Friday, 2 September 2016

नमस्कार लाईव्ह 0२-०९-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह 0२-०९-२०१६चे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
१- पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला, ४ अतिरेकी ठार
२- पाकिस्तानच्या मर्दान शहरात २ बॉम्बस्फोट, अनेक जण जखमी 
३- प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू
४- पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद
५- न्यूझीलंडमध्ये तीव्र भूकंप
६- पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी
७- अब्दालीचे वंशज जमिनीसाठी कोर्टात
८- युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी
९- न्यूझीलंडच्या किनारपट्टीला 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
१०- दूरसंचार क्षेत्रात आता रिलायन्सची ‘जिओ’गिरी
११- देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर
१२- डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी
१३- दूरसंचार क्षेत्रात जिओमुळे भूकंप!
१४- पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच व्हिएतनाम आणि चीनच्या दौ-यावर जाणार   
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- रिक्षा संपामुळे मुंबईकरांचे हाल
१६- सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली
१७- विमानतळाजवळ इमारती किती उंचीच्या असाव्यात?
१८- जखमी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू
१९- ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
२०- छोटा राजनवर आरोप निश्‍चित
२१- कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी. 
२३- नागपूर- एका अॅब्युलन्समधून 1 टन गांजा जप्त, आरोपी पसार 
२४- बिहार- गयामध्ये सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक 
२५- उस्मानाबाद; नापिकी आणि डोक्यावरील कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने  केली आत्महत्या 
२६- नाशिक- 75 वर्षीय वृद्ध रामचंद्र तित्कार यांची गळफास घेऊन आत्महत्या 
२७- वाशिम वेगात येणा-या ट्रकने अंजनखेडा फाट्यानजीक बालकास चिरडले 
२८- लाभक्षेत्रात पाऊस पडल्यानं जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- ‘मिशन आॅलिम्पिक’साठी कोल्हापुरी बळ
३०- इंडोनेशिया ओपनसाठी एच. एस. प्रणय सज्ज
३१- ...हे तर मानसिक खच्चीकरण करण्यासारखेच
३२- मिनी आयपीएलची योजना सध्या गुंडाळली- बीसीसीआय
३३- चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला
३४- सुवर्णकन्येने गावाला झळकाविले विजेने
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

वेलिंगकरांचे काय चुकले? - उद्धव ठाकरे

  • First Published :02-September-2016 : 09:28:45

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २ - मातृभाषेसाठी लढणा-या सुभाष वेलिंगकर यांना गोव्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदावरुन हटवण्याच्या निर्णयावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करताना वेलिंगकरांचे समर्थन केले आहे. 
     
    वेलिंगकरांचे काय चुकले? त्यांचा गुन्हा तरी काय? याचे उत्तर आधी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर द्यायलाच हवे, पण मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील रिमोट कंट्रोलनेही द्यावे अशा शब्दात उद्धव यांनी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला सुनावले आहे. 
     
    मनोहर पर्रीकर हे गोव्यात विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मातृभाषेच्या संरक्षणाची मागणी केली होती. काँग्रेस सरकारकडे याच मागणीचा रेटा लावला होता व मातृभाषेच्या रक्षणासाठी वेलिंगकर यांच्या मदतीने त्यांनी आंदोलन उभे केले. त्याच भूमिकेमुळे भाजपसाठी गोव्यात सत्तेचे दार उघडले गेले; पण मराठीच्या शिड्या चढून व कोंकणीचे पायपुसणे करून जे सत्तेवर आले त्यांनी मराठीऐवजी पाद्रयांच्या शाळांना ताकद दिली असे अग्रलेखात म्हटले आहे. 
=====================================

ना स्वर्ग, ना नरक; पाकिस्तान आहे ‘स्किझोफ्रेनिक’

  • First Published :02-September-2016 : 03:00:00Last Updated at: 02-September-2016 : 09:39:36

  • - राजदीप सरदेसाई
    (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
    ‘पाकिस्तान नरक नाही’, केवळ इतकेच म्हटल्यावरुन अभिनयक्षेत्रातून राजकारणात आलेल्या रम्या या अभिनेत्रीवर राष्ट्रद्रोहाच्या खटल्यास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. खरे तर भारतीय पत्रकारांच्या दृष्टीने परदेशात राहून वार्तांकन करण्यासाठी पाकिस्तानइतका चांगला देश दुसरा कुठलाही नाही.
    १९९५ ते २००४ दरम्यान मी अनेकदा त्या देशात जाऊन आलो. प्रत्येक वेळी तिथे मला नवीन काही तरी बघायला आणि करायला मिळाले. १९९६ साली पहिल्यांदाच आमच्या पत्रकार चमूने दाऊद इब्राहीमचे कराचीतील घर शोधून काढले होते. आम्ही एमक्यूएमच्या दहशतवाद्यांनी कराची शहरात केलेल्या उच्छादाचे विशेष वार्तांकन केले होते. लष्करच्या दहशतवादी शिबिरांचे वार्तांकन तर केलेच पण आम्ही जमात-उद-दवाचे मुख्यालयदेखील शोधून काढले होते. पेशावरमधील शस्त्रांच्या बाजारातून आम्ही फिरून आलो आणि ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान हद्दीवरील ठिकाणापर्यंतही जवळजवळ जाऊन पोहोचलो. पण आमच्या व्हिसाप्रमाणे आम्हाला लाहोर आणि इस्लामाबादच्या पलीकडे जाण्याची परवानगी नसल्याने आमच्या तेथील सूत्राने अखेरच्या क्षणी आम्हाला थांबवले होते. आम्ही पाकिस्तानी समाजाच्या चांगल्या बाजू दाखवल्या, कराचीतील अब्दुल सत्तार इधी यांच्या पीस फाऊंडेशनला प्रसिद्धी दिली आणि पाकिस्तानी टीव्हीवर एक मालिका सुद्धा चालवली. तेथील पहिल्या महिला रॉक बँडमधील कलाकारांची मुलाखत घेतली आणि लाहोरच्या फूड स्ट्रीटवर एक फीचरही तयार केले. लालूप्रसाद यादव यांच्या पाकिस्तान दौऱ्यात आम्ही त्यांच्या सोबत होतो. इस्लामाबादेतील बाजारात त्या बिहारी नेत्याला बघून सगळेच दंग झाले होते. लालूंनी आपल्या मिश्कील शैलीत तिथला एक बटाटा हातात उंचावून ‘पाकिस्तानने आलू, बिहारमे लालू’ अशी कोटी केली व तिला तिथल्या गर्दीने चांगला प्रतिसादही दिला.

=====================================

प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू

  • First Published :02-September-2016 : 09:07:59

  • ऑनलाइन लोकमत 
    लीऑन, दि. २ - प्रेमात असलेल्या प्रियकर-प्रेयसीने परस्परांचे चुंबन घेणे सामान्य बाब आहे. चुंबनातून प्रेमाची भावना व्यक्त करताना ते चुंबन आपल्या जीवलगाच्या जीवावर बेतेल असा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही. पण मेक्सिकोमधील एका शहरात प्रेयसीचे चुंबन प्रियकराच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. 
     
    मेक्सिकोमध्ये रहाणा-या १७ वर्षाच्या ज्युलियो मासीयस गोनझालेझचे त्याच्या प्रेयसीने चुंबन घेतले. प्रेयसीने ज्युलियोच्या मानेचे चुंबन घेतले. पण या चुंबनामुळे ज्युलियोच्या मानेपासून डोक्यापर्यंत रक्ताच्या गुठळया तयार झाल्या. 
     
    ज्युलियो प्रेयसीला भेटून आल्यानंतर कुटुंबियांसोबत जेवण घेत असताना अचानक आकडी येऊन खाली कोसळला. कुटुंबिय त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्युलियोच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूसाठी प्रेयसीला जबाबदार धरले आहे. तिच्या चुंबनामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला असे त्यांचे म्हणणे आहे. 
=====================================

मनोरुग्ण वैमानिकाने २०० प्रवाशांचा जीव घातला धोक्यात

  • First Published :02-September-2016 : 08:21:34

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २ - विमान उड्डाणवस्थेत असताना अचानक वैमानिकाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विमानातील २०० प्रवाशांसह क्रू सदस्यांचे जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे. २८ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ या दिल्ली-पॅरिस विमान प्रवासात प्रवाशांना या धक्कादायक अनुभवातून जावे लागले. 
     
    या घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सदर वैमानिकाला मानसोपचारांची गरज असून, त्याने सहवैमानिक म्हणून सहा महिने काम करावे असा निष्कर्ष काढला आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीत या वैमानिकाची वर्तणूक तपासावी असे या समितीने म्हटले आहे. 
     
    सध्या या वैमानिकाला विश्रांती देण्यात आली असून, एअर इंडियाने या घटनेच्या तपासासाठी आणखी एक समिती नियुक्ती केली असून, ती समिती या वैमानिकाला क्लीनचीट देण्याची शक्यता आहे. २८ एप्रिलला सदर वैमानिकाने विमानातील संगणक व्यवस्थेशी छेडछाड केली आणि विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. 
     
    विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेले तर, विमान अस्थिर होते. फ्लाईट कंट्रोलकडून कुठलीही मदत मिळत नाही. मुख्य वैमानिकाने विमानाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करताच सहवैमानिकाने आक्षेप घेतला. पण त्याने सहवैमानिकाचा सल्ला धुडकावून उंची वाढवली. सुदैवाने नंतर विमान सुरक्षित उंचीवर आणल्याने धोका टळला. सहवैमानिकाने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 

=====================================

मुस्लिमांमध्ये सर्वाधिक निरक्षरता, जैन सर्वाधिक साक्षर समाज

  • First Published :02-September-2016 : 11:04:20

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २ - भारतातील विविध समाजांमध्ये मुस्लिम समाजात निरक्षरांची संख्या सर्वात जास्त असून, जैन समाज देशातील सर्वाधिक सुशिक्षित समाज असल्याची माहिती २०११ च्या जनगणनेतून समोर आली आहे. मुस्लिमांच्या १७.२२ कोटी लोकसंख्येपैकी ७.३५ कोटी लोक निरक्षर आहेत. यातील २.८२ कोटी सहावर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. 
     
    ९६.६ कोटी हिंदूंपैकी ३५.१६ कोटी हिंदू निरक्षर आहेत. ख्रिश्चनांच्या २.७८ कोटी संख्येपैकी ७१.३७ लाख निरक्षर आहेत. जैन समाजामध्ये निरक्षरांची संख्या सर्वात कमी आहे. जैन समाजाची एकूण संख्या ४४.५१ लाख असून, त्यापैकी ६.०४ लाख निरक्षर आहेत. जैनांमध्येच सर्वाधिक  ११.४२ लाख ग्रॅज्युएट आहेत. 
     
    ग्रॅज्युएशन किंवा त्यापुढे फक्त २.७६ टक्के मुस्लिम शिक्षण घेतात. ०.४४ टक्के तंत्रज्ञान किंवा अन्य डिप्लोमाची पदवी घेतात. ६.३३ टक्के मुस्लिम एसएससीपर्यंत शिकतात. सहावर्षांच्या पुढे १२.७५ कोटी हिंदू निरक्षर आहेत. ५.७७ कोटी हिंदू ग्रॅज्युएट आहेत. अन्य समाजांमध्ये ४७.५२ लाख मुस्लिम, २४.६१ लाख ख्रिश्चन, १३.३३ लाख शिख ग्रॅज्युएट आहेत. यात दिलासा देणारी बाब म्हणजे २००१ पासून सर्व समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. 
     

=====================================

बैल नसल्याने आता पोळ्याला ट्रॅक्टरांची मिरवणूक

  • लोकमत ऑनलाइन   Updated: September 01, 2016
  • नंदुरबार - जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न व अनेक अडचणींमुळे शेतकरी बैलांऐवजी मिनी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असल्याने पोळ्याला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बैलाऐवजी मिनी ट्रॅक्टर सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================

No comments: