Thursday, 29 September 2016

नमस्कार लाईव्ह २९-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
२- 'सर्जिकल स्ट्राईक'चा दावा पाकिस्तानने फेटाळला 
३- पुढीलवेळी आम्ही उत्तर देऊ - पाक संरक्षणमंत्री 
४- राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली लष्करी कारवाई
५- भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात गोंधळ 
६- पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना फोनवर मिळाली धमकी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- चार तासात ३५ दहशतवादी, ९ पाकी सैनिकांचा खात्मा 
८- दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं
९- पाकविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी- कर्नल पाटील 
१०- सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ? 
११- 'सर्जिकल स्ट्राईक'चे काँग्रेसकडून कौतूक
१२- पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई; वाचा सविस्तर 
१३- भारताच्या कारवाईमुळे सेन्सेक्स कोसळला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे
१५- पंजाबमध्ये सीमेवरील गावांना अतिदक्षतेचा इशारा 
१६- 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी मारले' 
१७- सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे 'कमेंटभर' कौतुक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- आग्य्राजवळ मराठी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 
१९- अंधेरी; जन्मदात्या आईला पंख्याला लटकावलं, नराधम मुलाला अटक
२०- ठाण्यात मुख्यमंत्र्यासमोर कुपोषणाविरोधात निदर्शने
२१- भाईंदर; आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुण तलवार घेऊन इमारतीवर चढला
२२- सोलापूर;तोल जाऊन विहीरीत पडल्याने मुलीचा दुर्दैवी अंत.
२३- सांगलीतील प्रेमीयुगुलाची आग्रा येथे केली आत्महत्या. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय
२५- अनुराग ठाकूर, अजय शिर्के यांना हटवा
२६- बीसीसीआयने सुधारावे; अन्यथा आम्ही सुधरवू
२७- गंभीरच्या समावेशामुळे धवनचे स्थान धोक्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करा - संभाजी ब्रिगेड 

सोयाबीन, उडीद, मुग ह्या हाताशी आलेल्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. मागील तीन वर्षापासून दुष्काळात होरपळत 

असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीचा पाऊस दिलासा देणारा होता... पण, परतीच्या पावसाने हाताशी आलेले पिक जमीनदोस्त झाले आहे. उभे 

पिक जमिनीवर आडवे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पिकाच्या शेंगामधून मोड आलेले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हताश झाला 

आहे. 
या पिकांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, 

अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष संभाजी कल्याणकर व राजू मोरे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
================================

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले, भारताचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणं.
सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.
साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.
================================

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.
भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं पित्त चांगलंच खवळलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत असल्याचं पाकिस्ताने म्हटलं आहे. तसंच आमच्या शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, अशी उलटबोंब आता पाकिस्तानने सुरु केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आपली भूमिका मांडली. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचं नवाज शरीफांनी म्हटलं आहे.

================================

दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं

दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं
नवी दिल्ली : पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. उरी हल्ला आणि पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अर्धवट सोडून तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
या बैठकीसाठी तीनही सैन्यदलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि दिग्गज मंत्री उपस्थित आहेत.
दरम्यान, भारत आज पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधीचा करार मोडणार असल्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 साली शस्त्रसंधी करार झाला होता.
काल रात्री सीमेवर पुन्हा गोळीबार झाला. त्यात आमचे दोन जवान मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. शस्त्रसंधी करार जर संपुष्टात आला, तर सैन्यदलाला तात्काळ निर्णय घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मुभा मिळेल.

================================

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.  त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या.
“हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है, असंच म्हणावं लागेल, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली.
तसंच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असं म्हणत सुप्रियांनी निशाणा साधला.

================================
  • पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई
पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून 35 दहशतवादी व 9 सैनिकांना ठार मारल्याची घोषणा भारताने केल्यानंतर या कारवाईवर अचानक प्रकाशझोत पडला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला.

पार्श्‍वभूमी उरीतील दहशतवादी हल्ल्यात आपले 18 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरवात केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्‍मीरचे तुणतुणे वाजवले होते. एनाम गंभीर या भारतीय अधिकाऱ्याने शरीफ यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही आमसभेत हिंदीत भाषण करत पाकिस्तानच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविल्या होत्या. त्याच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर सभेत पाकिस्तानच्या जनतेशीच संवाद साधत तेथील राज्यकर्ते आणि लष्कराच्या कारवायांवर बोट ठेवले होते.

कारवाई काय झाली? पाकव्याप्त काश्‍मीरमधील प्रशिक्षण तळांवर दहशतवादी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर किमान 20 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कराने उधळले होते. आता पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल (बुधवार) मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या कालावधीमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. प्रत्यक्ष ताबारेषेपासून 500 मीटर ते दोन किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये ही कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई ही जमिनीवर झाली. या कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमधील किमान पाच दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईमध्ये भारताचा कोणताही जवान जखमी झालेला नाही; तर ‘आमचे दोन सैनिक ठार आणि नऊ सैनिक जखमी झाले,‘ असा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षेनुसार, पाकिस्तानने सुरवातीला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि नंतर या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ला ‘भारताने केलेले आक्रमण‘ असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भारताने कारवाईची अधिकृत घोषणा केल्यामुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानने आता भारतालाच ‘आक्रमक‘ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भारताने पुन्हा अशी कारवाई केल्यास पाकिस्तान पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देईल,‘ असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे.

पुढे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या योजना कार्यान्वित केल्या असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहण्यास मिळत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दुपारी चार वाजता सर्वपक्षीय बैठकही बोलाविली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिंधू पाणी वाटप कराराचाही पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर याविषयीही काही निर्णय होण्याची शक्‍यता आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनाही देण्यात आली आहे. 


No comments: