Monday, 26 September 2016

नमस्कार लाईव्ह २६-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- यूएनमध्ये पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी सुषमा स्वराज सज्ज 
२- भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका 
३- तीस फुटबॉल मैदानांएवढी चीनची महादुर्बीण अखेर कार्यरत 
४- दक्षिण जापानला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा धोका नाही. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार? 
६- मुंबई आयआयटी विद्यार्थांची गगनभरारी, 'प्रथम'चं यशस्वी उड्डाण
७- मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, मोदींनी ठणकावलं  
८- आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड 
९- वीस लाखांपर्यंतच्या व्यवसायाला करसूट 
१०- जी.एस.टी.; आता कामगार कायदयांत होणार मोठे बदल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- नाशकात भुजबळ समर्थकांची मोर्चाची तयारी, मेळाव्याला उदंड प्रतिसाद 
१२- मराठा मोर्चापूर्वी कोकणातील दोन शिवसेना नेत्यांची दिलजमाई 
१३- राज ठाकरे विझलेला दिवा, गांभीर्याने घेऊ नका : वारिस पठाण 
१४- पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती 
१५- अठरा जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर खुमखुमी कधी सिद्ध करणार ? - उद्धव ठाकरे 
१६- तमिळनाडूला पाणी सोडू शकत नाही- कर्नाटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- मांजरा धरण ओव्हरफ्लो, सहा दरवाजे उघडले 
१८- मुंबई; रिक्षाला आग लागल्याने 9 प्रवासी भाजले 
१९- दापोलीच्या समुद्र किनारी स्टंट, कार उलटून पर्यटकाचा मृत्यू 
२०- पिंपरी-चिंचवड; धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत 
२१- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात 
२२- मांजरा धरणाचे दरवाजे 5 वर्षांनी उघडले 
२३- जम्मू-कश्मीर: नियंत्रण रेषेजवळ गुरेझ येथे गोळीबाराचे आवाज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- 'सैराट'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार 
२५- कानपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, किवींची दमछाक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
======================================

मुंबई आयआयटी विद्यार्थांची गगनभरारी, 'प्रथम'चं यशस्वी उड्डाण

मुंबई आयआयटी विद्यार्थांची गगनभरारी, 'प्रथम'चं यशस्वी उड्डाण
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रथम’ उपग्रहाचं यशस्वी उड्डाण झालं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 9 वाजून 12 मिनिटांनी ‘प्रथम’ यशस्वीपणे अवकाशात झेपावला.
पीएसएलवी-सी35 या प्रक्षेपकातून आज वेगवेगळ्या 8 उपग्रहांसह ‘प्रथम’चं यशस्वी प्रक्षेपण केलं.
इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरु केली होती. त्या योजनेअंतर्गत हा उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणु मोजता येणार आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे.

======================================

मांजरा धरण ओव्हरफ्लो, सहा दरवाजे उघडले

मांजरा धरण ओव्हरफ्लो, सहा दरवाजे उघडले
बीड : मागील काही दिवसांपासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. मराठवाड्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने बीडमधील मांजरा धरण ओसंडून वाहू लागलं आहे. धरण 90 टक्क्यांहून अधिक भरल्याने सहा दरवाजे पहाटे उघडले आहेत.
तब्बल सहा वर्षांनी मांजरा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. याआधी 2010 मध्ये धरणाचे दरवाजे उघडले होते.
मांजरा धरणाच्या पाण्यावर तीन जिल्ह्यातील अनेक गाव अवलंबून आहेत. धरण भरल्याने या तीन जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. सध्या मांजरा धरणातून 147 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, धरणाखालील मांजरा नदीकाठच्या सर्व गावांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि केज या दोन्ही तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.

======================================

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?
नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतनं कंबर कसली आहे. पाकची खुमखुमी जिरवण्यासाठी 56 वर्षांपूर्वी झालेला सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या दृष्टीनं भारताच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारणमंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जी योजना आखली आहे, त्यावर आज दुपारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, तर पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधील आपल्या सभेत पाकिस्तानची खुमखुमी जिरवण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचं प्रयत्न सुरु असल्याचे सांगितलं होतं. यासाठी सिंधू नदीच्या प्रवाहाला ब्रेक लावूनच याची सुरुवात होऊ शकते.

======================================

यूएनमध्ये पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी सुषमा स्वराज सज्ज

यूएनमध्ये पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी सुषमा स्वराज सज्ज
न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्राच्या महासंघाच्या 71 व्या अधिवेशनात सुषमा स्वराज आज जगाला संबोधित करणार आहेत. पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाच लक्ष लागलं आहे.

उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 18 जवानांना आपल्या प्रणांची आहुती द्यावी लागली होती. त्यानंतर 21 तारखेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफांनी यांनी यूएनच्या व्यासपीठावरुन बोलताना, बुरहाण वाणी या दहशतवाद्याचा उल्लेख काश्मीरी नेता म्हणून केला. तसेच काश्मीरी नेत्याला भारतीय लष्करानं ठार असाही थोतांड आरोप केला. विशेष म्हणजे, काश्मीरला स्वतंत्र करणारच हे बोलायलाही ते यावेळी विसरले नव्हते. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा उघडा पाडतील याकडं सर्वाचं लक्ष लागलंय. संयुक्त राष्ट्र संघाच्या हॉलमध्ये सायंकाळी 7 ते 7.30 दरम्यान त्यांचे भाषण होणार आहे.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहे. त्यामुळे याचे पडसाद सर्वच व्यासपीठावरुन दिसून येत आहेत. शरिफांच्या या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोष लाट आहे. त्या असंतोषाला सुषमा स्वराज आज यूएनच्या व्यासपीठावर वाट मोकळी करुन देणार आहेत.

======================================

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याची मागणी जोर धरु लागली असताना, पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वर याने आगीत तेल ओतलं आहे.
अन्वरला बाहेरचा रस्ता
कोरोनेशन स्ट्रीट शोमधील अभिनेता मार्क अन्वरने ट्विटरवर भारतीयांबाबत अश्लाघ्य भाषेत ट्वीट केले. वांशिक भेदभाव निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी आयटीव्ही चॅनलने अन्वरवर कारवाई करत बाहेरचा रस्ता दाखवला.
मार्क अन्वर काय म्हणाला?
मार्क अन्वरने शिव्यांचा वापर करत भारतावर टीका केली. त्याने एका ट्वीटमध्ये म्हटलंय, “भारतीय आमच्या काश्मिरी बंधू-भगिनींना मारत आहेत. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी आणली पाहिजे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारत सोडलं पाहगिजे. पाकिस्तानी कलाकार भारतात का काम करत आहेत? त्यांना पैशावर जास्त प्रेम आहे का?”

======================================

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याची मागणी जोर धरु लागली असताना, पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वर याने आगीत तेल ओतलं आहे.
अन्वरला बाहेरचा रस्ता
कोरोनेशन स्ट्रीट शोमधील अभिनेता मार्क अन्वरने ट्विटरवर भारतीयांबाबत अश्लाघ्य भाषेत ट्वीट केले. वांशिक भेदभाव निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी आयटीव्ही चॅनलने अन्वरवर कारवाई करत बाहेरचा रस्ता दाखवला.
मार्क अन्वर काय म्हणाला?
मार्क अन्वरने शिव्यांचा वापर करत भारतावर टीका केली. त्याने एका ट्वीटमध्ये म्हटलंय, “भारतीय आमच्या काश्मिरी बंधू-भगिनींना मारत आहेत. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी आणली पाहिजे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारत सोडलं पाहगिजे. पाकिस्तानी कलाकार भारतात का काम करत आहेत? त्यांना पैशावर जास्त प्रेम आहे का?”

======================================

रिक्षाला आग लागल्याने 9 प्रवासी भाजले

रिक्षाला आग लागल्याने 9 प्रवासी भाजले
मुंबई: मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरची आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातले 9 जण भाजले आहेत. पण ऑटो रिक्षाची आसन क्षमता तीन असताना, 9 जण बसलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काल रात्री शिवाजीनगर कडून टिकळ टर्मिनर्सकडे जात होती. त्यावेळी रिक्षानं अचानक पेट घेतला.. सीएनजी गॅसची गळती झाल्यानं रिक्षानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिऴाली आहे. यात प्रकरणात एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.

कुंटुंबातील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या 8 जखमीमध्ये एकूण 3 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 5 मुलांमधील दोन महिन्यांची दोन मुलेही आहेत. हे कुंटुंब एका समारंभासाठी कर्नाटकला चालले होते.

पण तीन आसनी ऑटो रिक्षात 9 जण बसलेच कसे असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो आहे.

======================================

नाशकात भुजबळ समर्थकांची मोर्चाची तयारी, मेळाव्याला उदंड प्रतिसाद

नाशकात भुजबळ समर्थकांची मोर्चाची तयारी, मेळाव्याला उदंड प्रतिसाद
नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी नाशकात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पहिल्याच आवाहनात तब्बल अडीच हजार समर्थकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावल्याचं म्हटलं जातं.
शासनाने सुडबुद्धीतून भुजबळांवर कारवाई केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मा विरुद्ध नसून केवळ भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा राहणार असल्याचं रविवारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आलं.
मोर्चासाठी अडीच हजार वाहनं आणि लाखो रुपयांच्या निधीचं संकलन भुजबळ समर्थकांनी केल्याची माहिती आहे. औरंगाबाद रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉनमध्ये हा मेळावा पार पडला. भुजबळ समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी उद्यापासून राज्यभर बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत.

======================================

'सैराट'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार

'सैराट'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ‘सैराट’ला पुरस्कार मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय सिनेवर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जर्मनीतील लुकास  चित्रपट महोत्सवात सैराटनं दोन पुरस्कार पटकावले आहेत. ‘ऑडियन्स चॉईस’ अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि ‘स्पेशल मेन्शन’ अर्थात ‘विशेष उल्लेखनीय’ अशा दोन पुरस्कारांवर नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटानं मोहोर उमटवली आहे.
जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे पार पडलेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी बजावली आहे. आर्ची आणि परशाची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.

======================================

दापोलीच्या समुद्र किनारी स्टंट, कार उलटून पर्यटकाचा मृत्यू

दापोलीच्या समुद्र किनारी स्टंट, कार उलटून पर्यटकाचा मृत्यू
रत्नागिरी : समुद्रीकिनारी वेगानं गाडी चालवण्याचा स्टंट एका पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे. रत्नागिरीच्या दापोली समुद्र किनाऱ्यावर गाडी उलटून एकाचा मृत्यू झाला आहे.
समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना गाडी उलटल्यामुळे पर्यटकाचा मृत्यू झालाय. सागर मालुसरे असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर सागरला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळे नसती स्टंटबाजी करणं कसं जीवावर बेतू शकतं याचं उदाहरण समोर आलं.

======================================

धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत

VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत
पिंपरी-चिंचवड : धावत्या ट्रेनमधून उतरु नये अशा प्रकारच्या सूचना वारंवार देऊनही काही महाभाग विषाची परीक्षा घेतातच. लोणावळा रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे पोलिसांमुळे जीवनदान मिळालं आहे.
धावत्या काकिनाडा एक्स्प्रेसमधून उतरताना एक तरुण आणि तरुणी प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. तरुण रेल्वेपासून लांब फेकला गेला तर तरुणी मात्र रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकली.
ही दृश्य पाहताना प्लॅटफॉर्मवर उपस्थितांनी क्षणभर डोळे मिटले. मात्र फलाटावरील एका पोलिसांनी चपळाई दाखवत त्या तरुणीला बाहेर खेचलं. अंगावर शहारा आणणारा तो प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलचं नाव पवन तायडे असून पोलीस नाईक राहुल मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाडही मदतीला धावून गेले.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर आली तेव्हा सकाळी साडेनऊच्या
सुमारास हा अपघात घडला.

======================================

मराठा मोर्चापूर्वी कोकणातील दोन शिवसेना नेत्यांची दिलजमाई

मराठा मोर्चापूर्वी कोकणातील दोन शिवसेना नेत्यांची दिलजमाई
मुंबई : मराठा मोर्चाच्या तयारीपूर्वी शिवसेनेत कोकणातील दोन दिग्गज नेत्यांची दिलजमाई झाली आहे. सर्व जुन्या वादांवर पडदा टाकून नव्याने सुरुवात करण्याचा निश्चय केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.
अनंत गीतेंच्या मुंबईतल्या विलेपार्लेमधील कार्यालयात रामदास कदम यांच्या अनेपक्षित हजेरीमुळे कोकणातील शिवसेनेच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या मध्यस्थीने कदम यांनी अनंत गीते यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांच्या प्रचाराला रामदास कदम यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांच्यातील सुप्त संघर्षाची चर्चा चांगलीच रंगली. गीतेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना रामदास कदम यांचा पाठिंबा असल्याचीही जोरदार चर्चा होती.
या चर्चांमुळे कोणातील शिवसैनिक संभ्रमित अवस्थेत होते. मात्र आता कोकणातून मराठा मोर्चाची तयारी सुरु झाली असून कोकणातील मराठा नेता म्हणून रामदास कदम यांना पक्षश्रेष्ठींकडून तयारीला लागण्याचे आदेश आल्याची सूत्रांची माहिती आहे.  यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही व्यासपीठावर एकत्र येणं टाळणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिलजमाई झाल्याचं समोर आलं आहे.
रत्नागिरीतील चिपळूणमध्ये 16 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकणातील हा पहिलाच मराठा मोर्चा असेल. कोपर्डीतील अत्याचाराचा निषेध आणि अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत.

======================================

मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, मोदींनी ठणकावलं

मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, मोदींनी ठणकावलं
कोळीकोड : मुस्लिमांचा तिरस्कार करु नका, तर त्यांचा स्वीकार करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुस्लीम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहू नका, असं वक्तव्यही मोदींनी कोळीकोडमध्ये केलं आहे.
मुस्लिमांच्या मतांना केवळ बाजारातील वस्तू समजणाऱ्या विरोधकांना मोदींनी धारेवर धरलं. समाजामध्ये एकात्मतेची भावना कायम असली पाहिजे. राज्यकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मोदींनी सांगितलं. केरळमधल्या कोळीकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

======================================

राज ठाकरे विझलेला दिवा, गांभीर्याने घेऊ नका : वारिस पठाण

राज ठाकरे विझलेला दिवा, गांभीर्याने घेऊ नका : वारिस पठाण
सोलापूर : ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहेत, त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये’, अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. 48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं? असा सवालही पठाण यांनी विचारला आहे.
‘माध्यमांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नये. ज्यांना निवडून आलेला एक आमदारही सांभाळता येत नाही त्यांनी उगाच मोठ्या घोषणा करु नयेत’, असा हल्लाबोल वारिस पठाण यांनी राज ठाकरेंवर केला.
सोलापुरात पत्रकारांशी बोलताना पठाण यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेवर सडकून टीका केली. ‘मराठा आरक्षण जरुर द्या, पण मुस्लिम आरक्षण कधी देणार? न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जाणूनबुजून मुस्लिम आरक्षण नाकारत
आहे’, असंही पठाण म्हणाले.
‘सीमेवर जवान शहीद होत आहेत, कुठे आहेत अच्छे दिन आणणारे?’ असा प्रश्न विचारत ‘थोडे दिवस थांबा आम्ही काय करतो ते पहा’ असं वक्तव्यही वारिस पठाण यांनी केलं.

======================================

कानपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, किवींची दमछाक

कानपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, किवींची दमछाक
कानपूर : विराट कोहलीची टीम इंडिया कानपूर कसोटीत विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांचं आव्हान दिलं आहे.
रविचंद्रन अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर किवी टीमची अवस्था चौथ्या दिवसअखेर 4 बाद 93 अशी बिकट झाली आहे. त्यामुळे कानपूर कसोटीवर भारताची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ल्यूक रॉन्की 38 आणि मिचेल सॅन्टनर 8
धावांवर खेळत होता.
टीम इंडियानं दुसरा डाव 5 बाद 377 धावांवर घोषित केला होता. भारताकडून चेतेश्वर पुजारानं 78 तर मुरली विजयनं 76 धावा केल्या. रोहित शर्मानं नाबाद 68 आणि रविंद्र जाडेजानं नाबाद 50 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनंही 40 धावा केल्या.

======================================

पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती

पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती
Update : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाचा समारोप

======================================
======================================
======================================

No comments: