Tuesday, 27 September 2016

नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानची पोलखोल, घुसखोरीसाठी लष्कराकडूनच मदत 
२- पाकिस्तानला देण्यात आलेल्या 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्याचा विचार 
३- जगाच्या 90 टक्के भागाला प्रदूषित हवेचा फटका -जागतिक आरोग्य संघटना 
४- हिलरी क्लिंटन जिंकल्यास माझं समर्थन - डोनाल्ड ट्रम्प 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- रेल्वेच्या सुलभ शौचालयात महिलेचा विनयभंग
६- पाकिस्तानची पोलखोल, घुसखोरीसाठी लष्कराकडूनच मदत 
७- काटजू म्हणतात 'काश्मीर हवा असेल तर बिहार पण घ्या' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा 
९- ...तर मराठा समाजाचा उद्रेक अटळ, आयोजकांचा इशारा 
१०- मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'? 
११- छत्तीसगड - माजी मुख्यमंत्री अजित जोगींच्या ताफ्यातील गाडीने मोटरसायकलला दिली धडक 
१२- छत्तीसगड - फुलबर्गी येथे सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक 
१३- भुसावळ : पोलिस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस केले जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार 
१५- उत्तरप्रदेशमध्ये एका महिलेवर फेकलं एसिड 
१६- सोलापूर - कुरुल - कामती रोडवर अपघातात चार जणांचा मृत्यू. 
१७- जळगाव : नशिराबाद नजीक एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले. पैसे सुरक्षित. 
१८- नाशिक - सातपूर श्रमिकनगरमध्ये अज्ञातांकडून पाच चारचाकी गाड्यांची तोडफोड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- टोमॅटो 50 रुपये प्रती क्रेट विकण्याची नामुष्की 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=====================================

धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा

धुळ्यात मराठा समाजाच्या नगरसेवकाचा राजीनामा
धुळे : विविध ठिकाणी शांततेत मोर्चा निघत असताना आता मराठा समाजात राजीनामास्त्र सुरु झालं आहे. धुळ्याचे नगरसेवक रविराज पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पदाचा राजीनामा दिला आहे.
रविराज ज्ञानेश्वर पाटील हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. दोंडाईचा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून ते निवडून आले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्याचे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
धुळ्यात उद्या (28 सप्टेंबर) मराठा मूकमोर्चा मोर्चा होणार आहे. मात्र त्याआधीच पाटील यांनी नगरसेवक पद सोडलं आहे. आपल्या समाजाच्या मागणीसाठी नगरसेवकाने राजीनामा देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी.

=====================================

रेल्वेच्या सुलभ शौचालयात महिलेचा विनयभंग

रेल्वेच्या सुलभ शौचालयात महिलेचा विनयभंग
मुंबई: रेल्वे प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण रेल्वे शौचालयात प्रवासी महिलेचा विनयभंग करण्यात आला. धक्कादायक म्हणजे सुलभ शौचालयाच्या सफाई कामगारानेच विनयभंग केल्याचा आरोप आहे.
वसईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर ही घटना घडली.  याप्रकरणी महिलेने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
वसई रेल्वे पोलिसांनी सफाई कामगार प्रकाश माईकल डिसोजा या ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
काल दुपारी सव्वा बाराच्यादरम्यान प्रवासी महिला वसई स्टेशनवरील शौचालयाचा वापर करण्यासाठी आत गेली. त्यावेळी तिथे काम करणारा सफाई कामगार डिसोजा हा नशेत महिलेच्या मागून शौचालयात शिरला.
घाबरलेल्या महिलेने प्रसंगावधान ओळखून बाहेर धाव घेत, थेट वसई पोलीस ठाणे गाठलं. वसई रेल्वे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली.

=====================================
रेल्वेच्या सुलभ शौचालयात महिलेचा विनयभंग
मुंबई: रेल्वे प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण रेल्वे शौचालयात प्रवासी महिलेचा विनयभंग करण्यात आला. धक्कादायक म्हणजे सुलभ शौचालयाच्या सफाई कामगारानेच विनयभंग केल्याचा आरोप आहे.
वसईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर ही घटना घडली.  याप्रकरणी महिलेने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
वसई रेल्वे पोलिसांनी सफाई कामगार प्रकाश माईकल डिसोजा या ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
काल दुपारी सव्वा बाराच्यादरम्यान प्रवासी महिला वसई स्टेशनवरील शौचालयाचा वापर करण्यासाठी आत गेली. त्यावेळी तिथे काम करणारा सफाई कामगार डिसोजा हा नशेत महिलेच्या मागून शौचालयात शिरला.
घाबरलेल्या महिलेने प्रसंगावधान ओळखून बाहेर धाव घेत, थेट वसई पोलीस ठाणे गाठलं. वसई रेल्वे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली.
=====================================

पाकिस्तानची पोलखोल, घुसखोरीसाठी लष्कराकडूनच मदत

पाकिस्तानची पोलखोल, घुसखोरीसाठी लष्कराकडूनच मदत
नवी दिल्लीः दहशतवाद्यांना भारताच्या सीमेत घुसण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडूनच कशी मदत केली जाते, त्याची पोलखोल झाली आहे. सीमेवरील इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चार दहशतवाद्यांना भारताच्या सीमेत घुसण्यासाठी मदत करतानाची दृष्य कैद झाली आहेत.

दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली ही दृष्य जुलै महिन्यातील चोरगली बॉर्डर येथील आहेत. दहशतवाद्यांना मात्र भारतीय जवानांच्या नजरेतून निसटता आलं नाही. 11 जुलै रोजी पहाटे पावणे तीन वाजता ही घुसखोरी झाली.

दहशतवादी सीमेत घुसखोरी करत असल्याची माहिती भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला दिली. मात्र पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय जवानांचा हा दावा गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केलं. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांवर दबाव आणल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना घटनास्थळावरुन पळून जाण्यास मदत केली.

=====================================

सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार

सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार
सांगली : सांगलीत आज मराठा मोर्चा काढला जाणार आहे. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे काढले जात आहेत.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, 9 विभागीय पोलिस अधिकारी, 5 पोलिस उपअधीक्षक, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला आहे.

विश्रामबाग येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरवात होईल आणि राम मंदिर चौक येथे मोर्चाची समाप्ती होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद करण्यात आली आहे.

मोर्चासाठी हजारो महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलं आहे. या मोर्चात सीमेवरील कर्नाटकच्या गावांमधून तसंच कोल्हापूरमधूनही आंदोलक सहभागी होणार आहेत.

तसंच आजच्या मूक मोर्चात पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयंत पाटील, आर आर पाटील यांचे कुटुंबीय, सर्व आमदार आणि खासदार संजय पाटील हजेरी लावणार आहे.

=====================================

टोमॅटो 50 रुपये प्रती क्रेट विकण्याची नामुष्की

टोमॅटो 50 रुपये प्रती क्रेट विकण्याची नामुष्की
नाशिकः एकीकडे कांद्याचे भाव उतरल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कोबी आणि टोमॅटोही मातीमोल भावाने विकला जात आहे. येवल्यातल्या बाजारात टोमॅटो अवघा अडीच रुपये किलो तर कोबीला फक्त सव्वा रूपया किलोचा भाव मिळाला आहे. 20 किलोच्या टोमॅटो क्रेटला 50 रुपये आणि कोबीच्या क्रेटला फक्त 25 रुपये मिळत आहेत.

बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्य़ाला चहा पिता येईल एवढेही पैसे या कवडीमोल भावामुळे हातात पडले नाही. व्यापारी शेतकऱ्याकडून जरी मातीमोल दराने भाजीपाला विकत घेत असले तरी ग्राहकांना मात्र कोबी आणि टोमॅटोसाठी नेहमीप्रमाणेच दर द्यावा लागत आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची मनमानी पाहायला मिळत आहे.

=====================================

पाकमध्ये रेल्वेत चढण्यापासून भारतीय महिलांना रोखलं

पाकमध्ये रेल्वेत चढण्यापासून भारतीय महिलांना रोखलं
लाहोरः पाकिस्तानच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी दिल्लीला जाणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखलं. अनेकदा विनंती करुनही अधिकाऱ्याने कागदपत्रांवरुन अडवणूक केली, असं भारतीय महिलेने म्हटलं आहे.

समझोता एक्स्प्रेस लाहोर ते दिल्ली या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा चालवण्यात येते. कागदपत्र अपूर्ण असल्याचं सांगत अडवणूक केल्याने महिलांकडून वाघा रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन महिला भारतात जाऊ शकतात, असं अधिकाऱ्य़ाने सांगितलं.


=====================================

...तर मराठा समाजाचा उद्रेक अटळ, आयोजकांचा इशारा

...तर मराठा समाजाचा उद्रेक अटळ, आयोजकांचा इशारा
मुंबई : मराठा मोर्चाबद्दल सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मराठा सामाजाचा उद्रेक होऊ शकतो असा सरकारला इशारा देण्यात आला आहे. मराठा समाज मुक्ती मोर्चाच्या आयोजकांनी ही भूमिका घेतली आहे.
आतापर्यंत मराठा मोर्चे शांततेत निघाले आहेत, मात्र सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास मोर्चांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
मराठा मोर्चाची कोंडी फोडण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना?
एक पाऊल पुढे टाकून सरकार जिल्हा पातळीवर मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करायला तयार झालं आहे. मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.  एक मंत्री आणि दोन विरोधी पक्ष नेते यांचा या गटात समावेश असेल. हा गट जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन मराठा मोर्चा आयोजकांशी चर्चा करेल. यासंदर्भात लवकरच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
दरम्यान मराठा मोर्चे संपल्यानंतरच या मंत्रीगटाची स्थापना केली जाईल. त्यानंतरच चर्चा होणार असल्याचंही सरकारने सांगितलं. सगळे मोर्चे संपले की मग हे गट जिल्ह्यात जाणार आहेत.
सांगलीत आज मराठा मोर्चा
सांगलीत आज मराठा मोर्चा काढला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेला आहे. तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद केली गेली आहे.

=====================================

व्हाईट हाऊसच्या रेससाठी पहिलं वाकयुद्ध, हिलरींची ई-मेल प्रकरणावरुन कोंडी

व्हाईट हाऊसच्या रेससाठी पहिलं वाकयुद्ध, हिलरींची ई-मेल प्रकरणावरुन कोंडी
हॅम्पस्टीड: अमेरीकेच्या राष्ट्रअध्यक्षपदाची निवडणूक आता अंतिम टप्यावर पोहचली आहे. आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युक्तीवाद झाला. जवळपास दीड तास सुरु असलेल्या या चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा, अमेरिकेची दशा आणि दिशा या मुद्द्यांसोबतच काही वैयक्तिक जीवनातील विषयावरुनही आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. या चर्चेवेळी हिलरी क्लिंटन यांनी सरकारी कामांसाठी वैयक्तिक ई-मेल आयडी वापरल्याचे प्रकरण चांगलेच गाजले.

ट्रम्प कर्जबाजारी: हिलरी क्लिंटन
यावेळी हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांना कर्जबाजारी असल्याचा आरोप केला. हिलरी क्लिंटन यांनी उद्योग आणि टॅक्स रिटर्नचा प्रश्न उपस्थित करुन ट्रम्पनी 6 वेळा आपल्या उद्योगांचे दिवाळे काढले. त्यामुळे त्यांना कर्जदारांचा राजा घोषित केलं पाहिजे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्यावर टॅक्स रिटर्नचा हिशेब दिला नसल्याचा आरोप केला.


=====================================

No comments: