[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक
२- चीनच्या किनारपट्टीवर धडकले ‘मेरांती’
३- हिलेरी क्लिंटन यांच्या प्रकृतीत सुधारणा
४- तालिबानी नेता दहशतवादी का नाही!
५- इस्लामिक स्टेटने अपहरण केलेल्या भारतीय शिक्षकांची सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- भाजप मोदींचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करणार
७- संतप्त मातेनं मंत्री विष्णू सावरांना दारातूनच हाकललं
८- मल्ल्यांना भारतात परतण्यासाठी पासपोर्टची गरज नाही - परराष्ट्र मंत्रालय
९- मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
१०- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार !
११- भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडतमुक्ती नाहीच!
१२- आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त
१३- मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !
१४- घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
१५- २७ हजार कि.मी. इकॉनॉमिक कॉरिडॉर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
१७- तेलंगणातील रेल्वे ट्रॅक दुरुस्तीनंतर पुन्हा खचला, वाहतूक ठप्प
१८- मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
१९- पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण उमरखेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
२०- विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू
२१- दिवाळीसाठी वेटिंग वाढले, सर्वच गाड्या फुल्ल
२२- विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण
२३- गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी
२४- कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग
२५- आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- शिर्डीहून हैदराबादकडे निघालेल्या बसला भीषण आग, चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
२७- अथांग अरबी समुद्रात लालबागचा राजा विसावला
२८- दगडूशेठ रात्री अडीच वाजता मार्गस्थ, सकाळी 8 ला निरोप
२९- पुण्यात भाजप नगरसेवकावर गोळीबार, गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घटना
३०- दिल्ली; मित्रांसमोरच दोन अल्पवयीन तरुणींवर सामूहिक बलात्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय
३२- कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण
३३- स्पेनचे आव्हान पेलण्यास भारत सज्ज
३४- विराट होत आहे सज्ज
३५- न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून
३६- जपान ओपनमधून सिंधूची माघार
३७- रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय
३८- पंड्याची एकाकी झुंज भारत ९ बाद १६९
३९- सरवन घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===================================








१- वॉशिंग्टन; दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक
२- चीनच्या किनारपट्टीवर धडकले ‘मेरांती’
३- हिलेरी क्लिंटन यांच्या प्रकृतीत सुधारणा
४- तालिबानी नेता दहशतवादी का नाही!
५- इस्लामिक स्टेटने अपहरण केलेल्या भारतीय शिक्षकांची सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- भाजप मोदींचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करणार
७- संतप्त मातेनं मंत्री विष्णू सावरांना दारातूनच हाकललं
८- मल्ल्यांना भारतात परतण्यासाठी पासपोर्टची गरज नाही - परराष्ट्र मंत्रालय
९- मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
१०- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार !
११- भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडतमुक्ती नाहीच!
१२- आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त
१३- मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !
१४- घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
१५- २७ हजार कि.मी. इकॉनॉमिक कॉरिडॉर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
१७- तेलंगणातील रेल्वे ट्रॅक दुरुस्तीनंतर पुन्हा खचला, वाहतूक ठप्प
१८- मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
१९- पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण उमरखेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
२०- विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू
२१- दिवाळीसाठी वेटिंग वाढले, सर्वच गाड्या फुल्ल
२२- विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण
२३- गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी
२४- कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग
२५- आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- शिर्डीहून हैदराबादकडे निघालेल्या बसला भीषण आग, चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
२७- अथांग अरबी समुद्रात लालबागचा राजा विसावला
२८- दगडूशेठ रात्री अडीच वाजता मार्गस्थ, सकाळी 8 ला निरोप
२९- पुण्यात भाजप नगरसेवकावर गोळीबार, गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घटना
३०- दिल्ली; मित्रांसमोरच दोन अल्पवयीन तरुणींवर सामूहिक बलात्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय
३२- कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण
३३- स्पेनचे आव्हान पेलण्यास भारत सज्ज
३४- विराट होत आहे सज्ज
३५- न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून
३६- जपान ओपनमधून सिंधूची माघार
३७- रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय
३८- पंड्याची एकाकी झुंज भारत ९ बाद १६९
३९- सरवन घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर सकाळी 8 च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अरबी समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागचा राजा सकाळी सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा लवकर चौपाटीवर दाखल झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल 20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.गेले १० दिवस मुक्काम केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या गावी निघाले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी केली होती. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला.
===================================
दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 16 - जगभरात अनेक घडामोडी घडत असतात पण ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हे असंपण असतं का ? हा प्रश्न नक्की पडेल. रेस्टॉरंटमध्ये दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून चक्क महिलेला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये ही घटना घडली आहे.वॉशिंग्टन डीसीमध्ये रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती शांत बसून फ्राईज खात होता. त्यावेळी ही महिला दारुच्या नशेत तिथे पोहोचली आणि त्याच्या बाजूला बसली. दोघांनी काही वेळ गप्पादेखील मारल्या आणि बोलता बोलता या महिलेने त्याच्या प्लेटमधील फ्राईज उचलल्या. जेव्हा दुस-यांदा तिने फ्राईज उचलण्यासाठी हात पुढे नेला तेव्हा मात्र त्या व्यक्तीने विरोध करत आपण यासाठी पैसे मोजले आहेत आणि तुम्ही ते अशाप्रकारे उचलू शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे ही व्यक्ती पोलीस अधिकारी होती.त्याने विरोध केल्याचं पाहून महिलेला राग आला आणि तिने मग मला अटक करुन जेलमध्ये टाका असं सांगितलं. आणि खरंच त्या पोलीस अधिका-याने आपल्या प्लेटमधून तीन फ्राईज चोरल्याच्या आरोपाखाली त्या महिलेला अटक केली.
===================================
शिर्डीहून हैदराबादकडे निघालेल्या बसला भीषण आग, चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
- ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 16 - शिर्डीहून हैदराबादकडे निघालेल्या बसला लागलेल्या भीषण आगीत एका बाळाचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे बस हैदराबादच्या दिशेने जात असतानाच ही आग लागली. आगीत सहा जण जखमी झाले असून यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हुमणाबादजवळ ही धक्कादायक घटना घडली.बसमध्ये एकूण 44 प्रवासी होते. सर्व प्रवासी हैदराबादचे होते अशी माहिती मिळाली आहे. शिर्डाला साईबाबांचे दर्शन घेऊन सर्वजण आपल्या घरी हैदराबादला परतत होते. मात्र रस्त्यातच बसला भीषण आग लागली. आग इतकी भयानक होती की बस पुर्णपणे जळून खाक झाली आहे.
===================================
हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय
- नवी दिल्ली, दि. १६ : भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा असा पराक्रम प्रियंका चोप्राच्या नावावर झाला आहे. टेलव्हिजनवर जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवं स्थान मिळालं आहे. हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे. फोर्ब्सकडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी एबीसीच्या क्वांटिकोमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.विक्रमी ७३ कोटी रुपयांच्या मानधनासह बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंकाने आठवं स्थान मिळवलं आहे. जगात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी फोर्ब्सकडून काल जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रियंका आठव्या स्थानावर आहे. सोफिया वर्जारा ही हॉलिवूड अभिनेत्री २८८ कोटी रुपये एवढ्या मानधनासह पहिल्या स्थानावर आहे.
===================================
भाजप मोदींचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करणार
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. येत्या 17 सप्टेंबरला मोदींचा 66वा वाढदिवस आहे. यावेळी अनेक विश्वविक्रम बनवण्याची जय्यत तयारी सुरु आहे. यंदा मोदी त्यांचा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी म्हणजेच गुजरातमधील नवसारीमध्ये साजरा करणार आहेत.
भाजपने पक्षाच्या खासदार आणि आमदारांना नरेंद्र मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. 17 सप्टेंबरला मोदींच्या जन्मदिनी भाजपाध्यक्ष अमित शाह तेलंगणात स्वच्छ अभियानात सहभागी होणार आहेत.
गुजरातच्या सूरतमध्ये मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळी उपकरणं वाटली जाणार आहेत. तर 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअरचं वाटप करण्यात येणार आहे.
मोदींच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर, औषधांचं वितरण, रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत आणि स्वच्छता अभियान यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं. याशिवाय ‘नमो अॅप’वर एका कार्यशाळेचं आयोजन करणार आहे.
तर दुसरीकडे सूरतमध्ये एक टनापेक्षा जास्त वजनाचा आणि जगातील सर्वात उंच केक बनवण्या येणार आहे. हा केक पिरॅमिडच्या आकाराचा असणार आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या मुलींचा सन्मानही केला जाणार आहे.
===================================
अथांग अरबी समुद्रात लालबागचा राजा विसावला
मुंबई : तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. गिरगाव चौपाटीजवळ अथांग अरबी समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. यावेळी भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
लाखो भक्तांच्या उपस्थितीत आणि प्रचंड आतषबाजीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर सहभागी झाले होते.
लालबागचा राजा सकाळी साडेपाचच्या सुमारास गिरगावात दाखल झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती केली.
मग लालबागचा राजा सकाळी सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. प्रत्यक्ष पाण्याजवळ तराफ्यात चढवण्याची प्रक्रिया सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरु झाली.
तराफ्यावर चढवल्यानंतर सकाळी आठच्या सुमारास, तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
===================================
दगडूशेठ रात्री अडीच वाजता मार्गस्थ, सकाळी 8 ला निरोप
पुणे : विसर्जनासाठी मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास निघालेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, आज सकाळी आठच्या सुमारास झालं.
दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास निघाला. दरवर्षी दगडूशेठ गणपतीचं अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच्या सुमारास विसर्जन होतं. मात्र यंदा सुमारे तासभर उशीर झाला.
दगडूशेठ गणपतीच्या पुढे सार्वजनिक मंडळांचे बाप्पांचे असल्याने मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हायला वेळ लागला. सकाळी सातच्या सुमारास दगडूशेठ बाप्पा लक्ष्मीरोड चौकात दाखल झाला, तर साडेसातच्या सुमारास मिरवणूक अलका चौकात आली.
त्यापूर्वी कालच पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला होता.
ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. पावसाच्या व्यत्ययाला न जुमानता, पुण्यात सकाळीच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली, ती आजही कायम आहे.
===================================
तेलंगणातील रेल्वे ट्रॅक दुरुस्तीनंतर पुन्हा खचला, वाहतूक ठप्प
हैदराबाद: महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणातही मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाहामुळे तेलंगणातील विकाराबाद- सदाशिवपेठ दरम्यानच्या रेल्वे मार्ग काल वाहून गेला होता. त्यानंतर काल रात्री ट्रॅक दुरुस्तही करण्यात आला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा एकदा हा ट्रॅक खचला आहे.

सध्या हा ट्रॅक पुन्हा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे या मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल रात्री ट्रॅक दुरूस्त करण्यात आला होता. त्यानंतर चाचणीसाठी रेल्वे पाठवण्यात आली होती. त्याचवेळी हा ट्रॅक पुन्हा खचला.
दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा एकदा युद्धपातळी दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र, ट्रॅकखालील माती वाहून गेली आहे. त्यामुळे ट्रॅक दुरुस्ती करण्यास वेळ लागत आहे.
===================================
मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईः मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. परतीचा पाऊस जवळपास सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 39.84 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम उपनगरांत 37.93 मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात 36.37 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातं विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
===================================
संतप्त मातेनं मंत्री विष्णू सावरांना दारातूनच हाकललं
पालघर: पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना एका संतप्त मातेनं आपल्या दारातून परत पाठवलं. 30 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सागर वाघ या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता. त्यानंतर गेले 15 दिवस आदिवासी विकास मंत्री सावरा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली नव्हती.
आज ते भेटीसाठी गेले असता मृत मुलाच्या नाराज मातेनं मंत्री सावारांची भेट घेण्यास नकार दिला आणि त्यांना दारातूनच हाकलून लावलं.
पालघर जिल्ह्यातील या आदीवासी पाड्यांमध्ये बऱ्याचदा कुपोषित मुलं आढळून येतात. अनेकदा यामुळे काही मुलं दगावतातही. मात्र, योग्य वेळी सरकारकडून मदत मिळत नसल्याचा आरोप येथील आदिवासींकडून करण्यात येत आहे.
===================================
पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण
पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे यांना तीन जणांनी मारहाण केली. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मिरवणूक सुरु असताना काल ही घटना घडली.
मिरवणुकीवेळी मागे हटण्यावरुन सुरु झालेल्या या वादात तीघाजणांकडून कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे मागे लावलेल्या बॅरिकेट्सवर पडले. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाणप्रकरणी विनायक जांभूळकरला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघे आरोपी पळून गेले आहेत.
===================================
पुण्यात भाजप नगरसेवकावर गोळीबार, गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घटना
पुणे : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. कँटोन्मेट बोर्डचे भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर दोघांनी गोळीबार केला.
नगरसेवक विवेक यादव यांच्या तोंडाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
===================================
कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण
मुंबई : मुंबईसह देशभरात आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. मात्र आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी अभिनेता रणबीर कपूर, ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तर दुसरीकडे सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याला ऋषी कपूर यांनी मारहाण केली. शिवाय प्रतिक्रिया घेण्यासाठी रणबीर कपूरच्या गाडीजवळ गेलेल्या एका पत्रकाराला त्याने धक्काबुक्की केल्याचं कळतं.
गणपतीची आरती झाल्यानंतर पत्रकाराने रणधीर कपूर यांना प्रतिक्रिया विचारली. मात्र यावर रणधीर कपूर यांनी कोणतंही भाष्य न करता थेट पत्रकाराला मारहाण केली.
===================================
मल्ल्यांना भारतात परतण्यासाठी पासपोर्टची गरज नाही - परराष्ट्र मंत्रालय
- नवी दिल्ली, दि. 16 - बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी पासपोर्ट रद्द करण्यात आलेला असल्याने भारतात परतणं शक्य नसल्याचा केलेला दावा परराष्ट्र मंत्रालयाने खोडला आहे. विजय मल्ल्यांना खरंच भारतामध्ये परतायचं असेल तर आणीबाणी प्रमाणपत्राची (इमर्जन्सी सर्टिफिकेट) सोय उपलब्ध आहे. कोणत्याही नागरिकाला भारतामध्ये परतायचं असेल तर जवळच्या भारतीय दुतावासाशी किंवा उच्चायुक्तांशी संपर्क साधून आणीबाणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकतात अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
- =========================================


No comments:
Post a Comment