Thursday, 8 September 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स
२- बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा
३- आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी
४- चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा
५- पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- नथुराम गोडसे संघ स्वयंसेवकच - कुटुंबियांचा दावा 
७- काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव 
८- जातपंचांनी बहिष्कृत केलेल्या दाम्पत्याने केली मुख्यमंत्र्यांच्या गणपतीची आरती 
९- मनसेचा पुन्हा राडा, घाटकोपरमध्ये फळविक्रेत्याला केली मारहाण 
१०- जीएसटी अंमलबजावणीसाठी वेळ कमी 
११- सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर 
१२- यूबीएलचे चेअरमनपद विजय मल्ल्यांकडेच? 
१३- टाटा बनविणार ५ हजार बसेस 
१४- भारतात व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर 
'१५- इन्सॅट-3 डीआर'चे आज प्रक्षेपण 
१६- 'पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा नितीशकुमार सक्षम' - तेजस्वी यादव 
१७- केजरीवालांना महिलांनी दाखविल्या बांगड्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१८- काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव
१९- फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना सुरुवात
२०- असंसर्गजन्य आजारांना आळा घाला
२१- भावाच्या लग्नासाठी केली फसवणूक
२२- मनसेचा पुन्हा राडा, घाटकोपरमध्ये फळविक्रेत्याला केली मारहाण
२३- पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न
२४- प्रीती राठी अ‍ॅसिड हल्लाप्रकरण : अंकुरला फाशी दया
२५- कल्याण-डोंबिवली स्मार्ट होण्यास लागणार वेळ
२६- गृहखात्याची श्वेतपत्रिका काढा - विखे पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना सुरुवात 
२८- लखनऊ; स्मार्टफोनचा पासवर्ड नाही सांगितला म्हणून केली पत्नीची हत्या 
२९- रांची; शौचासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच लाँच 
३१- सकारात्मक विचाराने प्रेरित झाले
३२- जोकोविचची ‘सहज’ आगेकूच
३३- टी-२० त सर्वोच्च धावसंख्येची नोंद चौथ्यांदा!
३४- प्रशिक्षकांना ओळख मिळणे गरजेचे : गोपीचंद
३५- पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग
३६- डोक्याला चेंडू लागल्याने प्रग्यान ओझा जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

मनसेचा पुन्हा राडा, घाटकोपरमध्ये फळविक्रेत्याला केली मारहाण



  • मुंबई, दि. ८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठीचा राग आळवत राडा केला असून घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण केली आहे. मनसेच्या ४ ते ५ कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याला बेदम मारहाण करत त्याच्या गाडीवरची फळही फेकून दिली. घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. 
    या भागात परप्रांतियांनी रस्त्यावर दुकाने थाटू  आणि संबंधित फळवाल्याने दुस-या एका मराठी व्यक्तीला गाडी लावण्यापासून आडकाठी केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत त्याला मारहाण केल्याचे समजते. 
    दरम्यान ' ही मारहाण नसून हे एक आंदोलन असून  उत्तर भारतीयांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर दिलं आहे' असं मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच ' शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास आडकाठी करणाऱ्या परप्रांतीयांना असंच उत्तर देऊ' असे ते म्हणाले. 
======================================

जातपंचांनी बहिष्कृत केलेल्या दाम्पत्याने केली मुख्यमंत्र्यांच्या गणपतीची आरती

  • First Published :08-September-2016 : 10:15:00Last Updated at: 08-September-2016 : 10:17:42

  • - यदु जोशी / ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 8 - जातपंचांच्या जाचाविरोधात दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन बसलेल्या देवाळेकर दांपत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून आपल्या गणपतीची आरती करुन घेतली. सोबतच पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिका-यांना गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेशही दिले आहेत. 
     
    कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात देवाळेकर दाम्पत्य राहतं. या दाम्पत्याला 2006 पासून गावातील जातपंचांनी वाळीत टाकलं आहे. गावातील रुढी पंरपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
     
    गेल्या वर्षी या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. त्यावळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र काहीही कारवाई झाली नाही. यंदा गणपती उत्सवासाठी हेवाळेकर दाम्पत्य गावात गेलं असता जातपंचांनी त्यांना गावात प्रवेश नाकारला . यानंतर देवाळेकर दाम्पत्य थेट मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन उपोषणाला बसलं होतं.
======================================

स्मार्टफोनचा पासवर्ड नाही सांगितला म्हणून केली पत्नीची हत्या

  • First Published :08-September-2016 : 11:22:12

  • - ऑनलाइन लोकमत
    लखनऊ, दि. 8 - पत्नीने स्मार्टफोन लॉक खोलण्यासाठी पासवर्ड न सांगितल्याने नाराज झालेल्या आरोपी पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाशीमधील निवासस्थानी पत्नीची हत्या करण्यात आली. उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 
     
    पूनम वर्मा असं पिडित महिलेचं नाव आहे. 29 ऑगस्ट रोजी पती विनीत कुमारच्या मित्राने पूनमची गळा दाबून हत्या केली. दुस-या दिवशी पूनमच्या 4 वर्षाच्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजा-यांना हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विनीतची चौकशी केली. विनीतने आपण कामानिमित्त कानपूरला गेलो होतो अशी माहिती पोलिसांना दिली. 
     
    पोलिसांनी विनीतच्या फोन कॉल्सची तपासणी केली. त्यानंतर पुन्हा चौकशी केली असता विनीतने आपला गुन्हा कबूल केला. 'मी माझ्या पत्नीसोबत झांशी येथे राहत होतो. कामानिमित्त मला नेहमी कानपूरला जायला लागायचं. गेल्याच महिन्यात पूनमने स्मार्टफोन खरेदी केला, त्यानंतर तिच्या वागण्यात खूपच बदल झाला. ती मला आणि आमच्या मुलीकडे दुर्लक्ष करायला लागली. तिने आपला मोबाईल फोनदेखील लॉक केला होता जेणेकरुन कोणी तो पाहू नये,' अशी माहिती विनितने पोलिसांनी दिली.
     
    विनीतला पूनम आपल्याला धोका देत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी विनीतने आपल्या मित्रांना 80 हजार रुपये दिले. 29 ऑगस्टला विनीतने कानपूरहून पुनमला फोन करुन आपले दोन मित्र काही कामासाठी घरी येत असल्याचं कारण सांगितलं. विनीतचे मित्र लक्ष्मण आणि कमर कॉम्प्यूटर घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरी आले आणि त्यांनी गळा दाबून पूनमची हत्या केली. चोरी करण्याच्या उद्धेशाने हत्या झाल्याचा बनाव करण्यासाठी घरातील दागिनेही चोरुन नेले.
======================================

नथुराम गोडसे संघ स्वयंसेवकच - कुटुंबियांचा दावा

  • First Published :08-September-2016 : 09:20:00Last Updated at: 08-September-2016 : 10:07:38

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ८ - 'नथुराम गोडसे यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला नव्हता वा त्यांचे कधीही निलंबन झाले नव्हते. ते संघस्वयंसेवक होते' असा दावा गोडसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. ' अखेरच्या काळात त्यांनी संघावर बरीच टीका केली होती, पण तरीही १९३८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निजामाविरोधात छेडलेल्या आंदोलनात ते इतर स्वयंसेवकांसह सहभागी झाले होते' अशी माहिती नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नातू सात्यकी सावकर यांनी दिली आहे. ' इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. 
    2014 लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून हत्या केली असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार असतानाच आता गोडसे यांच्या नातवाच्या या वक्तव्यामुळे राहुल यांना मदत होण्याची चिन्हे दिसत आहेत. 
    ' आम्ही नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे सर्व महत्वपूर्ण लिखाण संग्रहीत केले आहे. त्या लिखाणातून हेच स्पष्ट होते की नथुराम गोडसे हे संघाचे समर्पित कार्यकर्ते होते. मात्र संघाने काही ठिकाणी मवाळ भूमिका घेतल्याने त्यांचे संघासोबत मतभेद झाले'  असे सात्यकी यांनी सांगितले. ' १९३२ साली सांगलीत असताना नथुराम गोडसे यांनी संघात प्रवेश केला. हिंदूंविरोधात होणा-या अत्याचारानंतरही संघ पुरेशी आक्रमक भूमिका घेत नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र असे असले तरीही १९३८-३९ सालादरम्यान संघाने हैदराबादच्या निजामाविरोधात भाग्यनगर येथे छेडलेल्या 'मुक्तिसंग्रामात' ते सहभागी झाले होते. संघासोबत मतभेद असतानाही ते इतर स्वयंसेवकांच्या खांद्याला खांदा भिडवून या आंदोलनात उतरले होते. हैदराबादमध्ये राहणा-या हिंदूंच्या शोधार्थ राबवण्यात आलेल्या मोहिमेतील स्वयंसेवकाच्या तुकडीत नथुराम याचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी हैदराबादमधून अनेक लेख पाठवले, ते अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही झाले होते, ते आम्ही आजही जपून ठेवले आहेत' असेही सात्यकी म्हणाले. 
    ' १९४२ साली विजयादशमीच्या दिवशी नथुराम यांनी स्वत:  'हिंदू राष्ट्र दल' या संस्थेची स्थापना केली. मात्र त्यांनी हिंदूंसाठी शिबिरे घेणे कायम ठेवले. फाळणीच्या मुद्यावरून १९४६ साली त्यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला. ' असे त्यांनी सांगितले. 
======================================

आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच लाँच

  • First Published :07-September-2016 : 22:10:00Last Updated at: 07-September-2016 : 23:18:44

  • ऑनलाइन लोकमत
    सन फ्रान्सिस्को, दि. 7 - अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 7 आज लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलच्या आयफोन 7 संदर्भातील अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर आयफोन 7चा व्हिडीओही जबरदस्त व्हायरल होऊन लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अ‍ॅपलचा हा आयफोन 7 म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आयफोन 7 सोबतच अ‍ॅपल आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 या दोन फोनचं लाँचिंग झालं आहे. मात्र सर्व फोनपैकी अ‍ॅपल 7 या फोन लोकांच्या केंद्रस्थानी आहे.
    आयफोन 7ची स्क्रीन साईज 4.7 इंच, तर आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 हँडसेटची स्क्रीन 5.5 इंच आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही आयफोन थ्रीडी टच आहेत. या हँडसेट्सच्या 32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपयांच्या जवळपास आहे. अ‍ॅपल कंपनीच्या या तिन्ही आगामी हँडसेट्समध्ये ए10 प्रोसेसरसोबत बसवण्यात आले आहेत.
    आयफोन 7 मध्ये 2 जीबी रॅम, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. अ‍ॅपल प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 मध्ये एकाच प्रकारचे सीपीयूचा वापर केला असून, क्लॉक स्पीडही आधीच्या आयफोनपेक्षा अधिक आहे. अ‍ॅपलचे हे सर्व आयफोन वॉटर रेसिस्टंट आहेत. तर आयफोनमध्ये स्टिरीओ स्पीकरही उत्तम प्रतीचे देण्यात आले आहेत. या सर्व आयफोनमध्ये हेडफोन जॅकच्या त्याऐवजी नवीन लाइटनिंग पोर्ट देण्यात आलं आहे. त्याद्वारेच एअरफोन कनेक्ट होणार आहे. हे सर्व फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येणार आहेत.
======================================

काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव

  • First Published :08-September-2016 : 06:10:48

  • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यापासून, काश्मीर आणि बलुचिस्तान यांची तुलना केली जात आहे, ती अकारण आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केले. मुंबई प्रेस क्लबद्वारे आयोजित केलेल्या बलुचिस्तानवरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. मात्र इतर वक्त्यांच्या भाषणांमध्ये भारत पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा संदेश जगभरात गेल्याचा सूर व्यक्त झाला.
    या वेळेस श्रीवास्तव म्हणाले, ‘काश्मीर किंवा जगातील कोणत्याही संघर्ष चालू असलेल्या प्रदेशात, मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांचा उल्लेख किंवा तशा घटनांच्या नोंदी अटळ आहेत. मात्र, म्हणून बलुचिस्तान आणि काश्मीर यांची तुलना करणे अयोग्य वाटते. दोन्ही प्रदेशांचा, त्यांच्या प्रश्नांचा इतिहास आणि वर्तमान वेगवेगळा आहे. त्यांच्या प्रश्नांची पार्श्वभूमीही वेगळी आहे. त्यामुळे त्या दोन प्रश्नांना जोडू नये. बलुचिस्तानचा मुद्दा भारताने उचलल्यावर, पाकिस्तानात भारताविरोधी मत एकत्र होईल, असे मुळीच वाटत नाही. त्याचप्रमाणे, बलुचिस्तानात निवडून आलेले सरकार अस्थिर होईल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण तेथे निवडणुका मुळीच निष्पक्ष पद्धतीने होत नाहीत. याउलट काश्मीर खोऱ्यामध्ये निवडणुका फारच चांगल्या पद्धतीने राबविल्या गेल्या आहेत. भारताने बलुचिस्तानातील मानवाधिकाराचा मुद्द्यावर मत व्यक्त करणे काहीच गैर नाही. श्रीवास्तव यांच्या या मताच्या अगदी विरोधी मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले. बलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानातही पसरला आहे. भारताने इराणमधील चाबहर बंदर विकसित करण्यास घेतले आहे, ते पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून केवळ ७० किमी दूर आहे. त्यामुळे इराण आणि भारताच्या संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो. जतीन देसाई यांनी बलुचिस्तानच्या इतिहासाचा आणि राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेताना, बलुचस्तिान हा संपन्न प्रदेश आहे, पण बलुच लोक गरीब आहेत,
======================================

फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना सुरुवात

  • First Published :08-September-2016 : 06:10:48

  • मुंबई : दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशास बुधवारी सुरुवात झाली. मात्र, या विशेष फेरीसाठी फ्रेशर्स म्हणजेच जून महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने, ठरावीक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
    या आधी फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या एकूण ९ आॅनलाइन फेऱ्या घेण्यात आल्या, तरीही नाराज विद्यार्थ्यांची संख्या संपत नसल्याचे चित्र आहे. नाराज विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून चूक झाल्यानेच ही वेळ आल्याचे लक्षात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, घरानजीकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश हवा असल्याचा पालकांचा हट्ट होता. शिवाय या फेरीतही विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी केली. याउलट फेरपरीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यास बुधवारी सुरुवात झाली. फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, म्हणून ही विशेष फेरी आहे. फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी या आधीच ९ फेऱ्या घेण्यात आल्या असून, त्यांना पुरेशी संधीही मिळालेली आहे. परिणामी, फेरपरीक्षेतील उत्तीर्ण व एटीकेटी मिळालेल्यांचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून या फेरीमध्ये फ्रेशर्सला संधी देण्यात आलेली नाही.

======================================

पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न

  • First Published :08-September-2016 : 06:20:21

  • कल्याण : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण होत असून कल्याणमध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी मोठ्या आवाजात वाद्य वाजवण्यावरून जरीमरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यात झालेल्या वादातून कार्यकर्त्यांनी डगळे यांना विसर्जन तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाच्या चार कार्यकर्त्यांना अटक झाली.
    कर्कश्श आवाजात वाद्य वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्या ‘जरीमरी मित्र मंडळा’च्या कार्यकर्त्यांना आपण हटकल्याने त्यांनी विसर्जन तलावाच्या पाण्यात आपल्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डगळे यांनी ‘लोकमत’कडे केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल विश्वनाथ गायकवाड (२०) याला कल्याणमधून, तर बिन्देश दत्ता गायकवाड (२१), नयन दिलीप गायकवाड (२२) व नरेश महादू गायकवाड (३२) यांना माणेरे गावातून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी संजू जॉन यांनी दिली. कल्याण पूर्व येथील जरीमरी तलावात दरवर्षीप्रमाणे दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन सुरू होते. त्या वेळी कार्यकर्ते आणि डगळे यांच्यात रात्री १० च्या सुमारास वाद झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन बंद केले. विसर्जन तलावाच्या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दी-गोंधळात एखाद्या गणेशमूर्तीला धक्का लागला, तर घटनेला वेगळेच वळण लागेल, हे ओळखून डगळे स्वत: पाण्यात उतरून गणपती विसर्जन करू लागले. हे पाहून जरीमरी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. त्यापैकी राहुल गायकवाड याने तलावात उडी घेऊन गणपती विसर्जन करणाऱ्या डगळे यांना रोखण्याचा व त्यांचे डोके पाण्यात बुडवू त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. डगळे यांनी कसाबसा आपला जीव वाचवून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जरीमरीच्या अन्य ३ कार्यकर्त्यांनी डगळे यांच्याशी हुज्जत घातली. कायद्याच्या रक्षकांवरील जीवघेण्या हल्ल्याचा हा दुर्दैवी प्रकार इतर हवालदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाइलमध्ये कैद करून आपल्या वरिष्ठांना कळवला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होताच राहुल व त्याच्या अन्य ३ साथीदारांनी तेथून पळ काढला.
    महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ले होत असतानाच डगळे यांच्यावरील हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. डगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार जणांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जरीमरी मित्र मंडळाने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेले आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे.
======================================

शौचासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू



  • रांची, दि. 8 - भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रामबाग जिल्ह्यात घडली आहे. सोनी कुमारी असं या मुलीचं नाव असून घराबाहेर शौचासाठी गेली असताना तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. गावातील अनेक लोक त्यावेळी कामावर गेले असल्याने शुकशूकाट होता. कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सोनीने ओरडण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून काही लोक धावत आले आणि तिला वाचवलं. 
     
    कुत्र्यांच्या हल्ल्यात सोनीला शरिरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारने भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचं तसंच मुलीच्या घरी शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. 
     
    'पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी परिसरातील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहे. सरकारी नियमांप्रमाणे कुटुंबाला मदत दिली जाईल. घरात शौचालय नसल्याने मुलीला बाहेर जावं लागलं होतं. आम्ही पीडित मुलीच्या घरी शौचालय बांधून देऊ', असं उपविभागीय अधिकारी किरण कुमारी यांनी सांगितलं आहे. 
     
    राज्यात एकूण 30 लाख भटकी कुत्री आहेत. याचा अर्थ कुत्र्यांचं प्रमाण एका व्यक्तीमागे दहा इतकं आहे. फक्त एकट्या रांचीमध्ये 40 हजार भटकी कुत्री आहेत अशी माहिती प्राणीमित्र संघटनेने दिली आहे.
======================================
'पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा नितीशकुमार सक्षम'

पाटना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पंतप्रधानपदासाठी अधिक सक्षम उमेदवार असल्याचे मत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजस्वी म्हणाले, "नितीशकुमार हे चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवाय ते केंद्रात मंत्रीही होते. पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार हे मोदींपेक्षा अधिक सक्षम आहेत.‘ तसेच "मागासलेपणाची बिहारची ओळख पुसून बिहार एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) बाबतीत देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तर ताज्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार गुन्ह्यांच्या बाबतीत बिहार राज्यात बावीसवे राज्य आहे. या गोष्टी नितीशकुमार यांची सक्षमता सिद्ध करण्यास पुरेशा आहेत.‘ असेही तेजस्वी यादव यावेळी म्हणाले.
======================================
केजरीवालांना महिलांनी दाखविल्या बांगड्या

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री व अरविंद केजरीवाल यांना आज (गुरुवार) सकाळी दिल्ली रेल्वे स्थानकावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घेराव करण्याचा प्रयत्न करत बांगड्या दाखविल्या. केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीतील मंत्री संदीप कुमार हे सेक्स व्हिडिओ क्लिपमध्ये दिसल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चार दिवसांसाठी पंजाब दौऱ्यासाठी केजरीवाल रवाना होत असताना, महिलांकडून आंदोलन करण्यात आले. केजरीवाल हाय हाय, अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या.

महिलांनी केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. या आंदोलनानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्ली पोलिस आणि भाजप मिळून केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा कट रचत असल्याचे सिसोदीया यांनी म्हटले आहे.
======================================

No comments: