Tuesday, 13 September 2016

नमस्कार लाईव्ह १३-०४-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अॅपलची खास भेट, सुपर मारियो नव्या रुपात भेटीला 
२- ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार
३- दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड
४- बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट
५- वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
६- कधी होता मेकॅनिक, आज जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये आहेत 22 फ्लॅट
७- दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर
८- इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
९- 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार 
१०- जीएसटी एप्रिलपासूनच
११- एप्रिल-आॅगस्टमध्ये वाढली करवसुली!
१२- वीस लाख टन डाळींचा राखीव साठा करणार
१३- फेडरलमुळे सेन्सेक्स आपटला
१४- दुकानदारांना बसणार चाप
१५- छत्रपती व सरखेलांच्या आरमारी इतिहासाचा विचार आजही अनिवार्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- जीन्स, स्कर्ट घालणाऱ्या मुलींना अंधेरीच्या राजाचं दर्शन नाही, मंडळाचा फतवा 
१७- मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: आंबेडकर 
१८- मराठा समाजाच्या मागण्यांशी मुख्यमंत्री सहमत, रावसाहेब दानवेंची माहिती 
१९- विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेने उधळली 
२०- मराठा मोर्चे हे दलितविरोधी नाहीत : विनायक मेटे 
२१- ...म्हणून अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची मागणी? 
२२- अधिकाऱ्यांवर १० वर्षांनी घोटाळ्याचे आरोपपत्र
२३- बांधकाम तिवरांपासून केवळ तीन फुटांवर
२४- अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा
२५- विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक
२६- शिल्पा शेट्टीच्या काकांकडूनही तिवरांची कत्तल
२७- आज‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’
२८- डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल - मुख्यमंत्री फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२९- ... तर महाडची दुर्घटना टळली असती - नितिन गडकरी 
३०- तुफान पावसाने विदर्भ ओलाचिंब, गोंदिया, गडचिरोलीत मुसळधार 
३१- लखनऊ: सवतीसाठी संपूर्ण कुटुंबालाच संपवलं 
३२- नाशिक; आजीचा खून करुन शवाची केली शेकोटी 
३३- बंगळूरू; कुत्र्याचा राग करणा-या मुलाशी लग्नास नकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- खिलाडी कुमारच्या खांद्यावर 'टिना'चा टॅटू! 
३५- सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर
३६- भारताविरुद्ध बलाढ्य स्पेनचे आगमन
३७- रोहित शर्माचे स्थान कायम : अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
३७- इच्छामरणाची ही वेळ नव्हे!
३८- बिन्नीचे शतक हुकले; इंडिया रेड सर्व बाद ३५६
३९- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यापेक्षा पॅरालिम्पिक धावपटू अधिक 'वेगवान' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

============================================

जीन्स, स्कर्ट घालणाऱ्या मुलींना अंधेरीच्या राजाचं दर्शन नाही, मंडळाचा फतवा

जीन्स, स्कर्ट घालणाऱ्या मुलींना अंधेरीच्या राजाचं दर्शन नाही, मंडळाचा फतवा
मुंबईः महिलांनी शनिशिंगणापूर आणि महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवला खरा मात्र मुंबईतील अंधेरीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी महिलांवर बंधन घालण्यात आली आहेत. मंडळाकून महिलांना जीन्स, स्कर्ट परिधान करून बाप्पाचं दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धेचा पोशाखाशी काय संबंध, असा प्रश्न भाविक विचारत आहेत.

असा आहे मंडळाचा अजब फतवा
अंधेरीच्या राजाच्या कमानीबाहेर जीन्स आणि स्कर्ट घालून येणाऱ्या महिला, मुलींना बंदी असल्याचा बोर्डच लावला आहे. हा बोर्ड सध्या मुंबईत चर्चेचा विषय बनलाय. कारण इथं बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर महिलांनी जीन्स, शॉर्ट स्कर्ट आणि तत्सम पोशाख करुन चालणार नाही. तर किमान सलवार कमीज, साडी अशा वेशातच बाप्पासमोर यावं लागणार आहे.

============================================

मराठा समाजाच्या मागण्यांशी मुख्यमंत्री सहमत, रावसाहेब दानवेंची माहिती

मराठा समाजाच्या मागण्यांशी मुख्यमंत्री सहमत, रावसाहेब दानवेंची माहिती
मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांशी मुख्यमंत्री सहमत असून, मागण्यांना विरोध नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘वर्षा’वरील बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. शिवाय, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात शांततेने निघणाऱ्या मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे अभिनंदनही केले.

गेल्या एक महिन्यापासून राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या विराट मोर्चांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं झाली. यावेळी आमदार, खासदार, समाजातील काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते.

“मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मराठा समाजाच्या मोर्चांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांततेने निघणाऱ्या मोर्चांचे अभिनंदन केले आणि मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमती दर्शवली. शिवाय, या मागण्यांबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचंही सांगितलं.”, अशी माहिती रावसाहेब दानवेंनी बैठकीनंतर दिली.

आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपनं सावधपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे.


============================================

मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: आंबेडकर

मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: आंबेडकर
नवी दिल्ली: “मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, असे मोर्चे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक होतील. मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरु आहे”, असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर निशाणा साधला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
कोपर्डी बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.
मराठा मोर्चाचं स्वागत, दलितांचे प्रतिमोर्चे नकोत
ते म्हणाले, “मराठा मोर्चा त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करतोय, याचं मी स्वागत करतो. मराठा मोर्चा दलितविरोधी हा संघाकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीच आरोपींना पकडून दिलं. मात्र संघाने याप्रकरणी राजकारण सुरु केलं असून काही लोकांना हाताशी धरुन प्रतिमोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. असे मोर्चे निघू नयेत या मताचा मी आहे. तसेच जे मोर्चे काढतील, ते संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले झालेले असतील”, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
सहकार क्षेत्रातील चौकशांमुळे मोर्चा?
सरकराने सहकारातल्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याची धग अनेकांना जाणवू लागली आहे. १५९ कुटुंबांच्या हातात सगळा सहकार आहे. इतर मराठ्यांना त्यात येण्याची मुभा नाही.

============================================

विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेने उधळली

विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेने उधळली
मुंबई: विदर्भवाद्यांची मुंबईतील पत्रकार परिषद मनसेने उधळली. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला.
विदर्भवादी नेत्यांनी आज मुंबई पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र त्याठिकाणी अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत मनसेने गोंधळ घातला.
त्यामुळं विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली.
हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे, त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळणं यात काहीही गैर नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, मनसेच्या राड्यानंतर काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.

============================================

तुफान पावसाने विदर्भ ओलाचिंब, गोंदिया, गडचिरोलीत मुसळधार

तुफान पावसाने विदर्भ ओलाचिंब, गोंदिया, गडचिरोलीत मुसळधार
नागपूरः पावसाने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विदर्भात पूर्वेकडून पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार बरसल्यानंतर गोंदियातही धुवाधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नागपूरकरांनाही पावसाचा फटका बसला आहे.

विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पाऊस झाला. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पावसाने पश्चिम विदर्भाकडे कूच केल्याचे संकेत आहेत यवतमाळमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर रिमझिम पावासाने हजेरी लावली. वाशिमसह अन्य जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

पावसाने जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त दिवस ओढ दिली आहे. पिकांना वाचवण्यासाठी सध्या पावसाची तीव्र गरज असल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

============================================

मराठा मोर्चे हे दलितविरोधी नाहीत : विनायक मेटे

मराठा मोर्चे हे दलितविरोधी नाहीत : विनायक मेटे
पुणे : मराठा समाजाचे मोर्चे हे दलितविरोधी नाहीत. त्यामुळे दलितांनी प्रतीमोर्चे काढू नये, असं आवाहन शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.
नांदेडसह अनेक जिल्ह्यात दलित संघटनांनी प्रतिमोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासंदर्भात विनायक मेटे आज पुण्यात बोलत होते.
“मराठा समाजाचा मोर्चा हा कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा नाही. तसंच हे मोर्चे राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चे आहेत, असं भाष्य करणारे चुकीचे आहेत. हे मोर्चे दलितांविरोधात असल्याचा सूर माध्यमांमध्ये आहे, पण तो बरोबर नाही,” असं मेटे यांनी सांगितलं.
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत बोलताना विनायक मेटे म्हणाले की, “एखाद्या कायद्याचा जाच होत असेल, तर त्यावर बोलण्याचा हक्क खुद्द घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनीच दिला आहे.”
तसंच मराठा समाजाचे मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत, असं मत मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचं विनायक मेटेंनी अभिनंदन करुन आभार मानले.

============================================

...म्हणून अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची मागणी?

स्पेशल रिपोर्ट : ...म्हणून अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची मागणी?
उस्मानाबाद: अॅट्रॉसिटी कायद्यामुळं गावा-गावात तणाव नाही, पण टोकाचे वाद आहेत. एका खुल्या जागेच्या वादातून अॅट्रॉसिटीपर्यंत प्रकरण गेल्यामुळं उस्मानाबादच्या अंबेजवळग्यात जाधव आणि कांबळे कुटुंब 25 वर्षापासून इरेला पेटलंय. त्यामुळंच अॅट्रॉसिटीत बदल करण्याचा मुद्दा कळीचा ठरतोय
उस्मानाबादच्या मराठा मोर्चात अजिनाथ जाधव हिरिरीनं सहभागी झाले. किडनीचं ऑपरेशन झाल्यावरही पायी ३ किलोमीटर चालत गेले. त्याचं कारण म्हणजे 50 बाय 30 ची खुली जागा.
पुण्याला स्थलांतरीत झालेल्या शिरीष कुलकर्णींनी ही जागा 1992 साली जाधवांना 3 हजारात विकली. जागेची रजिस्ट्री जाधवांच्या नावे आहे. पण जाधवांच्या आधी कुलकर्ण्यांनी कांबळेंशी जागा खरेदीची बोलणी केल्याचा कांबळेंचा दावा आहे.

============================================

सवतीसाठी संपूर्ण कुटुंबालाच संपवलं

सवतीसाठी संपूर्ण कुटुंबालाच संपवलं
लखनऊ: काही दिवसांपूर्वी ठाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली होती. एका तरुणाने शेअर बाजारातील नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबीयांना संपवले होते. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. पण या घटनेतील प्रमुख आरोपीला सवत आणायची होती, पण त्याला पहिल्या पत्नीकडून परवानगी न मिळाल्याने त्याने पत्नीसह आपल्या तीन मुलांची हत्या केली.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये बरेलीच्या तिहरा गांवात ही घटना घडली. सुच्चा सिंह असे या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या विवाहाला परवानगी मिळावी, यासाठी तो आपल्या पत्नीसोबत सतत भांडत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुच्चाचे आपली पत्नी जसप्रीतसोबत याच विषयावरून कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्याभरात त्याने तलावारीने आपल्या पत्नीसोबत 14 आणि 10 वर्षीय मुलांचा आणि 12 वर्षांच्या मुलीची हत्या केली.

============================================

अॅपलची खास भेट, सुपर मारियो नव्या रुपात भेटीला

अॅपलची खास भेट, सुपर मारियो नव्या रुपात भेटीला
मुंबई : आयफोन 7 आणि अॅपलचं स्मार्टवॉच 2 याशिवाय आणखी एक गोष्ट सध्या अॅपल यूझर्सना खुणावत आहे. तुमचा-आमचा लहानपणीचा सोबती असलेला सुपर मारियो. हा गेम आयओएस 10 मध्ये एका नवीन अवतारात भेटीला येणार आहे.

सुपर मारियो रन या नावाने लाँच झालेला हा गेम सध्या फक्त आयफोन यूझर्सनाच उपलब्ध आहे. आयफोन 7 च्या लाँचवेळीच याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अँड्रॉईड यूझर्सनाही हा गेम लवकरच उपलब्ध होईल, असं निनटेंडो कंपनीने जाहीर केलं आहे. मात्र प्ले स्टोअरमध्ये तो कधी येणार, याची माहिती नाही.

आयफोन 8 पुढच्या वर्षी
आयफोन 7 लाँच होतो, तोच आयफोन 8 बाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन 8 पुढच्या वर्षी युझर्सच्या भेटीला येणार आहे. 2017 च्या अखेरीस आयफोनची पुढची आवृत्ती येईल.

============================================

खिलाडी कुमारच्या खांद्यावर 'टिना'चा टॅटू!

खिलाडी कुमारच्या खांद्यावर 'टिना'चा टॅटू!
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चांगला अभिनेता तर आहेच, पण तो उत्तम पती आणि वडीलही आहे. याचा पुरावा म्हणजे अक्षयचा नवा टॅटू. अक्षयने नुकताच पत्नी ट्विंकलच्या नावाचा टॅटू केला आहे.
अक्षयने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अक्षयच्या खांद्यावर टिना नाव कोरल्याचं दिसत आहे. टिना हे ट्विंटकलचं टोपण नाव आहे.

============================================

No comments: