Friday, 9 September 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- आल्प्समध्ये पर्वतामध्ये केबल कार बिघडली, पर्यटकांची दुस-यादिवशी सुटका
२- 'आयफोन-7'ची खिल्ली उडवणारा व्हिडीओ झाला व्हायरल
३- उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी
४- 26/11 हल्ल्यातील आरोपीविरोधात पाकिस्तानला मिळेना पुरावा
५- पाकला एकाकी पाडा, निर्बंध घाला - नरेंद्र मोदी
६- अमृता फडणवीस यांचा रॅम्प वॉक
७- नेताजींचा मृत्यू झाला विमान अपघातातच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- नितिन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह
९- पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम सुरू होणार - नितीन गडकरी
१०- तुम्ही फार काळ कायदा मोडू शकत नाही!
११- सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर
१२- ऊर्जित पटेल यांना सुरक्षा रक्षकाने गेटवरच अडविले
१३- महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य
१४- कावेरी नदीच्या पाण्यावरुन सुरु असलेला वाद चिघळला, कर्नाटकने तामिळ चॅनेल्सना ब्लॉक केलं. 
१५- स्पेनमध्ये ट्रेन रुळावरुन घसरल्याने अनेकांचा मृत्यू  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- खड्ड्यांचे विघ्न अद्यापही कायमच
१७- बेस्ट प्रवासी संख्या वाढवणावर
१८- दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला
१९- वरळीत पोलिसाच्या अंगावर गाडी घातली
२०- भांडणानंतर विवाहितेची हत्या, पती गजाआड
२१- मीरारोडच्या सृष्टीमध्ये कागदी लगद्याची गणेशमुर्ती
२२- अहमदनगर: सनातन संघटनेवर बंदी घाला- राधाकृष्ण विखे पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- 30 वर्षानंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला अ वर्ग दर्जा  
२४- हेअरबँड लावला नाही म्हणून अंबरनाथ येथील शाळेतील विद्यार्थीनीला १२० उठाबशांची शिक्षा 
२५- जालना; गणपती बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डवर हल्ला 
२६- कोलकातामधील प्रेसिडन्सी युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयाला आग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- केईचा खळबळजनक विजय
२८- रिओ पॅरालिम्पिकमध्ये झांझरियाने उंचावला तिरंगा
२९- रोहितचा मुंबई संघात समावेश
३०- भारतापुढे नदाल-फेररचा अडथळा
३१- भारत ‘अ’ २३० धावांत गारद
३२- पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
====================================

महापालिकेने कपिल शर्माला अगोदरच बजावली होती नोटीस

  • First Published :09-September-2016 : 14:32:38

  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 9 - आपल्या कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप करणा-या कॉमेडी किंग कपिल शर्माचा वार त्याच्यावर उलटताना दिसत आहे. ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे ते बांधकाम अवैध होतं, आणि त्यासंबंधी 16 जुलै 2016 रोजी नोटीसदेखील पाठवली होती अशी माहिती महापालिकेने दिली आहे. 
     
    या नोटीसमध्ये कपिल शर्माला बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. या नोटीसची एक प्रत वर्सोवा पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. महापालिकेने दिलेल्या माहितीमुळे तक्रार करुन कपिल शर्माने आपल्याच अडचणी वाढवल्याचं दिसत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनीदेखील कपिल शर्माच्या ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा केला आहे. वर्सोव्यामध्ये या ऑफिसचं बांधकाम सुरु आहे. 

====================================

आंघोळीचा व्हिडीओ शूट करुन बॉसचा महिलेवर बलात्कार

  • First Published :09-September-2016 : 16:35:12

  • ऑनलाइन लोकमत 
    बंगळुरु, दि. ९ -  फिल्ड ट्रीपच्या बहाण्याने ऑफीसमधील महिला सहका-याला कोदगू येथे नेऊन बॉसने  तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एप्रिलमध्ये घडली त्यावेळी २३ वर्षीय पीडित महिलेसोबत तिचा एका वर्षाचा मुलगाही होत. पीडित महिला बांधकाम साहित्याचा पुरवठा करणा-या कंपनीत कस्टमर केअर अधिकारी म्हणून जानेवारी महिन्यात रुजू झाली होती. 
     
    येलहंका कोगीलू येथे या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत रुजू झाल्यानंतर दोन महिन्यांनी कंपनीच्या टी. विवेकानंद या पार्टनरने लैंगिक सुखासाठी सदर महिलेला त्रास देणे सुरु केले होते. पीडित महिलेला हा त्रास असहय्य झाल्यानंतर तिने सदर पार्टनरला पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. 
     
    त्यानंतर बॉसने महिलेला जाळण्यात ओढण्यासाठी फिल्ड ट्रीपचा कट रचला. कंपनीची कोदगू येथे फिल्ड ट्रीप ठेवली. या ट्रीपला येणे प्रत्येक कर्मचा-याला बंधनकारक केले. पीडित महिलेची आई कोदगू येथे रहात असल्याने ती तयार झाली. अन्य बिझनेस पार्टनरही सोबत असल्याने पीडित महिलेला कोणताही संशय आला नाही. 
     
    तिने आपल्या वर्षाच्या मुलालाही सोबत घेतले. आरोपीने विराजपेठ येथे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक रुम बुक केली. आरोपीने पीडित महिलेला त्या रुममध्ये रहायला भाग पाडले. आरोपी आणि त्याचा बिझनेस पार्टनरही त्याच रुममध्ये थांबला होता. 
    दुस-यादिवशी सकाळी दुसरा बिझनेस पार्टनर कामानिमित्ताने तातडीने बंगळुरुला निघून गेला. आरोपीने हिच संधी साधून घेतली. त्याने पीडित महिलेच्या आंघोळीचे चित्रीकरण केले. त्याने महिलेला तो व्हिडीओ नव-याला दाखवण्याची आणि ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी दिली. 
     
    त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पुढचे काही दिवस या महिलेवर अशीच जबरदस्ती सुरु होती. आरोपीने व्हिडीओ अपलोड केला तर बदनामी होईल या भितीने तो तिचे लैंगिक शोषण करत होता. अखेर या महिलेच्या पतीला हे प्रकरण समजले. मात्र त्याने परिस्थिती समजून घेतली व पत्नीला साथ दिली. त्यानंतर दोघांनी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. 

====================================

कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

  • First Published :09-September-2016 : 17:24:05

  • योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
    कपिल शर्मांनी मुंबई महापालिकेच्या अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून केली काय, नी लगेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शर्मांच्या आलिशान इमारतीच्या बांधकामप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्याचा दावा शर्मांनी केला आहे.
    शर्माजी, महाराष्ट्रातली जनता असंख्य कैफियती घेऊन मंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, जागांच्या भावांचे प्रश्न असे सगळे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांची तंत्रज्ञानाप्रती असलेली रूची बघून अनेकांनी ट्विटर अकाउंटपण उघडली आणि जनतेच्या कैफियती मांडत मुख्यमंत्र्यांना टॅग पण केलं. पण, तक्रारीची दखल किंवा रिट्विट तर सोडा, साधं लाइक पण नाही हो ते करत...
    पण तुम्ही एक कैफियत काय मांडली सगळं मंत्रालय नी मुंबई महापालिकेची फोर्टातली इमारत कामाला लागली की हो! 
    तर आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना! माध्यम काही असो, व्यथांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं महत्त्वाचं, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता यावर आमचा विश्वास बसला आहे

====================================

बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल पहिलेच गांधी

  • First Published :09-September-2016 : 11:40:00Last Updated at: 09-September-2016 : 12:25:38

  • - ऑनलाइन लोकमत
    अयोध्या, दि. 9 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्येच्या दौरा करत 26 वर्षापुर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. राहुल गांधी यांनी सकाळी हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर महंत ज्ञानदास यांची भेट ते घेणार आहेत. विश्व हिंदू परिषदेविरोधात भुमिका मांडल्याने महंत ज्ञानदास चर्चेत आले होते.
     
    किसान यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून देवरिया ते दिल्ली असा सुमारे २५०० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी या यात्रेमध्ये करणार आहेत. त्यामध्ये ते विविध ठिकाणी खाट सभा घेणार असून, वेगवेगळ्या लोकांनाही भेटणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीकडे लक्ष ठेवूनच राहुल गांधींच्या दौ-याचे आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

====================================

No comments: