Saturday, 3 September 2016

नमस्कार लाईव्ह 03-०९-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- फिलिपिन्समधील दावोस शहरात स्फोट, 10 जणांचा मृत्यू 
२- पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी 
३- सेक्स वर्कर म्हणणा-या वेबसाईटवर मेलेनिया ट्रम्पनी भरला खटला 
४- पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला, मर्दानमध्ये बॉम्बस्फोट 
५- चीन आणि अमेरिकेकडून पॅरिस हवामान कराराला संयुक्तरित्या मान्यता दिल्याचं जाहीर. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- विजय मल्ल्यांच्या 6630 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई 
७- मुंबईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू 
८- अर्थव्यवस्था वेगात; रोजगार मात्र जैसे थे!
९- आर्थिक संकटांपासून भारत सुरक्षित-जेटली
१०- ‘कॅशबॅक’बाबत अटी स्पष्ट करा
११- सी-डॅक बनविणार ‘देशी’ सुपर कॉम्प्युटर
१२- दूरसंचार क्षेत्रात आता रिलायन्सची ‘जिओ’गिरी
१३- देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर 
१४- तावडेवरून न्यायालयाने तपास यंत्रणेला फटकारले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- बईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू 
१६- शाळेत रंगला स्कूल रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त सोहळा 
१७- ठाणे; मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला फरफटत नेले 
१८- सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली 
१९- छोटा राजनवर आरोप निश्‍चित 
२०- गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेचा पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप 
२१- गोंदिया - आमगांव रेल्वे स्थानकात गुंडाचा हैदोस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- अहमदनगर; गणपतीची वर्गणी देण्यास नकार देणा-या दाम्पत्याला बेदम मारहाण 
२३- कोसबाड येथे जागतिक नारळ दिन साजरा 
२४- वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी आणि पिंपळगाव येथे चोरटयांचा धुमाकूळ 
२५- लातूर - बेकायदेशीर मद्य साठा ठेवल्याप्रकरणी चार बारवर कारवाई, दोघांचे परवाने रद्द तर दोघांवर दंडात्मक कारवाई 
२६- नाशिक महापालिकेच्या शाळा क्रमांक दोनमधील मुख्याध्यापिका शैला मानकर यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक. 
२७- दिल्ली; सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलेले आपचे संदीप कुमार यांनी डीसीपी कार्यालयात केलं आत्मसमर्पण 
२८- बीड - जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या 
२९- सोलापूर - बोकडाच्या पैशाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, तिघे जखमी, पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल  
३०- पुणे - नोकरी लावण्याच्या अमिषाने शिक्षिका महिलेचा निवृत शिक्षकाने केला विनयभंग,  
३१- शिर्डी - वाळू तस्करी रोखण्यास गेलेल्या पोलिसांना तस्करांनी केली मारहाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३२- योगेश्वरला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
३३- गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्व
३४- मेस्सीचे धडाक्यात पुनरागमन
३५- भविष्यात खूप पुढचा विचार करण्यावर विश्वास नाही - रहाणे
३६- गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व
३७- रणजी सामन्यांचे आयोजन यंदा तटस्थस्थळी होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
================================

बईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू



  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 3 - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गुरुवारी मात्र 18 प्रवाशांसाठी डेथलाईन ठरली. गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 18 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 18 प्रवाशांना जीव गमावल्याचा हा उच्चांक आहे. 18 प्रवाशांनी प्राण गमावले असून 16 प्रवासी जखमी झाले आहेत. यावर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत एकूण 2000 रेल्वे प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना अपघात होऊन मृत्यू झालेल्याचं प्रमाण जास्त आहे.
    वसई जीआरपीच्या हद्दीत सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाले आहेत. पाच प्रवाशांचा मिरा रोड ते वैतरणा दरम्यान मृत्यू झाला असून यामधील दोघांची ओळख पटलेली नाही. यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. कल्याण स्थानक दुस-या क्रमांकावर असून तीन प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामधील एक महिला प्रवासी आहे. अज्ञात मृतदेहांची ओळख पटावी यासाठी रेल्वे पोलीस स्थानकांवर फोटो लावत आहेत. 
================================

विजय मल्ल्यांच्या 6630 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई



  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 3 - बँकांचे हजार कोटींचे कर्ज बु़डवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांची 6630 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत मल्ल्यांचा मॉल, फार्महाऊस आणि स्टॉक्सचा समावेश आहे. मुंबई आणि बंगळुरुतील संपत्तीवर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 
    मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
================================

गणपतीची वर्गणी देण्यास नकार देणा-या दाम्पत्याला बेदम मारहाण


  • ऑनलाइन लोकमत
    अहमदनगर, दि. ३ - गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर मारहाणीनंतरते दाम्पत्य उपचारांसाठी रुग्णालयात गेले असता तेथेही त्यांना बडवण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज हाती आले असून पोलिस आता त्यावर काय कारवाई करतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त दुकानदार राजू पाटोळे यांच्याकडे काही जण वर्गणी मागण्यास आले. मात्र पाटोळे यांनी त्यांना वर्गण देण्यास नकार दिला असता संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पाटोळे यांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी पाटोळे यांची पत्नी मध्ये पडली असता, त्यांनाही मारण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या नराधमांनी दुकानाचीही तोडफोडही केली. मारहाणीत जबर जखमी झालेले पाटोळे रुग्णालयात उपचारांसाठी गेले असता काही जणांनी रुग्णालयात जाऊन तेथेही त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. त्यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  मारहाणीची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जमाव बेदम मारहाण करताना दिसत आहे. 
================================

शाळेत रंगला स्कूल रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त सोहळा



  • - साईं सावंत / ऑनलाइन लोकमत
    नियम बाजूला ठेवून जपला ॠणानुबंध; ३५ वर्षांची सेवा संपविताना डोळ्यात पाणी
    सातारा, दि. 3 - मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्त सोहळा तसा प्रत्येक शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, गेली ३५ वर्षे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज ने-आण करणा-या रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त समारंभ अत्यंत भावनिकरीत्या साजरा झाला. साता-यातील नवीन मराठी शाळेत सर्वच्या सर्व म्हणजे ४५ शिक्षक अन् शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या रिक्षावाल्याकाकांना निरोप देण्यात आला. शाळेने सर्व नियम बाजूला ठेवून हा जपलेल्या या आगळ्या-वेगळ्या ऋणानुबंधांने ३५ वर्षांची सेवा संपविताना रिक्षावाल्याकाकांचे डोळे आनंदाश्रूने पाणावले.

================================

मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला फरफटत नेले



  • ऑनलाइन लोकमत
    ठाणे, दि. ३ - हेल्मेट घातले नाही म्हणून अडवणारे वाहूतक पोलिस विलास शिंदे यांच्यावर बांबूने प्रहार करून त्यांचा जीव गेल्याची घटना अद्याप ताजी असतानाच ठाण्यात एका मद्यपी चालकाने वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरटफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तेथील नागरिकांना प्रसंगावधान दाखवत त्या कारचालकाला पकडले व मोठी दुर्घटना होण्यापासून रोखले. या घटनेत हवालदार नरसिंग महापुरे जखमी झाले आहेत.  
    मिळालेल्या माहितीनुसार, महापुरे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तीन हात नाका येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या उलट्या बाजूने भरधाव वेगाने कार जात असल्याचे दिसले. त्यांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला मात्र मद्यपी कार चालक योगेश भांबरेने गाडी न थांबवता तशीच पुढे नेली व महापुरे यांना उडवले. त्यामुळे महापुरे बोनेटवर पडले, एवढे होऊनही गाडी न थांबता तशीच पुढे गेली व महापुरेही अर्धा किलोमीटर पुढे फरफटत गेले. कारचालकाने गाडी वाकडी तिकडी करत त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत कार चालकाला रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महापुरे यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. 
    या घटनेनंतर ठाणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत संतापाचे वातावरण आहे. 

================================

No comments: