, असे साऊथ मेटेओरोलॉजिकलचे किम नाम-वूक यांनी म्हटले. या चाचणीमुळे जगाच्या अनेक भागांत भूकंपाप्रमाणे लहान-मोठे धक्के जाणवले. चीनसह जगातील जवळपास सर्व राष्ट्रांनी उत्तर कोरियाच्या या अणुचाचणीचा कडक शब्दांत निषेध केला असून, यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र आहे.
    अमेरिकेने या चाचणीनंतर उत्तर कोरियाला गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे.

========================================

९/११ हल्ल्यातील पीडित सौदी अरेबिया विरुद्ध खटला दाखल करणार ?

  • First Published :09-September-2016 : 22:55:30

  • ऑनलाइन लोकमत 
    वॉशिंग्टन, दि. ९ - अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडित व त्यांच्या कुटुंबियांना थेट सौदी अरेबिया सरकारविरुद्ध खटला दाखल करण्याची परवानगी देणा-या विधेयकाला अमेरिकन प्रतिनिधीगृहाने शुक्रवारी मंजुरी दिली. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर पीडितांना सौदी अरेबिया सरकार विरुद्ध नुकसानभरपाईचा दावा ठोकण्याचा अधिकार मिळणार आहे.  
    अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा अशा प्रकारच्या विधेयकाला विरोध असून, या विधेयकाचा मार्ग रोखण्यासाठी ते विशेषाधिकार विटोचा वापर करु शकतात. अमेरिकन प्रतिनिधीगृहाने आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर केले. 
    सौदी अरेबियाने या विधेयकाला जोरदार विरोध केला असून, या विधेयकावरुन अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या संबंध बिघडले आहेत. ९/११ दहशतवादी हल्ल्यातील १९ पैकी १५ अतिरेकी सौदी अरेबियाचे नागरीक होते. 

========================================

आल्प्स पर्वतामध्ये केबल कार बिघडली, पर्यटकांची दुस-यादिवशी सुटका

  • First Published :09-September-2016 : 17:25:00Last Updated at: 09-September-2016 : 19:43:03

  • ऑनलाइन लोकमत 
    चामोनिक्स, दि. ९ - फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरागांमध्ये मॉन्ट ब्लान्क येथे केबल कारमध्ये अचानक बिघाड झाल्याने ४५ पर्यटकांना संपूर्ण रात्र केबल कारमध्ये काढावी लागली. चामोनिक्स येथील माऊंटन रेसक्यू टीमने हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर शुक्रवारी सकाळी या ४५ पर्यटकांची सुटाका झाली. 
    गुरुवारी संध्याकाळी ३६०० मीटर उंचीवर असताना कारवाहून नेणा-या केबल्समध्ये बिघाड झाला. संध्याकाळीच बचावमोहिम सुरु झाल्यानंतर गुरुवारी रात्रीपर्यंत ६५ जणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर रात्रीचा अंधार आणि हॅलिकॉप्टरसाठी उड्डाणयोग्य वातावरण नसल्याने बचाव मोहिम थांबवावी लागली. 
    त्यामुळे ४५ पर्यटकांना संपूर्ण रात्र केबल कारमध्ये काढावी लागली. जे नागरीक अडकले होते त्यांच्या ब्लँकेट, पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली होती. आल्पसमध्ये रात्रीच्यावेळी पार गोठवून टाकणारी थंडी असते. 

========================================

‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

  • First Published :10-September-2016 : 06:10:34

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटला हटके असा ‘दिलस्कूप’ फटक्याची भेट देणारा आणि श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला. मात्र, यावेळी संघसहकाऱ्यांनी गार्ड आॅफ आॅनर सादर करत दिलशानला भावूक निरोप दिला.आॅस्टे्रलियाविरुध्द शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात जेव्हा दिलशान फलंदाजीला उतरला तेव्हा, श्रीलंकाई खेळाडूंनी बॅट हवेत उंचावून दिलशानला ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. मात्र, दिलशानची अखेरची खेळी अपयशी ठरली. आपल्या अखेरच्या खेळीत ३ चेंडूत केवळ एक धावा काढण्यात दिलशानला यश आले. जॉन हेस्टिग्सच्या चेंडूवर डेव्हीड वॉर्नरकडे झेल देऊन दिलशान माघारी परतला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हटके आणि आकर्षक असा ‘दिलस्कूप’ शॉटचा जन्मदाता असलेल्या दिलशानचा हा ४९७ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. १९९९ साली सनथ जयसूर्याच्या नेतृत्त्वाखाली दिलशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.दिलशानने मार्च २०१३ साली कोलंबो येथे बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. तसेच, नुकताच २८ आॅगस्टला दाम्बुला येथे आॅस्टे्रलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.
    दिलशानने ८७ कसोटी सामन्यांत ५४९२ धावा काढल्या असून ३३० एकदिवसीय सामन्यांत १० हजार २९० धावा केल्या आहेत. तर, ८० टी२० सामने खेळताना त्याने १८८९ धावा काढल्या आहेत.

========================================

आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय

  • First Published :10-September-2016 : 06:10:34

  • कोलोंबो : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले. यासह आॅस्टे्रलियाने टी२० मालिकेत २-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे, कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या तिलकरत्ने दिलशानला विजयी निरोप देण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला.
    गतसामन्यात विक्रमी नाबाद शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवताना २९ चेंडूत ७ चौकार आणि चार षटकारांसह ६६ धावांची वेगवान खेळी केली. शिवाय कर्णधार डेव्हीड वॉर्नरनेही २४ चेंडूत २५ धावांची खेळी करुन मॅक्सवेलसह ९३ धावांची दमदार सलामी दिली. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य आॅस्टे्रलियाने १७.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यातही मॅक्सवेलने विक्रमी खेळी करताना १८ चेंडूत अर्धशतक पुर्ण करुन आॅस्टे्रलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने गेल्या सामन्यातील स्वत:चाच १९ चेंडूत अर्धशतकाचा विक्रमही मागे टाकला. 
========================================

अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे

  • First Published :10-September-2016 : 06:10:34

  • मुंबई : उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचणीचे धक्के आज जगभरातील शेअर बाजारांना बसले. आशियाई बाजारांबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २४८ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ८६ अंकांनी खाली आला.
    व्यापक बाजारही घसरणीपासून दूर राहू शकला नाही. बीएसई मीडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 0.९९ टक्के आणि 0.४७ टक्के
    घसरले. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स २६५.१४ अंकांनी म्हणजेच 0.९२ टक्क्यांनी वाढला. या आठवड्यात निफ्टीही ५७.0५ अंकांनी म्हणजेच 0.६४ टक्क्यांनी वाढला.
    ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर तो खाली
    आला. सत्राच्या अखेरीस २४८.0३ अंकांनी अथवा 0.८५ टक्क्यांनी घसरून तो २८,७९७.२५ अंकांवर
    ५बंद झाला. ५0 कंपन्यांचा
    समावेश असलेला निफ्टी ८५.८0 अंकांनी अथवा 0.९६ टक्क्यांनी घसरून ८,८६६.७0 अंकांवर बंद झाला.

========================================

शांती सेनेसमोर अनेक नवी आव्हाने

  • First Published :10-September-2016 : 06:10:34Last Updated at: 10-September-2016 : 05:53:26

  • सुरेश भटेवरा,
    नवी दिल्ली- जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्र शांती सेना अत्यावश्यकच आहे मात्र बदलत्या काळात विविध देशात शांती सेनेच्या प्रयत्नांमधे अडथळे निर्माण करण्याचे काम दहशतवाद्यांचे काही सशस्त्र गट व निवडक नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स करीत आहेत. माणुसकीच्या भावनेने जागतिक शांततेसाठी कार्यरत असलेल्या शांती सेनेपुढे त्यामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. यजमान देशाने शांती सेनेच्या कार्यात केवळ मदतच नव्हे, तर या सेनेच्या मिशनशी सूसूत्रता राखणेही आवश्यक आहे. अन्यथा त्यातून नवी संकटे निर्माण होतील. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने त्यात लक्ष घालावे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी लंडन येथे आयोजित जागतिक शांती सेना परिषदेत केले.
    संघाने ७0 वर्षात विविध देशात शांती सेना पाठवण्याच्या ज्या ७१ मोहिमा आखल्या त्यापैकी ५0 मोहिमांमधे भारतीय जवान सहभागी होते. इतकेच नव्हे, तर शांती सेनेतल्या २ लाख ३0 हजार भारतीय जवानांनी जागतिक शांततेसाठी चालवलेल्या मोहिमांमधे स्वत:च्या प्राणांचे बलिदानही दिले, याचा आवर्जून उल्लेख करीत डॉ. भामरे म्हणाले, न्यूयॉर्क येथील राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान मोदींनी वचन दिल्यानुसार भारत यापुढेही शांती सेनेच्या मोहिमांमधे अग्रक्रमाने सहभागी होईल. तसेच शांती सेनेत सहभागी अन्य देशातल्या अधिकारी व जवानांना बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षणही भारतीय तळांवर दिले जाईल. भारतात ३५ देशातले ११४ शांती सैनिक सध्या प्रशिक्षण घेत आहेत.

========================================

No comments: