[अंतरराष्ट्रीय]
१- पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल
२- काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण - नवाझ शरीफ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- काश्मीरमधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार : अमित शाह
४- मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी
५- 'मोदींच्या पाकवरील टीकेत नावीन्य नाही'- कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते डी. राजा
६- केरळ- समाजातील कमी वर्गाचा विकास केला पाहिजे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
७- केरळ- समाजातील कोणताही भाग आमच्यासाठी अस्पृश्य नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
८- नवी दिल्ली- दहशतवादाला संपवण्यात केंद्र सरकार अपयशी- मायावती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे: मुख्यमंत्री
१०- नाशिक- छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला मोर्चा
११- पुणे-मराठा मोर्चामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंसह, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,उदयनराजे भोसले, भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- पुण्यात लाखोंच्या जनसमुदायात मराठा मोर्चाची सांगता
१३- दिल्ली- माजी आमदार भरत सिंह यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी देवाला अटक
१४- अकोला; एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर
१५- नागपूर; कॅन्सरग्रस्त चिमुकले वेदना घेऊनच परतले घरी
१६- सोलापूर- मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागांत शिरलं पाणी
१७- रत्नागिरी- परशुराम घाटात दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
१८- बीड : अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेले दोन तरुण बुडाले
१९- अकोला: व्याळा येथील शेतकऱ्याची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या
२०- सिंधुदुर्ग :वैभववाडी-लोरे येथील शिवगंगा नदीवरील पुलावर अजुनही पाणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- कानपूर कसोटीवर भारताची पकड, न्यूझीलंडसमोर 434 धावांचं आव्हान
२२- सानिया-बार्बराने जिंकले जेतेपद
२३- धोनीने घेतली सुपरस्टार रजनीकांतची भेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
-----------------------------------------------------------

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे: मुख्यमंत्री
नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चे बलिदान दिले. राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली.
ते पुढे म्हणाले की, ”सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्र्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.”
-----------------------------------------------------------
काश्मीरमधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार : अमित शाह
कोळीकोड : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केरळच्या कोळीकोडमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचं सुतोवाच केलं. कोळीकोडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील शेवटच्या दिवशी अमित शाहनी नेत्यांशी संवाद साधला.
“काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून तोडू शकत नाही,” अमित शाह यांनी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केलं.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भाषणातून दहशतवादाचं समर्थन
“पाकिस्तान आज राष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारत बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या दहशतवादाला बळी पडलेला आहे. गेल्या दीड दशकात आम्ही अनेक छोटे-मोठे दहशतवादी हल्ले झेलले आहेत. नुकताच काश्मीरमधील उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावण्यासाठी पाकिस्तान नेहमीच खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचं संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावरुन ते दहशतवादाचं समर्थन करत असल्याचं सिद्ध होत आहे,” असं अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले.
-----------------------------------------------------------
पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल
नवी दिल्ली: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण बैठकीसाठी काल रात्री उशीरा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या. सुषमा स्वराज राष्ट्र संघात भारताचं प्रतिनिधित्व करत असून संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारणा बैठकीला संबोधित करणार आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मगरीचे अश्रू ढाळताना, संयुक्त राष्ट्र संघासमोर जगाची दिशाभूल केली होती. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या दहशतवादाच्या फॅक्टरीचं सत्य जगासमोर उघडे पाडणार आहेत. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, रशिया आणि चीन आदी स्थायी सदस्य देशांसमोर पाकिस्ताच्या कुकर्माचे पुरावे सादर करणार आहेत.
उरी हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून जे पुरावे हस्तगत झाले, त्यातून यामागे पाकिस्तानचा या हल्ल्यामागे हात असल्याचे समोर आले. दहशतवाद्यांकडून भारताचा नकाशा, जीपीएस उपकरण आणि पाकिस्तानच्या सैन्य दलाकडून वापरण्यात येणारे मोबाईल सेटही जप्त करण्यात होते. यासंबंधी सर्व माहिती भारताकडून संयुक्त राष्ट्र संघाला देण्यात येईल.
संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी काश्मीरविरोधातील गरळ ओकताना, दहशतवादी बुरहान वानीला याला काश्मीरचा नेता म्हटलं होतं. इतकेच नव्हे, तर भारतीय सैन्य काश्मीरमधील जनतेवर अनन्वित अत्याचार करत असल्याचं सांगून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
-----------------------------------------------------------
मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी
- ऑनलाइन लोकमतकेरळ, दि. 25 - मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका, असं वक्तव्य करून मतांसाठी मुस्लिमांना चुचकारणा-या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. समाजामध्ये एकात्मतेची भावना असली पाहिजे. भारत 125 कोटींची लोकवस्ती असलेला देश आहे. या तरुण देशाचे स्वप्न आणि संकल्पही तरुण असले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत. केरळमधल्या कोझिकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. जनसंघानं दीनदयाल उपाध्याय यांना अध्यक्ष बनवले होते. त्यांनी मुस्लिम जनतेला नेहमीच आपलं मानलं, असंही ते म्हणाले आहेत.
-----------------------------------------------------------
एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर !
- ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - नागरिकांना २४ तास पैसे काढण्याची सोय म्हणून शहरात सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एटीएम उभारले आहेत. शहरातील जवळपास सर्वच एटीएमला कोणतीच सुरक्षा नसल्याने या एटीएम मशिन रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या काचा, बंद पडलेली वातानुकूलन यंत्रणा, सुरक्षारक्षकांचा अभाव यामुळे एटीएमची सुरक्षा धोक्यात आहे.एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी ठरावीक वेळा व्यवहार केल्यानंतर पुढील व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाते. ज्या अर्थी या बँकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाते, त्याअर्थी बँकेने सुसज्ज एटीएम सेंटर उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा बंद पडलेली असते. एटीएममध्ये जाण्यासही काही महिला धजावत नाहीत. अशा सेंटरवर पुरेपूर सुरक्षायंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच अनेक एटीएम सेंटरमध्ये आगप्रतिबंधात्मक यंत्रणाही नाही. आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची सूचना देणारा भोंगा नसतो. या सर्व समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. एटीएम सेंटरवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांकडे सुरक्षेची साधने अतिशय तोकडी असतात. अनेक जणांकडे लाठीसुद्धा नसते. त्यामुळे समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास या सुरक्षारक्षकांकडून काहीच प्रतिकार होणार नाही. बचावासाठी त्यांच्याकडे साधन नसल्यास त्यांना गंभीर इजा अथवा जीव गमवावा लागेल. त्यामुळे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तैनात असणे आवश्यक असते.
-----------------------------------------------------------
काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण
- लंडन : उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा दावा करताना काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेले गोळीबार, त्यात अनेकांचे झालेले मृत्यू, जखमींची संख्या हजारांच्या घरात असणे, कैक लोकांना अंधत्व येणे यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच उरी हल्ला झाला असावा, अशा शब्दांत उलट्या बोंबा मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे.
-----------------------------------------------------------
'मोदींच्या पाकवरील टीकेत नावीन्य नाही'- कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते डी. राजा
| |
- - वृत्तसंस्था
रविवार, 25 सप्टेंबर 2016 - 05:09 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=LBF3Au
| |
नवी दिल्ली - उरी येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोझिकोडे येथील भाषणातून पाकिस्तानवर केलेल्या टीकेत काहीही नाविन्य नसल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते डी. राजा यांनी केली आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना राजा म्हणाले, "पंतप्रधानांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नव्हता. हल्ल्यानंतरही ते नेहमीच्याच भाषेत बोलत आहेत. त्यांच्या भाषणात नवीन काय होते? तर काहीच नाही. ते नेहमीप्रमाणे एखाद्या जाहीर सभेत बोलत असल्याप्रमाणे बोलले. मला त्यात काहीही नवीन वाटले नाही.‘ तसेच "कदाचित सरकार आणि पंतप्रधानांचे याबाबत काही वेगळे धोरण असेल आणि ते लोकांसमोर जाहीर करता येत नसेल‘, असेही राजा पुढे म्हणाले. "भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही सरकार या नात्याने पाकिस्तानबाबतचे धोरण आणि लोकांना त्रास सहन करावा लागत असलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत विचार करावा आणि स्पष्टता ठेवावी‘, असेही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तानकडून दहशतवादाची निर्यात होत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोझिकोडे येथील कार्यक्रमात बोलताना केली होती. तसेच सर्व दहशतवादी ओसामा बिन लादेनप्रमाणे पाकिस्तानमध्ये आश्रय घेत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

कॅन्सरग्रस्त चिमुकले वेदना घेऊनच परतले घरी
| |
-
| |
नागपूर - दोन सारख्या वयाचे चिमुकले. एक गडचिरोली, तर दुसरा भामरागड येथील. दोघांनाही एकसारखाच कॅन्सर... दोघांच्याही आयुष्याचा प्रवास कुठे थांबेल सांगता येत नाही. कोबाल्टवर "लाइट‘ घेत असल्याने त्यांच्या जगण्याचे चार क्षण वाढतात. परंतु, तीन दिवसांपासून मेडिकलच्या कॅन्सर विभागातील कोबाल्ट युनिट बंद आहे. त्यामुळे बालाजी व झनक उपचाराशिवाय परत गेले.
उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कोबाल्ट युनिट बंद असल्याने दिवसाला 80 रुग्ण परत जातात. तीन दिवसांत 250 रुग्ण वेदना घेऊनच परत गेले. विशेष असे की, कोबाल्ट युनिट कालबाह्य ठरले. परंतु, वर्षभरात अडीच हजार कॅन्सरग्रस्तांवर हे यंत्र वरदान ठरते.
अशी एक नव्हे, तर विदर्भासहित मध्य प्रदेशातून दरवर्षी शंभरावर कॅन्सरग्रस्त मुलांना जगण्याचे चार क्षण देणारी ही मशीन वर्षभरात पाच वेळा बंद पडते. कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी चार वर्षांत सात प्रस्ताव पाठवल्यानंतर पुन्हा नवीन प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात शासन भूमिका मांडते. यावरून राज्यकर्त्याना नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार करायचे नाही हे पक्के झाले आहे.
-----------------------------------------------------------
No comments:
Post a Comment