Sunday, 4 September 2016

नमस्कार लाईव्ह 0३-०४-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारताचे व्हिएतनामला ५0 कोटी डॉलर
२- उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कारिमोव्ह यांचे निधन
३- फिलिपिन्समधील दावोस शहरात स्फोट, 10 जणांचा मृत्यू
४- दक्षिण फिलीपीन्सला भूकंपाचा धक्का 
५- पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी
६- सेक्स वर्कर म्हणणा-या वेबसाईटवर मेलेनिया ट्रम्पनी भरला खटला
७- पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला, मर्दानमध्ये बॉम्बस्फोट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू - सय्यद सलाहउद्दीन 
९- जमात-इ-इस्लामीच्या कासीम अलीला फाशी 
१०- मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल होणार 
११-  'ऍट्रॉसिटी'बाबत खास अधिवेशन बोलवा - उद्धव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- टेमघर धरण गळती प्रकरणी १० अभियंते निलंबित 
१३- रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच
१४- सेन्सेक्सचा १६ महिन्यांचा उच्चांक
१५- अर्थव्यवस्था वेगात; रोजगार मात्र जैसे थे!
१६- आर्थिक संकटांपासून भारत सुरक्षित-जेटली
१७- ‘कॅशबॅक’बाबत अटी स्पष्ट करा
१८- सी-डॅक बनविणार ‘देशी’ सुपर कॉम्प्युटर 
१९- मध्ये रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- कोकणात जाणारी लक्झरी बस दरीत कोसळली, २ ठार 
२१- पुण्यात पोलिसांवर गोळीबार 
२२- गोमांस नेत असल्याच्या संशयावरून पेटविला ट्रक 
२३- देशातील पहिले 'इनोव्हेशन हब' पुण्यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- योगेश्वरला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
२५- गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्व
२६- मेस्सीचे धडाक्यात पुनरागमन
२७- भविष्यात खूप पुढचा विचार करण्यावर विश्वास नाही - रहाणे
२८- गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व
२९- जख्मी मेस्सीला व्हेनेझुएलाविरुद्ध सामन्यात विश्रांती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===================================

काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू - सय्यद सलाहउद्दीन

  • ऑनलाइन लोकमत 
    श्रीनगर, दि. ४ - काश्मीरचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनने काश्मीर खो-यात भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू अशी धमकी दिली आहे. काश्मीरमध्ये अधिकाधिक आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षित करु जे खो-याला भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवतील अशी धमकी त्याने दिली आहे. 
    काश्मीरमध्ये जी अस्वस्थतता आहे त्याला खतपाणी घालणा-या सलाहउद्दीनने काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गाने राजकीय तोडगा काढण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. काश्मीर प्रश्नावर चर्चा निरर्थक असून,  दहशतवादाशिवाय काश्मीर प्रश्नावर तोडगा शक्य नाही असे ६९ वर्षीय सलाहउद्दीनने म्हटले आहे. 
    लक्ष्य निश्चित करुन सशस्त्र उठावानेच काश्मीरप्रश्नी तोडगा निघू शकतो. शांततमय मार्गाने तोडगा निघणार नाही हे काश्मीरी नेतृत्व, जनता आणि मुजाहिद्दीन यांना ठाऊक आहे असे सलाहउद्दीनने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पाकिस्तान व्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथील कार्यालयात त्याने ही मुलाखत दिली. 
    काश्मीरमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. खो-यातील तणाव कमी करणे हा या भेटीमागचा उद्देश आहे. पण सलाहउद्दीने चिथावणीखोर, हिंसेची धमकी दिली आहे. 
===================================

कोकणात जाणारी लक्झरी बस दरीत कोसळली, २ ठार

  • मुंबई, दि. 04 - गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना घेऊन कोकणात निघालेल्या खासगी लक्झरी बसला लांजा जवळच्या आंजनारी घाटात अपघात झाला. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. 
    या अपघातात २ जण ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त एमएच ४३ एच ७५५४ बस विशाल ट्रॅव्हल्सची आहे. विशाल ट्रॅव्हल्सची ही बस प्रवाशांना घेऊन देवगडला चालली होती. या अपघातातील जखमींना लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातामुळे आंजनारी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 
    मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. दरवर्षी कोकण रेल्वे, एसटीकडून अनेक अतिरिक्त गाडया सोडल्या जातात. पण प्रवासी संख्येसमोर या गाडया अपु-या पडत असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहने, लक्झरी बसचा पर्याय स्वीकारतात. 
    सर्व प्रवासी मुंबईचे 
    विशाल ट्रॅव्हल्सच्या अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी  सध्या मुंबईत राहतात. गणपती उत्सवासाठी ते गावी येत होते. अपघातस्थळाच्या 10 कि.मी. आधी चालक बदलला होता. त्याची झोप उडाली नसल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघात घडल्यानंतर चालक गायब झाला आहे. तो पळून गेला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.
===================================

टेमघर धरण गळती प्रकरणी १० अभियंते निलंबित

  • मुंबई, दि. ४ - टेमघर धरण गळती प्रकरणी जलसंपदा विभागाने एकाचवेळी मोठी कारवाई करत १० अभियंत्यांना निलंबित केले आहे. टेमघर धरणातून मोठया प्रमाणावर गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. 
    त्यात कंत्राटदारासह २५ अभियंते दोषी असल्याचे समोर आले. १५ अभियंते सेवानिवृत्त झाल्याने उरलेल्या १० जणांना तात्काळ निलंबित करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: जाऊन धरणाची पाहणी केली. त्यानंतर ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 
    खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने टेमघर धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडणे शक्य नसल्याने हे धरण डिसेंबर पर्यंत हे धरण दूरूस्तीसाठी रिकामे करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. 
    या धरणाची क्षमता ३.८१ टीएमसी असून सध्या धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे गळती रोखण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा कमी केला जाणार असून तो २.३१ ते २.८१ इतका पाणी साठा शिल्लक ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. टेमघर धरणातून तब्बल ६०० लिटर पाण्याची प्रतिसेकंद गळती होत आहे. सेकंदांचा हिशोब मांडला तर ते फारसे काही विशेष वाटत नाही. 
    ही गळती दिवसांमध्ये मोजल्यास एका दिवसाचे ८६,४०० सेकंद म्हणजे दिवसाला ५,१८,४०,००० याचा अर्थ दिवसाला पाच कोटी अठरा लाख चाळीस हजार लिटर पाण्याची गळती होते. एका महिन्याचा हिशेब मांडला तर एकशे पंचावन्न कोटी बावन्न लाख लिटर पाण्याची गळती होत आहे.

पुण्यात पोलिसांवर गोळीबार

  • पुणे, दि. ४ - मुंबईत दुचाकीस्वाराच्या मारहाणीत वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. जबरी चोरीचे प्रकार घडत असलेल्या पाषाण टेकडीवर गस्तीसाठी गेलेल्या दोन पोलिसांवर संशयित चोरटयांनी एअर गनमधून गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. 
    यामध्ये एका पोलिसाच्या छातीला बरगडीजवळ छर्रा लागल्याने जखम झाली आहे. तर दुसऱ्या पोलिसाच्या डोक्यात बंदुकीने मारहाण केली आहे. पोलीस हवालदार बबन मारुती गुंड, पोलीस शिपाई अमर अब्दुल शेख अशी जखमींची नावे आहेत. 
    चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुस खिंड, पाषाण येथील टेकडीवर अलिकडच्या काळात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या टेकडीवर पोलिसांची गस्त वाढवली आहे. शनिवारी रात्री  हवालदार गुंड आणि शिपाई शेख टेकडीवर गस्तीसाठी गेले होते. 
    त्यावेळी तीन तरुण जाताना पोलीसांना दिसले. संशय आल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांची अंगझडती घेताना आरोपींनी प्रतिकार केला. पळून जात असलेल्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने एअर गन काढून हवालदार गुंड यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या छातीला उजव्या बरगडीजवळ छर्रा लागल्याने जखम झाली आहे. 
===================================

No comments: